Tumgik
#दुर्घटनेत
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या घरी बॉम्बस्फोट; दुर्घटनेत दोघांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या घरी बॉम्बस्फोट; दुर्घटनेत दोघांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या घरी बॉम्बस्फोट; दुर्घटनेत दोघांचा मृत्यू नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या घरी रात्री उशिरा बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नसल्यचे पोलिसांनी म्हटले आहे. मेदिनीपूरच्या भूपती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुन नगर भागात ही घटना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 18.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून सुरुवात
पर्यावरण रक्षणासाठी राज्याच्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल, मुख्यमंत्र्यांचा वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमकडून आज सन्मान
मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
दहा दिवसीय गणेशोत्वाची सांगता, धुळे-नाशिक इथं दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू
आणि
आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताला पाचवं अजिंक्यपद
सविस्तर बातम्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. एनपीएस वात्सल्य च्या नवी दिल्ली येथील उद्‌घाटन सोहोळ्याअंतर्गत देशभरात जवळपास 75 ठिकाणी एकाच वेळी असा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही ठिकाणे सहभागी होतील आणि त्या ठिकाणी नवीन अल्पवयीन सदस्यांची पीआरएएन कार्ड देऊन नोंदणी केली जाईल.
****
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमच्या वीस देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंद��� यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन काल सर्वत्र साजरा झाला. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. निजाम आणि रझाकारांच्या अत्याचारांवर मात करत, एकजुटीनं लढलेल्या मराठवाड्यातील जनतेच्या संघर्षाचं स्मरण करत असल्याचं शाह यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम काल दिवसभर पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे चालली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले...
गेल्या वर्षी आम्ही राज्य मंत्रीमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला घेतली. आणि ४५ हजार कोटी पेक्षा जास्त काम आणि प्रकल्प सुरू केले. १६ सष्टेंबर २०२३ ला २९ निर्णय व २६ घोषणा करण्यात आल्या. यापैकी २९ हजार कोटीची कामे पूर्णत्वाकडे चालली आहेत. उरर्वरित काम प्रगती पथावर आहेत. हे फक्त कागदावर ठेवलेल नाही, तर यांची अंमल बजावणी सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विकासकामांच्या दाव्याला विधान परिषदेतले विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आव्हान दिलं आहे. पूर्ण झालेल्या कामांची मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर करावी असं, दानवे यांनी म्हटलं आहे. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाची गती पाहता, पुढील १० वर्ष मराठवाड्याला पाणी देण्याचा सरकारचा मनोदय दिसत नसल्याची, गंभीर टीका दानवे यांनी केली.
****
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध विकासयोजनांच्या कामांचं भूमिपूजन केलं. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय- घाटीतील सुपर स्पेशालिटी विभागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करुन डॉक्टरांशी संवाद साधला. निवासी डॉक्टरांसाठी आवश्यक सोयीसुविधा उभारणीसाठी पुरेसा निधी दिला जाईल,  सुरक्षेबाबतही शासन डॉक्टरांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 'चिठ्ठीमुक्त घाटी' या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी  रुग्णालय प्रशासनाचं कौतुक केलं.
****
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पालकमंत्री सावे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
****
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.  हुतात्मा चौक इथंल्या स्मारकास २१ तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी केलेल्या भाषणात शेतकरी आणि नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुंडे यांनी नमूद केलं.
****
परभणी, हिंगोली,नांदेड, धाराशिव आणि लातूर इथं शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं..
****
केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या स्‍वच्‍छता ही सेवा पंधरवड्याला कालपासून प्रारंभ झाला. नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रांगणात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते या मोहिमेचं काल उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. गावात स्वच्छता राखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून, येत्या पंधरवड्यात या मोहिमेला गती देण्यासाठी गाव स्तरावर स्‍वच्‍छता विषयक विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्‍यात आलं आहे.
****
दहा दिवसीय गणेशोत्सवाची काल सांगता झाली. ठिकठिकाणी दुपारपर्यंत घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. दुपारनंतर सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीपाठोपाठ शहरातल्या मोठ्या गणपतींनी विसर्जनासाठी प्रस्थान ठेवलं. शहरात आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं दिसून आलं. ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत लहान मोठ्या वाहनांवर आरूढ होऊन आलेल्या गणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
नांदेड, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात श्री गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. 
****
श्रोते हो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. अमेरिकेत वॉशिंग्टन प्रांतात रेडमण्ड इथं वॉशिंग्टनच्या राजाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गेली दहा वर्ष तिथं राहणारे निशांत बिंदू यांनी याबाबत अधिक माहिती दिली...
लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनीच ही मूर्ती घडवली आणि ती मूर्ती समुद्रामार्गाने अमेरिकेत आणण्यात आली असं आम्हाला सांगण्यात आलं. अतिशय सुंदर आणि भव्य अशा या मूर्तीची रेडमंड इथं अतिशय उत्साहात स्थापना करण्यात आली. शेकडोंच्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत भारतीय अतिशय उत्साहात आरती केली याचं सुंदर दृश्य मी पाहिलं. ढोल ताशांच्या गजरात, लेझीम, फुगड्या असे पारंपारिक कलाप्रकारही इथं सादर करण्यात आले. या अतिशय भव्य उत्सवात सामील होताना आपला भारत देश इथंही आपल्यात वसत असल्याची भावना निर्माण झाली.
****
धुळे जिल्ह्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये ट्रॅक्टर खाली आल्यानं तीन बालकांचा मृत्यू झाला. धुळे शहराजवळ असलेल्या चितोड गावात ही घटना घडली. इतर सहा जण या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
नाशिकजवळील पाथर्डी इथंही नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला तर अन्य एका घटनेत चुंचाळे गावाजवळ एक जण डोहात बुडाला असून त्याचा शोध सुरु असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****
आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आहे. चीनमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या काल दुपारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारतानं चीनचा एक शून्य असा पराभव केला. जुगराजसिंह याने या सामन्यातला एकमेव गोल करत, भारताला विजय मिळवून दिला. भारतानं हे अजिंक्यपद सलग दुसऱ्या वर्षी तर एकूण पाचव्या वेळेस जिंकलं आहे.
****
हिंगोली जिल्हा दिव्यांगमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देशातील आकांक्षित तालुक्यात दिव्यांगांना साहित्य वाटप केलं जात आहे, या अंतर्गत काल हिंगोली इथं झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी गोयल बोलत होते.
****
अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीबाबत आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला निश्चितपणे जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असं ते यावेळी म्हणाले.
****
नांदेड इथं काल स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांनी  गोदावरी बाग-क्रिकेट स्टेडियम, रेल्वे विभागीय कार्यालय  इथं रेल्वे अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सामुहिक वृक्षारोपण करण्यात आलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तेर इथल्या त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी केली. आपण सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामासाठी दोन कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकला, अशी माहिती पाटील यांनी  दिली.
****
0 notes
nashikfast · 11 months
Text
शॉर्ट सर्किटमुळे गोदामाला आग लागल्याने "इतक्या" जणांचा मृत्यू
पुणे : शॉर्ट सर्किटमुळे गोदामास आग लागून ३ वर्षांच्या चिमुकल्यासह त्याच्या आईचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. ७) नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे घडली. दुर्घटनेत प्रिन्स राजभर (वय ३), शकुंतला राजभर (वय ३५) यांचा मृत्यू झाला आहे. वळपाडा येथील पारसनाथ कंपाऊंड येथील पहिल्या मजल्यावर टेक्सराईज कापसापासून उशा बनवणारी शेजल इंटरप्रायझेस…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
जेवणासाठी थांबले अन् घात झाला, भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; 60 ते 70 लोक दबल्याची भीती
भिवंडी : भिवंडीत अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. भिवंडीतील वलपाडा येथे एक तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, इमारतीखाली 60 ते 70 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशम दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदत कार्यास सुरुवात केली आहे. इमारतीचा ढिगारा उपसला जात असून त्याखालून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nbi22news · 1 year
Video
youtube
#nbinewsmarathi: पारस येथील दुर्घटनेत 7 भाविकांचा आणि मृत्यू 37 जण जखमी
0 notes
mhlivenews · 2 years
Text
बल्लारपूर रेल्वेस्थानक दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
बल्लारपूर रेल्वेस्थानक दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
मुंबई दि.२८- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा आज केली आहे. याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
बल्लारपूर रेल्वेस्थानक दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
बल्लारपूर रेल्वेस्थानक दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
मुंबई दि.२८- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा आज केली आहे. याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे…
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
📍
*पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत जवळपास 145 लोकांचा मृत्यू झाला आहे, भाजपाची लोक हा व्हिडिओ टाकून आपल्या सरकारचे पाप झाकण्याचां केविलवाणा प्रकार करीत आहेत, हा व्हिडिओ टाकून सांगत आहेत की पुलावर काही लोक मस्ती करत होते आणि पुलावर येणाऱ्यांची संख्या जास्त होती.*
मग माझे त्या बीजेपीच्या अंधंभक्तांना विचारणे आहे की, मग तुम्ही पुलावरच बोर्ड लावायला हवा होता की, फक्त चार माणसंच या पुलावर जाऊ शकतात कारण आम्ही भ्रष्टाचार करून तो बनविला असल्याने त्याच्यात क्वालिटी नावाचा प्रकार नाही आणि तुम्ही मस्ती कराल तर तो पूल कागदाच्या पूलासारखा सहज पडू शकतो, त्यामुळे या फुलावर मस्ती करणे आणि चार लोकांपेक्षा जास्त लोकांना जाण्यास मनाई आहे, आत मूर्ख लोक आता त्या बळी गेलेला लोकांना काही लाख रुपये देण्याची घोषणा करतील आणि आपण आपले कर्तव्य कसे प्रामाणिकपणे निभावले याचा आव आणतील.
