#तंबाखू उद्योग
Explore tagged Tumblr posts
Text
तंबाखू उद्योग जाहिरात बंदीचा तिरस्कार करीत आहे - तंबाखू उद्योग हे यासारख्या जाहिरातींवर बंदी आणत आहे
तंबाखू उद्योग जाहिरात बंदीचा तिरस्कार करीत आहे – तंबाखू उद्योग हे यासारख्या जाहिरातींवर बंदी आणत आहे
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घातल्यानंतर सिगारेट उत्पादक कंपन्या त्यांचा जाहिराती सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत. ते टिकटोक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी असे व्हिडिओ तयार करीत आहेत, ज्यामध्ये धूम्रपान ग्लॅमरिझ होते. विशेषतः ब्रिटीश अमेरिकन टोबॅको (बीएटी) कंपनीने असे…
View On WordPress
#ई सिगारेट#जागतिक हिंदी बातम्या#तंबाखू उद्योग#तंबाखूची जाहिरात#तंबाखूच्या जाहिराती#सोशल मीडियावर तंबाखूची जाहिरात#हिंदी मधील जागतिक बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 January 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि. ****
· बांधकाम प्रकल्पांना सर्व अधिमूल्यावर ५० टक्के सूट देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
· डिसेंबरअखेर पर्यंतच्या गुंठेवारी योजना नियमित; औरंगाबाद इथल्या कर्करोग रुग्णालयात रुग्ण खाटा वाढवण्याला मंजुरी.
· औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करणारी अधिसूचना काढा - मुख्यमंत्र्यांचं नागरी उड्डयन मंत्रालयाला स्मरणपत्र.
· कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आयटीआयचं अद्ययावतीकरण.
· दर्पण दिन काल सर्वत्र साधेपणानं साजरा.
· राज्यात चार हजार ३८२ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २१८ रुग्णांची नोंद.
आणि
· लातूर जिल्ह्यात तूर उत्पादकांना पीक विम्याची २५ टक्के रक्कम अग्रीम देण्याची विमा कंपनीला सूचना.
****
बांधकाम प्रकल्पांना सर्व अधिमूल्यावर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५० टक्के सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतला. जे प्रकल्प ही सवलत घेतील त्यांना त्यांच्या ग्राहकांचं संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे. बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी स्थापन दीपक पारेख समितीने सादर केलेल्या अहवालानुसार मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला. यामुळे घरांच्या किमती कमी होतील, असा विश्वास नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
****
राज्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना नियमित करण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी पात्रतेच्या कोणत्याही निकषांमध्ये अथवा अटींमध्ये बदल करण्यात आलेला नाही. राज्यात नियमित नसणाऱ्या अनेक गुंठेवारी योजनांना याचा लाभ होणार आहे. औरंगाबाद शहरातल्या ११८ वसाहतीतली स��मारे सव्वा लाख घरं या निर्णयामुळे नियमित होणार आहेत.
****
ग्रामीण भागात रस्ते बांधणी आणि दुरुस्तीसाठी केंद्र सरकारच्या ग्रामीण रस्ते विकास मंत्रालयासोबत सामंजस्य करार करायला राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या अंतर्गत राज्यात सहा हजार ५५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
****
कृषी पंपांसाठी सौर ऊर्जेचा वापर, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण २०१६ आणि फॅब प्रकल्पांकरिता प्रोत्साहनाच्या धोरणात सुधारणा, तसंच आरोग्य सेवा आयुक्तालयातंर्गत कार्यरत संस्थांमध्ये दोन अभ्यासक्रमांच्या समावेशाला मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयात रुग्ण खाटा वाढवण्याला तसंच नवीन पदनिर्मितीला कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या या रुग्णालयात असलेल्या रुग्णखाटांची संख्या आता १०० वरून २६५ होणार आहे. या रुग्णालयासाठी गट अ ते गट ड ची ३१६ नियमित तर ४४ बाह्यस्त्रोताने अशी एकूण ३६० पदे निर्माण होणार आहेत. यासाठी २४ कोटी ६४ लाख २४ हजार ७८८ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
****
औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयानं लवकरात लवकरात अधिसूचना काढावी, असं स्मरणपत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद��रीय नागरी उड्डयनमंत्री हरदिपसिंह पुरी यांना पाठवलं आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात याबाबतचा एकमतानं मंजूर झाला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार झाला आहे.
****
कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था-आयटीआयचं अद्ययावतीकरण केलं जाणार आहे. यासाठी साधारण ११ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी ८८ टक्के निधी उद्योग क्षेत्राकडून, तर राज्य शासनाकडून १२ टक्के निधी उपलब्ध होणार आहे. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत झालेल्या या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. लातूर इथले प्लास्टिक सर्जन डॉ विठ्ठल लहाने यांनी या मोहिमेत सहभागी होत, नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
प्रस्तावित शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने निमंत्रित महिला तसंच वकील सं��टनांसोबत विधीमंडळ समिती बैठका घेणार असल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ११ जानेवारीला नागपूर इथं, १९ जानेवारीला मुंबईत तर २९ जानेवारीला औरंगाबाद इथं बैठक होईल. या बैठकीला महिला संघटना तसंच वकील संघटना या निमंत्रित राहणार आहेत. या तीनही ठिकाणी दुपारी ३ वाजता महिला संघटनांसोबत तर सायंकाळी ५ वाजता वकील संघटनांसोबत बैठक होणार आहे. संबधीतांनी आपली मतं तसंच सूचना लेखी स्वरुपात सादर कराव्यात, असं देशमुख यांनी सांगितलं आहे.
****
दर्पण दिन काल सर्वत्र साधेपणानं साजरा झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करत, पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे वार्षिक पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कार तर दैनिक पुढारीचे चंदन शिरवाळे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला. राज्यस्तरीय वृत्तपत्र प्रतिनिधी पुरस्कार किरण तारे यांना तर राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी पुरस्कार औरंगाबादचे सिद्धार्थ गोदाम यांना जाहीर झाला आहे.
****
मराठवाड्यात दर्पण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आचार्य जांभेकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्य पत्रकार संघाच्या वतीनं विशेष वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्राध्यापक जयदेव डोळे यांनी या कार्यक्रमात बोलताना, पत्रकारितेचं शिक्षण देणाऱ्या संस्थांनी पत्रकार म्हणून नोकरी करणाऱ्या व्यक्तींऐवजी मालक तयार करावेत, असं मत व्यक्त केलं.
औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी ऑनलाईन परिसंवादात मार्गदर्शन केलं. पत्रकारितेकडे फक्त व्यवसाय म्हणून पाहून चालणार नाही तर ते समाज परिवर्तनाचे एक साधन असल्याचं डॉ येवले म्हणाले.
विभागीय माहिती संचालक कार्यालय तसंच जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीनं आचार्य जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी दर्पणकारांना आदरांजली वाहिली.
****
पत्रकारांनी कोविड काळात केलेल्या वार्तांकनाची दखल घेत लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात काल पत्रकारांचा गुणगौरव करण्यात आला. माजी आमदार पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातल्या ४७ पत्रकारांचा सन्मानचिन्ह देत, ‘कोरोना योद्धा’ म्हणून गौरव करण्यात आला.
