#न्यायालया��ा
Explore tagged Tumblr posts
Text
कणकवली न्यायालया मार्फत जानवली, वागदेमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे
कणकवली न्यायालया मार्फत जानवली, वागदेमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे
दोन्ही ठिकाणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली : आझादी का अमृत महोत्सव या निमित्त पॅन इंडिया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुशंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशा प्रमाणे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन जानवली, व वागदे येथे करण्यात आले होते. सदर कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन टी. एच. शेख दिवाणी न्यायाधिश, कणकवली यांच्या हस्ते दिप प्रज्वल��� करून व सावित्रीबाई…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 August 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· राज्य विधीमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन, विविध सहा अध्यादेश आणि नऊ विधेयकं सदनाच्या पटलावर मांडली जाणार
· विरोधी पक्षांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार,
· राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ, वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळांच्या बसेस मधून मोफत प्रवास
· शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरील हक्कासंदभार्भात केंद्रीय निवडणूक आयोगापूर्वी सर्वोच्च न्यायालया आपलं निरीक्षण नोंदवणार
· स्वराज्य महोत्सवाअंतर्गत आज सकाळी ११ वाजता राज्यभर समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे ८३६ रुग्ण, मराठवाड्यात ४९ बाधित
आणि
· पैठणच्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फूट उघडल्याने गगोदावरी नदीला पूर
****
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात विविध सहा अध्यादेश आणि नऊ ��िधेयकं सदनाच्या पटलावर मांडली जाणार आहेत. अधिवेशन काळात १९, २०, २१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत, तर २४ ऑगस्टला विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.
****
राज्याच्या इतिहासात यावर्षी एकाही तालुक्यात दुष्काळाची स्थिती नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या ४० दिवसात नव्या सरकारनं सुमारे साडेसातशे निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. जुन्या सरकारनं घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेऊन, त्यापैकी जनतेच्या हिताचे निर्णय कायम ठेवू, मात्र अनावश्यक कामांचा आढावा घेऊन त्याबाबत योग्य निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. हे सरकार विश्वासघात करून सत्तेवर आल्याच्या विरोधकांच्या आरोपाचं खंडन करत, हे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आहे, जनतेच्या मनातलं सरकार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. आमचं सरकार आल्याबद्दल अजित पवार यांना वाईट वाटणं साहजिक आहे, कारण आधीचं सरकार तेच चालवत होते, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
आमचं सरकार सत्तेत आल्यापासून लोकांना फरक दिसत असून, विरोधी पक्षांनी सरकारपेक्षा स्वत:च्या एकजूटीवर लक्ष द्यावं, असा उपरोधिक सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.
दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत पावसाळी आधिवेशन संपताच थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ते काल चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर क्रांती हुतात्मा सन्मान सोहळ्यात बोलत होते.
****
विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेलं सरकार विधीमान्य नसल्याचं सांगत विरोधी पक्षांनी काल सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. याबाबतचं पत्र विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, विरोधी पक्षांची भूमिका मांडली. अंबादास दानवे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सरकारची भूमिका बेपर्वाईची असल्याचं सांगत, टीईटी घोटाळ्यात नातेवाईकांना नोकरी देणाऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल सरकारवर टीका केली. ते म्हणाले....
‘‘जी घटना भंडारा आणि गोंदियामध्ये घडलेली आहे. त्याला जोडूनच महाराष्ट्रात या काळात अनेक घटना घडलेल्या या चाळीस पन्नास दिवसात आणि याच्याविषयी सरकारची भूमीका बेपर्वाईची आहे. सगळ्यात महत्वाचं टीईटी सारखा गैरप्रकार करुन स्वत:च्या नातेवाईकांना नोकरी देण्याचा प्रकार घडलेला असताना अशा प्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देणे हा सुद्धा प्रकार या सगळ्या याच्यात घडलेला आहे. बुलेट ट्रेनसाठी इमिजिएट निधी या सरकारने दिलेला आहे. परंतू शेतकऱ्यांसाठी निधी मिळत नाही. या अधिवेशनात हे विषय सुद्धा आम्ही सगळे मिळून घेणार आहोत.’’