*परंतु प्रश्न येथे हा आहे पूल तुटलाच कसा? तो ज्या कॉन्ट्रॅक्टरने बनवला त्याने बीजेपीच्या कोणकोणत्या नेत्याला किती कमिशन दिले? हे सर्व आता उघडकीस आले पाहिजे, परंतु ते पाप उघडकीस येणारही नाही? कारण आता चौकशी समिती, पोलीस आणि सरकार हे त्यांचेच आहे ? त्यामूळे सत्य बाहेर येण्यासाठी गुजरातच्या लोकांनी एकत्र येत, कमिशनखोर सर्व नेत्यांना आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला फासावर लटकविण्यासाठी मोठ्या संख्येने आंदोलन करून तेथील बहिऱ्या सरकारला वठणीवर आणले पाहिजे,कारण जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत भीक घेणारे आणि निकृष्ठ बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर रोज पैदा होत राहतील.*
*- अॅड.डॉ.राजेंद्र गुंडलवार, संघटनमंत्री, आम आदमी पार्टी
0 notes
Text
रशियात विमान दुर्घटनेत १० जण ठार; पुतीन विरोधात बंड पुकारणारे प्रिगोझीन देखील विमानात
https://bharatlive.news/?p=126373 रशियात विमान दुर्घटनेत १० जण ठार; पुतीन विरोधात बंड पुकारणारे प्रिगोझीन ...
0 notes
airnews-arngbad · 12 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 08 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
उत्तर प्रदेशातील लखनऊ ट्रांसपोर्ट नगर इथं एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आज आठवर पोहचली आहे, तर २८ जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. शोध आणि बचाव कार्यादरम्यान, तीन नवीन मृतदेह सकाळी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. काल दुपारी पावणे पाच वाजता ही इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली काही लोक दबले होते. चारच वर्षांपूर्वी उभारलेल्या या इमारतीत काही कामं सुरु असताना त्यावेळी ही दुर्घटना घडली.
****
मुख्यमंत्री योजनादूत द्वारे राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागं एक अशा एकंदर पन्नास हजार योजनादूतांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी या योजनादुतांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं  करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे एकंदर पाचशे स्टार्टअप्स् अर्थात नवोद्योगांना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेची अधिक माहिती www.msins.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या दहा जिल्ह्यांत खरीपातील जवळपास साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं पावसामुळं मोठं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, ज्वारी पिकांचं आणि कांदा, भाजीपाल्याचंही नुकसान झालं आहे.
अतिपावसामुळं पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी पीक विमा कपंनीला कळवायला हवं, जेणेकरून पंचनामे करण्याच्या कामासही गती येईल, असंही आवटे यांनी म्हटलं आहे.
****
निरपेक्ष अशा सेवाभावानं इतरांसाठी जगल्यास प्रगत समाजाची निर्मिती होईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं  आहे. काल मुंबई इथं धरमपूरच्या श्रीमद राजचंद्र मिशन संस्थेतर्फे आयोजित ‘पर्युषण महोत्सव २०२४ ’महोत्सवात ते बोलत होते. इतरांसाठी जगणं या भारतीय तत्त्वज्ञानातल्या शाश्वत विचाराला अनुसरुन भारतानं इतर राष्ट्रांना कोविडची मोफत लस वितरित केल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी विकास कार्यावर विशेष लक्ष देण्यासाठी राजभवनातला ‘आदिवासी कक्ष’ पुनरूज्जीवित करण्यात आला असून राज्यातील साडे नऊ टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपण कार्य करणार असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले .
****
अकोला शहरात डिजे आणि लेझर किरणांचा प्रकाशझोत म्हणजेच लेझर बीम फोकसच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणावं, अशी मागणी अकोल्यातील ज्येष्ठ  नागरिक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
डीजेच्या अनियंत्रित वापरामुळे ज्येष���ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुलं, गर्भवतींसह सर्वांनाच घातक परिणाम भोगावे लागत आहेत. तसंच लेझर बीम फोकसमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम जाणवत असल्याच्या या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह  कोकण आणि विदर्भात आगामी १८ तासांत तुरळक ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर मराठवाड्याच्या परभणीसह धाराशिव जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे.
