#पद्धतीने
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा; शक्तिपीठ महामार्गाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याची माहिती. • मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, जलपरिषदेत एकमत. • महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान सुरु, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. • महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताला विजेतेपद, पुरुष संघाचाही इंग्लंडविरुद्ध मालिका विजय.
राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं महानुभाव पंथीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराचा नवपर्व आणि कलशारोहण सोहळा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या पाच वर्षांच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत, त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू.
रिद्धपुरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंद प्रभू देवस्थान या अनेक ठिकाणी संवर्धनाचं काम सुरु असून, यापुढेही हे कार्य सुरू राहील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणं हटवण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून विकास क��मं केली जातील, चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभं राहील, असं ते म्हणाले. मराठवाडा, विदर्भासह ठिकठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान, नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, शक्तिपीठ महामार्गाला सगळ्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं.
आदिवासी भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणं हे आपल्यापुढचं सर्वांत मोठं आव्हान असून, सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्समध्ये ‘फिस्ट-२०२५’ या आंतराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी गडकरी बोलत होते. या परिषदेचा समारोप काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
साहित्य संमेलनामधून साहित्याबरोबर, शेती, सहकार, शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर सखोल विवेचन व्हावं, असं मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं काल दहाव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या सहकारमंत्री पदाची संधी आपल्याकडे आली असून, सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, यावेळी उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी विविध वेषभूषा साकारुन सहभागी झाले होते.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. आपण आपल्या भाषेवर ठाम राहीलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संमेलन प्रत्येक शहरामध्ये भरवलं गेलं पाहिजे, अशी शासनाकडे मागणी करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मसिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणीवाटप संस्था यांच्या वतीने मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद -२०२५ ही परिषद काल घेण्यात आली. समन्यायी पद्धतीने पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा द्यावा, अशी मागणी, जलतज्ज्ञांनी यावेळी केली. या एक दिवसीय परिषदेला पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी यावेळी बोलताना, मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्यासाठी निर्माण झालेली ही समस्या भांडण -तंटा न करता देखील सोडवता येऊ शकते, असं मत व्यक्त केलं. कोकणातून सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत बंद पाईपने पाणी आणणं सहज शक्य आहे, यातून जलविद्युत प्रकल्प देखील उभारता येईल. सर्व अर्थाने उपयुक्त असा हा पर्याय असल्याचं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज पहाटे सुरु झालं. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती आखाड्याचं अमृत स्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह ५० हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
अहिल्यानगर इथं झालेल्या ६७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. गादी गटात त्याने नांदेडच्या शिवराज राक्षेचा पराभव केला, तर माती गटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने परभणीच्या साकेत यादवचा पराभव केला. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजनं विजय मिळवला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्ता भरणे, यांच्या उपस्थितीत त्याला चांदीची गदा प्रदान करण्यात आली.
१९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर नऊ खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचं ८३ धावांचं आव्हान भारतानं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात तीन खेळाडू बाद करणारी गोंगदी त्रिशा हिला प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द सिरीज या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
पुरुष क्रिकेटमध्ये, पाचव्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत, पाच सामन्यांची मालिका चार - एक अशी जिंकली. काल म���ंबईत झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २४८ धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्यूत्तरादाखल आलेला इंग्लंडचा संघ ९७ धावातच सर्वबाद झाला. अभिषेक शर्माला प्लेयर ऑफ द मॅच, तर वरुण चक्रवर्तीला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
उत्तराखंडमधे सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र १२ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारोत्तोलन स्पर्धेत पुरुषांच्या १०२ किलो वजनी गटात काल महाराष्ट्राच्या वैशव शहाजी ठाकूर याने सुवर्ण पदक पटकावलं. पदक तालिकेत सेनादलांचा संघ सर्वाधिक १४ सुवर्णपदकं मिळवून अव्व्ल स्थानावर, तर कर्नाटक १३ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ९०० कोटी रूपयांच्या, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्ग प्रकल्पाची सुधारित किंमत आता तीन हजार कोटी रुपये इतकी झाली असून, त्यानुसार रेल्वे बोर्डाने निधीची तरतूद करावी अशी मागणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली काल ही माहिती दिली. अद्ययावत सुविधांसह धाराशिवचं रेल्वेस्थानक तिप्पट मोठं होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सहकार चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा असून, ही चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं प्रतिपादन सहकार दिंडीचे स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनच्यावतीनं काढण्यात आलेली नागपूर ते शिर्डी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचं काल जालना इथं आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या सहकारी शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जुना जालन्यातल्या भाग्यनगर भागात वीर विनायक दामोदर सावरकर भवन उभारलं जाणार असून, या भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ काल आमदार खोतकर यांच्या हस्ते झाला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा वि. वा. देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या 'मुक्तिसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि पंधरा हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आज सोमवारी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे आजपासून तीन दिवस पुणे विभागातल्या विविध रेल्वे स्थानकांची तपासणी करणार आहेत. यात ते बीड रेल्वे स्थानक आणि तिथल्या सुविधांची देखील पाहणी करणार आहेत. यामध्ये विगनवाडी ते राजुरी, राजुरी ते बीड स्थानकांदरम्यानची तपासणी होणार आहे.
