#चंद्रपुरात
Explore tagged Tumblr posts
news-34 · 6 hours ago
Text
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासह सहा राज्यांत विशेष निरीक्षकांची नियुक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांसाठी आज चंद्रपुरात प्रचार सभा
वंचित बहुजन आघाडीची बीड इथून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा हंगामातला पहिला विजय
राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरची भाग्यश्री फड ठरली महाराष्ट्र केसरी
आणि
हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव इथल्या यात्रेची काल्याच्या कीर्तनानं सांगता
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं, महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी सामान्य आणि पोलीस अशा दोन श्रेणींमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सेवानिवृत्त सनदी अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य श्रेणीत विशेष निरीक्षक म्हणून तर भारतीय पोलिस सेवेतले निवृत्त अधिकारी एन.के. मिश्रा यांची पोलिस श्रेणीत विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे विशेष निरीक्षक राज्य मुख्यालयात थांबतील आणि आवश्यकतेनुसार संवेदनशील तसंच समन्वयाची गरज असलेल्या भागांना भेट देतील, असं याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात २५४ ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रं असावीत यावर भर दिला असून, प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रंही असणार आहेत. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त ३० मतदान केंद्रांचं नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. राज्यात यंदा एकूण सहा लाख ४ हजार १४५ इतके दिव्यांग मतदार आहेत.
****
निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासंबंधित परवानगी देण्यासाठी सुविधा संकेतस्‍थळ सुरु केलं आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रचार सभा आयोजित करणं, तात्पुरतं पक्ष कार्यालय उघडणं, घरोघरी जाऊन प्रचार, वाहन वापर परवाना आणि प्रचार सामग्री वितरण करण्याची परवानगी देण्यात येत आहे. या संकेतस्थळावर सुरुवातीच्या २० दिवसांमध्ये तब्बल ७३ हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ४४ हजारांहून अधिक अर्ज मंजूर, १० हजाराहून अधिक अर्ज रद्द तर ११ हजार २०० अर्ज नामंजूर झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशाच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा आज चंद्रपुरात महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार तसंच गडचिरोली चिमूर मतदार संघाचे उमेदवार अशोक नेते यांच्यासाठी होत आहे. या सभेच्या दृष्टीनं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विदर्भातल्या पाच मतदार संघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
****
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या १२ एप्रिल पासून छत्तीसगड, मध्यप्रदेश, आसाम आणि राजस्थान दौऱ्यावर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी रवाना होणार आहेत. आठवले हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएचे राष्ट्रीय स्तरावरचे स्टार प्रचारक आहेत. दरम्यान, १४ एप्रिल रोजी सकाळी दिल्लीत संसदेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडक यांना जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आठवले उपस्थित राहणार असून, त्याच दिवशी दुपारी मुंबईत चैत्यभूमी इथं ते बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत.
****
वंचित बहुजन आघाडीने बीड लोकसभा निवडणुकीसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
निवडणूक कामकाजात सजगता आणि सकारात्मकता आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात काल दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. दरम्यान, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काल सकाळी २५० हून अधिक सायकलस्वारांनी मतदार जागृतीसाठी सायकल फेरी काढली.
****
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, तसच मतदान ���ांततेत पार पडावं, यासाठी जिल्ह्यात ७ मे रोजी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. या दिवशीचे आठवडी बाजार इतर दिवशी भरवण्यात यावेत, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
श्रोतेहो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण परभणी लोकसभा मतदार संघाचा घेतलेला आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा २९ धावांनी पराभव करत या मालिकेतला आपला पहिला विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सने दिलेल्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना दिल्ली कॅपिटल्स संघ २० षटकात ८ बाद दोनशे पाच धावाच करू शकला. दहा चेंडूत नाबाद ३९ धावा आणि एक बळी घेणारा रोमारिओ शेपर्ड सामनावीर ठरला.
दरम्यान, लखनऊ इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंटस संघानं गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. लखनऊ सुपर जायंटसनं दिलेल्या १६३ धावांचा पाठलाग करतांना गुजरात टायटन्सचा संघ १८ षटक पाच चेंडूत सर्वबाद झाला. पाच बळी घेणारा यश ठाकूर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा दुसरा सामना काल पर्थ इथं झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ४-२ असा पराभव करत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला तिसरा सामना पर्थ इथंच १० एप्रिलला होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात घेण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरच्या भाग्यश्री फडने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला, तर पिंपरी - चिंचवडची प्रगती गायकवाड उपविजेती ठरली. छत्रपती संभाजीनगरच्या श्रृंखला रत्नपारखीने ६८ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत सुवर्ण पदक पटकावलं. कुस्तीगीर संघटना आणि नरेंद्रजी अग्रवाल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा घेण्यात आल्या.
