#दिल्ली क्रीडा सुविधा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आमच्या सर्व श्रोत्यांना ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
****
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण
राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचा आधार - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा, राज्यातल्या ५९ कर्मचाऱ्यांचा समावेश
राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन
हिंगोली तसंच वाशिम जिल्ह्यातल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता वितरीत
आणि
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे चित्रपट पुरस्कार जाहीर
****
देश आज आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य राष्ट्रीय सोहळ्यात थोड्याच वेळात ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येईल, त्यानंतर पंतप्रधान देशवासियांना संबोधित करतील. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरातून समाजातल्या विविध क्षेत्रातल्या नागरिकांना आमंत्रित केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या १२३ जण असून, त्यांच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या सारिका धन्यकुमार जैन, जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातल्या ढासला ग्रामपंचायतीचे सरपंच राम पाटील आणि त्यांच्या पत्नी वर्षाराणी पाटील, परतूर तालुक्यातले रमेश भापकर आणि त्यांच्या पत्नी पूजा भापकर यांचा समावेश आहे.
ध्वजारोहण समारंभाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सकाळी सात वाजेपासून प्रसारित होईल.
**
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात, तर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुण्यात विधान भवन इथं, सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. राज्यभरात सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटं ते नऊ वाजून पस्तीस मिनिटं, या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असं राजशिष्टाचार विभागानं कळवलं आहे. राज्यपाल राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचा आधार आवश्यक असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्या बोलत होत्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक लोकशाहीचं सांगितलेलं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. त्या म्हणाल्या...
“हमें संविधान निर्माता डॉक्टर बी.आर. आंबेडकर के शब्दों को भी सदैव याद रखना चाहिए। उन्होंने ठीक ही कहा था, ‘हमें अपने राजनीतिक लोकतंत्र को सामाजिक लोकतंत्र भी बनाना चाहिए। राजनीतिक लोकतंत्र तब तक नहीं टिक सकता जब तक कि उसके आधार में सामाजिक लोकतंत्र न हो।’’
कृषी, क्रीडा, अंतराळशास्त्र, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, आदी विषयांवर राष्ट्रपतींनी भाष्य केलं. जागतिक तापमान वाढीवर उपायासंदर्भात भारत करत असलेल्या उपायांचं त्यांनी कौतुक करत, नागरिकांनाही या क्षेत्रात योगदान देण्याचं आवाहन केलं.
****
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पोलीस, अग्निशमन, होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि सुधारणा सेवेतल्या एकंदर एक हजार ३७ कर्मचाऱ्यांना, शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा काल करण्यात आली. यात महाराष्ट्रातल्या वि��िध सेवांमध्ये कार्यरत असलेल्या ५९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक अनुज तारे यांना शौर्यपदक जाहीर झालं आहे. तर अतिरिक्त महासंचालक चिरंजीव प्रसाद, संचालक राजेंद्र डहाळे आणि सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना परमसेवा पदक घोषीत झालं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत सहाय्यक पोलीस उप निरीक्षक द्वारकादास भांगे यांना प्रशंसनीय सेवेसाठीचं पदक जाहीर झालं आहे.
****
राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गांवरचे खड्डे तातडीने बुजवावेत, कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, आदी निर्देशही त्यांनी दिले. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही पथकर माफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे.
****
अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं धान्य वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता दिली आहे. गेल्या काही दिवसात ई-पॉस यंत्राच्या तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना धान्य वितरण होऊ शकत नव्हतं. याकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतल्या दुकानदारांनी निदर्शनही केली होती. तांत्रिक अडचणीमुळे हे लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
****
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या सवना इथल्या अनुराधा नायक, कुशर्वता नायक या दोघांच्या खात्यावर जमा झाला आहे. याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.
“मी अनुराधा पद्माकर नायक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून मला आज तीन हजार रुपये हप्ता जमा झाला आहे. योजनेनुसार आम्हाला घर ग्रहस्थी सांभाळण्यास मदत होणार आहे, म्हणून मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांचे मनापासून खूप खूप आभार मानते. काही महिलांचे फॉर्म भरायचे राहीलेले आहेत, त्यांना सुद्धा मनापासून आवाहन करते की त्यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ घ्यावा.’’
वाशिम जिल्ह्यातही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये काल तीन हजार रुपये जमा झाले. स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन यांच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या अनुदानामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं ��ळवलं आहे.
****
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. चित्रपती व्ही. ��ांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना, आणि स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना, तर स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन.चंद्रा यांना जाहीर झाला आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथं अमृत योजनेच्या दुसर्या टप्प्याअंतर्गत मंजूर नवीन पाणी पुरवठ्याच्या विविध कामांचं भूमिपूजन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या योजनेमुळे शहराला दररोज पाणी मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत काल बीड जिल्ह्यातल्या चिंचपूर जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं पंचाहत्तर मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली.
परभणीतही शहर महानगरपालिका, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागांनी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तिरंगा अभियानाची शपथ दिली. महानगरपालिका आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने काल चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ३०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
**
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत काल जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज वितरीत करण्यात आला, प्रत्येकानं देशाला सर्वतोपरी मानून देशाप्रति आपलं कर्तव्य बजावण्यास प्राधान्य द्यायला हवं असं मत स्वामी यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
विभाजन विभिषिका स्मृती दिनाच्या औचित्यानं दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने काल नांदेड रेल्वे स्थानकावर फाळणीसंदर्भात माहिती देणारं प्रदर्शन लावण्यात आलं होतं. विभागीय प्रबंधक नीती सरकार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. अनेक नागरिकानी या प्रदर्शनाला भेट दिली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा काल लातूर जिल्ह्यात दाखल झाली. या यात्रेदरम्यान मराठा आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवत, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. त्यानंतर अहमदपूर इथं देखील सुळे यांची सभा सुरु असताना मराठा आंदोलक थेट मंचावर चढले आणि माईकचा ताबा घेऊन, ही मागणी केली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा पंचायत समितीला आयएस�� मानांकन प्राप्त झालं आहे. लोहा पंचायत समितीने केंद्र तसंच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळवणारी ही जिल्ह्यातली दुसरी पंचायत समिती ठरली आहे.
****
जलशक्ती अभियानातंर्गत सुरु असलेल्या "कॅच द रेन" मोहिमेत सर्व यंत्रणांनी सहभागी होवून, धाराशिव जिल्हयात ती सक्षमपणे राबवावी, असे निर्देश जलशक्ती अभियानाचे संचालक अशोककुमार यांनी दिले आहेत. काल धाराशिव इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलताना त्यांनी, या मोहिमेला गती प्राप्त करुन देण्यासाठी महिलांचा सहभाग वाढवण्याची गरजही व्यक्त केली.
****
श्रमजीवींचं मन आणि जगणं वामनदादा कर्डक यांनी आपल्या लेखणीतून मांडलं, असं मत ज्येष्ठ समीक्षक ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केलं आहे. कर्डक यांच्या जयंतीनिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र संचालक दासू वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देवून त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यत पोहचवण्याकरता धाराशिव जिल्यात तालुकास्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मेळावा आजपासून तीन सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
त्यागराज स्टेडियम प्रकरणात IAS अधिकारी कुत्र्यासोबत फिरत आहेत: संजीव खिरवार यांच्यावर कारवाई करण्याची भाजप, सोशल मीडियाची मागणी
त्यागराज स्टेडियम प्रकरणात IAS अधिकारी कुत्र्यासोबत फिरत आहेत: संजीव खिरवार यांच्यावर कारवाई करण्याची भाजप, सोशल मीडियाची मागणी
नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर दिल्ली सरकारचे मुख्य सचिव (महसूल) संजीव खिरवार यांच्या कुत्र्यांच्या फिरण्याचे प्रकरण तापले आहे. अरविंद केजरीवाल धोरण द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनंतर दिल्ली सरकारने कारवाई केली आहे. हे पाहता दिल्ली सरकारने रात्री १० वाजेपर्यंत सर्व क्रीडा सुविधा खेळाडूंसाठी खुल्या ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या घटनेला जबाबदार असलेले आयएएस अधिकारी संजीव खिरवार…
Tumblr media
View On WordPress
#IAS अधिकारी कुत्र्यासोबत फिरत आहेत#IAS अधिकाऱ्यासाठी त्यागराज स्टेडियम रिकामे#अरविंद केजरीवाल#आम आदमी पार्टी#एमएस सिरसा#कपिल मिश्रा#चंद्र श्रीकांत#चंद्रार श्रीकांत#तजिंदर सिंग बग्गा#त्यागराज स्टेडियम#त्यागराज स्टेडियम आयएएस अधिकाऱ्यासाठी रिक्त#दिल्ली क्रीडा सुविधा#दिल्ली त्यागराज स्टेडियम#दिल्लीचे स्टेडियम रात्री १० वाजेपर्यंत खुले असते#दिल्लीतील स्टेडियम रात्री १० वाजेपर्यंत सुरू असतात#नेहा खन्ना#बेंजल#बैंजल#मनीष सिसोदिया#ममता काळे#संजीव खिरवार#संजीव खिरवार कुत्र्याला स्टेडियममध्ये फिरवत आहेत#संजीव खिरवार त्यागराज स्टेडियम#संजीव खिरवार स्टेडियमवर कुत्र्याला फिरवत आहे#सिरसा येथील कु
0 notes
ashokgehlotofficial · 3 years ago
Text
यूथ हॉस्टल में ‘राजीव गांधी यूथ एक्सीलेंस सेंटर‘ के शिलान्यास समारोह को संबोधित किया। राज्य सरकार पूर्ण प्रतिबद्धता के साथ युवा विचारों और उनकी भावनाओं के आधार पर ही उज्ज्वल भविष्य के लिए फैसले ले रही है। वर्तमान सरकार द्वारा अभी तक 1.25 लाख नौकरियां दे दी गई हैं। एक लाख प्रक्रियाधीन हैं, और एक लाख नौकरियां देने की घोषणा की है। भविष्य में प्रदेश की नौकरियों में राजस्थान के युवाओं को ही लाभ मिले, इसके लिए भी उच्च स्तरीय परीक्षण कराया जा रहा है। हमारा प्रयास है कि अगला राजस्थान बजट युवा केंद्रित रहे। इसके लिए युवा वर्ग देश के विभिन्न राज्यों और विदेशों में संचालित योजनाओं क�� स्टडी कर सुझाव दे।
सेंटर में युवाओं को उच्च कोटि की सुविधाएं मिलेंगी। राज्य सरकार युवा हितों में कोई कमी नहीं रखेगी। पूर्व प्रधानमंत्री श्री राजीव गांधी ने भी युवाओं के विचारों के लिए क्रांतिकारी फैसला लेकर 18 वर्ष की आयु में मतदान करने का अधिकार दिया था। उसी तरह राज्य सरकार भी युवाओं के लिए अहम फैसले ले रही है।
राज्य सरकार ‘राजीव गांधी स्कॉलरशिप फॉर एकेडमिक एक्सीलेंस‘ के जरिए खर्च वहन कर प्रदेश के युवाओं को विदेशों के विश्वविद्यालयों, संस्थानों में शिक्षा प्राप्त करने का अवसर प्रदान करा रही है। मुख्यमंत्री अनुप्रति कोचिंग योजना में 15 हजार युवाओं को निःशुल्क कोचिंग सुविधा भी उपलब्ध कराई जा रही है। प्रदेश के आरक्षित वर्ग के कॉलेज स्टूडेंट्स के लिए अंबेडकर डीबीटी वाउचर स्कीम शुरू की गई है।
वर्तमान सरकार ने गत 3 वर्षों में 211 महाविद्यालय (90 महिला) खोलकर प्रदेश में उच्च शिक्षा को और मजबूत किया है, जबकि इन वर्षों से पूर्व सिर्फ 240 महाविद्यालय ही खुले थे। वहीं, 500 से अधिक संख्या वाले गर्ल्स स्कूलों को कॉलेज में क्रमोन्नत करने का अहम फैसला लिया गया है। यही वजह है कि 20 साल पहले लड़कियां कम पढ़ती थीं, आज इनकी संख्या लड़कों से ज्यादा है। युवाओं को विभिन्न प्रतियोगी परीक्षाओं में शामिल होने के लिए राजस्थान रोडवेज बसों में निःशुल्क यात्रा सुविधा दी जा रही है। साथ ही प्रदेश के करीब 200 खिलाड़ियों को आउट ऑफ टर्न नियुक्तियां देकर उन्हें प्रोत्साहित किया है।
ग्रामीण ओलंपिक खेलों के लिए 26 लाख खिलाड़ी रजिस्ट्रेशन करा चुके हैं। ओलंपिक के आयोजन से हर गांव में खेलों के अनुकूल माहौल बनेगा। मैदान में हर उम्र के खिलाड़ी नजर आएंगे। यह आयोजन एक नया रिकॉर्ड बनाएगा।
युवाओं से आह्वान है कि वे राज्य सरकार की जनकल्याणकारी योजनाओं को पढ़ें। उनके बारे में अपने आसपास के लोगों को जानकारी देकर लाभान्वित कराने का प्रयास करें। लोकतंत्र में सभी को अपनी बात रखने का अधिकार है, लेकिन शांतिपूर्वक तरीके से। हिंसा और आगजनी जैसी घटनाएं नहीं होनी चाहिए।
