#प्रसिद्ध रामलीला
Explore tagged Tumblr posts
Text
खेकड़ा नगर के विभिन्न रास्तों पर हुआ राम बारात का भव्य स्वागत
बागपत, उत्तर प्रदेश। विवेक जैन। हर वर्ष की भॉंति इस वर्ष भी श्री बालाजी रामलीला कमेटी खेकड़ा द्वारा खेकड़ा नगर में भगवान श्री राम की भव्य बारात को बड़े ही धूमधाम और हर्षोल्लास के साथ निकाला गया। रामबारात में क्षेत्र की जानी-मानी हस्तियों ने शिरकत की। रामलीला के पदाधिकारियों ने भगवान श्री राम जी और लक्ष्मण जी की आरती उतारकर राम बारात का शुभारम्भ किया। राम बारात खेकड़ा नगर के विभिन्न मार्गो से होती हुई…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणूक प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक-प्रचारसभांसोबत प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठकांवर उमेदवारांचा भर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हिंगोलीतल्या सभेत काँग्रेसवर कडाडून टीका;तर काँग्रेसकडून भाजपला जातनिहाय जनगणनेची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता पथकाकडून १९ किलो सोन्यासह ३७ किलो चांदी जप्त
आणि
भारत-दक्षिण आफ्रिका संघादरम्यान टी - ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज चौथा आणि शेवटचा सामना
****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह स्थानिक छोट्या पक्षाचे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा भर दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने रिक्षांवर भोंगे लावून प्रचार करण्याला जवळपास सर्वच उमेदवारांनी पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज हिंगोली इथं रामलीला मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. महायुती सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतांनाच, शहा यांनी काँग्रेस पक्षावर कडाडून टीका केली. काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० पुन्हा एकदा लागू करण्याचं आश्वासन काँग्रेस देत आहे, परंतु गांधी घराण्याची चौथी पिढीही हे काम करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. हिंदुत्वाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शहा यांनी टीका केली.
दरम्यान, शहा यांचं हिंगोलीत आगमन होताच, निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मतदारांचं समर्थन मिळत नसल्याने, काँग्रेस पक्ष मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप, केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला आहे. ते आज गडचिरोली जिल्ह्यात अहेरीचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम आणि गडचिरोलीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप बदलणार आहे, ��सा खोटा प्रचार कॉग्रेस करत आहे, परंतु काँग्रेसनेच अनेकदा घटनेची मोडतोड केल्याचं गडकरी म्हणाले.
****
जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बालत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनेच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, असं चेन्निथला यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. गेल्या १९ वर्षात आम्ही काय केलं यावर ही पुस्तिका असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर मनसेच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे वेळेअभावी ही सभा न घेता मतदार संघांना प्रत्यक्ष भेटी देणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विकासाबाबतच्या ब्लू प्रिंटवरून आपल्याला हिणवलं गेलं, त्या ब्लू प्रिंट मधील प्रश्नांचाच या जाहीरनाम्यात समावेश केल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. उद्या सायंकाळी आंबेडकर यांची आमखास मैदानावर प्रचार सभा होणार आहे.
****
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठीचं प्रत्यक्ष मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून नियोजन, अंमलबजावणी, सोयीसुविधांच्या पूर्ततेसोबतच जनजागृतीसाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ‘मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम’-स्वीप उपक्रमांतर्गत पारंपरिक माध्यमांसोबतच अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर मतदानाचे संदेश प्रकाशित करण्यात आले आहेत. तर, २७ लाख बँक ग्राहकांना मतदानाचं आवाहन करणारे लघूसंदेश -एसएमएस पाठवण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मतदारांच्या सोयीसाठी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीसाठी मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गासह हार्बर रेल्वे मार्गावरून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी विशेष मोफत बस सेवाही दिली जाणार आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात मतदान दिवसाच्या एक दिवस आधी तसंच मतदानाच्या दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे.
****
येत्या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. जालना इथला अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला कैवल्य जोशी या नवमतदारानेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे –
बाईट – कैवल्य जोशी, नवमतदार
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सातारा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५५ वी जयंती आज सर्वत्र भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीही आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसद भवन परिसरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली, तसंच आकाशवाणीवरून नागरिकांना संबोधित करत, जनजातीय अर्थात आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गुरु नानक जयंतीनिमित्त नांदेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्यासह विविध गुरुद्वाऱ्यांमध्ये शबद, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत.
कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमाही आज साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तुलसी विवाह सोहळ्याची आज सांगता होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त स्थिर सर्व्हेक्षण पथकानं काल रात्री सिल्लोड मतदार संघात निल्लोड फाटा इथं १९ किलो सोने आणि ३७ किलो चांदी जप्त केली. याची किंमत अंदाजे १९ कोटी रुपयांची आहे, असं आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकं आणि स्थिर निगराणी पथकांनी जवळपास ४२ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली. या बाबत पुढची सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
****
धुळे जिल्हात आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या एक महिन्यात ‘सी-व्हिजिल ॲप’ वर एकूण ५४ त���्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी ३० तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून २४ तक्रारी चुकीच्या असल्याचं समोर आलं, यापैकी ६ तक्रारी जिल्हा स्तरावर तर १८ तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर फेटाळण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान शांततेत आणि प्रलोभनमुक्त होण्यासाठी राज्य सीमेवरील तपासणी नाक्यावर कडक तपासणी करावी असे निर्देश केंद्रीय निवडणूक पोलीस निरिक्षक अभिषेक मिना यांनी दिले आहेत. मिना यांच्या अध्यक्षतेखाली आज धुळ्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन-एकनं आघाडीवर आहे.
