#पगार
Explore tagged Tumblr posts
chaitanyakulkarni98 · 4 months ago
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वा��तं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती ��र्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही ���समाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
��रं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोल��्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहत���. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
vishnulonare · 5 days ago
Text
वेळोवेळी दर्शन देऊन घरातील कलह केला समाप्त. | Nashik | Sant Rampal Ji Ma...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: वेळोवेळी दर्शन देवून घरातील कलह केला समाप्त - अरुणा मधुकर पगार |Nashik| Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ३९
"तुम्ही तिघीजणी पुढील १५ मिनिटांत इथून निघाला नाहीत ना, तर मी खरंच खुप रागावेन!" पमाताईच्या शांत स्वरांतला निग्रह शुभदाला चांगलाच जाणवला. तणाव कमी करण्यासाठी ती हंसत हंसत म्हणाली, "उगाच किती चिडचिड कराल, पमाताई! आम्ही निघायचीच तयारी करीत आहोंत हे तुम्हीसुद्धां बघताय् ना!" "हो, बघतेय् ना!-- आणि अर्ध्या तासापासून तेंच ते पालुपदही ऐकतेय्!" पमाताई मनोरमा आणि रजनीकडे कटाक्ष टाकीत म्हणाली. "तसं नाहीं,पमाताई!" मनोरमा समजूत काढीत म्हणाली, "पण आम्ही गेल्यावर रात्रभर तुम्ही एकट्याच इथे असाल;-- त्यामुळे कांही करायचं राहूं नये याची जरा अधिकच खबरदारी घेत आहोंत एवढंच!" "पण राहिलंय् काय? पोटं भरल्यावर सगळी मुलं केव्हांची झोपीं गेली आहेत! भांडी घासून उरल्या-सुरल्याची झाकपाकही तुम्ही केली आहे." आपल्या प्रतिपादनाला चिकटून रहात पमाताईने शांतपणे विचारलं, "मग आतां संध्याकाळपासून इथे खपत अस��ेल्या तुम्हांला घरी जाऊन थोडी विश्रांती घ्यावी असं वाटत नाहीं कां?" "चला ग, आतां निघुयां! उद्यां सकाळी वेळेवर यायचं आहे ना, पमाताईंना मोकळं करायला? नाहींतर, सकाळी उशीर कराल आणि मग पमाताईंना तोंड देणं मुष्कील होईल!" रजनीने सगळ्या विषयावर पडदा टाकायचा प्रयत्न केला. स्वयंपाकघरात नाईट-लॅम्प लावून ठेवून सगळ्याजणी बाहेर आल्या तेव्हां जणूं त्यांचीच वाट बघत असल्यागत मनोहर भोसले म्हणाले, "तुम्हांला बोलावण्यासाठी आतां मी आंतच येणार होतो! प्रभाकरराव आणि पमाताई, तुम्ही रात्रभर इथे थांबणार असल्याने मोठीच काळजी मिटली आहे! सकाळी आमच्यापैकी कुणीतरी येईलच ७\७-३० पर्यंत. मध्यंतरी कांही लागलं तर वाॅचमनला सांगा किंवा आमच्यापैकी कुणालाही फोन करा!"
अनाथाश्रमाच्या इमारतीबाहेर आवारांत उभ्या केलेल्या आपापल्या वाहनांकडे सर्व वळण्यापूर्वी मनोहर भोसले सर्वांना उद्देशून म्हणाले, "आपण सर्व इथे आपुलकीने काम करतो, त्यामुळे कुणीही कुणाला धन्यवाद देण्याची आवश्यकता नाहीं! आज दुपारपासून अचानक अंगावर पडलेली जबाबदारी आपण समर्थपणे निभावून नेली;-- तथापि उद्यांपासून तांतडीने पर्यायी व्यवस्था करण्याबद्दल मी ट्रस्टच्या अध्यक्षांना, संध्याकाळी ते एकुण परिस्थिती पहायला आले होते तेव्हां स्पष्टपणे सांगीतलं आहे. त्यांनी त्यासाठी उद्यां सकाळी सर्व संबंधितांची बैठक तांतडीने बोलावली आहे. त्या बैठकीत पर्यायी व्यवस्थेचा निर्णय होईल!" "पण पर्यायी व्यवस्था म्हणजे काय?" शुभदाने कांहीसं अस्वस्थ होऊन विचारलं, "आतां होत्या तशाच दुसऱ्या आया वा परिचारिका नेमणार?" तिला थांबवायचा अनंतने प्रयत्न केला तेव्हां भोसले म्हणाले, "अनंतराव, वहिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नामधे तथ्य आहे! मी स्वत: गेली १२ वर्षं या 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'साठी देणग्या गोळा करीत असलो तरी ट्रस्टच्या अंतर्गत कारभाराशी माझा कांहीच संबंध नव्हता! त्यामुळेच आज जे घडलं ते मलाही खुप धक्कादायक आहे! क्षणभर वाटलं की आपण इतकी वर्षं ट्रस्टच्या एकुण कारभारातही थोडं तरी लक्ष घालायला हवं होतं!" "जे घडलं ते तुमच्याप्रमाणेच, ट्रस्टशी संबधित इतर सर्वांनाही धक्कादायक असेल ना?" अनंतने सावधपणे विचारलं.