युवाओं के लिए लगभग 4.50 करोड़ की लागत से एक्सीलेंस सेंटर बनेगा। इसके बेसमेंट में प्रशिक्षण सभागार और अन्य सुविधाएं होंगी। भूतल में स्वागत कक्ष, प्रतीक्षा कक्ष, एक कॉन्फ्रेंस हॉल, कार्यालय व किचन मय डाइनिंग हॉल तथा प्रथम तल पर डोरमेट्री सहित कमरों का निर्माण होगा। यहां पर प्रदेश के युवाओं को ठहरने क��� सुविधा उपलब्ध होगी। साथ ही, युवाओं से संबंधित सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाला���ं आयोजित होंगी।
दिल्ली स्थित उदयपुर हाउस में 300 करोड़ रूपये लागत से 500 युवाओं के लिए 250 कमरों का नेहरू यूथ ट्रांजिट हॉस्टल एंड फैसिलिटेशन सेंटर बनाया जा रहा है। यहां राजस्थान के युवाओं को दिल्ली में पढ़ाई और अन्य कार्यों के लिए जाने पर ठहरने की सुविधा मिलेगी।
समारोह में युवा मामले एवं खेल राज्यमंत्री श्री अशोक चांदना ने कहा कि मुख्यमंत्री ने राज्य बजट के द्वार युवाओं के लिए खोल दिए हैं। युवाओं और खिलाड़ियों को कई सौगातें दी हैं। देश में सबसे ज्यादा मेडिकल कॉलेज और राजकीय कॉलेज खोलने से राजस्थान एजुकेशन हब बनकर उभर रहा है। उन्होंने कहा कि पदक विजेता खिलाड़ियों को प्राथमिकता से जमीन आवंटन और प्रोत्साहन राशि में कई गुणा बढ़ोतरी कर उनका हौसला बढ़ाने का कार्य किया गया है। समारोह में राजस्थान यूथ बोर्ड अध्यक्ष श्री सीताराम लांबा, उपाध्यक्ष श्री सुशील पारीक ने भी संबोधित किया।
समारोह में राजस्थान खादी एवं ग्रामोद्योग बोर्ड के अध्यक्ष श्री बृजकिशोर शर्मा, राजस्थान किसान आयोग के अध्यक्ष श्री महादेव सिंह खंडेला, समाज कल्याण बोर्ड की अध्यक्षा श्रीमती अर्चना शर्मा, राजस्थान राज्य क्रीडा परिषद की अध्यक्षा श्रीमती कृष्णा पूनिया, अन्य पिछड़ा वर्ग वित्त एवं विकास कॉर्पोरेशन के अध्यक्ष श्री पवन गोदारा, अनुसूचित जाति वित्त एवं विकास कॉर्पोरेशन के अध्यक्ष श्री शंकर सिंह यादव, खेल एवं युवा मामलों के शासन सचिव श्री नरेश ठकराल सहित अन्य जनप्रतिनिधिगण, अधिकारीगण और बड़ी संख्या में युवा उपस्थित रहे।
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर कायम, अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवला
पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातल्या लोकांना स्थलांतरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा उपक्रम
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची उपान्त्य फेरीत धडक, तर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा उपान्त्य फेरीत पराभव
****
मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवल्यामुळे नदीकाठच्या गावांमधल्या नागरिकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २९ हजार ४१४ घनफूट प्रतिसेकंद इतका विसर्ग वाढवून आजपासून ३५ हजार दोन घनफूट प्रतिसेकंद इतका केला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करायची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली असून, नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. सिंहगड, एकता नगर भागातल्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.
ताम्हिणी घाटासह पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते बंद केले आहेत. पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसंच धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला असून उजनी धरण ९० टक्यांहून अधिक भरलं आहे.
****
पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातल्या लोकांना स्थलांतरित करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे तसंच त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या भागात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराचे १०५ सैनिक तैनात करण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं श्रावण महिन्यानिमित्त ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमात एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचं आयोजन करण्यात येत असून, यात सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जाणार आहेत. प्रवाशांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केलं आहे. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मारलेश्वर, अष्टविनायक दर्शन, दर गुरुवारी नृसिंहवाडी, औदुंबर, दर शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलींचा यात समावेश आहे.
****
महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यात ‘जनसन्मान’ यात्रा काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या यात्रेच्या निमित्तानं सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज जाहीर केली आहे. त्यामध्ये समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे आदींची निवड करण्यात आली आहे.
****
भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीत महायुती सोबतच जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. नंदुरबार इथं आज झालेल्या जिल्हास्तरीय विस्तारित बैठकीत त्या बोलत होत्या. एकनाथ खडसे यांच्याबाबतीत पक्षाचे अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील असं रक्षा खडसे यांनी सांगितलं.
****
अठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज मुंबईत झालेला बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली इथल्या सरहद संस्थेत हे संमेलन घेण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
****
ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्य��त निधन झालं, त्या १०० वर्षांच्या होत्या. शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाजकार्य केलं. भारत सरकारनं २०११ मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने उपान्त्य फेरी गाठली आहे. उपान्त्यपूर्व सामन्यात आज भारताने इंग्लंडचा पेनल्टी शूट आऊटमध्ये चार - दोन असा पराभव केला. सामन्याची वेळ संपेपर्यंत दोन्ही संघ एक - एक अशा बरोबरीत होते. पेनल्टी शुट आऊटमध्ये भारताचा गोलकीपर पी आर श्रीजेश यानं इंग्लंडचे दोन गोल रोखले. भारताकडून हरमनप्रीत सिंह, सुखजीत सिंह, ललित उपाध्याय आणि राजकुमार पालनं गोल करत संघाला विजय मिळवून दिला.
तर दुसरीकडे बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा उपान्त्य फेरीत पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात लक्ष्यला डेन्मार्कच्या विक्��र एक्सेलसन कडून २२ - २०, २१ - १४ असा पराभव पत्करावा लागला. आता कांस्य पदकासाठी लक्ष्यचा सामना इंडोनेशियाच्या खेळाडुसोबत होणार आहे.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुर असलेल्या दुसर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारतासमोर २४१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. श्रीलंकेनं निर्धारित षटकात नऊ बाद २४० धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने तीन, कुलदीप यादवने दोन, तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक गडी बाद केला.
****
लातूर इथं आज सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या वतीनं ‘चला सावली पेरुया’ या वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. वृक्ष लागवड आणि संवर्धनाची प्रेरणा शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सांगली-साताऱ्यात वृक्ष लागवडीसाठी पाच लाख वृक्षांच्या बिया पाठवण्यात आल्या असून, लातूर जिल्ह्यासह पंधरा लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा उप्रकम पोहोचवण्याचं उद्दीष्ट असल्याचं शिंदे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
****
दरम्यान, लातूर जिल्ह्यात ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियानाअंतर्गत येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ‘एक कुटुंब, एक झाड’ उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमात उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी बेल वृक्षाची लागवड करून बेल वनांची निर्मिती करावी, यासाठी जिल्ह्यातल्या वृक्षप्रेमी संघटनांनी पुढाकार घ्यावा, तसंच नारळी पौर्णिमेला प्रत्येक भावानं आपल्या बहिणीला एक रोप भेट द्यावं, अशा पद्धतीने सण साजरे करून नागरिकांनी आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या जल कायदा, धोरण आणि शासन या नव्या अभ्यासक्रमाचं औपचारिक उद्घाटन आज माजी खासदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं. विद्यापीठाने मागील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. जल व्यवस्थापनासाठी सर्व राज्यांनी एकत्रितपणे एका दिशेने प्रयत्न करण्याची गरज, प्रभू यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यापीठाचे कुलगुरू ए. लक्ष्मीनाथ, गोदावरी विकास महामंडळाचे कार्य़कारी संचालक संतोष तीरमनवार, उद्योजक राम भोगले यावेळी उपस्थित होते.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात आतापर्यंत २५ हजार ८६ ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आहेत. यात १०१ पूर्णांक १८ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसवल्यामुळे राज्याने शंभर मेगावॅटचा टप्पा पार केला. या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला केली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचं अभिनंदन केलं असून, ग्राहकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असं आवाहन केलं आहे.
****
वेरुळच्या घृष्णेश्वर महादेव मंदीरासह दौलताबादच्या भद्रा मारोती मंदीर या छत्रपती संभाजीनगर नजिकच्या देवस्थानांना, श्रावण मासानिमित्त होणारी भाविकांची गर्दी आणि कावड यात्रेमुळे धुळे-सोलापूर महामार्ग वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. येत्या दोन सप्टेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हा बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.
****
सांगली इथं आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. क्रांतिसिंह नाना पाटील चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात ४५ संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी कृषी, आरोग्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका तसंच शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यातले बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, नांदेडचे विकास माने आणि अनुप पाटील या तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसंच जिल्ह्यात डॉ. सचिन खल्लाळ आणि क्रांती डोंबे यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 12 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं, राज्यात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट उपलब्ध करुन दिले आहेत. या टप्प्यात अकरा लोकसभा मतदार संघांमध्ये, मतदानासाठी २९ हजार २८४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात उद्या होणाऱ्या मतदानासाठी या सर्व जिल्ह्यांची प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान अधिकारी, कर्मचारी नियुक्त ठिकाणी रवाना झाले आहेत. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात उद्या १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदारांना मतदारयादीत आपलं नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागानं आपल्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याशिवाय मोबाइल एसएमएस सेवेद्वारेही मतदारांना ही सुविधा देण्यात आली आहे. यासाठी मतदारांनी मोबाइलच्या मेसेज बॉक्समध्ये इंग्रजीत ईसीआय स्पेस आणि त्यानंतर आपला मतदार ओळखपत्राचा क्रमांक लिहून १९५० या क्रमांकावर मेसेज पाठवायचा आहे. या मेसेजच्या उत्तरात मतदार यादी क्रमांक आणि मतदार क्रमांक तत्काळ पाठवला जातो.
****
केंद्र सरकारच्या वतीनं देशभरात २०२२ ते २०२७ या कालावधीत उल्लास- नवभारत साक्षरता अभियान राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात या अभियानात सहभाग घेऊन ४ लाख २५ हजार ९०६ जण साक्षर झाले आहेत. यामध्ये ६६ वर्षांपेक्षा अधिक वयाचे तब्बल ९६ हजार ५१८ परीक्षार्थी उत्त��र्ण झाल्याचं राज्याच्या शिक्षण संचालनालयानं काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. मागील शैक्षणिक सत्रापासून या अभियानात सहभागी झालेल्या निरक्षरांची साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा १७ मार्चला घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व उपकेंद्रातील विभागांमध्ये, २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी, प्रवेश चाचणी परीक्षा-सीईटीच्या माध्यमातूनच प्रवेश होणार असल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे. सीईटीसाठी १५ ते २५ मे दरम्यान नोंदणी केली जाणार असून, त्यानंतर ३ ते १४ जून दरम्यान संबंधित विभागांमध्ये ऑफलाइन पद्धतीनं सीईटी होणार आहे.
सीईटीचे ५० टक्के आणि अंतिम वर्षाच्या ऐच्छिक विषयाचे ५० टक्के गुण ग्राह्य धरून गुणवत्तेनुसार संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित केला जाणार आहे. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ऑनलाइन नोंदणी होणार असून, सीईटी परीक्षाही स्वतंत्रपणे आयोजित केलेली आहे. १०० गुणांच्या चा परीक्षेत एकूण ५० प्रश्न विचारले जातील, असं विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे आहे.
****
अमृतसर इथून सुटणाऱ्या अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेसची आज रविवारची फेरी रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे रुळाच्या कामांसाठी जालना जिल्ह्यात कोडी आणि रांजणी रेल्वे स्थानकांदरम्यान लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दर मंगळवारी आणि शनिवारी काही गाड्या उशिराने धावणार आहेत. तर धर्माबाद-मनमाड ही गाडी आजपासून चार ऑगस्टपर्यंत धर्माबाद ते नांदेडदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे.
