#निधनाने
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 25 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २५ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
निवृत्त न्यायमूर्ती, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगांवकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. ८० च्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९९९ साली न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतरही साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत ते सक्रीय राहिले. वर्धा इथं झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदं त्यांनी भुषवलं होतं. चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने लेखणीच्या जोरावर समाजाला योग्य दिशा दाखवणारा एक सिद्धहस्त साहित्यिक आपण गमावला, अशी भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चपळगावकर यांना आदरांजली वाहिली.
राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, उद्या नवी दिल्लीतील कर्तव्य पथ इथं ७६ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं संचलन पाहण्यासाठी दहा हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. आमंत्रित पाहुण्यांमध्ये आपत्ती मित्र स्वयंसेवक, आशा कर्मचारी, शेतकरी उत्पादक संघटनांचे शेतकरी, पंतप्रधान किसान सन्मान निधी लाभार्थी, माय भारत स्वयंसेवक आणि इतरांचा समावेश आहे. पुण्याजवळील तळेगाव दाभाडे इथल्या नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रीतम अहिरे यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. हा अनुभव आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याची भावना अहिरे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना तसंच सर्व यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही संविधानाची ओळख करून देण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय तसंच विशेष सहाय्य विभागांतर्गत नांदेडच्या सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात उद्या प्रजासत्ताक दिनी संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात येणार आहे. तसंच नांदेड सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय अधिनस्त शासकिय वसतिगृह शासकिय निवासी शाळा इथं उद्या भारतीय संविधानावद्दल माहिती देणारे कार्यक्रमही आयोजीत करण्यात येणार आहेत.
नांदेड जिल्हा पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे. नियंत्रण कक्षातील पोलिस सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय अंबादासराव जोशी आणि जमादार दिलीप भोजूसिंग राठोड यांना पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी हे राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळ्यात दोघांनाही हे पदक प्रदान करण्यात येईल.
दुसऱ्या टप्प्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. याचा मोठा फायदा घरगुती ग्राहक आणि औद्योगिक ग्राहकांना होणार आहे, अशी माहिती महावितरणचे स्वतंत्र संचालक तसंच भाजप प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी काल दिली. मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सौर उर्जा प्रकल्पांमुळं आगामी पाच वर्षांत १०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर प्रति ८७ युनिटपर्यंत ५ रुपये तर १०१ ते ३०० युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे दर ११ रुपये ८२ पैसे प्रति युनिटपर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होतील, एक एप्रिलपासून महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्यानं मिळू लागतील असं त्यांनी यावेळी सांगितलं.
अहिल्यानगर इथं राज्य शासनाचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमानं न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालयात, उद्या २६ आणि परवा २७ ज��नेवारी रोजी दोन दिवसीय अहिल्यानगर ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्या सकाळी दहा वाजता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या ग्रंथोत्सवाचं उद्घघाटन होणार आहे.
0 notes
Text
माजी आमदार प्रदीप नाईक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली - महासंवाद
मुंबई, दि. 01: “किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या निधनाने धडाडीचा लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला आहे. त्यांच्या निधनाने किनवटच्या सामा���िक जीवनाशी घट्ट नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. किनवट विधानसभा मतदार संघाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. दिवंगत प्रदीप नाईक यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी…
View On WordPress
0 notes
Text
Pune : दैनिक भारत डायरीचे संपादक अशोक अग्रवाल यांचे दुःखद निधन
एमपीसी न्यूज – दैनिक भारत डायरीचे प्रतिष्ठित संपादक अशोक अग्रवाल (Pune)यांचे सोमवारी पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांचे वय सुमारे 60 वर्षे होते. त्यांच्या निधनाने हिंदी पत्रकारितेची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. अशोक अग्रवाल निःपक्षपाती, निर्भय आणि सचोटीवर आधारित पत्रकारितेसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अग्रवाल…
0 notes
Text
नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास
नांदेड : नांदेडचेकाँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली. त्यानंतर पहाटे ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वसंत चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह���यावर शोककळा पसरली आहे.
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/former-minister-rajni-satav-passed-away/
0 notes
Text
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीत, कला क्षेत्राची मोठी हानी - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १३ : स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनामुळे संगीत आणि कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. प्रभाताई यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन, भावगीत…
View On WordPress
0 notes
Text
अतुल बेडेकर यांच्या निधनाने प्रयोगशील उद्योजक हरपला: अजित पवार
https://bharatlive.news/?p=186537 अतुल बेडेकर यांच्या निधनाने प्रयोगशील उद्योजक हरपला: अजित पवार
मुंबई, ...