****
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा आदर्श पत्रकारांनी सदैव जोपासला पाहिजे, असं परभणी इथले ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांनी म्ह��लं आहे. परभणी इथं पत्रकार भवनात आचार्य जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. दर्पण दिनानिमीत्त ��रभणी जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने काल दर्पण दिनी वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क, सॅनिटायझर, आर्सेनिक गोळ्यांसह आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात जिल्ह्याच्या विकासासह ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं.
****
नांदेड इथं पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पत्रकारांचा सत्कार केला.
****
बीड इथं जिल्हा माहिती कार्यालयात जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. माजलगाव पत्रकार संघाच्या वतीनं काल दर्पण दिन समारंभात प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांना “माजलगांव भूषण” पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी काल जाहीर झाली, संघाच्या अध्यक्षपदी महादेव गोरे, उपाध्यक्षपदी गणेश जाधव तर सचिवपदी नंदकुमार पांचाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
****
राज्यात काल चार हजार ३८२ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख ५४ हजार ५५३ झाली आहे. काल ६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार ८२५ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५५ शतांश टक्के इतका कायम आहे. काल दोन हजार ५७० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ५२ हजार ७५९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७९ शतांश टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५० हजार ८०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २१८ रुग्णांची नोंद झाली. मृत रुग्णांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात दोन तर जालना तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे ८२ कोविडग्रस्त आढळले, नांदेड तसंच बीड जिल्ह्यात प्रत्येकी ३४, उस्मानाबाद २९, जालना १३, हिंगोली २० तर परभणी जिल्ह्यात काल ६ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली.
****
लातूर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त तूर उत्पादकांना पीक विम्याची २५ टक्के रक्कम अग्रीम देण्याची सूचना पीक विमा कंपनीला करण्यात आली आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सुमारे ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा तुरीची पेरणी झाली होती. मात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातल्या अतिवृष्टीने या पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव होऊन तुरीचं नुकसान झालं. या नुकसानीचे पंचनामे करून शेतक��्यांना नुकसानभरपाई पोटी पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळावी अशी मागणी आमदार निलंगेकर यांनी शासनाकडे केली हो���ी. यानुसार शेतकऱ्यांना पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याचे आदेश भारतीय कृषी विमा कंपनीला देण्यात आले आहेत. याबाबतचं पत्र जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलं असल्याची माहिती निलंगेकर यांनी दिली.
****
नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते मधुकरराव पाटील खतगावकर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी बिलोली तालुक्यातल्या खतगाव इथ अंत्यसंस्कार करण्यात आले. खतगावकर यांचं काल पहाटे हैद्राबाद इथं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. सहकार, शिक्षण, सामाजिक तसंच सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव काम केलं होतं.
****
लातूर जिल्हा परिषद इमारत परिसर तसंच बागेच्या परिसराची स्वच्छता करून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सुंदर माझे कार्यालय या अभियानाचं काल उद्घाटन केलं. जिल्हा परिषदेच्या परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन हजार ६५० रुपये दंड वसूल करण्यात आला.
परभणी जिल्हा परिषद कार्यालयातही मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्वच्छता केली जात आहे.
****
हिंगोली इथले जलसंपदा विभागातले कार्यकारी अभियंता एस एम शेख यांनी नागरिकांना कोविड संसर्गापासून बचावासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात गेवराई तसंच केज इथं टपाल विभागाच्या डाक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या १४ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात टपाल विभागाचे नवीन खातं उघडणं, सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडणं, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन डाक विमा काढणं, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडणं, तसंच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना आदी सेवा ग्राहकांना पुरवण्यात येणार आहेत. आधार दुरुस्ती तसंच नूतनीकरण सेवाही या मेळाव्यात पुरवली जाणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात ४२८ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत ४० ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. यामध्ये उमरगा तालुक्यातल्या ११, कळंब ६, भूम, परंडा आणि लोहारा प्रत्येकी ५, तुळजापूर चार, उस्मानाबाद तीन आणि वाशी तालुक्यातल्या एका ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेत, एक बाद २१ धावा केल्या आहेत.
****
मराठवाड्यात पुढच्या २४ तासांत उस्मानाबाद, नांदेड, लातूर, जालना आणि परभणी जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, औरंगाबाद तसंच लातूर इथं काल सायंकाळनंतर पाऊस झाला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 June 2019 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ जून २०१९ सायंकाळी ६.०० **** जर्मन उद्योजकांनी उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. यापुढं तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता यासह सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांमध्येही जर्मनीनं गुंतवणूक वाढवावी, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची राज्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिन्डर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. दोन्ही देशांतील सांस्कृतिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक देवाण – घेवाण वाढावी याबाबत मुख्यमंत्री आणि जर्मनीच्या राजदूतांच्या या बैठकीत चर्चा झाली. **** महात्मा गांधीजी यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त विविध धोरणं आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी दिडशे कोटी रुपयांचा निधी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. आज मुंबईत एका बैठकीत ते बोलत होते. यानिमित्तानं महात्मा गांधी यांचं कार्य आणि विचारधारेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वेरूळ घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील कामांनी या मंदिराच्या वास्तू शिल्पात भर पडावी, अशा सूचना मुनगंटीवार यांनी केल्या आहेत. त्यांनी घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर परिसर विकासासाठी ११२ कोटी ४१ लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान आणि परिसर विकासासाठी १४८ कोटी ३७ लाख रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. **** भारतीय रिझर्व्ह बँकेनं डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी `एनईएफटी` आणि `आरटीजीएस` वरचं शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेनं चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक आढावा आज जाहीर केला. रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर रेपो दरात पाव टक्क्यानी कपात केली असून रेपो दर सहा टक्क्यांवरून पावणेसहा टक्के झाला आहे. पतधोरण समितीची बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत वार्ताहरपरिषदेत ही माहिती दिली. गेल्या चार महिन्यातली रेपो दरात केलेली ही सलग तिसरी कपात आहे. रेपो दरात कपात केल्यामुळे वाहनकर्ज आणि गृहकर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे. रिव्हर्स रेपो दर साडेपाच टक्के तर बँक दर सहा टक्के राहणार आहे. आर्थिक वृद्धी दराच्या यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजात बदल करून तो आता सात टक्के राहील, असा नवा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. **** केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मुंबईत चित्रपट विभागाच्या आवारात वृक्षारोपण केलं. त्यांनी नुकत्याच सुरु केलेल्या `सेल्फी विथ सॅपलिंग` या उपक्रमाला चालना देत, पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हे वृक्षारोपण केलं. यानंतर जावडेकर यांनी भारतीय चित्रपट संग्राहलयाला भेट दिली. **** परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात आज सकाळी सुमारे पंधर��� मिनिटं वळवाच्या पावसानं हजेरी लावली. काल रात्री जिंतूरमध्ये झालेल्या पावसामुळे मोठे वृक्ष उन्मळून प��ल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. सेलू तालुक्यातील आडगाव (दराडे) परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं केळीच्या बागांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना, औरंगाबाद परिसरात आज पावसाच्या हल्यक्या सरी झाल्या. दक्षिण कोकणात काही ठिकाणी तसंच उत्तर कोकण, मराठवाडा, विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. **** औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातल्या नगर रचना विभागात आज सकाळी आग लागली. यात महत्त्वाचे दस्तावेज तसंच फर्नीचर जळून खाक झालं आहे. अग्निशमन विभागाच्या दोन बबांनी ही आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. **** तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं जळगाव जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयं आणि रेल्वे स्टेशन परिसरात अवैध गुटखा, तंबाखू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 June 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ जून २०१९ सकाळी ७.