****
पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेसाठी, भारतीय कुस्तीपटू अमन शेरावतनं आपलं स्थान पक्कं केलं आहे. ही कामगिरी करणारा अमन हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. तुर्कियेतल्या इस्तंबूलमध्ये जागतिक कुस्ती ऑलिंपिक पात्रता फेरीत त्यानं ५७ किलो वजनी गटात फ्री स्टाइल प्रकारात विजय मिळवला.
दरम्यान, भारताच्या दिपक पुनियाला ८६ किलो वजनी गटात आपलं स्थान निश्चित करता आलं नाही.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी साडेतीन वाजता खेळवला जाईल. चेन्नईच्या एम. ए. चिंदबरम क्रीडा संकुलात हा सामना होईल, तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता होईल. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी क्रीडा संकुलात हा सामना खेळवला जाईल.
****
येत्या २४ तासांत राज���यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, तसंच गारांसह पाऊस पडेल, असा ‌अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा विभागानं दिला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या यात्रेच्या देशभरातल्या हजारो लाभार्थ्यांसह, केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार तसंच इतर लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात पदमपुरा भागात विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांचा हा कार्यक्रम दाखवण्यात येत आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान आजपासून तीन दिवस गुजरात दौऱ्यावर जात असून, उद्या गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथं जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. दहा जानेवारीला गांधीनगर इथं त्यांच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचं उद्घाटन होईल. “भविष्याचे प्रवेशद्वार” अशी या परिषदेची संकल्पना आहे.
****
शालेय जीवनातच विद्यार्थांना रस्ता वाहतुकीचे नियम शिकवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल 'सडक सुरक्षा अभियान २०२४ - संवेदना का सफर' या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. १८ वर्षाखालील मुलांना रस्ता सुरक्षतेसाठी जागरूक करण्यासाठी समाज माध्यमे, महाविद्यालय, सामाजिक संघटनांनी पुढाकर घ्य���वा, असं आवहन गडकरी यांनी केलं. देशात रस्ते अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते वाहतूक आणि सुरक्षा अधिक बळकट करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
आकाशवाणी दिल्ली इथले माजी उर्दू वृत्तनिवेदक अशरफ आबिदी यांचं काल रात्री दिल्लीत निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. आबिदी यांनी १९८२ ते २००२ पर्यंत जवळपास २० वर्ष आकाशवाणी दिल्लीच्या वृत्त विभागात काम केलं.
****
नागरिकांमध्ये सुदृढ आरोग्याविषयी जागरुकता वाढावी या उद्देशानं यवतमाळमध्ये हेल्थ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यात नागपुर, पुणे, मुंबई सारख्या इतर अनेक शहरांमधले धावपटुही सहभागी झाले होते. यात पोलीस विभागानं नशामुक्त पहाट अभियानातून व्यसनमुक्ती बाबत जनजागृती केली. विजेत्या धावपटूंना आणि नशामुक्त पहाट अभियानात आयोजित स्पर्धेतल्या विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आलं.
****
रत्नागिरी इथं काल पहिल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. २१, १० आणि पाच किलोमीटर्स अशा वेगवेगळ्या अंतराच्या स्पर्धेत पाच ते ८८ वर्षं या वयोगटांतल्या एकूण दीड हजार स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. क्रीडा पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचं सहकार्य लाभलं.
****
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन - सीटू प्रणित जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनं शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या ११ तालुक्यांमधल्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी काल लो��ी इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावं, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान वेतन पगारी रजा, शासकीय भत्ते, आरोग्य विमा आणि इतर सुविधा द्याव्या, आदी मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या जेष्ठ कवयित्री संध्या रंगारी यांना साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार' माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. नांदेड इथल्या सावित्री -रमाई महोत्सवात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
****
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं सुरु असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एयर रायफल पिस्टल सांघिक प्रकारात भारतीय खेळाडुंनी सुवर्ण पदक पटकावलं. वरुण तोमर, अर्जुन सिंह चीमा आणि उज्वल मलिक यांच्या संघानं हे यश संपादन केलं. वरुण आणि अर्जुन यांनी वैयक्तिक प्रकारात देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेन्टी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं टी ट्वेन्टी संघात पुनरागमन झालं आहे. या मालिकेसाठी रोहीत शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. शुभमन गिल, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, आवेश खान, अर्षदिप सिंग आणि मुकेश कुमार गोलंदाजीची बाजू सांभाळणार आहेत. येत्या ११ जानेवारीपासून भारतात या मालिकेला सुरुवात होईल.
****
हवामान
राज्यभरात पुढचे दोन दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांचं आश्वासन
माझी माती माझा देश अभियानाचा राज्य शासन स्तरावर समारोप;अमृत कलश दिल्लीला रवाना
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात गांजाची पावणे चार क्विंटल झाडं जप्त
आणि
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकांची शंभरी
****
राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल, असं आश्वासन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिलं आहे. त्या आज मुंबईत प्रधानमंत्री मातृवंदना योजना जनजागृती कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२ हजार ८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा हप्ता केंद्र शासनाकडून भरण्यात येईल, असंही ईराणी यांनी सांगितलं. शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. ��संच राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असंही ईराणी यांनी सांगितलं.
****
'माझी माती माझा देश अभियान' हे देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या स्तरावर आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर या अभियानाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. केवळ पायाभूत सुविधा, मोठे प्रकल्प, भौतिक सुविधाच महत्त्वाच्या न���हीत, तर मातृभूमीविषयी प्रेम आणि संस्कृतीविषयी आदर तितकाच महत्त्वाचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या ३८१ अमृत कलशांचं, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पूजन झालं. हे सर्व कलश विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाले. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मुंबई स्थानकावरून निघालेली ही रेल्वे उद्या दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी दिल्ली इथं हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणार आहे.
****
माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं काल रात्री निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. न्यूमोनियाने आजारी असलेले ढाकणे यांच्यावर गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर पाथर्डी तालुक्यातील त्यांचे मूळ गांव पागोरी पिंपळगाव इथं उद्या दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढाकणे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ढाकणे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिव देहावर नेरुळ इथं शासकीय इतमामात अंत्यंसंस्कार होत आहेत. बाबा महाराज यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी काल निधन झालं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेरुळ इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन बाबा महाराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. बाबा महाराजांचं स्मारक तर होईलच मात्र त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्यांच्या विचारांचं स्मारक कसं करता येईल, याबाबत प्रयत्न करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात घेतलेल्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातल्या बहुतांश गावांमध्ये मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यातील ४५ गावे या साखळी उपोषणात सहभागी झाली आहेत. तसंच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे फलकही गावोगावी लावण्यात आली आहेत.
****
नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दोन वाहनांची काल रात्री तोडफोड झाली. खासदार चिखलीकर हे गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातील अंबुलगा इथं माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी गेले होते. राजकीय नेत्याने गावात प्रवेश केल्याने संतप्त झालेल्या मराठा तरुणांनी त्यांच्या दोन वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर खासदार चिखलीकर हे पोलीस वाहनातून नांदेडकडे रवाना झाले. आरक्षणावर राज्य सरकार निश्चितच तोडगा काढेल, मात्र मराठा समाजाने संयम राखावा, असं आवाहन खासदार चिखलीकर यांनी केलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील आपेगांव मध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यत गावात कोणत्याही नेत्याला प्रवेश नसल्याचं, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सकल मराठा समाजानं जाहीर केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीनं आज धाराशिव जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समितीला माहिती देण्यात आली. अनेक नागरिकांनीही समितीची भेट घेतल्याचं वृत्त आहे. 
****
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात येणोरा इथं कापसाच्या शेतात तुरीसह लावलेली गांजाची झाडं परतूर आणि आष्टी पोलिसांनी आज संयुक्त कारवाई करत जप्त केली. या झाडांचं वजन तीन क्विंटल ७० किलो असून त्याची बाजारभावाप्रमाणं किमंत सुमारे ३५ लाख रुपये असून, या प्रकरणी शेतकरी लक्ष्मण बोराडे याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी दिली आहे.
****
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतानं पदकांची शंभरी गाठली आहे. आज सकाळी तीरंदाजीच्या कंपाउंड स्पर्धेत शीतल देवी हिने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं. बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत नीतेश कुमार आणि तरुण यांच्या जोडीने तसंच सुहास यतिराज याने याच स्पर्धेच्या एकेरीत सुवर्णपदक मिळवलं. बॅडमिंटनच्या एस एल थ्री प्रकारात पुरुष खेळाडूंनी सुवर्ण तसंच रौप्यपदक तर महिलांच्या एस यू पाच प्रकारात तुलसीमतीने सुवर्णपदक पटकावलं. पंधराशे मीटर टी ३८ स्पर्धेत रमन शर्माने, थाळीफेक प्रकारात देवेंद्र कुमारने तर गोळाफेक प्रकारात मनू याने सुवर्णपदक पटकावलं आहे. आतापर्यंत २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्यपदकांसह भारतानं एकूण शंभर पदकं पटकावली आहेत. इंडोनेशियात झालेल्या मागच्या स्पर्धेत भारताच्या पॅरा संघाने ७२ पदकं जिंकली होती.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथं सुरू असलेल्या सामन्यात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २७१ धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीच��� निर्णय घेत ४७व्या षटकांत सर्वबाद २७० धावा केल्या. पाकिस्तानच्या सऊद शकीलनं सर्वाधिक ५२ धावा केल्या तर आफ्रिकेच्या तबरेज शम्सीनं सर्वाधिक चार बळी घेतले.
****
गोवा इथं सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघात छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा प्रबोधिनीच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. काजल आटपाडीकर, निर्जला शिंदे आणि शालिनी साकुरे अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावं आहेत. यापूर्वी काजल आटपाडीकर हिनं भारतीय ज्युनिअर संघातून जर्मनी आणि आयर्लंड इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे. हॉकी संघटनेचे छत्रपती संभाजीनगर इथले अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव पंकज भारसाखळे यांनी या निवडीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम २५ टक्के दिवाळीपूर्वी मिळणार आहे. येत्या १० नोव्हेंबर पासून ही अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होणार आहे.
****
येत्या ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाकरता 'भ्रष्टाचाराला नाही म्हणा ; राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा' ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात या सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकात नमूद केल्यानुसार कार्यवाही करुन अहवाल शासनास आणि जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असं जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीनं कळवण्यात आलं आहे.
****
राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम आणि योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत. या सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्यासाठी लातूर इथं येत्या दोन नोव्हेंबर रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्य���स्थापक पी. डी. हणबर यांनी ही माहिती दिली. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचं आवाहन हणबर यांनी केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०७ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं शंभर पदकं जिंकत आतापर्यंतची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यात २५ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४० कांस्य पदकांचा समावेश आहे. आज सकाळी महिलांच्या कबड्डी स्पर्धेत भारतानं सुवर्णपदक पटकावलं. तीरंदाजीच्या कंपाउंड प्रकारात वैयक्तिक स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा तसंच ओजस देवतळेनं सुवर्ण पदक पटकावलं. दोघांचंही या स्पर्धेतलं हे तिसरं सुवर्णपदक आहे. याच प्रकारात अभिषेक वर्माने रौप्य पदक तर आदिती गोपीनाथ हिने कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडुंचं अभिनंदन केलं आहे.
****
महिलांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नर्गिस मोहम्मदी इराणच्या नागरिक असून सध्या त्या तुरुंगवासात आहेत.
****
येत्या दोन वर्षात देशातून नक्षलवादाचा पूर्ण नायनाट करण्याची घोषणा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली आहे. नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ���०१९ पासून नक्षलबाधीत क्षेत्र कमी होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जी-20 देशांच्या संसदेच्या अध्यक्षांची नववी परिषद या महिन्याच्या १३ आणि १४ तारखेला नवी दिल्ली इथं होणार असल्याचं, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद, हे या परिषदेचं घोषवाक्य आहे.
****
ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या पश्चिम विभागातल्या प्रादेशिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची दुसरी परिषद कालपासून नाशिकमध्ये सुरू झाली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झालं. सर्वांसाठी आरोग्य सुविधा ही केंद्राची संकल्पना राबवण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी महत्त्वाचं योगदान देत असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट दरात असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. रामटेक इथं काल त्यांनी दानवे यांना या मागणीचं निवेदन दिलं.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 September 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन.
नागपूर शहरात अतिवृष्टीचे दोन बळी-मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा.
