Tumgik
#पुण्यातून लोकसभा निवडणूक
marathinewslive · 2 years
Text
"तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का?", पत्रकारांच्या 'या' प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा सवाल | Devendra Fadnavis comment on speculations of contesting Loksabha election from Pune
“तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का?”, पत्रकारांच्या ‘या’ प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा सवाल | Devendra Fadnavis comment on speculations of contesting Loksabha election from Pune
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वर्णी लागल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले केले. त्याचवेळी फडणवीस यांनाच लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने बी जे पी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली. यानंतर पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनीही पुणे लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस लढले तर मला आनंदच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 26 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी सुमारे तीनशे जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २३० जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास १९ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
उत्तरप्रदेशात भाजपला ३४ तर समाजवादी पक्षाला ३५ जागांवर सध्या आघाडी आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दलाला १४, भाजपला ११ तर लोकजनशक्ती पक्षाला पाच जागांवर आघाडी आहे. तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला पाच जागांवर आघाडी आहे.
पंजाबात काँग्रेसला सात तर आम आदमी पक्षाला तीन जागांवर आघाडी आहे. हरियाणात काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागांवर आघाडी आहे. झारखंडमध्ये सर्वाधिक ९ जागांवर भाजप आघाडीवर आहे.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर, उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर तर हिमाचल प्रदेशात सर्व चार जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
दक्षिण भारतात कर्नाटकातून मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं दिसून येतं आहे. कर्नाटकात भाजप १६, काँग्रेस १० तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेशात तेलगूदेशम पक्ष सर्वाधिक १६ जागांवर, तमिळनाडूत द्रविड मुनेत्र कळघम सर्वाधिक २१ जागांवर, केरळमध्ये काँग्रेस सर्वाधिक १२ जागांवर तर तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ मतदार संघात आघाडीवर आहेत.
गोव्यातल्या दोन जागांपैकी भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.
****
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २० जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी २७ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे जवळपास ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसऱ्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात नोटा ला एक हजार ५९५ मतं मिळाली आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. जालना मधून महाविकास आघाडीचे कल्याण काळे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा-गोंदिया मधून महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महायुतीच्या नवनीत राणा, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, गडचिरोली - चिमुर मधून महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर असून, भाजप नेत्या केंद्रीय मंत्री भारती पवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महायुतीचे सुजय विखे पाटील, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत. 
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पुण्याचे पालकमंत्री होणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
पुण्याचे पालकमंत्री होणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
पुण्याचे पालकमंत्री होणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले… मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का? असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पुणे : पुण्याचे पालकमंत्री होणार का ? आणि पुण्यातून निवडणूक लढविणार का, या दोन्ही प्रश्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी थेट आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिले. मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही. लोकसभा निवडणूक लढवावी, अशी…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
संजय काकडेंनी घेतली अशोक चव्हाणांची भेट; काकडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा
संजय काकडेंनी घेतली अशोक चव्हाणांची भेट; काकडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा
पुण्याचे भाजपचे खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
अशोक चव्हाण आणि संजय काकडे यांची ही भेट काही दिवसांआधी झाली होती. या भेटीची पुण्याच्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. काकडे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक आग्रही आहेत, पण भाजपने तिकीट दिले नाही तर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 27 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०४ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी तीनशेहून अधिक जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २०० ते २०५ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास ३० जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर तर उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २६ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी १९ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून तिसर्या फेरी अखेर महायुतीचे संदीपान भुमरे आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसर्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसर्या क्रमांकावर आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत. जालना मधून महायुतीचे रावसाहेब दानवे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महायुतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा - गोंदिया मधून महायुतीचे सुनिल मेंढे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसर्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे, नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महायुतीचे कपिल पाटील, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महाविकास आघाडीचे निलेश लंके, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महायुतीचे धैर्यशील मोहिते पाटील, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, इशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महायुतीचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत. 
****
उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. अमेठी मतदरासंघातून काँग्रेसचे किशोरी लाल आघाडीवर, तर भाजप नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दुसर्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली इथून तसंच केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत. हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आघाडीवर आहेत.
****
मतमोजणीच्या सर्व फेऱ्यांचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या results.eci.gov.in या संकेतस्थळावर वर तसंच व्होटर हेल्पलाइन ॲपवर उपलब्ध आहे. आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे. 
****
मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरुन निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सायंकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी विशेष बातमीपत्र प्रसारित होईल. आम���्या यूट्यूब चॅनलवर तसंच सामाजिक माध्यमांवर ही बातमीपत्रं आपल्याला ऐकता येतील. त्याशिवाय, निवाडा जनतेचा हा निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम देखील सादर होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच छत्रपती संभाजीनगर इथले राजकीय विश्लेषक या कार्यक्रमात सहभागी होऊन, निवडणूक निकालाबात माहिती देत आहेत.
****
राज्यातली पाणी टंचाई, बी - बियाण्यांचा तुटवडा, शेतकरी आत्महत्या, पुणे अपघातप्रकरणी सरकारी अधिकारी डॉक्टरांचा समावेश, या विषयांवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला जबाबदार ठरवलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातली पाण्याची टंचाई पाहता युती सरकारने आणलेली जलयुक्त शिवार दोन ही योजना फोल ठरल्याचं दानवे म्हणाले.
****
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असून या आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचं लातूर जिल्हा प्रशासनाने कळवलं आहे. या काळात विना परवानगी मिरवणूक काढणं, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास मनाई असून या नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 03 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग, परभणीतून विद्यमान खासदार संजय जाधव तर नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अर्ज दाखल
वंचित बहुजन आघाडीची औरंगाबादमधून अफसर खान, परभणी - बाबासाहेब उगले तर नांदेडमधून अविनाश भोसीकर यांना उमेदवारी
नांदेड तसंच लातूर इथं मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम
आणि
पैठण इथं नाथषष्ठी सोहळ्याची काल्याची दहीहंडी फोडून सांगता
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांनी महाविकास आघाडीकडून काल अर्ज दाखल केला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यावेळी उपस्थित होते. शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करुन जाधव यांनी सभेला संबोधित केलं. इतर चार उमेदवारांनी देखील काल अर्ज दाखल केले. या मतदरासंघात आतापर्यंत नऊ उमेदवारांचे १८ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रीय किसान पक्षाचे विष्णू जाधव यांच्यासह जगदीश पोतरे, सुरज कदम, नागोराव वाघमारे आणि नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसेन या अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज भरले. नांदेड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत ११ अर्ज दाखल झाले आहेत.
हिंगोली लोकसभा मतदार संघात काल पाच उमेदवारांनी आठ उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नागेश आष्टीकर यांनी काल महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला. त्याशिवाय ओबीसी बहुजन पार्टीचे रवि शिंदे यांच्यासह नामदेव कल्याणकर, देशा बंजारा आणि वसंत पाईकराव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले.
वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अमर काळे यांनी महाविकास आघाडीकडून काल उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे प्रमुख, खासदार शरद पवार यावेळी उपस्थित होते.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी महायुतीकडून काल उमेदवारी अर्ज भरला. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते.
यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी देखील काल उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार आदित्य ठाकरे आणि रोहीत पवार यावेळी उपस्थित होते. या मतदारसंघात आतापर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत.
****
काँग्रेस पक्षाने काल सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये ओडिशामधल्या आठ, आंध्र प्रदेश पाच, बिहार तीन, तर पश्चिम बंगालमधल्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
****
लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं काल पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. औरंगाबाद मतदार संघातून अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परभणी इथून बाबासाहेब उगले, नांदेड - अविनाश भोसीकर, पुण्यातून वसंत मोरे यांना तर शिरूर इथून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचारी, सुरक्षा दल आणि मतदान यंत्रांचं पर्यवेक्षण करण्याचं महत्त्वपूर्ण काम विशेष निरीक्षकांवर सोपवण्यात आलं आहे. विशेष निरीक्षक राज्याच्या मुख्यालयात थांबून तसंच स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून संवेदनशील भागाचा दौरा करतील, असं आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची मतमोजणी केंद्रं आणि त्याठिकाणी निर्माण करावयाच्या सुविधांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल आढावा घेतला. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, सुरक्षा यंत्रणा, संदेशवहन यंत्रणा, इंटरनेट आदींची उपलब्धता करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ���्वामी यांनी यावेळी दिले.
****
नवमतदारांनी मतदान करुन आपलं कर्तव्य पूर्ण करावं, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृती कक्षाच्या प्रमुख मिनल करनवाल यांनी केलं आहे. नांदेड शहरातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात तीनशे नवमतदारांसोबत संवाद साधताना त्या काल बोलत होत्या. मतदान आवश्यकता आणि गरज या विषयावर विविध उदाहरणं देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्त्व पटवून दिलं.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आज स्वयं सहाय्यता गटातल्या सुमारे एक लाख ८५ हजार महिला मतदान करण्याची शपथ घेणार आहेत. या मोहिमे�� महिला आणि युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असं आवाहन करनवाल यांनी केलं आहे.
****
जागतिक ऑटीझम दिनानिमित्त लातूर जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून मतदानाविषयी काल जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांच्या उपस्थितीत ३५० विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत नागरीकांना मतदानाचं आवाहन केलं. जिल्हा परिषदेच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या मतदार जनजागृती संकल्पनेचं उद्घाटन जिल्हाधिकार्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकार्यांनी लातूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं असंघटीत कामगारांशी संवाद साधून त्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. 
****
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येत्या दहा तारखेला रामटेक इथं जाहीर सभा होणार आहे. १४ एप्रिलला नागपूर मध्ये दीक्षाभूमी इथं दर्शन घेऊन, पंतप्रधान मोदी चंद्रपूर इथं सभा घेणार आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
चंद्रपूर लोकसभा मतदरासंघातले भाजप महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काल प्रचारादरम्यान वार्ताहरांशी संवाद साधला. जनतेच्या हितासाठी ही लढाई असून, आपल्याला नागरीकांचा आशिर्वाद मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा- २०२२ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार १०१ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे. परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातले ओंकार संजय निकुंभ हे खुला आणि मागास वर्गवारीतून, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या स्वप्नाली तांदुळजे या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ महाराज यांच्या २४५ व्या नाथषष्ठी सोहळ्याची काल काल्याची दहीहंडी फोडून सांगता झाली. यावेळी वारकरी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसंच छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औरंगपुरा इथल्या संत एकनाथ महाराज यांच्या मंदीरातही काल काल्याची दहीहंडी फोडण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगरसाठी राबवण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेसाठी सर्वांनी सहकार्य करावं, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केली आहे. शहराच्या दोन हजार ७४० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा घेण्यासाठी दाखल जनहीत याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत खंडपीठाने जलकुंभांबाबत माहिती घेतली. हनुमान टेकडी आणि टीव्ही सेंटरचे जलकुंभ हस्तांतरित करण्यात आले असून, इतर चार जलकुंभांचं हस्तांतरण एप्रिल अखेरपर्यंत करण्यात येईल, असं संबंधित कंपनीने यावेळी सांगितलं. यासंदर्भात पुढची सुनावणी १६ एप्रिलला होणार आहे.
****
नांदेड जिल्‍ह्यात वेगवेगळ्या तालुक्‍यात एकाच दिवशी घडणा-या बालविवाहांना महिला आणि बाल विकास विभाग, जिल्‍हा आणि पोलीस प्रशासन यांच्‍या सहकार्यानं रोखण्‍यात यश आलं. महिला आणि बाल विकास विभागाच्या कर्मचा-यांना घटनास्‍थळी पाठवून हे बालविवाह समुपदेशनाच्‍या माध्‍यमातून थांबवण्यात आले. जिल्ह्यात बाल विवाह रोखण्‍यासाठी ग्राम बालसंरक्षण समितीने आपली भूमिका कर्तव्‍यदक्षपणे पार पाडावी, असं आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं काल महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातल्या तीन जणांना दीड हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलं. जिल्हा व्यवस्थापक सुनिल काची, कार्यालय सहाय्यक छाया वाकोडे, संगणक ऑपरेटर आशिष जाधव यांनी तक्रारदाराच्या मसाला उद्योग सुरू करण्यासाठी मागणी केलेले कर्ज प्रकरण मंजुरीला पाठवण्यासाठी ही लाच मागितली होती. 
****
लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसची खाती गोठवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ धाराशिव इथं काल जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनानंतर जिल्हाधकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आलं.
****
राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल मुंबईत वरळी आणि अंधेरी इथं अवैध मद्याचा साठा आणि चारचाकी वाहनासह ३७ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सतीश शिवलाल पटेल या आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
हवामान
राज्यात उष्णतेचा तडाखा कायम आहे. काल मालेगाव आणि जेऊर इथं सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात जालना आणि बीड इथं ४० अंश, लातूर ३९ तर छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 November 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते.
न्यायमूर्ती चंद्रचूड हे १३ मे २०१६ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. पुढची दोन वर्ष ते सरन्यायाधीश पदावर राहतील.
