#कीर्तनकार
Explore tagged Tumblr posts
Text
मातृ पितृ कृतज्ञता सोहळा साजरा करणारे एकमेव इंदुरीकर महाराज , डॉ. सुजय विखे म्हणाले की..
आई वडिलांची सेवा करा असे कीर्तनातून फक्त प्रबोधन न करता मातृ पितृ कृतज्ञता सोहळा आयोजित करणारे इंदुरीकर महाराज महाराष्ट्रातील एकमेव कीर्तनकार आहेत असे गौरवोदगार माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी इंदुरीकर यांच्या बद्दल बोलताना काढलेले आहेत. इंदुरी येथे समाज प्रबोधनकर निवृत्ती महाराज देशमुख व शालिनीताई देशमुख यांच्या वतीने आयोजित मातृ पितृ अखंड हरिनाम सप्ताह मध्ये डॉ विखे पाटील बोलत होते.…
0 notes
Text
मराठी साहित्य अकादमी की ओर से संत वाणी का आयोजन 29 सितंबर को
इटारसी। महाराष्ट्र मंडल इटारसी द्वारा 29 सितंबर 2024 को सायंकाल 7 बजे से सरला मंगल भवन सूरज गंज इटारसी में मराठी साहित्य अकादमी के सहयोग से संतवाणी कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसमें कीर्तनकार हरि भक्त पारायण पंकज महाराज पवार वाशिम, महाराष्ट्र द्वारा कीर्तन की प्रस्तुति दी जाएगी। इस अवसर पर अभय गोरे जबलपुर द्वारा संत परंपरा के प्रतीक समर्थ रामदास पर व्याख्यान दिया ��ाएगा। कार्यक्रम में मराठी…
0 notes
Video
youtube
इंदुरीकर महाराजांसारखा दुसरा कीर्तनकार होणे नाही..
0 notes
Text
संत गाडगेबाबा हे संत मालिकेतील ‘शिरोमणी‘ म्हणून ओळखले जातात. अशा या थोर कीर्तनकार, संत, समाजसुधारक आणि स्वच्छतेच्या पूजाऱ्याची आज पुण्यतिथी. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. आज स्मृतिदिनी त्यांना अभिवादन !
#gadgebaba #santgadgebaba #gadgemaharaj #santgadgemaharaj #स्वच्छता_दुत #गाडगे_महाराज #india #babasahebambedkar #shahumaharaj
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Jagdamb
#Vyavsaywala
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 28 October 2023
Time: 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· शासकीय सेवेत नव्यानं नियुक्त ५१ हजार उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप
· राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांचं आश्वासन
· माझी माती माझा देश अभियानाचा राज्य शासन स्तरावर समारोप;अमृत कलश ��िल्लीला रवाना
· माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं निधन;आज अंत्यसंस्कार
आणि
· पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारत शंभरीच्या उंबरठ्यावर;महिला आशियायी हॉकी स्पर्धेतही विजयी सलामी
सविस्तर बातम्या
शासकीय सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या ५१ हजाराहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी एक वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्रांचं वाटप करणार आहेत. देशभरात ३७ ठिकाणी हा रोजगार मेळावा होणार आहे. हे नवे कर्मचारी रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासह सरकारची विविध मंत्रालयं, विभागांमध्ये रुजू होतील. दरम्यान, उद्या सकाळी पंतप्रधान मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
****
राज्यातल्या तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल, असं आश्वासन, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिलं आहे. त्या काल मुंबईत प्रधानमंत्री मातृवंदना योजना जनजागृती कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२ हजार ८०० रुपये देण्यात येणार असून, अंगणवाडी ताईच्या सुरक्षेसाठी, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा हप्ता केंद्र शासनाकडून भरण्यात येईल, असंही ईराणी यांनी यावेळी सांगितलं.
****
माझी माती माझा देश अभियान हे देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर राज्य शासनाच्या स्तरावर या अभियानाच्या समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या अमृत कलशांचं, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पूजन झालं. ३६ जिल्ह्यातले अमृत कलश घेऊन ९०८ स्वयंसेवक विशेष वातानुकूलित रेल्वेनं मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकातून द���ल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. सायंकाळच्या सुमारास मुंबई स्थानकावरून निघालेली ही रेल्वे आज दुपारी दिल्ली इथं हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणार आहे.
****
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला कालपासून प्रारंभ झाला. येत्या नऊ डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम राज्यात राबवला जाणार आहे. समाजातल्या काही वंचित घटकातल्या नागरिकांची मतदार यादीत नोंद करण्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्तिंसाठी, तर तृतीयपंथी व्यक्ती, शरीरविक्रय करणाऱ्या महिला, भटक्या विमुक्त जमातींसाठी, दोन आणि तीन डिसेंबर या दिवशी शिबीरं आयोजित केली जाणार आहेत. ग्राम विकास विभाग तसंच पंचायतराज विभागाच्या सहकार्याने एक ते सात नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरात विशेष ग्रामसभा घेऊन मतदार याद्यांचं वाचन केल जाणार आहे.
****
माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांच्या पार्थिव देहावर आज अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात पागोरी पिंपळगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. न्यूमोनियाने आजारी असलेले ढाकणे यांच्यावर गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ढाकणे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिव देहावर काल नवी मुंबईत नेरुळ इथं शासकीय इतमामात अंत्यंसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबामहाराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात घेतलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या बहुतांश गावांमध्ये मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यातल्या ४५ गावं या साखळी उपोषणात सहभागी झाली आहेत. तसंच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे फलकही गावोगाव�� लावण्यात आली आहेत.
****
नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दोन वाहनांची गुरुवारी रात्री तोडफोड झाली. खासदार चिखलीकर हे गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातल्या अंबुलगा इथं माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी गेले होते. राजकीय नेत्याने गावात प्रवेश केल्याने संतप्त झालेल्या मराठा तरुणांनी त्यांच्या दोन वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर खासदार चिखलीकर हे पोलीस वाहनातून नांदेडकडे रवाना झाले. आरक्षणावर राज्य सरकार निश्चितच तोडगा काढेल, मात्र मराठा समाजाने संयम राखावा, असं आवाहन चिखलीकर यांनी केलं.
****
मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीला येत्या २४ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, या समितीनं काल धाराशिव जिल्ह्याचा आढावा घेतला.
****
येत्या सणासुदीच्या दिवसात अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनांची तपासणी करण्याच विशेष मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम डिसेंबरपर्यत राबवण्यात येणार आहे. उत्पादकांकडे कायद्यातल्या तरतुदींचं उल्लंघन होत असल्याचं आढळून आल्यास, कडक कारवाई करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला आहे.
****
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत ९९ पदकं जिंकून गेल्यावेळचा ७२ पदकांचा विक्रम मोडीत काढला आहे. काल सकाळी तीरंदाजीच्या कंपाउंड स्पर्धेत शीतल देवी हिने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं. दोन्ही हात नसलेली शीतलदेवी ही जगातली एकमेव धनुर्धर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतलदेवीसह विजेत्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
Byte…
बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत नीतेश कुमार आणि तरुण यांच्या जोडीने तर वैयक्तिक गटाच्या तीन प्रकारात सुहास यतिराज प्रमोद भगत आणि थुलासिमथी यांनी सुवर्णपदकं पटकावली.
पंधराशे मीटर टी ३८ स्पर्धेत रमन शर्माने, थाळीफेक प्रकारात देवेंद्र कुमारने तर गोळाफेक प्रकारात मनू याने सुवर्णपदक पटकावलं आहे. आतापर्यंत २५ सुवर्ण, २९ रौप्य आणि ४५ कांस्यपदकांसह पदकतालिकेत भारताच्या पदकांची संख्या ९९ वर पोहोचली आहे.
महिला आशियाई हॉकी स्पर्धेत काल रांची इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने थायलंडचा सात - एक असा दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारताकडून संगीता कुमारीनं हॅटट्रिक केली, तर मोनिका, सलिमा टेटे, दीपिका आणि लालरेम्सियामी यांनी प्रत्येकी एक गोल केला.आज या स्पर्धेत भारताचा मलेशियाशी सामना होणार आहे.
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानचा एक गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानचा संघ ४७व्या षटकात २७० धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं १६ चेंडू शिल्लक असतानाच हे आव्हान पूर्ण केलं.
****
या स्पर्धेत आज धर्मशाला इथं ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, तर कोलकाता इथं बांग्लादेश विरुद्ध नेदरलँड्स सामना होणार आहे.
****
गोवा इथं सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघात छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा प्रबोधिनीच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. काजल आटपाडीकर, निर्जला शिंदे आणि शालिनी साकुरे अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावं आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेची काल राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर यांच्या व्याख्यानाने सांगता झाली. भारतात होत असलेल्या विकासात्मक कामामुळे आज भारत हा अन्य देशासाठी रोल मॉडेल ठरत असल्याचं त्यांनीयावेळी नमूद केलं.
****
जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात येणोरा इथं कापसाच्या शेतात तुरीसह लावलेली गांजाची झाडं परतूर आणि आष्टी पोलिसांनी काल संयुक्त कारवाई करत जप्त केली. या झाडांचं वजन तीन क्विंटल ७० किलो भरलं असून, त्याची बाजारभावाप्रमाणे किमंत सुमारे ३५ लाख रुपये आहे.
****
0 notes
Text
बाबा महाराज सातारकर : घराण्याची १३५ वर्षांची परंपरा वेगळ्या उंचीवर नेणारे कीर्तनकार
https://bharatlive.news/?p=178551 बाबा महाराज सातारकर : घराण्याची १३५ वर्षांची परंपरा वेगळ्या उंचीवर ...
0 notes
Text
' पेटवा की चूल ' , तब्बल तब्बल तीन तास बैठक अन त्यानंतर..
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील एका चुलीवरील बाबाचा व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल झालेला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिल्यानंतर याबाबाने नर्मदा परिक्रमा या गोंडस नावाखाली तेथून पलायन केले. त्याच्या या दाव्याची पोलखोल महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांनी केलेली आहे. सत्यपाल महाराज यांनी स्वतः गरम तव्यावर बसून या…
View On WordPress
0 notes
Text
' पेटवा की चूल ' , तब्बल तब्बल तीन तास बैठक अन त्यानंतर..
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथील एका चुलीवरील बाबाचा व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल झालेला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिल्यानंतर याबाबाने नर्मदा परिक्रमा या गोंडस नावाखाली तेथून पलायन केले. त्याच्या या दाव्याची पोलखोल महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांनी केलेली आहे. सत्यपाल महाराज यांनी स्वतः गरम तव्यावर बसून या…
View On WordPress
0 notes
Text
नाथ मंदिर पर माधवनाथ महाराज के 87वें पुण्यतिथि महोत्सव का शुभारंभ संकीर्तन से हुआ
प्रतिदिन होंगे सुबह लघु रुद्राभिषेक, शाम को भक्ति संगीत एवं संकीर्तन पण्डित श्याम जोशी – इंदौर। साऊथ तुकोगंज स्थित श्री नाथ मंदिर पर योगाभ्यानंद सदगुरु माधवनाथ महाराज के 87वें पुण्यतिथि महोत्सव का शुभारंभ काकड़ आरती, लघु रुद्राभिषेक, स्वरचित भजन मंडली की बहनों और सायंकाल पुणे की कीर्तनकार सौ. स्मिता आजेगांवकर के मनोहारी संकीर्तन से हुआ। उत्सव प्रमुख मनीष ओक ने बताया आजेगांवकर ने अपनी प्रस्तुति के…
View On WordPress
0 notes
Photo
माफ करा तुकोबा... तुकोबा तुम्हाला संप्रदायात यांनी राहूच दिले नाही खरे तुकोबा वारकऱ्यांना पाहूच दिले नाही कीर्तनात सांगून ज्यांनी तुम्हाला वैकुंठाला नेले त्यांनी किर्तन सोडून कीर्तनाचे धंदे चालू केले तुमचे न���व चालते यांना पण विचार चालत नाही तुमच्या बदनामीवर कुठला कीर्तनकार बोलत नाही वारकरी संप्रदाय यांनी आता धर्माला बांधला आहे भोळ्या भाविकांचा असाच यांनी खेळ मांडला आहे तुम्ही असता तर हातून यांच्या वीणा खेचला असता तुमच्या विद्रोहाने बिचारा वारकरी तर वाचला असता तुम्ही असता तर वारकऱ्यांची कमाल झाली असती तुम्हाला बोलण्याची बागेश्र्वराची मजाल झाली नसती माफ करा तुकोबा भाविक आता लाचार झाले आहे कारण हजारो मनुवादी कीर्तनकार झाले आहे -अज्ञात (at Dehu Road Pune Maharashtra) https://www.instagram.com/p/CoCoQB7MY4H/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Video
youtube
नाशिक मधील वारकरी कीर्तनकार सुषमा अंधारे यांच्यावर आक्रमक..
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांचं आश्वासन
माझी माती माझा देश अभियानाचा राज्य शासन स्तरावर समारोप;अमृत कलश दिल्लीला रवाना
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात गांजाची पावणे चार क्विंटल झाडं जप्त
आणि
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकांची शंभरी
****
राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल, असं आश्वासन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिलं आहे. त्या आज मुंबईत प्रधानमंत्री मातृवंदना योजना जनजागृती कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२ हजार ८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा हप्ता केंद्र शासनाकडून भरण्यात येईल, असंही ईराणी यांनी सांगितलं. शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. तसंच राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असंही ईराणी यांनी सांगितलं.
****
'माझी माती माझा देश अभियान' हे देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्य शासनाच्या स्तरावर आ�� मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर या अभियानाच्या समारोप सो��ळ्यात ते बोलत होते. केवळ पायाभूत सुविधा, मोठे प्रकल्प, भौतिक सुविधाच महत्त्वाच्या नाहीत, तर मातृभूमीविषयी प्रेम आणि संस्कृतीविषयी आदर तितकाच महत्त्वाचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या ३८१ अमृत कलशांचं, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पूजन झालं. हे सर्व कलश विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाले. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास मुंबई स्थानकावरून निघालेली ही रेल्वे उद्या दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी दिल्ली इथं हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणार आहे.
****
माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचं काल रात्री निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. न्यूमोनियाने आजारी असलेले ढाकणे यांच्यावर गेल्या तीन आठवड्यांपासून अहमदनगर इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर पाथर्डी तालुक्यातील त्यांचे मूळ गांव पागोरी पिंपळगाव इथं उद्या दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढाकणे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ढाकणे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिव देहावर नेरुळ इथं शासकीय इतमामात अंत्यंसंस्कार होत आहेत. बाबा महाराज यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी काल निधन झालं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेरुळ इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन बाबा महाराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. बाबा महाराजांचं स्मारक तर होईलच मात्र त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी त्यांच्या विचारांचं स्मारक कसं करता येईल, याबाबत प्रयत्न करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात घेतलेल्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातल्या बहुतांश गावांमध्ये मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यातील ४५ गावे या साखळी उपोषणात सहभागी झाली आहेत. तसंच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे फलकही गावोगावी लावण्यात आली आहेत.
****
नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दोन वाहनांची काल रात्री तोडफोड झाली. खासदार चिखलीकर हे गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातील अंबुलगा इथं माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी गेले होते. राजकीय नेत्याने गावात प्रवेश केल्याने संतप्त झालेल्या मराठा तरुणांनी त्यांच्या दोन वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर खासदार चिखलीकर हे पोलीस वाहनातून नांदेडकडे रवाना झाले. आरक्षणावर राज्य सरकार निश्चितच तोडगा काढेल, मात्र मराठा समाजाने संयम राखावा, असं आवाहन खासदार चिखलीकर यांनी केलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील आपेगांव मध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यत गावात कोणत्याही नेत्याला प्रवेश नसल्याचं, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सकल मराठा समाजानं जाहीर केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीनं आज धाराशिव जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समितीला माहिती देण्यात आली. अनेक नागरिकांनीही समितीची भेट घेतल्याचं वृत्त आहे.
****
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात येणोरा इथं कापसाच्या शेतात तुरीसह लावलेली गांजाची झाडं परतूर आणि आष्टी पोलिसांनी आज संयुक्त कारवाई करत जप्त केली. या झाडांचं वजन तीन क्विंटल ७० किलो असून त्याची बाजारभावाप्रमाणं किमंत सुमारे ३५ लाख रुपये असून, या प्रकरणी शेतकरी लक्ष्मण बोराडे याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी ��िली आहे.
****
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतानं पदकांची शंभरी गाठली आहे. आज सकाळी तीरंदाजीच्या कंपाउंड स्पर्धेत शीतल देवी हिने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं. बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत नीतेश कुमार आणि तरुण यांच्या जोडीने तसंच सुहास यतिराज याने याच स्पर्धेच्या एकेरीत सुवर्णपदक मिळवलं. बॅडमिंटनच्या एस एल थ्री प्रकारात पुरुष खेळाडूंनी सुवर्ण तसंच रौप्यपदक तर महिलांच्या एस यू पाच प्रकारात तुलसीमतीने सुवर्णपदक पटकावलं. पंधराशे मीटर टी ३८ स्पर्धेत रमन शर्माने, थाळीफेक प्रकारात देवेंद्र कुमारने तर गोळाफेक प्रकारात मनू याने सुवर्णपदक पटकावलं आहे. आतापर्यंत २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्यपदकांसह भारतानं एकूण शंभर पदकं पटकावली आहेत. इंडोनेशियात झालेल्या मागच्या स्पर्धेत भारताच्या पॅरा संघाने ७२ पदकं जिंकली होती.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई इथं सुरू असलेल्या सामन्यात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २७१ धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत ४७व्या षटकांत सर्वबाद २७० धावा केल्या. पाकिस्तानच्या सऊद शकीलनं सर्वाधिक ५२ धावा केल्या तर आफ्रिकेच्या तबरेज शम्सीनं सर्वाधिक चार बळी घेतले.
****
गोवा इथं सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघात छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा प्रबोधिनीच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. काजल आटपाडीकर, निर्जला शिंदे आणि शालिनी साकुरे अशी निवड झालेल्या खेळाडूंची नावं आहेत. यापूर्वी काजल आटपाडीकर हिनं भारतीय ज्युनिअर संघातून जर्मनी आणि आयर्लंड इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे. हॉकी संघटनेचे छत्रपती संभाजीनगर इथले अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव पंकज भारसाखळे यांनी या निवडीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम २५ टक्के दिवाळीपूर्वी मिळणार आहे. येत्या १० नोव्हेंबर पासून ही अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होणार आहे.
****
येत्या ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाकरता 'भ्रष्टाचाराला नाही म्हणा ; राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा' ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात या सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकात नमूद केल्यानुसार कार्यवाही करुन अहवाल शासनास आणि जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असं जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीनं कळवण्यात आलं आहे.
****
राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम आणि योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत. या सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्यासाठी लातूर इथं येत्या दोन नोव्हेंबर रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. हणबर यांनी ही माहिती दिली. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचं आवाहन हणबर यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
महान कीर्तनकार सातारकर महाराजांचे निधन; वयाच्या ८९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
https://bharatlive.news/?p=178369 महान कीर्तनकार सातारकर महाराजांचे निधन; वयाच्या ८९व्या वर्षी घेतला ...
0 notes
Text
अखेर ' त्या ' कीर्तनकार बाबासोबत महिलेवरही गुन्हा दाखल, नावही जगजाहीर
अखेर ‘ त्या ‘ कीर्तनकार बाबासोबत महिलेवरही गुन्हा दाखल, नावही जगजाहीर
महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. समव्यावसायिक क्षेत्रातील महिलेसोबत कीर्तनकार बाबाची अश्लील चित्रफीत व्हायरल झाल्याने अखेर वैजापूरच्या त्या व्हिडिओमधील महाराजासह महिलेवर देखील धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. बाळकृष्ण मोगल (वय ४८, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव असून पोलीस प्रकरणाचा तपास करत…
View On WordPress
0 notes
Text
अखेर ' त्या ' कीर्तनकार बाबासोबत महिलेवरही गुन्हा दाखल, नावही जगजाहीर
अखेर ‘ त्या ‘ कीर्तनकार बाबासोबत महिलेवरही गुन्हा दाखल, नावही जगजाहीर
महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. समव्यावसायिक क्षेत्रातील महिलेसोबत कीर्तनकार बाबाची अश्लील चित्रफीत व्हायरल झाल्याने अखेर वैजापूरच्या त्या व्हिडिओमधील महाराजासह महिलेवर देखील धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. बाळकृष्ण मोगल (वय ४८, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव असून पोलीस प्रकरणाचा तपास करत…
View On WordPress
0 notes
Text
अखेर ' त्या ' कीर्तनकार बाबासोबत महिलेवरही गुन्हा दाखल, नावही जगजाहीर
अखेर ‘ त्या ‘ कीर्तनकार बाबासोबत महिलेवरही गुन्हा दाखल, नावही जगजाहीर
महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. समव्यावसायिक क्षेत्रातील महिलेसोबत कीर्तनकार बाबाची अश्लील चित्रफीत व्हायरल झाल्याने अखेर वैजापूरच्या त्या व्हिडिओमधील महाराजासह महिलेवर देखील धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. बाळकृष्ण मोगल (वय ४८, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव असून पोलीस प्रकरणाचा तपास करत…
View On WordPress
0 notes