#नवीन नेटफ्लिक्स चित्रपट
Explore tagged Tumblr posts
Text
हा छोटा सुपरस्टार देतोय आलिया भट्टला स्पर्धा, कॉपी केला गंगूबाई काठियावाडीचा डायलॉग
हा छोटा सुपरस्टार देतोय आलिया भट्टला स्पर्धा, कॉपी केला गंगूबाई काठियावाडीचा डायलॉग
व्हायरल व्हिडिओ: आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आलियाचा चित्रपटातील फर्स्ट लूक फार पूर्वीच समोर आला होता पण आता गंगूबाई काठियावाडीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘ढोलिडा’ हे पहिले गाणेही खूप धमाल करत असून आलिया भट्टच्या काही दमदार संवादांनी लोकांच्या ओठांवर ताव मारला आहे. या चित्रपटातील आलिया भट्टच्या लूकसोबतच तिच्या अॅटिट्यूडचीही खूप चर्चा होत आहे. त्यामुळे सोशल…
View On WordPress
#आलिया भट्ट#आलिया भट्ट आणि रणबीर कपूर#आलिया भट्ट ��ंगुबाई काठियावाडी#आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडीत लूक#आलिया भट्ट नवीन चित्रपट गंगुबाई काठियावाडी#आलिया भट्टचा नवीन चित्रपट गंगूबाई#एबीपी बातम्या#गंगुबाई काठियावाडी#गंगुबाई काठियावाडी आणि आलिया भट्ट#गंगुबाई काठियावाडी आलिया भट्ट#गंगुबाई काठियावाडी कथा#गंगुबाई काठियावाडी कलाकार#गंगुबाई काठियावाडी ट्रेलर#गंगुबाई काठियावाडी नेटफ्लिक्स#गंगुबाई काठियावाडी पूर्ण चित्रपट#गंगुबाई काठियावाडी रिलीज डेट#गंगुबाई काठियावाडी व्हायरल व्हिडिओ#गंगुबाई काठियावाडीसाठी आलिया भट्ट पगार#रणबीर कपूर#व्हायरल व्हिडिओ#व्हिडिओ व्हायरल
0 notes
Text
कोब्रा काईच्या यशानंतर, सोनीने नवीन कराटे किड फिल्मची घोषणा केली
कोब्रा काईच्या यशानंतर, सोनीने नवीन कराटे किड फिल्मची घोषणा केली
एक अजूनही पा��ून कोब्रा काई झलक. (शिष्टाचार: नेटफ्लिक्स) लॉस आंजल्स: हॉलिवूड स्टुडिओ सोनीने एक नवीन घोषणा केली आहे कराटे बालक चित्रपट आणि यूएस मध्ये 7 जून 2024 रोजी रिलीज करण्यासाठी तारीख दिली आहे. मनोरंजन न्यूज वेबसाइट द हॉलिवूड रिपोर्टरच्या मते, नवीन चित्रपट “मूळ कराटे किड फ्रँचायझीवर परतावा” म्हणून डब करण्यात आला आहे. सोनीच्या कोलंबिया पिक्चर्स बॅनरमधून आलेल्या या प्रकल्पाशी कोणतेही कलाकार आणि…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 November 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
· उत्पादन आणि निर्यातीत वाढ करण्यासाठी दहा क्षेत्रांना उत्पादन आधारित लाभ लागू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता.
· कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रानं घेतलेल्या निर्णयांबद्दल, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून राज्याची प्रशंसा.
· पत्रकार अर्णव गोस्वामी तसंच अन्य दोघांना अंतरिम जामीन मंजूर.
· राज्यात आणखी चार हजार ९०७ तर मराठवाड्यात ४३९ नवीन कोविड बाधितांची रुग्णांची नोंद.
आणि
· माता पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ३० टक्के वेतन माता पित्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा लातूर जिल्हा परिषदेचा निर्णय.