****
महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. पुण्यात बालेवाडीच्या सभागृहात झालेल्या या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची तर उपाध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड झाली आहे. हे मंडळ २०२८ पर्यंत कार्यरत राहील.
****
हिंगोली जिल्ह्यात संत नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव इथल्या यात्रेची काल्याच्या कीर्तनानं काल सांगता झाली. काल दुपारी कीर्तनानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या तीन दिवस चाललेल्या या यात्रेत संत नामदेव महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा, प्रवचन, कीर्तन यासारख्या कार्यक्रमांत भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाल्याचं दिसून आलं.
****
नांदेड शहरात काल जिल्हा पोलीस दलातर्फे सद्‌भावना फेरी काढण्यात आली. विविध धर्मांचे धर्मगुरू तसंच एकात्मतेचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेले शालेय विद्यार्थी या फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले.
****
सार्वत्रिक निवडणुक कार्यात दिव्यांगत्वाचं भांडवल करत कुणीही गैरप्रकार करू नयेत, अशा प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेनं केली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोक आठवले यांनी याबाबत एक निवेदन निवडणुक आयुक्तांना पाठवलं आहे.
****
मराठवाड्यातले पहिले प्‍लास्टिक सर्जन दिवंगत डॉक्टर अविनाश येळीकर यांच्या पहिला स्मृतिदिनानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन इथं, डॉक्टर अविनाश येळीकर-सर्जन गरीबांचा, मैत्र जीवांचा या गौरव ग्रंथांचं प्रकाशन करण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत, प्लास्टिक सर्जन डॉक्टर रवीन थत्ते यांच्या हस्ते या गौरवग्रंथाचं प्रकाशन झालं. उपस्थित मान्यवरांनी डॉ येळीकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक होण्यासाठीची राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षा छत्रपती संभाजीनगरातील २२ केंद्रांवर काल घेण्यात आली. या परीक्षेला �� हजार १०५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 
****
आंतराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त जनजागृती म्हणून नाशिक इथं काल गोदावरी नदीच्या काठावर पाच हजार सहाशे २५ चौरस फुटांची रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीच्या माध्यमातून भरडधान्याचं महत्त्व सांगतानाच त्यातील विविधता, पर्यावरणपूरकता, आरोग्यासाठी उपयुक्तता, आदी संदेश देण्यात आला.
****
हवामान
मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात पुढच्या २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 1 year ago
Text
केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभी राहणार १० हजार नवीन घरकुले- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
नागपूर/चंद्रपूर, दि. १५ : आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय योजनेतून दहा हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असून तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर झाला आहे. स्वतः पालकमंत्री श्री. मुनगंटीवार या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, यावर्षी आतापर्यंत 12 जणांचे बळी
https://bharatlive.news/?p=111377 चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, यावर्षी आतापर्यंत ...
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
जोगेंद्र कवाडे महायुतीत, आता रामदास आठवले म्हणतात, आम्हाला विचारायला हवं होतं
जोगेंद्र कवाडे महायुतीत, आता रामदास आठवले म्हणतात, आम्हाला विचारायला हवं होतं
चंद्रपूर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले चंद्रपुरात आले होते. यावेळी ते म्हणाले, प्रा. जोगेंद्र कवाडे जवळचे मित्र आहेत. आम्ही एकत्र राहिलेलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोग्रेंद्र कवाडे यांना सोबत घेतले. त्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणं अत्यंत आवश्यक होतं. महायुतीत येणाऱ्या लोकांचं स्वागत आहे. परंतु, जोगेंद्र कवाडे यांना सोबत घेताना आम्हाला विचारायला हवं होतं. सरळ जाहीर करणं हे अयोग्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
हनीट्रॅप मध्ये अडकला अधिकारी, 50 लाखांची मागितली खंडणी 
चंद्रपूर :  उच्च पदावर असलेला अधिकारी हनीट्रॅप मध्ये अडकल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. अश्लील चित्रफित समाज माध्यमात वायरल करण्याची भीती दाखवीत ब्लॅकमेलिंग करणाऱ्या दोघांना पोल��सांनी अटक केली तर तीन महिलांवर गुन्हे दाखल केले आहे. 50 लाखांची मागितली खंडणी केल्याने त्रस्त झालेल्या अधिकाऱ्याने  पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं. सात महिन्यांपूर्वी …
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील प्रवाशांची सुखरूप सुटका
Tumblr media
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू आहे. अशीच एक घटना चंद्रपुरात समोर आली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका बसमधील ३५ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. स्थानिकांनी दिलेल्या इशा-याकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडले असते. चंद्रपूर येथील चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात बस अडकली होती. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. पुराच्या पाण्यात बस अडकल्याची माहिती विरूर पोलिस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धाडसी कामगिरी करत प्रवाशांची सुटका केली. पुराच्या पाण्यात अडकलेली बस मध्य प्रदेशातून शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाला स्थानिक पोलिस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितले होते. मात्र, तरीदेखील बसचालकाने त्याकडे दुर्लक्ष करत बस पुढे नेली. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही बस पुराच्या पाण्यात बंद पडली. भर पुराच्या पाण्यात बस बंद पडल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होती. पुराच्या पाण्यात बसचा अर्धा भाग बुडाला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसची माहिती विरूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. विरूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात पहाटेच्या अंधारात बचाव कार्य सुरू केले. Read the full article
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्रात फक्त 1 ते 7 दिवसांचा कोळशाचा साठा उपलब्ध, देशभरात वीज संकट वाढत आहे
महाराष्ट्रात फक्त 1 ते 7 दिवसांचा कोळशाचा साठा उपलब्ध, देशभरात वीज संकट वाढत आहे
(प्रतिकात्मक फोटो) प्रतिमा क्रेडिट स्रोत: (फाइल फोटो) महाराष्ट्रातील वीजनिर्मिती केंद्रांची स्थिती चिंताजनक आहे. कोराडी वीजनिर्मिती केंद्रात केवळ २.२१ दिवसांचा कोळशाचा साठा शि��्लक आहे. नाशिकमध्ये केवळ 2.80 दिवसांचा कोळसा साठा शिल्लक आहे. भुसावळमध्येही केवळ 1.24 दिवसांचा तर परळीत एका दिवसापेक्षा कमी साठा आहे. तसेच पारस येथे 5 दिवस, चंद्रपुरात 7 आणि खापरखेडा येथे 6 दिवसांचा साठा आहे. सध्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
चंद्रपूर येथे संविधान भवन निर्माण करणार - बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर येथे संविधान भवन निर्माण करणार – बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर, दि. 14 एप्रिल : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला बहुमूल्य संविधान दिले आहे. समाजातील शेवटच्या घटकाला उभे करण्याची शक्ती संविधानात आहे. 1956 मध्ये नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी दोन दिवसानंतर म्हणजे 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपुरात दीक्षा दिली. त्यामुळे येथील दीक्षाभूमीच्या विकासासोबतच चंद्रपुरात संविधान भवन निर्माण केले जाईल, अशी ग्वाही…
View On WordPress
0 notes
news-34 · 1 day ago
Text
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
चंद्रपुरात वाघिणीचा दोन बछड्यांसह धुमाकूळ
चंद्रपुरात वाघिणीचा दोन बछड्यांसह धुमाकूळ
चिमूर, जि. चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतच्या पळसगावात वाघिणीने दोन बछड्यांसह धुमाकूळ घातला. दोघांवर हल्ला केला. यात वनविभागाचा कर्मचारी आणि गावकरी गंभीर जखमी झाले. चरणदास बन्सोड, सुनील व्यंकटराव गजलवार अशी जखमींची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. २३) घडली. चिमूर तालुक्यातील पळसगाव हे ताडोबा जंगलातील बफर झोनलगतच वसले आहे. काही दिवसांपासून गावाला लागून असलेल्या झुडपात वाघिणीसह तिच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी विशेष निरीक्षकांची नियुक्‍ती
वीस दिवसांमध्ये निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रचारासंबंधी विविध परवानग्या काढण्यासाठी ७३ हजाराहून अधिक अर्ज दाखल
डॉक्टर अविनाश येळीकर यांच्या १ लाख शस्त्रक्रियांची नोंद आढळल्यास पद्मश्रीसाठी प्रयत्‍न करणार असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची ग्वाही
आणि
आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं दिल्ली कॅपिटल्ससमोर २३५ धावांचे आव्हान
