#प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
Explore tagged Tumblr posts
kandeonlinecenter · 2 years ago
Text
0 notes
darshanpolicetime1 · 1 month ago
Text
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा - महासंवाद
मुंबई, दि. 24: केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत भूसंपादन विभाग व महाराष्ट्र राज्यात मृद व जलसंधारण विभागामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 (PMKSY 2.0) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘पाणलोट यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘पाणलोट यात्रेच्या’ माध्यमातून राज्यात पाणलोट विकासाची चळवळ उभारण्यात येईल असे मृद व जलसंधारण मंत्री संजय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 14 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही मार्गांवरच्या टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
राज्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करणं, समाजकार्य महाविद्यालयांमधल्या अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम राबवणं, राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित करणं, मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची तीन पदांची भरती, खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणं, किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याला व्याजासह कर्जमाफी, तसंच अडचणीतल्या सहकारी उपसा जलसिंचन योजनांचं थकीत कर्ज माफ करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजना, आष्टी उपसा सिंचन योजनेसह, वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास आणि पुणे मेट्रो ���ेल टप्पा-दोन मधल्या रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा साजरा करणं, अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी तसंच उमेदसाठी अभ्यासगट स्��ापन करणं आणि कौशल्य विद्यापीठाचं पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असं नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत शोक व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांपैकी धर्मराज कश्यप हा आरोपी अल्पवयीन नसल्याचं चाचणीतून सिद्ध झालं आहे. त्यामुळे त्याला देखील २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्हा दौऱ्यावर येणार असून, घनसावंगी तालुक्यातल्या कुंभार पिंपळगाव इथं शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. ब्ल्यू सफायर कंपनीच्या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या दुसऱ्या युनिटचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
****
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट उठवली असून, आता तिथे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी नवीन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. 
****
प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याच्यादृष्टीनं जैव प्लास्टिक उत्पादनाच्या जेजुरी इथल्या पथदर्शी प्रकल्पाचं केंद्रीय अणु ऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं. जैव प्लास्टिक उत्पादनांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे. 
****
भारताने जागतिक दर्जाची अंकेक्षित सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित केली आहे ज्यामुळे उच्च-गुणवत्तेची अंकेक्षित वित्तीय उत्पादनं विकसित करणं सुलभ झालं आहे असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत RBI@90 या उच्चस्तरीय परिषदेत बोलत होते. एक लाख ४० हजार स्टार्टअप्स आणि शंभरहून अधिक युनिकॉर्नसह भारत आता जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं ते म्हणाले.
****
राज्यात रबी हंगामातल्या पिकांचं सरासरी क्षेत्र सुमारे ५४ लाख हेक्टर असून, गेल्या वर्षीच्या रबी हंगामापेक्षा यावर्षी सुमारे अडीच लाख हेक्टरनं अधिक म्हणजे ६१ लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा होईल, असा अंदाज कृषी आयुक्तालयातले उपसंचालक धनंजय कोंढाळकर यांनी व्यक्त केला आहे. राज्यात यावर्षी साडे १२ लाख क्विंटल बिया��ं पुरवठ्याचं नियोजन असून, गरजेपेक्षा दोन लाख क्विंटल अतिरिक्त बियाणं ��पलब्ध करुन देण्यात आलं आहे. आतापर्यंत ५४ हजार ७४० क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती कोंढाळकर यांनी दिली.
****
राज्यात राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्याने चार हजार १६४ अंगणवाड्यांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून, तब्बल ७४ लाख ४५ हजार ३४५ नोंदी घेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. पोषण माह अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्यांचा काल मुंबईत गौरव करण्यात आला. कंधारचे बाल विकास प्रकल्प अधिकारी एल. एम. राजुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अमरावती जिल्ह्यालाही विविध उपक्रम राबवून अव्वल स्थान मिळवल्याबद्दल राज्यस्तरीय दोन पुरस्कार मिळाले आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी ही माहिती दिली.
****
कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आज रत्नागिरी रेल्वेस्थानकासमोरच्या श्रमशक्ती स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून दिवंगत कामगारांना आदरांजली वाहिली. कोकण रेल्वेमार्गाची उभारणी करताना अनेक कामगार, अभियंते आणि अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रत्नागिरी रेल्वेस्थानकासमोर श्रमशक्ती स्मारक उभारण्यात आलं असून, दर वर्षी १४ ऑक्टोबरला स्मृती दिवस पाळून त्यांना आदरांजली वाहिली जाते.
****
0 notes
shetiudyoglive · 2 years ago
Text
PM Krushi Sinchan Yojana,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मिळवा जास्तीत जास्त लाभ.
PM Krushi Sinchan Yojana,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना मिळवा जास्तीत जास्त लाभ.
PM Krushi Sinchan Yojana महाराष्ट्र शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी महा DBT पोर्टल वर ऑनलाईन योजना सुरु करण्यात आल्या आहेत,आणि त्याच योजनांपैकी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हि एक आहे.तर मित्रानो आज आपण पाहणार आहोत तुमि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ कशा प्रकारे घेऊ शकता आणि तुम्हाला अनुदान स्वरूपात किती मोबदला मिळू शकतो. योजनेबद्दल माहिती (shetiudyoglive PM Krushi Sinchan) पिकांच्या झाडाच्या मुळाशी…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
amhikastkar · 4 years ago
Text
ठिबकच्या नव्या दरपत्रकाला मान्यता द्या 
पुणे: कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे धास्तावलेल्या ठिबक संच उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. सुधारित दरपत्रकाला मान्यता देण्याची मागणी देखील या कंपन्यांनी राज्याच्या कृषी खात्याकडे केली आहे.  २०२०-२१ मधील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना काढण्याच्या कृषी ��युक्तालयाच्या निर्णयाचे राज्यातील ठिबक उद्योगाने स्वागत केले आहे. मात्र, सुक्ष्म…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahanews18 · 4 years ago
Link
Tumblr media
prime-minister-poor-welfare-scheme-2020
कोरोनाच्या धमकीमुळे एक चांगली बातमी समोर आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातील गरीब घटकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना असे या योजनेचे नाव आहे. कोरोनाव्हायरसमुळे या योजनेचा विस्तार करण्यात आला असून या योजनेला नवीन स्वरूप देण्यात आले आहे. त्यास प्रधानमंत्री गरीब कल्याण अण्णा योजना असेही म्हणतात. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
हे वाचा...PM Kisan :- प्रशासन ने की गलती और किसान का लिया नाम.
गरीब कल्याण योजना म्हणजे काय?
कोरोना साथीने संपूर्ण जगात आपले जाळे पसरविले आहे. ज्या क्षणी सामान्य जनता असहाय्य आहे, त्याच सरकारे जनतेच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. या मालिकेत गरीब कल्याण योजनेंतर्गत गरीब कल्याण अन्न योजना भारत सरकारने ���ुरू केली आहे. या योजनेचे उद्दीष्ट म्हणजे देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला अनुदानासह रेशन देणे जेणेकरून कोणालाही भुकेले राहू नये. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
हे वाचा...जन-धन खात्यामध्ये नऊ हजार कोटी
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे मुख्य मुद्दे:
या योजनेच्या माध्यमातून देशातील गरिबांना पैसे आणि अन्न या दोहोंची मदत होईल.
आपणास ठाऊकच असेल की सरकार आर्थिक दुर्बल घटकांसाठी यापूर्वी 5 किलो गहू / तांदूळ पुरवते. या योजनेअंतर्गत, दरमहा या 5 किलो गहू / तांदळाच्या व्यतिरिक्त (पुढील तीन महिन्यांपर्यंत) प्रत्येक लाभार्थी गरीब व्यक्ती मोफत मिळेल आणि त्याचवेळी प्रत्येक गरीब कुटुंबाला 1 किलो डाळी देण्यात येईल. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
हे वाचा...पंतप्रधान कृषी सिंचन योजना या योजनेसाठी शेतक्यांना केंद्राकडून 60% अनुदान दिले जाते.
थेट हस्तांतरणाद्वारे गरीबांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातील. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
शेतकऱ्यांसाठी या योजनेचे अनुदान मिळणार, नवीन अर्ज सुरू होणार पहा सविस्तर बातमी 2020
Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 September 2022 Time 07.10 AM to 07.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, राजकीय पक्षांचे आपलीच सत्ता आल्याचे दावे - प्रतिदावे
राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात रखडलेले सिंचन प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा ठराव
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत चार ऑक्टोबरपर्यंत वाढ
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर
मराठवाड्यात अनेक भागात मुसळधार पाऊस
आणि
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी कळंबमध्ये सकल मराठा समाजाचा मोर्चा
****
��विस्तर बातम्या
राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. ५१ ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक झाली. सरपंच पदाची थेट निवडणूक झाल्यानं राजकीय पक्षांनी ग्रामपंचायतींवर आपली सत्ता आल्याचे दावे - प्रतिदावे केले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भाजपा - शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिल्याचा दावा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं पत्रकाराशी बोलत होते. एकूण ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये भाजपा - शिवसेना युतीचे सरपंच निवडून आले आहेत. या निकालांवरुन जनतेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे, असं ते म्हणाले. आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन करतो असे सांगत, बावनकुळे यांनी मतदारांचेही आभार मानले. शिवसेनेच्या शिंदे गटाला ४१ ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसनं १२७ ग्रामपंचायतींमध्ये, काँग्रेसनं ५९, शिवसेनाचा उद्धव ठाकरे गटानं ३७ ग्रामपंचायतीत विजय मिळवल्याचा दावा केला आहे.