ठाणे जिह्यात उल्हासनगर इथं सेंच्युरी रेयॉन कंपनीत स्फोट;तिघांचा मृत्यू.
आणि
बीड इथल्या यश जाधवची १८ वर्षाखालील भारतीय रग्बी संघात निवड.
****
सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज सकाळी दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषदेचं उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सायबर दहशतवाद, आर्थिक गैरव्यवहार, कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर या समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक चौकटीची गरज आहे, हे एकट्या दुकट्या सरकारचं काम नसून, विविध देशांच्या कायदेतज्ज्ञांनी यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी नमूद केली.
****
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशात वाराणसी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट संकुलाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते आज झाली, त्यावेळी बोलत होते. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून इतर देशांशी संबंध वृद्धिंगत होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. क्रीडा क्षेत्रात भारतात विपुल गुणवत्ता असून, त्याला ���ाव देण्यासाठी केंद्रसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. क्रीडासंकुल उभारलं की आसपासच्या परिसराचा आर्थिक विकास वेगाने होतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
****
नागपूर आणि परिसरात मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चार तासांत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून अंबाझरी तलाव ओसंडून वाहत आहे. दरम्यान, या पुरामुळे दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १४ जनावरंही दगावली आहेत. जिल्हा आणि महानगर प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन चमू कार्यरत असून, शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ��ेवून आहे. सैन्य दलाच्या दोन तुकड्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरु असून, चारशे नागरिकांना सुरक्षितस्थिळी हलवण्यात आलं आहे. नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमरावती जिल्ह्यातही गेल्या ४८ तासापासून होत असलेल्या पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, दर्यापूर तालुक्यात आज एक युवक नदीपात्रात वाहून गेल्याचं वृत्त आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. धोकादायक घरं आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तत्काळ हलवण्याच्या सूचना देत, त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पाण्याची पातळी वाढल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
दरम्यान नागपूर परिसरात पुढचा आठवडाभर जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
****
ठाणे जिह्यातल्या उल्हासनगर शहाड गावठाण इथल्या सेंच्युरी रेयॉन कंपनीत आज दुपारी स्फोट झाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे तर १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. कंपनीत झालेल्या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या स्फोटाचं कारण अद्याप समजलं नसून, कंपनी समोर कामगारांच्या नातेवाईक आणि नागरिकांनी गर्दी केली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं शासकीय वस्तीगृहात राहणाऱ्या सहा मुलींना अन्नातून विषबाधा झाली आहे. या विद्यार्थिनींवर चिखली इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसतीगृहात सतत नित्कृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा आरोप या विद्यार्थिनींनी केला होता, मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला आहे. आमदार श्वेता महाले, माजी आमदार रेखा खेडेकर यांच्यासह चिखली पोलिस ठाण्याचे ठाणेदार सखाराम पाटील यांनी रुग्णालयात जाऊन विषबाधा झालेल्या मुलींच्या प्रकृतीची चौकशी केली.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विकसित केलेल्या एम. ए. इतिहास या शिक्षणक्रमाचे प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आली आहे. या शिक्षणक्रमासाठी विद्यापीठाने १७५ अभ्यासकेंद्रं सुरु केली आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी या शिक्षणक्रमाच्या प्रवेशा�� पात्र आहेत. प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ ही आहे, असं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा १०५ वा भाग असून, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरून उद्या सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल. आकाशवाणीचं संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आज एक दिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत आगमन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर शाह यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते. शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी स्थापन श्रीगणेशाचं दर्शन घेतलं. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणेश मंडळालाही शहा यांनी भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यानी लालबाग इथं जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
****
यवतमाळ जिल्ह्यात ‘मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाचा दुसरा टप्पा मोठ्या उत्साहात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक गावात ‘अमृत कलश यात्रा’ काढली जात असून, जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ५ हजार कुटुंबांकडून माती, तांदुळाचं संकलन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथं डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज 'मेरी माटी मेरा देश" अभियानांतर्गत अमृतकलशात माती संकलन करण्यात आलं. विद्यापीठाचे  प्र- कुलगुरू डॉ श्याम शिरसाठ यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कुलसचिव, डॉ.भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप, संचालक डॉ मुस्तजीब खान, रासेयो संचालक डॉ सोनाली क्षीरसागर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
बीड जिल्ह्यातल्या यश बालासाहेब जाधव या रग्बी खेळाडूची १८ वर्षाखालील भारतीय रग्बी संघात निवड झाली आहे. आशियायी रग्बी स्पर्धा तैवानच्या तैपेयी इथं येत्या ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान खेळल्या जाणार आहेत. बीड जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यात गेल्या ४ वर्षापासून या खेळाचा प्रचार, प्रसार करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कास्य पदके प्राप्त केली आहेत.
दरम्यान, बीड जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्याध्यक्षपदी डॉ. योगेश क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड बीडवासियांसाठी अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केल��.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या इंदूर इथं खेळवला जाणार आहे. उद्या दुपारी दीड वाजता सामन्याला प्रारंभ होईल. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.
****
लातूर जिल्ह्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या ९२५ वर पोहोचली आहे. यामध्ये ३९३ रुग्ण लातूर शहरातले तर ५३३ रुग्ण शहराबाहेरचे असल्याची माहिती, महापालिकेकडून मिळालेल्या अहवालात देण्यात आली आहे. महापालिकेकडून धूरफवारणी तसंच ॲबेटिंगची कार्यवाही करण्यात येत असून, नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.
****
नदिष्ट कांदबरीचे लेखक मनोज बोरगांवकर यांचा उद्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मसापच्या सभागृहात उद्या सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात राष्ट्रीय स्वच्छता दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं स्वच्छता पंधरवडा अभियान हाती घेतलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
औरंगाबाद इथं आजपासून ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोला प्रारंभ
शेतीच्या विविध योजनांसाठी इस्रोचं तंत्रज्ञान लाभदायक-संचालक एस सोमनाथ यांची माहिती
मुंबईतला मराठी टक्का कमी होऊ देणार नाही-विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्र्यांची ग्वाही
वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा विचार नसल्याचं सरकारकडून स्पष्ट-संप मागे
साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांची मालमत्ता ईडीकडून जप्त
उस्मानाबाद जिल्ह्यात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची मागणी
आणि
उत्तरेकडील थंड वारे दाखल झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता
****
औरंगाबाद इथं आजपासून ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोला प्रारंभ होत आहे. शेंद्रा इथल्या ऑरिक सिटीत येत्या आठ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. मराठवाडा आणि औरंगाबादसह ऑरिकचा औद्योगिकदृष्ट्या जागतिक पातळीवर प्रचार करण्यासाठी, राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - मासिआ यांच्या वतीनं, या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या एक्स्पोमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उद्योजक सहभागी होणार असून, विविध विषयांवरच्या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यासाठी १९ हजार ७४४ कोटी रुपये निधीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. शासकीय प्रसार माध्यमांमध्ये सुधारणांसाठी ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क डेव्हलपमेंट स्कीम - BIND ला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या योजनेद्वारे सरकारी प्रसार माध्यमांना प्रसारण, पायाभूत सुविधा आणि वृत्त सामग्री सुधारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल, असं ठाकूर यांनी सांगितलं. यासाठी मंत्रिमंडळाने २०२५-२६ पर्यंत दोन हजार ५३९ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.
****
पीक व्यवस्थापन तसंच नुकसान भरपाईसह इतर योजनांमध्ये, भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोद्वारे विकसित तंत्रज्ञान लाभदायक असल्याचं, इस्रोचे संचालक एस सोमनाथ यांनी सांगितलं आहे. नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात सुरू असलेल्या, एकशे आठव्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सोमनाथ यांनी, पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. अंतराळातले ८० टक्के उपग्रह कार्यरत नाहीत, त्यांची नोंद घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. गगनयान मिशनसाठी संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशा चाचण्या झाल्यानंतरच या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सोमनाथ यांनी दिली.
****
आजची बालकं उद्याची ‘यंग सायंटिफीक ब्रिगेड’ असून, या बालकांमधली जिज्ञासा आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचं, भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना यांनी सांगितलं आहे. भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये राष्ट्रीय बाल शास्त्रज्ञ संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. १० ते १७ वर्षे वयोगटातल्या बालवैज्ञानिकांनी यावेळी विविध प्रयोग सादर केले.
****
विज्ञान काँग्रेसमध्ये काल दुसऱ्या दिवशी ‘हृदयविकार आणि मधुमेह या विषयातील नवीन संशोधन’ याविषयावर चर्चासत्र झालं. डॉ शंतनू सेनगुप्ता यांनी यावेळी बोलताना, नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या हृदयविकार आणि मधुमेह, या विकारांमध्ये नव्यानं झालेल्या संशोधनातून, नवीन घातक घटक निदर्शनास आलं आहे, हे घटक वेळीच ओळखून रुग्णांनी आपला बचाव करावा, असं आवाहन केलं.
****
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मुंबईत विश्व मराठी संमेलन घेण्यात आलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या तीन दिवसीय संमेलनाचं उद्घाटन झालं. मराठी भाषेचा प्रचार-प्रसार जगभर होण्यासह, उद्योग कल्पनांच्या आदान-प्रदानासाठी जगभरातल्या मराठी भाषाप्रेमी आणि उद्योजकांसाठी, हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. मुंबईतला मराठी टक्का कमी होणार नाही, यासाठी आमचं सरकार प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
“मराठी मातीचा आणि मराठी संस्कृतीचा विचार नेहमीच विश्वाला कवेत घेत आलेला आहे. मुंबई-महाराष्ट्र मिळवण्यासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलं, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे मुंबईत मराठी भाषेची, मराठी भाषिकांची पिछेहाट होणार नाही, मुंबईवर मराठी ठसा आणि मुंब���तला मराठी टक्का कायम रहावा यासाठी देखील आमचं सरकार याठिकाणी नेहमी प्रयत्न करतंय.’’
विश्व मराठी संमेलनाला राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातल्या नव्या शहरांमध्ये हे संमेलन भरवण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
परदेशातल्या ४९८ मराठी मंडळांचे प्रतिनिधी, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ४७० प्रतिनिधी, तसंच १६४ नामवंत साहित्यिक, या संमेलनात सहभागी झाले आहेत. मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या जात्यावरच्या ओव्या, लेझीम पथक, मराठी वेशभुषा, रांगोळीने सजलेले तुळशी वृंदावन, पुस्तक विक्रीसाठी वेगवेगळी दालनं, तसंच महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ही या संमेलनाची ठळक वैशिष्ट्यं आहे.
****
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता संघर्ष समितीनं, पुकारलेला संप काल मागे घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या ३२ संघटनांसोबत काल बैठक घेतली. वीज कंपन्याचं खाजगीकरण करण्याचा राज्य सरकारचा कुठलाही विचार नसून, या कंपन्यामध्ये ५० हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...
“राज्य सरकारला या कंपन्यांचं कुठलंही खाजगीकरण करायचं नाही. याउलट पुढच्या तीन वर्षामध्ये पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्‌समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही.’’
वीज कर्मचारी आणि अधिकारी कृती समितीचे पदाधिकारी संजय ठाकूर यांनी राज्यशासनाच्या आश्वासनानंतर संप मागे घेत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
“तुमचं जे प्रोपोजल आहे, ते प्रपोजल द्या. त्याच्यामध्ये कुठलंही इंटेशन ज्याच्या अनुषंगाने कुठलंही प्रायव्हटाजेशन होईल, कुठलंही प्रायव्हटायजेशन प्रोमोट करायची अशा प्रकारची भूमिका अजिबात राज्य शासनाची अशी भूमिका साहेबांनी सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारची भूमिका असल्यानंतर आम्हीसुद्धा, सर्व बत्तीस संघटना असतील, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संघटना असतील यांनी या ठिकाणी विचारविनीमय केला. आणि साहेबांनी जाहीररीत्या इथं जे निर्णय घेतले, त्या निर्णयाच्या बाबतीत आम्हीसुद्धा पॉझिटीव्ह निर्णय घेऊन हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतोय.’’