0 notes
Text
दावोसच्या करारातील 29 कंपन्यांपैकी 28 कंपन्या भारतातीलच , दावोसचे नियोजन कशासाठी ?
ज्या पद्धतीने गाजावाजा करून महाराष्ट्र सरकारने दावोस इथे 29 कंपन्यांसोबत गुंतवणुकीच्या उद्देशाने सामंजस्य करार केला त्यातील फक्त एक कंपनी परदेशातील असून उर्वरित 28 कंपन्या भारतातीलच आहेत अशी परिस्थिती असताना दावोसला जाण्याची गरजच काय असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन…
0 notes
Text
वावरने आपल्या प्रमुख उत्पादन ‘वावर जादूगर’ चे केले अनावरण
शाश्वत कृषी नवकल्पनेत आघाडीवर असलेल्या वावरने वावर जादूगर हे अत्याधुनिक इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट (आयपीएम) तंत्रज्ञानावर आधारित आपले प्रमुख उत्पादन सादर केले आहे, जे भारतीय शेतकऱ्यांसमोरील कीटक व्यवस्थापनाच्या समस्या सोडवण्यासाठी डिझाइन केले आहे.
जादूगर पीक नुकसान क���णाऱ्या कीटक प्रजातींना लक्ष्य करते आणि त्यांच्या जीवनचक्रामध्ये व्यत्यय आणण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्र वापरते. हा उत्पादन संपूर्ण स्वयंचलित पद्धतीने काम करतो आणि सूर्यास्तानंतरच्या संध्याकाळच्या ३-४ तासांमध्ये, जेव्हा कीटकांचा हल्ला शिगेला पोहोचतो, त्या वेळी प्रभावीपणे पिकांचे संरक्षण करतो. वावर जादूगर सौर उर्जेवर चालतो, त्यामुळे ते पर्यावरणपूरक असून शेतकऱ्यांसाठी कार्यक्षमतेच्या खर्चात लक्षणीय घट करते.
Read More
1 note
·
View note
Text
‘सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी
मुंबई:- नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांनी आधुनिक वैद्यकशास्र प्रमाणपत्र (सीसीएमपी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यास, त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्र वैद्यक (विषमचिकित्सा) पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. संबंधित व्यावसायिक हे महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम अन्वये नोंदणीकृत असणे व शासनमान्य…
0 notes
Text
मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहायक अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन - महासंवाद
मुंबई, दि.२७ :सैनिकी मुलींचे वसतिगृह कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधिधिका पदकंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दि.१५ जानेवारी, २०२५ रोजीपर्यंतअर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रां.प्र.जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या पदासाठी अर्जदार ही युध्द विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d7578609fbe176bc9521d8db283054ac/f60444a27ec689e8-46/s540x810/37ba9f2abc8bf0d77eaf2139e87f54dd48e61574.jpg)
View On WordPress
0 notes
Text
संत रामपाल जी महाराज सत्संग अवश्य बघा कारण ते आपल्या सर्व पवित्र शास्त्रात प्रमाणित करून दाखवतात की पूर्ण परमात्मा कोण आहे आणि तो कशा प्रकारे मिळेल आज पर्यंत आपले धर्म गुरु नी मनमानी पद्धतीने सांगले होते कोणताही प्रमाण नाही
0 notes
Text
कबावत ब्रशेस और रोलर्स: आपल्या इंटीरियर्ससाठी परफेक्ट पेंटिंग टूल
घराची सजावट करताना, पेंटिंग ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. इंटीरियर्सला नवा लुक देण्यासाठी आणि त्यांच्या सौंदर्यात वाढ करण्यासाठी योग्य पेंटिंग टूल्स आवश्यक असतात. यासाठी, कबावत ब्रशेस और रोलर्स हे एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतात. जर आपण आपल्या घराच्या भिंतींचे किंवा इतर पृष्ठभागांचे पेंटिंग करत असाल, तर कबावत ब्रशेस और रोलर्स नक्कीच आपल्यासाठी एक आदर्श टूल आहे.