****
राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित आहे. यंदा ऊसाच्या १० पूर्णांक २५ टक्के मुलभूत उताऱ्यासाठी, प्रति मेट्रीक टन तीन हजार पन्नास रुपये रास्त आणि किफायतशीर दर देण्यात येणार आहे. यावर्षी  १४ लाख ८७ हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली असून, २०३ कारखान्यांमधून १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
****
राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल शासन सकारात्मक असून, जनतेला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा पुरवण्याचं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राजपत्रित अधिकारी महासंघासोबत काल झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. महासंघानेही या चर्चेनंतर २७ सप्टेंबर रोजी पुकारलेलं ‘लक्षवेध दिन’ आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
****
राज्यात रखडलेले सिंचन प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावे, यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी सूचना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिली आहे. जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी, या केंद्र अर्थसहाय्यीत योजनांसह सिंचन प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रखडलेल्या प्रकल्पांना मान्यता देतांना प्रादेशिक समतोल राखला जाईल, याची काळजी घ्यावी, पुढील दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करावे, जलसंपदा विभागाच्या सर्व कामांना गती देण्यासाठी मिनी वॅार रूम सुरू करावी, पाणीपट्टी मोजण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा, उपसा सिंचन योजनांवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवाव, आदी सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
****
राज्यात सध्याचं शिंदे - फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. भाजपचं गणित जुळलं की हे सरकार बरखास्त होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला. पक्षाच्या स्थानिक नेत्यांना महाविकास आघाडीतल्या इतर पक्षातल्या स्थानिक नेत्यांशी बोलण्यास सांगितलं असून, तिथे त्यांचं जुळत असेल तर महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यास हरकत नाही, असं पाटील यावेळी म्हणाले.
****
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, असा ठराव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं घेतला आहे. काल मुंबईत झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला, सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली. सर्व पदाधिकारी निवडीचे अधिकार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे देण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.
****
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत चार ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र, ईडीने त्यास तीव्र विरोध करत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत जामीन देऊ नये असे म्हटलं आहे.
****
दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं काल जाहीर केल्या. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान तर दहावीची परीक्षा दोन मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातले लघु-मध्यम प्रकल्प तुडंब भरले आहेत. कन्नड तालुक्यातला शिवना टाकळी मध्यम प्रकल्प ९९ टक्के भरला असून, काल या धरणातून ३६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं. लामणगाव, धरणखेडा, मालेगावं तसंच शिवना नदी काठावरील सर्व शेतकर्यांना आणि ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कन्नड तालुक्यात नागद गडदगड नदीला महापूर आला आहे. तर पिशोर परिसरात रात्री अतिवृष्टी झाल्यानं अंजना - पळशी प्रकल्प पूर्णपणे भरला असून त्याच्या सांडव्याहून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. या परिसरातल्या काही गावांचा संपर्क तुटला आहे. सोयगाव परीसरातही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालं.
पैठण इथल्या ��ायकवाडी धरणात पाण्याची आवक कमी झाल्यानं, धरणाच्या विसर्गातही कपात करण्यात आली आहे. धरणात ८० हजार ६७४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत असून, धरणाच्या सर्व २७ दरवाजातून ८० हजार ६७२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातला पाणी साठा सध्या ९६ पूर्णांक  ३१ शतांश टक्के एवढा असल्याचं, जलसंपदा विभागानं सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात मंठा आणि जाफराबाद तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातही काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यातही काल पाऊस पडला.
जिंतूर तालुक्यातल्या येलदरी धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडण्यात आले असून, ३२ हजार ७६८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर आणि सिद्धेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं, नदीकाठावरच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड शहरालगतच्या विष्णुपुरी धरणातही पाण्याची आवक वाढल्यानं, काल धरणाचे आठ दरवाजे उघडून ८० हजार ७९८ ‌घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.    
****
बुलडाणा जिल्ह्यातला खड़कपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून काल या प्रकल्पाचे १९ दरवाजे एक फुटानं उघडण्यात आले असून, वीस हजार सातशे अठ्ठेचाळीस पूर्णांक बारा घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. पेनटाकळी प्रकल्पाचेही नऊ दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातल्या साखरखेर्डा- लव्हाळा मार्गावरील भोगावती नदीला पूर आल्यामुळे या भागातल्या गावांचा संपर्क तुटला आहे. प्रवाशांनी आपली वाहनं पर्यायी मार्गावरून न्यावी असं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
येत्या दोन दिवसात कोकण, मराठवाडा, आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. 
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं धरणात बुडून मृत्यू झालेल्या डॉक्टरचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या कोल्हापूर इथल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जवानाचा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना घडली. राजशेखर मोरे असं मृत जवानाचं नाव आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २९२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख १५ हजार ८३४ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३१२ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ३९० रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६३ हजार ८२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या चार हजार ४���० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सहा, उस्मानाबाद चार, लातूर तीन, तर हिंगोली, बीड आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
वेदांता फॉक्सकॉन आणि रायगडमधला बल्क ड्रग पार्क हे उद्योग परराज्यात गेले, यामुळे राज्य सरकारनं तरुणांच्या रोजगाराकडे लक्ष द्यावं, अशी मागणी, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे. दोन दिवसीय औरंगाबाद जिल्हा दौऱ्यादरम्यान ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूरच्या मिहान इथं विमान निर्मिती करणाऱ्या एअर बस कंपनीचा प्रकल्प अन्य राज्यात जाणार नाही याकडे सरकारनं लक्ष द्यावं, यामुळे विदर्भ आणी मराठवाड्यातल्या युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातल्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करावं, अशी मागणी सरदेसाई यांनी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे केली आहे .
****
मर���ठा समाजाला इतर मागासवर्ग - ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी, उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब इथं काल सकल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण मिळावं यासाठीचं निवेदन उप विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलं. नागरिक, विद्यार्थी, महिला, मुले, या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यात गोरेगाव, बाभुळगाव, आजेगाव आणि पुसेगाव ही चार मंडळं अतिवृष्टी अनुदान लाभातून डावलण्यात आल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून काल गोरेगाव इथं शेतकऱ्यांनी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या नेतृत्वात तासभर रास्तारोको आंदोलन केलं. विष्णुपंथ भुतेकर यांच्या मध्यस्थीने संप मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी शेतकऱ्यांनी गोरेगाव इथलं पर्जन्यमापक यंत्र गेल्या सात आठ वर्षापासून बंद असल्याचं सांगत, चुकीचा अहवाल सादर करून अतिवृष्टीतून डावलल्याची तक्रार केली.
****
लातूर इथले अधिक्षक अभियंता जयंत धोंडोपंत कुलकर्णी यांना काल २०१८ या वर्षीच्या उत्कृष्ट अभियंता पुरस्कारानं काल सन्मानित करण्यात आलं. सध्या ते सार्वजनिक बांधकाम विभागात अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांना सपत्नीक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
��स्मानाबाद इथं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याअंतर्गत शाळा- महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थांना जातीचे प्रमाणपत्र देणं, तृतीय पंथीयांना प्रमाणपत्र देणं, वृद्धांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी करणं, समाजकल्याण वसतिगृहातल्या सुविधांमध्ये वाढ करणं, ऊस तोड कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र देणं आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत. याबरोबरच विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला.
****
अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा भगनावराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यु म पठाण यांना काल ज्येष्ठ समिक्षक सुधीर रसाळ यांच्या हस्ते काल औरंगाबादमध्ये प्रदान करण्यात आला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 September 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा राज्यसरकारचा निर्णय.
रखडलेले सिंचन प्रकल्प जलद पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश.
नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्यात २ ऑक्टोबरपासून नदी महोत्सवाचं आयोजन.
आणि
राज्य सरकारनं तरुणांच्या रोजगाराकडे लक्ष द्यावं - युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची मागणी.
****
राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित आहे. यंदा ऊसाच्या १० पूर्णांक २५ टक्के मुलभूत उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन ३ हजार पन्नास रुपये रास्त आणि किफायतशीर दर देण्यात येणार आहे. यावर्षी १४ लाख ८७ हजार हेक्टरवर ऊस लागवड करण्यात आली असून २०३ कारखान्यांमधून १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केलं. यंदा देशातून निर्यात होणाऱ्या १०० लाख मेट्रीक टन साखरेत राज्यातून ६० लाख मेट्रीक टन साखर निर्यात करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. देशात इथेनॉल निर्मितीतही राज्याचा वाटा ३५ टक्के असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
राज्यात रखडलेले सिंचन प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावे, यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जलसंपदा विभागाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी या केंद्र अर्थसहाय्यीत योजनांसह सिंचन प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रखडलेल्या प्रकल्पांना मान्यता देतांना प्रादेशिक समतोल राखला जाईल, याची काळजी घ्यावी. पुढील दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करावे, जलसंपदा विभागाच्या सर्व कामांना गती देण्यासाठी मिनी वॅार रूम सुरू करा, पाणीपट्टी मोजण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा, उपसा सिंचन योजनांवर सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
****
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, असा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीनं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला, पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली. सर्व पदाधिकारी निवडीचे अधिकार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे देण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.
****
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान, राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र, ईडीने त्यास तीव्र विरोध करत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत जामीन देऊ नये असे सांगितलं.