****
पीपल्स रिपब्लिकन पार्टीने बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजी महाराजांबाबत आपण काहीही वादग्रस्त विधान केलेलं नाही, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणण्याची आवश्यकता नाही, असं पवार यांनी म्हटलं होतं, त्या विधानावर राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मात्र आपण आजही आ��ल्या विधानावर ठाम असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री परळीत अपघात झाला. यात मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला आहे. वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं मुंडे यांनी सामाजिक माध्यमांवरून सांगितलं. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
क्रिकेटपटू ऋषभ पंत याला काल मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आणण्यात आलं. गेल्या महिन्याच्या ३० तारखेला दिल्ली-डेहराडून महामार्गावर कार अपघातात जखमी झालेल्या पंतवर डेहराडून इथं रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला झालेल्या इतर जखमा भरल्या असून त्याची प्रकृतीही स्थिर असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुंबईत त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
****
सक्तवसूली संचालनालय - ईडीने काळा पैसा वैध केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांची, १० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब, साई रिसॉर्ट, सी शंख रिसॉर्ट आणि इतरांविरुद्ध दापोली न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातल्या पांगरी इथं फटाक्याच्या कारखान्याचा मालक युसूफ मणियार याला न्यायालयानं, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिराळे हद्दीत असलेल्या मणियार याच्या फटाका कारखान्याला रविवारी आग लागून चार महिला जखमी झाल्या, तर दोन जणांचा मृत्यू झाला.
****
उस्मानाबादचं धाराशिव नामांतर करण्यावर केंद्र सरकार लवकरच शिक्कामोर्तब करेल, असं केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सांगितलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘सबका साथ सबका विकास सबका प्रयास’यावर आधारित देशाच्या प्रगतीसाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता मिश्रा यांनी व्यक्त केली. भाजप कार्यकर्त्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केलं.
उस्मानाबाद जिल्ह्यात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची मागणी, जिल्ह्यातल्या एकविध क्रीडा संघटनेच्या वतीनं भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी राज्यमंत्री मिश्रा यांच्याकडे केली आहे. मिश्रा यांनी काल उस्मानाबाद इथं राष्ट्रीय खो खो पटू निकिता पवार यांच्या घरी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी डॉ जाधव यांनी या मागणीचं निवेदन मंत्र्यांना सादर केलं.
****
उत्तरेकडील थंड वारे दाखल झाल्याने राज्यातल्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात घटच अपेक्षित असल्याची माहिती महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंध��र यांनी दिली. दरम्यान, औरंगाबादमध्ये काल ११ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
****
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन पुणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. काल स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योतीच्या रॅलीचं काल पुण्याच्या एस एस पी एम एस महाविद्यालयाच्या प्रागंणात आगमन झालं. मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक आणि पुणे या आठही जिल्ह्यातून आलेल्या क्रीडाज्योती आज एकत्र येऊन महाविद्यालयाच्या प्रागंणात सकाळी दहा वाजता मुख्य क्रीडाज्योत रॅलीला सुरूवात होईल. 
****
दरम्यान, राज्य मिनी ऑलंपिक्स स्पर्धेकरता औरंगाबाद जिल्ह्याच्या हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी ही घोषणा केली. मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी आंचल क्षीरसागर तर मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी इमरान शेख यांची निवड करण्यात आली आहे.
****
श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत दुसरा सामना आज पुण्यात खेळला जाणार आहे. सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत परवा मुंबईत झालेला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.
या सामन्यात उमरान मलिकने १५५ किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजीचा नवा विक्रम केला. या विक्रमामुळे तो भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे.
दरम्यान, पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे संजू सॅमसन या मालिकेत खेळू शकणार नाही, त्याच्या ऐवजी जीतेश शर्मा याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याची सूचना, लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिले आहेत. काल नांदेड इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या कायद्याच्या अंतर्गत शासकीय पातळीवरून दिल्या जाणाऱ्या सेवा अधिसूचित केलेल्या आहेत. तालुका पातळीवरील सर्व यंत्रणानी या सेवा देतांना प्रकरणं प्रलंबित राहणार नाहीत याची काळजी घ्यावी, असं शिंदे यांनी सांगितलं.
****
सर्वसामान्य नागरिकांना नदीसाक्षर बनवण्यासह मांजरा नदीचं प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जाणार आहेत, अशी माहिती, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे. ‘चला जाणुया नदीला उपक्रमांतर्गत, जिल्ह्यात ११ जानेवारीपासून मांजरा नदी जलसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून जलसाक्षरता, स्वच्छताविषयी जनजागृती करण्यासह विविध सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
****
औरंगाबाद इथं मोबाइल फोनचं बनावट साहित्य विकणाऱ्या पाच दुकानांवर पोलिसांनी काल कारवाई केली. पुण्यातल्या एका कंपनी मालकाने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. या पाचही दुकानातून मोबाईल फोनच्या कव्हरसह सुमारे पाच लाखा��ून अधिक किंमतीचं बनावट साहित्य जप्त करण्यात आलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 October 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
शिवसेनेच्या ठाकरे गटाला मशाल चिन्हासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव, मुख्यमंत्री शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव देण्यास निवडणूक आयोगाची मान्यता, मात्र चिन्हासाठी नवे तीन पर्याय देण्याची सूचना
औरंगाबादमधल्या ऑरिक सिटीत उद्योगांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेट देण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उद्योजकांना आवाहन
पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांना १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषीविषयक योजनांचा गरजू शेतकऱ्यांना लाभ देण्याला प्राधान्य देण्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश
औरंगाबाद शहर बसमधून डोकावणाऱ्या विद्यार्थ्याचा डोकं खांबाला लागल्यानं जागीच मृत्यू
गुजरातमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १२६ पदकांसह महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानी झेप
महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा थायलंडवर नऊ फलंदाज राखत विजय
आणि
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज भारताचा तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना
****
शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव, तसंच मशाल हे चिन्ह देण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यास मान्यता देण्यात आली असून, चिन्हासाठी नवे तीन पर्याय देण्याची सूचना आयोगानं केली आहे. आज सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांना हे पर्याय द्यावे लागणार आहेत.
शिंदे गटाने दिलेल्या त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या पर्यायांपैकी एक चिन्ह देण्यास आयोगानं नकार दिला. त्रिशूळ तसंच गदा ही चिन्हं धार्मिक भावनेशी निगडित आहेत, तसंच ती आयोगाकडच्या मुक्त चिन्हांच्या यादीत समाविष्ट नाहीत. तसंच उगवता सूर्य हे चिन्ह द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षासाठी तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये राखीव असल्याचं, आयोगानं म्हटलं आहे.
ठाकरे गटानेही त्रिशूळ, उगवता सूर्य तसंच मशाल हे पर्याय दिले होते. यापैकी त्रिशूळ आणि गदा ही चिन्हं आयोगानं नाकारली, तर मशाल हे चिन्ह दिवंगत माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस समता पार्टी साठी राखीव होतं, मात्र २००४ मध्ये या पक्षाची मान्यता रद्द झाल्यानं, आयोगाने मशाल हे चिन्ह ठाकरे गटाच्या अर्जानंतर मुक्त चिन्हांच्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला, आणि ते चिन्ह म्हणून वापरण्याची परवानगी दिल्याचं, एका पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आपलं म्हणणं ऐकून घ्यावं असं कॅव्हेट एकनाथ शिंदे यांनी दाखल केलं आहे. याप्रकरणी आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
****
महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक औद्योगिक, प्रगतीशील आणि वेगाने विकसित होणारं राज्य असून, सध्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचे शिखर गाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका विकास महामंडळ- एन आय सी डी सी च्या चौथ्या गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत ते बोलत होते. महिला उद्योजक, स्टार्टअप यांचा देशातल्या वाढत्या उद्योजकतेत महत्त्वाचा सहभाग असून, जगाचं ग्रोथ इंजिन म्हणून आपला देश काम करत असल्याचं गोयल यांनी नमूद केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या��ेळी बोलताना, औरंगाबाद इथल्या ऑरिक सिटीत उद्योगांसाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेट देण्याचं आवाहन, उद्योजकांना केलं. ऑरिक सिटीमध्ये एक उत्तम परिसंस्था तयार केली आहे. याठिकाणी ‘प्लग’ आणि ‘प्ले’ यासारख्या सुविधा तयार आहेत. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग हा आतापर्यंतचा सर्वात स्मार्ट एक्सप्रेस-वे असून, ऑरिक सिटी ही सर्वात स्मार्ट औ���्योगिक वसाहत असल्याचं, फडणवीस म्हणाले. एक्सप्रेसवेसोबत बंदरांशी जोडणी, रेल्वेचे उत्तम जाळे, तसंच विमानतळाचं नियोजित विस्तारीकरण याबाबत त्यांनी माहिती दिली.
गुंतवणूकदारांच्या या चौथ्या गोलमेज परिषदेत, देशभरातल्या ग्रीनफिल्ड औद्योगिक शहरांत होत असलेला विकास दर्शवला जाणार आहे. राज्यात सध्या औरंगाबाद, रायगड, सातारा आणि नागपूर या चार ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहरांचा विकास करण्यात येत आहे.
****
पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत सात दिवस म्हणजे १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी सक्तवसुली संचालनालय -ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी झाली होती. मात्र न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी कालपर्यंत स्थगित केली होती. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं राऊत यांच्या कोठडीत सात दिवसांसाठी वाढ केली. पत्राचाळ प्रकरणी ईडीने राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्याच्या निर्णयाविरोधात, सक्तवसुली संचलनालय-ईडीने, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीशांच्या पीठासमोर ही याचिका दाखल केली. याप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात देशमुख यांना जामीन मंजूर करत, त्यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याची टिप्पणी केली होती.
दरम्यान, अनिल देशमुख यांना खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मुंबई सत्र न्यायालयानं दिली आहे.
****
नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या अपघात प्रवण क्षेत्रांच्या बाबत अभ्यास करून तोडगा काढला जाईल, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं आहे. नाशिक इथं परवा झालेल्या बस जळीत अपघातातल्या जखमींची काल त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, त्यानंतर त्या बोलत होत्या. खाजगी बस कंपन्यांनी रस्ता सुरक्षेच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असून, नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अपघात प्रवणक्षेत्रांच्या ठिकाणी तात्काळ सुधारणा कराव्यात, असे निर्देश केंद्रीय रस्ते, वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
****
केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषीविषयक योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि गरजू शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याला प्राधान्य द्यावं, अ��े निर्देश, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. ते काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. पीक पद्धती आणि विपणन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, आंतरपीक प्रात्यक्षिकं, प्रमाणित बियाणे वाटप, विद्यापीठ संशोधक आणि शेतकरी समन्वय, आदी महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देण्याची गरज, सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अधिक प्रयत्न होणं आवश्यक असून, कृषी विभाग आणि इतर संलग्न विभागांनी एकत्रितपणे योग्य समन्वय ठेवून आणि जलद गतीने काम करण्याची अपेक्षा, त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याची घोषणा काल तिन्ही पक्षांच्या वतीने करण्यात आली. शिवसेना सचिव अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १३ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, यावेळी तिन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते उपस्थित राहतील, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल मातोश्री इथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, या निवडणुकीसाठी शिवसेनेला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश प्रवक्ते राजु वाघमारे उपस्थित होते.
****
समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिव देहावर आज उत्तरप्रदेशात सैफई या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. यादव यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते.
मुलायम सिंह यादव यांनी १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. ते तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री पदही भूषवल होतं. मुलायम सिंह हे उत्तर प्रदेशातल्या यादव समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जातात.
****
विडी कामगारांसाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या राजूबाई केशव कनकट्टी ऊर्फ कनकट्टी अम्मा यांचं काल सोलापूर इथं निधन झालं, त्या ९२ वर्षांच्या होत्या. पद्मशाली समाजातली कर्तृत्ववान महिला अशी ओळख असलेल्या कनकट्टी अम्मा यांनी, पद्मशाली महिला मंडळ, लक्ष्मीबाई दासरी प्राथमिक शाळा, कनकट्टी इंग्लिश स्कूल, इंदिरा महिला सहकारी बँक यासारख्या अनेक संघटना उभ्या करून, सर्वसामान्य महिलांच्या सक्षमीकरणासाठी भरीव काम केलं. सोलापूर इथं नगरसेवक म्हणून तसंच भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. कनकट्टी अम्मांच्या निधनाबद्दल सोलापूर आणि परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
****
औरंगाबाद शहरात शहर बसमधून डोकावणाऱ्या विद्यार्थ्याचं डोकं खांबाला धडकल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारी औरंगपुऱ्यातल्या जिल्हा परिषद मैदानासमोर ही घटना घडली. सरस्वती भुवन शाळेत शिकत असलेल्या या विद्यार्थ्याचं नाव हरीओम पंडित असं आहे. शाळा सुटल्यानंतर तो जिल्हा परिषद मैदानावरून स्मार्ट शहर बसनं बजाजनगरकडे निघाला होता. खिडकीतून डोकं बाहेर काढून बघत असताना अचानक भिंत आणि खांबाची त्याच्या डोक्याला धडक बसली. यात हरिओम रक्तबंबाळ होऊन कोसळला. त्याला बसचे चालक-वाहक आणि प्रवाशांनी घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
औरंगाबाद महापालिका प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, औरंगाबाद शहर बस प्रशासनाकडून मुलाच्या कुटंबियाना शक्य तेवढी मदत करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.