कबावत ब्रशेस और रोलर्स च्या फायदे
1. स्मूथ आणि स्ट्राइक-फ्री फिनिश
कबावत ब्रशेस और रोलर्स ने पेंटिंग करताना स्ट्राइक किंवा अनवधानिक डाग्स येत नाहीत. या रोलर्समुळे पेंटिंगची परफेक्ट, स्ट्राइक-फ्री फिनिश मिळते. त्यामुळे प्रत्येक पेंटिंग प्रोजेक्ट एकसारखा आणि सुंदर दिसतो.
2. उच्च गुणवत्ता आणि टिकाऊपणा
कबावत ब्रशेस और रोलर्स उच्च गुणवत्ता आणि टिकाऊपणासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे पेंटिंग करताना आपल्याला दीर्घकाळ वापरता येणारी टूल्स मिळतात. या रोलर्सची स्ट्रक्चर अशी आहे की, ती जास्त पेंट समाविष्ट करू शकतात, त्यामुळे आपल्याला पेंटिंग करताना बारंबार पेंट डुबवण्याची आवश्यकता नाही.
3. प्रत्येक पृष्ठभागासाठी योग्य
कबावत ब्रशेस और रोलर्स हे प्रत्येक पृष्ठभागावर वापरता येतात, जसे की प्लास्टर, गुळगुळीत भिंती, कच्चे किंवा असमान पृष्ठभाग. त्यामुळे, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि इतर भिन्न पृष्ठभागांवर सहजपणे पेंट लागू करता येते.
4. वेगवेगळी आकार आणि डिझाइन
कबावत ब्रशेस और रोलर्स विविध आकारांमध्ये उपलब्ध आहेत. छोट्या आणि मोठ्या पृष्ठभागांसाठी योग्य रोलर्स मिळवू शकतात, ज्यामुळे प्रत्येक पेंटिंग प्रोजेक्ट अधिक सोपा आणि जलद होतो.
5. आरामदायक वापर
कबावत ब्रशेस और रोलर्स चे हँडल आरामदायक आहेत, ज्यामुळे दीर्घ वेळ पेंटिंग करताना आपले हात थकल्यासारखे होत नाहीत. यामुळे, आपल्याला अधिक सहजतेने आणि आरामदायक पद्धतीने पेंटिंग करता येते.
कबावत ब्रशेस और रोलर्स वापरून इंटीरियर्स पेंटिंग कशी करा?
1. पृष्ठभागाची तयारी
पेंटिंग सुरू करण्यापूर्वी, पृष्ठभाग स्वच्छ आणि गुळगुळीत असावा. धूळ आणि इतर अशुद्धता काढून टाका. यामुळे, पेंट जास्त चांगल्या प्रकारे लागू ��ोईल.
2. कबावत ब्रशेस और रोलर्स चा वापर करा
कबावत ब्रशेस और रोलर्स चा योग्य आकार निवडा आणि पेंट डुबवा. पेंटच्या रोलरवर समान प्रमाणात पेंट असावा, ज्यामुळे स्ट्राइक-फ्री फिनिश मिळेल. रोलरला पृष्ठभागावर हलके हलके फिरवा, जेणेकरून पेंट समानपणे लागू होईल.
3. पेंटिंगचे दोन ते तीन कोट द्या
पेंटिंग पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन कोट आवश्यक असू शकतात. प्रत्येक कोट पूर्णपणे वाळवून झाल्यावर, दुसरा कोट लावा. यामुळे, पेंट अधिक चांगला आणि टिकाऊ दिसतो.