"नक्की सांगणं कठीण आहे!" भोसले घुटमळत म्हणाले, "जे काय असेल ते असो;-- पण मी मात्र उद्यां होणाऱ्या बैठकीत याबद्दल अनेक प्रश्न बेधडक विचारणार आहे! ट्रस्टच्या दैनं��िन कारभाराशी संबंधित नसलो, तरी माझ्यावर विश्वास ठेवून देणग्या देणाऱ्यांच्या वतीने रोखठोक प्रश्न विचारण्याचा पुरेपूर अधिकार मला आहे हे समजून अध्यक्षांनी मला उद्यां होणाऱ्या सभेमधे भाग घेण्यासाठी खास आमंत्रित म्हणून बोलावलं आहे!" "ते तुमच्या सभेमधे काय होईल, मला कांही कळत नाहीं! पण आम्ही तिघींनी आज जी अव्यवस्था सगळीकडे बघितली त्यावरून एवढं नक्की वाटतं की यापुढे तरी सुशिक्षित आणि अनुभवी परिचारिकांची नियुक्ती करावी लागेल!" मनोरमाने व्यथित स्वरांत सुचना केली. "ज्या कुणा नवीन परिचारिकांची निवड होईल त्यांना ट्रस्टने पुरेसा पगार दिला पाहिजे, म्हणजे त्यांना अशी चोरी-मारीची दुर्बुद्धी होणार नाहीं!" रजनीने आपलं मत मांडलं. "या अनाथाश्रमांतल्या बऱ्याच अपंग, आजारी मुलांना धड तक्रारही करतां येत नाही!" शुभदा हळहळत म्हणाली, "पण ज्या कांही चार-सहा मुलांशी आमचा संवाद होऊ शकला, त्यावरून असं जाणवलं की इथे काम करणाऱ्या परिचारिका इथल्या मुलांना व्यवस्थित खाऊं-पिऊं घालण्यापेक्षा स्वत:च्या छानछोकीमधेच दंग होत्या!" "तुम्ही तिघींनी जे कांही अनुभवलं त्याचा सविस्तर गोषवारा मनोरमा मला आतां घरी गेल्यावर सांंगेलच! त्या आधारे मी उद्यां होणाऱ्या ट्रस्टींच्या बैठकीत काय मुद्दे उपस्थित करायचे त्याची यादी तयार करीन!" भोसले म्हणाले, "त्याबाबत आपण उद्यां सकाळी बैठकीपूर्वी, एकत्र जमून बोलुयां!"
१८ मे २०२३
0 notes
writerss-blog · 2 months ago
Text
खुशी हैसियत अनुसार
सौजन्य गूगल हर इंसान की हैसियत के अनुसार खुशी का पैमाना, महीने भर नौकरी करने पर जब पगार आती आम इंसान का खुशी का ना होता है कोई ठिकाना, अपने ही मेहनत की कमाई जब जेब में आती है बुनने लगता है महीने भर का ताना बाना, आम इंसान की खुशी वो धनकुबेरों को नहीं नसीब, वो दौलत के ढेर पर बैठे होते हैं पर तनाव उनके जीवन के हर पल चलता है आम इंसान को जरूरतें सीमित उनको पूरा करके खुशी का पल जीता है…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 2 months ago
Text
दिवाळीचे वेध
झाला दसरा आतालागले दिवाळीचे वेध ।खर्चाचा पहाड पुढेखिशाला तर मोठे छेद  । चिवडा शेव लाडू गुलाबजामचकलीचेही तोंड वाकडे ।बायकोला पहिजे नवीन साडीमुलांनाही हवेच कपडे । फटाके रांगोळी आकाश दिवाघराला रंगही ��वा नवा ।इथे पगार नाही बोनस नाहीगुल झाली माझीच हवा ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 5 months ago
Text
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नांदुरी ते सप्तश्रृंगी गड रस्ता व बसस्थानकाचे भूमीपूजन संपन्न
नाशिक, दिनांक 2 ऑगस्ट,जि. मा. का. वृत्तसेवा) : तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजना व केंद्रीय मार्ग निधी (CIRF) अंतर्गत २०२३-२४ मध्ये कळवण तालुक्यातील नांदुरी येथील सप्तश्रृंगी गड रस्ता व नांदुरी बसस्थानकाच्या कामांचे भूमीपुजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक पगार,…
0 notes
newschakra · 5 months ago
Text
3 महीने से नहीं मिली पगार, अब सामुहिक हड़ताल की दी चेतावनी !