****
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित काल औरंगाबाद इथं दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते बालकांना जंतनाशक गोळ्या देऊन या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातल्या सर्व संबंधित पालकांनी आपल्या पाल्यास जंतनाशक गोळी द्यावी तसंच या पासून आपले पाल्य वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचं आवाहन मीना यांनी यावेळी केलं.
नांदेड जिल्ह्यातल्या बालकांना जिल्हा शासकीय रूग्णालयात जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. भोकर इथं जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेतही जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आल्या. हिंगोली तसंच जालना इथंही जंतनाशक मोहिमेला कालपासून प्रारंभ झाला.
****
गुजरातमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पदक तालिकेत महाराष्ट्रानं दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. ३४ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ५६ कांस्य पदकासह राज्यातल्या खेळाडूंनी एकूण १२६ पदकांची कमाई केली आहे. सैन्य दल ५३ सुवर्ण, ३३ रौप्य आणि २९ कांस्य पदकं मिळवून पहिल्या, तर ३२ सुवर्ण पदकांसह हरयाणा तिसऱ्या स्थानावर आहे.
मुष्टीयुद्ध स्पर्धेत महाराष्ट्राचे निखिल दुबे आणि रेनॉल्ड जोसेफ पुढच्या फेरीत पोहोचले आहे, तर अनुज कुकरेटी पराभूत झाला. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत काल महाराष्ट्राच्या संघाला उत्तर प्रदेशकडून पराभव पत्करावा लागला. महिलांच्या सॉफ्टबॉलमध्ये देखील केरळनं महाराष्ट्राला पराभूत केलं.
****
बांग्लादेश मध्ये सुरु असलेल्या महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघानं थायलंड संघावर नऊ फलंदाज राखत विजय मिळवला. या विजयासोबतचं भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. थायलंड संघाच्या सर्व फलंदाज सोळाव्या षटकांत ३७ धावांवर बाद झाल्या. भारतीय संघानं हे लक्ष्य अवघ्या सहा षटकात पूर्ण करत विजय मिळवला. या स्पर्धेत भारतीय महिला संघ आठ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामान्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज दिल्लीत खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघ एक - एक सामना जिंकून मालिकेत बरोबरीत आहेत.
****
औरंगाबाद शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून विकास कामं करण्याचं आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिलं आहे. औरंगाबाद शहरात समता नगर इथं कराड यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांची सुरुवात करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मलनि:सारण वाहिकेच्या कामाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं.
****
भारताला खरा धोका हा चीन पासून असला तरी दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता फार कमी आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक दिवाकर देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड इथं नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्राच्या वतीने 'भारताची भू-राजनीती' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते काल बोलत होते. युद्धाची शक्यता कमी असली तरी दोन्ही देशांमधील सीमावाद पाहता भारत आणि चीनमधील असलेला तणाव कायम राहील, असं ते म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या देवकुरुळी इथल्या श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज या गुळ पावडर उत्पादक कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ काल माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते झाला. गुळ पावडर उत्पादक कारखान्यांना इथेनॉल सारख्या उपपदार्थांची निर्मिती करणं गरजेचं असून, केंद्र आणि राज्य सरकारने गुळ पावडर कारखान्यांना उपपदार्थांची निर्मिती करण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही ठाकूर यांनी यावेळी दिली.
****
जालना इथं काल बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी लाल बावटा संघटनेच्यवतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस देण्यात यावा, कामगारांच्या पाल्यांना मिळणारी थकित शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, आदी मागण्यांचं निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळानं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं अनेक जल प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे पेनटाकळी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून, यातून एकूण एक हजार ४९४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.
****
औरंगाबाद आणि बीज जिल्ह्यात काल दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १५ जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
अग्निपथ योजनेच्या माध्यमातून चार वर्ष सैन्य दलात नोकरी केलेल्या अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि आसाम रायफल्स मध्ये भरती करताना प्राथमिकता देण्याचा निर्णय गृह मंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली. अग्निपथ योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शी निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या योजनेमुळे प्रशिक्षित युवक देशाची आणि सुरक्षा आणि सेवेत योगदान देऊ शकतील, असं शहा यांनी नमूद केलं.  
****
फाईव्ह जी स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हा लिलाव पुढच्या महिन्यापासून सुरू होणार असून, हा लिलाव पुढील २० वर्षांसाठी असेल. सध्याच्या फोर जी स्पेक्ट्रमच्या तुलनेत फाईव्ह जी चा माहिती वहनाचा वेग दहा पट जास्त असेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली इथल्या कथित बेकायदेशीर रिसॉर्टच्या आर्��िक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालय - ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. ईडीनं गेल्या महिन्यात या प्रकरणी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी छापे मारले होते आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
****
राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या तसंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये शिवसेना सहभागी होत आहे. शिवसेनेच्या वतीनं उद्योगमंत्री सुभाष देसाई या बैठकीत सहभागी होणार आहेत. नवी दिल्ली इथं आज दुपारी ही बैठक होणार असून, देसाई नवी दिल्लीला रवाना झाले आहेत.
****
उन्���ाळी सुट्ट्या संपून आजपासून सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली. बीड जिल्ह्यात विद्यार्थ्यांचं फुलं, फूगे देऊन तसंच नविन वर्षाची पुस्तकं देऊन स्वागत करण्यात आलं. जिल्ह्यात आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची कमालीची उपस्थिती असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीनं राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. कोविडच्या कालावधीतही आपल्या राज्याने देशातलं सर्वात जास्त युनिट रक्त संकलन केलं आहे, ही बाब अतिशय महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले. रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जाईल, असं टोपे यांनी सांगितलं.
****
चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी राज्य वस्तू आणि सेवाकर विभागानं मुंबईतल्या एका व्यावसायिकाला अटक केली आहे. घाटकोपर इथल्या जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनीचे संचालक हितेश पटेल यांनी जवळपास ५० कोटींची खरेदी दाखवून ११ कोटी १९ लाख रुपयांची चुकीची कर वजावट दाखवल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. राज्य वस्तू आणि सेवाकर विभागानं चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी १९ जणांना अटक केली आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या जाधववाडी मंडी इथं ३०० हून अधिक शहर बसेससाठी अत्याधुनिक बस आगाराच्या बांधकामास सुरुवात झाली असून, या वर्षअखेरीस हे बस आगार तयार होईल, अशी माहिती महापालिकेच्या स्मार्ट सिटी बस विभागानं दिली आहे. हे बस आगार सात एकरांवर पसरलेलं असून २५० डिझेलवर चालणाऱ्या बसेस आणि ५० इलेक्ट्रिक बसेसच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसंच कार्यशाळा, प्रशासकीय कार्यालय, मेकॅनिक, चालक आणि वाहकांसाठी विश्रांती कक्ष आणि मुख्य चालन व्यवस्थापकाचं कार्यालय या शहर बस आगारात असणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात घडणारे सायबर गुन्हे रोखणं, महिला सुरक्षा जनजागृती यासह ग्राहक तक्रार दिनाचं आयोजन करुन नागरिकांशी संवाद ठेवत कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य देणार असल्याचं नुतन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. जिल्हा पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते काल बोलत होते. गुन्हेगारांवर कायद्याचं नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भालाफेकपटू नीरज चोप्रानं फिनलंडमध्ये सुरू असलेल्या पाव्हो नुर्मी क्रीडास्पर्धेत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. नीरजने या स्पर्धेत ८९ पूर्णांक ३० मीटर अंतरावर भाला फेकला. यासोबतच या स्पर्धेतलं रौप्यपदकही त्याने पटकावलं आहे. याआधीचा त्याचा विक्रम ८८ पूर्णांक सात मीटरचा होता. या यशाबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी नीरजचं अभिनंदन केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 June 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० जून २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजनेची येत्या ३१ जुलैपर्यंत अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य सरकारांना निर्देश.
·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १९ जुलैपासून प्रारंभ.
·      आगामी गणेशोत्सवासाठी राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी; गणपती आगमन तसंच विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई.
·      कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी महिला आणि बाल विकास विभागानं घेतली तर पदवी-पदव्युत्तर शिक्षणाचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
·      राज्यात आठ हजार ८५ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १५ जणांचा मृत्यू तर ३८४ बाधित.
·      बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या इरफान शेखला उत्तरप्रदेश दहशतवादी विरोधी पथकाकडून अटक.
आणि
·      मराठवाड्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अठरा कामं, कमकुवत कंत्राटदार आणि एजन्सीधारकांमुळे अपूर्ण - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण.
****
‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेची अंमलबजावणी येत्या ३१ जुलै पर्यंत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. तसंच कोविड-19 ची साथ सुरु आहे तोपर्यंत स्थलांतरित मजुरांना अन्नाचा पुरवठा सुरु ठेवावा, कम्युनिटी किचनही सुरु ठेवावं, असंही न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे स्थलांतरीत कामगारांच्या सोयी-सुविधांसंदर्भात संबंधित राज्य सरकारांनी उत्तम नि��ोजन करण्याच्या सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान घेण्याची शिफारस संसदीय कामकाज समितीनं केली आहे. अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी समितीनं गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती. या अधिवेशनादरम्यान अनेक विधेयकं सादर करण्यात येणार आहेत.
****
आगामी गणेशोत्सवासाठी राज्यशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सा��्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींची उंची चार फूट, तर घरगुती गणेश मूर्तींची उंची दोन फुटांपर्यंत असण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरगुती गणेश मूर्ती धातू अथवा संगमरवरी असण्याला प्राधान्य द्यावं, असं सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना गणपती आगमन तसंच विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. घरगुती गणपतींचं विसर्जन शक्यतो घरीच करावं, लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाच्या कृत्रिम तलाव परिसरात जाऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव काळात भाविकांची गर्दी होणार नाही, याकडे लक्ष द्यावं, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरांसारखे आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत, ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
****
कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम, महिला आणि बाल विकास विभाग हाती घेत आहे. यासाठी काल महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दोन सामंजस्य करार करण्यात आले. कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांचं शालेय शुल्क, त्यांना शिक्षणाकरता लागणारे टॅब, लॅपटॅाप अशा गोष्टी उपलब्ध करुन दिल्या जाणार असून, यासाठी प्रोजेक्ट मुंबई या संस्थेसोबत सामजंस्य करार करण्यात आला. यशोमती ठाकूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली, त्या म्हणाल्या –
जी लेकरं आहेत ज्यांनी आपले आईवडील गमावलेले आहेत, त्या लेकरांच्या पुढच्या तीन वर्षांच्या फीसची व्यवस्था आम्ही करतो आहोत शैक्षणिक. त्याच्यासोबतच या बाळांना सायकॉलॉजिकली मदत कशी करता येईल, याचं देखील आम्ही बघतो आहे. त्यांना टेक्नॉलॉजिकली लॅपटॉप असो किंवा अँड्राईड फोन्स असो, किंवा यायला जायला सायक्लस जर लागल्या, तर सायकल्स असो, याची व्यवस्था आम्ही करणार आहोत.
****
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या मुलांचं पदवी/पदव्युत्तर शिक्षण पुर्ण होईपर्यंतचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत ही घोषणा केली. विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क आणि विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही, परंतू इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही, त्या बाबींसाठी आकारण्यात येणारं शुल्क पुर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा आणि ग्रंथालय शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल, असंही सामंत यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. संसद आणि विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
****
राज्यात काल आठ हजार ८५ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६० लाख ५१ हजार ६३३ झाली आहे. काल २३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २१ हजार ८०४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक एक दशांश टक्के झाला आहे. काल आठ हजार ६२३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५८ लाख नऊ हजार ५४८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख १७ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३८४ कोविड बाधितांची नोंद झाली, तर १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातल्या सहा, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, लातूर दोन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा मृतांमधे समावेश आहे.
बीड जिल्ह्यात १७० रुग्ण आढळले. औरंगाबाद ९१, उस्मानाबाद ५३, लातूर २९, परभणी २५, जालना ११, तर हिंगोली जिल्ह्यात पाच नवे रुग्ण आढळून आले. नांदेड जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यात काल प्रथमच एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला नाही, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात शासनानं जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केलं. ते काल हिंगोली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २४ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या संवाद दौऱ्याच्या या दुसऱ्या टप्प्यात, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली हे चार जिल्हे, आणि यातील २३ मतदारसंघाचा आढावा घेतल्याचं, त्यांनी सांगितलं.