****
विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आचार्य धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या २० दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे जयपूर इथं सवाई मानसिंह रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजस्थानच्या विराटनगर इथं त्यांच्या पार्थिव देहावर विधीपूर्वक अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. १९६६ चं गोरक्षण आंदोलन, रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनासह जनजागृतीपर अनेक कार्यात आचार्य धर्मेंद्र यांचं मोठं योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आचार्य धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. महाराणींचा पार्थिव देह वेस्टमिंस्टर ॲबे इथल्या राजघराण्याच्या पारंपारिक चर्चमध्ये नेण्यात आलं, तिथे प्रार्थना सभ�� झाली, आता महाराणींच्या पार्थिवाचं विंडसर कॅसल इथं महाराणींचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलीप यांच्या समाधीशेजारी दफन करण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह जगभरातले राष्ट्रप्रमुख तसंच अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी महाराणींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
राज्यातल्या ७५ नद्यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या उद्दीष्टानं जनजागरण करण्यासाठी २ ऑक्टोबरपासून नदी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात आज झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. वर्धा इथून या नदी महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवापंधरवड्याचा समारोपही होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नदी संरक्षण आणि संवर्धनसाठी सांस्कृतिक कार्य विभाग काम करणार असून या विभागामार्फत प्रत्येक जिल्हयातल्या एका नोडल ऑफीसरची नियुक्ती केली जाणार आहे. “आओ नदी को जानें” या कवितेचा मराठी अनुवाद लवकरच तयार करण्यात यावा असे निर्देश मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
दरम्यान, जनतेनं यापुढे फोनवरून संवाद साधताना ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलं आहे. या अभियानाचा शुभारंभ २ ऑक्टोबरला करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
वेदांता फॉक्सकॉन आणि रायगडमधील बल्क ड्रग पार्क हे उद्योग परराज्यात गेले, यामुळे राज्य सरकारनं तरुणांच्या रोजगाराकडे लक्ष द्यावं अशी मागणी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे. सरदेसाई हे दोन दिवसीय औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागपूरच्या मिहान इथं विमान निर्मिती करणाऱ्या एअर बस कंपनीचा प्रकल्प अन्य राज्यात जाणार नाही याकडे सरकारनं लक्ष द्यावं, यामुळे विदर्भ तसंच मराठवाड्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचं वरुण सरदेसाई यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात गोरेगाव इथं आज शेतकऱ्यांनी तासभर रास्तारोको आंदोलन केलं. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. सेनगाव तालुक्यातली गोरेगाव, बाभुळगाव, आजेगाव आणि पुसेगाव ही चार मंडळं अतिवृष्टी अनुदान लाभातून डावलण्यात आल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर हा संप सुरू आहे. या संपादरम्यान वेगवगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्यात येत आहे.
विष्णुपंथ भुतेकर यांच्या मध्यस्थीने संप मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी शेतकऱ्यांनी गोरेगाव इथलं पर्जन्यमापक यंत्र गेल्या सात आठ वर्षांपासून बंद असल्याचे सांगत चुकीचा अहवाल सादर करून अतिवृष्टीतून डावलल्याची तक्रार केली.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 June 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ जून २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      मराठवाडा वॉटर ग्रीड टप्पाटप्प्यानं विकसित करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता, औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून २८५ कोटी रूपयांच्या पहिल्या ग्रीडला मंजुरी.
·      जालना जिल्ह्यातल्या हातवन प्रकल्पाच्या २९७ कोटी ३९ लाख रुपयांच्या सुधारीत खर्चास प्रशासकीय मान्यता.
·      राज्यातल्या ‘आशा’ स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याची राज्य सरकारची घोषणा, मागण्या मान्य झाल्यानं संप मागे.
·      राज्यात १० हजार ६६ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १३ जणांचा मृत्यू तर ४०५ बाधित.
आणि
·      जल जीवन अभियानाअंतर्गत मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना ठरवून दिलेलं उद्दिष्ट विहित कालावधित पूर्ण करण्याचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश.
****
मराठवाडा विभागातल्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी, मराठवाडा वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता टप्पा-टप्प्यानं विकसित करण्यास, काल मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात या संदर्भात बैठक झाली. प्रथम औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यासाठी, जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या २८५ कोटी रुपयांच्या खर्चास काल मान्यता देण्यात आली असून, औरंगाबाद जिल्ह्यातील कांही तालुके, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि उर्वरित पुढील टप्प्यांबाबत, एकूण पाण्याची उपलब्धता, आणि निधीच्या उपलब्धतेनुसार मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नाशिकमधल्या धरणांमधून वाहून जाणारं पाणी, तसंच जायकवाडी, उजनी, येलदरी, सिद्धेश्वर, विष्णुपुरी, सीना कोळेगाव, माजलगाव, निम्न तेरणा, निम्न मनाड, इसापूर, पैनगंगा ही ११ धरणं मोठ्या जलवाहिनीनं जोडून दुष्काळी भागात पाणी पुरवठा करण्याची ही ग्रीड योजना आहे.
 जालना जिल्ह्यातल्या हातवन बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या २९७ कोटी ३९ लाख रुपयांच्या सुधारीत खर्चास, प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णयही, मंत्रिमंडळानं काल घेतला. यामुळे जवळपास १८ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. ही योजना गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत, दुधना उपखोऱ्यात हातवन गावाजवळील कुंडलिका नदीवर होणार आहे. याशिवाय यातून जालना तालुक्यातल्या हातवन, हिवरा रोशनगाव, कारला, ममदाबाद, वझर आणि सोलगव्हाण, या सहा गावातलं एक हजार ६९५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसंच बळीराजा संजीवनी योजनेतील प्रकल्पांना, केंद्र शासनाकडून मिळणारं अर्थसहाय्य आणि राज्य शासनाच्या हिश्श्यापोटी, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक-नाबार्डकडून कर्जरुपानं मिळणारी रक्कम, संबंधित पाटबंधारे महामंडळाच्या खात्यात जमा न करता, राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जमा करण्यासही, काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
 महाराष्ट्र वस्तु आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२१ च्या प्रारुपासही, काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. करदाते तसंच वस्तु आणि सेवा कर विभाग यांच्यामध्ये भविष्यात उद्भवणारे वाद कमी होऊन, कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याच्यादृष्टीनं, तसंच करदात्याचे हित जोपासण्याच्या उद्देशानं या कायद्यात ही सुधारणा करण्यात येत आहे.
****
राज्यातल्या ‘आशा’ स्वयंसेविकांना ��ेत्या १ जुलै पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता, अशी एकूण १५०० रुपयांची वाढ, तर गट प्रवर्तकांना एक हजार २०० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता, अशी एकूण एक हजार ७०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला. मुंबईत काल कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सध्या राज्यभर चालू असलेला आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा, कृती समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांनी केली. आजपासून राज्यातल्या आशा स्वयंसेविका कामावर हजर होतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोनही देण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले –
‘आशा’ची एकूण जी संख्या आहे ६८,२९७ गटप्रवर्तक एकूण ३,५७० आणि त्यामुळे जवळजवळ दोनशे दोन कोटी प्रतिवर्ष खर्च अपेक्षित आहे. याबरोबरच पुढच्या वर्षी देखील आपण जुलै महिन्यामधे पाचशे रूपये वाढ देण्याच्या दृष्टीकोनातून चर्चेमधे आम्ही ठरवलेलं आहे. त्याचबरोबर आशाताई, ज्या काम करत असतांना कोविड परिस्थितीमधे ज्या बाधीत झाल्या आणि आणि दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला अशा ज्या काही केसेस असतील त्या सगळ्यांना देखील ५० लाख रूपये आम्ही देणं निश्चित झालेलं आहे.
आशां वर्कर्सचं काम आणि त्यांना मिळणारं मानधन या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी, ‘यशदा’ मार्फत समिती स्थापन करण्यात येईल, लसीकरणासाठी गर्दीचं व्यवस्थापन करण्याकरता २०० रुपये अतिरिक्त भत्ता देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
****
अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं कर्ज बुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची, संपत्ती निवारण अधिनियम २००२ कायद्यातंर्गत, १८ हजार १७० कोटी दोन लाख रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. बँकांच्या एकूण नुकसानीच्या ८० पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढी ही मालमत्ता आहे. ईडीनं एका ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली. एकूण जप्त मालमत्तेपैकी नऊ हजार ३७१ कोटी १७ लाख रूपये, कर्ज दिलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आल्याचं, ईडीनं म्हटलं आहे.