अजित पवार यांनी आमदारांच्या आक्षेपार्ह वर्तनाचा मुद्दा उपस्थित करत, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. राज्यात पूरस्थितीमुळे झालेलं नुकसान, अतिवृष्टीमुळे झालेली जीवीत हानी, तसंच अन्य घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं चहापान टाळून फक्त चर्चा करणं संयुक्तिक ठरलं असतं, असं सांगत, सरकारनं किमान संवेदनशीलता दाखवायला हवी होती, असं मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीग्रस्तांना भरघोस मदती द्यावी यासह विविध मागण्या मांडत पवार यांनी, चहापानावर बहिष्कार टाकल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
‘‘ओला दुष्काळ जाहीर करा. पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टरी मदत करा. फळबागांना हेक्टरी दीड लाख रुपये मदत जाहीर करा. मजूरांना एकरकमी अनुदान दिलं गेलं पाहिजे तसंच अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क देखील माफ करा आणि यंदा विधेयक पण बरीचशी आहेत, तीपण चर्चा करुनच शासकीय विधेयक मंजूर केली गेली पाहिजे. या सगळ्या कारणांमुळे आम्ही विरोधी पक्षांनी आज चहापानावर बहिष्कार घालायचा निर्णय घेतलेला आहे.’’
****
विधान परिषदेचं सदस्यत्व सोडू नये यासाठी उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याचं, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला होता. मात्र चुकून त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधान परिषदेच्या सभापतींऐवजी राज्यपालांकडे दिला असावा, असं पवार म्हणाले.
****
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चालू महिन्यापासून ही वाढ देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन ३४ टक्के होणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दहीहंडी गोविंदा पथकातल्या गोविंदांना १० लाखाचं विमा संरक्षण देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या विमा संरक्षणाचं प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलं जाणारं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय, लतादीदींच्या जयंती दिनी, येत्या २८ सप्टेंबरला सुरू करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. काल यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जागेअभावी संगीत महाविद्यालय सुरू करण्यास वेळ लागू नये, यासाठी तात्पुरती जागा उपलब्�� करून तातडीने यावर्षी ��िमान प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावा. त्यानंतर टप्याटप्यानं पदविका आणि पदवी अभ्यासक्रम सुरू करावेत, असं त्यांनी सांगितलं.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाची जागा असून, त्याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारलं जाणार आहे. यावर्षी पु.ल.देशपांडे कला अकादमीमध्ये तात्पुरतं महाविद्यालय सुरू करण्याबाबत चर्चा झाली.
****
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटापैकी धनुष्यबाण चिन्ह कोणाचं, यावर निवडणूक आयोग निर्णय देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालया आपलं निरीक्षण नोंदवणार आहे. निवडणूक चिन्हाबाबत न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी निवडणूक आयोग निर्णय देईल, अशी शक्यता असल्यानं, उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय पहिले आपलं निरीक्षण नोंदेल, असं सांगण्यात आलं.
****
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना कृषीसंबंधी माहिती द्यावी, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. चांगल्या वाणांची बियाणं, पीक विमा, कीटकनाशकं, खतं, शासनाच्या कृषी योजना, नवनवीन कृषी संशोधन यासंबंधीची माहिती शेतकऱ्यांना द्यावी, म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळून शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी होईल, असं सत्तार म्हणाले. ग्रामसभा आणि कार्यशाळेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी कृषीसहायकांना आराखडा आखून देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पीक नुकसानीच्या त्वरित पंचनामे करुन त्यासंबंधीचे प्रस्ताव विमा कंपन्यांकडे पाठविण्याचे निर्देश सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
****
राज्यातल्या गृहरक्षक दल- होमगार्ड सैनिकांना, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आदी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात यावं, असा आदेश शासनाने पारित करावा, यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. गृहरक्षक दलाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ही माहिती दिली. सुरक्षा रक्षक म्हणून होमगार्ड सैनिकांची नेमणूक करण्यात आली तर सुरक्षा कामात आणखी तत्परता येईल असं त्यांनी नमूद केलं.
****
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पालकत्व ॲपचं लोकार्पण केलं. बालकांसाठी जन्मापासून पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे असून, या दरम्यान बालकांची शारिरिक, बौद्धिक वाढ होत असते. या ॲपच्या माध्यमातून पालकांना यासंबंधी माहिती उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, देशात बालमृत्यू दर कमी करण्यात वेगानं पावलं उचलली जात आहेत. २०१४ पासून ते २०१९ पर्यंत बाल मृत्यू दर हा दर हजारी ३५ एवढा कमी झाला असल्या��ंही पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गत नऊ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत, राज्यात स्वराज्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून, या अंतर्गत आज सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातल्या आबालवृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या उपक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातली सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, सहकारी तसंच खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठानं, संस्था यांना सामुहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
लातूर जिल्हा क्रीडा संकुलात ७५ या अंकाची प्रतिकृती करून सामूहिक राष्ट्रगीत होणार असून, जिल्ह्यात विविध शाळा, महाविद्यालयात, सामाजिक संस्था, नागरिकांनी सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभाग घ्यावा, असं आवाहन, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं, कोविड प्रतिबंधक खबरदारीची लस मात्रा ७५ दिवस मोफत देण्याची मोहीम १५ जुलैपासून सुरु केली आहे. ही लसमात्रा घेतलेल्या जालना जिल्ह्यातल्या लाभार्थी उषा तिकांडे यांनी आकाशवाणीशी बोलताना बूस्टर डोस घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या...