कोटपूतली में सफाई कर्मी लामबंद, आर्थिक शोषण का लगाया आरोप न्यूज़ चक्र, कोटपूतली। किसी भी शहर की सफाई व्यवस्था के लिए सफाई कर्मियों का योगदान महत्वपूर्ण होता है। लेकिन अगर सफाई कर्मियों को दो से तीन महीने तक लगातार वेतन ही ना मिले तो फिर बिगड़ती सफाई व्यवस्था के लिए कौन जिम्मेदार! जी हां, कोटपूतली शहर के सफाई कर्मियों ने आज से सामूहिक हड़ताल की घोषणा कर दी है। सफाई कर्मियों ने पिछले 3 महीने का…
0 notes
homeloansguide101 · 5 months ago
Text
गृह कर्ज उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय
पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांसाठी एक अतिशय चांगली बातमी आहे. आपल्याकडे औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसला तरीही, आपण आता आपल्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळवू शकता. आपण रोजंदारी वर काम करत असाल किंवा अनौपचारिक काम करत असून रोख पगार मिळवत असाल, तरीसुद्धा आपण साध्या गृह कर्जासाठी होमफर्स्ट फायनान्स कंपनी कडे अर्ज करू शकता.
घरांच्या किमती वाढत असताना सध्याच्या काळामध्ये सर्वात खालच्या स्तरावरचे Standard of living ही सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला “घर” म्हणून एक जागा असावी अशी गरज आहे. तथापि, अनेक लोक कायम रोजगार आणि उत्पन्न नसल्यामुळे या गरजेपासून वंचित आहेत.
“उत्पन्नाचा पुरावा नसणे” म्हणजे काय?
अधिक खोलवर जाण्यापूर्वी, आपण “उत्पन्नाचा पुरावा नसणे” ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये, लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (कमी-उत्पन्नाचा गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या श्रेणीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे अन्न, आरोग्य, शिक्षण, किंवा पायाभूत बँकिंग अशा गोष्टींसाठी दुर्लक्षित ठेवले जाते. त्यांची अंदाजे संख्या सांगायची झाली तर ते अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक लोकांकडे पडताळणी करता येईल असा उत्पन्नाचा पुरावा नसतो. म्हणजेच, त्यांच्याकडे एक तरी उत्पन्नाचा ��्त्रोत असेल परंतु ते त्याला कागदोपत्री सत्यापित करू शकत नाहीत. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते जसे की त्यांच्याकडे रोजगार आहे परंतु त्यांना मोबदला रोख रकमेच्या स्वरूपात दिला जातो किंवा ते असे लहान व्यवसाय करतात जे योग्य पद्धतीने नोंदणीकृत नाहीत.
उदाहरणार्थ एका कंपनीमधील मशीन ऑपरेटर किंवा रिक्षा चालक अशा स्वरूपाची उदाहरणे आहेत. लहान व्यावसायिक आणि व्यवसायांचे मालक जसे की आपल्या भागातील “किराणा दुकानदार” किंवा “पाणीपुरी वाला” ज्याच्याकडे आपण रोज संध्याकाळी जाता, त्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टी मिळू शकत नसतील, सहजपणे मिळू शकतील अशा गृहकर्जाची तर बात सोडाच. जरी त्यांना परतफेड गरज असली तरी ते बाजारात पलब्ध असलेल्या संधी बद्दल अज्ञात असतात.
उत्पन्नाच्या पुराव्याची कमतरता
भारतामध्ये लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (अल्प उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या मागास घटक) यामध्ये मोडतो, जे अनेकवेळ आपल्या देशाच्या पायाभूत बँकिंग द्वारे दुर्लक्षित केले जातात. अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आर्थिकदृष्ट्या वगळले जातात कारण त्यांच्याकडे प्रमाणित उत्पन्नाचा पुरावा नसतो. याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे उत्पन्न असते परंतु ते त्याला कागदोपत्री प्रमाणित करण्यात मागे पडतात.
हे खालील अनेक कारणांमुळे होऊ शकते:
रोख मोबदला: मनुष्याला रोजगार दिल जातो परंतु तो रोख स्वरूपाचा असतो. एक उदाहरण म्हणून किराणा दुकानात काम करणारा मदतनीस घ्या.