****
उत्पादन आणि निर्यातीत वाढ करण्यासाठी दहा क्षेत्रांना उत्पादन आधारित लाभ लागू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही ब���ठक झाली. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर, बातमीदारांना ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत पाच वर्षात जवळपास दोन लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. अडचणीत सापडलेल्या वाहनांचे सुटे भाग आणि वाहन उद्योगाला ५७ हजार कोटी रुपयांचे लाभ देण्यात येणार आहेत. याशिवाय रसायने, औषध निर्मिती, खाद्यपदार्थ निर्मिती, दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनं, या उद्योगांना केंद्र सरकार मदत करणार आहे. या योजनेनुसार केंद्र सरकार संबंधित उद्योगांना अतिरिक्त उत्पादन करण्यास प्रोत्साहन, तसंच स्वदेशी उत्पादन निर्यात करण्यासाठी परवानगी देणार आहे. यामुळे उत्पादन आणि निर्यातीबरोबरच देशात रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ - फिक्कीनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रानं घेतलेल्या निर्णयांबद्दल, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी राज्याची प्रशंसा केली आहे. देशातल्या विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतला. कोरोना नियंत्रणासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणं, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर तसंच मास्कच्या दरांवर नियंत्रण, खासगी रुग्णालयातल्या ८० टक्के खाटा राखीव ठेवणं, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणं, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवणं, यांसारखे चांगले आणि अभिनव निर्णय महाराष्ट्रानं घेतले आहेत, जे अन्य राज्यांसाठी उपयुक्त ठरतील, असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासह सात राज्यांचा आढावा घेतला.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर दिवाळीच्या शुभेच्छा देताना सणाचा जरूर आनंद घ्या, पण आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवा असं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आपण स्वत: देखील केवळ सामाजिक संपर्क माध्यमं, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्याघरी हा सण साजरा करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या सात- आठ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचं पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यांनंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक ��रण्यात आलेले पत्रकार अर्णव गोस्वामी तसंच अन्य दोघांना सर्वोच्च न्यायालयानं काल अंतरिम जामीन मंजूर केला. प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. त्यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर काही तासांतच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान, अलिबाग इथं न्यायालयीन कोठडीत असताना अर्णब गोस्वामी यांना मोबाईल पुरवणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. हे कर्मचारी कैद्यांना मोबाईल पुरवत असल्याचं समोर आल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. औरंगाबादचे विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
केंद्र सरकारनं डिजिटल आणि सर्व ‘ऑनलाईन’ माध्यमं, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत आणण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सर्व प्रकारचे ‘ऑनलाईन’ चित्रपट, दृक श्राव्य कार्यक्रम, बातम्या आणि चालू घडामोडींवर आधारीत कार्यक्रमांचा समावेश आहे. सध्या ‘नेटफ्लिक्स’, ‘हॉटस्टार’, ‘प्राईम व्हिडिओ’, यासारख्या वाहिन्या आणि विविध प्रकारचे ‘ऑनलाईन’ वृत्त देणारे `पोर्टल` कार्यरत आहेत. या सर्व वाहिन्या यापूर्वी कोणत्याही कायदा किंवा स्वायत्त संस्थेअंतर्गत येत नव्हत्या.
****
रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते ‘पाणीवाले बाबा’ राजेंद्रसिंह राणा यांच्या तरुण भारत संघ संस्थेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या ‘पर्यावरण संरक्षण सन्मान २०२०’ या पुरस्कारासाठी, राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांची निवड करण्यात आली आहे. येत्या २५ तारखेला राजस्थानातल्या भीकमपुरा इथल्या तरुण आश्रमात पाशा पटेल यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार घोषित झाल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना पाशा पटेल म्हणाले –
मला पर्यावरण संरक्षणाचा पुरस्कार प्राप्त झाला, त्याच्या मागची एकच गोष्ट आहे की, पृथ्वीवरची झाडांची संख्या कमी झालेली आहे, ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून या क्षेत्रामधे मी प्रचंड वाहून घेतलेलं आहे. मी टीश्यूकल्चर लॅब काढली, फक्त बांबुची लागवड करण्यासाठी. आणि गोदावरी आणि मांजरा या दोन नद्यांच्या खोऱ्यामधे बावीसशे पंचवीस किलोमीटर लांबी आहे. या नद्यांच्या कडेला आणि शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतकऱ्याच्या शेतामधे मला बांबुची लागवड करून पर्यावरण रक्षणाचं काम करायचं आहे. या कामामधे मी झपाटल्यामुळे मला हा पुरस्कार मिळालेला आहे.
****
अंबाजोगाई इथल्या मानवलोक संस्थेचे कार्यवाह तथा सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया यांना भारत सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या ‘जल योद्धा’ या राष्ट्रीय पुरस्कारानं काल सन्मानित करण्यात आलं. पश्चिम विभागातल्या जल संधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते अनिकेत लोहिया यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची कोणतीही मदत पोहचली नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उद्या शुक्रवारी चुन भाकर आंदोलन करणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणार्या या आंदोलनात भाजप आणि किसान मोर्चा, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे देतील, चुन भाकर खातील आणि तहसीलदार तसंच जिल्हाधिकारी यांनाही चुन भाकर खायला देतील. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई आणि कर्जमाफी द्यावी, किसान क्रेडीट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, रासायनिक खते तसंच बियाणांचा रास्त दरात पुरवठा करावा यांसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे.
****
दिवाळीच्या सणाला आजपासून वसुबारसेनं सुरुवात होत आहे. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते.
****
राज्यात काल आणखी चार हजार ९०७ कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या सतरा लाख ३१ हजार ८३३ झाली आहे. काल १२५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४५ हजार ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल नऊ हजार १६४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत पंधरा लाख ९७ हजार २५५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ८८ हजार ७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक २३ शतांश टक्के तर मृत्यू दर दोन पूर्णांक ६३ शतांश टक्के असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.
****
मराठवाड्यात काल आठ कोविडबाधितांचा मृत्यू झाला, तर नव्या ४३९ रुग्णांची नोंद झाली.