4. पेंट वाळवायला वेळ द्या
पेंटिंग केल्यानंतर, भिंतीला वाळवायला आणि सेट होण्यासाठी वेळ द्या. यामुळे, पेंट चांगले ठरते आणि इंटीरियर्सला एक सुंदर लुक मिळतो.
कबावत ब्रशेस और रोलर्स च्या सहाय्याने घर सजवा
कबावत ब्रशेस और रोलर्स वापरून आपले घर सहजपणे सुंदर आणि आकर्षक बनवू शकता. हे रोलर्स प्रत्येक प्रकारच्या पृष्ठभागावर चांगले कार्य करतात आणि परफेक्ट फिनिशसाठी आदर्श आहेत. घराच्या भिंती किंवा फर्निचर पेंट करत असताना, Kabawat Rollers एक विश्वासार्ह आणि प्रभावी पर्याय आहेत.
संपर्क करा
📞 फोन: 82096 17061 | 98218 25663 📧 ईमेल: [email protected] 🛒 ऑनलाइन खरेदी करा: Kabawat Rollers
कबावत ब्रशेस और रोलर्स वापरून आपल्या इंटीरियर्सला नवीन जीवन द्या आणि सुंदर बनवा!
हमसे जुड़ें: क्रिएटिव आइडियाज़ और अपडेट्स के लिए हमें इंस्टाग्राम पर फॉलो करें यहां।
~https://www.instagram.com/p/DCy2EeLtWj5/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
For more information or to request a consultation, visit their website: https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
To stay updated with the latest posts, follow us on social media:
📸 Instagram
📘 Facebook
📌 Pinterest
🧵 Thread
🥁 Tumblr
▶️ YouTube
Contact: Kabawat Brush Company +91- 82096 17061 / +91- 98218 25663 https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
Digital Partner:
TVM INFOSOLUTIONS PVT LTD
Contact: TVM Info Solutions Pvt. Ltd.
+91-9004590039
Follow us on Social Media
🌐 Website
📸 Instagram
📘 Facebook
🔗 Linkedin
▶️ Youtube
#KabawatRollers#InteriorPainting#SmoothFinish#HomeMakeover#DIYProjects#PaintingTools#ProfessionalLook
0 notes
Text
'सेंद्रिय शेती' कशी करावी?
सेंद्रिय शेती कशी करावी? – एक संपूर्ण मार्गदर्शक सेंद्रिय शेती ही आधुनिक काळातील एक शाश्वत व निसर्गस्नेही शेती पद्धत आहे. रासायनिक खतांपासून मुक्त, नैसर्गिक घटकांचा उपयोग करून पीक उत्पादन करणारी सेंद्रिय शेती आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके किंवा कोणतेही कृत्रिम घटक न वापरता केली जाणारी नैसर्गिक शेती. यात प्रामुख्याने कंपोस्ट, गोमूत्र, गांडूळ खत, शेणखत, तसेच जैविक कीटकनाशके यांचा उपयोग केला जातो.
सेंद्रिय शेती करण्याचे महत्त्व आरोग्यासाठी फायदेशीर: सेंद्रिय पिकांमध्ये पोषणमूल्ये अधिक असतात. मातीचे आरोग्य राखते: सेंद्रिय घटकांमुळे मातीतील सजीव घटक जिवंत राहतात. पर्यावरणपूरक: जलप्रदूषण आणि मातीचे नुकसान टाळते. कमी खर्च: रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक पर्याय स्वस्त व सहज उपलब्ध होतात.
सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती
जमिनीची निवड आणि तयारी सेंद्रिय शेतीसाठी भुसभुशीत, सेंद्रिय घटकांनी समृद्ध जमीन आवश्यक आहे. कंपोस्ट किंवा शेणखत जमिनीत मिसळून मातीची सुपीकता वाढवावी. जमीन नांगरून योग्य प्रकारे सजीव अन्नद्रव्ये तयार करावीत.
सेंद्रिय खतांचा वापर शेणखत: नैसर्गिकरित्या कुजवलेले शेणखत जमिनीत टाकल्याने पीक निरोगी राहते. गांडूळ खत: गांडुळांद्वा��े तयार होणारे खत मातीला पोषक बनवते. कंपोस्ट खत: घरातील व शेतीतील जैविक कचऱ्यापासून बनवलेले खत पीकवाढीस उपयुक्त आहे.