‘‘मी कोविड काळामध्ये कोरोना लस पूर्ण केलेली आहे. व तिसरा पण बुस्टरचा डोस घेतलेला आहे. तरी आपण सर्वांनी काळजीपूर्वक तिसरा बुस्टरचा डोस घेणे. आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. सर्वांनी काळजीपूर्वक आपल्या सुरक्षेसाठी तिसरा बुस्टरचा डोस घेणे जरुरी आहे.’’
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ८३६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ७४ हजार ३६५ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर एक हजार २२४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख १४ हजार ४३३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ७५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १७, औरंगाबाद १६, बीड सात, लातूर सहा, तर परभणी जिल्ह्यातल्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
****
जालना रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या १०० फूट उंच ध्वजस्तंभावर काल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. शंभर फूट उंचीवर फडकणारा हा राष्ट्रध्वज ३० फूट लांब आणि २० फूट रूंद आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणात पा���्याची आवक वाढल्यानं आज सकाळी धरणाचे १८ दरवाजे तीन फुटानं उघडण्यात आले असून, ५६ हजार ५९२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. परिणामी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातल्या दारणा तसंच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे ३२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी पात्रात सोडलं जात आहे. पावसाचं प्रमाण पाहता, या विसर्गात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे भंडारादरा धरण पूर्ण भरलं आहे. सध्या धरणातून ११ हजार ३२५ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातलं निळवंडे धरणही ९० टक्के भरले असून, त्यामधून विसर्ग सुरु असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीला पूर आल्याने, अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नदीची पातळी धोक्याच्या खुणेपेक्षा तीन मीटरने वाढली आहे. यामुळे भंडारा-तुमसर राज्यमार्ग काल बंद झाला होता. भंडारा शहरातही अनेक भागात पुराचं पाणी शिरलं आहे.
****
धुळे शहरासह जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरु होती. धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातल्या अनेक गावात पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं, पिकांचं नुकसान होत आहे. अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे.
****
0 notes
Text
जळगाव न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती जगमलानी यांनी दिलेल्या निवेदन वर ' थोडे थोडे ' काम सुरु .
जळगाव न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती जगमलानी यांनी दिलेल्या निवेदन वर ‘ थोडे थोडे ‘ काम सुरु .
जळगाव न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती जगमलानी यांनी दिलेल्या निवेदन वर ‘ थोडे थोडे ‘ काम सुरु . प्रतिनिधी : एकीकडे जनतेच्या तक्रारी आणि दुसरीकडे स्वतः न्यायाधिशांनी अनुभवलेल्या समस्या याचा विचार करत, जळगाव न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमलानी यांनी स्वतः याची गंभीर दखल घेत न्यायालया तर्फे जिल्हाधिकारी आणि मनपा प्रशासनास नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण काय उपाय योजना केल्या आहेत आणि केल्या जाणार आहेत?…
View On WordPress
#&8216;#काम#जगमलानी#जळगाव#थोडे#दिलेल्या#निवेदन#न्यायालयाचे#बातम्या#मा.न्यायमूर्ती#मा.न्यायमूर्ती जगमलानी#यांनी#वर#सुरु
0 notes
Text
हनी ट्रॅप मधीत 'त्या' महीलेला न्यायालयीन कोठडी
हनी ट्रॅप मधीत ‘त्या’ महीलेला न्यायालयीन कोठडी
गौतम बचुटे/केज :- केज पोलीस ठाण्यात हनी ट्रॅपच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या महिलेस केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील केज, धारूर आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्यात हनी ट्रॅपच्या गुन्ह्यात केज पोलिसांच्या अटकेत असलेल्या महिलेस तिची पोलीस कोठडीची मुदत संपल्या नंतर केज पोलिसांनी केज न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी…
View On WordPress
0 notes
Text
#Ahmednagar #District Court करोना काळातही सर्व वकिलांनी सहकार्य करत चांगले काम केले आहे ; सर्व क्षेत्रात महिला प्रामाणिकपणे काम करत नेतृत्व करत आहेत : न्यायाधीश रेवती देशपांडे
#Ahmednagar #District Court करोना काळातही सर्व वकिलांनी सहकार्य करत चांगले काम केले आहे ; सर्व क्षेत्रात महिला प्रामाणिकपणे काम करत नेतृत्व करत आहेत : न्यायाधीश रेवती देशपांडे