****
गोव्यातील पणजी इथं होणाऱ्या ५५ व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अर्थात ‘इफ्फी’मध्ये झळकण्याचा मान ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा होणार आहे.
****
0 notes
Text
पप्पू यादव को लेकर 'इंडिया' में खेल शुरू, राजेश रंजन के नामांकन की डेट बढ़ाने में छिपा राज
पटना: बिहार की राजनीति में पप्पू याव के नाम से प्रसिद्ध राजेश रंजन ने अपनी जन अधिकार पार्टी (JAP) का हाल ही कांग्रेस में विलय कर दिया था। वे पूर्णिया सीट से लोकसभा का चुनाव लड़ना चाहते हैं। चुनाव की तैयारी तो उन्होंने विलय के पहले से ही शुरू कर दी थी, लेकिन वे अपनी जीत सु��िश्चित करने में कोई कमी नहीं छोड़ना चाहते थे। यही वजह रही कि उन्होंने 'इंडिया' अलायंस का राष्ट्रीय स्तर पर नेतृत्व करने वाली कांग्रेस के साथ जाना मुनासिब समझा। कांग्रेस नेतृत्व ने विलय की बातचीत में उनकी पूर्णिया से उम्मीदवारी का समर्थन भी किया। लालू ने डाला पप्पू की राह में अड़ंगा ! पप्पू यादव को आशंका थी कि कांग्रेस के टिकट पर वे पूर्णिया से चुनाव लड़ते हैं तो कहीं आरजेडी सुप्रीमो कोई व्यवधान न खड़ा कर दें। यही वजह रही कि JAP के कांग्रेस में विलय की पूर्व संध्या पर वे लालू और उनके बेटे तेजस्वी यादव से मिलने राबड़ी देवी के आवास पहुंच गए। जैसी तस्वीरें और बयान उन्होंने सोशल मीडिया पर पोस्ट किए, उससे लगा कि सब कुछ सही दिशा में जा रहा है। तब तक उन्हें इसका तनिक आभास नहीं था कि लालू उनके साथ खेल की पहले से प्लानिंग कर चुके हैं। इसका तो रहस्य तब उजागर हुआ, जब जेडीयू छोड़ आरजेडी जॉइन करने वाली बीमा भारती ने सोशल मीडिया पर सिंबल लेते हुए तस्वीर पोस्ट की। पप्पू यादव ने लालू पर आरोप लगाया जब यह चर्चा आम हो गई कि आरजेडी ने बीमा भारती को पूर्णिया से ही चुनाव लड़ने का सिग्नल दिया है तो पप्पू यादव सामने आए। उन्होंने लालू यादव पर आरोप लगाया कि लालू की बात नहीं मानी, इस��िए ऐसा हुआ है। पप्पू की मान��ं तो लालू ने उनसे JAP का विलय आरजेडी में करने का प्रस्ताव दिया था। साथ ही पप्पू को पूर्णिया के बजाय मधेपुरा से चुनाव लड़ने की सलाह दी थी। यानी लालू का प्रस्ताव अस्वीकार करने की वजह से ही पूर्णिया सीट कांग्रेस के खाते में नहीं गई। पप्पू की पूर्णिया से ही लड़ने की जिद उसके बाद कभी प्रेस कॉन्फ्रेंस कर तो कभी सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर पप्पू ने यह संदेश देना शुरू किया कि कुछ भी हो जाए, वे पूर्णिया से ही चुनाव लड़ेंगे। उन्होंने तो भारी मन से भावुक होकर यहां तक कह दिया कि मर जाना पसंद करेंगे, पर पूर्णिया नहीं छोड़ेंगे। हां, वे यह भी दोहराते रहे कि कांग्रेस का झंडा लेकर ही वे चुनाव मैदान में उतरेंगे। हालांकि यह तभी संभव है, जब कांग्रेस से बगावत कर वे चुनाव लड़ें। फिर वे कांग्रेस का झंडा लेकर मैदान में उतरने की बात कैसे और क्यों कह रहे हैं! यह तभी संभव है, जब फ्रेंडली फाइट की कांग्रेस हरी झंडी दिखाए। पप्पू ने नोमिनेशन की तय तारीख बढ़ाई पप्पू यादव ने नामांकन का पर्चा दाखिल करने की तारीख भी दो अप्रैल घोषित कर दी। हालांकि अब उन्होंने 'X' पर जानकारी दी है कि उनके चहेते देश के कई हिस्सों में हैं। वे नामांकन के दिन मौजूद रहना चाहते हैं। इसलिए वे अब दो के बजाय चार अप्रैल को नामांकन दाखिल करेंगे। साथ ही उन्होंने पलटी मारते हुए लालू को अभिभावक बताया है। उनसे पूर्णिया पर फैसला बदलने का अनुरोध भी किया है। नामांकन टालने में छिपा है असली 'राज' पप्पू ने जितनी सहजता से नामांकन की तारीख टालने की बात बताई है, वह पूरा सच नहीं है। सच यह है कि अब भी उन्हें आरजेडी का फैसला बदलने की उम्मीद है। कांग्रेस में वे गए ही इस भरोसे पर थे कि उन्हें पूर्णिया से चुनाव लड़ने के लिए पार्टी उन्हें सिंबल देगी। कहा जाता है कि प्रियंका गांधी और राहुल गांधी ने इसके लिए पप्पू को आश्वस्त किया था। उन्हीं दोनों की सलाह पर वे लालू और तेजस्वी से मिलने भी गए थे। टिकट बंटवारे में लालू ने जिस तरह मनमानी की है, उससे कांग्रेस नेतृत्व नाराज है। इसकी झलक दिल्ली के रामलीला मैदान में इंडी अलायंस की रैली में भी दिखी। 