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं, महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी सामान्य आणि पोलीस अशा दोन श्रेणींमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सेवानिवृत्त सनदी अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार यांची सामान्य विशेष निरीक्षक आणि भारतीय पोलिस सेवेतले माजी अधिकारी एनके मिश्रा यांची पोलिस विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याचं, आयोगानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. हे विशेष निरीक्षक, कर्मचारी, सुरक्षा दलं आणि मतदान यंत्रांवर देखरेख ठेवतील. ते स्वत: राज्य मुख्यालयात थांबतील आणि आवश्यकता भासली तर संवेदनशील आणि जिथे समन्वयाची गरज आहे अशा भागांना भेट देतील, असं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासंबंधित परवानगी देण्यासाठी सुविधा संकेतस्‍थळ सुरु केलं आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातुन प्रचार सभा आयोजित करणं, तात्पुरतं पक्ष कार्यालय उघडण, घरो-घरी जाऊन प्रचार, हेलीकॉप्टर, वाहन वापर परवाना आणि प्रचार सामग्री वितरण करण्याची परवानगी देण्यात येत आहे. या संकेतस्थावर सुरुवातीच्या २० दिवसांमध्ये तब्बल ७३ हजाराहुन अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ४४ हजारांहून अधिक अर्ज मंजूर तर ११ हजार २०० अर्ज नामंजूर केले आहेत. तर १० हजारहून अधिक अर्ज रद्द केले असून, काही अर्ज प्रक्रियाधीन आहेत. सर्वाधिक २३ हजार अर्ज तामिळनाडू, १२ हजार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेशातून १० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
****
देशाच्या विविध भागात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा उद्या चंद्रपुरात भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी होणार आहे. मोरवा विमानतळाजवळच्या १६ एकराच्या विस्तीर्ण परिसरात ही सभा होणार असून नरेंद्र मोदी सुमारे १० वर्षांनी चंद्रपूरमधे सभा घेणार आहेत. या सभेच्या दृष्टीनं भाजपातर्फे जय्यत तयारी होत असून सुरक्षा व्यवस्थाही ठेव��्यात आली आहे.
****
वंचित बहुजन आघाडी पक्षानं बीड लोकसभा निवडणुकीसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पाठिंबा दिल्याची माहिती पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
****
आंतराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त जनजागृती म्हणून नाशिक इथं आज गोदावरी नदीच्या काठावर ५ हजार सहाशे २५ चोरस फुटांची रांगोळी काढण्यात आली आहे. या रांगोळीच्या माध्यमातून भरडधान्याचं महत्त्व सांगतानाच त्यातील विविधता, पर्यावरणपूरकता आरोग्यासाठी उपयुक्त, सशक्त आणि सकस आहार समृद्धीचे भांडार हा संदेश देण्यात आला. तब्बल शंभर महिलांनी चार तासांत ही महारांगोळी साकारल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण हिंगोली लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
दिवंगत डॉक्टर अविनाश येळीकर यांनी केलेल्या एक लाख प्‍लास्टिक शस्त्रक्रियांची नोंद मिळाल्यास त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यासाठी आपण प्रयत्न करु, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन इथं आज मराठवाड्यातले पहिले प्‍लास्टिक सर्जन दिवंगत डॉक्टर अविनाश येळीकर यांच्या पहिला स्मृतिदिनानिमित्त डॉक्टर अविनाश येळीकर- सर्जन गरीबांचा, मैत्र जीवांचा या त्यांच्यावरच्या गौरव ग्रंथांचं प्रकाशन झालं, त्यावेळी कराड बोलत होते. दरम्यान, सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर रवीन थत्ते यांच्या हस्ते या गौरवग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाला एमजीएम संस्थेचे अंकुशराव कदम, गौरव ग्रंथाचे संपादक डॉक्टर सुधीर गव्हाणे आदींची उपस्थिती होती.
****
निवडणूक कामकाजात सजगता महत्त्वाची असून, हे काम करतांना नेहमी सकारात्मकता आवश्यक आहे, असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं मतदारसंघातल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने औरंगाबाद पश्चिम, सिल्लोड, कन्नड, गंगापूर आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघ निहाय प्रशिक्षण सत्राचा आजचा दुसरा दिवस आहे. ज्या लोकशाहीमुळे आज आपणा सर्वांना पद, मान, सन्मान, चरितार्थाचं साधन, अशा सर्व गोष्टी मिळत आहेत, त्या लोकशाहीची सेवा करण्याची संधी या निवडणूक कामकाजाच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे, असंही स्वामी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आज सकाळी २५० हून अधिक सायकलस्वारांनी मतदार जनजागृतीसाठी सायकल फेरी काढण्यात आली.
****
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, तसच मतदान शांततेत पार पडावं, यासाठी जिल्ह्यात ७ मे रोजी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. या दिवशीचे आठवडी बाजार इतर दिवशी भरवण्यात येण्यात यावेत, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्‍य सरकारच्‍या दूध अनुदान योजनेंतर्गत अहमदनगर जिल्‍ह्यातल्या ६७ हजार दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने ६१ कोटी रुपये अनुदान जमा केले. राज्‍य सरकारच्‍या वतीनं ��ूध उत्‍पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्‍यासाठी ५ रुपये अनुदानाची योजना सुरु केली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्‍यात वर्ग करण्यात आले नव्हते. दूग्‍ध व्‍यवसाय आणि पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीनं अनुदानासाठी लावण्‍यात आलेल्‍या अटी आणि नियमांमध्‍ये आता शिथीलता केल्‍यामुळे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्‍यात वर्ग होण्‍यास मदत झाली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या बेंद्री इथं काल पतीच्या अपघाती अपघाती निधनानंतर पत्नीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरुण बाबुराव केंद्रेकर हे विष्णुपुरी इथून आपल्या कर्तव्यावरून परत येत असतांना त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला, ही माहिती त्यांच्या कुटूंबीयांना कळवल्यानंतर पत्नी स्नेहा केंद्रे यांनी घरामध्ये गळफास घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड शहरात आज सकाळी जिल्हा पोलीस दलातर्फे सद्भावना रॅली काढण्यात आली. सध्याच्या विविध सण-उत्सवाच्या अनुषंगानं याचं आयोजन करण्यात आलं. यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांसह शहरातील ठाणे अधिकारी, विविध धर्मांचे धर्मगुरू, एकात्मतेचं दर्शन घडवणारी वेशभूषा केलेल्या शालेय विद्यार्थ्यांचीही यात मोठ्या संख्येन उपस्थिती होती.
****
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्राध्यापक होण्यासाठीची राज्य पात्रता चाचणी अर्थात सेट परीक्षा छत्रपती संभाजीनगरातील २२ केंद्रांवर आज घेण्यात आली. या परीक्षेला ८ हजार १०५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. रोहित शर्मा ४९, इशान किशन ४२ धावा काढून बाद झाले. त्‍यानंतर संघाचा कर्णधार हार्दिक पांड्यानं ३९ धावांची खेळी केली. टीम डेव्‍हीड ४५ धावा काढत नाबाद राहिला. रोमारिओ शेफर्ड यानं १० चेंडूत चार षटकार आणि तीन चौकारांसह नाबाद ३९ धावा फटकावल्या. मुंबई इंडियन्स संघानं २० षटकात ५ गडी बाद २३४ धावा काढल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा आठ षटकात एक बाद ६९ धावा केल्या होत्या.
दरम्यान, आजच्या दिवसातील दुसरा सामना लखनऊच्या एकाना स्पोर्ट सिटी मैदानावार लखनऊ सुपर जायंटस आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी साडेसात खेळला जाईल.
****
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा दुसरा सामना आज दुपारी पर्थ इथं झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ४-२ असा पराभव करत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
चंद्रपुरात वन्यजीव-मानव संघर्ष सुरुच, वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
https://bharatlive.news/?p=93951 चंद्रपुरात वन्यजीव-मानव संघर्ष सुरुच, वाघाच्या हल्ल्यात महिला ठ��र
Tiger ...
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यातील जखमी गुराख्याचा मृत्यू, जिल्ह्यातील 3 दिवसांतील वाघाचा तिसरा बळी
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यातील जखमी गुराख्याचा मृत्यू, जिल्ह्यातील 3 दिवसांतील वाघाचा तिसरा बळी
या वाघाची वैद्यकीय तपासणी करून त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रुषा केंद्रात हलविले जाणार आहे. वाघ जेरबंद झाल्यानंतर ब्रह्मपुरी शहरालगतच्या शेतशिवारात नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. (वाघाचा हल्ला) चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गुराख्याचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. भाऊराव गेडाम (वय 55) असं मृतक गुराख्याचे नाव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र उष्णतेची लाट: चंद्रपूरने पुन्हा मोडला 50 वर्षांचा उष्णतेचा विक्रम, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तापमानात आणखी वाढ होणार आहे.
महाराष्ट्र उष्णतेची लाट: चंद्रपूरने पुन्हा मोडला 50 वर्षांचा उष्णतेचा विक्रम, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तापमानात आणखी वाढ होणार आहे.
बुधवारी चंद्रपुरात ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरमध्ये गेल्या पन्नास वर्षांतील हे सर्वा��िक तापमान आहे. पुढील तीन दिवस मुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेची लाट सुरू होणार आहे. दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रतीकात्मक चित्र प्रतिमा क्रेडिट स्रोत: फाइल फोटो महाराष्ट्रातील अनेक भागात पुढील तीन दिवस म्हणजे २…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 2 days ago
Text
0 notes