१० मि. **** पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश; शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी येत्या १७ जूनपासून लोकसभेचं अधिवेशन; ५ जुलैला अर्थसंकल्प सादर होणार देशात सरासरीच्या ९६ टक्के तर राज्यातही यंदा समाधानकारक पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा सुधारीत अंदाज आणि इंग्लंडमधल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल पाकिस्तानवर वेस्टइंडिजचा सहज विजय **** पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा विस्तार करून देशातल्या सर्व शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या पहिल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याच्या योजनांनाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याची घोषणा भारतीय जनता पक्षानं निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती, या आश्वासनानुसार सरकारनं मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत या दोन्ही योजनांना मंजुरी दिली. बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती देतांना कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं की, शेतकरी सन्मान योजनेचा विस्तार करताना यापूर्वीची पात्रतेसाठीची दोन हेक्टर्सची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. यामुळे आता या योजनेचा लाभ देशभरातल्या १४ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना मिळू शकेल. वार्षिक सहा हजार रूपयाचं अनुदान या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना तीन टप्प्यात दिलं जाणार आहे. आतापर्यंत साडेतीन कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचं तोमर यांनी सांगितलं. याशिवाय वयाची ६० वर्ष पूर्ण केलेल्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरमहा किमान तीन हजार रूपये निवृत्ती वेतन देण्याच्या योजनेलाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली. स्वैच्छिक आणि अंशदानाच्या आधारावर ही योजना असून वयाची १८ वर्ष पूर्ण असलेले शेतकरी, वयाची ४० वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेत सहभागी होऊ शकतील. सहभागी शेतकऱ्यांना दरमहा त्यांच्या हिश्श्याची रक्कम योजनेत गुंतवावी लागेल, तेवढीच रक्कम केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या निवृत्तीवेतन खात्यात भरेल, असं तोमर म्हणाले. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस ५० टक्के कुटुंब निवृत्तीवेतन देण्याची तरतूदही या योजनेत आहे, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांसाठीच्या निवृत्तीवेतन योजनेलाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. सर्व दुकानदार, किरकोळ व्यापारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना सा��ाजिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना ��ुरू करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. दीड कोटी रूपयांपेक्षा कमी वस्तु आणि सेवा कराची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ही योजना आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच व्यापाऱ्यांनाही या योजनेत स्वतःचा हिस्सा द्यावा लागणार आहे, त्यांनाही वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा किमान तीन हजार रूपये निवृत्तीवेतन देण्याची तरतूद या योजनेत आहे. देशभरातल्या तीन कोटी व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, असं जावडेकर म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा निधी योजनेअंतर्गतच्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत वाढ करण्यासही काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. **** दरम्यान, लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जून ते २६ जुलै या कालावधीत बोलावण्यासही मंत्रीमंडळानं मान्यता दिली. या अधिवेशनादरम्यान लोकसभा अध्यक्षांची निवड १९ तारखेला केली जाईल. २० जूनला राष्ट्रपतिचं अभिभाषण होईल. आर्थिक सर्वेक्षण चार जुलैला तर ५ जुलैला अर्थसंकल्प सादर केला जाईल. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचं काल खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये मोदी यांच्याकडे कार्मिक मंत्रालय, नागरी तक्रार आणि निवृत्ती, आण्विक ऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग ही खाती आहेत. कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह यांना संरक्षण, अमित शाह यांना गृहमंत्री तर निर्मला सीतारामण यांना अर्थ आणि कंपनी व्यवहार खाते देण्यात आलं आहे. नितीन गडकरी यांना परिवहन आणि महामार्ग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ही खाती देण्यात आली आहेत. रामविलास पासवान यांना अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण, नरेंद्र सिंह तोमर हे कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच ग्रामीण विकास आणि पंचायत राज, रवीशंकर प्रसाद हे कायदा, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत. स्मृती ईराणी यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण तसंच वस्त्रोद्योग, प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण तसंच वन आणि पर्यावरण, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम या खात्यांचा पदभार ��ेण्यात आला आहे. राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण तसंच अन्न आणि नागरी पुरवठा, रामदास आठवले हे सामाजिक न्याय आणि सबलीकरण, संजय धोत्रे हे मनुष्यबळ विकास, दळणवळण, माहिती आणि तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत. खातेवाटप झाल्यानंतर बहुतांशी मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारला आहे. **** देशात यंदा सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा सुधारित अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. येत्या सहा जूनपर्यंत केरळमध्ये पावसाचं आगमन होईल. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत साधारण पाऊस राहणार आहे. अल् निनोचा प्रभावही कमी होणार असल्याचं या अंदाजात म्हटलं आहे. दरम्यान, देशाबरोबरच राज्यातही यंदा समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज आणि चार तारखेला राज्यात मराठवाड्यासह कोकण, गोवा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजही ��वामान खात्यानं वर्तवला आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** औरंगाबाद शहरातल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरूवात होत आहे. ऑनलाईन प्रवेश घेतला तरच विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीच्या मंडळाची परीक्षा देता येणार आहे, त्यामुळं शाळा महाविद्यालयांनी कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश ऑफलाईन करू नये असा इशारा काल शिक्षण विभागानं मुखाध्यापक आणि प्राचार्यांना दिला. काल औरंगाबाद इथं या प्रवेशासंदर्भात महापलिका क्षेत्रातले माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तसंच कनिष्ठ महाविद्यालाचे प्राचार्य यांची सहविचार सभा शिक्षण विभागानं घेतली. ही प्रक्रिया एकूण चार फेऱ्यांमध्ये राबवली जाणार आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं खत विक्रीचा परवाना नसतांना अनधिकृतरित्या खत विक्री करणाऱ्या गुजरातमधल्या जी.बी. ॲग्रो कंपनीविरूद्ध शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना बांधावर कमी किमतीत खत विकले जात असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. संबंधित खताची तपासणी केली असता यामध्ये अन्नद्रव्य घटकाचं प्रमाण नगण्य आढळून आलं आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक खत विक्रेत्यांकडून, पक्की पावती घेऊनच खताची खरेदी करावी आणि फसवणूक टाळावी असं आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी केलं आहे. **** इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल नॉटिंगहम इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं पाकिस्तानवर सात गडी राखून सहज विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना २२ व्या षटकांत ११० धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघान चौदाव्या षटकातच तीन गडी गमावून हे आवाहन पूर्ण केलं. या स्पर्धेत उद्या न्युझीलंड आणि श्रीलंका तसंच अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सामने होणार आहेत. **** जालना औद्योगिक वसाहतीमधल्या भक्ती ऑईल मील या कंपनीच्या गोदामाला काल सकाळी आग लागली. आगीच्या या घटनेत गोदामात मोठ्या प्रमाणात साठवलेलं कुकुट पालन उद्योगासाठी वापरण्यात येणारं कोंबडी खाद्य आणि बारदान्यानं पेट घेतला. जालना, औरंगाबाद आणि परतूर इथल्या अग्निशमन दलासह खासगी टँकर आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** निम्न दुधना प्रकल्पातून आज दुपारी चार वाजता पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे निम्न दुधना प्रकल्प ते परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहराजवळच्या कोल्हापूर बंधाऱ्या��र्यंत निम्न दुधना नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसंच ज्यांनी आपली जनावरं किंवा साहित्य नदीपात्रात ठेवली असतील ती त्वरीत काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. **** जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त कालपासून ३० जूनपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अमोल गिते यांनी औरंगाबाद इथल्या जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात दिली. डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी तंबाखूच्या दुष्परिणामांवर पथनाट्य सादर करण्यात आलं. **** अहमदनगर जिल्ह्यातल्या चोंडी या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी काल त्यांच्या २९४व्या जयंती निमित्त विविध मान्यवरांनी अभिवादन केलं. माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात खासदार छत्रपती संभाजीराजे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे प्रमुख उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर यांनी सर्व जाती धर्माना घेऊन काम केलं. त्या महामाता होत्या. त्यांचा आदर्श पुढं चालू ठेवून काम करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं. **** लातूर जिल्ह्यातल्या मुरूड अकोलाजवळ काल एका वऱ्हाड्याच्या टेम्पोला अपघात झाल्यानं दोन जणांचा मृत्यु आणि चौदा जण जखमी झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली. चाटा गावामधला विवाह समारंभ आटोपून परत जात असतांना या टेम्पोला समोरून येणाऱ्या एका वाहनानं जोराची धडक दिल्यानं दोन्ही वाहनं पुलावरून खाली पडली. यात टेम्पोतील दोन जणांचा मृत्यु झाला. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 May 2019 Time 20.00 to 20.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ मे २०१९ सायंकाळी २०.०० **** नवीन केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या पहिल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा निधी योजनेअंतर्गतच्या पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. या योजनेत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी दोन हजार रूपयांची शिष्यवृत्ती वाढवून ती आता अडीच हजार रूपये तर विद्याथीनींची शिष्यवृत्ती सवा दोन हजार रूपयांवरून तीन हजार रूपये करण्यात आली आहे. नक्षली आणि दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या राज्य पोलिस दलांच्या पाल्यांनाही आता या शिष्यवृत्ती योजनेत सामावून घेण्यात आलं आहे. दरवर्षी राज्य पोलीस दलातल्या ५०० विद्यार्थांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचं आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये मोदी यां���्याकडे कार्मिक मंत्रालय, नागरी तक्रार आणि निवृत्ती, आण्विक ऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग ही खाती आहेत. कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह यांना संरक्षण, अमित शाह यांना गृहमंत्री तर निर्मला सीतारामण यांना अर्थ आणि कंपनी व्यवहार खाते देण्यात आलं आहे. नितीन गडकरी यांना परिवहन आणि महामार्ग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ही खाती देण्यात आली आहेत. रामविलास पासवान यांना अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण, नरेंद्र सिंग तोमर हे कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच ग्रामीण विकास आणि पंचायत राज, रवीशंकर प्रसाद हे कायदा, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत. स्मृती ईराणी यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण तसंच वस्त्रोद्योग, प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण तसंच वन आणि पर्यावरण, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे. राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण तसंच अन्न आणि नागरी पुरवठा, रामदास आठवले हे सामाजिक न्याय आणि सबलीकरण, संजय धोत्रे हे मनुष्यबळ विकास, दळणवळण, माहिती आणि तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत. खातेवाटप झाल्यानंतर बहुतांशी मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारला आहे. **** केंद्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १७ जून ते २६ जुलैदरम्यान होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात नियमित अर्थसंकल्प सादर केला जाईल, एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं आज ही माहिती दिली. **** जंगलवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नात महाराष्ट्र देशात अव्वल असून जलयुक्त सोबतच वनयुक्त शिवार ही संकल्पना त्यासाठी उपयुक्त ठरली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिक इथं वार्ताहरांशी बोलतांना आज दिली. राज्य शासनाच्यावतीनं यंदा वन महोत्सवाअंतर्गत ३३ कोटी झाडे लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात वाघांची संख्या वाढत असून चार वर्षांपूर्वी राज्यात २०४ वाघ होते, परंतु आता २५० मोठे वाघ असून बछड्यांची संख्याही वाढल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी नमूद केलं. **** जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त आजपासून ३० जूनपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अमोल गिते यांनी औरंगाबाद इथल्या जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात दिली. डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी तंबाखूच्या दुष्परिणामांवर पथनाट्य सादर करण्यात आलं. **** जालना औद्योगिक वसाहतीमधल्या भक्ती ऑईल मील या कंपनीच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. आगीच्या या घटनेत गोदामात मोठ्या प्रमाणात साठवलेलं कुकुट पालन उद्योगासाठी वापरण्यात येणारं कोंबडी खाद्य आणि बारदान्यानं पेट घेतला. जालना, औरंगाबाद आणि परतूर इथल्या अग्निशमन दलासह खासगी टँकर आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या लोकसभा मतदारसंघात झालेलं एकूण मतदान बारा लाख ४५ हजार ७९७ इतकं होतं. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीमध्ये बारा लाख ४६ हजार २५६ मतं आढळली, म्ह���जेच या मतदारसंघात ४५९ मतं जास्तीची आढळल्याचा आरोप पराभूत खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. **** इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज नॉटिंगहम इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं पाकिस्तानवर सात गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना २२ व्या षटकांत ११० धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघान चौदाव्या षटकातच तीन गडी गमावून हे आवाहन पूर्ण केलं. या स्पर्धेत उद्या न्युझीलंड आणि श्रीलंका तसंच अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामने होणार आहेत. **** निम्न दुधना प्रकल्पातून उद्या दुपारी चार वाजता पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे निम्न दुधना प्रकल्प ते परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहराजवळच्या कोल्हापूर बंधाऱ्यापर्यंत निम्न दुधना नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसंच ज्यांनी आपली जनावरं किंवा साहित्य नदीपात्रात ठेवली असतील ती त्वरीत काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 May 2019 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ मे २०१९ सायंकाळी ६.०० **** नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची नवी दिल्लीत पहिली बैठक होत आहे. राष्ट्रीय संरक्षण निधी अंतर्गत शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा पहिला निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. देशाचं संरक्षण करणाऱ्यांना हा निर्णय समर्पित करण्यात आला आहे. तत्पुर्वी, आज दुपारी सतराव्या लोकसभेच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कार्मिक मंत्रालय, नागरी तक्रार आणि निवृत्ती, आण्विक ऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग ही खाती आहेत. कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री, अमित शाह यांना गृहमंत्री तसंच नितीन गडकरी यांना परिवहन आणि महामार्ग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ही खाती देण्यात आली आहेत. निर्मला सीतारमण या अर्थ आणि कंपनी व्यवहार, रामविलास पासवान हे अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण, नरेंद्र सिंग तोमर हे कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, तसंच रवि शंकर प्रसाद हे कायदा, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत. स्मृती ईराणी यांच्याकडे महिला आणि बाल कल्याण तसंच वस्त्रोद्योग, प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती आणि प्रसारण तसंच ��र्यावरण, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम या खात्यांचा पदभार देण्यात आला आहे. राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे ग्राहक संरक्षण तसंच अन्न आणि नागरी पुरवठा, रामदास आठवले हे सामाजिक न्याय आणि सबलीकरण, संजय धोत्रे हे मनुष्यब��विकास, दळणवळण, माहिती आणि तंत्रज्ञान ही खाती संभाळणार आहेत. **** आज अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी त्यांच्या २९४ व्या जयंती निमीत्त विविध मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं. माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी झालेल्या समारंभात खासदार छत्रपती संभाजीराजे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे प्रमुख उपस्थित होते. अहिल्याबाई होळकर यांनी सर्व जाती धर्माना घेऊन काम केलं. त्या महामाता होत्या. त्यांचा आदर्श पुढं चालू ठेवून काम करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं. दरम्यान, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आपल्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केलं. यावेळी पशूपालन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ***** जंगलवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नात महाराष्ट्र देशात अव्वल असून जलयुक्त सोबतच वनयुक्त शिवार ही संकल्पना त्यासाठी उपयुक्त ठरली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थ – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाशिक इथं पत्रकार परिषदेत आज दिली. राज्य शासनाच्या वतीनं यंदा वनमहोत्सवाअंतर्गत ३३ कोटी झाडे लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात वाघांची संख्या वाढत असून चार वर्षांपूर्वी राज्यात २०४ वाघ होते परंतु आता २५० मोठे वाघ असून बछड्यांची संख्याही वाढल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी नमुद केलं. **** विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. राज्याच्या इतर भागातही तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे. औरंगाबादमध्ये काल ४२ पूर्णांक तीन अंश सेल्सीअस तर उस्मानाबादमध्ये ४३ पूर्णांक नऊ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. **** ज्येष्ठ पत्रकार, भाषांतरकार तसंच लेखक डॉ. राम अग्रवाल यांची संसदेतील राज्यसभेत मराठी भाषांतर सल्लागार पदी नियुक्ती झाली आहे. भारताचे राष्ट्रपती एम. वेंकाय्या नायडू यांच्या उपस्थितीत, राज्यसभेचे महासचिव देश दिपक वर्मा यांच्या हस्ते डॉ. राम अग्रवाल यांना बालयोगी सभागृहात झालेल्या समारंभात नियुक्ती बद्दल सन्मान पत्र प्रदान करण्यात आलं. **** जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त आजपासून ३० जूनपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अमोल गिते यांनी औरंगाबाद इथल्या जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात दिली. डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमावेळी तंबाखूच्या दुष्परिणामांवर पथनाट्य सादर करण्यात आलं. **** जालना औद्योगिक वसाहतीमधल्या भक्ती ऑईल मील या कंपनीच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. आगीच्या या घटनेत गोदामात मोठ्या प्रमाणात साठवलेलं कुकुट पालन उद्योगासाठी वापरण्यात येणारं कोंबडी खाद्य आणि बारदान्यानं पेट घेतला. जालना, औरंगाबाद आणि परतूर इथल्या अग्निशमन दलासह खासगी टँकर आग विझवण्यासाठी बोलावण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 February 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि. **** लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळली राज्यात एक हजार दुष्काळी गावांमध्ये दहा हजार लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवणार एस टी च्या शिवशाही शयनयान बसच्या प्रवास भाड्यात कपात स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी परळीच्या मुंडे डॉक्टर दाम्पत्याला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा सात गडी राखून विजय ***** लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे. कॉंगेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता औरंगाबाद आणि पुणे इथं बोलतांना वर्तवली होती, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काल पालघर इथं वार्ताहरांशी बोलतांना, राज्यसरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं स्पष्ट केलं. विधानसभा बरखास्त करण्याचे कोणतेही संकेत शासनाला मिळाले नसून दोन्ही निवडणुका आपापल्या नियोजित वेळेतच होतील असा खुलासाही त्यांनी केला. **** राज्यातल्या दुष्काळी भागातल्या एक हजार गावांमध्ये दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या प्लॅस्टिक टाक्या बसवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनानं केलेल्या उपाय योजनांची आढावा बैठक काल मुंबईत झाली, यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद आणि अहमदनगर या सहा जिल्ह्यात आठ गोशाळांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, यामध्ये आतापर्यंत सात हजार ३७५ जनावरं दाखल झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. मंडळस्तरावर जनावरांची संख्या वाढल्यास एकापेक्षा अधिक चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही पाटील यांनी सांगितलं. **** आम आदमी पक्ष महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढवणार असून, समविचारी प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करणार असल्याचं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर सावंत यांनी सांगितलं. ��ाल मुंबईत पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, सावंत यांनी, जागा वाटपाबद्दल १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय होईल, अशी माहिती दिली. **** लोकसभेत काल २०१९च्या अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा सुरु झाली. चर्चेला सुरुवात करताना बिजू जनता दलाचे तथागत सत्पथी यांनी, दोन हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नसल्याचं सांगितलं. सत्ताधारी पक्षाकडून चर्चेत सहभागी होताना खासदार अनुराग ठाकूर यांनी, नवभारताच्या निर्माणासाठी केलेल्या अनेक उपाययोजना या अर्थसंकल्पातून दिसून येत असल्याचं सांगितलं. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र ���ळघम पक्षानं अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला. दरम्यान, राफेल खरेदी प्रकरणावरून विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळात सभागृहाचं कामकाज आधी दोनदा आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. त्यामुळे अर्थसंकल्पावरची चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. राज्यसभेत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी राफेलचा मुद्दा लावून धरला, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित केला, सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी स्थगन प्रस्तावानुसार चर्चा घ्यायला नकार दिला. त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. **** राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी एका वृत्तपत्रातूल प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेला मजकूर हा केवळ तत्कालीन संरक्षण सचिवांच्या निवेदनावर आधारीत असून त्यामध्ये तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं आहे, असं त्यांनी काल लोकसभेत सांगितलं. **** खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांना, नोकरी आणि शिक्षणात, दहा टक्के आरक्षणाच्या निर्णयाला, आव्हान देणाऱ्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला, स्थगिती देणार नसल्याचंही, न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. **** महाराष्ट्रात धुम्रपानाचं प्रमाण देशात सर्वात कमी असल्याचं, जागतिक प्रौढ तंबाखू सर्व्हेक्षण २०१६-१७ मध्ये आढळून आलं असल्याचं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत सांगितलं. ‘तंबाखू मुक्त शाळा’ अभियानांतर्गत २ हजार ७५५ शाळा तंबाखू मुक्त करण्यात आल्याचं सांगून राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खाजगी शाळा आणि महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. **** महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक आणि वाहक पदांसाठी आता हलके वाहन चालवण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिला आणि अवजड वाहन चालवण्याचा एक वर्षाचा अनु��व असलेले पुरूष उमेदवारही अर्ज करु शकतील, असं परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत सांगितलं. महिला उमेदवारांना शारिरीक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली आहे. राज्यात सध्या ८ हजार २२ चालक तथा वाहक पदांची भरती सुरु आहे. दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीस १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पदांसाठी येत्या २४ फेब्रुवारी रोजी संबंधित जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परिक्षा होणार आहे. **** राज्यात असलेली दुष्काळसदृश्य परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसंच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर आणि माफक दरात व्हावा या उद्देशानं महामंडळानं वातानुकूलित शिवशाही शयनयान बसच्या प्रवास भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात आली असल्याची घोषणा परिवहन मंत्री रावते यांनी केली. कमी झालेले नवीन दर येत्या १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत. सध्या महामंडळातर्फे राज्यातल्या विविध ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** बीड जिल्ह्यातल्या बहुचर्चित स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी परळीचे डॉक्टर सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावत साडे चार लाख रुपयांचा दंडही ठोठावला. २०१२ मध्ये मुंडे यांच्या दवाखान्यात अवैध गर्भपात करताना विजयमाला पट्टेकर या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. सदोष मनुष्यवध तसंच प्रसुतीपूर्व अवैध गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायद्यान्वये ही शिक्षा सुनावण्यात आली. मुंडे दांपत्यासह मृत विजयमाला पट्टेकर यांच्या पतीस देखील दहा वर्षाची शिक्षा सुनावली असून, उर्वरित दहा जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. **** राज्यात काल भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अकरा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात पुण्याचे क्रीडा आणि युवा संचालनालयाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांची औरंगाबादचे विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे, तर डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची त्यांच्या जागी क्रीडा आणि युवा संचालनालयाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. **** भारत आणि न्यूझीलंडच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान ऑकलंड इथं झालेला दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं सात गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित षटकांत आठ बाद १५८ धावा केल्या. भारतीय संघानं हे लक्ष्य एकोणिसाव्या षटकात सात गडी राखून पूर्ण केलं. रोहीत शर्मानं ५०, ॠषभ पंत ४० तर शिखर धवननं ३० धावा केल्या. तीन सामन्या��च्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत. त्यापूर्वी काल सकाळी महिलांच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाला मात्र सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे न्यूझीलंडच्या महिला संघाकडे मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी आहे. दोन्ही संघांचा तिसरा आणि अंतिम टी-ट्वेंटी सामना उद्या हॅमिल्टन इथं होणार आहे. **** सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ‘आयुष्मान भारत योजने’अंतर्गत जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या २१ हजार ३६ कुटुंबातल्या ९२ हजार ८७३ लाभार्थ्यांना कुटुंब पत्र वाटप उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते काल बोलत होते. **** मराठवाड्यातली दुष्काळाची व्यथा युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून दूर करावी, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मराठवाडास्तरीय संमेलनात ते बोलत होते. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी युवकांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं. परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यावेळी उपस्थित होते. या संमेलनात विविध विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. **** दोन महिन्याचं थकीत वेतन तत्काळ द्यावं, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी लातूर महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी काल महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं. पालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि आंदोलन मागं घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सायंकाळी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, मात्र इतर कामकाजाबाबत सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे. **** बुलडाणा जिल्ह्यातले शहीद जवान अनिल वाघमारे यांच्या पार्थिव देहावर काल चिखली तालुक्यातल्या सावरगाव डुकरे या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरमधल्या सियाचिन इथं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. **** जालना इथले प्रसिद्ध उद्योजक शांतीलाल पित्ती यांच्या पार्थिव देहावर काल जालना इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. पित्ती यांचं गुरूवारी हृदयविकाराच्या धक्यानं निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते. जालना इथं पोलाद उद्योग उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा ��हे. **** हिंगोली इथं उद्या अटल महाआरोग्य मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आतापर्यंत दीड लाखावर गरजू रूग्णांनी तपासणीसाठी नोंदणी केली आहे. सकाळी आठ वाजेपासून शिबिराला सुरूवात हो��ार आहे. सर्व प्रकारच्या रूग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 November 2018 Time - 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.०० ****
शासकीय आणि गायरान जमिनींवरही आता ‘सर्वांसाठी घरं’ ही योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियमात दुरुस्ती करण्यात येणार असून, यामुळे परवडणाऱ्या घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे. काम करण्यास सक्षम अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं सेवासमाप्तीचं वय ६० वरून ६५ वर्षे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आला. आरोग्य सक्षमतेचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतर प्रथम तीन वर्ष आणि पुढे आणखी दोन वर्ष सेवा करता येणार आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या नावात आपत्ती व्यवस्थापनाचा समा��ेश करण्याचा, तसंच पुण्याच्या गुंजवणी प्रकल्पासाठी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.
****
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेनं अवनी वाघीणीच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.
****
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्य अग्रेसर राहण्यासाठी नॅसकॉम सोबत झालेला करार महत्वपूर्ण असून, यामुळे राज्यातल्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत उद्योगांना चालना मिळणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई इथं आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली नामवंत संस्था नॅसकॉमसोबत राज्य शासनाच्या उद्योग विभागानं पाच वर्षांसाठी सामंजस्य करार केला, त्यावेळी ते बोलत होते. या करारानुसार नॅसकॉमची ‘टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम’ ही परिषद पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात होणार असून, या परिषदेअंतर्गत जागतिक गुंतवणूकदार राज्यात आकर्षित होणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा फायदा सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे यावर भर दिला आहे. नवी दिल्ली इथं आज विज्ञान, तंत्रज्ञान सल्लागार परिषद सदस्यांशी ते संवाद साधत होते. देशवासीयांचं जीवन सोपं करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परिषदेच्या सल्लागारांनी शिक्षण संस्था, संशोधन, विकास प्रयोगशाळा, उद्योग आणि विविध सरकारी विभागांशी दृढ संबंध स्थापन करण्यासाठी कार्य करण्याचा पंतप्रधानांनी यावेळी आग्रह धरला.
****
केंद्रीय संसदीय कार्य मंत्री अनंत कुमार यांच्या पार्थीव देहावर आज दुपारी बंगळूरु इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह, धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांच्यासह विविध नेत्यांनी यावेळी अनंत कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली. अनंतकुमार यांचं काल बंगळूरु इथं निधन झालं, ते ५९ वर्षांचे होते.
****
माजी मुख्यमंत्री, सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
कोरेगाव-भीमा प्रकरणी राज्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना भिमा कोरेगाव दंगलीच्या चौकशी आयोगासमोर बोलवावं, अशी मागणी भारीप - बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते आज पुण्यात या प्रकरणी चौकशी आयोगात सुनावणीसाठी आले असताना बोलत होते.
****
नांदे�� जिल्ह्यातल्या मालेगाव इथं आज जिल्ह���स्तरीय तंबाखू नियंत्रण पथकानं अचानक धाडी टाकून १३ तंबाखू विक्रेत्यांकडून चार हजार ९०० रुपये दंड वसूल केला. जिल्हा रुग्णालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध - कोटपा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास नागरिकांनी तक्रार करण्याचं आवाहन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.पी.कदम यांनी केलं आहे.
****
धनगर समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे आज औरंगाबाद इथं कोकणवाडी ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास एक जानेवारी पासून राज्यातल्या भाजप आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन तसंच सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचा इशारा आंदोलकांचे नेते आमदार रामराव वडकुते यांनी यावेळी दिला. आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचं निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आलं.
****
उस्मानाबाद आणि तुळजापूर परिसरात आज दुपारी दोन वाजून ४४ मिनीटांनी जमिनीतून जोरदार आवाज झाला. आवाज मोठा असल्यामुळे घरांच्या खिडक्या, तावदानं हादरली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 October 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ सकाळी ७.१० मि. **** नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणीविसर्गाचे जलसंपदा मंत्र्यांचे संकेत प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टीने तपासून पाहण्याचं प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचं आवाहन प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु राहणार आणि वेस्ट इंडीज विरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका भारतानं दोन शून्यनं जिंकली; पृथ्वी शॉ मालिकावीर **** मराठवाड्यात परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं, नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडावं लागेल, अशी शक्यता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. आज १५ ऑक्टोबरनंतर पाण्याच्या शिल्लक साठ्याचा आढावा घेऊन नियमानुसार पाणी सोडलं जाईल, असं ते म्हणाले. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे या भागाचा विचार करून, योग्य तो निर्णय घेतला जाईल असं, महाजन यांनी नमूद केलं. **** मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नियुक्त समितीचा अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त होणार असून, त्यानंतर आरक्षण देण्यासंदर्भात विधी मंडळात कायदा केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते नाशिक इथं काल बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत, याची राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचं ते म्हणाले. मराठा समाजातल्या युवक युवतींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जात असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. **** केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्यावर होत असलेले लैंगिक शोषणाचे आरोप बिनबुडाचे असून ते राजकीय हेतूने जाणीवपूर्वक केले जात असल्याचं म्हटलं आहे. असे आरोप करणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करणार असून, माध्यमांतल्या बातम्यांच्या आधारावर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. **** लोकसभेची आगामी निवडणूक आपण दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लढवणार असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल जाहीर केलं. पुण्यात वार्ताहरांशी बोलतांना आठवले यांनी दक्षिण मध्य मुंबई आणि साताऱ्याची जागा रिपाइंसाठी सोडण्याची मागणी केली आहे. **** प्रत्येकाने नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवून विज्ञानन्निष्ठ होत, वैज्ञानिक दृष्टीने सर्व गोष्टी तपासून पहाव्या, असं आवाहन प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर केलं आहे. काल सातारा इथं, सातारा नगरपालिकेचा 'डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार' डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते काकोडकर यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक लाख रुपये, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि सातारी कंदी पेढे असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. **** माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती, हा दिवस सर्वत्र वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगानं आज सर्वत्र, विशेषत: शैक्षणिक संस्थांमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. **** छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेद्वारे प्रत्येक पात्र शेतकऱ्यास लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहणार असून, पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शासन खबरदारी घेत असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. सरकारनं शेतमालासाठी निर्धारित केलेला हमीभाव, बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना द्यायला हवा असं त्यांनी नमूद केलं. देशमुख यांनी काल परांडा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. खासगाव इथं पीक पाहणी करुन देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. **** सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातल्या पिकांच्या पाहणीनंतर बोलत होते. पाणी टंचाई तसंच जनावरांना चारा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत असून, सिंचन तसंच पाणी पुरवठ्यासाठी गावनिहाय अहवाल तयार करुन मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यानचा हैदराबाद इथला दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं दहा गडी राखून जिंकत मालिका दोन - शून्यनं जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीत भारतानं पहिल्या डावात तीनशे सदुसष्ठ धावा करत, ५६ धावांची आघाडी घेतली होती. वेस्ट इंडीज संघाचा दुसरा डाव अवघ्या १२७ धावांतच संपुष्टात आला. भारताना दुसऱ्या डावात सामना जिंकण्यासाठी असलेलं अवघं ७२ धावांचं लक्ष��य सतराव्या षटकातच पूर्ण केलं. उमेश यादवनं चार, रविंद्र जडेजानं तीन, रविचंद्रन अश्विननं दोन, तर कुलदीप यादवनं एक गडी बाद केला. सामन्यात दोन्ही डावांत एकूण दहा बळी घेणारा उमेश यादव सामनावीर, तर पदार्पणातच शतक झळकावणारा पृथ्वी शॉ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. **** नेदरलँड्स इथं झालेल्या डच खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद भारताच्या सौरभ वर्मानं पटकावलं आहे. अंतिम फेरीत त्यानं, मलेशियाच्या जून वेई चिम याला २१-१९, २१-१३ असं दोन सरळ गेम्समध्ये हरवलं. सौरभचं हे सहावं आंतरराष्ट्रीय विजेतेपद असून चालू हंगामातलं दुसरं विजेतेपद आहे. यावर्षी त्यानं रशियन खुली बॅडमिंटन स्पर्धाही जिंकली आहे. **** गोंदिया जिल्ह्यात केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत ५९ हजार ९४३ गृहिणींना गॅस जोडणी मिळाली आहे. यामुळे या चुलीवर स्वयंपाक, तसंच जळणासाठी सरपण गोळा करणं आणि त्यामुळे होणाऱ्या धुराच्या त्रासापासून सुटका झाल्याचं गोंदियाच्या रहिवाशी किरण उके या महिलेनं सांगितलं. त्या म्हणाल्या... आधी माझ्या घरी मातीची चुल होते. मातीच्या चुलामुळे मला खूप त्रास होत होता. वेळेवर काड्या मिळत नवत्या. वेळेवर कामही होत नव्हते. उज्ज्वला गॅस मिळल्यामुळे माझे वेळेवर कामही होत आहे. आणि कामाची बचतही होत आहे. मला बाहेर काढा काढायला जायला नाही लागे. आणि रॉकेल साठी रागेत राहावे नाही लागे. आणि वेळेची बचतही होत. आणि मला वेळेवर कॉलेजलाही जायला मिळते. त्यामुळे उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला. आणि इतर लोकांनाही उज्ज्वला योजनेचा लाभ घ्या. **** शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबरोबरच महाआरोग्य शिबिरातून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या जवरला इथं आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन डोंगरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामस्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. **** आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार अपेक्षित असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही रुग्णालयांनी, रुग्णांकडून पैसे घेतल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळे या रुग्णालयांची या योजनेतली नोंदणी शासनानं रद्द केली आहे. जिल्ह्यातल्या एकूण ३४ रुग्णालयांवर दिल्ली आणि मुंबईच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. जिल्ह्यातली बहुतांश रुग्णालयं वेगवेगळी कारणं दाखवून रुग्णांकडून पैशांची लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे आल्या होत्या, त्या पार्श���वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. **** परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात, तसंच जिंतूर तालुक्यातल्या कौसडी इथं काल रोगनिदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी मोफत औषधांचं वाटपही करण्यात आलं. जिल्ह्यातला कोणताही रुग्ण उपचाराअभावी वंचित राहू नये, असं आवाहन आमदार विजय भांबळे यांनी यावेळी केलं. **** औरंगाबाद इथं, चिकलठाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात काल चार चित्रकला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर भित्तीपत्रक प्रदर्शन भरवलं होतं. यामध्ये ८० चित्रांचा समावेश होता. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि प्रेरणा प्रकल्पात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आलं. **** सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं काल महात्मा गांधी स्वच्छता संवाद सेवा पदयात्रा काढण्यात आली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या यात्रेला सुरुवात केली. या पदयात्रेच्या माध्यमातून चांगल्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जनतेला आपण देत आहोत, असं सांगून खोत यांनी, संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार पुढे जायचं असल्याचं नमूद केलं. **** अहमदनगर सोलापूर रस्त्यावर काल ट्रक आणि आराम बस च्या अपघातात एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले. या अपघातामुळे दोन्ही बाजूनी सहा ते आठ किलोमीटर अंतरापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. *****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 October 2018 Time - 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ६.०० ****
मराठवाड्यात परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं जायकवाडी धरणात नाशिक मधल्या धरणातून पाणी सोडावं लागण्याची शक्यता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. १५ ऑक्टोबरनंतर पाण्याच्या साठ्याचा आढावा घेऊन नियमानुसार पाणी सोडलं जाईल, असं ते म्हणाले. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जाईल असं त्यांनी नमूद केलं.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त होणार असून, त्यानंतर आरक्षण देण्यासंदर्भात विधी मंडळात कायदा केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. नाशिक इथं आज मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नयेत, याची राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचं ते म्हणाले. मराठा समाजातल्या युवक युवतींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जात असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, तसंच युनिसेफच्या सहकार्यानं युवा माहितीदूत उपक्रम राज्यात राबवला जाणार आहे. या उपक्रमात युवा माहितीदूताला प्रत्येकी ५० व्यक्तींना शासनाच्या योजनांची माहिती द्यायची असल्याचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.केशव वाळके यांनी सांगितलं. ते आज भंडारा इथं एका कार्यशाळेत बोलत होते.
****
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर उद्या राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त नांदेड जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीनं “ग्रंथ प्रदर्शन, वाचनध्यास उपक्रम आणि ई-पुस्तकांचं वाचन” असे उपक्रम आयोजित केले आहेत. राज्यात इतरत्रही वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
****
शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याबरोबरच महाआरोग्य शिबिरातून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातल्या जवरला इथं आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन डोंगरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामस्थांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या देवळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात, तसंच जिंतूर तालुक्यातल्या कौसडी इथं आज रोगनिदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी मोफत औषधांचं वाटपही करण्यात आलं. जिल्ह्यातला कोणताही रुग्ण उपचाराअभावी राहू नये, असं आवाहन आमदार विजय भांबळे यांनी यावेळी केलं.
****
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं आज महात्मा गांधी स्वच्छता संवाद सेवा पदयात्रा काढण्यात आली. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या यात्रेला सुरुवात केली. या पदयात्रेच्या माध्यमातून चांगल्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जनतेला आपण देत आहोत, असं सांगून खोत यांनी, संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार आपल्याला पुढे जायचं असल्याचं नमूद केलं.
****
औरंगाबाद नजिक चिकलठाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आज चार चित्रकला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर पोस्टर्स प्रदर्शन भरवलं होतं. यात पाहणाऱ्याला अंतर्मुख करणाऱ्या ८० चित्रांचा समावेश होता. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि प्रेरणा प्रकल्पात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आलं.
****
विजयादशमीनिमित्त औरंगाबाद शहरातल्या बुद्ध लेणी परिसरातल्या महाविहारात दहा दिवसीय श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हे श्रामणेर शिबिर सुरु असून, अनेक विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.
****
भारत आणि वेस्ट इंडीज् दरम्यानचा हैदराबाद इथला दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं दहा गडी राखून जिंकत मालिका दोन - शून्यनं जिंकली आहे. भारताचा पहिला डाव तीनशे सदुसष्ठ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या १२७ धावाच करु शकला. उमेश यादवनं चार, रविंद्र जडेजानं तीन, रविचंद्रन अश्विननं दोन, तर कुलदीप यादवनं एक गडी बाद केला. दुसऱ्या डावात सामना जिंकण्यासाठी असलेलं ��वघं ७२ धावांचं लक्ष्य भारतीय संघानं सतराव्या षटकातच पूर्ण केलं. सामन्यात एकूण दहा बळी घेणारा उमेश यादव सामनावीर, तर पदार्पणातच शतक झळकावणारा पृथ्वी शॉ मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 May 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० मे २०१८ दुपारी १.०० वा. **** माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा राज्यातून अट्ठ्यांऐंशी पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे दोन टक्क्यांनी कमी आहे. उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचं प्रमाण ब्याण्णव पूर्णांक छत्तीस शतांश टक्के तर मुलांचं हे प्रमाण पंच्याऐंशी पूर्णांक तेवीस शतांश टक्के, इतकं आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९४ पूर्णांक ३६ टक्के इतका असून, औरंगाबाद विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ७४ आणि लातूर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ३१ टक्के इतका लागला आहे. **** राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे प्रशिक्षणार्थी, देशासाठी समर्पण आणि उत्कृष्ठता या बाबतीत, देशभरातल्या युवकांचे आदर्श बनले आहेत, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती आज पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमी,एनडीए च्या एकशे चौतिसाव्या तुकडीच्या दीक्षांत समारंभानंतर बोलत होते. यावेळी सर्वश्रेष्ठ प्रशिक्षणार्थीं साठीची राष्ट्रपती पदकंही प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमा आधी राष्ट्रपतींना सैन्याच्या विमानांच्या एका तुकडीनं हवाई सलामी दिली. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जकार्ता इथे इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्याशी चर्चा केली. यानंतर दोन्ही नेत्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या चर्चेनंतर उभय देशांदरम्यान, संरक्षण, अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रां संदर्भात अनेक करार होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान आज जकार्ता इथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. **** रोटोमॅक, या कानपूरच्या उद्योग समूहाच्या एकशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्त वसुली संचालनालयानं टाच आणली आहे. या कंपनीवर, बँकांचं तीन हजार सहाशे पंचाण्णव कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. मनीलाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये या कंपनीच्या मुंबईतल्या मालमत्तांचाही समावेश आहे. **** प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या हेतूनं रेल्वेमार्गांच्या अद्ययावती करणाचं काम सुरू असल्यामुळे सध्या अनेक मार्गांवर रेल्वेगाड्या उशिरा धावत असून, प्रवाशांनी याबाबत रेल्वेला सहकार्य करावं, असं रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. गोयल यांनी एका ट्विट संदेशाद्वारे हे आवाहन केलं आहे. **** बँकांच्या राज्यातल्या बारा हजार शाखांमधले सुमारे साठ हजार बँक कर्मचारी आजपासून दोन दिवसांच्या संपावर गेल्यामुळे राज्यातल्या बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्या आहेत. देशभरातल्या एकवीस सार्वजनिक, तेरा जुन्या खाजगी, सहा परदेशी आणि छप्पन्न प्रादेशिक ग्रामीण बँकांमधले सुमारे दहा लाख कर्मचारी, अत्यल्प पगारवाढीच्या निषेधार्थ या संपावर गेले आहेत. **** नैऋत्य मॉन्सून काल भारतीय उपखंडात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामानखात्यानं केली आहे. केरळसह अंदमान निकोबार बेटं, लक्षद्वीप आणि तामीळनाडूच्या काही भागात मॉन्सून सक्रिय झाला असून, त्याच्या पुढच्या वाटचालीसाठीही हवामान पोषक असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. रत्नागिरी शहरात काल मॉन्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं, तसंच सातारा शहर आणि परिसरामध्ये कोकणपट्टीकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे तापमानात मोठी घट झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. मराठवाड्या��्या काही जिल्ह्यांमध्ये आज मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामानखात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, कर्नाटक मधल्या मंगलोर इथे आज मॉन्सूनच्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याचं वृत्त आहे. **** तंबाखूचं कुठल्याही स्वरूपातलं सेवन हे आरोग्याला घातक असल्यामुळे तरुण पिढीनं तंबाखूपासून दूर राहावं, असं आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलं आहे. उद्याच्या जागतिक तंबाखू विरोधी दिवसा निमित्त शासनानं हाती घेतलेल्या ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र‘ या तीन दिवसीय जनजागृती अभियानाचं उद्घाटन काल बडोले यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बडोले यांनी उपस्थितांना महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याची शपथ दिली. **** पॅरिस इथे सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या सामन्यांमध्ये भारताच्या रोहन बोपण्णानं आपला फ्रेंच जोडीदार रॉजर व्हॅसलिन याच्या साथीनं स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीतलं भारताचं एकमेव आव्हान असलेला युकी भांबरी मात्र पहिल्या फेरीतच पराभूत झाला. *****
0 notes