#नाट्य अभिवाचन
Explore tagged Tumblr posts
kokannow · 4 years ago
Text
'रातराणी' च्या अभिवाचनाने 'प्रलं'ना आदरांजली; नार्वेकरांनी केला एक नवा प्रयोग
‘रातराणी’ च्या अभिवाचनाने ‘प्रलं’ना आदरांजली; नार्वेकरांनी केला एक नवा प्रयोग
सिंधुदुर्ग :ज्येष्ठ नाटककार, कथाकार  प्र. ल. मयेकर यांच्या १८ ऑगस्टच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्गचे सुपुत्र नाट्यकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांच्या व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट  मुंबई संचालित “चला, वाचू या” मासिक अभिवाचन उपक्रमाच्या ५४ व्या पुष्पामध्ये  ‘रातराणी’ नाटकाचे साभिनय अभिवाचन करण्यात आले.  एक अत्यंत वेगळा प्रयोग या निमित्ताने नाट्यरसिकांना अनुभवता आला. हे अभिवाचन व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 August 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा. ****
दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत, अशी घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेच्या रुग्णालयामंध्ये गोविंदांना ��ि:शुल्क वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळकाला,  दहीहंडीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या उत्सवातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करूया, त्यातून येणारी समृद्धी, आनंद, समाधानाची लयलूट करूया, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. गोविंदा पथकांनी या उत्सवात सहभागी होताना पुरेशी काळजी घ्यावी, आयोजकांनीही सतर्कता बाळगून उत्सव साजरा करावा, असं आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
राज्यभर दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहे. राज्य सरकारने दहीहंडीसह सार्वजनिक सण निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोविंदांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
मुंबईत उंचच उंच मानवी मनोरे उभारण्याची स्पर्धा सकाळपासून सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानवी मनो-यांचे राजकीय कार्यक्रम विभागवार होणार आहेत. मुंबईसह ठाण्यातली दहीहंडी पथकंही सज्ज झाली आहेत. या पथकांकडून थरावर थर लावण्याचा सराव गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता. या दहिहंडी उत्सवात सुमारे दीड लाखाहून अधिक तरूण सहभागी होतात. या उत्सवासाठी पोलिसांनी आज मुंबईत पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
****
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं दिल्ली उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ शी संबंधित १० ठिकाणांवर आज छापे टाकले असून, यामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी सीबीआय तपासाची शिफारस केली होती. याप्रकरणी त्यांनी उत्पादन शुल्काच्या ११ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही केली होती.
दिल्ली सरकार लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचं काम करत असून, जो चांगलं काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो, आपल्या देशाचं हे दुर्देव आहे. याच कारणामुळे आपला देश प्रथम क्रमांकावर नाही, असं ट्वीट करत मनीष सिसोदिया यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.
सीबीआय चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करु, याआधीही छापे पडले असून, काही बाहेर आलं नव्हतं, यावेळीही काही मिळणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३१ लाख ५२ हजार ८८२ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०९ कोटी २७ लाख ३२ हजार ६०४ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या १५ हजार ७५४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५ हजार २२० रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख एक हजार ८३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागात यंदा अतिवृष्टी झाली असून, राज्यात १८ लाखांहून अधिक हेक्टर शेतीचं नुकसान झालं असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार जुलै मध्ये झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सुमारे दोन हजार ६०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असा प्रस्ताव कृषी विभागाने दिला असल्याचं पुणे कृषी संचाल��� विकास पाटील यांनी काल सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा आयोजनाची कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल दिली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाची ही स्पर्धा यंदा १५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. यासाठी १५ सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका मागवण्यात येत आहेत.
****
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या पाचोळा या कादंबरीला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुवर्ण महोत्सवी पाचोळा या सन्मान सोहळ्याचं औरंगाबाद इथं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या २० ऑगस्टला एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, रा. रं. बोराडे यांचा सत्कार, परिसंवाद, अभिवाचन, तसंच युवा ग्रामीण कादंबरीकारांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
****
हवामान
येत्या चार दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या तुलनेत मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी राहील असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
****
0 notes