बीड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ११९ रुग्ण आढळून आले. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात नव्या १२६, जालना ५८, उस्मानाबाद ३०, तर नांदेड जिल्ह्यात नव्या २८ रुग्णांची भर पडली. लातूर जिल्ह्यात ६४, परभणी जिल्ह्यात १८, तर हिंगोली जिल्ह्यात काल केवळ दोन नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईत काल आणखी एक ��जार ६९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर २२ ��णांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ५७३ नवे रुग्ण, तर १६ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ४४१ रुग्ण आढळले, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात २४३, सोलापूर २०२, सातारा २०१, गोंदिया १०५, गडचिरोली आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी ५८, यवतमाळ ५३, बुलडाणा ४९, सांगली ४१, जळगाव ३७, वाशिम ३३, धुळे २५, नंदुरबार २२, रत्नागिरी १२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ११ रुग्णांची नोंद झाली.
****
माता-पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातील ३० टक्के वेतन माता पित्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेनं घेतला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत काल हा निर्णय घेण्यात आला.
****
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काल १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर, वंचित बहुजन आघाडीचे नागोराव पांचाळ, रिपब्लिकन सेनेचे अतुल कांबळे, प्रहार जनशक्तीचे सचिन ढवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसंच ईश्वर मुंडे, संजय तायडे, सिद्धेश्वर मुंडे, कृष्णा डोईफोडे, विलास जगदाळे, रोहीत बोरकर, आशिष देशमुख, दिलीप घुगे, रमेश पोकळे, रमेश कदम यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क वापरणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकांत सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राधेश्याम कुलकर्णी यांनी केलं आहे.
****
राज्यात सध्या पक्षी सप्ताह साजरा केला जात असून या निमित्त औरंगाबाद जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांनी दिली. याअंतर्गत जायकवाडी पक्षी अभयारण्याचा अभ्यास केला असता, इथं एकूण १९० प्रकारच्या पक्षी प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यामध्ये ११० प्रजाती या पाणपक्षी आणि ८० प्रजाती या झुडुपांवरील असल्याचं त्यांनी सांगितलं. यात १२० स्थानिक पक्षी आहेत तर ७० पक्षी हे उत्तर भारत, तिबेट, युरोप, नेपाळ, चीन, रशिया आणि सायबेरीया इथले असल्याची माहितीही, त्यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. विविध उपाय योजना राबवून जिल्ह्यात या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९६ पूर्णांक ५२ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर केवळ एक पूर्णांक सहा टक्के आहे. जिल्ह्यात बाधीत रुग्णांची संख्या गेल्या आठवडाभरापासून १०० पेक्षा कमी झाली आहे. आज तर केवळ दोनच रुग्ण जिल्ह्यात आढळले असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या केवळ ८५ झाली आहे. विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यात कोरोना रोगावर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे. अनेक भागांमधे कोरोनाचे रुग्ण आढळले नसल्याने नागरिकांनीही आता सुटकेचा श्वास सोडला आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी, रमेश कदम, हिंगोली.
****
नांदेड जिल्हा परिषदेतल्या सर्व संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ देण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी जिल्हा परिषदेत पेन्शन कक्षाची स्वतंत्र स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुच्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. राज्य शासकीय निमशासकीय आणि जिल्हा परिषद वाहन चालक कर्मचारी संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांचं निवेदन काल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलं, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
****
लातूर जिल्ह्यात दिवाळी उत्सवानिमित्त जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यावर्षीची दिवाळी साध्या घरगुती स्वरुपात साध्या पद्धतीनं साजरी करत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा, या उत्सवा दरम्यान सार्वजनिक उपक्रमांचं आयोजन केल्यास त्याचं ऑनलाईन सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे प्रसारण करावं असं या संदर्भातल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये किती ताकद आहे ते पहा
या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये किती ताकद आहे ते पहा
नवीनतम चित्रपट प्रदर्शित पुनरावलोकन: कॉमेडी, रोमान्स आणि क्राइम थ्रिलर चित्रपट घेऊन मनोरंजनात भर घालण्यासाठी या आठवड्यात अनेक स्टार्सचे मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या सस्पेन्सने भरलेल्या चित्रपटांमध्ये तुम्हाला प्रत्येक फ्लेवरचा स्वभाव पाहायला मिळेल. होय, दीपिका पदुकोणपासून ते राजकुमार रावपर्यंतचे मोस्ट अवेटेड चित्रपट या आठवड्यात रिलीज झाले आहेत. आणि अशा परिस्थितीत तुम्ही कोणता चित्रपट…
View On WordPress
#amazon prime#अनन्या पांडे#अभिनंदन#ऍमेझॉन प्राइम#गेहरायान#गेहर्यान#चित्रपट पुनरावलोकन#दीपिका पदुकोण#नवीन चित्रपट#नाईल वर मृत्यू#नेटफ्लिक्स#भूमी पेडणेकर#राजकुमार राव#वाढाई करा#सिद्धांत चतुर्वेदी
0 notes