'भारत जोड़ो न्याय' यात्रा में राहुल और तेजस्वी के बीच जो गर्मजोशी दिखी थी, वह रैली के मंच पर नजर नहीं आई। राहुल का बाडी लांग्वैज तेजस्वी को भी जरूर खटका होगा। संभव है, दोनों की बाद में बात-मुलाकात भी हुई हो। सोमवार की सुबह पप्पू यादव का नामांकन की तारीख बढ़ाने का जिस तरह का पोस्ट वायरल हुआ, उससे यही लगता है कि कांग्रेस नेतृत्व ने लालू-तेजस्वी को पूर्णिया पर अपनी नाराज़गी का इजहार कर दिया है। संभव है कि फैसले के लिए कांग्रेस ने दो दिन की मोहलत दी हो। खैर, 4 अप्रैल तक इंतजार बेहतर होगा। http://dlvr.it/T4w7y7
0 notes
Text
श्री धार्मिक रामलीला खेकड़ा में श्रीराम का अयोध्या पहुॅंचने पर हुआ भव्य स्वागत II
रामलीला ज्ञान का अनुपम भंड़ार है जिसमें जीवन की हर समस्याओं का समाधान छिपा हुआ है – दीपक शर्मा, प्रधान भरत का चरित्र भाई प्रेम, समर्पण, सेवा भाव और कर्त्तव्य पालन की शिक्षा देने वाला है – नरेश शर्मा लोकतंत्र उद्घोष-बागपत,यूपी दिल्ली एनसीआर की प्र��िद्ध रामलीलाओं में शुमार श्रीधार्मिक रामलीला खेकड़ा में श्रीराम के अयोध्या पहुॅंचने और माताओं और भाईयों से 14 वर्ष उपरान्त मिलने का बहुत ही सुन्दर मंचन…
View On WordPress
0 notes
Text
रामनगर की प्रसिद्ध रामलीला: माता जानकी की तलाश में जुट गई वानर सेना
रामनगर की प्रसिद्ध रामलीला: माता जानकी की तलाश में जुट गई वानर सेना
सोमवार को रामनगर की रामलीला में बालि वध, सुग्रीव-राजतिलक, अंगद को युवराज पद, वर्षा वर्णन तथा माता जानकी की खोज में बंदरों के रवाना होने की लीला हुई। राम ने बालि को मारकर अपनी मित्रता निभाई और सुग्रीव को किष्किंधा का राजा बना दिया। Ramlila of Ramnagar: Vanar army started in search of mother Janaki, Ram got angry after not getting the news of Sita वाराणसी(आज़ाद-समाचार)। सोमवार को रामनगर की रामलीला…
View On WordPress
#hindu nav varsh#holy city Varanasi#Navratri#news update#ram navami#Ramnagar ki Ramleela#varanasi news
0 notes
Text
आगामी 24 नवंबर से होने वाली राम कथा परिसर विधायक ने किया निरीक्षण
आगामी 24 नवंबर से होने वाली राम कथा परिसर विधायक ने किया निरीक्षण
लहरपुर सीतापुर। नगर के प्रसिद्ध पौराणिक तीर्थ पक्का तालाब के निकट स्थित रामलीला मैदान में आगामी 24 नवंबर से होने वाली प्रख्यात राम कथा वाचक प्रेम भूषण महाराज का कार्यक्रम प्रस्तावित है जिसको लेकर आयोजक मंडल द्वारा तैयारियां जोरों से चल रही है इसी क्रम में तैयारियों की व्यवस्था को देखने व उनके समुचित प्रबंध हेतु क्षेत्रीय विधायक सुनील वर्मा ने प्रस्तावित राम कथा परिसर का निरीक्षण किया और उपस्थित…
View On WordPress
0 notes
Text
श्री धामिर्क रामलीला में हुआ भगवान राम के जन्म का मंचन
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 24 October 2023
Time: 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
आज विजयादशमी;विविध ठिकाणच्या देवी मंदिरांसह शिर्डीचं साई मंदिर आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर नागरिकांची गर्दी
ओबीसी जनगणनेसाठी पद्धती निश्चित करण्याची गरज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त;मराठा आरक्षण देण्याचा पुनरुच्चार
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचं निधन
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर आठ गडी राखून दणदणीत विजय
आणि
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून काल सहा सुवर्णांसह १७ पदकांची लयलूट
****
अश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमीचा सण आज साजरा होत आहे. हिंदू कालगणनेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या या दसरा सणासाठी, वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं, सोने-चांदीची आभुषणं आणि कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठा, फुलून गेल्या आहेत. दसऱ्याला विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली आहे.