सामान्य नागरीकांची सेवा करणं हे आपलं प्राधान्य असून, न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी काम करणार असल्याचं, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी, शपथविधी समारंभानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या आजपर्यंतच्या न्याय क्षेत्राच्या गौरवास्पद वाटचालीत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या कारकिर्दीनं आणखी भरच पडेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
आजपासून सुरु झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांनी सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील प्रारंभ आज पुण्यातून झाला. याअंतर्गत सर्वप्रथम बालेवाडी इथून सायकल फेरी काढण्यात आली, त्यानंतर राजीव कुमार बोलत होते. निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मतदार नोंदणी आणि जागृतीपर प्रदर्शन भरवण्यात आलं, आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांनी याठिकाणी तृतीयपंथीय समुदायाशी संवाद साधला. शहरी मतदार आणि युवकांचा मतदार प्रक्रियेतला सहभाब वाढवण्याचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यानिमित्तानं मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
****
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे उद्या नांदेड इथं सहभागी होणार आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज नायगाव इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे या यात्रेत सहभागी होणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र तसंच देशाबाहेरच्या नाट्यसंस्थांना हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होता यावं, म्हणून दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ५९व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. राज्यात यापूर्वी दोन नाट्यविषयक प्रशिक्षण आयोजित केली जात होती, त्यांची संख्या आता १२ करण्यात येत असल्याची घोषणाही, मुनगंटीवार यांनी केली. बालनाट्य स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी धोरण निश्चित करणं, राज्य नाट्यस्पर्धेतली पारितोषिक रक्कम तसंच परीक्षकांचं मानधन वाढवणं यांचाही प्राधान्यानं विचार करणार असल्याचं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
****
आयसीसी टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य फेरीचा पहिला सामना आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघादरम्यान होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपान्त्य फेरीचा दुसरा सामना उद्या भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान होईल. उपान्त्य फेरीत जिंकणारे दोन संघ येत्या रविवारी अंतिम फेरीचा सामना मेलबर्न इथं खेळणार आहेत. या स्पर्धेत भारत आपल्या श्रेणीतले चार सामने जिंकणारा एकमेव संघ आहे.
****
जॉर्डनमध्ये सुरु असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे १२ खेळाडू आज आणि उद्या उपान्त्य फेरी खेळतील. महिलांच्या स्पर्धांना आज तर पुरुषांच्या उपान्त्य फेरीला उद्यापासून सुरुवात होईल.
****
हिंगोलीमध्ये झालेल्या ५८व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत गतविजेत्या पुण्याचा पराभव करत मुंबई उपनगरने अतिशय चुरशीच्या सामन्यात काल पुरूषांचं अजिंक्यपद मिळवलं. तर महिलांमध्ये गतविजेत्या पुण्याने ठाणे संघाचा शेवटच्या क्षणाला पराभव करत विजयी परंपरा कायम राखली.
****
औरंगाबाद इथल्या हर्सुलच्या हरसिद्धि देवीच्या यात्रेला काल कार्तिक पौर्णिमेपासून सुरुवात झाली. या यात्रेतील पशू प्रदर्शन, आणि कुस्ती राज्यभर प्रसिद्ध असून, यंदा कुस्तीसाठी दहा लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं असल्याची माहिती सल्लागार पूनमचंद बमणे यांनी दिली. या यात्रेत उद्या घोड्यांचं नाच काम, चालिची स्पर्धा तर १२ आणि १३ नोव्हेंबरला बैलगाडा शर्यत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 May 2019 Time 20.00 to 20.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २४ मे २०१९ सायंकाळी २०.०० **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे सादर केले. राष्ट्रपतींनी हे राजीनामे स्वीकारले असून, सतरावी लोकसभा स्थापन होईपर्यंत मोदी यांना पंतप्रधान पदाचं कामकाज सांभाळण्याचे निर्देश दिले आहेत. सोळावी लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज संमत केला. नवी दिल्लीत आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, सुषमा स्वराज, मेनका गांधी, यांच्यासह मंत्रिमंडळातले ज्येष���ठ सदस्य उपस्थित होते. सोळाव्या लोकसभेची मुदत येत्या तीन जूनला पूर्ण होत असून, त्यापूर्वी सतरावी लोकसभा स्थापन करणं आवश्यक आहे. यासाठी निवडणूक आयोग लवकरच राष्ट्रपतींची भेट घेऊन, नवनिर्वाचित खासदारांची यादी राष्ट्रपतींकडे सोपवेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची उद्या संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या बैठकीत नेते म्हणून निवड होण्याची शक्यता असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** काँग्रेसनं पक्षाच्या कार्यकारी समितीची उद्या नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावर या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीनं या निवडणुकीत जवळपास ९० जागा जिंकल्या असून, यामध्ये काँग्रेस पक्षाला बावन्न जागांवरच विजय मिळवता आला आहे. या कामगिरीवर चर्चेसाठी आयोजित या बैठकीत, पक्षाध्यक्ष राहुल गांधी, संयुक्त पुरोगामी आघाडी अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. **** सतराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं तीनशे तीन जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्याचं, निवडणूक विभागानं आता थोड्यावेळापूर्वीच जाहीर केलं. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं देशभरात साडे तीनशे जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये शिवसेनेचे अठरा, संयुक्त जनता दलाचे सोळा तर शिरोमणी अकाली दलाच्या दोन खासदारांचा समावेश आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं, महाराष्ट्रातून सहा विद्यमान खासदारांना उमेदवारी न देता, त्यांच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली, पक्षाचा हा निर्णय अचूक ठऱला असून, या सहाही जागांवर पक्षानं विजय नोंदवला आहे. जळगांव इथून ए.टी. नाना पाटील यांच्याऐवजी उन्मेश पाटील, अहमदनगर मधून दिलीप गांधींऐवजी डॉ सुजय विखे पाटील, दिंडोरीमधून हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ऐवजी भारती पवार, पुण्यातून अनिल शिरोळेंऐवजी गिरीश बापट, सोलापूरहून शरद बनसोडे यांच्याऐवजी जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज आणि लातूर इथून सुनील गायकवाड यांच्याऐवजी सुधाकर श्रृंगारे यांना भाजपनं निवडणुकीत उतरवलं होतं, या सर्व उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. **** यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून अट्ठ्याहत्तर महिला खासदार निवडून आल्या असून, महिला खासदारांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. मावळत्या सोळाव्या लोकसभेतल्या एक्केचाळीस महिला खासदारांपैकी सत्तावीस महिला खासदारांनी आपलं पद राखलं आहे. यात सोनिया गांधी, हेमा मालिनी, सुप्रिया सुळे आणि किरण खेर यांचा समावेश असून, लोकसभेत नव्यानं खासदार होत असलेल्या एक्कावन्न महिलांमध्ये स्मृती इराणी यांचा समावेश आहे. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरच्या आक्षेपांबाबत, कायमस्वरूपी समाधान शोधायला हवं, असंही त्यांनी म्हटलं आहे. ही प्रक्रिया पारदर्शी न केल्यास लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास कमी होईल, असं पाटील यांनी ट्वीट संदेशातून म्हटलं आहे. **** लातूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर भाजपचे दीपक मठपती यांची निवड झाली आहे. लातूर महापालिकेत काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी आठ आठ सदस्य असल्यानं, स्थायी समितीच्या सभापती पदाची निवड सोडत पद्धतीनं केली जाते. काँग्रेसकडून रविशंकर जाधव तर भाजपनं दीपक मठपती यांना सभापतिपदासाठी उमेदवारी दिली. सोडत पद्धतीनुसार दीपक मठपती यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्यामुळे त्यांना विजयी घोषीत करण्यात आलं. जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 May 2019 Time 7.00 AM to 7.10 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २४  मे २०१९ सकाळी ७.०० मि. ****
·       लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यश
·       काँग्रेसला अवघ्या ५२ जागा, अध्यक्ष राहूल गांधी अमेठीतून पराभूत तर केरळच्या वायनाडमधून विक्रमी मताधिक्यानं विजयी
·       राज्यातही भाजप - शिवसेनेला ४१ जागा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून पराभूत
आणि
·       लोकसभा निवडणुकीतला विजय जनतेला समर्पित- पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे. पक्षानं आतापर्यंत निकाल घोषित झालेल्या ५०६ जागांपैकी २८८ जागा जिंकल्या असून १५ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपला स्वबळावर लोकसभेत संपूर्ण बहुमत मिळालं आहे, तर भाजपच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३२९ जागांवर विजय मिळाला असून आणखी १७ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनं १८ जागांवर विजय मिळवला आहे. संयुक्त जनता दलानं १६, लोकजनशक्ती पक्षानं सहा, शिरोमणी अकाली दलानं दोन जागांवर विजय मिळवला आहे.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ आतापर्यंत केवळ ५० जागांवर विजय मिळवता आला आहे, त्यांच्या आणखी दोन जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या अन्य पक्षांपैकी तामिळनाडूतला द्रविड मुनेत्र कळघम पक्ष वगळता अन्य कोणत्याही पक्षाला लक्षणीय यश मिळालेलं दिसून येत नाही. द्रमुकला तामिळनाडूत २२ जागांवर विजय मिळाला असून त्यांचा आणखी एक उमेदवार आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष १०, समाजवादी पक्ष पाच, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २२, आंध्रप्रदेशमध्ये युवाजन स्त्रमिका रिथु - वायएसआर काँग्रेस २२, तेलंगणा राष्ट्र समिती नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाच जागा मिळाल्या आहेत. ओडिसात बिजु जनता दलाचे दोन उमेदवार विजय झाले असून त्यांचे दहा उमेदवार आघाडीवर आहेत.