दरम्यान, जलसंपदा मंत्री पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा हिंगोली वरून वसमतकडे येत असतांना, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही काळ अडवला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मागणीचं निवेदन जयंत पाटील यांच्याकडे सादर केल्याचं, आमच्या वार्तारानं कळवलं आहे.
****
बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणी उत्तरप्रदेश दहशतवादी विरोधी पथकानं बीड जिल्ह्यातल्या इरफान शेख नावाच्या तरुणाला दिल्लीतून अटक केली. परळी तालुक्यातल्या शिरसाळा इथला रहिवासी असलेला इरफान हा केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागात मुकबधीर मुलांसाठी सांकेतिक संवाद दुभाषा म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूकबधीर लोकांना पैशाचं अमिष दाखवून, धर्मांतरण करण्यात येत होतं. या धर्मांतरणासाठी आयएसआय या पाकिस्तानी संघटनेकडून पैसा पुरवला जात असल्याचं, समोर आलं आहे.
****
औरंगाबाद नजिक वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याबाबत, सिडकोनं केलेला ठराव रद्दबातल करण्यासाठी दाखल याचिकेच्या अनुषंगानं, मुंबई उच्च न्यायालयानं, सिडको प्रशासन आणि औरंगाबाद महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा ठराव करून, सिडको प्रशासनानं हा भाग औरंगाबाद महानगरपालिकेकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्र दिलं आहे.
****
वैश्विक समस्यांच्या बाबतीत भारतानं नेहमीच दिशादर्शक भूमिका घेतली आहे, कोविड प्रादुर्भावामुळे उदभवलेल्या सद्यस्थितीतही भारतानं सभ्यता, मानवता आणि संवदेनशीलतेचं दर्शन घडवलं, असं प्रतिपादन बिहारमधल्या मोतीहारी इथल्या महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु, डॉ संजीवकुमार शर्मा यांनी केलं आहे. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनारमध्ये, बीजभाषणात डॉ.शर्मा बोलत होते. नैनीताल इथल्या कुमाऊं विद्यापीठाचे डॉ.मधुरेंद्र कुमार, दिल्ली विद्यापीठातले डॉ.प्रकाश सिंग यांच्यासह सुमारे ३६० जणांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला, तर ९० संशोधकांनी आपले शोधनिबंध यावेळी सादर केले.
****
मराठवाड्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची २४ पैकी अठरा कामं, कमकुवत कंत्राटदार आणि एजन्सीधारकांमुळे अपूर्ण राहिली आहेत, असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशो��� चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर आपण मराठवाड्यातल्या या चोवीस कामांबाबत चर्चा केली असून, काही एजन्सी धारकांच्या कामांबद्दल आक्षेप नोंदवले आहेत, केंद्र आणि राज्य सरकारकडून या रस्त्यांच्या कामांच्या पूर्ततेबाबत लवकरच निश्चितच मार्ग काढला जाईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
दरम्यान, परभणी तालुक्यातल्या तीर्थक्षेत्र त्रिधारा पाटीपासून ते उखळद-पिंपरी देशमुख -मिरखेल, या १४ किलोमीटर मार्गाच्या कामाचा आणि परभणी इथल्या सावली या शासकीय विश्रामगृहाच्या दुसऱ्या मजल्याच्या कामाचा प्रारंभ, काल चव्हाण यांच्या हस्ते झाला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठा काल सायंकाळी चार वाजता बंद झाल्या. व्यापाऱ्यांनी कोविड नियमांचं पालन करत सर्व बाजारपेठा बंद केल्या. पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दुपारी साडे तीन वाजेपासूनच व्यापाऱ्यांना आस्थापना बंद करण्यासंबंधी सूचना दिल्या जात होत्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात सांयकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी, आणि त्यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू असून, शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद असणार आहेत.
दरम्यान, औरंगाबाद ��हरातल्या सर्व पेट्रोलपंपांवर सर्वसामान्य नागरिकांना, सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंतच इंधन मिळेल, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मात्र त्यानंतरही इंधन पुरवठा सुरू राहणार असल्याचं, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोविड प्रतिबंधाक लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. आज नांदेड शहरात १२ तर ग्रामीण भागात ९० अशा एकूण १०२ केंद्रातून लस देण्यात येणार आहे. कोविशिल्ड ही लस पहिला आणि दुसरा तर कोव्हॅक्सिन लसीचा फक्त दुसरा डोस देण्यात येणार असून, पात्र व्यक्तींनी लसीकरण करुन घेण्याचं आवाहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल एकूण आठ हजार ८१ जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातल्या सात हजार ४९२ जणांनी, तर शहरात ५८९ जणांनी लस घेतली. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख २६ हजार ७११ जणांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालं असल्याचं, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा योजनांचं वीज बील थकल्यामुळे, महावितरण कंपनीने नांदेड महापालिकेचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा योजनांची, एकूण ५४ कोटी सहा लाख रूपयांची थकबाकी महानगरपालिकेकडे आहे, महावितरणची आर्थिक परिस्थिती खालावल्याने थकबाकी वसूल करण्याशिवाय पर्याय नसल्याचं, महावितरणनं म्हटलं आहे. वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत शहराला पाणी पुरवठा होऊ शकणार नसल्याचं, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी बंधाऱ्याच्या एका दरवाजातून, १६ हजार ६३५ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं, पाणी काल सोडण्यात आलं. धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या दिग्रस बंधारा तथा पूर्णा नदी मधून चालू पाण्याच्या विसर्गामुळे, प्रकल्पात येणारी पाण्याची आवक तसंच सततचा पाऊस लक्षात घेता, पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं.
****
राज्यात मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढचे तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 May 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणीस्तानचं नागरिकत्व असणाऱ्या, पण अनेक वर्षे भारतात गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा आणि पंजाब या राज्यातल्या १३ जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या, विविध अल्पसंख्यांक नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी, अर्ज करण्याच आवाहन, केंद्र सरकारनं केलं आहे. नागरीकत्व अधिनियम १९५५ नुसार हा आदेश लागू करण्यासंबंधी केंद्रीय गृह मंत्रालयानं अधिसूचना जारी केली आहे.
****
कोविडसंदर्भात उपयोगात येणारी औषधं, लस, वैद्यकीय उपकरणे, आरोग्यविषयक सेवा आदींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर अधिकाधिक सवलत देण्यात यावी, अशी मागणी, अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची ४३वी बैठक काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी पवार यांनी मागणी केली. केंद्र सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या इंधनावरील विविध उपकर आणि अधिभारांच राज्यांना सुयोग्य वाटप व्हावं, कोरोना संकटाचा सामना करण्याबरोबरच राज्यांचे अर्थचक्र सावरण्यासाठी केंद्राकडून मदत आणि सकारात्मक सहकार्याची अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
म्यूकरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीवरील औषधांवरील सीमा शुल्क तसंच वस्तू आणि सेवा करावर देण्यात आलेल्या सवलतींना मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सीन लसीची उत्पादन क्षमता जुलै-ऑगस्ट महिन्यात सहा ते सात पटींनी वाढवण्यात येणार आहे. आत्मनिर्भर भारतच्या मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत कोव्हॅक्सीनची उत्पादन क्षमता वाढवली जाणार आहे. जैव तंत्रज्ञान विभागाद्वारे हे अभियान राबवलं जात आहे.
****
राज्यातल्या ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची नावाशिवाय जन्म नोंदणी झाली आणि त्याला १५ वर्षे झाली आहेत, अशांनी जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करून घ्यावी, असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. यामध्ये १९६९ पूर्वीच्या जन्म नोंदणींचा देखील समावेश असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं.
****
राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये खेलो इंडिया केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती, क्रिडामंत्री सुनील केदार यांनी दिली. केदार यांनी काही दिवसांपूर्वीच नवी दिल्ली इथं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन, महाराष्ट्रातलं क्रीडा धोरण आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाबाबत चर्चा केली होती. देशभरात सर्वत्र क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारच्या सहकार्याने, क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया केंद्र सुरू करण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून तीन कोटी ६० लाख इतकं अर्थसहाय्य प्राप्त होणार असल्याचं केदार यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारला उद्या ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावांमध्ये कोरोना निवारणासाठी सेवाकार्य करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी ही माहिती दिली. कोविडच्या पार्श्वभूमीवर कोणताही उत्सव होणार नाही, मात्र कोविड योद्ध्यांचा सत्कार, सेवाकार्य करणाऱ्यांना आवश्यक साहित्य, कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची १२ वीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी, तसंच रक्तदान शिबीरं घेण्यात येणार असल्याचं, काळे यांनी सांगितलं.
****
पालघर जिल्ह्यातल्या उमरोळी गावात ग्रामपंचायत, गावातले सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या सर्वांच्या लोक सहभागातून १२ खाटांचं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. कोरोना विषाणूची सौम्य लक्षणं असलेल्या किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी, ज्यांना गृह विलगीकरणात राहणं शक्यं नाही, अशा रुग्णांसाठी हे सेंटर उभारण्यात आलं आहे. या सेंटर मध्ये रुग्णांसाठी दोन डॉक्टर्स आणि काही आशा वर्कर्स आपली सेवा देणार आहेत.
****
ज्यादा दराने खत विक्री करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या सात खत विक्रेत्यांवर कृषी विभागानं कारवाई केली आहे. यात देवळा तालुक्यातल्या तीन, नांदगाव तालुक्यातल्या दोन, तर मालेगाव आणि सिन्नर तालुक्यातल्या प्रत्येकी एका विक्रेत्याचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा २४ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
परभणी शहरात टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांविरोधात विविध ठिकाणी महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ३३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
****
दुबई इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत अमित पंघाल आणि शिवा थापा यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पंघाल यानं कझाकिस्तानच्या, तर थापा यानं ताजिकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.
*****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर नोंदणी तसंच समूह नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय  
** भारत बायोटेकच्या कोविड बूस्टर डोसचं परीक्षण सुरू; पॅनेसिया बायोटेक कंपनी स्पुतनिक लसीचं उत्पादन करणार
** बीड जिल्ह्यात उद्या रात्रीपासून ३१ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू होणार
आणि
** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं स्वखर्चातून उभारलं सुसज्ज कोविड सुश्रुषा केंद्र
****
१८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर नोंदणीची तसंच समूह नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार हा निर्णय घ्यावा, लसीच्या मात्रा वाया जाऊ नयेत, आणि नागरिकांचं लसीकरण व्हावं, हाच या मागचा उद्देश आहे. फक्त शासकीय लसीकरण केंद्रांवरच ही सुविधा उपलब्ध असेल. खासगी लसीकरण केंद्रांना मात्र लसीकरण कार्यक्रम जाहीर करून, ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. कोविन ॲपवर सध्या एका मोबाईलवरून चार जणांची नोंदणी करता येते, मात्र ज्या नागरिकांना मोबाईल किंवा इंटरनेट वापराला मर्यादा आहेत, त्यांना या ॲपवरून समूह नोंदणी करून लसीकरणाची वेळ घेता येणार आहे. लसीकरण केंद्रावर नोंदणीचा निर्णय घेताना, केंद्रांवर गर्दी होणार नाही, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला द्यावेत, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत बायोटेक कंपनीने कोविड लसीच्या बूस्टर डोसचं परीक्षण सुरू केलं आहे. औषध महानियंत्रकांनी बूस्टर डोसचं परीक्षण करण्याची परवानगी दिल्यानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सच्या दिल्ली तसंच पाटणा इथल्या रुग्णालयात हे परीक्षण केलं जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या परीक्षणात सहभागी नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीची दुसरी मात्रा घेतल्याच्या सहा महिन्यांनंतर बुस्टर ड��स दिला जाणार आहे.
दरम्यान, पॅनेसिया बायोटेक ही भारतीय जैव तंत्रज्ञान कंपनी रशियाच्या स्पुतनिक या कोविड लसीचं उत्पादन करणार आहे. स्पुतनिक व्ही या लसीच्या दरवर्षी दहा कोटी मात्रांचं उत्पादन करण्याची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेश जैन यांनी केली आहे.