अहमदनगर ः नगर जिल्हा न्यायालया मधील वकिलांच्या बारचे व महिला वकीलांचे खूप चांगले काम चालू असल्याने येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव पदाला प्राधान्य दिले. याठिकाणी न्यायिक काम करतांना खूप काही शिकण्यास मिळत आहे. करोना काळातही सर्व वकिलांनी सहकार्य करत चांगले काम केले आहे. सर्व क्षेत्रात महिला प्रामाणिकपणे काम करत नेतृत्व करत आहेत. यात महिला वकीलही मागे नाहीत. लॉकडाऊननंतर महिला वकिलांनी…
View On WordPress
#AHMEDNAGAR#AhmednagarCorporation#ahmednagarnews#Ahmednagar_District#District-court#Lawyers#MAHARASHTRA
0 notes
Photo
मराठा मोर्चा | चाकण मधे हिंसाचार करणार्या त्या आंदोलकांना अटक चाकण | पुण्याजवळील मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या चाकन परिसरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावून जाळपोळ करणार्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी दंगेखोरांना अटक केली असून त्यांना आज न्यायालया समोर हजर करण्याची संभावना आहे. सामाजिक शांतते साठी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. ३० जुलै रोजी मराठा आंदोलनाच्या मोर्चात भडकलेल्या हिंसाचारात एसटी महामंडळाच्या आणि पुणे शहर परिवहन विभागाच्या सहा बस जळून खाक झाल्या आहेत. तसेच अतुल भापकर हे पोलीस शिपाई हिंसाचाऱ्यांच्या हल्ल्यात कोम्यात गेले आहेत. चाकण मध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात मी जातीने लक्ष घालत असून हिंसाचाराचा तपास प्रगती पथावर आहे. हिंसाचार घडवणाऱ्या २२ लोकांची ओळख पटली असून त्यांचा आंदोलनाच्या ठिकाणी हिंसाचार भडकवण्यात सहभाग असल्याचे व्हिडिओ क्लिप व्दारे स्पष्ट झाले आहे. यापुढे चाकण औद्योगिक पट्ट्यात आणि शहरात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.
#मराठा आंदोलन#मराठा आरक्षण#मराठा क्रांती मोर्चा#मराठा मोर्चा#breaking news#daily news#maratha andolan#maratha arakshan#maratha kranti morcha#maratha morcha#maratha morcha news#pune news#pune police#sandip patil#sp sandip patil
0 notes
Text
हॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बाटली MRP चं बंधन नाही जास्त दराने विकू शकतात .
हॉटेल आणि रेस्टॉरंट पाण्याची बाटली MRP चं बंधन नाही जास्त दराने विकू शकतात ., हॉटेल आणि रेस्टॉरंट मिनरल वॉटर अर्थात बादली बंद पाणी आणि इतर खाण्याचे हवाबंद पदार्थ एमआरपीपेक्षा जास्त दराने विकू शकतात असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवर एमआरपी दराने विकण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायलयाने सांगितलं आहे. न्यायालयानुसार, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स सेवा पुरवतात आणि त्यांना लीगल मेट्रोलॉजी अॅक्ट अंतर्गत आणलं जाऊ शकत नाही. हॉटेल मालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ही बाब नमूद केली. द फेडरेशन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने (FHRAI) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे एफएचआरएआय विरुद्ध केंद्र सरकार अशी लढाई सुरु झाली होती. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितंल की, हॉटेल आणि रेस्टॉरंट फूड आणि ड्रिंक्स सर्व करतात, ते एकाप्रकारे सेवा पुरवतात. त्यामुळे हे एकत्रित बिलिंगसोबत जोडण्यात आलेला व्यवहार आहे आणि या गोष्टींवर एमआरपी रेटचा दबाव टाकला जाऊ शकत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने एफएचआरएआयविरोधात दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं होतं की, हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये प्री-पॅकेज्ड वस्तूंवर एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारणे लीगल मेट्रोलॉजी अॅक्टनुसार गुन्हा आहे. तसंच मिनरल वॉटर अर्थात बादली बंद पाण्यावर एमआरपीपेक्षा जास्त दर आकारल्यास दंड किंवा शिक्षा होऊ शकते. सुनावणीदरम्यान उपस्थित एका वकिलाने संगितलं की, 'हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये इतर अनेक सेवा पुरवल्या जातात. एमआरपीच्या उल्लंघना��ाठी कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नाही'. याआधी अधिका-यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये मिनरल वॉटरसारख्या गोष्टी एमआरपी दरानेच विकल्या पाहिजेत असं म्हटलं होतं. अन्यथा कारवाई केली जाईल अशी चेतावणी दिली होती. लीगल मेट्रोलॉजी एक्टच्या कलम-36 नुसार जर कोणी व्यक्ती छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीत एखादी वस्तू विकताना आढळल्यास त्याला पहिल्यांदा असा गुन्हा केल्यामुळे 25 हजाराचा दंड आकारला जाईळ, पुन्हा त्याने ही चूक केल्यास 50 हजाराचा दंड आणि पुनरावृत्ती करत राहिल्यास 1 लाखाचा दंड किंवा एक वर्षाचा तुरूंगवास अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.,,http://www.maharashtracitynews.com/the-bottle-of-hotel-and-restaurant-water-can-sell-mrp-at-a-higher-rate/