काल महानवमीला घटोत्थापन होऊन नवरात्रोत्सवाचीही सांगता झाली, आज ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये दसऱ्याच्या सीमोल्लंघन मिरवणुका काढण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या कर्णपुरा देवीची आज सायंकाळी सहा वाजता महाआरती होणार आहे. त्यानंतर भव्य रथ यात्रा निघणार आहे. सिडको एन- सात परिसरातलं रामलीला मैदान तसंच वरुड फाटा इथल्या इस्कॉन मंदिरासह शहरात पाच ठिकाणी रावण दहन करण्यात येणार आहे.
राजकीय पक्षांच्या दसरा मेळाव्याची तयारीही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचा हा सण सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात चांगलं परिवर्तन आणणारा असून, यानिमित्तानं आपण आनंद आणि स्नेहाचं सोनं लुटूया, असं ��ुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी आजच्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर इथं दीक्षाभूमीवर अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते काल पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यंदा दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी २५ लाखाच्या वर अनुयायी येण्याची शक्यता असून श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो हे यंदाच्या धम्मचक्र परिवर्तन दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असल्याचं, स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितलं आहे.
****
शिर्डी इथं साईबाबांच्या १०५ व्या पुण्यतिथी उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. संस्थानच्या तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा करून या सोहळ्याला सुरुवात झाली. दरम्यान, आज विजयादशमीला समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरू राहणार असल्याचं, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आता स्वयंसेवकांच्या पथसंचलनाला सुरुवात झाली आहे.
यंदा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी मार्गदर्शन करतील. यावेळी ध्वजारोहण, तसंच शस्त्रपूजन करण्यात येणार आहे.
****
मराठा आरक्षणाबाबत घाईने कोणताही निर्णय घेण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देऊ, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेतली असून, आपण त्यांच्या भूमिकेसोबत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘मराठा समाजाला आरक्षण सरकार देईलच इतकं स्पष्ट सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. आम्ही सगळे पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहोत. हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे हा सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे.’’
मागासवर्गीय आयोगावर रिक्त असलेल्या जागा भरण्यात ये��ील, तसंच आवश्यकता असेल आयोगाचं पुनर्गठनही करण्यात येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठीची पद्धती निश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली....
‘‘यासंदर्भात सरकारची काय भूमिका आहे ही मी मागच्या काळातच स्पष्ट केलेली आहे. आणि सरकारने कधीही याला नकार दिलेला नाहीये. याच्या पद्धतीचाच मूळ प्रश्न आहे.कारण ज्या प्रकारे आता बिहारमध्ये ज्या अडचणी तयार झाल्या आहेत, तशा प्रकारच्या अडचणी आपल्या इथे तयार होणार नाहीत, अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल’’
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी, सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत आज संपत आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ न देता जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला असून, या मुदतीनंतर कोणत्याही वाटाघाटी केल्या जाणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. २८ ऑक्टोबरपासून गावागावात साखळी उपोषणही केलं जाणार आहे. राजकीय नेत्यांना गावबंदीची तयारी या आंदोलकांनी केली आहे.
****
मराठा क्रांती मोर्चाने काल पत्रकार परिषद घेऊन, आम्हाला घटनात्मक पद्धतीने हिंदू मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे, असं म्हटलं आहे. फक्त कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन तात्पुरती मलमपट्टी करू नका, असा इशाराही या पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
****
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू नये, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांसाठी काल जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं ओबीसी समाजाच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन एका शिष्टमंडळानं तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना सादर केलं.
****
धनगर समाजाला अनुसुचित जमातीत आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला.
****
****
मेरी माटी मेरा देश अभियानात महाराष्ट्रातल्या कार्यक्रमांचा येत्या २७ तारखेला समारोप होणार आहे. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचं, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर श���्त्रक्रिया झाली होती, तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. बेदी यांनी १९६६ ते १९७९ दरम्यानच्या क्रिकेट कारकिर्दीत ६७ कसोटी सामन्यात २६६ तर १० एकदिवसीय सामन्यात सात बळी घेतले. २२ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं होतं. बेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रीडा आणि युवककल्याण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या चौथ्या पॅरा एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सतरा पदकं जिंकून आपलं विजयी अभियान धडाक्यात सुरू केलं आहे. यामध्ये सहा सुवर्ण, सहा रौप्य तर पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. पाच हजार मीटर धावण्याच्या टी ११ स्पर्धेत अंकूर धर्मा याने, उंच उडीच्या टी - फोर्टी सेवन प्रकारात भारताच्या निशादकुमार याने, तर नेमबाजीत अवनी लेखरा हिने दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं. ५० मीटर मिक्स पिस्तुल प्रकारात १६ वर्षीय रुद्रांश खंडेलवाल याने तर मोनू घंघास याने गोळा फेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. उंच उडीत टी - सिक्टी थ्री प्रकारातली तसंच पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेतली तिन्ही पदकं भारतीयांनी पटकावली.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल अफगाणिस्ताननं पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात २८२ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या संघानं हे लक्ष्य ४९व्या षटकातच पूर्ण केलं.