जैविक कीटक नियंत्रण कीड व रोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी गोमूत्र, दशपर्णी अर्क, निम तेल, हळद आणि सेंद्रिय मिश्रणे वापरावीत. पीक संरक्षणासाठी झाडांवर नैसर्गिक फवारणी करावी.
आंतरपीक पद्धती एकाच शेतात दोन किंवा अधिक प्रकारची पिके एकत्र लावून मातीतील पोषणमूल्ये टिकवून ठेवता येतात. उदा. भाजीपाला व कडधान्ये एकत्र लावणे.
पाण्याचा काटकसरीने वापर ठिबक सिंचन व सेंद्रिय मलमूळ पद्धती वापरून पाण्याची बचत करावी. मातीला ओलावा टिकवण्यासाठी झाडांच्या मुळाशी सेंद्रिय कचरा टाकावा. सेंद्रिय शेतीचे फायदे मातीतील पोषणमूल्ये वाढतात. पिकांना नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळते. पाण्याचा वापर कमी होतो. ग्राहकांना रसायनमुक्त व उच्च पोषणमूल्य असलेले अन्न मिळते. पर्यावरणाचा समतोल राखला जातो. उत्कृष्ट सेंद्रिय शेतीसाठी काही टिप्स जैविक खते वेळच्या वेळी वापरा. आंतरपीक पद्धतीने मातीचे आरोग्य जपा. नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करून पिकांचे संरक्षण करा. गादीवाफा तंत्राचा उपयोग करून उत्पादन वाढवा. शेवटची महत्त्वाची गोष्ट सेंद्रिय शेती ही केवळ उत्पादनाची पद्धत नाही, तर एक जीवनशैली आहे. आरोग्यदायी अन्न, मातीचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.
सेंद्रिय शेतीचा स्वीकार करा आणि निसर्गासोबत सुसंवाद साधत शाश्वत विकासाकडे वाटचाल करा!
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/f25f14a883fa0cabe000204dcb94755f/dff91441ce8bb4fe-4a/s540x810/3ec03313c6e0f2cc5e9eb850a43d315e1f357590.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/6c223423bf27bfd1ec59277a1fd5184f/dff91441ce8bb4fe-10/s540x810/0c71b70eee83f19c4415936fd75e34e650382ba8.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/8acf5922d2e6593a6eaecee00e4cbe8c/dff91441ce8bb4fe-84/s540x810/901a6a90df3394d13dbe4fbb216770ea55fc48c4.jpg)
कृषी विज्ञान केंद्र,सागरोळी येथे आधुनिक कृषी तंत्रज्ञान" या विषयावर एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश आधुनिक शेती उपकरणे व तंत्रज्ञान यांचा परिचय करून देत शेती उत्पादन व कार्यक्षमता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा होता.
प्रशिक्षणाचा हेतू: शेती यंत्रसामग्रीतील प्रगत तंत्रज्ञान, त्यांचे अनुप्रयोग, देखभाल प्रक्रिया तसेच आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्याने होणारे फायदे याबद्दल सखोल माहिती देणे आणि प्रत्यक्ष अनुभव प्रदान करणे.
मार्गदर्शन: या प्रशिक्षणासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञ डॉ. प्रियंका राजकुमार खोले यांचे मार्गदर्शन लाभले. यांनी व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रशिक्षण सत्र घेतले. त्यामध्ये आधुनिक शेती उपकरणांचा वापर, त्यांचे फायदे, तसेच ते शेतकऱ्यांच्या दैनंदिन कार्यामध्ये कसे उपयुक्त ठरू शकतात यावर भर देण्यात आला.
प्रमुख विषय: अत्याधुनिक शेती यंत्रांची ची ओळख, त्यांचा वापर व देखभाल, हवामान बदलाशी सुसंगत, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पाणलोट विकास प्रकल्प व त्याचा उपयोग
सत्राचे स्वरूप: प्रशिक्षण सत्र संवादात्मक पद्धतीने राबवण्यात आले. सहभागी शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली तसेच तांत्रिक अडचणींवर उपाय सुचवण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील समस्या सोडविण्याचा आत्मविश्वास मिळाला.