0 notes
Text
कणकवली नगरपंचायत ला जिल्हा न्यायालयाकडून "दिलासा"
कणकवली नगरपंचायत ला जिल्हा न्यायालयाकडून “दिलासा”
कणकवली नगरपंचायत च्या वतीने ऍड. राजेश परूळेकर यांनी पहिले काम कणकवली: शहरात 2004 पासून सुरू असलेल्या एका न्यायालयीन प्रकरणात कणकवली न्यायालया पाठोपाठ जिल्हा न्यायालयाने देखील कणकवली नगरपंचायत ला दिलासा देणारा निकाल दिला आहे. कणकवली नागवे रोड ते कणकवली – फौजदारवाडी मधील 3 मीटर रुंदीच्या पायवाटेवर केलेल्या अतिक्रमण प्रकरणी जिल्हा न्यायालयाने देखील नगरपंचायत च्या बाजूने निर्णय देत त्या पायवाटेवर…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 October 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
· राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.
· राज्यात पुन्हा काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना आवश्यक मदत तसंच त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
· अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्र सरकारनेही आर्थिक मदत करण्याची महसूल मंत्र्यांची मागणी.
· वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, राज्यात आशिष झांट्ये पहिला.
· राज्यात आणखी ११ हजार ४४७ कोविड बाधितांची नोंद, ३०६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
· मराठवाड्यात २८ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ७०६ रुग्णांची नोंद.
आणि
· नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेनं सुरुवात.
****
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. याचिकेत उल्लेख केलेले प्रसंग मुंबईत घडले आहेत. मुंबई म्हणजे सर्व महाराष्ट्र समजू नका असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना सुनावलं. दिल्लीतले वकिल ऋषभ जैन, गौतम शर्मा आणि विक्रम गेहलोत यांनी ही याचिका दाखल केली होती.
केवळ बॉलीवूडच्या अभिनेत्याच्या मृत्यूसारख्या, काही उदाहरणांवर विसंबून महाराष्ट्रात राज्य घटनेनुसार कारभार होत नसल्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काय काढला असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं याचिकार्त्यांना केला. यामागणीसाठी सर्वोच्च न्यायालया ऐवजी राष्ट्रपतींकडे जाण्याची सूचनाही त्यांनी याचिकाकर्त्यांना केली.
****
राज्यात पुन्हा काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गाफील न राहता नागरिकांना मदत करण्याचे तसंच आवश्यकतेनुसार ��्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी काल औरंगाबाद, पुणे, कोकण आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून पूरस्थितीचा आढावा घेतला. मदत पथकाकडून अनेक ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे, या स्थलांतरीत कुटुंबांची काळजी घेण्यात यावी. पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी गेल्यास त्यांना तिथे आवश्यक असणारी मदत पुरवण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी केंद्र सरकारनेही आर्थिक मदत करावी, अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यावर्षीच्या मान्सूननं आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती, तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला असून, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल, केंद्र सरकारने त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी, असं ते म्हणाले.
****
राज्यात अतिवृष्टीनं झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. ते काल सांगली जिल्ह्यातल्या मिरज, जत, कवठे महांकाळ, आटपाडी तसंच खानापूर तालुक्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलत होते. पंचनामे पूर्ण होताच सरकार शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल, असंही कदम यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनीही लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या सहा तालुक्यात चार दिवस सुरु असलेल्या पावसाने अक्षरशः पिके पाण्यात वाहून गेली आहेत, तर नदीकाठच्या गावशिवारातल्या सोयाबीनच्या गंजी पुरात वाहून गेल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचं श्रृंगारे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देवून वीज बिलमाफी, पिक कर्ज माफी सह पिकांची संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी, असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
तर, भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी, पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. युतीचं सरकार असताना, कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाईची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी, आता त्यांनीच पूर्ण करावी, असं ते म्हणाले.