या स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश संघादरम्यान सामना होणार आहे.
****
धाराशिव इथं १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठीच्या मैदानाचं भूमिपूजन काल करण्यात आलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव सराई इथले रहिवासी असलेले अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते यांना सियाचीन इथं कर्तव्यावर असताना वीरमरण आलं. त्यांच्या पार्थिव देहावर काल त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
0 notes
Text
नोएड़ा सेक्टर.62 में रामलीला में मुख्य अतिथि के रुप में शामिल हुये सतेन्द्र शर्मा
नोएड़ा सेक्टर.62 में रामलीला में मुख्य अतिथि के रुप में शामिल हुये सतेन्द्र शर्मा
नोएड़ा: नोएड़ा सेक्टर.62 में श्री राम मित्र मडल कमेटी द्वारा आयोजित प्रसिद्ध भव्य रामलीला में नोएड़ा काँग्रेस के नेता उत्तर प्रदेश काँग्रेस कमेटी के सद्स्य बतौर मुख्यथिति शामिल हुये, सतेन्द्र शर्मा ने सभी नोएड़ा शहरवासियों को नवरात्रों की बधाई एव शुभकामनाएं देते हुये कहा है कि भगवान राम के चरणों मे आकर मन को शाँति मिलती है हर मनुष्य को भगवान के लिए समय जरूर निकालना चाइये नोएड़ा शहर के लोग बहुत…
View On WordPress
0 notes
Text
कानिया गाँव की प्रसिद्ध रामलीला में राक्षसों की घर लीला का सुंदर व मनमोहक मंचन हुआ
कानिया गाँव की प्रसिद्ध रामलीला में राक्षसों की घर लीला का सुंदर व मनमोहक मंचन हुआ
रामनगर: कानिया गाँव की प्रसिद्ध रामलीला में राक्षसों की घर मेंखरमस्तिया, मारीच सुबाहु का आतंक, विश्वामित्र के यज्ञ का विध्वंस, ताड़का वध, अहिल्या उद्धार तक की लीला का सुंदर व मनमोहक मंचन हुआ। इससे पूर्व लीला का शुभारंभ समाजसेवी पुष्कर दुर्गा पाल, नंदा बल्लभ बेलवाल, लक्ष्मी चन्द्र करगेती ने किया गया। रामलीला कमेटी के पदाधिकारियों ने सभी अतिथियों का शॉल ओढ़ाकर सम्मानित किया। लीला में दिखाया गया कि…
View On WordPress
0 notes
Text
मुख्यमंत्री ने किया नरेंद्रनगर में 45वां सिद्धपीठ श्री कुंजापुरी पर्यटन एवं विकास मेले का उद्घाटन
मुख्यमंत्री ने किया नरेंद्रनगर में 45वां सिद्धपीठ श्री कुंजापुरी पर्यटन एवं विकास मेले का उद्घाटन
मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धामी ने गुरुवार को रामलीला मैदान, नरेंद्रनगर, टिहरी गढ़वाल में उत्तराखंड के प्रसिद्ध 45वां सिद्धपीठ श्री कुंजापुरी पर्यटन ए���ं विकास मेले का उद्घाटन किया। कार्यक्रम में शिरकत करने पहुंचे मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धामी ने नरेंद्रनगर हेतु विभिन्न घोषणाएं की जिनमेंं नरेन्द्रनगर में सामुदायिक भवन का विस्तारीकरण होगा, नरेन्द्रनगर में बस स्टैण्ड के समीप 70 वर्षीय पुरानी…
View On WordPress
0 notes
Link
यदि आप दिल्ली या उसके आसपास रहते हैं तो आज हम आपको दिल्ली में आयोजित होने वाले पांच ऐसे रामलीला के मंच बताएँगे जहाँ की रामलीला दिल्ली की सबसे भव्य रामलीलाओं में से एक होती हैं। साथ ही यहाँ जानीमानी हस्तियों का भी जमावड़ा लगा रहता हैं।
0 notes
Link
आज दो प्रसिद्ध हस्तियों का जन्मदिन है। पहले तो लोकनायक जयप्रकाश नारायण और दूसरे हैं सदी के महानायक अमिताभ बच्चन। दोनों ने अपनी-अपनी विधा में अलग पहचान कायम की है।
जयप्रकाश नारायण यानी जेपी का जन्म 11 अक्टूबर 1902 को बिहार में सारन के सिताबदियारा में हुआ था। पटना से शुरुआती पढ़ाई के बाद अमेरिका में पढ़ाई की। 1929 में स्वदेश लौटे और स्वतंत्रता आंदोलन में सक्रिय हुए। तब वे मार्क्सवादी होते थे। सशस्त्र क्रांति से अंग्रेजों को भगाना चाहते थे। हालांकि, महात्मा गांधी और जवाहरलाल नेहरू से मिलने के बाद उनका नजरिया बदला।