****
देशभरात सर्व राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीनं चांगलं यश मिळवलं. प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यासह मंत्रीमंडळातले बहुतांशी मंत्री विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या नेत्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग, अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला विजयी झाले आहेत.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हारले आहेत, मात्र केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून ते सात लाख ९० हजार विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. लोकसभेतले काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, उपनेते ज्योतिरादित्य शिंदे, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, काँग्रेस नेते दिग्विजय सिंग, शत्रुघ्न सिन्हा, जया प्रदा यांचा पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे.
****
चार राज्यांच्या विधानसभांसाठीची ही मतमोजणी झाली आहे. यात आंध्र प्रदेशमध्ये वाय एस आर काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली आहे तर अरुणाचल प्रदेश मध्ये भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. विधानसभेच्या ६० जागांपैकी भाजपनं ३१ जागा जिंकल्या असून चार जागांवर आघाडी घेतली आहे. संयुक्त जनता दलानं सात, काँग्रेस चार, अन्य आणि अपक्षांनी चार जागा जिंकल्या आहेत.
१४६ सदस्यांच्या ओडिशा विधानसभेत पुन्हा एकदा बिजू जनता दलाला सत्ता मिळाली आहे. सिक्कीम विधानसभेत ३२ जागांपैकी सुरु असलेल्या मतमोजणीत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चानं १३ जागी विजय मिळवला असून तीन जागांवर आघाडीवर आहेत. तर सिक्कीम डेमॉक्रॉटीक फ्रंटनं आठ जागी विजय मिळवला असून पाच जागी आघाडी घेतली आहे.
****
महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भारतीय जनता पक्षानं २३ आणि शिवसेनेनं १८ जागा जिंकल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पाच जागांवर विजय मिळवला आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सुरेश धानोरकर, औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडी- ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीनचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील तर अमरावतीमधून अपक्ष उमेदवार नवनीत कौर राणा विजयी झाल्या आहेत.
मराठवाड्यातून औरंगाबाद वगळता, सर्व मतदार संघातून शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले. औरंगाबाद इथं वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्यात कडवी लढत झाली, अखेरपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत इम्तियाज यांनी खैरे यांचा चार हजार ४९२ मतांनी पराभव केला.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ४० हजारावर मतांनी पराभूत झाले, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला.
परभणीतून शिवसेनेचे संजय जाधव बेचाळीस हजार मतांनी विजयी झाले, त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांचा पराभव केला.
उस्मानाबाद मधून शिवसेनेचे ओम प्रकाश राजेनिंबाळकर एक लाख सत्तावीस हजार पाचशे सहासष्ट मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला
लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांनी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत, यांचा दोन लाख ८९ हजार मतांनी पराभव केला. बीडमध्ये भाजपच्या डॉक्टर प्रितम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा एक लाख ६८ हजार मतांनी पराभव केला. हिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी कॉंग्रेसचे सुभाष वानखेडे यांचा दोन लाख ७७ हजार मतांनी तर जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे विलास औताडे यांचा तीन लाख ३२ हजार मतांनी पराभव केला.
नागपूरमधून नितीन गडकरी, रामटेकमधून कृपाल तुमाने, गडचिरोलीमधून अशोक नेते, भंडारा - गोंदिया मधून सुनिल मेंढे, वर्धामधून रामदास तडस, अकोल्यातून संजय धोत्रे, बुलडाण्यातून प्रताप जाधव, वाशिम यवतमाळमधून भावना गवळी, जळगावमधून उन्मेष पाटील, रावेर मधून रक्षा खडसे, धुळे इथून डॉक्टर सुभाष भामरे, नंदूरबारहून हिना गावीत, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, नाशिकमधून हेमंत गोडसे, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, अहमदनगर डॉक्टर सुजय विखे पाटील, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून सुप्रिया सुळे, रायगडमधून  सुनील तटकरे, शिरूरमधून डॉक्टर अमोल कोल्हे मावळमधून श्रीरंग बारणे, सातारामधून उदयन राजे भोसले, माढातून रणजीत निंबाळकर, सोलापूरमधून जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज, सांगलीमधून संजय पाटील, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगलेमधून धैयशिल माने, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहूल शेवाळे, अरविंद सावंत, उत्तर पूर्व मुंबईतून भाजपचे मनोज कोटक, पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, गजानन किर्तीकर, ठाणेमधून राजन विचारे, पालघरमधून राजेंद्र गावित, भिवंडीतून कपिल पाटील, कल्याणमधून श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत.
****
शिवसेनेचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री अनंत गीते, भाजपचे मंत्री हंसराज अहीर, शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे.  
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेला विजय हा, जनता जनार्दनाचा विजय असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत भाजप मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित विजयी सभेत बोलत होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या सभेला उपस्थित होते. शहा यांनी यावेळी केलेल्या भाषणात, देशातल्या जनतेचे आभार मानत, भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं.
निवडणुकीतल्या विजयाबद्दल, शेजारी देश असलेल्या नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, आणि पाकिस्तान सह, अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान, इस्राईल, आणि संयुक्त अरब अमीरात आदी देशांच्या प्रमुखांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.