****
ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी जनतेला कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी मास्क वापरण्या��ं, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचं त्याच बरोबर वेळोवेळी हात धुण्याचं आवाहन केलं आहे.
****
राज्यात ज्या भागात अतिवृष्टी झाली, त्या भागातल्या शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. बाधित शेतकऱ्यांना सरकारने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, असं ते म्हणाले. विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी नुकताच अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्यातल्या बाधित जिल्ह्यांना भेट देऊन तिथल्या परिस्थितीचे निवेदन सादर केल्याचंही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीटचा निकाल काल जाहीर झाला. यापरीक्षेत ओडीशातल्या शोएब आफताब यानं ७२० पैकी ७२० गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर दिल्लीच्या आकांक्षा सिंग हिनं द्वितीय स्थान मिळवलं आहे. आशिष ��ांट्ये हा राज्यात पहिला तर देशात १९ व्या स्थानावर आला आहे. तेजोमेय वैद्य, पार्थ कदम आणि अशोक चिल्लरगे यांनी पहिल्या ५० उमेदवारांमध्ये स्थान मिळवलं आहे. या परीक्षेत देशभरातून सर्वाधिक त्रिपुरा इथले ८८ हजार ८८९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर महाराष्ट्रातील ७९ हजार ९७४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी ११ हजार ४४७ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १५ लाख ७६ हजार ६२ झाली आहे. राज्यभरात काल ३०६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४१ हजार ५०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १३ हजार ८८५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १३ लाख ४४ हजार ३६८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ८९ हजार ७१५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ७०६ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात आठ बाधितांचा मृत्यू झाला तर २१७ नवे रुग्ण आढळले. बीड आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी सात बाधितांचा मृत्यू झाला, बीड जिल्ह्यात १२१ तर नांदेड जिल्ह्यात १०५ नवे रुग्ण आढळले. लातूर आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, लातूर जिल्ह्यात ११०, तर जालना जिल्ह्यात नव्या ७६ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, उस्मानाबाद जिल्ह्यात ५१ तर परभणीत १३ नव्या रुग्णांची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात आणखी १३ रुग्ण आढळले.
****
मुंबईत एक हजार ८२३ नवे रुग्ण आढळले तर ३७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात एक हजार ७२ रुग्ण आढळले तर ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात ४८२ नवे बाधीत आढळले तर १४ रूग्णांचा मृत्यू झाला. सांगली २३१, सातारा २६४, पालघर २२५, गडचिरोली ६३, सिंधुदुर्ग ३०, वाशिम ९२, अमरावती जिल्ह्यात ११९ नवे रुग्ण आढळले.
****
नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेनं सुरुवात होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ��ुळजापूर इथंही भाविकांशिवाय नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी तुळजापूर इथं येण्याचं टाळावं, असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे.
तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रौत्सव या वर्षी साधेपणानं साजरा करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने सर्व देवीजींच्या भक्तांना नम्र सूचना आहे, विविध जिल्ह्यांतून पायी चालत येणारे भाविक आहेत, देवीजींची मशाल घेऊन जाणारे भाविक आहेत त्यांना सुध्दा आमची नम्र विनंती आहे यावर्षी आपण जिल्ह्यामधे येऊ नये. देवीजींचे जे कुळाचार आहेत, नित्याचार आहेत केवळ त्यांची अंमलबजावणी यावर्षी आम्ही करणार आहोत. देवीजींची जी नित्यपूजा आहे आणि जे नित्य दर्शन आहे त्यासाठी आम्ही ऑनलाईन माध्यमातून मंदिराच्या वेबसाईटवरून दर्शानाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे.
मंदीर प्रशासनानं भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री तुळजाभवानी डॉट ओआरजी या संकेस्थळावर भाविकांना ऑनलाईन दर्शन घेता येईल.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाईत योगेश्वरी देवीची घटस्थापना पुजारी आणि देवल समितीच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत अध्यक्ष तहसीलदार संतोष रूईकर यांच्या हस्ते होत आहे. भाविकांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून दर्शन करता येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात माहूर इथं रेणुकादेवीची तसंच कोल्हापूरमध्ये अंबाबाईची घटस्थापनाही विधीवत पुजेनं केली जाणार आहे.
****
राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी जनतेला कोविड-19 पासून बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याचं, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचं त्याच बरोबर वेळोवेळी हात धुण्याचं आवाहन केलं आहे.