नेहरू की सलाह पर कांग्रेस से जुड़े। लेकिन, आजादी के बाद वे आचार्य विनोबा भावे के सर्वोदय आंदोलन से जुड़ गए। ग्रामीण भारत में आंदोलन को आगे बढ़ाया और भूदान को सपोर्ट किया। जेपी ने 1950 के दशक में राज्य व्यवस्था की पुनर्रचना नाम से किताब लिखी। इसके बाद ही नेहरू ने मेहता आयोग बनाया और विकेंद्रीकरण पर काम किया। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि जेपी ने कभी सत्ता का मोह नहीं पाला। नेहरू चाहते थे, लेकिन कैबिनेट से जेपी दूर ही रहे।
1975 में निचली अदालत में गांधी पर चुनावों में भ्रष्टाचार का आरोप सही साबित हुआ तो जेपी ने उनसे इस्तीफा मांगा। उन्होंने इंदिरा गांधी के खिलाफ एक आंदोलन खड़ा किया, जिसे जेपी आंदोलन भी कहते हैं। उन्होंने इसे संपूर्ण क्रांति नाम दिया था। इंदिरा गांधी ने इमरजेंसी की घोषणा कर दी और जेपी के साथ ही अन्य विपक्षी नेताओं को गिरफ्तार कर लिया।
जेपी की गिरफ्तारी के खिलाफ दिल्ली के रामलीला मैदान में एक लाख से अधिक लोगों ने हुंकार भरी थी। उस समय रामधारी सिंह “दिनकर” ने कहा था “सिंहासन खाली करो कि जनता आती है। जनवर���-1977 में इमरजेंसी हटी। लोकनायक के “संपूर्ण क्रांति आंदोलन” के चलते देश में पहली बार ग���र कांग्रेसी सरकार बनी। जेपी को 1999 में भारत सरकार ने भारत रत्न से सम्मानित किया।
2000 में नासा के स्पेस शटल प्रोग्राम का 100वां मिशन
इस प्रोग्राम को स्पेस ट्रांसपोर्टेशन सिस्टम या एसटीएस के तौर पर भी जाना जाता है। यह दुनिया का पहला प्रोग्राम था, जिसमें लोगों को अंतरिक्ष में ले जाने के लिए दोबारा इस्तेमाल होने वाले स्पेसक्राफ्ट शामिल किया। स्पेस शटल बेड़े की पहली फ्लाइट ने 12 अप्रैल 1981 को उड़ान भरी है। इसमें कोलंबिया, चैलेंजर, डिस्कवरी, एटलांटिस और एंडीवर शामिल थे। 100वीं फ्लाइट डिस्कवरी की थी और इस मिशन को STS-92 दिया गया था। 30वीं बार डिस्कवरी को अंतरिक्ष भेजा गया था।
इतिहास में आज का दिन इन घटनाओं के लिए भी याद किया जाता हैः
1869ः अमेरिकी नागरिक थॉमस एडीसन ने अपने पहले आविष्कार पर एक पेटेंट के लिए आवेदन किया। इस इलेक्ट्रिक मशीन का इस्तेमाल वोटों की गिनती के लिए किया गया था।
1881ः अमेरिकी आविष्कारक डेविड हेंडरसन हॉस्टन ने कैमरों के पहले रोल फिल्म का पेटेंट कराया।
1916ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से जुड़े रहे समाज सेवी नानाजी देशमुख का जन्म।
1932ः न्यूयॉर्क में राजनीतिक अभियान के लिए पहला प्रसारण किया गया।
1939ः अमेरिकी राष्ट्रपति रूजवेल्ट ने अल्बर्ट आइंस्टीन को पत्र लिखकर अमेरिका के परमाणु कार्यक्रम को तेजी से विकसित करने का आग्रह किया।
1942ः फिल्म एक्टर अमिताभ बच्चन का जन्म।
1968ः अमेरिका का पहला मानवयुक्त ओपोलो मिशन ‘अपोलो 7’ के प्रक्षेपण का कक्षा से पहली बार टेलीविजन प्रसारण किया गया।
1984ः अमेरिकी अंतरिक्ष वैज्ञानिक कैथरीन डी सुलिवन अंतरिक्ष में सैर करने वाली पहली महिला अंतरिक्ष यात्री बनी। वह अंतरिक्ष शटल चैलेंजर पर सवार थीं।
1994ः अमेरिका में कोलोराडो सुप्रीम कोर्ट ने राज्य में समलैंगिक विरोधी अधिकारों को असंवैधानिक घोषित कर दिया।
2000ः दक्षिण अफ़्रीकी क्रिकेट बोर्ड द्वारा हैन्सी क्रोन्ये पर आजीवन प्रतिबंध।
2001ः त्रिनिदाद में जन्में भारतीय मूल के ब्रिटिश लेखक विद्याधर सूरज प्रसाद नॉयपाल को वर्ष 2001 के नोबेल साहित्य पुरस्कार से सम्मानित करने की घोषणा।
2002ः नेपाल नरेश ज्ञानेन्द्र ने लोकेन्द्र बहादुर को प्रधानमंत्री नियुक्त किया।
2005ः तीसरे अंतरिक्ष पर्यटक ग्रेगोरी ओल्सन पृथ्वी पर लौटे।
2007ः ब्रिटेन के उपन्यासकार डोरिस लैसिंग को वर्ष 2007 के ��ाहित्य के नोबेल पुरस्कार के लिए चुना गया।
2008ः प्रधानमंत्री मनमोहन सिंह ने नौगांव स्टेशन से हरी झंडी दिखाकर कश्मीर की घाटी में चलने वाली पहली रेलगाड़ी को रवाना किया।
आज की ताज़ा ख़बरें पढ़ने के लिए दैनिक भास्कर ऍप डाउनलोड करें
Today History for October 11th/ What Happened Today | Jaiprakash Narayan Birthday | All You Need To Know About Sampurna Kranti JP Movement | Amitabh Bachchan Birthday | 100th Mission of NASA’s Space Shuttle Program
