Tumgik
#बिल्किस बानो प्रकरणाची सुनावणी
marathinewslive · 2 years
Text
बिल्किस बानो प्रकरण: दोषींच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयाची गुजरातला नोटीस
बिल्किस बानो प्रकरण: दोषींच्या सुटकेवर सर्वोच्च न्यायालयाची गुजरातला नोटीस
गुजरात दंगलीत जेव्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला तेव्हा बिल्किस बानो 21 वर्षांची आणि पाच महिन्यांची गर्भवती होती. नवी दिल्ली: २००२ च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी दोषी ठरलेल्या ११ जणांच्या सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गुजरात सरकारचे उत्तर मागवले. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांना या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २४ ऑगस्ट २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणामधे फरीदाबाद इथं १३३ एकर क्षेत्रात उभारलेल्या सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या अमृता रुग्णालयाचं लोकापर्ण करणार आहेत. पंजाबमधे मुल्लामपूर इथं उभारलेल्या होमीभाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचं लोकापर्णही त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओ तसंच भारतीय नौदलानं, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी केली. ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावरून ही चाचणी घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल सर्व संबधितांचं अभिनंदन केलं आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय नौदलाची आकाशातील विविध अस्त्र नेस्तनाबूत करण्याची क्षमता वाढणार असल्याची माहिती, डीआरडीओचे प्रमुख डॉ.जी. सतीश रेड्डी यांनी दिली आहे.
****
गुजरातमधल्या बिल्किस बानो सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या ११ दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी या प्रकरणाची सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.
****
औरंगाबाद इथं वीजचोरी विरोधी मोहिमेत काल शिवाजीनगर भागात १६ जणांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अंदाजे १ लाख रुपयांपर्यंतची वीजचोरी उघडकीस आल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
जालना औद्यगिक वसाहतीमधल्या काही स्टील कंपन्यांवर वस्तु आणि सेवा कर विभागाच्या पथकानं काल छापे मारले. कर चुकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
****
जॉर्जिया इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ३ सुवर्ण आणि २ रौप्यपदक मिळवलेल्या विजेत्यांचा काल मुंबईल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात गौरव करण्यात आला. १५ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं  पदकतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला आहे .
****
बी डबल्यू एफ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत, भारतच्या सायना नेहवालनं उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. काल झालेल्या सामन्यात तीने हाँगकाँगच्या चेयुंग एनगॅनचा २१-१९, २१-१९ असा पराभव केला.
****
0 notes