****
राज्यात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या २०० जागांसाठीच्या पोटनिवडणुकांच्या घोषणेला, भारतीय जनता पक्षानं विरोध दर्शवला असून, या निवडणुकांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पावसाळी अधिवेशन केवळ दोनच दिवस घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि या पोटनिवडणुकांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ��डणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकारनं जर या निवडणुका घेतल्याच तर आम्ही सगळ्या जागांवर फक्त इतर मागासवर्गीय उमेदवार देऊ, जिंकण्या-हरण्याची पर्वा नाही, असं फडणवीस म्हणाले. इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
राज्यात काल १० हजार ६६ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ९७ हजार ५८७ झाली आहे. काल १६३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १९ हजार ३०३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९९ शतांश टक्के झाला आहे. काल ११ हजार ३२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५७ लाख ५३ हजार २९० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ९३ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख २१ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ४०५ कोविड बाधितांची नोंद झाली, तर १३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाच, उस्मानाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर लातूर आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात १४८ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ९८, औरंगाबाद ५९, लातूर ३६, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी २३, जालना १४ तर हिंगोली जिल्ह्यात चार नवे रुग्ण आढळून आले.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक शुल्कासंदर्भात, विद्यार्थी आणि पालक संघटनांकडून शासनास प्राप्त झालेल्या निवेदनावर अभ्यास करून, विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. मुंबईत काल महाराष्ट्र विना अनुदानीत खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम-२०१५ नुसार, गठीत केलेल्या समितीची पहिली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, याबाबत काळजी घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
****
जल जीवन अभियानाअंतर्गत मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना ठरवून दिलेलं उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत काल मराठवाड्यातल्या सर्व पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रखडलेल्या आणि लहान पाणीपुरवठा य��जनांच्या कामांना गती द्यावी, तसंच नवीन योजनांचं सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल सप्टेंबरपर्यंत तयार करण्याच्या सूचनाही, त्यांनी दिल्या आहेत. मराठवाड्यात आठ जिल्ह्यांतल्या ७६ तालुक्यांमध्ये, यावर्षी जवळपास सात लाख २४ हजार ९०४ कुटुंबांना नळजोडण्या देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेची आगामी निवडणूक एमआयएम पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची माहिती, खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. औरंगाबादमध्ये ते काल वार्ताहरांशी बोलत होते. यंदा जास्तीत जास्त वार्डांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचं ते म्हणाले. औरंगाबाद विमानतळासमोर होणारा नियोजित उड्डाणपूल रद्द करुन, आकाशवाणी किंवा दुध डेअरी इथं तो उभारण्यात यावा किंवा सि��को बसस्थानकाजवळील जालना मार्गावरील उड्डाणपूलाचं विस्तारीकरण करुन तो सरळ केंब्रीज पर्यंत करावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचं, जलिल यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वडगाव कोल्हाटी इथं काल १८ वर्षांवरील दिव्यांग बांधवांसाठी, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं. यावेळी ४० दिव्यांगाना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. शासनानं दिव्यांगांसाठी लसीकरणाची ही सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल लाभार्थी दत्ता वाकडे यांनी आभार मानले. ते म्हणाले –
शासनाने जे दिव्यांगासाठी महाराष्ट्रामध्ये घरपोच लस देण्याचं जे उद्दिष्ट ठेवलं, त्यात डॉ बामणे यांच्या मदतीने बजाजनगर वडगाव कोल्हाटी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ४० दिव्यांगाना जवळपास आज लस देण्यात आली. आणि लस घेण्यासाठी बजाजनगर परिसरात दिव्यांग त्रस्त होते. लॉकडाऊनमुळे एवढे वर्ष ते घरीच होते. कारण त्यांना लस घेण्यासाठी बाहेर केंद्रावर जात येत नव्हतं किंवा कुठे रजिस्ट्रेशन करा हे काम खुप सोप्या पद्धतीने आम्हाला करुन घेतलं. या सर्व टिमचं आणि शासनाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड शहरातल्या घरकुल लाभधारकांचे प्रलंबित हप्ते तत्काळ वाटप करावेत, अशी मागणी एमआयएमच्या वतीनं, काल एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. पावसाळा सुरु झाला असून, गंगाखेड शहरातले घरकुल लाभार्थी किरायाने राहत आहेत. घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित हप्ते मिळाले तर बांधकाम करून राहण्याची व्यवस्था होईल, आणि आर्थिक कुचंबणाही थांबेल, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणी संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या २६ जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. औरंगाबाद शहरात आकाशवाणी चौकात सकाळी १० वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती, शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात सर्व तालुक्यात हे चक्का जाम आंदोलन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या विद्युत वितरण विभागाच्या डोंजा उपकेंद्रामध्ये, पाच मेगा व्होल्ट ॲम्पीयर क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशी मागणी भूम-परंडा-वाशीचे आमदार तानाजी सावंत यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यामुळे या भागातील शेतकरी आणि ग्राहकांना सुरळीत विद्युत पुरवठा करता येईल, असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या या उपकेंद्रातून कमी दाबानं वीज पुरवठा होत असल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याचं, त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या रा��ी सावरगांव इथं विजेच्या लपंडावाला कंटाळून नागरिकांनी काल सकाळी राणी सावरगांव-गंगाखेड मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केलं. गावातल्या लोकांनी वेळोवेळी महावितरणकडे स्वतंत्र ग्रीडरची मागणी करुनही कंपनीनं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे आंदोलन केल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरात दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पाऊस पडला. जिल्ह्यात कन्नडसह काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा, तर विदर्भात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
amhikastkar · 5 years ago
Text
सूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींच्या निधीस मंजुरी ; केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली माहिती
सूक्ष्म सिंचनासाठीच्या ४००० कोटींच्या निधीस मंजुरी ; केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली माहिती
[ad_1]
प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे या उद्देशाने सन 2015-16 पासून सूक्ष्म सिंचन योजना ही प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये समाविष्ट केली आहे. पाणी, वीज यांची बचत तसेच मातीची धूप थांबवून रासायनिक खतांचा वापर नियंत्रित पद्धतीने होण्यासाठी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 November 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -०२ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. ****  शेतीच्या नुकसानासंदर्भात विमा कंपन्यांनी सरकारी पंचनामे ग्राह्य धरावेत - मुख्यमंत्र्यांची सूचना  अवकाळी पावसामुळे मराठवाड्याच्या ७२ तालुक्यात २२ लाख हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान  शिवसेनेनं ठरवलं तर स्थिर सरकारसाठी आवश्यक संख्याबळ शक्य - खासदार संजय राऊत आणि  औरंगाबाद इथं बनावट नोटा छापून चलनात आणणारी टोळी जेरबंद **** अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीसंदर्भात विमा कंपन्यांनी सरकारी पंचनामे ग्राह्य धरावेत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल मुंबईत काल दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या नुकसानाचा आढावा घेतला, त्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलताना, मुख्यमंत्र्यांनी, विमा कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेलं अपुरं मनुष्यबळ लक्षात घेता, सरकारी पंचनामेच ग्राह्य धरावेत, असं सांगितलं. शेतकऱ्यांनी मोबाईलवर नुकसानाचं छायाचित्र काढून संबंधित विभागाकडे पाठवलं, तरी ते ग्राह्य धरलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सचिव, जिल्हाधिकारी यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर काम करणाऱ्यांबरोबर संवाद साधावा, आणि नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याबरोबरच अतिरिक्त मदत कशी करता येईल, याबाबत सरकार विचार करत आहे. मंत्रिमंडळाच्या उपसमितीची या अनुषंगानं आजच बैठक घेतली जाणार असून केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. या पावसामुळे द्राक्ष, मका आणि कांद्यासह अन्य पिकांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही खोत यांनी दिली. **** राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी काल नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या विविध भागांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्याला किती भरपाई मिळेल याची माहितीच सरकारी यंत्रणेकडे नाही, याकडे ��क्ष वेधलं. राज्य सरकारला नुकसानीची आकडेवारी सादर करुन मदतीची मागणी करू, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. सरकारनं यावर सहानुभूतीनं निर्णय घ्यावा, मात्र अपेक्षित निर्णय न घेतल्यास पुढं काय करायचे ते आपण ठरवू, असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला. **** या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातल्या ७२ तालुक्यातल्या २२ लाख हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालं असून राज्यात ५३ हजार हेक्टरवरची फळपिकं, एक लाख ४४ हजार हेक्टरवरचं भात पीक, प्रत्येकी दोन लाख हेक्टरवरची ज्वारी तसंच बाजरी, पाच लाख हेक्टरवरचा मका, तर प्रत्येकी १९ लाख हेक्टरवरच्या सोयाबीन आणि कपाशीचं नुकसान झालं आहे. जालना जिल्ह्यात सुमारे चार लाख तेहतीस हजार हेक्टरवरच्या खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सोयाबीन, मका, बाजरी आणि कापसाचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागानं सुरू केले आहेत. पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी काल बदनापूर तालुक्यातल्या भराडखेडा इथं नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात खरीप पिकाचं ३२६ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं कृषी अधिकारी शिंदे यांनी सांगितलं. **** परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या एक लाख ३८ हजार १०७ शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज केले असून आजपासून पंचनामे करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांना प्रत्येकी एक गाव देण्यात आलं आहे. या पावसामुळे जिल्ह्यात तीन लाख २९ हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून यापैकी एक लाख ५२ हजार हेक्टरवर सोयाबीन तर एक लाख ६८ हजार हेक्टरवरच्या कपाशीचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कृषी तसंच महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं **** लातूर जिल्ह्याच्या औसा मतदारसंघातल्या अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून प्रशासनानं या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना आमदार अभिमन्यू पवार यांनी दिल्या आहेत. ते काल औसा इथं तातडीच्या आढावा बैठकीत बोलत होते. या पावसामुळे काढून ठेवलेले सोयबीन, नुकतीच पेरणी केलेली ज्वारी आणिा हरभरा, ऊस यासह फळबागांचंही नुकसान झालं आहे. आमदार पवार यांनी शिवारात जाऊन या नुकसानीची पाहणी केली. **** हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं कापणी केलेलं सोयाबीन जाळून टाकलं. कापणी केलेलं सोयाबीन पावसात भिजल्यावर प्रशासनानं पंचनामे न केल्यानं हे सोयाबीन जाळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहेत आमचे वार्ताहर ..... कळमनुरी तालुक्यातील खरीप ज्वारी व कापसाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तर सोयाबीन बियाचे ८४.