//************//
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 April 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि. ****  शांतताप्रेमी हिंदूंचा दहशतवादाशी संबंध जोडून, बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - पंतप्रधानांची वर्ध्याच्या सभेत टीका  लोकसभा निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांची एक आघाडी होऊ शकते- काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोजगारात वाढ  येत्या आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता - हवामान खात्याचा अंदाज आणि  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक इच्छूक उमेदवारांचे अर्ज दाखल; पुण्यातून काँग्रेसची मोहन जोशी यांना उमेदवारी **** शांतताप्रेमी हिंदूंचा दहशतवादाशी संबंध जोडून, हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी काल वर्धा इथून, महाराष्ट्रातल्या भाजपच्या निवडणूक प्रचार मोहिमेला प्रारंभ केला. घराणेशाही, भ्रष्टाचार, आदी मुद्यांवरूनही त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वाऱ्याची दिशा अचूक ओळखतात, त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं मोदी म्हणाले. पवार यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मोदी यांनी केला. दरम्यान, काँग्रेस पक्षानं, मोदी यांचा हा आरोप खोटा असल्याचं म्हटलं आहे, वरिष्ठ भाजप नेते, तत्कालीन गृहसचिव आर के सिंह यांनी हिंदू दहशतवाद या शब्दाचा सर्वप्रथम वापर केल्याचं, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी सांगितलं. **** देशहिताच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता सर्व विरोधी पक्ष एक झाले आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्रित येऊन मतदानोत्तर एक आघाडी करू शकतात, असं काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करणं, लोकशाही आणि संविधान वाचवणं या कामाला सर्वाधिक प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय संस्था आणि सामाजिक रचना उद्ध्वस्त करण्यापासून भाजपला रोखणं, विकास आणि अर्थव्यवस्थेला गती देणं, रोजगार निर्मिती, सामाजिक सौहार्द निर्माण करणं तसंच अन्याय आणि असमानतेच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले असल्याचं गांधी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. **** काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या विरूद्ध केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून भारतीय धर्म जन सेनेचे तुषार वेल्लाप्पल्ली हे उमेदवार असतील, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. केरळमध्ये भाजप आणि भारतीय धर्म जन सेनेची आघाडी आहे. **** लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या गुरूवारी संपत आहे, त्यामुळे संबंधित मतदार संघात, काल अनेक ठिकाणी इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड, अपक्ष म्हणून संगीता निर्मळ, बहुजन महा पार्टीच्या वतीनं शेख नदीम शेख करिम, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे, तर माढा लोकसभा मतदार संघातून रणजित नाईक निंबाळकर, रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदार संघातून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नीलेश राणे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे धनंजय महाडिक, शिवसेना-भाजप युतीचे संजय मंडलिक, वंचित बहुजन आघाडीच्या अरुणा माळी यांनी तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेना भाजप युतीचे धैर्यशील माने, आणि वंचित बहुजन आघाडीचे असलम सय्यद यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. जालना लोकसभा मतदार संघातून अखिल भारतीय सेनेचे गणेश चांदोडे तर शहादेव पालवे यांनी अपक्ष म्हणून, अर्ज दाखल केला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव येवले आणि एका अपक्ष उमेदवारानं काल अर्ज दाखल केले. दरम्यान, काल काँग्रेसनं आणखी नऊ उमेदवारांची एक यादी जाहीर केली. यामध्ये पुणे मतदार संघातून मोहन जोशी यांना तर रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. **** महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोजगारात १ एप्रिलपासून दरवाढ करण्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या प्रस्तावास निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारा रोजगार हा कृषी कामगारांच्या ग्राहक मूल्य निर्देशांकाशी संलग्न असून दरवर्षी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, १ एप्रिल रोजी त्याचे नवे दर जाहीर केले जातात. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे ग्रामविकास मंत्रालयानं हे दर जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे दर असल्यामुळे ही दरवाढही वेगवेगळी आहे. सध्याच्या दराच्या तुलनेत ही दरवाढ पाच टक्के आणि त्यापेक्षा अधिक आहे. **** येत्या आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नागपूरच्या हवामान केंद्रानं वर्तवली आहे. मराठवाड्यात चार दिवस तर विदर्भात पाच दिवस ही उष्णतेची लाट राहील. काल राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४३ पूर्णांक ४ डिग्री सेल्सीअंश इतकं नोंदवलं गेलं. दरम्यान, मध्य भारतात यंदा एप्रिल ते जून या काळात, नेहमीपेक्षा अर्धा अंश सेल्सियस अधिक तापमान राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या भागात पुढचे तीन महिने तापमापकाचा पारा कमाल चव्वेचाळीस अंशांपर्यंत वाढू शकतो, अशी शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** नांदेड लोकसभा मतदार संघात दोन उमेदवारांना पेड न्यूज प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. अपक्ष उमेदवार डॉ महेश तळेगावकर यांच्यासंदर्भात दैनिक श्रमिक एकजूट आणि दैनिक नांदेड एकजूट या वृत्तपत्रातून प्रसारीत झालेल्या बातम्यांवरून तसंच दैनिक पुढारी या दैनिकात अपक्ष उमेदवार अशोक चव्हाण यांच्या नावापुढे लोहा असा उल्लेख आल्यानं उमेदवाराची वेगळी ओळख प्रदर्शित झाली. त्यामुळे त्या पेडन्युजच्या व्याख्येत येत असल्याच्या कारणाने दोघाही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. **** लातूर लोकसभा मतदार संघातली लढत ही तिरंगी होणार आहे. भाजपा सेना युतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छींद्र कांमत हे दोघे करोडपती उमेदवार आहेत, वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राम गारकर त्यांच्याशी झुंज देत आहेत. या तिन्ही उमेदवारांनी आपले संपत्तीविषयक विवरण निवडणूक विभागाला सादर केलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.. भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या परिवाराकडे साडे अठ्ठावीस कोटींची मालमत्ता आहे.तर काँग्रेसचे उमेदवार मच्छींद्र कामत यांच्याक��े अकरा कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार जे निवृत्त शासकीय अधिकारी आहेत राम गारकर यांच्याकडे मात्र अवघे ७९ लाख अठ्याहत्तर हजार आठशे तेहतीस रूपये आहेत. स्वत:च्या मालकिची एक दुचाकी आणि एक स्विफ्ट कार वाहन आहे. आणि या दोघांचा जर विचार केला तर श्रृंगारे आणि मच्छींद्र कामत हे दोघं उद्योजक आहेत त्यामुळे होणारी लढाई ही कोट्याधीशांमधली होणार आहे. **** बीड लोकसभा मतदार संघातल्या शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपासंदर्भात आपणच निवडणूक आयोगाकडं सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल बीडमध्ये वार्ताहरांशी बोलत होत्या. तर खासदारकीचा निधी आपण जिल्ह्याच्या विकास कामांसाठी खर्च केला असून राज्य आणि केंद्र सरकारच्या देखील विविध योजनांचा निधीही जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर आणला असल्याचा दावा यावेळी डॉक्टर प्रितम मुंडे यांनी केला. **** राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीही प्रचारात आघाडी घेतली असून ते मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर देत आहेत. दरम्यान, सोनवणे यांना जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं पाठिंबा दिला आहे. पक्षाचे राज्य समन्वयक अॅड.