सहकार्य : हा कार्यक्रम नाबार्डच्या अर्थसहाय्याने, संस्कृती संवर्धन मंडळ सागरोळीच्या, जय शिवराय पाणलोट विकास समिती काटकळंब यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. #agriculture #machinery #machinery #climatechange #ClimateSmartFarming #climatesmartfarming #ClimateSmartAgriculture #climatesmartagriculture
0 notes
Text
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ, आर्थिक सर्वेक्षण अहवाल होणार सादर • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण • बीडसह बहुतांश ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठका संपन्न, बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूतोवाच • छत्रपती संभाजीनगर इथं जी बी एस आजाराचे पाच संशयित रुग्ण, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत २३ ��दकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या सदनासमोर सादर करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर सोमवारी दोन्ही सभागृहात चर्चा होईल. अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीला ३६ विविध पक्षांचे मिळून ५२ खासदार उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्याच्या दृष्टीने सहकार्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात आलं.
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. या विधेयकासंबंधी १४ सुधारणा समितीने स्वीकारल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब पदासाठीच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित असून, उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन, आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केलं आहे. त्या काल नवी मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. येत्या रविवारी दोन फेब्रुवारीला 'महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४' होणार आहे. त्याची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याचं वृत्त, पुण्याच्या एका दैनिका�� प्रसिद्ध झाल्यानंतर, खरात यांनी हा खुलासा केला, त्या म्हणाल्या, “या परिक्षेकरता जवळपास दोन लाख ८६ हजार इतके उमेदवार बसलेले आहेत. सगळी व्यवस्था अतिशय चोख आहे, प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत. आणि कोणतीही पश्नपत्रिका लिक झालेली नाही.’’
दरम्यान, याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा इशारा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिला आहे. तसंच परीक्षा केंद्रावर ज्या शाळांमधले विद्यार्थी परीक्षा देत आहेत, त्या शाळेतल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची नियुक्त न करण्याचा निर्णय राज्य मंडळानं घेतला होता. त्याला संस्थाचालक, शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला आहे. ��्या परीक्षा केंद्रावर मागच्या पाच वर्षांत गैरप्रकार झाले होते त्या शाळांना मात्र हाच निर्णय लागू असेल, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते काल बीड इथं नियोजन समितीच्या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते. सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून, चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारच, असं पवार यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले… ‘‘चांगल वागा मी तुमच्या मागे पूर्ण ताकत उभी करीन पण चुकीचं वागलात तर कारवाई केली जाईल. जे नियम आहेत, त्या पद्धतीने कलमं लावली जातील. सातत्य राहिलं तर मकोका पण लावला जाईल. जेवढी आपण नीट शिस्त लावू, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले, उद्योगपती इथ येऊन गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडे काही साईट विलमींगच्या चांगल्या आहेत. सोलरपॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की मुंबई, बीड रेल्वे पण सुरु करता येते का? का तर तुमचा मुंबईशी पण,पुण्याशी पण संपर्क कसा राहील.
दरम्यान, नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात एकूण आराखड्यातल्या ५३६ कोटी ४४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. नगरपालिका तसंच सार्वजनिक बांधकाम विभागांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, सर्व तालुक्यांनी विकासाबाबत परस्परात सकारात्मक स्पर्धा करण्याचं आवाहन पवार यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्ताने रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन, जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सन २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या एक हजार ३५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.
नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या ७०३ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखडयास काल जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आराखड्यात भरीव वाढ करण्याची शिफारस राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येईल, असं आश्वासन सावे यांनी दिलं.