३१ टक्के नुकसान झाले आहे. यासंबंधीचा प्राथमिक अहवाल कळमनुरीचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी जिल्ह्याधीकाऱ्यांकडे पाठविलेला आहे. कळमनुरी तालुक्यामध्ये सोयाबीन ४९ हजार ८१४ हेक्कटरवर पेरण्यात आले होते, त्या��ैकी ४२ हजार हेक्कटर वरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. खरीज ज्वारी १३२२ हेक्कटरवर तर कापूस ९ हजार ७७५ हेक्कटरवर पेरण्यात आला होता.या दोन्हीही पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. - रमेश कदम. **** बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि राज्य शासनाच्या अतिवृष्टी साठी मिळणाऱ्या भरपाईचा लाभ देखील मिळू शकेल, यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी केलं आहे. ७२ तासात पीक विम्याचे दावे दाखल न करू शकलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार असल्याचं पांडेय यांनी सांगितलं. **** औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आज दोन दिवसा���च्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. आज सकाळी ते दहा वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहोचतील. आज दिवसभरात ते गंगापूर, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री आणि औरंगाबाद तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. तर उद्या कन्नड, वैजापूर, तालुक्यातल्या पाहणीनंतर दुपारी ते विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत ते आढावा बैठक घेणार आहेत. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** शिवसेनेनं ठरवलं तर पक्षाला राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ प्राप्त करता येईल, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. भाजप आणि शिवसेनेदरम्यान राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असं स्पष्ट करतानाच, भाजपला सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेनं कोणताही अंतिम इशारा दिलेला नाही, असा खुलासाही राऊत यांनी केला. **** भाजप शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या घडामोडी म्हणजे पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. जनतेने आपल्याला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला आहे, तो मान्य करून आपला पक्ष विरोधी बाकांवरच बसेल, असं पवार यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या घडामोडींसंदर्भात बोलताना, भाजपकडून शिवसेनेची फसवणूक होत असल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी ठरलेल्या समीकरणावर भाजप ठाम नसल्याचं, चव्हाण यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यात निर्माण होत असलेल्या राजकीय अस्थिरतेला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसची भूमिका मात्र प्रतीक्षेची असल्याचं त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे **** दरम्यान, राज्यात निर्धारित वेळेत सरकार स्थापन झालं नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. भाजप शिवसेनेची सत्तावाटपाबाबतची बोलणी दिवाळीमुळे लांबली असून, एक दोन दिवसांत बोलणी सुरू होतील, असं मुनगंटीवार म्हणाले. येत्या आठ नोव्हेंबरला विद्यमान सरकारचा कार्यकाळ पूर्ण ��ोत असून, सात तारखेच्या आत नवीन सरकार स्थापन होणं आवश्यक आहे. **** औरंगाबाद इथं बनावट नोटा छापून चलनात आणणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. परवा रात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तीन युवकांना अटक करून, नोटा छपाईचं साहित्य आणि शंभर रुपये दर्शनी मूल्याच्या एक हजार पन्नास नोटा जप्त केल्या. शेख समरान, सय्यद सैफ आणि सय्यद सलीम अशी या तिघांची नावं असून, हे तिघे सहा महिन्यांपासून राहत्या घरीच नोटा छापून चलनात आणत असल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांच्या इतर साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत. **** उस्मानाबाद जिल्ह्यात ऑक्टोबर अखेर पर्यंत वार्षिक सरासरीच्या ९३ % म्हणजे ७२१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात तुळजापूर कळंब वाशी उमरगा आणि लोहारा तालुक्यात अवकाळी पावसामुळे खरिप पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु सप्टेंबर अखेरपर्यंत परंडा तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शासनाने परंडा तालुक्यात खरीप हंगामात दुष्काळ जाहीर केला आहे. जिल्ह्यातील २२३ सिंचन प्रकल्पात ३२ % म्हणजे २२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी सुरु असलेले टॅंकर बंद झाले आहेत. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 July 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ जुलै २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांसाठीचं आरक्षण लागू ** राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात ठिबक सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा ** शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करण्याची शिवसेनेची मागणी ** आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी पंढरपूर नगरी दुमदुमली. आणि ** विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत यजमान इंग्लंडचा अंतिम फेरीत प्रवेश **** वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग- मराठा आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. एमबीबीएस अभ्यासाक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती. यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी हे आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षण कायदा ३० नोव्हेंबर २०१८ पासून अमलात आला. मात्र, वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली होती. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून हे आरक्षण लागू करता येणार नाही, असा दावा याचिकार्त्यांनी केला होता. दरम्यान, राज्य सरकारनं काल २०१४मध्ये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरता आरक्षण देण्याचा काढलेला आदेश रद्द करण्याया शासन निर्णय जारी केला, यामुळे तात्पुरत्या स्वरुपात खुल्या प्रवर्गातून विविध पदांवर केलेल्या नियुक्त्या रद्द झाल्या आहेत. **** राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात ठिबक सिंचन योजनेसाठी ८०टक्के अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथं आयोजित कृषी पंढरी कार्यक्रमात ते काल बोलत होते. **** शेती तसंच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. सरकारं बदलली तरी, प्रशासकीय यंत्रणा तीच असल्यामुळे, अंमलबजावणीतले कच्चे दुवे कायम राहतात, असे कच्चे दुवे दुरुस्त करण्याचा अधिकार या कृषी आयोगाला असावा, ठाकरे यांनी म्हटलं आहे. पीक विमा दाव्यांची देयकं अदा न केल्याच्या निषेधार्थ येत्या बुधवारी, मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर निषेध मोर्चा काढणार असल्या���ं, ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतरही विमा कंपन्या पीक विम्याच्या दाव्यांचा निपटारा करणार नसतील, तर शिवसेना आपल्या भाषेत त्यांना समज देईल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. **** प्रत्येक विद्यापीठांनी विस्तारीकरणाबरोबरच गुणवत्ता विकासाकडेही लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, श्रमिक पत्रकारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात २३८ सदनिकांच्या बांधकामाचं भूमीपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. **** आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूरमध्ये १२ लाख भाविकांचा मेळा जमला आहे. राज्य आणि राज्याबाहेरून अनेक दिंड्या आणि पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक तसंच वैयक्तिक वाहनांनीदेखील मोठ्या प्रमाणावर भाविकांची मांदियाळी पंढरपूरात अवतरली आहे. किर्तन, भजन, टाळ -मृदुगांच्या तसंच विठू नामाच्या गजरानं अवघं पंढरपूर दुमदुमनं गेलं आहे. पहाटे दोन वाजून १५मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्निक शासकीय महापूजा झाली.यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेस बसण्याचा मान लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या सांगाची सुनेवाडी तांडा इथल्या विठ्ठल चव्हाण आणि त्यांच्या पत्नी प्रयाग चव्हाण यांना मिळाला. आषाढी वारी सकारात्मक शक्तीचे दर्शन घडवते असं सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले…. पंढरी आणि माऊली सर्व सामान्यांचं आशास्थान आहे या महाराष्ट्रामध्ये ही शेकडो वर्षाची परंपरा या परंपरेला महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवला आमची संस्कृती अबाधित ठेवली आणि खऱ्या अर्थानं लाखो लोकं यावे या ठिकाणी येतात एक सकारात्मक शक्तीचा आविष्कार हा या वारीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा-आकांक्षा यांचे प्रतिनिधित्व करणारी अशा प्रकारची वारी आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, चांगला पाऊस येऊन बळी राजा सुखावला पाहिजे अशी मागणी आपण विठ्ठलाच्या चरणी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या छोट्या पंढरपूरमध्येही आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. राज्यमंत्री अतुल सावे यांनी पंढरपूर इथं मध्यरात्रीनंतर सपत्नीक महापुजा केली. या यात्रेमुळे आज औरंगाबाद- पुणे रस्त्यावरच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** अनुसूचित जाती - जमाती अन्याय अत्याचार ��्रतिबंधक कायदा - अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्ह्यांचा तत्परतेनं तपास करुन गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा होण्यासाठी, कायद्याची प्रभावी अमंलबजावणी होणं गरजेचं आहे असं सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं त्यांनी या कायद्यासंदर्भात मराठवाडा विभागाची आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले... अॅट्रॉसिटी अॅक्ट ज्यागोष्टीचा आम्हाला अडसर वाढतो .विशेषता: शिक्षा होत नाही किंवा कोर्टामध्ये केसेसचा निकाल जास्त लागत नाही या विषयावर ती आम्ही चर्चा केली त्याची कारणे शोधायचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर गावागावात वातावरण हे असता कामा नये तर वातावरण समभावाचा असावा अशा प्रकारची देखील इंस्ट्रक्शनस त्यांना दिलेले आहेत **** इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल उपांत्यफेरीत यजमान इंग्लंडनं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करतांना इंग्लंडसमोर विजयासाठी २२३ धावांचं आव्हान ठेवलं. इंग्लडनं हे आव्हानं ३२व्या षटकात ८ गडी राखून पूर्ण केलं. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी आता इंग्लड आणि न्यूझीलंड या संघामध्ये होणार आहे. या दोन्ही संघाना आतापर्यंत कधीच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं नाही. **** बीड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत संपादीत केलेल्या जमिनीच्या मावेजासाठी ११ कोटी ६९ लाख रूपये मंजूर केल्याबद्दल बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने काल राज्याचे रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणं १५ दिवसात मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. **** विद्यमान सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता केलेली नसून केवळ जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. लातूर शहर विधानसभा मतदार संघातल्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारून कामाला लागावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. **** परभणी जिल्ह्यात काल दुपारी बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. खरीपाच्या पिकांसाठी हा पाऊस पोषक असल्यानं, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. नांदेड शहरा��ह जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर परिसरातही काल पाऊस झाला. **** परभणी जिल्ह्यात जिंतूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार विजय भांबळे यांच्यावर कारवाई करावी, तसंच संबंधित कर्मचाऱ्याविरोधात दाखल केलेला मागासवर्गीय अन्याय अत्याचार प्रतिबंधक -ॲट्रासिटी कायद्यातर्गंत गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी संभाजी सेनेच्यावतीने काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. **** नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ यांच्यात काल नाशिक इथं सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर आणि महाराष्ट्र विश्वकोश मंडळाचे सचिव श्यामकांत उपस्थित होते. आरोग्य विद्यापीठाशी संबंधित असा विश्वकोष मंडलाचा हा पहिलाच करार असल्याचं म्हैसेकर यांनी सांगितलं. ****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 June 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २६ जून २०१९ सकाळी ७.१० मि. ****  वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्याची जनतेची भावना अभिनंदनीय-पंतप्रधानांचं प्रतिपादन  सर्वंकष आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र देशभरातून तिसऱ्या क्रमांकावर  ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामं मार्च २०२० पर्यंत होणार पूर्ण आणि  आज सामाजिक न्याय दिन; राजर्षी शाहू महाराजांना अभिवादनपर विविध कार्यक्रमांचं आयोजन **** वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचा जनतेची भावना अभिनंदनीय असून, यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून ही बाब स्पष्ट झाल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं दिशा आणि गती कायम ठेवून विकासाच्या मार्गावर आगेकूच सुरू ठेवली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आपला देश सशक्त, सुरक्षित, विकसित आणि सर्वसमावेशक व्हावा, यासाठी सरकार आणि विरोधी पक्षाला एकत्र येऊन काम करावं लागेल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. **** सर्वंकष आरोग्य निर्देशांकात ६३ पूर्णांक ९९ शतांश गुण मिळवून महाराष्ट्रानं देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. नीति आयोगानं काल नवी दिल्लीत सर्वंकष आरोग्य निर्देशांक जाहीर केला. २०१५ सालच्या सहाव्या स्थानावरून राज्यानं यंदा तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पाच वर्षांखालील बालकं तसंच नवजात बालकांच्या मृत्यूदरात घट झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रणी राहिलं आहे. राज्यात जन्मदराचं प्रमाणही स्थिर असल्याचं या अहवालात नमूद आहे. दरम्यान, आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे हे साध्य झाल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचं हे यश असल्याचं शिंदे म्हणाले. **** राज्यातली रूग्णालयं आणि आरोग्यकेद्रांमधल्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्यावी, आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, कंत्राटी पद्धतीनं ही पदं भरून जनतेला आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. ते काल विधानभवनात एका बैठकीत बोलत होते. राज्याच्या ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्यास अडचण असल्यामुळे डॉक्टरांना प्रति रुग्ण प्रोत्साहन निधी सारख्या सुविधा देण्यात याव्यात, असंही शिंदे म्हणाले. **** राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्याचं उद्दीष्ट गाठायचं आहे असं, वित्तमंत्री सु��ीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतांना ते काल विधान सभेत बोलत होते. यावेळी वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणात औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक, जलयुक्त शिवार योजनेमुळे कृषी उत्पादन झालेली वाढ, प्रधानमंत्री पीक विमा योजना, महागाईमध्ये झालेली घट आदींसह विविध मुद्दयांना स्पर्श केला. **** आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांना शासनातर्फे पाच हजार रुपये आणि दहा हजार रुपये मानधन दिलं जात असून, या निधीत वाढ करण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. आर्थिक सुस्थिातीत आणि हयात असलेल्या अनेक मान्यवरांनी हे मानधन नाकारलं असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक हजार गावं आदर्श करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या प्रकल्पाची सुरूवात केली असून याअंतर्गत राज्यातील २५ जिल्हयांमधील सरपंच आणि ग्रामसेवक यांची प्रशिक्षणाव्दारे क्षमता बांधणी करण्यात येत आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाखालील दुष्काळी गावांना पाणीपुरवठ्यासाठी ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामं मार्च २०२० पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली. या योजनेच्या प्रलंबित कामाबाबतची लक्षवेधी सूचना सतीश चव्हाण यांनी मांडली, त्याला उत्तर देताना शिवतारे बोलत होते. या योजनेवर मार्च २०१९ अखेर भूसंपादनसह एकशे चौऱ्यांशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये निधी खर्च झालेला आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी आणखी तीनशे छत्तीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये निधीची आवश्यकता असून, त्यापैकी चालू आर्थिक वर्षासाठी पंधरा कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. निधी उपलब्धतेनुसार उर्वरित कामं पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचंही शिवतारे यांनी यावेळी सांगितलं. या चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनीही सहभाग घेतला. **** राज्यातल्या बेकायदेशीर रोगनिदान प्रयोगशाळांविरुद्ध कारवाईसाठी आठवडाभरात शासननिर्णय जारी करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य सुनील प्रभू यांनी एका लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना राज्यभर सुमारे आठ हजार बेकायदेशीर प्रयोगशाळा कार्यरत असल्याचं नमूद केलं होतं. **** खेळाडूंना खाजगी क्षेत्रातही नोकरीसाठी आरक्षण लागू करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी काल दिली. विधानसभेत सदस्य संजय केळकर यांनी खेळाडूंच्या नोकरीतील आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जात आहे. या निमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्र��ांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघाच्या वतीनं शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ अभिवादनपर विशेष कार्यक्रमाचं आणि व्याख्यानाचं आयोजन केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुपारी बारा वाजता महात्मा फुले सभागृहात विचारवंत प्राचार्य डॉ. आय.एच. पठाण यांचं विशेष व्याख्यान होणार आहे. नांदेड इथं आज समता दिंडी, अभिवादन सभा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. **** केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान विकास सन्मान योजना राबवण्यासंदर्भात परभणी जिल्हा प्रशासनाकडून फक्त ग्रामसेवकांनाच सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेनं दिला आहे. संघटनेचे पालम तालुकाध्यक्ष केशवराव खाडे यांनी तहसीलदारांना याबाबत लेखी निवेदन सादर केलं आहे. ही योजना तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी संयुक्तरित्या काम करून राबवणं अपेक्षित आहे. **** कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काल धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर इथं `रस्ता बंद` आंदोलन केलं. सिल्लोड - सोयगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरीत मिळावी, धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हतनूर इथल्या उड्डाणपुलाची उंची वाढवावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक सुमारे तीन तास खोळंबली होती. कन्नड ग्रामीण पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. **** जालना इथं काल भरधाव टँकरच्��ा धडकेत दुचाकीवरील एका ज्येष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू झाला. नितीन राठोड आणि लक्ष्मण आढे अशी मृतांची नावं असून ते अंबड तालुक्यातल्या गोंदीतांडा इथले रहिवासी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. **** अकोला जिल्ह्यातल्या हिवरखेड इथं प्रतिबंधित एचटी बीटी कपाशी, आणि बीटी वांग्यांची अडगाव इथल्या शेतांमध्ये लागवड केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललीत बहाळे यांच्यासह बारा जणांविरुद्ध पोलिसांनी काल गुन्हे दाखल केले. एचटी बीटी कपाशी, बीटी वांगी लागवड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. **** लातूरचे नायब तहसीलदार इंद्रजित नामदेव गरड यांना १५ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहाथ पकडलं. शेतजमिनीच्या खरेदी प्रकरणात फेर ओढुन देण्यासाठी गरड यांनी ३५ हजार रुपयाची मागणी केली होती, त्यातील १५ हजार रूपये घेतांना काल गरड यांना ���कडण्यात आलं. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातल्या शेंडी इथला ग्रामसेवक शिवाजी नारायण देशमाने याला तीन हजार रूपये लाच स्वीकारतांना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. अंगणवाडीत दुरूस्ती केलेल्या कामाचा धनादेश काढण्यासाठी ही लाच स्वीकारली जात होती. **** औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील लेखापाल महानंदा भिकन जाधव हिला अडीच हजार रूपये लाच घेतांना काल रंगेहाथ पकडण्यात आलं. तासिका तत्वावरच्या शिक्षकाचा २० हजार रूपयांचा धनादेश काढण्यासाठी तिनं लाच मागितली होती. **** क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर ६४ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे बारा गुण झाल्यानं, हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या स्पर्धेत आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तर, उद्या भारत आणि वेस्ट इंडीज संघात सामना होणार आहे. **** नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा ९० टक्क्यापेक्षा जास्त भाग व्यापला असून, येत्या चार पाच दिवसात उर्वरित भागातही मोसमी पाऊस पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, औरंगाबाद शहर आणि पैठण तालुक्यातल्या आडगाव, कडेठाण परिसरात काल पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर इथं गारपीट झाल्याचं वृत्त आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 February 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि. ****  भारत हा नवीन परंपरा आणि नव्या धोरणांचा स्वीकार करणारा देश - पंतप्रधान नरेंद्र मोदी  नांदेड इथल्या एकलव्य निवासी विद्यालयासह राज्यात विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण  बुलडाणा इथले जवान संजय राजपूत आणि नीतिन राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  मराठवाड्यात अनेक ठिकाणी बंद पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली आणि  वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि सौरभ वर्मा अजिंक्य **** भारत हा नवीन परंपरा आणि नव्या धोरणांचा स्वीकार करणारा देश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. धुळे इथं काल विविध विकासकामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. पुलवामा हल्ल्यातल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश असून, या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं जाईल, असं ते म्हणाले. सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली. यावेळी कृषी सिंचन योजनेंतर्गत ‘निम्न पांझरा’ प्रकल्पाचं लोकार्पण, धुळे - नरडाणा रेल्वेमार्ग, जळगाव - मनमाड रेल्वेमार्गाच्या तिहेरीकरणाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. राज्यपाल सी विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते भुसावळ-वांद्रे खानदेश एक्सप्रेस, उधना-नंदूरबार मेमू ट्रेन, उधना-पाळधी मेमू ट्रेन, या