स्वयंरोजगार: असा कोणीतरी जो एक लहान व्यवसाय करतो आणि एक ठराविक रक्कम कमावतो, परंतु त्या उत्पन्नामध्ये सातत्य नसते. उदाहरणार्थ, रिक्षा चालक.
ठराविक कालावधी मधील उत्पन्न: ते वर्षातील एक ठराविक कालावधीमध्ये रोजगार करतात आणि काही रक्कम कमवतात जी त्यांना बाकी वर्षभर पुरते. उदाहरणार्थ, फटाके विक्रेते.
अनेक लहान लहान उत्पन्न: असे जे विविध प्रकारची अनौपचारिक कामे करतात. उदाहरणार्थ, घर कामगार जे विविध घरांमध्ये कामे करतात.
सर्वांसाठी गृह कर्जाची गरज
घर खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असते कारण घर ही एखादया व्यक्तीकडे असणारी सर्वात मोठी मालमत्ता असते. अशा मोठ्या गुंतवणूकीमुळे लोकांची बहुतेक बचत संपते, म्हणूनच बहुतेक व्यक्ती घर विकत घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून गृह कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकांकडून पैसे कर्ज घेण्याकडे वळतात. या संपूर्ण प्रक्रियेची एक महत्त्वपूर्ण गैरसोय म्हणजे समाजातील सर्व घटकांना असे बँक कर्ज घेता येत नाही.
गैरसमजूत: गृह कर्जाला मंजूरी मिळण्यासाठी उत्पन्नाचे दस्तऐवजीकरण करणे अनिवार्य आहे
जरी ते कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असले तरीही कर्जदारांना बाजारातील पर्यायाबद्दल माहिती नाही. त्यांना असे वाटते की कागदपत्रांच्या अभावामुळे ते पारंपारिक बँकेच्या माध्यमातून कधीही गृह कर्ज घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना असे वाटत असते की मालमत्तेच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याची ही एकमेव पद्धत आहे. त्यांना हे माहित नाही की होमफर्स्ट फायनान्स कंपनीसारखी परवडणारी गृहनिर्माण वित्तीय संस्था त्यांना मदत करू शकते आणि त्यांना त्यांच्या महत्वाकांक्षा सत्यामध्ये उतरवण्यास सक्षम करू शकते.
गैरसमजूत अशी आहे की बँकेच्या ठराविक प्रक्रियेमध्ये कर्ज घेणाऱ्या कडून अनेक कागदपत्रे गोळा केली जातात ज्याद्वारे ते कर्ज म्हणून घेत असलेल्या पैशांची परतफेड करण्यास सक्षम आहेत याची खात्री केली जाते.
गैरसमज दूर करण्यासाठी, NBFCs सारख्या संस्था समाजातील विशिष्ट घटकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा संस्था उत्पन्नाचा कोणताही पुरावा न घेता कर्ज घेतात.
‘कागदपत्रांशीवाय गृहकर्ज’ असे प्रतीत करते की कर्ज घेणाऱ्याकडे मालमत्ता, उत्पन्न, किंवा रोजगार सत्यापन याची कमतरता आहे.
तर्, ही यंत्रणा नक्की कशाप्रकारे काम करते?
वास्तविकत: उत्पन्नाचा पुरावा न देता गृह कर्ज मिळविणे शक्य आहे. होमफर्स्ट येथे हे वास्तविकता आहे. आम्ही ग्राहकांना कागदपत्रांची मोठी यादी किंवा मोठ्या प्रक्रियेसह घाबरवून टाकत नाही, त्यातील बहुतेक ग्राहकांना समजू शकत नाही. त्याऐवजी, आम्ही ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देतो आणि गृह कर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांच्या अडचणी ऐकतो.
आमच्या ग्राहकांच्या विश्वासार्हतेचे मूल्यांकन करण्याचा दस्तऐवजीकरण हा एकमेव मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला वाटत नाही की ग्राहक कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असेल की नाही हे वेतन स्टब निर्णय घेऊ शकतो. पगाराची पावती म्हणजे कागदाचा एक तुकडा आहे जो आमच्या ग्राहकांना किती प���से मिळतात हे दर्शवितो. तथापि, आमचा आर्थिक उपाय अशा प्रकारे तयार केला गेला आहे की तो कंपनीला ग्राहकांचा हेतू आणि परतफेड क्षमता निश्चित करण्यात मदत करतो.
होमफर्स्ट फायनान्स कंपनी येथे, आमचे ध्येय असे आहे की आमच्या ग्राहकांना त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आणि ते त्यांचा हेतु प्रकट करतात तेव्हा पासून ते त्यांच्या नवीन घरा��ध्ये राहायला जातील तोपर्यंतची प्रक्रिया सोपी करणे.
