#जम्मू-काश्मीरमध्ये दहशत
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०२ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता****
२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवसांच्या उलटगणतीच्या निमित्तानं आयुष मंत्रालयाच्या वतीनं जयपूर इथं आज योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यावेळी उपस्थित होते. आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी आपल्या सर्वांना योगाचा अभ्यास नियमित केला पाहिजे, असं सोनोवाल यावेळी म्हणाले.
****
कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुक जवळ आल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचार दौर्याच्या दुसर्या टप्प्याला आजपासून सुरुवात करणार आहेत. भाजप नेतेब अमित शहा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी देखील प्रचार सभा आणि रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
****
जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे १४ मेसेंजर मोबाइल अॅप्लिकेशन सरकारनं ब्लॉक केले आहेत. दहशतवादी, त्यांचे समर्थक आणि त्यांच्याकरता प्रत्यक्ष काम करणारे हस्तक यांच्याशी संवाद साधण्यासाठी हे अॅप्स वापरत असल्याचं आढळून आलं आहे.
****
कामगार दिनानिमित्त आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं यशवंतराव चव्हाण सभागृहात मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस विधीज्ञ माधुरी क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केलं. या मेळाव्यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शहर परिसरातून मिरवणूक काढली होती.
****
हिंगोली जिल्ह्यात कुरुंदा इथं नदीच्या पूरनियंत्रणाच्या मागणीसाठी काल बंद पाळण्यात आला. ग्रामस्थांनी पालकमंत्री अब्दुल सत्ता��, खासदार हेमंत पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही या प्रश्नावर चर्चा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
इजिप्तमधल्या कैरो इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ जागितक विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मेराज अहमद खान आणि गनीमत सैंखो या दोघांनी पहिलं सुवर्ण पदक पटकावलं. या जोडीनं अंतिम फेरीत मेक्सिकोच्या जोडीचा पराभव केला.
****
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
जम्मू काश्मीर न्यूज: काश्मिरी विद्यार्थ्यांचा गैरवापर हेतूसाठी वापरणारे दहशतवादी - नेटवर्क व्हॅलीपासून बिहार पर्यंत इतर राज्यांमध्ये शिकणार्‍या काश्मिरी विद्यार्थ्यांचा अतिरेकी वापर करीत आहेत.
जम्मू काश्मीर न्यूज: काश्मिरी विद्यार्थ्यांचा गैरवापर हेतूसाठी वापरणारे दहशतवादी – नेटवर्क व्हॅलीपासून बिहार पर्यंत इतर राज्यांमध्ये शिकणार्‍या काश्मिरी विद्यार्थ्यांचा अतिरेकी वापर करीत आहेत.
आयईडी मिळाल्यानंतर सुरक्षा अधिक कडक केली … – फोटो: अमर उजाला अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि जैश यांनी द रजिस्ट्रेशन फ्रंट आणि लष्कर-ए-मुस्तफा या दोन नवीन संस्था तयार करून आपली रणनीती बदलली आहे. दहशतवाद्यांच्या अटकेमुळे या दोन्ही संघटनांच्या सेनापतींनी शस्त्रास्त्र तस्करीचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 March 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ मार्च २०१७ दुपारी १.००वा. *****
मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज पणजीत पत्रकारांशी बोलताना पर्रिकर यांनी आपण आपला राजीनामा पंतप्रधान कार्यालयाला पाठवला असल्याची माहिती दिली. उद्या सायंकाळी पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गोव्यात राजभवनावर हा शपथग्रहण सोहळा होईल, या सोहळ्यात काही आमदारही मंत्रिपदाची शपथ घेतील, असं पर्रिकर यांनी यावेळी सांगितलं. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप याबाबत निर्णय अद्याप व्हायचा असून, निर्णय होताच, माध्यमांना त्याबाबत माहिती दिली जाईल, असं पर्रिकर म्हणाले. गोवा विधानसभेत भाजपचे १३ आमदार असून, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष तसंच गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रत्येकी तीन आमदार आणि दोन अपक्ष आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा भाजपनं केला आहे. **** काँग्रेस पक्ष मणीपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहे. मणीपूर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक २८ आमदार निवडून आले आहेत. समविचारी पक्षांना सोबत घेऊन सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू असल्याचं, काँग्रेसचे मणीपूर प्रदेश समितीकडून सांगण्यात आलं. काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी मावळते मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांची निवड झाली आहे. राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी नवीन सरकार स्थापनेच्या प्रक्रियेसाठी इबोबी सिंह यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं नसल्याचं, राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, भाजपही मणीपूरमध्ये सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात असून, आपल्याला ३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा, भाजपनं राज्यपालांकडे केला आहे. **** ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं झालेल्या मनोज म्हात्रे हत्याप्रकरणी १९ जणांवर संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचं, ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज रानडे यांनी सांगितलं. या सर्व जणांनी राजकीय स्वार्थासाठी हत्या केल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, यापैकी सात जणांना अटक करण्यात आली असून, इतरांचा शोध सुरू असल्याचं, पोलिसांकडून सांगण्यात आलं. काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांची १४ फेब्रुवारीला राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती. **** पाकिस्ताननं सीमेपलिकडून आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं आज सकाळच्या सुमारास उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात कोणीही जखमी झालं नाही. भारताकडून या हल्ल्याला चोख उत्तर देण्यात आल्याचं, सैन्यदलाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं. पाकिस्तानकडून कालही हल्ले झाले होते. ९ मार्च रोजी झालेल्या अशाच हल्ल्यात दीपक घाडगे या जवानाला वीरमरण आलं होतं. **** बँकेच्या बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी निर्बंध आजपासून रद्द झाले आहेत. सर्व प्रकारचे बँक खातेधारक आपल्या खात्यातून हवी तेवढी रक्कम काढू शकतील. आतापर्यंत बचत खात्यामधून पैसे काढण्याची साप्ताहिक मर्यादा ५० हजार रूपये एवढी होती. विमुद्रीकरणानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर रिजर्व्ह बँकेनं निर्बंध घातले होते, टप्प्याटप्प्यानं हे निर्बंध रद्द करण्यात आले. **** संपूर्ण मराठवाड्यात उद्यापासून महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात गौण खनिज विभागातील अव्वल कारकून गजानन चौधरी यांच्या मृत्यूप्रकरणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद सुरू राहणार असल्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. **** शेतकरी कर्जमाफीचा निर्णय राज्यशासन योग्य वेळी घेणार असल्याचं, सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर जिल्ह्यात माढा इथं बोलत होते. शासनानं आतापर्यंत हमीभावानुसार सुमारे २३ लाख क्विंटल तूर खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिली. शेतमाल तारण योजनेतून आतापर्यंत एक लाख ९८ हजार क्विंटल मालावर तारण कर्ज देण्यात आलं असून, यापुढेही शेतकऱ्यांना वीज, पाणी आदी सुविधा मुबलकपणे देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं देशमुख यावेळी म्हणाले. **** दिव्यांग व्यक्तींसाठी येत्या गुरुवारी, १६ मार्च रोजी औरंगाबाद इथं रोजगार आणि स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथं गुरुवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या मेळाव्या�� स्वयंरोजगाराच्या संधींबाबत चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार असून इच्छुक तसंच पात्र दिव्यांग व्यक्तींनी कार्यशाळेचा लाभ घेण्याचं आवाहन, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. //******//
0 notes