रेल्वेगाड्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. त्यापूर्वी काल सकाळी, यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथंही विविध विकास कामांचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. २०२२ पर्यंत सर्वांना स्वत:चं घर देण्याची योजना प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी सांगितलं. एकलव्य निवासी विद्यालय योजनेंतर्गत, नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड इथं, आदिवासी मुला-मुलींसाठी बांधलेल्या शाळेचं दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना नव्या घराचा ताबा पंतप्रधानांच्या हस्ते देण्या�� आला. अजनी - पुणे हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी रवाना केलं. राज्यपालांसह मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री मदन येरावार यावेळी उपस्थित होते. वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचं काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. **** जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली इथं काल सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत या हल्ल्याच्या निषेधाचा ठराव संमत झाला. दहशतवाद आणि दहशतवाद्यांना सीमेपलिकडून मिळणारं संरक्षण याबाबतही या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत, काश्मीरला दहशतवाद आणि हिंसेतून मुक्त करण्याच्या सरकारच्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार केला. देशाची एकता आणि सुरक्षेसाठी आपण सरकार आणि सुरक्षा बलांसोबत असल्याचं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर वार्ताहारंशी बोलताना सांगितलं. दहशतवादाचा सामना करण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारसोबत असल्याचं त्यांनी नमूद केलं. **** दरम्यान, या हल्ल्यात हुतात्मा झालेले बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचे जवान संजय राजपूत तसंच लोणार तालुक्यातल्या चोरपांगरा इथले नीतिन राठोड यांच्या पार्थिव देहावर काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोन्ही जवानांचे पार्थिव देह काल औरंगाबाद इथं सकाळी लष्कराच्या विमानानं पोहोचले. त्यानंतर राठोड यांचा पार्थिव देह रस्तामार्गे लोणारकडे तर राजपूत यांचा पार्थिव देह हेलिकॉप्टरनी, मलकापूर इथं नेण्यात आला. औरंगाबाद विमानतळावर, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह नागरिकांनी वीरजवानांना श्रद्धांजली अर्पण केली. जालना इथं, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, यांच्यासह अनेकांनी वीरजवानाच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दोन कोटी एक्कावन्न लाख रुपये तर कोल्हापूर इथल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अकरा लाख रुपये अर्थसाह्य जाहीर केलं आहे. **** या हल्ल्याच्या निषेधार्थ काल बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात बहुतांश मुख्य बाजारपेठा बंद होत्या. पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं ठिकठिकाणी दहन करत, हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातही उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला. या बंद मध्ये शाळा, महाविद्यालयं, खाजगी शिक���णी वर्ग, सहभागी झाले. शहरातली बहुतेक व्यापारी प्रतिष्ठानं बंद राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. रेणापूर आणि नळेगाव इथं बंद पाळून, दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करण्यात आलं. परभणी शहरासह जिल्ह्यात काल उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं, हुतात्म्यांच्या कुटूंबियांसाठी मानवत इथं मदत फेरी काढण्यात आली. नागरिकांनी या मदत फेरीला चांगला प्रतिसाद दिला. पालघर जिल्ह्यातल्या बोईसर, नालासोपारा, वसई मध्ये, तसंच नंदुरबार, रत्नागिरी, आदी जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी रेल रोको आंदोलनही करण्यात आलं. औरंगाबाद इथं आज सायंकाळी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांना त्यांच्या पोलिस यंत्रणेला माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातला कलम ६६ अ, रद्द केलेला असल्याबद्दल जागरुक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लोकांना विनाकारण अटक होणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ऑनलाईन आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यास तुरुंगवासाची तरतूद असलेलं, माहिती तंत्रज्ञान कायाद्यातलं कलम ६६ अ, सर्वोच्च न्यायालयानं मार्च २०१५ मध्ये रद्द केलेलं आहे. **** गुवाहाटी इथं काल सायना नेहवालनं वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. सायनानं, पी व्ही सिंधूचा २१-१८, २१-१५ असा पराभव करत चौथ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे. पुरुषांच्या गटात, सौरभ वर्मानं लक्ष्य सेनचा पराभव करून विजेतेपदाची हॅटट्रीक साधत पुरूष एकेरीतील किताब पटकावला. पुरूष दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि चिराग शेट्टी या जोडीनं अव्वल मानांकीत अर्जुन एम आर आणि श्लोक रामचंद्रन या जोडीचा सरळ लढतीत पराभव केला. **** जालना जिल्ह्यातल्या बठाण बुद्रुक इथं आज गुणीजन साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, ज्येष्ठ साहित्यिक गेल ऑम्वेट संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत, पाटोदा या आदर्श गावाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच, भास्करराव पेरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल. **** औरंगाबाद इथल्या पन्नालाल नगर विकास संस्थेच्या वतीनं आयोजित अष्टविनायक संगीत महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 February 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १६ फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि. ****  पुलवामा हल्ल्याच्या उत्तराचं स्वरुप, वेळ आणि स्थळ निवडण्याची तिन्ही सैन्य दलांना मुभा - पंतप्रधान नरेंद्र मोदी  या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या राज्यातल्या दोन जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत  पंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावर;  लातूर जिल्ह्यात ऊसाला लागलेल्या आगीत वृद्ध महिलेचा मृत्यू; ३० एकर ऊसही भस्मसात आणि  ऑस्ट्रेलिया सोबतच्या आगामी क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर **** पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या उत्तराचं स्वरुप, वेळ आणि स्थळ निवडण्याची मुभा तिन्ही सैन्य दलांना देण्यात आल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल उत्तरप्रदेशात झाशी आग्रा संरक्षण मार्गिकेच्या पायाभारणी समारंभात बोलत होते. केंद्रीय पोलिस दलाच्या जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नसल्याची ग्वाही, आपण देशातल्या १३० कोटी जनतेला देतो, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. त्याआधी काल सकाळी केंद्र सरकारनं, पाकिस्तानला व्यावसायिक दृष्टीकोनातून बहाल केलेला सर्वात आवडते राष्ट्र - मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. या हुतात्मा जवानांचे पार्थिव देह काल श्रीनगरहून नवी दिल्लीत आणण्यात आले, पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री राजनाथसिंह, माहिती प्रसारणमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यांच्यासह तीनही सैन्यदल प्रमुखांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. **** दरम्यान, काल राज्यभरात ठिकठिकाणी या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. मंत्रालयात महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या उपस्थितीत श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं काल तुळजापूर इथं, पाकिस्तानचा झेंडा जाळून हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. तर उस्मानाबाद शहरात दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध सभा आणि मोर्चे काढून त��व्र भावना व्यक्त करण्यात आल्या. वसमत शहरात व्यापाऱ्यांनी निषेध मोर्चा काढून बाजारपेठ बंद ठेवली. परभणी शहर तसंच जिल्ह्यात विविध पक्ष संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला. औरंगाबाद इथं निषेध मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौकातून निघालेल्या या मोर्चात राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले. सायंकाळी सिडको परिसरातून मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथंही मेणबत्ती मोर्चा काढून या हल्ल्याचा निषेध करत, हुतात्म्यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. बीड शहरातील सिद्धिविनायक संकुलात श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. धुळे शहर आणि जिल्ह्यातही पाकिस्तान पुरस्कृत दशहतवाद्यांच्या कृत्याचा निषेध करत सर्व पक्षीय पदाधिकारी, विविध संघटनांनी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. मुंबई, पालघर, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर इथं या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. **** या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातले संजय राजपूत आणि नितीन राठोड हे दोन जवान हुतात्मा झाले. या दोन्ही जवानांच्या कुटुंबांना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, प्रत्येकी ५० लाख रुपये मदत, जाहीर केली आहे. या दोन्ही कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही राज्य शासनातर्फे उचलण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. **** ……… या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार वितरण सोहळा स्थगित करण्यात आला. काल पुणे इथं हा कार्यक्रम होणार होता. या सोहळ्याची पुढची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असं सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत, धुळे इथं कृषी सिंचन योजनेंतर्गत ‘निम्न पांझरा’ प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. धुळे तसंच यवतमाळ जिल्ह्यातल्या विविध योजनांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड इथं, एकलव्य निवासी विद्यालय योजनेंतर्गत, आदिवासी मुला-मुलींसाठी बांधलेल्या शाळेचं उद्धाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते नव्या घराच्या चाव्या वितरित होणार आहेत. भुसावळ बांद्रा खानदेश एक्सप्रेस तसंच अजनी-पुणे रेल्वेगाडीला दूरदृष्य संवाद यंत्रणेनं हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान रवाना करतील. **** राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे सर्वोत्तम प्रयोगशाळा पुरस्कार काल उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते अकरा तंत्रनिकेतन संस्थ��ंना प्रदान करण्यात आले. यामध्ये औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतनचा समावेश आहे. संस्थेचे प्राचार्य एफ. ए. खान यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पन्नास हजार रुपये आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** बंजारा समाजाचे गुरु संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं, तर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुंबईत मंत्रालयात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद इथंही सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त वाहनफेरी आणि अभिवादन सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. **** लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातल्या मौजे डिगोळ इथं ऊसाला लागलेल्या आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून ३० एकर परिसरातला ऊसही भस्मसात झाला. नागरबाई जोगदंड असं या ६५ वर्षीय महिलेचं नाव आहे. या आगीत २१ शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** जायकवाडी पाटबंधारे उपविभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मुकुंदराज कलशेट्टी याना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं लाच घेताना रंगेहात पकडलं, ऊसाला कालव्यातून पाणी सोडण्यासाठी कलशेट्टी यानं, तक्रारदार शेतकऱ्यांकडून चार हजार रुपये लाच मागितली होती. पाथरी उपविभागीय कार्यालयात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** ऑस्ट्रेलिया सोबतच्या टी ट्वेंटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघ काल जाहीर करण्यात आला. दोन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी युवा लेग स्पीनर मयंक मर्कंडेयची तर एक दिवसीय सामन्यांसाठी ऋषभ पंतसह के.