****
0 notes
Photo
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा आक्रमक..! कोल्हापूर : कोल्हापूर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थगिती देण्यात आली. यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 7 July 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ७ जुलै २०१८ दुपारी १.०० वा. **** मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या कोनशिलेनं अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री आज औरंगाबाद दौऱ्यावर असून, पोलिस आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. **** भारत आणि भूतान दरम्यान समान हिताच्या विषयांबाबत एकत्रितरित्या काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरींग यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत दोन्ही देशांदरम्यानचे द्वीराष्ट्रीय संबंध नव्या उंचीवर नेण्याबाबत एकमत झालं. भूतान हा भारताचे जवळचा शेजारी आणि एक मित्र राष्ट्र म्हणून त्यांच्या विकासकामांमध्ये सातत्यानं पाठिंबा देणार असल्याचं पंतप्रधानां��ी यावेळी स्पष्ट केलं. **** भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी स्थलांतर आणि व्हिसा प्रक्रिया आणखी मजबूत आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. परदेशी नागरिकांच्या व्हिसा, भारतातील सुरक्षित प्रवेश, नोंदणीबाबत केरळमधे कोची इथं आयोजित संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. **** देशात सट्टेबाजी आणि जुगार खेळण्याला कायदेशीर मान्यता देणं व्यवहार्य नसून, सट्टेबाजी आणि जुगार खेळण्याला पूर्णपणे बंदी करायला हवी अशी शिफारस विधी आयोगानं केली आहे. आयोगानं खेळांवर लावण्यात येणाऱ्या सट्ट्यांबाबत आपला अहवाल सरकारला सादर केला असून, यात जुगार आणि सट्टेबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता असून, यामुळे काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्यास मदत होईल असं म्हटलं आहे. **** काही खाजगी दूरचित्र वाहिन्यांच्या संकेतस्थळांवर दिशाभूल करणाऱ्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या निदर्शनास आलं असल्याचं, त्यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे. धुळे जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी आल्याची अफवा अशीच चुकीच्या आणि काहीही संबंध नसलेल्या छायाचित्रांच्या आधारे पसरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. माध्यमांकडून सरकारला जबाबदार वर्तनाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. **** नेपाळमध्ये अडकलेल्या १६० कैलास मानसरोवर यात्रेकरूंना हवाई मार्गानं बाहेर काढण्याचं काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे भाविक नेपाळ मधल्या सिमिकोट, हिल्सा आणि तिबेट मध्ये अडकले आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये नेपाळ मधल्या भारतीय दूतावासानं सुमारे चौदाशे भाविकांना बाहेर काढलं. **** कॉंग्रेस नेते खासदार शशी थरुर यांना, पत्नी सुनंदा पुष्करच्या मृत्यू प्रकरणी दिल्लीच्या न्यायालयानं नियमित जामिन मंजुर केला आहे. सत्र न्यायालयाच्या निर्देशानुसार थरुर यांना एक लाख रुपयाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रुपयाच्या जमानत रकमेवर हा जामिन देण्यात आला. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी आरोपी म्हणून थरुर आज न्यायालया समोर हजर झाले. त्यांना गेल्या गुरुवारीच अटकपूर्व जामिन मंजूर करण्यात आला होता. **** दुधाला अनुदान आणि रास्त दर मिळण्या बाबतचा निर्णय होत नाही तो पर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातल्या दूध संघाचं संकलन पूर्णपणे बंद ठेवणार आहे, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी यांनी दिला आहे. राज्यातल्या दूध उत्पादकांना शासना ��डून न्याय मिळावा यासाठी कोल्हापूर इथं संघटनेच्या वतीनं आयोजित दूध मेळाव्यात ते बोलत होते. राज्याच्या सर्व भागात जिल्हास्तरीय मेळावे घेतले जाणार असून, येत्या १६ जुलै पासून दूध विक्री बंद आंदोलन करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. कर्नाटक, गोवा, केरळ राज्यात गाईच्या दूध विक्रीवर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान सरकार कडून मिळतं, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही गाईच्या दूधावर अनुदान द्यावं, या मागणी साठी दूध विक्री बंद ठेवण्यात येईल, असं शेट्टी यांनी सांगितलं. **** आषाढी वारीसाठी राज्यातल्या विविध भागांतून निघालेल्या दिंड्या हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मार्गक्रमण करत आहेत. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं, तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र देवगड इथल्या दिंडीनंही काल पंढरपूर कडे प्रस्थान केलं. ज्ञानेश्वर महाराजांसह संत तुकाराम महाराजांची पालखीही आज पुण्यात दाखल होत आहे. पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज कुंडलपारगाव इथं मुक्कामी आहे. **** राज्यात विदर्भ, कोकण भागात आज सकाळ पासून जोरदार पाऊस सुरु असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्हयातल्या गांधारी, काळ, सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा फटका जिल्ह्यातल्या रस्ता आणि रेल्वे वाहतुकीलाही बसला असून, कर्जत-चौक नजिक रेल्वे रूळावर पाणी साचल्यानं नांदेडहून पनवेलला येणारी एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळवण्यात आली आहे. *****
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २ ० जून २०१८ सकाळी ११.०० वाजता.