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 July 2024
Time 16.45 to 16.55
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जूलै २०२४ सायंकाळी १६.४५
****
चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर
तीन लाखापर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त-स्टॅण्डर्ड डिडक्शन पन्नास हजारावरून ७५ हजार रुप��े
कर्करोगाची औषधं, मोबाईल, इलेक्ट्रीक वाहनं, तसंच मौल्यवान धातूंच्या सीमा शुल्कात कपात
महाराष्ट्रासाठी विविध विभागांतर्गत सुमारे सात हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद
आणि
महिला आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारत- नेपाळ सामना
****
आयकर दात्यांना दिलासा, उद्योग क्षेत्राला चालना, धार्मिक पर्यटनाचा विकास, आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारा चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला. उत्पादकता, रोजगार, सामाजिक न्याय, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा आदी नऊ प्राधान्यक्रमांवर हा अर्थसंकल्प आधारलेला आहे.
या अर्थसंकल्पात आयकर रचनेत बदल प्रस्तावित असून, वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं असून, स्टॅंडर्ड डीडक्शनची मर्यादा वाढवण्यात आली असून, पगारदारांसाठी ही मर्यादा ७५ हजार रुपये तर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी २५ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे पगारदारांच्या आयकरात साडे सतरा हजार रुपये बचत होणार असून, सरासरी सुमारे चार कोटी पगारदारांना याचा लाभ होणार आहे.
वार्षिक सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के, सात लाख ते १० लाख रुपयांपर्यंत १० टक्के, १० लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत १५ टक्के, १२ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत २० टक्के तर १५ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर ३० टक्के आयकर आकारला जाणार आहे. नव्या कर विवरण पद्धतीने करमूल्यांकनासाठी या तरतुदी लागू असणार आहेत.
****
विदेशी कंपन्यांसाठी कार्पोरेट कर ४० टक्क्यांवरून ३५ टक्के, ई कॉमर्स कंपन्यांसाठी स्रोतावर कर कपात - टीडीएसचा दर एक टक्क्यावरून शून्य पूर्णांक एक टक्का करण्याची तसंच स्टार्टअप्सनास प्रोत्साहन देण्यासाठी एंजल कर रद्द करण्याची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.
****
या अर्थसंकल्पात, कर्करोगावरची औषधं तसंच वैद्यकीय उपकरणांवरचं सीमा शुल्क माफ करण्यात आलं असून, मोबाईल फोन, इलेक्ट्रीक वाहनं, चामड्याच्या वस्तू, अणु उर्जेसाठी लागणारी उपकरणं, प्लॅटिनम, सोने, चांदी, तांबे तसंच इतर २५ धातूंवरच्या सीमा शुल्कात कपात प्रस्तावित करण्यात आली आहे. तर प्लास्टिक तसंच टेलिफोन उपकरणांवरच्या सीमाशुल्कात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
****
पीएम आवास योजनेअंतर्गत तीन कोटी अतिरिक्त घरं बांधली जाणार असून, शहरी भागात गरीबांच्या घरांसाठी दहा लाख कोटी रुपये तर महिला आणि बालिका विकासासाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी पंतप्रधान पाच योजन���ंच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांना कामावर घेण्यास मदत करण्यासाठी नियोक्त्यांना एक महिन्याचा पगार अनुदान म्हणून दिला जाईल. या योजनेसाठी पात्रता मर्यादा १ लाख रुपये मासिक वेतन असेल. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा असेल.
या योजनांमुळे पाच वर्षांत चार कोटी १० लाख युवकांना रोजगार मिळणार असल्��ाचं सीतारामन यांनी सांगितलं. युवकांसाठी इंटर्नशीप आंतरवासिता योजना सीतारामन यांनी जाहीर केली, यामध्ये पुढच्या पाच वर्षात पाचशे कंपन्यामध्ये युवकांना १२ महिने इंटर्नशीपचा अनुभव मिळणार आहे, यासाठी दरमहा पाच हजार रुपये विद्यावेतन आणि कार्यकाळ पूर्ण झाल्यावर सहा हजार रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे. मुद्रा योजनेत कर्ज मर्यादा २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार असून, अधिक उत्पादन देणारी ३२ विविध वाणं तसंच बागायती पिकांसाठी शंभरावर नवी वाणं उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एक लाख ५२ हजार कोटी रुपये, ग्रामीण विकास दोन लाख ६६ हजार कोटी रुपये, तर शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी एक लाख ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी बिहार राज्यात गया इथं विष्णूपद मंदिर, तसंच महाबोधी मंदिराचा काशी विश्वनाथ कॉरीडॉरच्या धर्तीवर तर ओडिशातल्या मंदिरांचा तसंच पर्यटन स्थळांचा जागतिक पातळीवर विकास करण्यात येणार आहे. नालंदा हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
बिहार राज्यात रस्ते बांधणीसाठी २६ हजार कोटी तर आंध्रप्रदेशात राजधानी अमरावतीसह विविध प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री जनजाती उन्नत अभियानाची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली, या माध्यमातून ६३ हजार गावांतल्या पाच कोटी आदिवासी बांधवांना लाभ होणार आहे.