विशाल कदम यांनी ही माहीती दिली. **** परभणी मतदार संघाचा प्रचाराला गती येत आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी जिंतूर, सेलू इथं शिवेसना भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय विटेकर यांनी काल परभणी तालुक्यातील गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान यांनी पालम, गंगाखेड शहराला भेट देवून मतदारांशी हितगुज साधले. हळुहळु सर्व उमेदवारांच्या प्रचाराला वेग येत असल्याचे दिसून येते. **** लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक एन. आर. पाटील आणि चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन तेलंग यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी आमदार विनायकराव पाटील उपस्थित होते. **** बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातल्या चिंचाळा तांडा इथं पाण्याचे ड्रम भरून ठेवलेली बैलगाडी उलटून दोन लहान मुले चिरडून ठार झाली. काल ही घटना घडली. पाण्याचे ड्रम भरून ठेवलेल्या या बैलगाडीखाली ही मुलं खेळत असतांना बैलगाडीला लटकल्यामुळं बैलगाडी उलटून ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 March 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि. ****  प्रचार सभा, मिरवणुका आणि रोड शो द्वारे विविध राजकीय पक्षांचा निवडणूक प्रचाराला वेग  शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; रावेरमध्ये उल्हास पाटील यांना काँग्रेसची तर सांगलीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विशाल पाटील यांना उमेदवारी  लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर आणि  भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत **** प्रचार सभा, मिरवणुका आणि रोड शो करत विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या प्रचाराला वेग दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अरूणाचल प्रदेशमध्ये पश्चिम सिंयांग जिल्ह्यात सभा घेऊन ईशान्य भारतातल्या प्रचाराची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी आसाममध्ये गोहपुर इथं सभा घेतली. त्यांनतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल रोड शो करत गांधीनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या पाच वर्षांच्या काळात अर्थव्यवस्थेचा बोजवारा वाजल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी काल नवी दिल्लीत वार्तांहरांशी बोलतांना केला. या शिवाय निर्यात, गुंतवणूक, निर्मिती आणि उत्पादन क्षेत्र तसंच भांडवल निर्मितीतही घसरण झाल्याचं ते म्हणाले. **** सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं पोलीस प्रशासनानं म्हटलं आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात, अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या तीन पेक्षा अधिक वाहनांना परवानगी नसेल, तसंच नामनिर्देशनपत्रं दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात पाचपेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहू शकणार नाहीत. यासह इतर नियम जारी करण्यात आले असून, सर्व नियमांचं काटेकोर पालन आवश्यक असल्याचं, पोलीस प्रशासनानं म्हटलं आहे. **** जालना लोकसभा मतदार संघातून काल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी तर रामभाऊ उनगे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. याबाबत अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून... काल पर्यंत निवडणूक विभागातून ४६ जणांनी १४१ अर्ज नेले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार विलास औताडे, यांच्यासह अपक्ष रामभाऊ वनगे यांनी काल जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत औताडे यांनी भाजप सरकारवर टीका केली. भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बाबासाहेब म्हस्के जालना. दरम्यान, विलास औताडे अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना, त्यांच्या सोबत असलेल्या समर्थकांना बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अडवल्यामुळे, पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी युतीच्या नेत्यांसमवेत काल उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी मिरवणूक काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. औरंगाबाद शहरात कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि सुरेश फुलारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. या मतदार संघात आतापर्यंत ७१ जणांनी १४१ अर्ज घेतले आहेत. **** लातूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला गती येत आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर … काँग्रेस उमेदवार मच्छिंद्र कामत यांनी पक्ष कार्यकर्ते आणि लातूर आणि ग्रामीण मतदार संघात जाऊन गाठीभेटी सुरु केलेल्या आहेत. भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी भेटीगाठीला सुरुवात केली आहे. एकूणच प्रचाराला आता वेग येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मतदानाचा टक्का वाढवून लातूर मतदारसंघाला डिस्टींक्शन मध्ये आणण्याचं आमचा प्रयत्न आहे. अरुण समुद्रं, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर **** बीड लोकसभेच्या भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल आष्टी तसंच पाटोदा तालुक्यात दौरा केला. डोंगरकिन्ही इथं त्यांनी जाहीर सभा घेतली. **** परभणी लोकसभा मतदार संघातही प्रचाराला हळुहळू वेग येत आहे. अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून………. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे राजेश विटेकर यांनी परभणी तालुक्यातील जांब सर्कल मधील गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.वंचित बहुजन आघाडीचे आलमगिर मोहम्मद खान यांनी काल मानवत शहरासह तालुक्यातील गावांना भेटी देऊन मतदारांशी संपर्क साधला. शिवसेना भाजप युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी काल पाथरी तालुक्यातील हदगाव, रेना, खळी, वडी, निवळी आदी गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर. **** शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रवीण गायकवाड यांनी काल मुंबईत, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, यावेळी उपस्थित होते. गायकवाड यांना काँग्रेसतर्फे पुण्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी, रावेर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं उल्हास पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत भाजप सेना युतीच्या उमेदवार, रक्षा खडसे यांच्याशी होणार आहे. काँग्रेस महाआघाडीतर्फे सांगली मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं, विशाल पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. **** रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघात काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. तर सातारा लोकसभा मतदार संघात, शिवसेना- भाजप युतीचे नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** राज्य शासनानं लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली. कामानिमित्त आपल्या लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ही सुट्टी लागू असेल. राज्यात पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात १८, तिसऱ्या टप्प्यात २३, तर चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला, संबंधित मतदार संघात सुट्टी राहणार आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीतली स्वायत्त महामंडळं आणि प्रतिष्ठानांनाही ही अधिसूचना लागू आहे. **** मतदान जागृती कार्यक्रमांतर्गत आज पहाटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीसरात रन फॉर डेमॉक्रसी स्पर्धा घेण्यात आली. पोलिस महानिरीक्षक विक्रमकुमार सिंघल आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हिरवा झेडा दाखवून या स्पर्धेला सुरूवात केली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी चौधरी यांनी, मतदान हे पवित्र कार्य असून देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. **** बुलडाणा जिल्ह्यात नागरिकांनी आचारसंहितेचा भंग झाल्याच्या १९ तक्रारी दाखल केल्या आहेत. यापैकी ११ व्यक्तींवर चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सी व्हिजील ॲपद्वारे आलेल्या तक्रारींची खात्री केली असता शहरात अनेक ठिकाणी आचारसंहिता भंग झाल्याचं आढळून आलं आहे. **** सांगली लोकसभा मतदार संघात पृथ्वीराज सयाजीराव देशमुख यांनी जाहीर सभेत केलेल्या भाषणाच्या अनुषंगानं दाखल तक्रारीची, शहानिशा करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. **** भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतनं पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात त्यानं, चीनच्या हुआंग युशिआंग याचा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताच्या परूपल्ली कश्यपचा पराभव करून व्हिक्टर ॲक्सेंसलनं अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत पी व्ही सिंधुचा चिनच्या बिंग जिआओ या खेळाडूनं पराभव करून अंतिम फेरी गाठली. **** अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल दक्षिण कोरियानं भारताला चार - दोन अशा फरकानं पराभूत केलं. सामन्याच्या निर्धारित वेळेत दोन्ही संघ एक - एक नं बरोबरीत होते. त्यामुळे पेनॉल्टी शुटआऊट नुसार सामन्याचा निर्णय घेण्यात आला. **** आज एकतीस मार्च, २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस. भारतीय रिझर्व्ह बँकेनं, आज सर्व बँकांना कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह बँकेनं, एक स्वतंत्र परिपत्रक काढून, ऑनलाईन व्यवहारही आज सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 March 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २१ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि. ****  सार्वत्रिक निवडणुकीत सोशियल मिडियावरची बातमी आणि जाहिरातीच्या प्रसारण तसंच प्रकाशनावर अंकुश ठेवण्यासाठी प्रणाली विकसित  सी व्हिजील ॲपवर राज्यभरातून आतापर्यंत सातशे तक्रारी; तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कारवाई  सोलापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजीतसिंह मोहिते भाजपमध्ये तर चंद्रपूर जिल्ह्यातले शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांचा आमदारकीचा राजीनामा आणि  राज्यात आज धुलिवंदनाच्या रंगोत्सवाचा उत्साह **** फेसबुक, ट्विटर, गुगल, तसंच शेयरचॅट आणि इतर सामाजिक माध्यम- सोशल मिडियांनी सार्वत्रिक निवडणुकीत बातमी आणि जाहिरातीच्या प्रसारण आणि प्रकाशनावर अंकुश ठेवण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. काल या माध्यमांनी तसंच इंटरनेट आणि मोबाईल संघानं नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना नैतिक आचार संहितेचा दस्तावेज सादर केला. निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर या माध्यमांनी स्वैच्छिक आचारसंहिता तयार केली. यामध्ये सोशियल मिडीयावर देण्यात येणारी राजकीय जाहिरात माध्यम प्रमाणन आणि देखरेख समितीकडून प्रमाणित करून घेणं बंधनकारक असणार आहे. दरम्यान, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या घटनांवर निगराणी ठेवण्यासाठी विशेष दलही गठित केले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे. **** लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना तक्रार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सी व्हिजील ॲपवर राज्यभरातून आतापर्यंत सातशे तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी तथ्य आढळलेल्या २९४ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दहा मार्चला लागू झाली, त्यानंतरच या तक्रारी आल्याचं, निवडणूक विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सर्वाधिक १३३ तक्रारी पुण्यातून, ठाण्यातून एकसष्ठ, सोलापूर ४४, मुंबई उपनगर चाळीस, मुंबई एकोणचाळीस, औरंगाबाद इथून १२, बीड-८ हिंगोली-७ जालना-१ लातूर -११ उस्मानाबाद- ८, आणि परभणी इथून ७ आणि नागपूरातून सव्वीस तक्रारी दाखल झाल्या आहेत. मतदारांना प्रलोभन म्हणून पैसे वाटप किंवा आक्षेपार्ह भाषणांच्या चित्रफीतीही या माध्यमातून मतदारांना, निवडणूक आयोगाकडे पाठवता येतील. **** लातूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी १३ उमेदवारांनी ४१ अर्ज खरेदी केले. गेल्या दोन दिवसात २८ उमेदवारांनी ७९ अर्ज खरेदी केले आहेत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात काल सात इच्छुकांनी १० उमेदवारी अर्ज नेले. आतापर्यंत १९ इच्छुकांनी ३७ अर्ज घेतले असून, काल एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मात्र काल दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातही चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या लोकसभा मतदार संघातून १७ इच्छुकांनी ४१ अर्ज घेतले आहेत. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी काल मुंबईत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिमचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातले वरोरा- भद्रावतीचे शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी काल विधानसभा सदस्यत्त्वाचा तसंच पक्षाच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला. चंद्रपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. **** लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमांवर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. परराज्यातून शस्त्रास्त्रं, मद्य तसंच रोख रकमेची संभाव्य अवैध वाहतूक थांबवण्याच्या दृष्टीनं हे निर्देश देण्यात आले आहेत. **** हिंगोली जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता भंग करणारे एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत. यात सहा वाहनांचा आणि प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा प्रचार प्रसार करणाऱ्या एका गॅस एजन्सीचा समावेश आहे. ***** हिंगोलीत, उमेदवारामार्फत करण्यात येणाऱ्या खर्चाच्या विविध १२ गटांमधल्या १२१ बाबींचे प्रमाणित दर अधिसूचित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रूचेश जयवंशी यांनी ही माहिती दिली. **** हिंगोली जिल्ह्यात काल निवडणूक तपासणी पथकानं दोन वेगवेगळ्या खाजगी वाहनांमधून नेले जात असलेले साडे सत्तावीस लाख रुपये जप्त केले. यामध्ये कळमनुरी इथल्या उमरा फाटा इथं २६ लाख रुपये तर वाशिम मार्गावरील कनेरगाव नाका इथं दिड लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आले. औरंगाबाद – अहमदनगर रस्त्यावर वाळूज टोल नाक्यावरही काल एका चारचाकी वाहनामधून दीड लाख रूपये तपासणी पथकानं जप्त केले. **** आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून आजपासून रात्री आठ वाजता पाच मिनिटांचं निवडणूक विषयक एक बातमीपत्र सुरू केलं जात आहे. याशिवाय सकाळी अकरा वाजताच्या दोन मिनिटांच्या बातमी पत्राच्या वेळेतही वाढ करून ते पाच मिनिटांचं करण्यात आलं आहे. ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणी बरोबरच फेसबुक, युट्युब आणि ट्विटरवर लाईव्ह ऐकता येतील. आकाशवाणी औरंगाबादच्या अधिकृत पृष्ठावरून त्याचं प्रसारण केलं जाईल. याशिवाय आमच्या अन्य सर्व बातमीपत्रांचंही या सामजिक माध्यमांवरून लाईव्ह प्रसारण केलं जात आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातून तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता गौर��� सावंत यांना १२ पैकी एक सदिच्छा दूत म्हणुन नियुक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये तृतीयपंथीयांना मत देण्याचा अधिकार सर्वप्रथम मिळाला. २०१४ मध्ये या श्रेणीत ९१८ मतदारांची नोंदणी होती. गेल्या पाच वर्षात ही संख्या दुप्पट झाली असून आता ती दोन हजार ८६ पर्यंत पोहचली आहे. गौरी सावंत यांच्या या नेमणुकीनं मतदारांच्या नोंदणीच्या अंतिम टप्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. **** राज्यातल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येत्या २४ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल मुंबईत दिली. लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकाच वेळी मतदान होत असल्यानं शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. **** लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल परभणी इथं निवडणूक अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये निवडणूक निरीक्षक अभिषेक सिंग यांनी मार्गदर्शन केलं. आचारसंहिता विषयक तक्रारी नागरिकांना थेट सीव्हिजील मोबाईल अॅपवरती दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सिंग यांनी यावेळी दिली. **** राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती तसंच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला आज साजऱ्या होत असलेल्या धुलीवंदन सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विविध रंगाचे संगम आपल्या कुटुंब आणि समाज व्यवस्थेला सकारात्मक उर्जा निर्माण