जम्मू काश्मीर मध्ये आज पासून राज्यपालांचं शासन लागू झालं आहे. या बाबतची शिफारस राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कडे केली होती. सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी ती मंजूर केली. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा प्रश्न हाताळण्यात तसंच राज्यातली स्थिती सुधारण्यात मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती अपयशी ठरल्याचं सांगत भारतीय जनता पक्षानं सरकारचा पाठिंबा मागे घेतल्यानं मुफ्ती यांनी काल पदाचा राजीनामा दिला होता. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांशी नमो ॲपच्या माध्यमातून आज संवाद साधला. शेतकरी हे अन्नदाता असूनही, त्यांना त्यांच्या नशीबावर सोडून देण्यात आलं होतं, मात्र आता शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. बियाणां पासून उत्पादित शेतमालासाठी बाजारा पर्यंत, प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना मदत करण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरातल्या अनेक शेतकऱ्यां कडून त्यांच्या प्रगती बद्दल पंतप्रधानांनी या वेळी माहिती घेतली. **** चेन्नईतल्या एका विशेष न्यायालयानं, काळ्या धनाबाबतच्या तक्रारी संदर्भात, माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम, त्यांच्या पत्नी, पुत्र आणि स्नुषा यांना येत्या पंचवीस तारखेला न्यायालया समोर हजर होण्यासाठी समन्स जारी केलं आहे. या सर्वांच्या संयुक्त नावावर ब्रिटन मध्ये असलेल्या सुमारे साडेपाच कोटी रुपये मूल्याच्या संपत्तीचा खुलासा न केल्यानं आयकर विभागानं तक्रार दाखल केली आहे. **** ��ंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या उत्तराखंड मधल्या डेहराडून इथे होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कुलपती सी. विद्यासागर राव यांनी राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना उद्या विद्यापीठांमध्ये तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. **** राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन ४ जुलै ते २० जुलै या कालावधीत नागपूर इथं होणार आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. *****
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २४ जानेवारी २०१८ सकाळी ११.००
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत, व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि म्यांमार या तीन आशियान देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. उद्यापासून दिल्लीत सुरू होत असलेल्या भारत-आशियान स्मरणोत्सव परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आशियान देशांच्या नेत्यांसोबत एकूण नऊ द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. आशियान देशांचे नेते यावर्षीच्या गणराज्य दिनाचे प्रमुख पाहुणेही असणार आहेत. **** दावोस इथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या यंदाच्या वार्षिक परिषदेतलं वातावरण भारत केंद्रित झालं असतानाच महाराष्ट्रही त्यात अग्रेसर राहिला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विकासाची यशकथा जागतिक व्यासपीठावर मांडली असतानाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या, राज्यातल्या परिवर्तन प्रक्रियेच्या माहितीला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. जागतिक आर्थिक मंचाच्या जगातल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल दिली. **** कुलभूषण जाधव प्रकरणी भारत आणि पाकिस्ताननं आपापलं लेखी निवेदन देण्यासाठीची कालमर्यादा आंतरराष्ट्रीय न्यायालयानं निश्चित केली आहे. त्यानुसार भारतानं येत्या सतरा एप्रिलपर्यंत, तर पाकिस्ताननं येत्या सतरा जुलैपर्यंत आपलं यासंदर्भातलं निवेदन आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर मांडायचं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून याप्रकरणाचा निर्णय होईपर्यंत जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करू नये, असा आदेश या न्यायालयानं या आधीच दिला आहे. **** त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना आज जारी होणार असून, इच्छुक उमेदवारांना आज सकाळी अकरा वाजल्या पासून येत्या एकतीस तारखेपर्यंत आपली नामांकनपत्रं दाखल करता येणार आहेत. या राज्यातल्या साठ जागां साठी येत्या अठरा फेब्रुवारीला मतदान होणार असून त्याची मतमोजणी येत्या तीन मार्चला होणार आहे. **** राजीव गांधी हत्या प्रकरणातल्या सात दोषींची सुटका करण्याच्या, तामिळनाडू सरकारच्या मागणी बाबत, तीन महिन्यात निर्णय घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिला आहे. राज्य सरकारनं सुटकेचा निर्णय घेतला आहे मात्र त्याच्या अंमलबजावणी साठी केंद्रसरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे, असं प्रतिपादन या सात दोषींनी सर्वोच्च न्यायालया कडे केलेल्या याचिकेत केलं आहे. ***** ***
0 notes