एल.राहुल, सिध्दार्थ कौल, विजय शंकर यांची निवड झाली आहे. पहिला टी-ट्वेंटी सामना २४ फेब्रुवारीला तर दोन मार्चपासून पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. **** आसाममध्ये गुवाहाटी इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय वरीष्ठ बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला गटात सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू यांच्यात आज अंतिम लढत होणार आहे. पुरुष गटात सौरभ वर्मा आणि लक्ष्य सेन यांच्यात अंतिम लढत होणार आहे. **** औरंगाबाद इथल्या शासकीय चित्रकला महाविद्यालयातल्या माजी विद्यार्थ्यांच्या कला प्रदर्शनाला कालपासून औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. महात्मा गांधी मिशनच्या कला दीर्घेत भरलेल्या या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, लघुचित्रशैली आणि छायाचित्रांच्या सरस कलाकृती यामध्ये पाहता येणार आहेत. पॅच ग्रूपच्या वतीनं आयोजित हे प्रदर्शन उद्या रविवारपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुलं आहे. **** जलसंवर्धन ही लोकचळवळ होण्याची गरज उस्मानाबादचे अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण यांनी व्यक्त केली आहे. रेडिओ किसान दिनानिमित्त, काल तुळजापूर तालुक्यात सांगवी इथं आयोजित, जलसंवर्धन कार्यशाळेत बोलत होते. शेतकऱ्यांना जल व्यवस्थापनाचं महत्त्व सांगण्यासाठी ही कार्यशाळा आयोजीत केल्याचं, उस्मानाबाद आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी संजय बरिदे यांनी सांगितलं. **** परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या प्रधानमंत्री आवास योजना तसंच रमाई घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांना नियमानुसार मोफत रेती उपलब्ध करुन देण्यात यावी या मागणीसाठी काल उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. या लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याच्या घोषणेची अद्याप त्याची अंमलबजावणी न झाल्यानं, हे आंदोलन करण्यात आलं. **** औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं काल गोदावरी प्रकट दिन साजरा झाला. यानिमित्तानं आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. **** औरंगाबाद जिल्ह्यात करमाड इथं आजपासून मुस्लिम धर्मियांच्या जिल्हास्तरीय दोनदिवसीय इज्तेमाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात सर्व सुविधांसह चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 January 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि. ****  सर्वसाधारण वर्गातल्या आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद असलेलं, १२४वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर  राज्यातल्या कोतवालांच्या मानधनात सेवाज्येष्ठतेनुसार वाढ; आरोग्य-अपघात- निवृत्तीवेतन योजना लागू  पंतप्रधान आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; विविध विकास कामांचं भूमिपूजन  बीड आणि जालना जिल्ह्यात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मदतीचं वाटप आणि  खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला आजपासून पुण्यात प्रारंभ **** सर्वसाधारण वर्गातल्या आर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद असलेलं, १२४वं घटनादुरुस्ती विधेयक काल रात्री लोकसभेत मंजूर झालं. विधेयकाच्या समर्थनात ३२३ मतं पडली तर तीन खासदारांनी विधेयकाविरोधात मतदान केलं. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी हे विधेयक सादर करताना, खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बल घटकाला सामाजिक दृष्ट्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. या आरक्षणामुळे इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं सांगितलं. घटनात्मक तरतुदींतर्गत संमत झालेलं हे आरक्षण सर्वोच्च नायालयात याचिका दाखल करूनही रद्द होणार नाही, असं गहलोत यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसंच शिवसेनेनंही या विधेयकाला पाठिंबा दर्शवला. **** नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ काल लोकसभेनं काल पारित केलं. नागरिकत्व कायदा १९५५ मध्ये सुधारणा करुन अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या मुस्लिम वगळता इतर धर्मीय अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्वासाठी पात्र ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. दरम्यान लोकसभेचं कामकाज काल अनिश्चितकाळासाठी तहकूब झालं. राज्यसभेचा हिवाळी अधिवेशनाच्या कार्यकाळ आज एका दिवसासाठी वाढवण्यात आला आहे. **** राज्यातल्या कोतवालांच्या मानधनात सेवाज्येष्ठतेनुसार वाढ करण्यासह आरोग्य, अपघात आणि निवृत्तीवेतनाच्या योजना लागू करून त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यास काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा राज्यातल्या दहा हजाराहून अधिक कोतवालांना लाभ होणार आहे. या निर्णयानुसार सेवाज्येष्ठतेनुसार १० वर्षापर्यंत सेवा झालेल्यांना साडेसात हजार रूपये, ११ ते २० वर्षापर्यंत सेवा झालेल्यांना साडेसात हजार रूपये अधिक तीन टक्के, २१ ते ३० वर्षापर्यंत सेवा झाली असल्यास साडेसात हजार रूपये अधिक चार टक्के आणि ३१ वर्षांहून अधिक सेवा झालेल्या कोतवालांसाठी साडेसात हजार रूपये अधिक पाच टक्के इतकं मानधन दिलं जाईल. तसंच ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक कोतवालास १५ हजार रुपय�� मानधन दिलं जाणार आहे. याशिवाय महसूल विभागातल्या गट ड मधल्या प्रथम नियुक्तीच्या पदांपैकी नियमित पदांमधून २५ टक्क्यांऐवजी आता ४० टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्यातील कृषी आणि कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन - स्मार्ट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासही राज्यी मंत्रिमंडळानं तत्त्वत: मान्यता दिली. या प्रकल्पामध्ये जागतिक बँकेच्या सहाय्याने जवळपास २२२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. राज्यातल्या विविध नगर पंचायत आणि परिषदेच्या सुमारे एक हजार चारशे रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. ११ मार्च १९९३ ते २७ मार्च २००० या कालावधीत पालिकांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र आणि शारीरिक शिक्षण या विषयांना अनुदान देण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. **** केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. त्यामुळे आलोक वर्मा पुन्हा एकदा सीबीआयचे संचालक म्हणून रुजू होणार आहेत. मात्र केंद्रीय दक्षता आयोगाचा तपास पूर्ण होईपर्यंत वर्मा हे कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत, असंही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध विकास कामांच ते भूमिपूजन करणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार घरकुल योजनेचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते होईल. याशिवाय सोलापूर- तुळजापूर - उस्मानाबाद या ५८ किलोमीटर लांबीच्या चौपदरी रस्त्याचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते केलं जाईल. जवळपास ९९ किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पाचा हा एक भाग आहे. सोलापूर-येडशी दरम्यानच्या या कामासाठी ९७२ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. पंतप्रधानांनी २०१४मध्ये या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं. 'अमृत' योजनेअंतर्गत १९० कोटी रुपयांच्या सांडपाणी योजनेचा, पायाभरणी समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पाणीपुरवठा सुधारणा आणि भुयारी गटार अशा एकत्रित प्रकल्पाची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल. **** शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून दिल्या जाणाऱ्या मदतीअंतर्गत बीड आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ठाकरे यांच्या हस्ते मदतीचं वाटप करण्यात येणार आहे. बीड इथं आयोजित शेतकरी मेळाव्यातही ते मार्गदर्शन करणार आहेत. **** अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय हा आयोजकांचा नसून, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी घेतला असल्याचा खुलासा कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते यांनी केला आहे. ते काल यवतमाळ इथं बोलत होते. सहगल यांनी संमेलनाच्या उद्घाटक म्हणून यावे अशी विनंती त्यांना केली असल्याचं, कोलते यांनी सांगितलं. झालेल्या प्रकारबाबत आयोजकांनी दिलगिरी व्यक्त करून निमंत्रित सर्व साहित्यिकांना संमेलनात उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला आजपासून पुण्यात सुरूवात होत आहे. या स्पर्धेत देशभरातून सुमारे नऊ हजार खेळाडू सहभागी होत आहेत. १८ क्रीडा प्रकारांच्या या स्पर्धा १७ आणि २१ वर्षाखालच्या वयोगटात होणार असल्याचं क��रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. महाराष्ट्राते ९०० खेळाडू यात सहभागी होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. **** ऑस्ट्रेलियासोबत येत्या शनिवारपासून सुरु होत असलेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी आणि त्यानंतरच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याला विश्रांती देण्यात आली असून, त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा संघात समावेश केला आहे, तर टी ट्वेंटी मालिकेसाठी गोलंदाज सिद्धार्थ कौल याची निवड झाली आहे. **** महावितरण, महाजनको आणि महापारेषणमध्ये होत असलेल्या पुनर्रचनेविरोधात पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर काल सरकारनं महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक - मेस्मा कायदा लागू केला आहे. यानंतरही कर्मचाऱ्यांनी या पुर्नरचना निर्णयाला विरोध केला आहे. आज संपाचा शेवटचा दिवस आहे. **** दहा राष्ट्रीय कामगार संघटनांसह विविध क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात औरंगाबाद जिल्ह्यातल्या संघटीत आणि असंघटित कामगारांनी सहभागी होत, शहरातल्या क्रांतीचौकपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर काल मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांना देण्यात आलं. नांदेड इथंही संयुक्त कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. **** औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातल्या बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर राहणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित करा अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचारीही गैरहजर राहत असल्यानं, ग्रामीण भागातले रूग्ण वैद्यकीय उपचारापासून वंचित राहत असल्याचं, चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. **** परभणी जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत निवड झालेल्या जिंतूर तालुक्यातल्या शंभर लाभार्थ्यांना आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते काल मंजूर पत्राचं वाटप करण्यात आलं. या योजनेत अनुसूचित जातीतल्या शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्याकरता नवीन सिंचन विहिरी, मोटार, पाईप लाईन आणि कोटेशन साठी तीन लाख रुपये अनुदान दिलं जातं. **** स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र शासनाच्या पेय जल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यात स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेचा कालावधी एक ते ३१ जानेवारी असून, जास्तीत-जास्त नागरिकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांनी केलं आहे. **** नाशिक मध्ये तापमान पुन्हा घसरलं असून काल सायंकाळी शहरात सात पूर्णांक तीन दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली तर निफाड तालुक्यात तीन पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस इतकी नोंद झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ***** ***
0 notes