करतात, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. भिन्नतेनं नटलेल्या भारतीय समाजामध्ये परस्पर प्रेम, बंधुभाव आणि सलोखा वाढवणारा हा सण असल्याचं राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर, जळकोट, अहमदपूर देवणी इथं आज साजऱ्या होत धुलीवंदन तसंच २५ मार्च रोजी लातूर, औसा, रेणापूर, निलंगा शिरूर अनंतपाळ आणि चाकूर तालुक्यात साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या मद्य विक्रीला जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याचा सण, होळी काल देशभरात साजरा करण्यात आला. काल संध्��ाकाळी सर्वत्र होलिका दहन झालं. आज धुळवड अर्थात धुलीवंदनाचा सण साजरा केला जात आहे. **** विदर्भात नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात अंगावर वीज पडून दोन जण मरण पावले. या पावसामुळे रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आजही काही भागात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. **** परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात मानोली इथं, एका शेतात आग लागून एक जण होरपळल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत सुमारे दीड एकरवरचं ज्वारीचं पीकही जळालं. ही घटना काल दुपारी घडली. अग्निशमन दल येईपर्यंत ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. जखमीला मानवतच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. **** परभणी जिल्ह्यातल्या सेलू शहराचे माजी नगराध्यक्ष विधीज्ञ वसंतराव खारकर यांचं काल दुपारी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. खारकर यांच्या निधनानं सेलूच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे. **** बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव सराई इथं सैलानी बाबाचा उत्सव सुरू आहे. काल या उत्सवात हजारो नारळांची होळी करण्यात आली. हिंदू आणि मुस्लिम समाजाचे बांधव मिळून साजरा करत असलेल्या या उत्सवासाठी राज्यभरातून लाखो भाविक आले आहेत. *** गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल गोवा विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. ठरावाच्या बाजूनं २० तर विरोधात १५ मतं पडली. महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या प्रत्येकी तीन आणि तीन अपक्ष आमदारांनी सावंत यांना पाठिंबा दिला. ****** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 March 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० मार्च २०१९ दुपारी १.०० वा. **** लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना तक्रार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सी व्हिजील ॲपवर राज्यभरातून आतापर्यंत चारशे तक्रारी आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दहा मार्चला लागू झाली, त्यानंतरच या तक्रारी आल्याचं, निवडणूक विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सर्वाधिक पंचाऐंशी तक्रारी पुण्यातून, ठाण्यातून एकसष्ठ, सोलापूर चव्वेचाळीस, मुंबई उपनगर चाळीस, मुंबई एकोणचाळीस, आणि नागपूरातून सव्वीस तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची खातरजमा करून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानं दिली. मतदारांना प्रलोभन म्हणून पैसे वाटप किंवा आक्षेपार्ह भाषणांच्या चित्रफीतीही या माध्यमातून मतदार, निवडणूक आयोगाकडे पाठवू शकतात. **** अरुणाचल प्रदेश सरकारमध्ये दोन मंत्री आणि सहा आमदारांनी आज भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन, नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला. इतर हिंदुत्ववादी पक्षांच्या १९ नेत्यांनीही एनपीपीमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त आहे. अरुणाचल प्रदेशात पुढच्या महिन्यात लोकसभेसोबत विधानसभेसाठीही मतदान होणार आहे. **** गोवा विधानसभेचं आज विशेष सत्र सुरू आहे. राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आजच्या या अधिवेशनात विश्वासमत प्रस्ताव मांडणार आहेत. त्यापूर्वी सकाळी विधानसभेनं माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजलीचा ठराव संमत केला. विविध पक्षाच्या नेत्यांनी पर्रिकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. चाळीस आमदारांच्या गोवा विधानसभेत, पर्रिकर यांच्यासह भाजप आमदार फ्रान्सिस डिसुजा यांचं निधन, तसंच काँग्रेसच्या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे, आमदारांची एकूण संख्या ३६ झाली आहे. सध्या चौदा आमदारांसह काँग्रेस हा विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असला तरी, सरकारचं संख्याबळ २१ एवढं आहे. यात भाजपचे १२, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे तीन आणि तीन अपक्ष आमदारांचा समावेश आहे. **** गुवाहाटी उच्च न्यायालयानं आसाम मध्ये सर्व प्रकारची आंदोलनं नियमबाह्य ठरवून, बंद पुकारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश, पोलिसांना दिले आहेत. एका याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयानं, बंद पुकारणाऱ्या संघटनावर २४ तासांच्या आत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल तीन ते सात दिवसात पोलिस आयुक्त किंवा गृह सचिवांना लेखी स्वरूपात सादर करावा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. **** निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातून तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता गौरी सावंत यांना १२ पैकी एक राजदूत म्हणुन नियुक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये तृतीयपंथीयांना मत देण्याचा अधिकार सर्वप्रथम मिळाला. २०१४ मध्ये या श्रेणीत ९१८ मतदारांची नोंदणी होती. गेल्या पाच वर्षात ही संख्या दुप्पट झाली असून आता ती दोन हजार ८६ पर्यंत पोहचली आहे. गौरी सावंत यांच्या या नेमणुकीनं मतदारांच्या नोंदणीच्या अंतिम टप्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. **** लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुलडाणा जिल्हा प्रशासकीय पातळीवर पूर्ण तयारी करण्यात आली आहे. विविध समित्या, पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत खर्च सनियंत्रण समिती आणि संबंधित पथकांमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडाव्यात, उमेदवारांच्या खर्चावर काटेकोरपणे लक्ष ठेवावं, अशा सूचना बुलडाण्याचे निवडणूक निरीक्षक साकेश प्रसाद सिंग यांनी दिल्या. **** दहावीच्या पेपर फुटीप्रकरणी ठाणे इथं, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं, ११, १३, १५, आणि अठरा तारखेला झालेले दहावीचे बीजगणित, भूमिती, आणि विज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका, परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वीच फुटल्याची तक्रार आली होती. या संदर्भात माध्यमिक शिक्षण मंडळानं, दोन परीक्षा केंद्रांवर संशय व्यक्त केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. ***** ***
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
'मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही'
‘मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही’
भाजपच्या तिकीटावर पुण्यातून बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे वृत्त काहीदिवसांपूर्वी समोर आले होते. पण हे वृत्त चुकीचे असल्याचा दावा माधुरीच्या प्रवक्त्यांनी केला आहे. हे वृत्त खोटे आणि निराधार असल्याचे तिच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याची काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा सुरु झाली होती. भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
पृथ्वीराज चव्हाण पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही..
पृथ्वीराज चव्हाण पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही..
लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्षभर बाकी असताना पुण्यातील लोकसभेची जागा कॉंग्रेसकडून कोण लढवणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील काही इच्छुकांबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत असून त्यांच्याकडून तशी चाचपणीदेखील करण्यात येत असल्याच्या बातम्या येत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र या बातम्यांच खंडन करत मी दक्षिण कराड मधूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट…
View On WordPress
0 notes