सीतारमन यांनी लोकसभेत वित्त विधेयक सादर केल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. वित्तमंत्र्यांनी राज्यसभेतही वित्त विधेयक सादर केलं, त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
दरम्यान, या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी सुमारे सात हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामध्ये विदर्भ तसंच मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ६०० कोटी, ग्रामीण रस्ते सुधार ४०० कोटी, कृषी प्रकल्पांसाठी ५९८ कोटी, उद्योग ४६६ कोटी, आदी तरतुदींचा समावेश असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
****
आज सादर झालेला अर्थसंकल्प समाजाच्या सर्व घटकांना सशक्त करणारा अर्थसंकल्प असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे आर्थिक विकासाला नवी गती मिळेल, आणि या गतीत सातत्य राहील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, हा अर्थसंकल्प ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा असल्याचं सांगत, कररचनेततल्या मोठ्या बदलांमुळे सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधानांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरवल्याची भावना व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी, हा अर्थसंकल्प दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, आणि अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा लोककल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचं नमूद केलं.
****
विरोधी पक्षांनी मात्र अर्थसंकल्पावर टीका केली आहे. देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर केंद्र सरकारने तुरी दिल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. अवघ्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी महाराष्ट्राला देशाचा पॉवर हाऊस म्हणून संबोधलं होतं, मात्र त्यांचं प्रेम हे बेगडी असल्याचं, या अर्थसंकल्पावरून दिसून आल्याचं मत, दानवे यांनी व्यक्त केलं.
विधान सभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राला सापत्न वागणुक दिल्याची टीका करत, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने केंद्र सरकारला पाठिंबा दिल्यामुळेच या दोन्ही राज्यांना भरभरून देण्यात आल्याचा आरोप केला.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी, धोरण आणि दृष्टी नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया नोंदवली.
****
मतदान केंद्र सुसूत्रीकरण आणि नवीन मतदान केंद्र तयार करताना मतदारांच्या मतदान केंद्रात बदल करण्यात येऊ नये, अशी मागणी, भारतीय जनता पक्षातर्फे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात निवेदन दिल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मतदान केंद्राच्या ठिकाणीच वाढीव मतदान केंद्र त्याच इमारतीत मंजूर करावे अशी मागणीही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
आकाशवाणी आज आपला सत्त्याण्णवावा वर्धापन दिन साजरा करत आहे. १९२७ साली आजच्या दिवशी आकाशवाणीचं पहिलं केंद्र मुंबई इथं सुरू झालं. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी नावानं सुरू झालेलं हे केंद्र १९५७ नंतर आकाशवाणी या नावानं प्रसिद्ध झालं.
****
महिला आशिया चषक टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंकेतल्या दांबुला इथं भारताचा सामना नेपाळसोबत होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे.
****
बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन मोहिमे अंतर्गत पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेत जन��ागृती कार्यक्रम घेण्यात आला. बालविवाहाविषयी माहिती देण्यासाठी दहा-नऊ-आठ या चाईल्ड मदतवाहिनीवर संपर्क करावा अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
****
सुधारित फौजदारी कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी धाराशिव इथं मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाला आज प्रारंभ झाला. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जोशी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. हे प्रदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीत दोन दिवस चालणार आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहयोगी प्राध्यापकांसह विविध पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती येत्या २९ जुलैला नवी मुंबई इथं घेण्यात येणार आहेत. मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असं आयोगानं कळवलं आहे.
****
0 notes
sharpbharat · 7 months ago
Text
Jamshedpur rural ucil strike : वेतन भुगताव के बाद काम पर लौटे यूसिल के नरवापहाड़ प्रोजेक्ट के ठेका मजदूर, ठेका कंपनियों के मजदूरों के खातों में भुगतान के बाद हड़ताल हुई समाप्त
जादूगोड़ा : यूसिल के नरवा पहाड़ यूरेनियम प्रोजेक्ट की आधा दर्जन ठेका कंपनियों की ओर से अपने मजदूरों को आज बकाया मासिक वेतन का भुगतान कर दिये जाने के बाद विगत दो दिनों से जारी ठेका कर्मियों की हड़ताल समाप्त हो गयी है. मिली जानकारी के अनुसार बकाया पगार मिलते ही करीब 600 हड़ताली ठेका कर्मी सुबह 11 बजे अपने काम पर लौट आये. (नीचे भी पढ़ें) इधर हड़ताल खत्म होने के बाद यूसिल प्रबंधन ने राहत की सास ली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 7 months ago
Text
0 notes
vishnulonare · 3 months ago
Text
गुरूंचा चमत्कार-अभ्यास झालेला नसताना मिळाले 78%गुण | Pune | Sant Rampal ...