लातूर इथंही काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत ४९० कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला. गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणार असल्याचं, पालकमंत्री यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल सहाव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित क���लं, मात्र, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण मराठा समाज मुंबईत धडकेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, तसंच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदींनी काल जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, काही मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचं आमदार धस यांनी सांगितलं. जरांगे यांनी, सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणं, मुंबई-हैद्राबाद-सातारा गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देणं, आदी मागण्यांचा पुनरुच्चार करत, राज्य सरकारला पुन्हा दोन महिन्यांची मुदत दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं गुईलेन बॅरे सिंड्रोम-जी बी एसचे पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बुलडाणा तसंच जालना इथल्या रुग्णांचा समावेश आहे. या पाच रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर तीन रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या आजाराबाबत नागरिकांनी घेण्याच्या खबरदारीबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी माहिती दिली… “जे काही पेशन्ट आपल्याकडे डिटेक्ट झालेले आहेत, त्यापैकी दोन पेशन्ट डिस्चार्ज झालेले आहेत. काही जास्त चिंता करण्याचा विषय नाहीये. यामध्ये काळजी घ्यायची म्हणजे, वेळोवेळी हात धुणे, दूषित पाणी पिण्यात येऊ नये, शिळं अन्न खाण्यात येऊ नये, आणि फिवर वगैरे, चार पाच दिवसांपेक्षा जास्त लूज मोशन्स वगैरे असेल, आणि विकनेस जाणवत असला, तरी तत्काळ डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेऊ नये.’’
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवन-साधना गौरव’ पुरस्कार, कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना काल प्रदान करण्यात आला. मानवस्त्र, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत २३ पदकांसह महाराष्ट्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये चार सुवर्ण, ११ रौप्य आणि आठ कास्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत ट्रायथलॉन प्रकारात महाराष्ट्राने सहा पदकांची कमा�� केली. महिलांच्या ४०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत मेडले प्रकारात राज्याच्या सानवी देशवाल हिने सुवर्णपदक पटकावलं.
बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. येत्या दोन फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील.
प्रशासनाने पारदर्शिता आणि दायित्व समजून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याच्या पालक सचिव राधिका रस्तोगी यांनी केलं आहे. शंभर दिवसांचा कृती आराखडा, जिल्हा सुशासन निर्देशांक, यासह विविध विभागांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. कार्यालयीन स्वच्छता आणि सोयी सुविधा, क्षेत्रीय भेटी, ई - सुविधांमध्ये वाढ, याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी निर्देश दिले.
0 notes
Text
नगरच्या विकासाला तोड नाही , रोज नरक यातना भोगताहेत नगरकर
ज्या पद्धतीने नगर शहरात विकास कामाच्या नावाखाली रस्ते खोदून टाकण्यात आले आहेत त्याला तोड नाही. नगर शहरात ट्रॅफिकची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली असून शहरातील अंतर्गत रस्ते देखील खोदून ठेवल्याने पर्यायी मार्ग देखील कमी पडत आहेत त्यामुळे जिथे कुठे जागा सापडेल अशा पद्धतीने वाहनचालक गाडी चालवत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नगर शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज समोरील रस्ता अशाच पद्धतीने खोदून…
0 notes
Text
आफ्रिकन संघ (African Union)
जागतिक राजकारणात (World Politics) आर्थिक, राजकीय, सामाजिक, सुरक्षा, व मानवी हक्क अश्या विविध-क्षेत्रात सक्रियपणे काम करणाऱ्या अनेक संघटनांचे जाळे निर्माण झालेले दिसून येते. त्याच-पद्धतीने जगाच्या वेगवेगळ्या राजकीय विभागात (Political Continent) देखील अश्या विविध विषयावर काम करणाऱ्या अनेक स्वरूपाच्या संघटना आकार घेताना दिसून येत आहेत, जसे युरोपियन संघ, सार्क इ. त्या अनेक संघटनापैकी आफ्रिका खंडाचे…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/97e3d10f7d186eee3a188355027dc814/a63d60fe90662f90-18/s540x810/b5ab92077ccdf239ff7c6e19c1d729f4b978fdf7.jpg)
View On WordPress
0 notes
Text
‘सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी - महासंवाद
मुंबई, दि. २७ : नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांनी आधुनिक वैद्यकशास्र प्रमाणपत्र (सीसीएमपी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यास, त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्र वैद्यक (विषमचिकित्सा) पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. संबंधित व्यावसायिक हे महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम अन्वये नोंदणीकृत असणे व शासनमान्य…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ff5a557e48503f23194e6b2350f6bc7a/57b3e5fe99f7c30b-af/s540x810/ac0a75f0a68895c07d8684b45820f10c7a58c621.jpg)
View On WordPress
0 notes
Text
Pimple Saudagar : शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक रस्त्याचे होणार आधुनिक पद्धतीने रुंदीकरण
Pimple Saudagar : शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक रस्त्याचे होणार आधुनिक पद्धतीने रुंदीकरण – MPC…
0 notes