from Dainik Bhaskar /national/news/today-history-october-11th-loknayak-jayprakash-narayan-birthday-amitabh-bachchan-birthday-127801744.html via IFTTT
0 notes
Text
प्रसिद्ध कवि एवं गीतकार प्रदीप का जन्म 6 फरवरी 1915 को हुआ था. उनका का मूल नाम 'रामचंद्र नारायणजी द्विवेदी' था। प्रदीप हिंदी साहित्य जगत् और हिंदी फ़िल्म जगत् के एक अति सुदृढ़ रचनाकार रहे। देशभक्ति गीत ऐ मेरे वतन के लोगों की रचना उन्होंने ही की थी।1962 के भारत-चीन युद्ध के दौरान शहीद हुए सैनिकों की श्रद्धांजलि में ये गीत लिखा था।
लता मंगेशकर द्वारा गाए इस गीत का तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू की उपस्थिति में 26 जनवरी 1963 को दिल्ली के रामलीला मैदान में सीधा प्रसारण किया गया। कवि प्रदीप ने इस गीत का राजस्व युद्ध विधवा कोष में जमा करने की अपील की। मुंबई उच्च न्यायालय ने 25 अगस्त 2005 को संगीत कंपनी एचएमवी को इस कोष में अग्रिम रूप से 10 लाख जमा करने का आदेश दिया।
1 note
·
View note
Text
रामधारी सिंह दिनकर | Ramdhari Singh Dinkar
रामधारी सिंह "दिनकर" | Ramdhari Singh Dinkar
दिनकर का जन्म 23 सितंबर 1908 को सिमरिया गाँव, बंगाल प्रेसीडेंसी में हुआ था। ब्रिटिश इंडिया (अब बिहार में बेगूसराय जिले में) बाबू रवि सिंह और मनरूप देवी के लिए। उनका विवाह बिहार में समस्तीपुर जिले के तभका गाँव में हुआ था। एक छात्र के रूप में, उनके पसंदीदा विषय इतिहास, राजनीति और दर्शन थे।स्कूल में और बाद में कॉलेज में, उन्होंने हिंदी, संस्कृत, मैथिली, बंगाली, उर्दू और अंग्रेजी साहित्य का अध्ययन किया। दिनकर इकबाल, रवींद्रनाथ टैगोर, कीट्स और मिल्टन से बहुत प्रभावित थे और बंगाली से हिंदी में रवींद्रनाथ टैगोर की कृतियों का अनुवाद किया। भारतीय स्वतंत्रता आंदोलन के दौरान कवि दिनकर के काव्य व्यक्तित्व को जीवन के दबावों और प्रति-दबावों द्वारा आकार दिया गया था। एक लंबा आदमी, ऊंचाई में 5 फीट 11 इंच, एक चमकदार सफेद रंग, लंबे उच्च नाक, बड़े कान और व्यापक माथे के साथ, वह ध्यान देने योग्य उपस्थिति के लिए गया था।दिनकर ने शुरू में भारतीय स्वतंत्रता संग्राम के दौरान क्रांतिकारी आंदोलन का समर्थन किया, लेकिन बाद में एक गांधीवादी बन गए। हालाँकि, वह खुद को "बुरा गांधीवादी" कहता था क्योंकि उसने युवाओं में आक्रोश और बदले की भावना का समर्थन किया था।कुरुक्षेत्र में, उन्होंने स्वीकार किया कि युद्ध विनाशकारी है लेकिन तर्क दिया कि यह स्वतंत्रता की सुरक्षा के लिए आवश्यक है। वह राजेंद्र प्रसाद, अनुग्रह नारायण सिन्हा, श्रीकृष्ण सिन्हा, रामबृक्ष बेनीपुरी और ब्रज किशोर प्रसाद जैसे प्रमुख राष्ट्रवादियों के करीबी थे।दिनकर को तीन बार राज्य सभा के लिए चुना गया था, और वह 3 अप्रैल 1952 से 26 जनवरी 1964 तक इस घर के सदस्य थे, और उन्हें 1959 में पद्म भूषण से सम्मानित किया गया था।वह 1960 के दशक की शुरुआत में भागलपुर विश्वविद्यालय (भागलपुर, बिहार) के कुलपति भी थे। द इमरजेंसी के दौरान, जयप्रकाश नारायण ने रामलीला के मैदान में एक लाख लोगों के जमावड़े को आकर्षित किया था और दिनकर की प्रसिद्ध कविता: सिंघासन खलि कारो के जनता आ गई है ("सिंहासन खाली करो, लोग आ रहे हैं" के लिए)। Read the full article
0 notes
Text
फ्री की सरकार वाले तंज पर केजरीवाल ने दिया करारा जवाब
New Post has been published on https://apzweb.com/%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%9c-%e0%a4%aa%e0%a4%b0-%e0%a4%95/
फ्री की सरकार वाले तंज पर केजरीवाल ने दिया करारा जवाब
तीसरी बार CM पद की अरविंद केजरीवाल ने ली शपथ
फ्री योजना पर कहा- अनमोल चीजें होती हैं मुफ्त
शिक्षा और स्वास्थ्य पर पैसे लूं तो मुझ पर है लानत
आम आदमी पार्टी के सं��ोजक अरविंद केजरीवाल ने दिल्ली के मुख्यमंत्री के तौर पर तीसरी बार शपथ ली. शपथ ग्रहण के बाद रामलीला मैदान में जनसभा को संबोधित करते हुए अरविंद केजरीवाल ने मुफ्त योजनाओं पर विपक्ष की टिप्पणियों पर जवाब भी दिया.