****
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसीच्या २१ कोटी ८० लाख ५१ हजार ८९० मात्रा दिल्या आहेत. यापैकी २० कोटी ८ हजार ८७५ मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही एक कोटी ८० लाख ४३ हजार मात्रांचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय, ४८ लाखाहून अधिक मात्रा सध्या पुरवठा प्रक्रियेत असून, येत्या ३ दिवसांत त्या राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध होतील, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
नागपूर जिल्ह्यात कोविडमुळे कुटूंबातल्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झालेला असल्यास अशा मुलांचं पालकत्व जिल्ह्यातली श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट घेणार आहे. या मुलांचं शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, कौशल्य विकासाची संपूर्ण जबाबदारी ट्रस्टनं स्वीकारली असल्याची माहिती माजी महापौर संदीप जोशी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय, पालक गमावलेल्या उपवर मुलींचा विवाह लावून देण्याचा या संस्थेचा प्रयत्न आहे. क्रीडा प्रशिक्षक, कलाकारांना किट्सचं वाटप करण्यात येणार अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिली.
****
नाशिक जिल्ह्यात १२ दिवसांचे कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर आज बाजार, उद्योग सुरू झाले. गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू झाल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत आज लिलाव सुरू होताच कांद्याला प्रतिक्विंटल किमान सातशे तर जास्तीत जास्त १ हजार ४८१ रुपये दर मिळाला.
****
सातारा जिल्ह्यात आज रात्री १२ वाजेपासून १ जूनच्या सकाळी  ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. या काळात राज्य परिवहन मंडळाच्या सेवा तसंच सर्व सहकारी बँक, पतसंस्था बंद राहणार आहेत. भाजी, किराणा तसंच इतर सर्व बाजारपेठा देखील बंद राहणार असून दूध वितरणासाठी सकाळी ७ते ९ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यात उद्या २५ तारखेच्या रात्री १२ वाजेपासून ३१ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज यासंदर्भातले आदेश जारी केले. औषधी दुकानं, आरोग्यसेवा, तसंच इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापनं या काळात बंद राहणार आहेत. भाजीपाला विक्री सकाळी ७ ते ९ या वेळेत तर दूधविक्री सकाळी ७ ते १० या वेळेत सुरू असेल. स्वस्त धान्य दुकानं आणि कृषी निविष्ठा सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहतील. ज्या नागरिकांना लसीकरणाबाबत मोबाईलवर संदेश आलेला आहे, अशांना या काळात लस घेण्यासाठी परवानगी असणार आहे.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज १४ कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ रुग्णांचा समावेश असून अहमदनगर जिल्ह्यातल्या तीन आणि नाशिक, जळगाव इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या पाच हजार ५५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पाच लाख ५१ हजार ३४२ जणांनी कोविडचे दोन्ही डोस घेतल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात आज ८२४ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड २०१, आष्टी १८२, केज ७८, पाटोदा ६५, अंबाजोगाई ५७, गेवराई ५४, माजलगाव ५१, शिरुर ४९, धारुर ४४, वडवणी २२ आणि  परळी इथल्या २१ रुग्णांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद शहरानजिक असणाऱ्या आदर्श पाटोदा ग्रामपंचायतनं स्वखर्चातून गावातील जिल्हा परिषद शाळेत सर्व सुविधांनी युक्त कोविड केअर सेंटर स्थापन केलं आहे. सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे आणि ग्राम विकास अधिकारी पुंडलिक पाटील यांच्या संकल्पनेतून गावात हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. गावातील ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचं ग्राम विकास अधिकारी पुंडलिक पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले….
प्राथमिक सर्व आरोग्याच्या ज्या सुविधा लागतील त्या आम्ही इथं ठेवलेल्या आहेत. खाजगी डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे, आणि त्याचं पेमेंट ग्रामपंचायत करते.होम आयासोलेशनचा ज्यांना सल्ला दिला जातो. तर इथे त्यांना ॲडमिट करुन त्यांची देखरेख या डॉक्टरांच्या अधिपत्याखाली करुन आणि मग त्याची ट्रीटमेंट करण्याची सुविधा आम्ही इथं केली .त्याच्या मागचं कारण असं आहे की, तो जर गावात पेशंट राहिला तर त्याचं मनोधैर्य मजबूत होतं आणि तो लवकर कव्हर होण्याच्या दृष्टीकोनातून म्हणून हे क्वारांटाईन सेंटर स्थापन करण्याची आमची संकल्पना होती. असंच जर इतर ग्रामपंचायतीनं केलं तर जो सरकारी यंत्रणेवर ताण येतो आहे. तो कमी होवून पेशंटची संख्या कमी होईल व कोरोना हा लवकरात लवकर हा हद्दपार होवू शकतो. एव्हढं आवाहन मी पाटोदा ग्रामपंचायतच्या वतीनं करतो.
 ****
टाळेबंदीच्या काळात परभणी जिल्ह्यातल्या ऑटो रिक्षा मालकांकडून बँका किंवा फायनान्स कंपन्या करत असलेली कर्जाची हप्ते वसुली तत्काळ थांबवावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना आज याबाबत एक निवेदन सादर करण्यात आलं. राज्य शासनानं चालू वर्षी दीड हजार रुपये मदत केली, मात्र ती तुटपुंजी आहे. या वर्गाची आर्थिक स्थिती सध्या नाजुक असल्यामुळे सक्तीची हफ्ते वसुली तत्काळ थांबवावी अशी मागणी संघटनेनं केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण पूर्णपणे रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी म्हटलं आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत बोलत होत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ६२ शतांश टक्क्यांवर आला आहे, कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपचारांच्या नियोजनसह प्रशासन सज्ज असल्याचं गव्हाणे यांनी सांगितलं.
//*********//
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** ग्रामीण भागात सुमारे बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या भुखंडावरच्या बांधकामांना नगर रचनाकाराच्या परवानगीची गरज नाही- ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची घोषणा
** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे १६ नवे रुग्ण, तीन रुग्णांचा मृत्यू
** समाज माध्यम कंपन्यांनी अनुपालन अधिकारी, मुख्य तक्रार अधिकारी आणि निवासी तक्रार अधिकाऱ्यांची तात्काळ नेमणूक करण्याचे सरकारचे आदेश
आणि
** तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा डाव १४५ धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डावही गडगडला
****
राज्यातल्या ग्रामीण भागात सुमारे बत्तीसशे चौरस फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगर रचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नसल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मुंबईत केली. सुमारे सोळाशे चौरस फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थाला मालकी कागदपत्र, तसंच अन्य संबंधित महत्त्वाची कागदपत्रं ग्रामपंचायतीला फक्त सादर करावी लागणार असून आवश्यक विकास शुल्क भरावं लागेल. ही पुर्तता केल्यानंतर ग्रामस्थाला थेट बांधकाम सुरु करता येईल. ग्रामपंचायत पातळीवर अडवणूक होऊ नये यासाठी या पातळीवरची प्रक्रियाही खूप सोपी करण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे नगररचनाकाराच्या मंजुरीअभावी रखडलेल्या ग्रामीण भागातील बांधकामातील अडचणी दूर होणार असून त्यास चालना मिळेल. ग्रामस्थांना तळमजला अधिक दोन मजल्यापर्यंत बांधकाम करता येणार आहे, असंही त्यांनी सांगितले.
****
मुंबईत बिर्ला क्रीडा केंद्राचा पुनर्विकास करून मराठी रंगमंच कलादालनाची निर्मिती केली जात आहे, यातून मराठीरंगभूमीचा गौरवशाली इतिहास, वैशिष्ट्यं आणि वैभवशाली वाटचाल दृष्टिपथात यावी, या पद्धतीनं या रंगमंच कला दालनाचं काम व्हावं, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यांनी काल मराठी रंगमंच कला दालनाच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या संदर्भात स्थापन समितीमध्ये आदेश बांदेकर, विजय केंकरे, सुबोध भावे आदींचा समावेश आहे. कला दालनाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधीही दिला जाणार आहे.
****
देशात काल १६ हजार ७३८ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी दहा लाख ४६ हजार ९१४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५६ हजार ७०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ११ हजार ७९९ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी सात लाख ३८ हजार ५०१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ५१ हजार ७०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत एक कोटी २६ लाख ७१ हजार १६३ नागरीकांना कोविड लसीकरण करण्यात आल्याचं, आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
औरंगाबाद इथं आज १६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आज तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयात सद्यस्थितीत १८४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचार घेत असुन त्यापैकी ६५ रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
समाज माध्यम कंपन्यांनी अनुपालन अधिकारी, मुख्य तक्रार अधिकारी आणि निवासी तक्रार अधिकारी यांची तात्काळ नेमणूक करावी, असे दिशा निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारनं `ओटीटी`, `ऑनलाईन` माध्यमांसाठी नवीन नियमावली जारी केली असुन त्यानुसार या माध्यमांवर मजकूर प्रसारित करणाऱ्य़ांची माहिती देणं, माध्यमांच्या अधिकाऱ्यांना बंधनकारक राहील. त्यामुळे समाज माध्यमांचा दुरुपयोग करणाऱ्यांना धाक बसेल, असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला. यावेळी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर हे देखील उपस्थित होते.
****
राज्यात कोरोना विषाणू ��ंसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर त्या थांबवून ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकांना परवानगी देणारा यापूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला आहे.
****
वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी देवस्थानचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकोणविस जणांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. यामध्ये महंत कबिरदास यांच्या कुटुंबातल्या तिघांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या तिथल्या दौऱ्यावेळी समर्थकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. त्यातून संसर्गाच्या संक्रमणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २८ फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७४वा भाग असेल.
****
इंग्लंडनं भारताविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज अहमदाबाद इथं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात सहा बाद ५६ धावा केल्या आहेत. अक्षर पटेल यानं पुन्हा भेदक मारा करताना चार गडी बाद केले आहेत. तत्पूर्वी, तीन बाद ९९ धावांवरुन पुढं खेळायला सुरुवात केलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव १४५ धावांमध्ये बाद झाल्यानं संघाला ३३ धावांची आघाडी मिळाली. रोहित शर्मानं सर्वाधिक ६६ धावा केल्या. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं केवळ आठ धावांमध्ये पाच गडी बाद केले तर जॅक लीचनं ५४ धावांत चार गडी बाद केले.
****
औरंगाबादमध्ये सिडकोतल्या नियोजित बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनासाठी प्रस्तावित प्रियदर्शिनी उद्यान सहा महिन्यानंतर शहराचं प्राणवायू उद्यान म्हणून ओळखलं जाईल, असं महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी म्हटलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थिती��ध्ये शहरातल्या पर्यावरण प्रेमीं नागरिकांच्या हस्ते या उद्यानात आज साडे तिनशे झाडांची लागवड करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. प्रियदर्शिनी उद्यानात एकही झाड न कापता हे उद्यान विकसित करण्यात येईल, अशी ग्वाही प्रशासक पांडेय यांनी यावेळी दिली.  
****
वस्तू आणि सेवा कर कायद्यातल्या कथित जाचक अटी आणि तरतुदी तसंच थेट परदेशी गुंतवणूक आणि औरंगाबाद महापालिकेच्या अस्थापना कराविरुद्ध जिल्हा व्यापारी महासंघानं उद्या बंदचा इशारा दिला आहे. औद्योगिक पुरवठादारांची संघटना, पेंट व्यावसायिकांच्या संघटनेनं एका निवेदनाद्वारे या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं कळवलं आहे.
****
होंडा कार्स या कंपनीच्या गाडीमध्ये त्रुटी आढळल्यानं ग्राहकाला आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्यामुळे ग्राहकाला जुनी गाडी परत घेत नवी गाडी देण्याचा आदेश लातुर जिल्ह्या ग्राहक मंचानं दिला आहे. गाडी प्रतिलिटर १९ किलोमीटर धावते या कंपनीच्या दाव्याविरोधात ग्राहकानं वितरकाकडे तक्रार केली होती. त्याला कुठलाही प्रतिलाद न मिळाल्यावर या ग्राहकानं लातूर जिल्हा ग्राहक मंचांकडे दाद मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्यातल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेला लोकसेवक आनंद हंबर्डे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. त्यांनं कंत्राटी सफाई कामगार म्हणुन कामावरून काढून न टाकण्यासाठी एकोणीसशे रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील पशुधनाला विविध साथीच्या आजारातून संरक्षण मिळावं आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरती पशू चिकित्सा वाहनं मिळाली असून त्यांचं लोकर्पण नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्या केलं जाणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं दिवंगत बाळासाहेब दीक्षित व्यासपीठ नामकरण समारंभ आणि ज्ञानसाधना केंद्राची स्थापना विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक सदस्य डॉ. अशोक कुकडे यांच्या हस्ते आज करण्यात आली.
//********//
0 notes