#भिवंडी लोकसभा उमेदवार कपिल पाटील
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 10 months ago
Text
कपिल पाटलांनी घेतली किसन कथोरेंची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाटलांनी सांगितलं...
ठाणे (भिवंडी): भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०४ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी तीनशेहून अधिक जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २०० ते २०५ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास ३० जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर तर उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २६ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी १९ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून तिसर्या फेरी अखेर महायुतीचे संदीपान भुमरे आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसर्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसर्या क्रमांकावर आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत. जालना मधून महायुतीचे रावसाहेब दानवे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महायुतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा - गोंदिया मधून महायुतीचे सुनिल मेंढे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसर्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे, नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महायुतीचे कपिल पाटील, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महाविकास आघाडीचे निलेश लंके, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, ��ोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महायुतीचे धैर्यशील मोहिते पाटील, तर रत्नाग��री - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, इशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महायुतीचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत. 
****
उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. अमेठी मतदरासंघातून काँग्रेसचे किशोरी लाल आघाडीवर, तर भाजप नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दुसर्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली इथून तसंच केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आघाडीवर आहेत.
****
मतमोजणीच्या सर्व फेऱ्यांचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर वर तसंच व्होटर हेल्पलाइन ॲपवर उपलब्ध आहे. आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. 
****
मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरुन निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सायंकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी विशेष बातमीपत्र प्रसारित होईल. आमच्या यूट्यूब चॅनलवर तसंच सामाजिक माध्यमांवर ही बातमीपत्रं आपल्याला ऐकता येतील. त्याशिवाय, निवाडा जनतेचा हा निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम देखील सादर होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच छत्रपती संभाजीनगर इथले राजकीय विश्लेषक या कार्यक्रमात सहभागी होऊन, निवडणूक निकालाबात माहिती देत आहेत.
****
राज्यातली पाणी टंचाई, बी - बियाण्यांचा तुटवडा, शेतकरी आत्महत्या, पुणे अपघातप्रकरणी सरकारी अधिकारी डॉक्टरांचा समावेश, या विषयांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला जबाबदार ठरवलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातली पाण्याची टंचाई पाहता युती सरकारने आणलेली जलयुक्त शिवार दोन ही योजना फोल ठरल्याचं दानवे म्हणाले.
****
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असून या आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचं लातूर जिल्हा प्रशासनाने कळवलं आहे. या काळात विना परवानगी मिरवणूक काढणं, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास मनाई असून या नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाने क���लं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 03 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज भरण्याची मुदत आज संपत आ��े. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून, सहा मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पाचव्या टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे.
****
काँग्रेसनं उत्तरप्रदेशमधल्या बहुप्रतिक्षित रायबरेली मतदार संघातून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर केली असून, आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर अमेठीतून काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा निवडणूक लढवणार आहेत.
****
धुळे लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुर रहमान यांनी आज नामांकन पत्र दाखल केलं.
पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम, ठाणे लोकसभा मतदारसंघातले शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के, तर भिवंडीतून महायुतीचे कपिल पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
****
निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे, तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रत्नागिरी इथं रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे, तसंच सांगली जिल्ह्यातल्या विटा इथं संजय पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असून, आज संध्याकाळी हातकणंगले इथं ते जाहीर सभा घेणार आहेत. गडकरी यांच्या उपस्थितीत उद्या महायुतीचा मेळावा होणार आहे.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सात तारखेला अहमदनगर आणि नंदुरबार इथं सभा घेणार आहेत.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली इथं प्रचारसभा घेणार आहेत.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज लातूर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारात सहभाग घेतला. यावेळी वार्ताहतांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप सरकारवर टीका केली.
****
बारामती मतदारसंघात गृह मतदानाची प्रक्रिया सुरु झाली असून, काल बारामती तालुक्यातल्या खुटवड गाव इथल्या ८९ वर्षाच्या महिला मतदारानं प्रथमच घरून मतदान केलं. रत्नागिरी शहरातल्या आरोग्य मंदिर परिसरातल्या ८७ वर्षांच्या महिला मतदारांनीही घरून मतदान केलं आणि या सुविधेबद्दल आभार मानले. लातूर तसंच उस्मानाबाद मतदारसंघातही गृह मतदान सुरु आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या तीन हजार ६१७ मतदान केंद्रावरच्या स्वच्छता मोहीमेला काल सुरुवात झाली. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोरामणी इथल्या मतदान केंद्र परिसरात स्वतः हातात झाडू घेऊन या स्वच्छता मोहिम सुरुवात केली. ग्रामीण भागातल्या २ हजार ३६१, तर शहरी भागातल्या १ हजार २५६ मतदान केंद्रावर ही स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात पुढील दीड महिना जलसंधारण कामांची मोहिम राबवण्याचे निर्देश जि��्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यावर्षी सात जून पासून पेरणी न करता पंधरा दिवस उशीरा पेरणी करण्याच्या सूचना कृषी विभागानं दिल्या आहेत.
****
वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा - नीट येत्या पाच तारखेला होणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या एकूण ५६ परीक्षा केंद्रावर २२ हजार २७९ विद्यार्थी ही परिक्षा देणार आहेत. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेअन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.
****
भंडारा वनविभागात अड्याळ वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या बेतात असलेल्या शिकाऱ्याला वनविभागाने काल अटक केली. या परिसरात वन कर्मचारी हे गस्तीवर असतांना ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या घरातून अस्वलाची दोन नखं जप्त करण्यात आली. आरोपीला  न्यायालयात हजर केलं असता, त्याला चार दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
****
गेल्या ३० एप्रिलला छत्तीसगडमधल्या नारायपूर जिल्ह्यातल्या अबुझमाड जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले. यात गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत वरिष्ठ नक्षल नेता जोगन्ना आणि पत्नी संगीता आत्राम यांच्यासह चार जणांचा समावेश आहे. जोगन्ना हा वरिष्ठ नक्षली असून, तो स्पेशल झोनल कमिटी मेंबर होता. त्याच्यावर १९६ गुन्हे दाखल होते. शासनाने त्याच्यावर २५ लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांदरम्यान सामना होणार आहे. मुंबईत वानखेडे मैदानावर संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes