#केवळ
Explore tagged Tumblr posts
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज ��ा थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अने�� चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
. ☘️ *ज्ञान गंगा* ☘️
.
➖ *विष्णूचे आपले पिता (काळ/ब्रह्मच्या) प्राप्तीसाठी प्रस्थान आणि मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे* ➖
त्यानंतर दुर्गेने (प्रकृती) विष्णूला सांगितले, की पुत्रा, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तेव्हा विष्णू आपले पिता ब्रह्मचा (काळ) शोध घेत पाताळलोकी पोहोचला, जेथे शेषनाग होता. विष्णू आपल्या हद्दीत आल्याचे पाहून शेषनागाने क्रोधित होऊन विष्णूच्या शरीरावर विषाचा फुत्कार मारला. त्याच्या प्रभावाने विष्णूजींचा रंग (वर्ण) सावळा झाला. तेव्हा या नागाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे, असे विष्णूच्या मनात आले. हे जेव्हा ज्योतिनिरंजनाने पाहिले, तेव्हा त्याला वाटले, की आता विष्णूला शांत करायला पाहिजे आणि आकाशवाणी झाली, की हे विष्णू, आता तू तुझ्या मातेकडे जा आणि जे काही घडले आहे, त्याचे सत्यकथन कर, तसेच जो त्रास तुला शेषनागापासून झालेला आहे, त्याचा प्रतिशोध तू द्वापारयुगामध्ये घे. द्वापारयुगामध्ये तू कृष्ण अवतार धारण करशील आणि कालिदहात (काली डोहात) कालिंद्री (कालिया) नावाने शेषनागाचा अवतार होईल.
ऊँच होई के नीच सतावै, ताकर ओएल (बदला) मोही सों पावे।
जो जीव देई पीर पुनी काँहु, हम पुनि ओएल दिवावें ताहूँ॥
तेव्हा विष्णू मातेकडे (दुर्गामाता) आले आणि त्यांनी मला पित्याचे दर्शन झालेले नाही, असे सत्य सांगितले. यावर आदिमाता (प्रकृती) अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, की पुत्रा, तू सत्यवादी आहेस. आता मी आपल्या शक्तीने तुला तुझ्या पित्याशी भेट घालून देते. तसेच तूझ्या मनातील संशय नष्ट करते.
*“कबीर, देख पुत्र तो हि पिता* *भीटाऊँ तौरे मन का धोखा* *मिटाऊँ।*
**मन स्वरूप कर्ता कह जानों,* *मन ते दुजा और न* *मानो।*
*स्वर्ग पाताल दौर मन केरा, मन** *अस्थीर मन अहै अनेरा।**
*निरंकार मनही को कहिए,* *मन की आस निश दिन* **रहिए। **
*देख हूँ पलटि सुन्य मह ज्योति,* *जहाँ पर झिलमिल झालर होती॥”*
अशा प्रकारे मातेने (अष्टांगी, प्रकृती) विष्णूला सांगितले, की ‘मन’ हाच जगाचा कर्ता आहे. हाच ज्योतिनिरंजन आहे. ध्यानामध्ये ज्या हजार ज्योती नजरेस पडतात, तेच त्याचे रूप आहे. जो शंख, घंटा इत्यादींचा आवाज ऐकू येतो, तो महास्वर्गामध्ये निरंजनाचाच वाजत आहे. ��ातेने (अष्टांगी, प्रकृती) पुढे सांगितले, की पुत्रा, तू सर्व देवतांचा शिरोमणी आहेस. तुझी प्रत्येक कामना आणि कार्य मी पूर्ण करेन. सर्व जगतामध्ये तुझी पूजा होईल. याचे कारण तू जे काय आहे, ते सर्व सत्य सांगितले आहेस. काळच्या (ज्योतिनिरंजन) या ब्रह्मांडातील प्राण्यांना एक विशेष सवय आहे, की ते फक्त आपली व्यर्थ महिमा गातात. जसे दुर्गा विष्णूला म्हणत आहे, की तुझी जगामध्ये पूजा होईल. मी तुला तुझ्या पित्याचे दर्शन घडवेन. दुर्गा मातेने केवळ प्रकाश दाखवून विष्णूवर कृपा केले. श्री विष्णूही परमात्म्याचा केवळ प्रकाश दिसतोे. परमात्मा निराकार आहे, अशी प्रभूची स्थिती आपल्या अनुयायांना समजावून सांगू लागले. त्यानंतर आदिभवानी रुद्राकडे (महेश) जाऊन म्हणाली, की महेश, तूसुद्धा आपल्या पित्याचा शोध घे. तुझ्या दोन्ही बंधूंना तुझ्या पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यांना जे काही द्यायचे ते मी दिले आहे, तेव्हा आता तुला काय पाहिजे असेल ते माग. यावर महेश (शंकर) म्हणाले, की हे जननी, माझ्या दोन्ही ज्येष्ठ बंधूंना पित्याचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे मी माझा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. कृपया मला असा वर प्रदान कर, की मी अमर (मृत्युंजय) होईन. माता प्रकृती म्हणाली, की पुत्रा, हे मी करू शकत नाही; परंतु मी एक युक्ती सांगू शकते, ज्यामुळे तुझे आयुष्य सर्वांपेक्षा जास्त होईल. ती युक्ती म्हणजे विधियोग आहे. (त्यामुळेच महादेव अधिकाधिक काळ समाधीमध्ये राहतात.) अशाप्रकारे आदिमाया प्रकृतीने तिन्ही पुत्रांना सृष्टिरचनेच्या विभागांची वाटणी करून दिली.
भगवान ब्रह्मांना काळलोकी 84 लक्ष वस्त्रांची (शरीरे) रचना करण्याचे म्हणजेच रजोगुणाने प्रभावित करून संतान उत्पत्तीसाठी विवश करून जीव उत्पन्न करण्याचा विभाग प्रदान केला गेला. भगवान विष्णूंकडे उत्पन्न झालेल्या जीवांचे पालनपोषण करणे व मोह-ममता उत्पन्न करण्याची स्थिती कायम ठेवण्याचा विभाग प्रदान केला गेला.
शिवशंकरांकडे (महादेव) पिता ज्योतिनिरंजनास एक लक्ष मानव देहधारी जीव प्रतिदिन आहार करण्याचा शाप लागलेला असल्यामुळे संंहार करण्याचा विभाग प्रदान केला.
येथे मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न होतो, की ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांच्यापासून उत्पत्ती, स्थिती आणि संहार कशाप्रकारे होतो? ते तिघेही आपापल्या लोकामध्ये वास्तव्य करत असतात. जसे आजकाल संचारप्रणाली चालवण्यासाठी अवकाशात उपग्रह सोडले जातात आणि त्याद्वारे खाली पृथ्वीवर दूरदर्शन, इतर सेवा आदी संचारप्रणाली चालविली जाते, अगदी त्याचप्रकारे हे तिन्ही देव जेथे वास्तव्य करत असतील, तेथून त्यांच्या शरीरातून निघणारे सूक्ष्म गुणांचे तरंग तिन्ही लोकांमध्ये आपोआप प्रत्येक प्राण्यावर कायम प्रभाव ठेवतात.
हे विवरण एका ब्रह्मांडामधील ब्रह्मच्या (काळ) रचनेचे आहे. क्षरपुरुषाची (काळ) अशी एकवीस ब्रह्मांडे आहेत.
परंतु, क्षरपुरुष (काळ) स्वतः व्यक्त म्हणजेच वा��्तविक शरीर रूपामध्ये सर्वांसमक्ष येत नाही. त्याच्या प्राप्तीसाठी तीन देवांनाही (ब्रह्मा, विष्णू, शिव) वेदांमध्ये वर्णन आलेल्या विधीनुसार खडतर साधना करूनही ब्रह्मचे (काळ) दर्शन झालेले नाही. तत्पश्चात ऋषींनी वेदांचे पठन केले. त्यात लिहिले आहे, की ‘अग्नेः तनूर् असि’ (पवित्र यजुर्वेदाच्या पहिल्या अध्यातील 15 वा मंत्र). परमेश्वर सशरीर आहेे, तसेच पवित्र यजुर्वेदाच्या 5 व्या अध्यायातील पहिल्या मंत्रामध्ये वर्णन आहे, की ‘अग्ने: तनुर् असि विष्णवे त्वा सोमस्य तनूर् असि.’ या मंत्रांमध्ये वेद दोन वेळा साक्ष देत आहे, की सर्वव्यापक, सर्वांचा पालनकर्ता, सत्पुरुष सशरीर आहे. पवित्र यजुर्वेदाच्या 40 व्या अध्यायातील 8 व्या मंत्रामध्ये म्हटले आहे, की (कविर् मनिषी) ज्या परमेश्वराची सर्व प्राण्यांना अतिआस्था (इच्छा) आहे, ते ‘कविर्’ अर्थात कबीर आहेत. त्यांचे शरीर नाडीविना- नाडीरहित (अस्नाविरम्) आहे, ते (शुक्रम्) वीर्यापासून उत्पन्न झालेल्या, पंचतत्त्वांनी बनलेल्या भौतिक कायारहित (अकायम्) आहेत. ते सर्वांचे स्वामी ‘सर्वोपरि’ (सर्वांत वर) सत्यलोकामध्ये विराजमान आहेत. त्या परमेश्वराचे शरीर तेजःपुंज व (स्वर्ज्योति) स्वयंप्रकाशित आहे, जे शब्दरूप अर्थात अविनाशी आहे. तेच कविर्देव (कबीर परमेश्वर) जे सर्व ब्रह्मांडांची रचना करणारे, (व्यदधाता) सर्व बह्मांडांचे रचनाहार, (स्वयम्भू:) स्वयं प्रगट होणारे, (यथा तश्य: अर्थान्) वास्तवामध्ये, (शाश्वत्) अविनाशी आहेत. (गीतेच्या 15 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकामध्येही याचे प्रमाण आले आहे)
भावार्थ असा, की पूर्ण ब्रह्मच्या शरीराचे नाव ‘कबीर’ (कविर्देव) आहे. त्या परमेश्वराचे शरीर नूर (तेज) तत्त्वाने बनलेले आहेे. परमात्म्याचे शरीर अतिसूक्ष्म आहेे आणि ते त्याच साधकाला दिसते, ज्याची दिव्य दृष्टी उघडलेली आहे. अशाप्रकारे जीवाचेही सूक्ष्म शरीर आहे, ज्यावर पाच तत्त्वांचे वेष्टन (आवरण) आहे म्हणजेच पंचतत्त्वांची काया चढलेली आहे आणि ते माता-पिता यांच्या संयोगाने (शुक्रम्) वीर्याने बनलेले आहे. शरीराचा त्याग केल्यानंतरही जीवाचे सूक्ष्म शरीर सोबतच राहते. ते शरीर त्याच साधकाला दृष्टीस पडते, ज्याची दिव्यदृष्टी उघडलेली आहे. परमात्मा व जीव यांची स्थिती अशाप्रकारेच समजून घ्यावी.वेदामध्ये ‘ओऽम’ नामाच्या स्मरणाचे प्रमाण आहे, ते केवळ ब्रह्म साधना आहेे. या उद्देशाने ‘ओऽम’ नामाच्या जपास पूर्ण ब्रह्मचे मानून ऋषींनी हजारो वर्षे हठयोग (समाधी लावून) करून प्रभूच्या प्राप्ती��ी चेष्टा (प्रयत्न) केली. त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या; परंतु प्रभूचे दर्शन झाले नाही. याच सिद्धिरूपी खेळण्याने खेळून ऋषीसुद्धा जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये (84 लक्ष योनींमध्ये) अडकले. त्यांना जे अनुभव आले, त्यानुसार त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये परमात्याचे निराकार असे वर्णन केले आहे. ब्रह्मने (काळ) शपथ घेतली आहे, की मी आपल्या वास्तविक रूपामध्ये कोणालाही दर्शन देणार नाही. मला सर्व जण अव्यक्त समजतील. (अव्यक्तचा भावार्थ आहे, की कोणी आकार स्वरूपात आहेे; परंतु व्यक्तिगत रूपाने स्थूल रूपामध्ये दर्शन देत नाही. आकाशामध्ये ढग जमा झाल्यावर दिवसाही सूर्य अदृश्य होतो म्हणजेच आपणाला तो दिसत नाही; परंतु वास्तवामध्ये तो ढगांच्या पलीकडे जसा आहे तसाच आहे. या अवस्थेला अव्यक्त असे म्हणतात). (प्रमाणासाठी गीतेच्या 7 व्या अध्यायातील 24 व 25 वा श्लोक आणि 11 व्या अध्यायातील 32 व 48 वा श्लोक)
#सत् भक्ति संदेश#hinduism#santrampaljimaharaj#हिंदुधर्म की श्रेष्ठता#santrampaljiquotes#satlok ashram news
2 notes
·
View notes
Text
#मुहर्रमपर_अल्लाहकबीर_कासंदेश
पापांची क्षमा होईल का?
मुसलमान कुरआन
अधिक माहितीसाठी वाचा "मुसलमानांना नाही समजले ज्ञान कुराण..!
मुसलमानांना नाही समजलं ज्ञान कुराण पुस्तक मोफत
कुरआन
मागविण्यासाठी तुमच नाव, मोबाईल नं. पत्ता पाठवा +91 9812238507 +91 9992600852
सूचनाः हे पवित्र पुस्तक केवळ हिंदी भाषेत उपलब्ध आहे आणि हे पवित्र पुस्तक केवळ मुसलमान भाऊ आणि बहिणीसाठी आहे.
Baakhabar Sant Rampal Ji
2 notes
·
View notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 05 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशाच्या राजधानी दिल्लीमधील रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याच्या संबंधित १२ हजार २०० कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. या उद्घाटनाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गाजियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद रेल्वे स्थानक ते दिल्लीतील न्यू अशोकनगर रेल्वेस्थानकादरम्यान नमो भारत रेल्वेनं प्रवासही करणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आज येत आहेत. या दौऱ्यात ते समपदस्थ अजीत डोभाल आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस. जयशंकर यांच्यासोबत बैठक करणार आहेत. या बैठकीत दोन्ही देशातील अंतराळ, संरक्षण आदी क्षेत्रासंबंधावर चर्चा होणार आहे. त्याशिवाय चीनच्या हिंद व प्रशांत महासागरातील प्रकल्पाविषयी चर्चा होणार आहे.
बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं ३-१ अशी जिंकली आहे. सिडनी इथं झालेल्या पाचव्या सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं दिलेलं १६२ धवांच लक्ष्य ऑस्ट्रेलिया संघानं ४ गड्यांच्या मोबदल्यात पुर्ण केलं. आज तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ केवळ १५७ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहला मालिकावीर तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलंड याला सामनावीर किताबानं गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियानं बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका तब्बल दहा वर्षांनी जिंकली आहे. तसच या मालिका विजयामुळं ऑस्ट्रेलिया संघानं कसोटी विश्व करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांचा सामना आता ��क्षिण अफ्रिकेशी होणार आहे.
