#छत्रपती संभाजीनगर न्यूज
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 9 months ago
Text
छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार भूमिगत गटार योजना, मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार, मंजुरीची प्रतिक्षा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराशी संबंधित तीन विधानसभा मतदारसंघात भूमिगत गटार योजनेचे काम केले जाणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, मंजुरीसाठी ते सरकारच्या विविध यंत्रणांकडे पाठवण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी प्रस्तावांना मान्यता मिळाल्यास महापालिकेला निविदा प्रक्रिया राबवणे शक्य होईल, असे मानले जात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 03 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य विधानसभा निवडणुकीतले उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. येत्या २० तारखेला २८८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात नऊ मतदार संघासाठी ४३७ उमेदवारांपैकी ३९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. जालना जिल्ह्यात २९६, बीड जिल्ह्यात ३७७, परभणी जिल्ह्यात दी़डशे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. लातूर जिल्ह्यात १९३, धाराशीव जिल्ह्यात १६४ उमेदरावांचे अर्ज वैध ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात १८७ तर नांदेड जिल्ह्यात ४६० उमेदवारी अर्ज पात्र ठरले.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे ३६ तर महाविकास आघाडीचे २६ उमेदवार बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. महायुतीच्या मोर्शी, आष्टी, श्रीरामपूर, दिंडोरी, देवळाली, अणूशक्तीनगर, मानखुर्द इथल्या उमेदवारांनी परस्परांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर महाविकास आघाडीत परंडा, पंढरपूर, दिग्रस, धारावी, मानखुर्द, सोलापूर शहर मध्य, सांगोला आणि लोहा या आठ जागांवर परस्परांविरोधात उमेदवार उभे आहेत. त्यामुळे, उद्या सोमवारी अर्ज मागं घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही ��ाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या या पत्रात म्हटलं आहे.
भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत असून देशाची संरक्षण निर्यात २०२९-३० पर्यंत ५० हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पासष्ठाव्या स्थापना दिवस समारंभात काल त्यांनी ही माहिती दिली. विकसित भारत हा दृष्टिकोन साकार करण्यासाठी देशात आयात होणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाचा स्वदेशात विकास करण्याचं आवाहन संरक्षणमंत्र्यानी भारतीय तरुणांना यावेळी केलं. आयआयटी कानपूरसारख्या संस्था शैक्षणिक इंजिनं असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात ती भारताला गतिशीलता प्रदान करू शकतात असं राजनाथ सिंह म्हणाले.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुंबईत सुरू तिसरा कसोटी क्रिकेट सामना आज तिसऱ्या दिवशी अतिशय रं��तदार अवस्थ आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा भारतानं १४७ धावांचं लक्ष्य असताना सात बाद १२० धावा केल्या आहेत. ऋषभ पंतनं यात ६४ धावा केल्या आहेत. झीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर बाद झाला. भारतानं पहिल्या डावात २६३ तर न्यूझीलंडनं २३५ धावा केल्या आहेत. तीन कसोटी सामन्यांची ही मालिका न्यूझीलंडनं या पूर्वीच दोन-शून्य अशी जिंकली आहे.
लद्दाखमध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप - एनएलएसटी उभारण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पाचं नेतृत्व बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स - आयआयए चे संचालक प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यम करत आहेत. सूर्यावरील वैज्ञानिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठीच्या या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली असून हा प्रकल्प अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आयआयए नुसार, या दुर्बिणीमध्ये दोन मीटरचे प्रतिक्षेपक बसवलेले असतील. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्यावर होत असलेल्या हालचाली समजून घेण्यास आणि संशोधन करण्यास मदत होईल.
दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला आज २० वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी पूर्वीची डीडी-मेट्रो ही वाहिनी अहोरात्र वृत्त वाहिनीमध्ये रुपांतरित करण्यात आली होती. दूरदर्शनच्या ३१ प्रादेशिक वृत्त वाहिन्या असून समाज माध्यमांवरही डीडी न्यूज अतिशय प्रभावीपणे सक्रिय आहे.
श्रीनगरमधील खा��यार भागात सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींत तीन दहशतवाद्यांना ठार केलं. सुरक्षा दलांनी काल लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उस्मान याला एका चकमकीत ठार केलं आहे.
0 notes
marmikmaharashtra · 14 days ago
Link
https://marmikmaharashtra.com/muhurat-of-social-film-nirdhar-with-song-sound-recording/
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Hinjawadi : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 74 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ;पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई
एमपीसी न्यूज – बनावट शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे (Hinjawadi)आमिष दाखवले. यातून हिंजवडी येथील एका व्यक्तीची 74 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने छत्रपती संभाजीनगर येथील टोळीला बेड्या ठोकल्या. साजिद शहा कासम शहा (वय 30), अभिजित रामराव श्रीरामे (वय 32, दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.…
0 notes
gajananjogdand45 · 7 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/on-the-occasion-of-tradition-the-struggle-between-life-and-tradition-will-be-reflected-on-the-silver-screen-on-26th-april-to-meet-the-audience/
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 9 months ago
Text
छत्रपती संभाजीनगरात आज पाण्याचा 'शटडाऊन'; 'या' परिसरांमध्येही पाणीपुरवठा राहणार बंद
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ९०० व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला क्रॉस कनेक्शन करण्यासाठी बुधवारी महापालिका शटडाऊन घेणार आहे.
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
जायकवाडीच्या पाण्याचा तिढा कायम,पैठण येथे रास्ता रोको आंदोलन, पाणीवाटपाचं नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय अधांतरी आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 19 days ago
Link
https://marmikmaharashtra.com/dimple-pagariya-won-the-post-of-maharashtra-womens-president/
0 notes
marmikmaharashtra · 21 days ago
Link
https://marmikmaharashtra.com/dramatic-romantic-action-film-naad-the-hard-love-will-release-on-october-25/
0 notes
marmikmaharashtra · 25 days ago
Link
https://marmikmaharashtra.com/the-first-look-motion-poster-of-reelstar-released-on-the-occasion-of-dussehra-reelstar-will-soon-be-seen-by-the-audience/
0 notes
marmikmaharashtra · 1 month ago
Link
https://marmikmaharashtra.com/the-story-of-two-lovers-who-fall-in-love-will-unfold-in-the-film-rajarani/
0 notes
marmikmaharashtra · 1 month ago
Link
https://marmikmaharashtra.com/atmosphere-of-excitement-in-dombivli-due-to-namo-ramo-navratri-festival/
0 notes
marmikmaharashtra · 1 month ago
Link
https://marmikmaharashtra.com/on-the-occasion-of-navratri-festival-samosharan-vidhan-started-with-flag-hoisting/
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 02 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
निरंतर प्रयत्न करुनच आपण स्वच्छ भारताचं उद्दीष्ट पूर्ण करु शकतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचं स्वरुप आलं असून, करोडो लोकांनी स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षात स्वच्छता अभियानात सहभागी झालेले, पुढाकार घेतलेले नेते, नागरीक, धार्मिक तसंच स्वयंसेवी संस्था, खेळाडू, सिने अभिनेते आणि माध्यमांचेही त्यांनी आभार मानले. 
आजपासून एक हजार वर्षांनंतर जेव्हा ���१ व्या शतका��ील भारताविषयी अभ्यास केला जाईल, तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण होईल. या शतकात, स्वच्छ भारत हा जगातला सर्वात मोठा आणि लोकांच्या नेतृत्वाखालील लोकांचा संकल्प असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
आज से एक हजार साल बाद भी जब भी इकसवी सदी के भारत का अध्ययन होगा, तो उसमें स्वच्छ भारत अभियान को जरूर याद किया जायेगा। स्वच्छ भारत इस सदी में दुनिया का सबसे बडा और सबसे सफल जन भागीदारी वाला जन नेतृत्व वाला जन आंदोलन है।
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते नऊ हजार ६०० कोटी रुपये किमतीच्या स्वच्छतेशी संबंधित अनेक योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. यामध्ये अमृत योजना, स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशन आणि १५ काँप्रेस्ड बायोगॅस संयंत्र योजनांचा समावेश आहे. या योजना स्वच्छ भारत मिशनला नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केल���. 
****
देशात आतापर्यंत ८० लाख टन कचऱ्याचा वापर रस्ते बांधणीत करण्यात आला असून, यामुळे पर्यायाने कचऱ्याची विल्हेवाट लागून स्वच्छता अभियानाला हातभार लागत असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छतेचं महत्व सांगताना गडकरी यांनी नागरिकांना, स्वतः चांगल्या सवयी आत्मसात करण्याचं आवाहन केलं.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५व्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत महात्मा गांधीजींचं समाधीस्थळ राजघाट इथं प्रार्थना सभा घेण्यात आली.
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री याची देखील आज जयंती. राष्ट्रपती द्रौपदी मूर्म, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं. 
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन, गांधी चौक इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज गांधी स्मारक ��िधी, सृजन सांस्कृतिक मंच आणि भारतीय विद्यार्थी महासंघाच्या वतीने, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक जयदेव डोळे यांचं, ‘सत्याशी असत्याचा सामना - अर्थात गांधीजी आणि फेक न्यूज’ या विषयावर व्याख्यान झालं. स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्यासाठी गांधींनी लोकांना, सत्याग्रह, अहिंसा, खादी, असहकार चळवळ आदी उपक्रम दिले, त्यामुळे जगभरातल्या वृत्तपत्राचं गांधीकडे लक्ष होतं, असं डोळे यांनी सांगितलं.
****
नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून व्यसनमुक्त गाव मोहिमेला प्रारंभ होत आहे. हदगाव तालुक्यातल्या शिऊर इथं पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन होणार आहे. नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या चारही जिल्ह्यात तंटामुक्त गाव समित्या देखील स्थापन होणार आहेत.
****
पुण्यातल्या बाधवन परिसरात आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. यात दोन वैमानिकांसह एका अभियांत्रिकाचा समावेश आहे. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅड वरून या हेलिकॉप्टरनं उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटातचं ही घटना घडली. दाट धुकं असल्यामुळे हा अपघात झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड- मनमाड- नांदेड ही रेल्वे दहा तारखेपर्यंत नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. तसंच बल्लारशा-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी ३१ डिसेंबर पर्यंत दादर ते मुंबई सी.एस.एम.टी. दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
marmikmaharashtra · 1 month ago
Link
https://marmikmaharashtra.com/ek-daav-bhutacha-is-an-interesting-journey-to-find-love-for-the-ghost-and-to-free-the-ghost-on-4th-october/
0 notes