youtube
अवश्य ऐका ही इंटरव्यू: गुरुंचा चमत्कार-अभ्यास झालेला नसताना मिळाले 78 % गुण- परिमल गोरख पगार |Pune | Sant Rampal Ji Marathi Satsang Interview.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : २६
'कोळाचे पोहे' खाऊन झाल्यावर हात धुऊन सबनीस शुभदाला म्हणाले, "वहिनी, आम्हां दोघांनाही पोह्यांचा हा प्रकार खुप आवडतो. पण आमच्या घरीं तो करायची प्रथा नाही. तुम्ही शिकवाल कां रजनीला?" "हो, नक्की! पुन: जेव्हां तुम्हांला 'कोळाचे पोहे खाण्याची इच्छा होईल तेव्हां सांगा! त्यावेळी मी तुमच्या घरीं ते रजनीवहिनींकडून करुन घेईन!! मग तर झालं?" त्यावर रजनीवहिनींनीही तत्परतेने मान डोलावली तशी सबनीस त्यांना उद्देशून म्हणाले, "तूं वहिनींना सगळं आवरायला मदत केल्यावर आपण लगेच निघुयां! फक्त ओळख करून घ्यायला म्हणून आलो, आणि बोलतां-बोलतां आपण खुप वेळ घेतला या दोघांचा!" "दिनकरराव, असे कसे तडकाफडकी काय निघालांत? कोळाचे पोहे आवडले ना? मग आता त्यावर निदान अर्धा कप तरी चहा नको? काय शुभदा?" "चहा तर करणारच आहे मी! एरवी आम्ही सकाळी पुन: चहा घेत नाही, पण रविवारी मात्र चहाखेरीज आम्हांला नाश्ता हजम होत नाही!" "ते सगळं ठीक आहे;-- पण वहिनी, तुमची सकाळपासून किती धांवपळ चालली आहे! त्यांत आतां तुम्ही पुन्हा चहा करणार?" रजनी सबनीस म्हणाल्या, "त्यापेक्षा मी चहा करते, तोवर तुम्ही बाकीचं आवरा! मला फक्त चहा-साखरेचे डबे कुठे आहेत ते दाखवा!"
चहा पितांना गप्पा पुन्हां नव्याने रंगल्या! त्या ओघात सबनीसांनी शुभदाला विचारलं, "मी ऐकलं होतं की अनंतराव नोकरीतून रिटायर झाले आहेत! पण मग तुम्ही घड्याळाच्या कांट्यांमागे धांवण्याचा उल्लेख कशासाठी केला?" " 'Bad habits die hard' म्हणतात ना, तसं काहीसं झालंय् आमचं! जवळपास गेली ३५ वर्षं अंगीं बाणलेल्या संवयी सुटतां सुटत नाहीत!" शुभदा सस्मित उत्तरली! "म्हणजे?---" सबनीसांच्या मनांतला गोंधळ आवाजात स��पष्ट जाणवत होता. तो उमजून शुभदा सांगू लागली, " मी जरा सविस्तर सांगते, म्हणजे बहुधा तुमच्या लक्षात येईल! लग्न होऊन मी जेव्हां केळकरांंच्या घरी आले तेव्हां आमची फक्त एक डबल रूम होती! त्यात राहणारे सासु-सासरे, माझे थोरले दीर-जाऊ, त्यांची दोन छोटी मुलं आणि आम्ही दोघं असे ८ जण! चाळीतली जागा म्हणजे मोजके काॅमन संडास आणि नळ हे ओघानेच आलं! त्यामुळे सगळ्या घराला एक शिस्त होती! सकाळी लौकर ऊठून, नळावर गर्दी होण्यापूर्वीच पाणी भरण्यापासून ते पुरुषांच्या आंघोळी उरकण्यापर्यंत! सासुबाईचं उठल्यावर पहिलं काम म्हणजे बंबात पाणी तापवायचं. तोपर्यंत जाऊबाई चहा करीत! चहा पिऊन सासुबाई मोरीत पटकन् आंघोळ करीत आणि स्वयंपाकाला लागत! लग्नापूर्वी मला नोकरी मिळाली होती, ती लग्नानंतरही चालूं ठेवायची असं आम्ही दोघांनी ठरवल्याने मूळांत थोडी गलथान असलेली मीसुद्धा लग्नानंतर लौकरच केळकरांच्या घराच्या शिस्तीनुसार सगळं पटापटा आवरायला शिकले! तीन वर्षांनी मोठा मुलगा कौस्तुभ जन्माला आल्यावर जागेची अडचण जाणवूं लागली तशी सर्वांची संमती घेऊन आम्ही जवळच एक डबलरूम घेऊन स्वतंत्र बिऱ्हाड थाटलं! जागेची अडचण कमी झाली तरी संसाराची जबाबदारी वाढली!