शपथ ग्रहण के बाद दिए गए भाषण में अरविंद केजरीवाल ने फ्री की सरकार वाले बयान पर विपक्ष को घेरा. अरविंद केजरीवाल ने कहा कि मुझ पर लानत है अगर मैं दिल्ली का मुख्यमंत्री हूं और अगर सरकारी स्कूलों में पढ़ने वाले बच्चों से फीस लूं. अस्पताल में इलाज करने आए बीमारों से दवाइयों का पैसा लूं.
अरविंद केजरीवाल ने कहा कि कुछ लोग कहते हैं कि मैं सब कुछ फ्री करता जा रहा हूं. दोस्तों इस दुनिया के अंदर जो भी अनमोल चीजें हैं, भगवान ने फ्री बनाई हैं. मां जब अपने बच्चों को प्यार करती है तो वह फ्री होता है. बाप जब अपने बच्चों को पालने के लिए रोटी नहीं खाता तो बाप की तपस्या फ्री होती है.
यह भी पढ़ें: केजरीवाल की कैबिनेट पर सहयोगी डडलानी ने उठाए सवाल, आतिशी को जगह नहीं मिलने से निराश
‘श्रवण कुमार की सेवा थी फ्री’
अरविंद केजरीवाल ने कहा कि श्रवण कुमार जब अपने माता-पिता को लेकर तीर्थयात्रा पर गए थे और जब उनकी मौत हो गई थी, श्रवण कुमार की सेवा भी फ्री थी. केजरीवाल अपने दिल्ली वालों को प्यार करता है दिल्ली वाले अपने केजरीवाल को प्यार करते हैं, यह प्यार भी फ्री है. इसकी कोई कीमत नहीं है.
बच्चों-मरीजों से पैसे लूं तो मुझ पर है लानत
अरविंद केजरीवाल ने कहा कि मैं क्या अपने सरकारी स्कूलों में पढ़ने वाले बच्चों से फीस लेना शूरू कर दूं? लानत है ऐसे सीएम पर. मैं अपने अस्पतालों में इलाज कराने वाले लोगों से दवाइयों के पैसे लेने शुरू कर दूं, लानत है ऐसे सीएम पर. मैं दिल्ली आने वाले मरीजों से ऑपरेशन के पैसे लेने शुरू कर दूं. लानत है मेरी जिंदगी पर.
ये है सीएम अरविंद केजरीवाल का सपना
अरविंद केजरीवाल ने कहा कि दोस्तों मेरा एक सपना है, जो मैं चाहता हूं पूरे देशवासियों का सपना हो. हम चाहते हैं एक वक्त ऐसा आए जब पूरी दुनिया के अदंर भारत का डंका बजा. लंदन, टोक्यो, ऑस्ट्रेलिया और अफ्रीका में भी भारत का डंका बजेगा. ��सके लिए नई राजनीति की शुरूआत होनी चाहिए. जो दिल्ली के लोगों ने अपना लिया है. इसके बाद अरविंद केजरीवाल ने प्रसिद्ध गीत हम होंगे कामयाब दोहराया.
यह भी पढ़ें: गोपाल राय ने ईश्वर नहीं, आजादी के शहीदों के नाम ली मंत्रिपद की शपथ
दिल्ली के ऐतिहासिक रामलीला मैदान में अरविंद केजरीवाल ने मुख्यमंत्री पद और गोपनीयता की शपथ ली. दिल्ली के उप राज्यपाल अनिल बैजल ने केजरीवाल को मुख्यमंत्री पद की शपथ दिलाई.
आजतक के नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट और सभी खबरें. डाउनलोड करें
!function(e,t,n,c,o,a,f)e.fbq(window,document,"script"),fbq("init","465285137611514"),fbq("track","PageView"),fbq('track', 'ViewContent'); Source link
0 notes