0 notes
Text
मडगावचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार वाल्मिकी फालेरोंचे निधन
साक्षेपी पत्रकार आणि इतिहास संशोधक म्हणून ओळख असलेले मडगावचे माजी नगराध्यक्ष वाल्मिकी फालेरो (71) यांचे आज गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. फालेरो यांच्यामागे पत्नी डेझी या आहेत.गुरुवारी दुपारी घरातच असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांकडून मिळाली. त्यांच्या निधनाची वार्ता शहरात काही मिनिटांतच पसरली. या निधनाने…
View On WordPress
0 notes
Text
डीआयजी विजय कुमार यांच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का
तामिळनाडू केडरमधील आयपीएस (DIG Vijay Kumar) अधिकारी सी. विजय कुमार यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. उपमहानिरीक्षकांसारख्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या आयपीएस विजय कुमार यांनी सर्व्हिस पिस्तुलने स्वत:वर गोळी झाडून घेतली. तामिळनाडू पोलिसातील कोईम्ब��ूर रेंजचे डीआयजी विजय कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मते, ते अतिशय शांत स्वभावाचे होते.…
View On WordPress
0 notes
Text
माजी जि.प. सदस्य रोहडा यांचा कार अपघातात मृत्यू
गोरेगाव, दि.19 : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत जानाटोला ते भंडगा दरम्यान आज शुक्रवारला सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास झालेल्या कार अपघातात माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया निवासी श्रीचंद रोहडा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. Death in a car accident श्रीचंद रोहडा हे तालुक्यातील कुऱ्हाडी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच या क्षेत्रातूनच ते जिल्हा परिषदेचे सदस्य बहुजन समाज पक्षाच्यावतीने राहिले. त्यांच्या निधनाने…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २७ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. डॉ सिंग यांचं काल रात्री निधन झालं, त्यांचा पार्थिव देह नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केलं, तसंच डॉ सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनीही डॉ सिंग यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन माजी पंतप्रधान डॉ सिंग यांना सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
डॉ मनमोहनसिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अफगाणिस्ताने माजी राष्ट्रपती हमीद करझई, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोम्मद नशीद, रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह, यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉ सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत, शोक व्यक्त केला आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अत्यंत शांत विनम्र मितभाषी व्यक्तिमत्व होते. त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली, या शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मकर संक्रांतीच्या सणादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा तिरूपती पूर्णा, नांदेड इरोड नांदेड, आणि तिरूपती अकोला तिरूपती या गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, गुंटूर- औरंगाबाद गाडी उद्या २८ तारखेला रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे परवा २९ तारखेला सुटणारी औरंगाबाद गुंटूर गाडीही धावणार नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, राज्यात अनेक जिल्ह्यात आजपासून तीन दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, अकोल, वाशीम जिल्ह्यात तुरळक पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर इथं उद्या २८ डिसेंबर पासून अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्यावतीने दोन दिवशीय मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होत आहे. दोन दिवस असणआऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य बाबुराव जाधव तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे असणार आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या आयसीसी चॅम्पियनशिप मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवशीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त आलं तेव्हा वेस्ट इंडिज संघाने १९ षटकात ३ खेळाडू बाद ८० धावा केल्या आहेत. तीन सामन्यांच्या या मालिकेतले दोन सामने भारताने जिंकले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावावर यजमान संघानं पकड मजबुत केली आहे. मेलबर्न इथं होत असलेल्या या सामन्यात, ऑस्ट्रेलिया संघानं आपल्या पहिल्या डावात ४७४ धावा केल्या आहेत. शेवटचं वृत्त हाती आली तेंव्हा भारतीय संघानं पहिल्या डावात २ बाद ८२ धावा केल्या आहेत. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
अग्नीवीर योजनेअंतर्गत सैन्यदलात कारकून तसंच सामान्य श्रेणीत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी बेळगावी इथल्या मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर इथं दोन जानेवारी २०२५ पासून नऊ जानेवारीपर्यंत भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वीरपत्नी, हुतात्मा सैनिकाचे भाऊ, माजी सैनिक, तसंच विशेष प्रावीण्यप्राप्त क्रीडापटूंसाठी हा मेळावा आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची या मेळाव्यात शारीरिक चाचणी तसंच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. साडे सतरा ते २१ वर्ष वयोगटातले युवक यासाठी पात्र असतील. सामान्य श्रेणीसाठीचा उमेदवार ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण तर कारकून श्रेणीसाठी ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं केलं आहे.
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात हवामान बदलामुळे भुईमुग पिकावर टीका रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा येत असल्याने रब्बीच्या भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज जिंतूर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
0 notes
Text
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
मुंबई, २६ डिसेंबर : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात…
View On WordPress
0 notes
Photo
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने पक्षाचे निष्ठावान आणि लढवय्ये नेते आज हरपले आहेत. आपल्या आजारपणातही कर्तव्यनिष्ठा प्रथम हे ध्येय त्यांनी जपले. राजकीय वर्तुळात त्यांची उणीव कायम जाणवत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.
0 notes
Text
भारत जोडो यात्रेत सेवादलाच्या कृष्णकुमार पांडेंचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
भारत जोडो यात्रेत सेवादलाच्या कृष्णकुमार पांडेंचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
नांदेड : भारत जोडो यात्रेच्या ६२ व्या दिवशी सकाळी एक दुःखद घटना घड���ी. सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच मध्यप्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रभारी कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पांडे यांच्या निधनाने काँग्रेसचा एक कट्टर कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पांडे यांच्या निधनाची…
View On WordPress
0 notes
Text
ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मींचा आधारवड हरपला - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मींचा आधारवड हरपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 15 : अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मींचा आधारवड हरपल्या���ी शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. रंगदेवतेचा वास असलेल्या नाट्यगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून हौशी व प्रायोगिक रंगभूमीची दीर्घकाळ सेवा श्री.मोरे यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेची स्थापना करून…
View On WordPress
0 notes
Text
अपघात नव्हे, निसर्गाच्या प्रकोपाने घाटात मृत्यू; सुस्वभावी शिक्षकाच्या निधनाने शाळा हळहळली
https://bharatlive.news/?p=90083 अपघात नव्हे, निसर्गाच्या प्रकोपाने घाटात मृत्यू; सुस्वभावी शिक्षकाच्या ...
0 notes