****
फ्रान्सच्या पॅरिस इथं आयोजित अपगांसाठीच्या जागतिक क्रिडा पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. स्पर्धेच्या इतिहासात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली असून ते समारोप कार्यक्रमात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील.
0 notes
kheliyad · 4 years
Link
नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचा NBA | दिग्गज खेळाडू कोबे ब्रायंट Kobe Bryant | याचा रविवारी, २६ जानेवारी रोजी हेलीकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आणि संपूर्ण क्रीडाविश्वाला धक्का बसला. या अपघातात कोबेची १३ वर्षांची मुलगीही मृत्युमुखी पडली. वयाच्या ४१ व्या वर्षी एका खेळाडूच्या वाट्याला असा मृत्यू यावा, हेच अनेकांना धक्का देणारे आहे. भारतीय क्रीडाविश्वात कोबेविषयी फारच कमी जणांना माहिती असेल. त्याची कहाणी हळवीही आहे आणि त्यात शोकांतिकाही आहे... मनाला धक्का देऊन जाणारं त्याचं आयुष्य उलगडून सांगण्याचा हा प्रयत्न...
1 note · View note
rebel-bulletin · 1 year
Text
हॉट एअर बलूनला आकाशात गेल्यावर आग लागली; त्यानंतर बलूनमधील प्रवाशांनी उंचावरूनच…
पहिल्यांदाच असं घडलं… व्हिडीओ बघा…   मेक्सिको : हवेत उडणाऱ्या हॉट एअर बलूनला आग लागल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग लागल्यानंतर बलूनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बलूनमधून उंचावरूनच उडी घेतली. या दुर्घटनेत एक मुलगाही भाजला आहे. ही घटना अमेरिकेजवळच्या मेक्सिकोमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पहिल्यांदाच आकाशात गेलेल्या हॉट एअर बलूनला आग लागल्याने एकच खळबळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
VIDEO: सोलापुरात मालगाडीचं इंजिन रुळावरुन घसरुन थेट शेतात घुसलं, पाहा व्हिडीओ
VIDEO: सोलापुरात मालगाडीचं इंजिन रुळावरुन घसरुन थेट शेतात घुसलं, पाहा व्हिडीओ
सोलापुरातील करमाळा तालुक्यात मालगाडी रुळावरुन घसरुन दुर्घटना घडली आहे. करमाळा तालुक्यातील केम येथे हा रेल्वे अपघात घडला. ही मालगाडी सोलापूर येथून पुणे येथे जात असताना दुर्घटना घडली आणि इंजिन थेट शेतात घुसलं. पहाटे ३ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट वाहून नेणाऱ्या मालगाडीचं इंजिन आणि दोन डबे रुळावरुन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
नगर ब्रेकिंग..अन ' त्या ' दुर्घटनेत शेतकरी पती पत्नीचा मृत्यू
नगर ब्रेकिंग..अन ‘ त्या ‘ दुर्घटनेत शेतकरी पती पत्नीचा मृत्यू
नगर जिल्ह्यात सध्या पावसाचे वातावरण असून शेतीची कामे देखील वेगाने सुरू आहे मात्र याच दरम्यान जमिनीत ओलसरपणा असल्याने विद्युत प्रवाहाने शॉक बसून जीविताला देखील धोका होत असल्याचे प्रकार उघडकीला येत आहेत. अशीच एक घटना शेवगाव तालुक्यात उघडकीला आलेले असून विद्युत प्रवाह एका मशीनमधून बसल्याने एका शेतकरी पती-पत्नीचा 23 तारखेला दुपारी शॉक लागून मृत्यू झालेला आहे. सदर घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल - नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
◼️बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत ◼️जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय ��र्च शासन करणार ◼️ अपघातातील प्रत्येक जखमीची केली आस्थेवाईकपणे विचारपूस ◼️सर्वांना वेळेत, संपूर्ण उपचार दिला जाणार ◼️दुर्घटनास्थळाची केली पाहणी   नाशिक, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) – काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल - नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
◼️बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत ◼️जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार ◼️ अपघातातील प्रत्येक जखमीची केली आस्थेवाईकपणे विचारपूस ◼️सर्वांना वेळेत, संपूर्ण उपचार दिला जाणार ◼️दुर्घटनास्थळाची केली पाहणी   नाशिक, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) – काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes