Tumgik
#ड मतदार
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 30 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 30 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३० डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रिमोट मतदान प्रक्रियेची तयारी; देशभरातून कुठूनही मतदान करणं शक्य होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचं निधन;महान फुटबॉलपटू पेले कालवश 
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात विरोधकांचं अविश्वास प्रस्तावाचं पत्र
केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाचा आकांक्षित तालुका आणि शहरे कार्यक्रम
समतोल प्रादेशिक विकासासाठी नव्याने समिती गठीत करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किटची घोषणा
सोयाबीन आणि कापसाला योग्य हमीभाव द्यावा-राज्य सरकारचं केंद्राला पत्र
विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
आणि
देशात 5-जी सेवा उपलब्ध होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या शहरात औरंगाबादचा समावेश
सविस्तर बातम्या
केंद्रीय निवडणूक आयोगानं रिमोट मतदान प्रक्रियेची तयारी केली आहे. यामुळे इतर राज्यात राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी आपल्या राज्यात परतण्याची गरज आता राहणार नाही. देशभरातून कुठूनही आपल्या मतदारसंघासाठी मतदान करणं शक्य होणार आहे. ही सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोगानं बहु-मतदारसंघ रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान-यंत्र निर्माण केलं असून, या यंत्राद्वारे एका मतदान केंद्रातून बहात्तर मतदारसंघांसाठी मतदान करता येणार आहे. या यंत्राच्या उपयोगाची माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगानं पुढच्या महिन्याच्या सोळा तारखेला सगळ्या राजकीय पक्षांची बैठक बोलावली असून, या पक्षांनी येत्या एकतीस जानेवारीपर्यंत याबाबतच्या आपल्या सूचना मांडाव्यात, असं त्यांना सांगितलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांचं आज पहाटे अहमदाबाद इथं निधन झालं, त्या शंभर वर्षांच्या होत्या. पंतप्रधानांनी ट्विटर संदेशाद्वारे याबाबत माहिती दिली. हिराबा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे परवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
****
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचं काल कर्करोगानं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. २१ वर्षांच्या कारकिर्दीत पेले यांनी १ हजार २८१ गोल केले. त्यांनी ब्राजिल संघाला तीन वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकून दिला होता. पेले यांच्या निधनानं क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचं पत्र विरोधकांनी विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना दिलं आहे. या पत्रावर सुनील केदार, सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील आदींसह सुमारे ३९ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विरोधकांना बोलू न देता पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र या प्रस्तावाबाबत कल्पना नसल्याचं, वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. त्यापूर्वी काल विधानसभेत २९३ अन्वये प्रस्तावाला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध घोषणा केल्या. कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असून, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
केंद्राच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित तालुका आणि शहरे कार्यक्रम राबवण्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली .या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातल्या ड वर्ग महानगरपालिका, ब आणि क वर्ग नगरपरिषदा तसंच नगरपंचायतींमधल्या शहरांचा समतोल आणि कालबद्ध सर्वसमावेशक विकास करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विदर्भाच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास पूर्ण होऊ शकत नाही, असं त्यांनी नमूद केलं.
****
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही वैधानिक महामंडळांच्या पुनर्गठनाची मागणी केंद्र सरकारकडे केली असून, ती लवकरच मान्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्रीयांनी व्यक्त केला. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी सुरू केलेल्या, विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास, या विषयावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्राच्या मान्यतेनंतर तीनही विकास मंडळांचं पुनर्गठन झाल्यावर, प्रादेशिक असंतुलन शोधून समतोल प्रादेशिक विकासासाठी नव्याने समिती गठीत करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मराठवाडा आणि विदर्भात सत्तर हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता दिल आहे, यातून या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. आता या महामार्गामुळे नागपूर आणि औरंगाबाद थेट संपर्क झाला असल्याने, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या धार्मिक आणि निसर्ग पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होणार आहे. याठिकाणीही पर्यटन स्थळांवर सुविधा विकसित करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. समृद्धी महामार्ग गडचिरोली मार्गे छत्तीसगड तसंच मध्यप्रदेशाला जोडण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मराठवाड्यातून जाणाऱ्या नागपूर गोवा औद्योगिक मार्गिकेचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले...
Byte …
नागपूरपासून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर देखील आपण विकसित करतोय. मग त्यात मराठवाड्याला पण न्याय मिळणार आहे. आणि मराठवाड्यातले उर्वरित जिल्हे जे काही आहेत, ते ही त्याच्यातून कव्हर होतायत. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लॉजिस्टीक सपोर्ट देखील तयार होतील.
****
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या चर्चेत बोलताना, मंत्रिमंडळ विस्तार आणि महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले,
Byte ..
ज्या वेळेस आपण पुढे जात असतो राज्याला घेऊन त्यावेळेस माझी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघांना विनंती आहे, महिलांनाही प्रतिनिधीत्व द्या अन् बाकीच्या पण जागा त्या ठिकाणी भरा. कुठल्या घ्यायच्यात त्या भरा.
****
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असून, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अधिक बळकट करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं तसंच समुपदेशन उपक्रमात तज्ज्ञांना सहभागी करून घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेत सहभागी होत, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या उद्योगांना वीज दरात सवलत देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार एक नवीन धोरण आखत असल्याची माहिती दिली. ऊर्जा योजनेसाठी केंद्रानं एकोणचाळीस हजार सहाशे दोनकोटी रुपये मंजूर केल्याचं फडणवीस  यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यातले किमान तीस टक्के शेतकरी पूर्णपणे सौरऊर्जा वापराकडे वळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. या प्रकारचा पहिला पथदर्शी फीडर राळेगण सिद्धी इथं बसवण्यात आला असून, या गावातल्या ग्रामस्थांनी अजून एका सौर फीडरची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणं आवश्यक असून, राज्यातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल विधानसभेत बोलत होते. केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करत नाही मात्र काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे, याकडे पटोले यांनी लक्ष वेधलं.
****
पाणीपुरवठा विभागातल्या कामांना गती मिळावी यासाठी या विभागातल्या एक हजार तीनशे तेरा जागा भरण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात एक उपअभियंता पद भरण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल विधानसभेत दिली. बीड जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत सदस्य लक्ष्मण पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
****
राज्यातल्या ६० हजार अंगणवाड्यांना वीज जोडणी देण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, येत्या तीन महिन्यात या सगळ्या अंगणवाड्यांना वीज पुरवठा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल विधानसभेत दिली.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला पन्नास वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त, पन्नास कोटी रुपये कृषी संशोधन आणि इतर अनुषंगिक उपक्रमासाठी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, त्यापैकी पंचवीस कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, आणि उर्वरित निधी आवश्यकतेनुसार देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल विधानसभेत दिली.  कृषी विद्यापीठाच्या सुधारित आकृती बंधाला तात्काळ मंजुरी देण्यात येईल, यामुळे ८० टक्के रिक्त जागा भरल्या जातील, असं ते म्हणाले. आमदार सुरेश वरपुडकर यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता.
****
सोयाबीन आणि कापसाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच निर्यात धोरणात योग्य तो बदल करावा, अशी मागणी करणारं पत्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पाठवलं आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्याला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सोयाबीनला आठ हजार ७०० रुपये, आणि कापसाला १२ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याची मागणी, त्यांनी या पत्रात केली आहे. सोयाबीन ढेप निर्यातीसंदर्भात धोरणात बदल करावा, खाद्यतेलावरील आयात शुल्क ३० टक्के करावं, आदी मागण्यांही सत्तार यांनी पत्रातून केल्या आहेत.
****
राज्यातल्या बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करण्यात येईल, तसंच अशा डॉक्टरांना अधिकाधिक कडक शिक्षा होण्याच्या दृष्टीनं कायद्यात काही सुधारणा करता येतील का, याचा विचार करण्यात येईल, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानसभेत सांगितलं. विधानसभा सदस्य संजय बनसोडे यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला  ते उत्तर देत होते. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात चार बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहितीही महाजन यांनी यावेळी दिली.
****
परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या पदवीधारकांनी बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे वैद्यकीय परिषदांमध्ये नोंदणी केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयनं काल देशभरातल्या एक्क्याण्णव ठिकाणी छापे घातले. यामध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई, नागपूर, बुलडाणा, पुणे, जळगाव इथल्या वैद्यकीय परिषदांचा, तसंच परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
****
विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी १२ जानेवारी पर्यंत अर्ज दाखल करता येतील. या जागांसाठी मतदान ३० जानेवारीला होईल आणि २ फेब्रुवारीला निकाल लागतील.
****
देशात 5-जी सेवा उपलब्ध होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या शहरात औरंगाबादचा समावेश करण्यात आला आहे. या टप्प्यातल्या शहरांमध्ये मार्च २०२३ पर्यंत 5-जी सेवा सुरू होणार आहे. औरंगाबाद शहराचा या टप्प्यात समावेश करण्याची मागणी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड अग्रीकल्चर - सीएमआयए संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या पुढाकारातून सीएमआयएने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. त्यानुसार आता औरंगाबाद शहरात येत्या मार्च महिन्यापासून 5-जी सेवा उपलब्ध होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सरसकट सगळ्या दिव्यांगांना मिळकत करामध्ये सवलत देण्याचे आदेश, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर, कुटुंबप्रमुख दिव्यांग असल्यास मिळकत करामध्ये मिळणारी पन्नास टक्के सूट, ही कुटुंबाचे प्रमुख नसलेल्या दिव्यांगांनाही मिळावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग विकास आघाडीनं केली होती, त्यानंतर, ही अट शिथिल करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यातल्या शेवाळा इथं मन्याड नदी संवाद यात्रेचा काल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. मन्याड नदीमधली गाळामुळे बंद पडलेली लिंबा उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गाळ काढण्याची तयारी दाखवल्याबद्दल राऊत यांनी ग्रामस्थांचं अभिनंदन केलं.
****
राज्य शासनाच्या २०२१-२२ च्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात उस्मानाबादच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल मधले क्रीडा शिक्षक संजय देशमुख यांना विशेष क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या मक्रणपूर इथं आज मक्रणपूर परिषद आणि जयभीम दिन स्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यसेनानी दलितमित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान आयोजित या परिषदेची सुरुवात सकाळी दहा वाजता ध्वजारोहणाने होईल. या परिषदेदरम्यान आज विविध कार्यक्रम होणार आहेत.
२०२२ या वर्षाचे अखेरचे २ दिवस शिल्लक आहे. सर्वत्र नव्या वर्षाची तयारी सुरू झाली आहे. या सरत्या वर्षानं आपल्याला काय दिलं, काय शिकवलं याचा आढावा घेणारा कार्यक्रम ‘सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा’ आज रात्री साडे ९ वाजता अस्मिता वाहिनीवरुन प्रसारित केला जाईल. राज्यातल्या सर्व केंद्रांवरुन हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल.
****
0 notes
marathinewslive · 4 years
Text
आसाम विधानसभा निवडणूक 2021: एक लाखाहून अधिक मतदार मतदान करण्यास सक्षम राहणार नाहीत, हे कारण आहे - आसाम विधानसभा निवडणूक 2021: एक लाखाहून अधिक मतदार मतदान करू शकणार नाहीत, हेच कारण आहे
आसाम विधानसभा निवडणूक 2021: एक लाखाहून अधिक मतदार मतदान करण्यास सक्षम राहणार नाहीत, हे कारण आहे – आसाम विधानसभा निवडणूक 2021: एक लाखाहून अधिक मतदार मतदान करू शकणार नाहीत, हेच कारण आहे
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका विधानसभा निवडणुकीत आसाममधील एक लाखाहून अधिक मतदार आपले मत देऊ शकणार नाहीत. राज्यातील तीन टप्प्यांच्या निवडणुकीत 1.08 लाख मतदारांना संशयास्पद मानले गेले आहे, त्यामुळे त्यांना मत देण्याची परवानगी दिली जाणार नाही. आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) नितीन खाडे यांनी शनिवारी ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 August 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक –  २७ ऑगस्ट २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      राज्यात उद्योग सुरु करण्यासाठी विभागनिहाय उद्योग नकाशा तयार करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
·      आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ
·      राज्यातल्या गट अ आणि गट ब वर्गातील अधिकाऱ्यांनाही अनुकंपा धोरण लागू
·      असंघटीत कामगारांसाठीच्या राष्ट्रीय ई-श्रम पोर्टलचं लोकार्पण
·      मराठवाड्यात १९६ नवीन कोविड बाधितांची नोंद तर पाच जणांचा मृत्यू
·      टमाट्याचे भाव घसरल्यानं  औरंगाबाद - मुंबई  महामार्गावर शेतकऱ्यांचं आंदोलन
·      जालना जिल्ह्यातील भोकरदनचे माजी आमदार संतोषराव दसपुते यांचं निधन  
आणि
·      तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर, इंग्लंडच्या पहिल्या डावात आठ बाद ४२३ धावा    
****
राज्यातली प्रादेशिक वैशिष्ट्यं, साधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या विभागात कोणते उद्योग सुरु करता येतील, हे निश्चित करण्यासाठी, राज्याचा विभागनिहाय ‘उद्योग नकाशा’ तयार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत काल एका दैनिकातर्फे आयोजित परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. उद्योग विभागाला या संदर्भातल्या सूचना दिल्या असून, या आराखड्याची निश्चिती झाली की आवश्यक त्या सोयी सुविधा उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येतील, या माध्यमातून स्थानिकांसाठीच्या रोजगार संधीचा मार्गही प्रशस्त केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. राज्यशासन गुंतवणूकदारांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि भविष्यातही राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. स्थानिकांना विश्वासात घेऊन आणि तिथं उभारण्यात येणाऱ्या उद्योग व्यवसायांची माहिती देऊन हे काम केलं जाईल, असं ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक उद्योजकानं देश आणि जगाच्या पातळीवर या राज्याचा `भूषण अग्रदूत` म्हणून काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पर्यटन क्षेत्रात अमाप रोजगार संधी दडल्या असल्याचं सांगतांना पर्यटन क्षेत्राला आदरातिथ्य उद्योगाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोबदल्यात दरमहा एक हजार रुपये, तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास, राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. ही प्रस्तावित वाढ जुलै २०२१ या महिन्यापासून देण्यात येणार आहे. यासाठी होणाऱ्या अंदाजे १३५ कोटी ६० लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली.
 राज्यातल्या गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास, कुटुंबातल्या सदस्याला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय, काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातल्या पात्र सदस्याला, अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचं निधन झालं असून, अधिकारी संघटनांची हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती.
अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून, `महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१`, तयार करण्यासही, राज्य मंत्रीमंडळानं मान्यता दिली. राज्य तंत्रशिक्षण मंडळ, अधिनियम १९९७ मधील कलमांमध्ये सुधारणा, कृषी आधारित आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत, मोठ्या आणि विशाल प्रकल्पांसाठी विहीत गुंतवणूक, रोजगाराचे निकष आणि प्रोत्साहने सुधारित करण्याचे निर्णयही, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.
 उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थाच्या परवानगीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय, काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी आता १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी मंडळाच्या सदस्य सचिवांकडे अर्ज करता येतील.
****
कोरोना विषाणू संसर्ग काळात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ सोहळ्याचा एक भाग म्हणून जलशक्ती मंत्रालयानं, शंभर दिवस चालणाऱ्या ‘सुजलाम’ मोहिमेला प्रारंभ केला आहे. गाव पातळीवर सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबवून अधिकाधिक गावं हागणदारी मुक्त करण्यासाठी ही मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत गाव पातळीवर सांडपाणी व्यवस्थापन करून विशेषतः एक लाख शोष खड्ड्यांची निर्मिती, आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीनं व्यवस्थापन केलं जाणार आहे. देशभरातल्या गावांना अल्पावधीत वेगानं हागणदारी मुक्त दर्जा प्राप्त करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु करून देण्याचा या मोहिमेचा प्रयत्न असून, परवा बुधवारपासून ही मोहीम सुरू झाली आहे.  
****
कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी असंघटीत कामगारांसाठी माहितीवर आधारीत राष्ट्रीय ई-श्रम पोर्टलचं नवी दिल्लीत काल लोकार्पण केलं. या पोर्टलमध्ये देशभरातील असंघटीत कामगारांची सर्व माहिती असेल. या माहितीच्या आधारे श्रम योगी ही योजना कामगारांपर्यंत पोहोचवणं सहज शक्य होणार असल्याचं, यादव यांनी म्हटलं आहे. कामगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी अंदाजे ४०४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, कोणत्याही असंघटित कामगारांना पोर्टलवर नोंदणीसाठी शुल्क द्यावं लागणार नाही, अशी माहिती कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिली. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, असंघटित कामगारांना शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची गरज नाही, १२-अंकी युए क्रमांक असलेलं हे ई-श्रम कार्ड हे देशभरात वैध असल्याचही तेली यांनी सांगितल.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ ऑगस्टला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ८०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्र सरकारनं परदेशातून जनुकीय बदल केलेल्या जीएम सोयाकेकच्या आयातीस दिलेली परवानगी तात्काळ रद्द करण्याची मागणी, राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र पाठवून, ही मागणी केली आहे. यंदा देशात सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र हे सोयाबीनचं उत्पादन घेणारं देशातलं सर्वात मोठं राज्य असून, ४५ लक्ष हेक्टर उत्पादन राज्यात होतं. मात्र तरीही केंद्र सरकारच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं १२ लाख टन जनुकीय बदल केलेल्या जीएम-सोयाकेक आयातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला, या निर्णयानंतर सोयाबीनचे भाव सुमारे दोन हजार रुपयांनी घसरल्याची टीका, भुसे यांनी या पत्राद्वारे क���ली आहे.
****
टमाट्याचे भाव घसरल्यानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत, औरंगाबाद - मुंबई महामार्गावर टमाटे फेकून देत काल आंदोलन केलं. मराठवाड्यात सर्वात जास्त टमाटे उत्पादक म्हणून नावारुपाला आलेल्या गंगापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी, लासूर स्टेशनजवळच्या सावंगी चौकात हे आंदोलन केलं. सध्या टमाट्याला केवळ दोन ते तीन रुपये किलो भाव मिळत असून, पंचवीस रुपये किलो हमीभाव जाहीर करावा, निर्यात बंदी तात्काळ उठवावी, अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकरी अनुदान मंजूर करावं, आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. आंदोलनादरम्यान या मार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबली होती. औरंगाबादमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाधवमंडीतही शेतकऱ्यांनी टमाटे फेकून देत नाराजी व्यक्त केली.
****
मराठवाड्यातला मधुर केसर आंबा जगभर लोकप्रिय ठरला असून, आता भारतीय टपाल खात्यातर्फे, `मराठवाडा केसर आंबा` यावर विशेष टपाल लिफाफा काढण्यात आला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत औरंगाबाद टपाल विभागाचे प्रमुख व्ही. एस. जयसंकर यांच्या हस्ते, आज दुपारी चार वाजता टपाल मुख्यालयामध्ये या लिफाफ्याचं अनावरण करण्यात येणार आहे.
****
मराठवाड्यात काल १९६ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १०५ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ४३, लातूर २२, औरंगाबाद २०, नांदेड तीन, तर जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
****
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुकांमध्ये इतर मागास वर्गीयांना राजकीय आरक्षण मिळूच नये, असा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचा संशय सरकारच्या ढिलाईवरून येत असल्याची टीका, भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या अठरा महापालिकांच्या प्रशासनाला निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेचा मसुदा तयार करण्यास सांगितलं असल्याचं, सावे यांनी या संदर्भातल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे.
****
जालना जिल्ह्यातील भोकरदन-जाफराबाद मतदार संघाचे माजी आमदार तथा महाराष्ट्र पंचायत राज समितीचे माजी अध्यक्ष संतोषराव दसपुते यांच काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. दसपुते १९८० मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर भोकदरन-जाफ्राबाद मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले होते. ग्रामीण भागातल्या शिक्षणासाठी त्यांनी भोकरदन शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना करून मुलींची शाळा सुरु केली. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी मूळ गाव भायडी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
पाणी बचतीच्या लढ्यात ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकचळवळ उभी करावी, असं आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे राज्य आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलं. अटल भूजल योजनेअंतर्गत, काल जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या यावल पिंप्री इथं आयोजित ग्रामसंवाद मेळाव्यात, ते बोलत होते.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान हेडिंग्ले इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कालच्या दुसऱ्या दिवस अखेर, इंग्लंडच्या पहिल्या डावात आठ बाद ४२३ धावा झाल्या. तत्पूर्वी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आल्यानं इंग्लंडचा संघ ३४५ धावांनी आघाडीवर आहे.
****
हवामान
गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं दिली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 January 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा. ****
राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे पुढे जात असून गेल्या एक वर्षापासून यावर काम सुरु आहे. नामांतराच्या मुद्यावर एकत्र बसून चर्चा करु आणि मार्ग काढू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. हे आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडी टिकावी आणि विकासाला महत्व द्यावं ही आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भूमिका असून आम्हीदेखील त्याचं समर्थन करुन पुढे जात आहोत, असं पवार म्हणाले.
****
अमेरिकेचे राष्‍ट्रपती डोनाल्‍ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी काल रात्री कॅपि‍टल इमारतीवर केलेल्या हल्ल्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ट्रंप समर्थकांनी हल्ला केला त्यावेळी अमेरिकेच्या संसदेत नव निर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांची निवड वैध असल्याबाबत चर्चा सुरु होती. निदर्शकांनी कॅपिटल इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना हिंसेचा मार्ग सोडून घरी जाण्याचं आवाहन केलं, मात्र ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गडबड झाल्याच्या बाबीचा वारंवार उल्लेख करत होते. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.
****
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागानं सूचित केलेल्या चार जन केंद्रीत सुधारणांपैकी तीन सुधारणा राज्यात घडवून आणणारा मध्य प्रदेश आणि आंध्रप्रदेश हा राज्यांचा पहिला गट ठरला आहे. या दोन्ही राज्य सरकारांनी त्या त्या राज्यांमध्ये ‘एक देश - एक रेशनकार्ड’, उद्योग सुलभता आणि नागरी स्थानिक संस्था या तीन सुधारणा लागू करण्याचे लक्ष्य पूर्ण केले आहे. या सुधारणा लागू केल्यामुळे केंद्र सरकारनं नव्यानं सुरु केलेल्या भांडवली खर्चासाठी राज्यांना विशेष मदत योजनेअंतर्गत या राज्यांना १ हजार ४ कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागानं घेतला आहे.
****
देशात कोविड संक्रमणातून बरे होण्याचा दर वाढून ९६ पूर्णांक ३६ दशांश टक्के झाला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कोविड १९ आजारातून बरे होणाऱ्यांनी एक कोटीचा टप्पा पार केला असून बरे होणाऱ्यांची संख्या १ कोटी १६ हजारांपर्यंत पोहचली आहे तर कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत घट होऊन ही संख्या प्रतिदिवस २५ हजारांवर आली आहे. गेल्या २४ तासांत देशात २० हजार ३४६ कोविड बाधितांची नोंद झाली असून सध्या देशात २ लाख २८ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहे. देशातल्या मृत्यू दरातही घट झाली असून हा दर आता १ पुर्णांक ४५ दशांश आहे. राज्यांनी उपचारासाठी पुरवलेल्या सुविधा तसंच कोरोना विषाणू प्रतिबंध नियमावलीचे पालन करण्यासाठी केलेली सक्ती यामुळे बरे होणाच्या संख्येत वाढ होवून नवसंक्रमितांच्या घट होत असल्याचंही आरोग्य विभागानं म्हटलं आहे.
****
दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं काल एका दिवसात एकूण ९ लाख ३७ हजार ५९० नमुन्यांची तपासणी केली. देशात आतापर्यंत एकूण १७ कोटी, ८४ लाख, ९९५ हजार चाचण्या घेण्यात आल्या असल्याचं परिषदेनं सांगितलं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियानं २ बाद १५९ धावा केल्या होत्या. सामना सुरु झाल्यानंतर केवळ २१ धावा झाल्यावर पावसामुळं खेळ थांबवण्यात आला होता. दुसऱ्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियानं जो बर्न्स आणि ट्रेव्हिस हेड यांना आराम देवून डेव्हिड वॉर्नर आणि युवा फलंदाज पुकोवस्की यांना संघात घेतलं आहे तर भारतीय संघानं मयंक अग्रवाल आणि उमेश यादव यांच्या जागी रोहीत शर्मा आणि नवदीप सैनी यांना संधी दिली आहे. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत असल्यामुळं हा सामना निर्णायक ठरणार आहे.
****
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानं शनिवारी गांगुलींना दक्षिण कोलकाता इथल्या वूडलँड या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून घरी सोडलं असलं तरीही डॉक्टरांकडून गांगुली यांच्या प्रकृतीची दररोज माहिती घेतली जाणार आहे.
****
मराठा आरक्षणाबाबत आज मुख्यमंत्री शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत. आज दुपारी साडे तीन वाजता सह्याद्री अतिथी गृहात ही बैठक होणार असून आरक्षणाबाबतच्या मुद्यांवर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली विधानसभा मतदार संघात आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर फेरीला आज चांगला प्रतिसाद मिळाला. कणकवली मुर्डेश्वर मैदानावरून निघालेली ही फेरी प्रांताधिकारी कार्यालयावर जाऊन धडकली.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 September 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      रबी हंगामातल्या गहू, हरभरा आणि करडईसह सहा पिकांच्या हमीभावात वाढ.
·      राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयकांवर चर्चेदरम्यान गदारोळ करणारे आठ सदस्य संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित; उपसभापतींविरूद्धचा अविश्वास ठराव फेटाळला.
·      मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल; आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक.
·      राज्यात आणखी १५ हजार ७३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, दिवसभरात २०० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      मराठवाड्यात ४७ बाधितांचा मृत्यू, तर नव्या एक हजार १८७ रुग्णांची नोंद.
आणि
·      राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार कायम, नद्या दुथडी भरुन वाहत आहेत तर अनेक धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु.
****
रबी हंगामातल्या गहू, हरभरा आणि करडईसह सहा पिकांच्या किमान आधारभूत किंमत - हमी भावात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल लोकसभेत केली. गव्हाच्या किमान हमीभावात क्विंटलमागे ५० रुपये वाढ करण्यात आली आहे. आता गव्हाचा किमान हमीभाव एक हजार ९७५ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. हरभऱ्याच्या दरात क्विंटलमागे २२५ रुपये वाढ झाल्यानं, हा दर आता पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल, जवाच्या दरात ७५ रुपये वाढीनंतर हा दर प्रतिक्विंटल सोळाशे रुपये, मसूरच्या दरात ३०० रुपये वाढ करण्यात आली असून, हा दर आता पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल, मोहरीच्या दरात २२५ रुपये वाढीनंतर मोहरीचा किमान हमीभाव आता चार हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. करडईच्या दरात प्रतिक्विंटल ११२ रुपयांनी वाढ करण्यात आली असून, हा दर आता पाच हजार ३२७ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.
कृषी सुधारणा विधेयकानंतरही किमान हमीभाव कायम असल्याचा पुनरुच्चार यावेळी तोमर यांनी केला, मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.
****
राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयकांवर चर्चा आणि मतदानावेळी गदारोळ करणाऱ्या आठ सदस्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित केलं होतं. निलंबनाचा ठराव मंजूर झाल्यावर सभापतींनी या सदस्यांना सदनाबाहेर जाण्यास सांगितल्यावर या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे सदनाचं कामकाज लागोपाठ चार वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं, त्यानंतर सभापतींनी या सर्व सदस्यांना चालू पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केल्याचं जाहीर केलं.
दरम्यान, या कारवाईच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी काल संसद भवन परिसरात निदर्शनं केली. निलंबित खासदार रात्रभर या आंदोलन स्थळी बसून होते.
दरम्यान, विरोधी पक्षांनी राज्यसभा उपसभापतिंविरूद्ध दिलेला अविश्वास प्रस्ताव सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे.
****
कृषी सुधारणा विधेयकांमुळे शेतमालाची आंतरराज्यीय विक्री सोपी होणार असल्याचं, विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात असा कायदा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाजारांची निर्मिती झाल्याचं आणि शेतकरी तिथे थेट विक्री करत असल्याचं दिसून आलं, असं फडणवीस म्हणाले. डॉ.स्वामिनाथन आयोगानं अशाच प्रकारच्या शिफारसी केलेल्या असून, हा आयोग पूर्णपणे लागू करण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचं, फडणवीस म्हणाले. औरंगाबादमध्ये आमदार हरीभाऊ बागडे यांनीही वार्ताहरांशी बोलतांना ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचं सांगितलं.
****
मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया असून, यावर पुढे सुनावणी होईल, आपण एक टप्पा पुढे गेलो आहोत, दोन दिवसांत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडतील, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल मुंबईत दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी ही माहिती दिली. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाला आरक्षणावर स्थगिती देण्याचा अधिकार नाही. शिवाय, ५० टक्के आरक्षणावर युक्तिवादच झाला नसल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. राज्यात ५० टक्के मागासवर्गीय आरक्षण असल्यानं यात मराठा समाजाला बसवणं शक्य नसल्यानं ५० टक्क्यांची सीमा ओलांडून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात आता पंतप्रधानांनीच मार्गदर्शन करावं, असं त्या म्हणाल्या.
****
मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी ��राठा क्रांती मोर्चानं काल ��ाज्यभर आंदोलन केलं. नांदेड जिल्ह्यात आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं.
सोलापूर जिल्ह्यातल्या आमदार आणि खासदारांच्या घरासमोरही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल सोलापूर जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्येही काल आंदोलन करण्यात आलं.
सकल मराठा समाज संघटनेनं काल हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं आंदोलन केलं. मराठा समाज आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात त्वरित दाखल करावी यासह आरक्षणासंबंधीच्या इतर मागण्यांचं निवेदन सेनगावच्या तहसीलदारांना देण्यात आलं.
****
राज्य सरकारनं धनगर समाजाचं आरक्षण मार्गी लावावं, अन्यथा राज्यात धनगर विरुद्ध सरकार संघर्ष अटळ असून जे होईल त्याची जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा धनगर समाजाचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. ते काल सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. येत्या दोन दिवसांत या आंदोलनाची दिशा ठरणार असून राज्यभरातील युवक आणि ज्येष्ठ मंडळी तीव्र आंदोलन करण्याचा तयारीत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमाती संवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजाने परभणी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं आहे. माजी आमदार रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. हरिभाऊ शेळके, यांच्यासह अनेक मान्यवरांनी सादर केलेल्या या निवेदनात धनगर आणि धनगड हे एकच आहेत, म्हणून धनगर आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, गरज पडल्यास अध्यादेश काढावा, आदी मागण्या केल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं मल्हार आर्मीच्या वतीनं तुळजाभवानी देवीच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आरक्षणाची ज्योत पेटवण्यात आली. ही ज्योत सबंध महाराष्ट्रभर फिरवण्यात येणार असून आरक्षणाचा वनवा महाराष्ट्रभर पोहोचणार असल्याचं मल्हार आर्मीचे सुरेश कांबळे यांनी सांगितलं.
****
हिंगोली लोकसभा मतदार संघातल्या शेतकऱ्यांना देण्यात येणारं पीक कर्ज आणि मतदार संघातल्या बँकांच्या कार्यप्रणालीसंदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन चर्चा केली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या ११ तालुक्यांत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांकडे शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाची मोठ्या प्रमाणावर मागणी केली आहे. मात्र, फक्त ३० टक्के शेतकऱ्यांनाच आतापर्यंत कर्ज वाटप करण्यात आलं आहे. खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना सांगितलं.
****
राज्यात काल आणखी १५ हजार ७३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १२ लाख २४ हजार ३८० झाली आहे. काल दिवसभरात २०० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय गेल्या आठवड्यात विविध रुग्णालयात मरण पावलेल्या ८१ रुग्णांची, तसंच त्यापूर्वीच्या आठवड्यात मृत पावलेल्या ६३ रुग्णांचीही काल नोंद घेण्यात आली. त्यामुळे राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३३ हजार १५ जणांचा मृत्यू झाला आहे. काल ३२ हजार सात रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत नऊ लाख १६ हजार ३४८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७४ हजार ६२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार १८७ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात तेरा बाधितांचा मृत्यू झाला, तर नवे ३१७ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २८५ रुग्णांची भर पडली. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी सात रुग्णांचा मृत्यू झाला, बीड जिल्ह्यात १३३, तर उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ११४ रुग्णांची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १६७ रुग्णांची भर पडली. जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, जालना जिल्ह्यात ७९ तर परभणी जिल्ह्यात आणखी ७२ रुग्ण आढळून आले. हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला तर नव्या २० रुग्णांची नोंद झाली.
****
पुणे जिल्ह्यात आणखी दोन हजार ३३८ नवे रुग्ण आढळले, तर ७६ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत एक हजार ८३७ नवे रुग्ण, तर ३६ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात आणखी एक हजार ६१ रुग्ण आढळले, तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार ३५०, सातारा ६९०, जळगाव ४७५, सोलापूर २९९, अमरावती २२५, गोंदिया १२९, बुलडाणा १३७, यवतमाळ १२६, अकोला ११७, वाशिम ८९, रत्नागिरी ७०, पालघर ५१, गडचिरोली ३६, तर भंडारा जिल्ह्यात काल आणखी २४ कोर���ना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.  
****
राज्य शासनाच्या आदेशाव्यतिरिक्त जिल्हा प्रशासनानं टाळेबंदीबाबत कोणताही आदेश जारी केला नसून टाळेबंदीबाबत कोणतीही अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे. जिल्हा‍धिकाऱ्यांनी काल सर्व नगराध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींची दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून, माझे कुटुंब माझी जबाबदारी, या योजनेची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष किंवा पंचायत समिती सभापती यांनी आवश्यकता वाटल्यास लोकांना बरोबर घेऊन जनता संचारबंदीबाबत निर्णय घ्यावा असंही दिवेगावकर म्हणाले.
****
राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. बहुतांशी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत, तसंच धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.
औरंगाबाद शहरात काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. यामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन, ज्वारी, मका, तीळ या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
कोकण तसंच सांगली आणि वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.
नाशिक जिल्ह्याच्या काही भागात दुपारी जोरदार पाऊस झाला. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले असून गोदावरी नदीचे पाणी वाढले आहे.
दरम्यान, राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पाचे आणखी दोन दरवाजे काल उघडण्यात आले. धरणाचे एकूण चौदा दरवाजे आता उघडण्यात आले असून नदीपात्रात २५ हजार २२३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन शासनाला अहवाल पाठवावा असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात कारसा-पोहरेगाव तसंच खरोळा बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत न उघडल्यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी जाऊन खरीप पिकांचं नुकसान झालं, हे दरवाजे उघडण्यास लागलेल्या विलंबाची खाते निहाय चौकशी करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
****
परभणी जिल्ह्यात सोयाबीन तसंच कापूस खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा परभणी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्रीधर देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.
****
परभणी तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीने, पुरानं, तसंच ओढे आणि नाल्यांच्या काठावरील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेत जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं असून, या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सोनपेठ तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी शिवसेनेच्या तालुकास्तरिय कार्यकारीणीनं तहसीलदार डॉक्टर आशिषकुमार बिरादार यांच्याकडे केली आहे.
****
सध्या पोषण माह सुरू आहे. लहान मुलांचं आरोग्य सृदृढ राहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे. या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना नागलीची खीर देता येईल. या नागलीच्या खीरची पाककृती सांगत आहेत आहारतज्ञ जाई संत –
प्रथम नागली भाजून घ्यावी. ती दळून वस्त्रगाळ करावी. पातेल्यात अर्धा चमचा तूप घेऊन त्यात दोन चमचे नागलीचे पीठ भाजून घ्यावे. नंतर त्यात आवश्यक त्या प्रमाणात दूध घालावे व चवीपुरती साखर घालावी. चांगले शिजू द्यावे. या खिरीतून मुलांना आयर्न, कॅल्शियम मिळते. खीर पातळ असल्यामुळे मुलांना चावायलाही काही प्रॉब्लेम होत नाही.
****
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनानं जाहीर केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसंच रुग्णालयातल्या जखमींची भेट घेतली. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेत सात मुलांसह १४ जण मरण पावले असून, आतापर्यंत २० जणांना ढिगाऱ्याच्या बाहेर काढण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सावंगी इथल्या महावितरणच्या कार्यालयातील सहायक अभियंता तुषार नांद्रे याला काल १७ हजारांची लाच स्विकारतांना अटक करण्यात आली. विद्युत ठेकेदाराकडून विद्युत वाहिनी स्थलांतरासह, नव्या विद्युत मीटर संबंधीची फाईल मंजूर करण्यासाठी नांद्रे यानं लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
****
दुबईत सुरू असलेल्या इंडियन प्रिमीअर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघानं सनरायजर्स हैदराबाद संघाचा १० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघानं निर्धारित २० षटकात १६४ धावा केल्या, प्रत्युत्तरात सनरायजर्स हैदराबाद संघ केवळ १५३ धावाचं करू शकला.
****
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 February 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि. ****  महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश  घरगुती वीजग्राहकांना शंभर युनीटपर्यंत वीज मोफत देण्याचा राज्यसरकारचा विचार  प्राप्ती कराच्या नव्या रचनेत ७० हून अधिक वजावटी रद्द केल्या असल्या तरी काही सवलती कायम राहणार - केंद्रीय अर्थमंत्री आणि  मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती दिल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा **** महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. काल मुंबईत वर्षा या आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीमार्फत कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. २१ फेब्रुवारीपासून या योजनेच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जातील, त्यानंतर योजनेच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीस सुरूवात होईल. यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. **** घरगुती वीजग्राहकांना शंभर युनीटपर्यंत वीज मोफत देण्याच्या प्रस्तावावर राज्यसरकार विचार करत आहे. ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. दिल्ली सरकारच्या धर्तीवर ही योजना राबवण्याबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून, या समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यावरच पुढचा निर्णय अवलंबून असेल, असं राऊत यांनी सांगितलं. कृषीपंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यावरही सरकार विचार करत असल्याची माहिती राऊत यांनी दिली. **** राज्यभरातल्या राष्ट्रीयकृत बँका, रेल्वे तसंच टपाल कार्यालयात त्रि-भाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा सक्तीनं वापर करावा, अशी मागणी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. केंद्र सरकारची प्राधिकरणं आणि कार्यालय त्रि-भाषा सूत्राचं पालन करत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी हे पत्र लिहिलं आहे. **** हिंगणघाट इथल्या जळीत प्रकरणाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नेमणूक केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटर द्वारे दिली आहे. दरम्यान, ‘मनोधैर्य’ योजनेतून पीडितेच्या कुटुंबाला संपूर्ण सहाय्य देण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. **** एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिका बनवल्या जाणार नाहीत, असं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल राज्यसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. या योजनेअंतर्गत अनुदानित धान्य मिळवण्यासाठी देशभर जुन्या शिधापत्रिकाच वैध राहतील, असं त्यांनी सांगितलं. नवीन शिधापत्रिका बनवण्याबाबत सामाजिक माध्यमांवर येणाऱ्या बातम्या निराधार असून, अशा बनावट शिधापत्रिकांसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फत चौकशीचे संकेत त्यांनी दिले. **** प्राप्ती कराच्या नव्या रचनेत ७० हून अधिक वजावटी रद्द केल्या असल्या तरी काही सवलती कायम ठेवण्यात येणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत काल उद्योग प्रतिनिधी, व्यापारी वर्ग, गुंतवणूकदार तसंच शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी अर्थमंत्र्यांनी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कर प्रणाली अधिकाधिक सुटसुटीत आणि सहज सोपी व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, त्या दृष्टीनेच नवीन कर रचनेचा पर्याय देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय विमा महामंडळाच्या प्रारंभिक सार्वजनिक विक्री प्रस्ताव -आयपीओमुळे अधिकाधिक किरकोळ गुंतवणूकदार याकडे आकर्षित होतील, त्यामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल, असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलं. **** दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात होईल. विधानसभेच्या ७० जागांसाठी ६७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतमोजणी येत्या मंगळवारी ११ फेब्रुवारीला होणार आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** विद्यमान सरकारनं मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला स्थगिती दिल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. परभणी इथं काल राज्यस्तरीय कृषी संजीनवी महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. मराठवाड्यातल्या नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावं या अपेक्षेने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती, असं ते म्हणाले. या महोत्सवानंतर वार्ताहरांशी बोलताना फडणवीस यांनी, राज्यातलं सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न आपल्याकडून होत नसून, सरकार स्वतःच्या कर्मानेच पडेल, अशी टीका केली. सरकारनं मुंबईतल्या नाईट लाईफ पेक्षा शेतकऱ्याच्या लाईफची चर्चा करावी, असंही ते म्हणाले. दरम्यान, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु असून, फडणवीस यांनी काल या विद्यार्थ्यांची अनौपचारिक भेट घेतली. **** नाशिक जिल्ह्यातल्या कांदा निर्यातीला परवानगी मिळावी यासाठी काल लासलगाव इथं विविध शेतकरी संघटनांनी बाजार समितीच्या आवारात जलकुंभावर चढून आंदोलन केलं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. **** नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद नगर परिषदेच्या दोन प्रभागाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षानं विजय मिळवला आहे. जिल्ह्यात पाच पालिकांच्या पोटनिवडणुकीत ६ पैकी पाच जागांवर कॉंग्रेस पक्ष तर एक जागा अपक्षानं जिंकली आहे. बिलोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ अ मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार यशवंत गादगे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ७० मतं आधिक घेऊन विजय मिळवला. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ ड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार अब्दुल गफार अब्दुल सत्तार विजयी झाले. गफार यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी एमआयएम पक्षाचे उमेदवार साबेर चाऊस यांचा एक हजार ८६६ मतांनी पराभव केला. नायगाव नगरपंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार हणमंत बोईनवाड २०७ मतांनी विजयी झाले. परभणी महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या खान शहनाजबी या विजयी झाल्या. त्यांना चार हजार २७९ मतं मिळाली. **** सांगली महापालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी भाजपचेच आनंदा देवमाणे हे विजयी झाले आहेत. गीता सुतार यांना ४३ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांना ३५ मतं पडली. **** अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाच्या पोटनिवडणुकीचा निकालही काल जाहीर झाला, भाजपच्या पल्लवी जाधव यांनी दोन हजार ९१५ मतं मिळवत, आपल्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या अनिता दळवी यांच्यावर एक हजार ७१२ मतांनी विजय मिळवला. **** लातूर इथं विभागीय महसूल आणि क्रीडा तसंच सांस्कृतिक स्पर्धांचं उद्धाटन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते काल झालं. या स्पर्धेत औरंगाबाद, परभणी, जालना बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या जवळपास चौदाशे खेळाडूंनी विविध १४ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला आहे. **** सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या भारतात सध्या मात्र जातीय, धार्मिक भावना अत्यंत टोकदार बनल्याचं माजी उच्च शिक्षण संचालक डॉ.एस.एन. पठाण यांनी म्हटलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्राचं उद्धाटन डॉ पठाण यांच्या उपस्थितीत काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. देश सामाजिक दुभंगतेच्या उंबरठ्यावर असून, संत साहित्याचा अभ्यास हाच यावर उतारा ठरेल असं पठाण यांनी यावेळी नमूद केलं. **** हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या भोसी शिवारात पोलिसांनी काल अफूच्या शेतीवर छापा टाकून झाडे जप्त केली. कांदा -लसणाच्या शेतामध्ये अफूचे सहाशे ते सातशे झाडं लावण्यात आली होती. या शेतकऱ्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवंलं आहे. **** उस्मानाबाद इथं काल आशा दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलतांना उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी आशा आरोग्य सेविकांच्या कार्याचा गौरव केला, या आशा सेविकांनी सुदृढ सशक्त आणि निरोगी भारत निर्मितीसाठी काम करत असतांनाच स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं असं आवाहन कांबळे यांनी केलं. आगामी काळात या सेविकांना विमा संरक्षण देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. **** सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या चळवळीच्या वतीनं लातूर इथं उद्या नऊ फेब्रुवारी रोजी रन फॉर मेरीटचं आयोजन करण्यात आलं आहे. समाजातल्या गुणवत्तेवर होणाऱ्या अन्यायाची जनजागृती व्हावी, गुणवतेला न्याय मिळावा म्हणून रन फॉर मेरिट हा कार्यक्रम एकाच दिवशी एकाच वेळी ३० शहरात आयोजित करण्यात आला आहे. **** भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज ऑकलंड इथं खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंड एक - शून्यनं आघाडीवर आहे. ***** ***
0 notes