अहिल्यानगर जिल्हा विभाजन, वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती असे अनेक प्रश्न सोडवू, असं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलं आहे. ते अहिल्यानगर इथं सर्वपक्षीय सत्काराला उत्तर देत होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्यासह अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
सज्जनांनी सक्रिय होणं हेच राष्ट्र निर्माणासाठी प्रेरक असतं, हे आर्य चाणक्य यांचे विचार आजच्या काळातही लागू पडतात, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. काल मुंबई इथं शेठ गोकुळदास तेजपाल, नाट्यगृहात झालेल्या चाणक्य नाटकाच्या १ हजार ७१० व्या प्रयोगाला फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आर्य चाणक्य यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम होत असल्याचं फडणविस यांनी सांगितलं.
नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेतल्या शासकीय कार्यक्रमांचा आज समारोप होत आहे. या यात्रेत कुस्त्यांची दंगल आज होणार असून, आठवडाभरात झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळाही होणार आहे. काल या स्पर्धेत नागरिकांनी शंकरपटाचा थरार अनुभवला. ५८ बैलजोड्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता. त्यापैकी हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यात पिंपळदरी इथले महादू कोंडिबा रिटे यांच्या बैलजोडीने निर्धारित अंतर अवघ्या साडे चार सेकंदात पार करत पहिला क्रमांक पटकावला.
शिक्षण घेऊन रोजीरोटीसाठी जॉब शोधण्याची संकल्पना आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळं स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडणारी पिढी घडविणं हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दीष्ट असल्याचं प्रतिपादन शिक्षण आणि संगणक क्षेत्राच्या अभ्यासक डॉ. रेवती नामजोशी यांनी केल आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत बोलत होत्या.
मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत काल विद्यापीठ ज्ञान स्त्रोत केंद्राच्या वतीनं ग्रंथ दिंडी काढण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, संचालक, ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. नंदकिशोर मोतेवार यांच्यासह विद्यापीठाच्या विविध विभागातील शिक्षक, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी असे ५०० पेक्षा अधिक जण ग्रंथ दिंडीमध्ये सहभागी झाले.
भारतीय टेनिसपटू सुमित नागपालने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने आज सकाळी अंतिम पात्रता फेरीत फ्रांसच्या एड्रियन मॅनारिनोचा पराभव केला. नागपालने काल झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या अलेक्झांडर क्लिंचारोव्हचा पराभव केला होता. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत उद्या, युकी भांब्री आणि अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीचा सामना नेदरलँडच्या सँडर एरेंड्स आणि ब्रिटनच्या ल्यूक जॉन्सन या जोडीशी होणार आहे.
राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते काल जिल्हा परिषद, धुळे इथं ११ नविन रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राना राज्यस्तरावरुन या ११ नविन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या होत्���ा.
0 notes
Text
मनुष्य जन्म झाला तर पूर्ण गुरु कडून नाम दिक्षा घेऊन भक्ती केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो आणि पूर्ण गुरु केवळ आज कलऊगात संत रामपाल जी महाराज हे आहे या आणि आपले कल्याण करून घ्या
0 notes
Text
सूर्यघर मोफत वीज योजना: गरिबांना मोफत सौर वीज उपलब्ध होणार
सूर्यघर मोफत वीज योजना: ग्रामीण महाराष्ट्रासाठी वीज ही केवळ मूलभूत गरज नाही, तर एक विकासाची संधी आहे. “सूर्यघर मोफत वीज योजना” ही योजना ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेचा लाभ देण्यासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल आहे. या ब्लॉगमध्ये आपण या योजनेची वैशिष्ट्ये, फायदे, आणि तिच्या अंमलबजावणीविषयी सविस्तर चर्चा करू.
0 notes
Text
58. आयुष्याचे चार टप्पे
श्रीकृष्ण म्हणतात की, “ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयांत वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते, ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते” (2.67). वारा हे आपल्या इच्छांचे एक रूपक आहे जे आपल्या मनावर आणि इंद्रियांवर प��रभाव टाकते आणि बुद्धीला (बोट) अस्थिर करते.
इच्छांच्या संदर्भात, आयुष्य हे चार टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. ही विभागणी केवळ वयाच्या आधारे केली नसून जगण्याच्या तीव्रतेनुसार केली आहे.
पहिल्या टप्प्यात आपली वाढ होत असते तसेच सैद्धांतिक ज्ञान, शारीरिक बल आणि काही मूलभूत कौशल्ये आपण मिळवीत असतो. दुसर्या टप्प्यात कुटुंब, काम, कौशल्यवृद्धी, वस्तू आणि आठवणींचा संग्रह, आयुष्याच्या विविध रुपांचे दर्शन, इच्छांमुळे मिळणारे अनुभव आणि त्यातून उत्पन्न होणारे यशापयश यांचा समावेश होतो. या प्रक्रियेतून, ज्ञान, कौशल्ये आणि आयुष्यातून अनुभवांचा मिश्र संग्रह आपल्याकडे जमा होतो आणि त्यातून आपल्यात जाणिवेचा जन्म होतो.
तिसर्या टप्प्याला आपोआप प्रारंभ होत नाही. महाभारतात नमूद केलेल्या कथेनुसार राजा ययातीने या स्थित्यंतरासाठी हजार वर्षे लावली कारण त्याला भौतिक सुखांचा त्याग करायचा नव्हता. गंमत म्हणजे, आपल्या मुलांचे बळी देऊन त्याला ही हजार वर्षे मिळाली होती. या परिस्थितीत, हा श्लोक (2.67) आपल्याला प्रतिबिंबित करण्यास आणि तिसऱ्या टप्प्यावर जाण्यास मदत करतो.
तिसर्या टप्प्यात झालेल्या जाणिवेने आपल्या हे लक्षात येते की भूतकाळातील इच्छा या मूर्खपणाच्या होत्या किंवा आता त्या संदर्भहीन आहेत आणि आपण त्या इच्छांचा हळुहळू त्याग करायला लागतो. आपली गृहितके कशी च���कीची होती, पूर्ण आणि अपूर्ण अशा दोन्ही इच्छांनी कसे घातक परिणाम केले हे ही आपल्या लक्षात यायला लागते. या जाणिवेमुळे, आपण संन्यास या अखेरच्या टप्प्यासाठी तयार होतो, ज्यामध्ये अहंकाराचा/कर्तेपणाचा त्याग करणे आणि ‘साक्षी’ होणे समाविष्ट आहे.
अंतिम टप्प्यात, पहिल्या टप्प्यातील इंद्रियांद्वारे ‘जाणून घेणे’ ते इंद्रियांपासून स्वतंत्र ‘असणे’ हे संक्रमण आहे. श्रीकृष्ण म्हणतात, "जेंव्हा सर्व इंद्रिये वस्तूंपासून रोखली जातात तेंव्हा बुद्धीची स्थापना होते" (2.68).
0 notes
Text
मातीच्या आरोग्याचे महत्त्व आणि ते महत्त्वाचे का आहे
माती हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. हे वाढत्या अन्नासाठी आधार प्रदान करते, परिसंस्थांना समर्थन देते आणि ग्रहाचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जमिनीच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. निरोगी माती का आवश्यक आहे हे समजून घेणे आम्हाला तिचे संरक्षण करण्यात आणि प्रत्येकासाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यात मदत करू शकते.
मातीचे आरोग्य म्हणजे काय? मातीचे आरोग्य म्हणजे मातीची स्थिती आणि ती वनस्पती, प्राणी आणि लोकांना किती चांगल्या प्रकारे आधार देऊ शकते याचा संदर्भ देते. निरोगी माती पोषक तत्वांनी समृद्ध आहे, फायदेशीर जीवांनी परिपूर्ण आहे आणि जास्त कार्यक्षमतेने निचरा करताना पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे.
मातीचे आरोग्य महत्त्वाचे का आहे?
अन्न उत्पादनास समर्थन देते निरोगी माती झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते. हे सुनिश्चित करते की पिके चांगली वाढतात, आपल्याला खाण्यासाठी निरोगी आणि पौष्टिक अन्न देतात. खराब माती आरोग्यामुळे पीक उत्पादन कमी आणि पौष्टिक अन्न कमी होऊ शकते.
पाण्याची गुणवत्ता आणि पुरवठा राखतो निरोगी माती स्पंजप्रमाणे काम करते, पावसाचे पाणी शोषून घेते आणि साठवते. हे पाणी वाहून जाण्यापासून आणि त्यासोबत मौल्यवान माती आणि पोषक द्रव्ये घेण्यास प्रतिबंध करते. हे भूजल पुनर्भरण करण्यास मदत करते आणि नद्या आणि तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करते.
हवामान बदलाचा प्रभाव कमी होतो माती कार्बन साठवते, ज्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. माती व्यवस्थापनाच्या चांगल्या पद्धती अधिक कार्बन मिळवून आणि हवेत कमी सोडून हवामान बदलाशी लढण्यास मदत करू शकतात.
जैवविविधतेला प्रोत्साहन देते निरोगी माती जीवाणू, गांडुळे आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करणाऱ्या कीटकांसह जीवनाने भरलेली असते. हे जीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, पोषक घटकांचा पुनर्वापर करतात आणि माती सुपीक ठेवतात.
मातीची धूप रोखते जोरदार पाऊस किंवा वारा असतानाही मजबूत, निरोगी माती जागीच राहते. हे शेतजमिनी, जंगले आणि नैसर्गिक परिसंस्थांचे ऱ्हास होण्यापासून संरक्षण करते. आपण मातीच्या आरोग्याचे रक्षण कसे करू शकतो? रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करा. जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी पीक रोटेशनचा सराव करा आणि कव्हर पिके वाढवा. कीटकनाशके आणि तणनाशकांचा अतिवापर टाळा. नो-टिल शेतीचा अवलंब करून मातीचा त्रास कमी करा. मातीची धूप रोखण्यासाठी झाडे आणि वनस्पती लावा. निष्कर्ष मातीचे आरोग्य ही शाश्वत भविष्याची गुरुकिल्ली आहे. हे अन्न उत्पादनास समर्थन देते, जलस्रोतांचे संरक्षण करते आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करते. आमच्या मातीची काळजी घेऊन, आम्ही केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाही - आम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करत आहोत. आपली माती निरोगी आणि समृद्ध ठेवण्यासाठी एकत्र काम करूया!
#soil#soilhealth#soil erosion#agriculture#micronutrients#organic fertilizer equipment#biostimulants market trends#organic fertilizer production line#farming#farms#environment
0 notes
Text
फिशर साठी उपचार करताना, केवळ लेसर शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम पर्याय आहे ही कल्पना एक सामान्य गैरसमज आहे. डॉ. सम्राट जानकर या विडिओ मध्ये फिशरसाठी सर्वोत्तम उपचार कसे ठरवायचे ते स्पष्ट करतात. फिशरसाठी उपचाराची निवड रुग्णाच्या वैयक्तिक घटकांवर आधारित असावी. लेसर शस्त्रक्रिया काही विशिष्ट प्रकरणांमध्ये प्रभावी ठरू शकते, परंतु ती नेहमीच आवश्यक नसते आणि प्रत्येकासाठी सर्वात योग्य पर्याय असू शकत नाही. लेसर शस्त्रक्रिया हा नेहमीच सर्वोत्तम पर्याय असतो या मिथ्याला बळी पडू नका. अधिक माहितीसाठी विडिओ पूर्ण बघा व आपापल्या मित्र परिवारासोबत शेअर कराhttps://www.kaizengastrocare.com/
#Fissure specialist#Fissure Treatment#Fissure surgery#Laparoscopic Surgeon#GIsurgeon#Gastroenterologist
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३४
एखाद्या प्रखर दिव्याच्या झोताने डोळे दिपून जावेत तसे केदार व एकनाथ अनंतच्या त्या प्रश्नाने थिजल्यागत स्तब्ध झाले! पण लौकरच त्यांतून स्वत:ला सावरीत, भानावर येऊन केदार म्हणाला, "हे असं कांही करतां येईल असं आमच्या मनांत कधी आलंच नाहीं, काका!" एव्हांना एकनाथलाही वस्तुस्थितीची जाणीव झाली होती. केदारला दुजोरा देत तो म्हणाला, "खरंच काका, असा कांही पर्याय आम्हांला सुचलाच नाही!" "अरे, रोजच्या रामरगाड्यांत असं घडणं अगदी स्वाभाविक आहे!", अनंत त्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी समजावीत म्हणाला, "तुमचा दिवसभराचा सगळा वेळ एवढा कामांत जातो की वेगळा विचार करण्यासाठी हवी ती स्वस्थता तुम्हांला मिळतच नाही! बरं मालकीचा स्टाॅल असल्याने हक्काच्या साप्ताहिक सुट्टीलाही वाव नाही!" "एवढंच नाहींये, अनंतराव!" सबनीस कौतुकाने म्हणाले, "गेल्या कांही महिन्यांत एकत्र काम करण्याची या दोघांना एवढी संवय झाली आहे, की आपण स्वतंत्रपणे, एकेकट्याने काम करूं शकतो हे ते पार विसरून गेले आहेत!" "नाही दिनकरराव;-स्टाॅलच्या कामाचा भार एवढा जास्त आहे की दोघांपैकी कुणालाही एकट्याने स्टाॅल पूर्ण वेळ सांभाळणे शक्य होणार नाही!" अनंत हंसून म्हणाला,"पण एखादा मदतनीस जोडीला घेऊन कामाची विभागणी केली तर दोघेही आळीपाळीने थोडी विश्रांती घेऊन, स्टाॅल सुरु ठेवण्याची वेळ पाहिजे तेवढी वाढवूं शकतील!"
त्या दोघांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असलेल्या केदार-एकनाथनी संमतीदर्शक मान हलवली! तथापि कांही क्षणांनी किंचित घुटमळत केदारने विचारलं, "काका, तुम्ही म्हणतां तसा मदतनीस घरांतूनच मिळाला तर?--" "तर मग सोन्याहून पिवळं! एक तर घरचं माणूस विश्वासाचं असेल आणि मदतनीसाला द्यावा लागणारा मोबदला तुमच्या घरांत�� राहील! पण घरांतून मदत करण्यासारखं कुणी आहे कां?" "मी आणि एकनाथने मिळून चहा-नाश्ता स्टाॅल सुरु केल्यावर सुरवातीला माझी आईच म्हणाली होती की 'मी घरांत नुसती बसून असते, त्याऐवजी तुम्हां पोरांना निदान निदान भांडी-कुंडी धुवायला मदत करीन मी! एरवी एका बाजुला बसून सर्वांवर नुुसतं लक्ष ठेवीन!' केदार सांगू लागला, "पण चहा-नाश्त्याच्या स्टाॅलवर बायका कुठेच आढळत नाहीत म्हणून मीच मना केलं!" "तुझ्या आईचं खरंच कौतुक केलं पाहिजे, केदार! तुम्हां पोरांचे कष्ट व्हावेत यासाठी तिची केवढी धडपड होती!" अनंत मनापासून म्हणाला, "केदार, चहा-नाश्त्याच्या स्टाॅलवर काम करणाऱ्या बायका सहसा दिसत नाहींत हे तुझं निरीक्षण खरं असलं तरी समजा उद्यां तुझी आई खरोखरच तुमच्या स्टाॅलवर बसूं लागली तर ते 'केदारनाथ स्टाॅल'चं वैशिष्ट्य नाहीं कां ठरणार?" " म्हणजे?" अनंतचा पवित्रा बघून गोंधळलेल्या केदारने साशंक मनाने विचारलं "तुमच्या मतें आईने आमच्या स्टाॅलवर काम करावं?" "मी विचारतो, कां नाहीं?" अनंत ठाम स्वरांत म्हणाला "केदार, आज नोकरी वा व्यवसायात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने वावरतात!मग पुरुषांप्रमाणे कामावर जातां-येतांना त्यांनाही निवांतपणे एखाद्या जागी बसून चहाचे चार घोट घ्यावे वा चटकन कांही खावं असं वाटत नसेल कां? पण तरीही गल्लोगल्ली असलेल्या चहा-नाश्ता स्टाॅल्सवर स्त्रिया अभावानेच कां आढळतात?"
यावर कांही उत्तर न सुचल्यामुळे केदार आणि एकनाथ गप्पच राहिले! कांही क्षणांनी अनंत पुन्हा बोलूं लागला, " कुठल्याही बऱ्यापैकी हाॅटेलमधे स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असेल, पण त्या असतात! -- आणि केवळ पुरुषांसोबत नव्हे तर स्वतंत्रपणे एकट्या वा कधी ग्रुपमधेही आढळतात! पण मग चहा-नाश्ता स्टाॅल्सवर हवं ते सगळं माफक दरांत आणि झटपट उपलब्ध असूनही स्त्रिया फारशा कांं आढळत नाहींत?" अनंतचा रोख लक्षांत येऊन सबनीस उत्तरले, " अनंतरावांच्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे, केदार आणि एकनाथ! चहा आणि नाश्त्याच्या स्टाॅल्सवर सर्वत्र केवळ पुरुषांचीच सतत वर्दळ असतांना तरुण मुली वा स्त्रियांना तिथे यावंसं कसं वाटेल? बरं, त्यांच्यासाठी ना कुठेही स्वतंत्र व्यवस्था वा आडोसा असतो! अशा परिस्थिती केदार, तुमच्या स्टाॅलवर तुझ्या आईसारखी मध्यमवयीन बाई येऊन नुसती बसूं लागली तरी तेथील एकुण वातावरणांत किती फरक पडेल याचा विचार करा!" " सबनीसकाकांनी माझ्या बोलण्याचा आशय किती अचूक ओळखला आहे बघा!" अनंत ��स्मित म्हणाला, "जोडीला आहे त्याच जागेत एका बाजूला छोटं बांकडं वा दोन खुर्च्या टाकून त्यांवर 'फक्त स्त्रियांसाठी राखीव' असे स्टिकर्स लावलेत तर काय घडूं शकेल याचीही कल्पना करा!" अनंत आणि सबनीसांच्या एकुण बोलण्याने केदार आणि एकनाथ थक्क झाले होते! केदार अक्षरश: हात जोडून म्हणाला, " स्त्री ग्राहकांना स्टाॅलकडे खेचून घेण्याची कल्पना खरंंच गंभीरपणे विचार करण्यासारखी आहे!" " मलासुद्धा ती खुप आवडली आहे!" एकनाथ उत्साहाने म्हणाला, "मीही याबाबत घरुन काही कुमक मिळेल का बघतो!" मनगटावरील घड्याळाकडे लक्ष गेल्यावर पटकन् उठत अनंत म्हणाला, " दिनकरराव, अहो किती वाजले बघितलंत कां? केदार आणि एकनाथ, तुम्हांला दोघांनाही तुमच्या घरून हवी तेवढी कुमक नक्की मिळेल;-- पण अधिक उशीर केला तर आम्हां दोघांना घरी काय भोगावं लागेल याचाही विचार करा!"
२३ मार्च २०२३
0 notes
Text
त्यांचेही नेते आता अमित शहा झालेत , कोणी केली खोचक टीका ?
‘ केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात विरोधी पक्षच नसावा अशी भाजपची इच्छा आहे हे लक्षात घेता राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाला मंजुरी दिली जाईल असे वाटत नाही मात्र त्यांच्या मंजुरीने फारसा फरक पडणार नाही. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका घेऊनच लढणार आहोत,’ असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर इथे बोलताना म्हटलेले आहे. नाना पटोले म्हणाले की ,’ पाकिस्तान बांगलादेश…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन-नायगाव इथलं नियोजित स्मारक पाच वर्षांत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही • शेतीच्या नुकसानाचं आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती • कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची आवश्यकता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याकडून व्यक्त आणि • जालना इथं ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह दोघांना अटक
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधिक भर दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल दिल्लीत विविध विकास कामांचं लोकार्पण केल्यानंतर नागरिकांशी बोलतांना पंतप्रधान म्हणाले.. “हमे सिर्फ बच्चों को सिर्फ पढाना ही नही है, बल्की वर्तमान और भविष्य की जरूरतों के लिए नई पिढी को तयार करना है। नई नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मे इसी बात का ध्यान रखा गया है। नई राष्ट्रीय शिक्षा निती गरीब परिवार का बच्चा हो, मध्यम परिवार की संतान हो अब वो अपनी मातृभाषा मे पढकर के डॉक्टर भी बन सकता है। इंजिनियर भी बन सकता है। और बडी से बडी अदालत में मुकदमा भी लड सकता है।’’
दर��्यान, आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. '२०४७ पर्यंत विकसित भारत' ही या महोत्सवाची संकल्पना आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी काल त्यांना अभिवादन केलं. महिला सक्षमीकरणाच्या जननी आणि शैक्षणिक तसंच सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी असलेल्या सावित्रीबाईंचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना काल सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. सावित्रीबाईंच्या जन्मगावी, सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. माजी मंत्री छगन भुजबळ, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव इथं घोषणा केलेलं सावित्रीबाईंचं स्मारक त्यांच्या द्वी शताब्दी जयंतीपूर्वी तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. या स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले… ‘‘स्मारक हे केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाहीये. स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचंदेखील झालं पाहिजे, आणि मी आपल्याला यानिमित्ताने शब्द देतो, की निश्चितपणे अशा प्रकारचं जे स्मारक आहे, ते याठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू. बरोबर पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होणार आहे. त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे. जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम दहा एकर जमीन अधिगृहीत करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा.’’ ** सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबईत मंत्रालयात तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव इथं विविध शासकीय कार्यालयं, लोकप्रतिनिधी तसंच पक्ष संघटनांकडून सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. हिंगोली जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. जास्त कर���ज मिळालेल्या गटांचा तसंच ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणारे सीआरपी अर्थात समुदाय संसाधन प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल तुळजापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. 'दुष्काळ तिथे पाणी' यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नदी जोड प्रकल्प हाती घेतला असून यामुळे कुठेच दुष्काळ भासणार नाही, असं सांगत लवकरच धाराशिव जिल्ह्यात पाणी येईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
दरम्यान, जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात मेंढगिरी समितीच्या शिफारसींचं मूल्यांकन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पूर्वीच्या अहवालानुसार जायकवाडीत ६५ टक्के पाणी शिल्लक असेल तरीही नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची शिफारस होती, मात्र नव्या शिफारसीनुसार जायकवाडीत ५८ टक्के पाणी साठा असेल तरीही, वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. या नव्या अहवालावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार असून, यासंदर्भात नाशिक इथं पाणी परिषद घेणार असल्याचं, आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलं आहे. त्या काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचं, आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक मोजमाप होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळू शकेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले… ‘‘फसल खराब हुई तो सॅटेलाईट के आधार पर रिमोट सेन्सिंग से इमेज लेंगे। फसल के नुकसान का आकलन करेंगे। और वो आकलन परफेक्ट होगा और जितना नुकसान होगा फसल का, फसल का उत्पादन कम होगा, उसका आकडा होगा सीधा किसान के अकाऊंट मे डीबीटी के माध्यम से डाल दिया जायेगा।’’
कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. या संदर्भात कार्यालयातल्या प्रत्येक सहकाऱ्याची जबाबदारी महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त लातूर इथं दोन दिवसीय पोलीस प्रदर्शनाचं रहाटकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनात पोलिस दलातल्या विविध विभागांची माहिती आणि शस्त्र पाहता येणार आहेत.
जालना इथल्या ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह आणखी एकास अटक करण्यात आली आहे. संजय अर्जुनराव राख आणि सहकार अधिकारी शेख रईस शेख जाफर अशी त्यांची नावं असून, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेविरुध्द दाखल तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिकेट सिडनी इथं सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं कालच्या एक बाद नऊ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद १०१ धावा झाल्या होत्या. दरम्यान, या कसोटीत काल भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, भारताचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांवर संपुष्टात आला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या गरवारे क्रीडा संकुलावर आजपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयकडून १९ वर्षा��खालील महिलांची क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या मैदानावर फ्लड लाईट्स आणि खेळपट्टीचं काम पूर्ण झाल्यावर प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा होणार आहे.
लातूर इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनात काल भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप जाहीर सभेत करण्यात आला. परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
पारंपारिक लोककलांचे संवर्धन आणि कलाकरांना प्रोत्साहन हे आपलं ध्येय असून, कलाकारांना शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं माळेगाव यात्रेत लोककला महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. विविध कलावंतांचा यावेळी चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले या दाम्पत्याने काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशसोहळा पार पडला.
आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा पाठवला असून आपल्याला देण्यात आलेली सुरक्षा काढून टाकावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 notes
Text
शास्त्र अनुकूल भक्ती केवळ संत रामपाल जी महाराज हे सर्व पवित्र शास्त्रात प्रमाणित करून दाखवतात संत रामपाल जी महाराज यांच्या लिखित पुस्तक ज्ञान गंगा पुस्तक अवश्य वाचा
0 notes