आर्थिक गरजेपोटीं माझी नोकरी चालूच होती ती अगदी मुलगी केतकी शाळेत जाऊं लागेपर्यंत! मध्यंतरी आमची आर्थिक परिस्थितीही सुधारली होती. त्यामुळे नोकरीत प्रमोशन मिळून पगार बराच वाढल्यावर मात्र यांनी मी नोकरी सोडावी असा आग्रह धरला! चांगली १२ वर्षं केलेली नोकरी एकदम सोडायला मी राजी नव्हते;-- पण तोपर्यंत केतकीचं शाळेत जाण्याचं वय झाल्याने 'मुलांना पुरेसा वेळ देणं अधिक महत्त्वाचं आहे!' हे मला पटलं आणि मी नोकरीचा राजीनामा दिला! अशा रीतीने एकीकडे नोकरीची दगदग कमी झाली, तरी दुसरीकडे वाढत्या वयाच्या मुलांच्या जबाबदाऱ्या वाढतच होत्या!"
" हे अगदी १०० % सत्य आहे!" अनंत कबुली देत म्हणाला, "ऑफिसात प्रमोशनमुळे पगार वाढला, तसा कामाचा बोजाही वाढला! त्यामुळे मी घरासाठी देत असलेला वेळ उत्तरोत्तर कमी कमी होत गेला! कौस्तुभ आणि केतकीला शुभदाने एकहातीं मोठं केलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीं! त्यांच्या पालनपोषणाचा खर्च उचलण्यापलीकडे मी बाप म्हणून कांही केलं नाहीं! -- आणि मुख्य म्हणजे मुुलांचे वाजवीपेक्षा जास्त वा फाजील लाड न करतां शुभदाने त्यांना शिस्तीत मोठं केलं!'लहानपणीं आईच्या कडक शिस्तीचा आम्हांला कधी कधी खुप राग यायचा, पण त्या शिस्तीचं महत्व आम्हांला आतां स्वत: पालक बनल्यानंतर समजतंय्!' असं कौस्तुभ आणि केतकी दोघंही आज प्रांजळपणे कबूल करतात!!" "अशा प्रकारे जवळजवळ गेली ३५ वर्षं अंगी मुरलेल्या संवयी जातां जात नाहीत! तुम्हांला खोटं वाटेल, पण रिटायर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी हा गृहस्थ पहांटे साडेपांच वाजता कीचनमधे रोजच्यासारखा चहा करीत होता! काय करणार;-- शेवटीं 'पदरी पडलं, पवित्र झालं,' म्हणायचं!!" म्हणत शुभदाने सुस्कारा सोडला!
५ जानेवारी २०२३
0 notes
writerss-blog · 5 months ago
Text
खुशी
हर इंसान की हैसियत के अनुसार खुशी का पैमाना, महीने भर नौकरी करने पर जब पगार आती आम इंसान का खुशी का ना होता है कोई ठिकाना, अपने ही मेहनत की कमाई जब जेब में आती है बुनने लगता है महीने भर का ताना बाना, आम इंसान की खुशी वो धनकुबेरों को नहीं नसीब, वो दौलत के ढेर पर बैठे होते हैं पर तनाव उनके जीवन के हर पल चलता है आम इंसान को जरूरतें सीमित उनको पूरा करके खुशी का पल जीता है । खुशी दौलत से…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bandya-mama · 7 months ago
Text
बायको : मलाही दर महिन्याला घरकामाचा पगार पाहिजे…
नवरा : मागणी मान्य आहे, पण एका अटीवर…
बायको : कोणती अट?
पती : पगार दिला जाईल… पण कामात काही चूक झाल्यास कामगार बदलण्यात येईल…
😅😅😅😀😀😀😂😂😂😄😄😄
0 notes
pradip-madgaonkar · 7 months ago
Text
बायको : मलाही दर महिन्याला घरकामाचा पगार पाहिजे…
Pradip : मागणी मान्य आहे, पण एका अटीवर…
बायको : कोणती अट?
Pradip : पगार दिला जाईल… पण कामात काही चूक झाल्यास कामगार बदलण्यात येईल…
😅😅😅😀😀😀😂😂😂😄😄😄
1 note · View note