#काँग्रेसचे
Explore tagged Tumblr posts
Text
भाजप सरकारच्या हुकूमशाही विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन
गडचिरोली : केंद्रातील हुकूमशाह बनलेले नरेंद्र मोदी यांच्या नेतृवातील भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करून सरकार विरोधी बोलणाऱ्याना, शेतकरी आणि सर्वसामानन्याचा आवाज उचलणाऱ्या नागरिकांचे व विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाही चे मंदिर असणाऱ्या संसदेतही विरोधकांना बोलू दिल्या जात नाही, खोटे आरोप लावून विरोधकांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे, हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट…

View On WordPress
0 notes
Text
किरण काळेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन , ओरिजनल हिंदुत्व काय असतं ते दाखवून देऊ
किरण काळेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन , ओरिजनल हिंदुत्व काय असतं ते दाखवून देऊ
अहिल्यानगर शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उबाठामध्ये प्रवेश केला आहे. रविवारी दुपारी मातोश्री येथे पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळे यांच्या हाती शिवबंधन बांधत मशाल दिली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, किरण काळें सारखे लढवय्ये नेतृत्व आता शिवसेनेमध्ये आले आहे. त्यांचा प्रवेश म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध येणे नव्हे…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 18 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या साजरी होणार असून, त्यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं आंबेगाव ब्रुद्रुक इथं साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसर्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेउद्या होणार आहे. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे उद्या सकाळी लालमहालातून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा ही मिरवणुक काढण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या सप्ताहादरम्यान शोभायात्रा, व्याख्यान, चित्र आणि पुस्तकांचं प्रदर्शन, शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शन तसंच किल्ले, गडकोट आणि दुर्ग स्वच्छता मोहीम इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या कौसडी इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे शिवरायांची भव्यदिव्य अशी प्रतिकृती साकारली होती. ९९५ विद्यार्थी यात सहभागी झाले होते. नांदेड इथं उद्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने "जय शिवाजी- जय भारत पदयात्रा" काढण्यात येणार आहे. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रांती चौक परिसरात शिवोत्सव सुरु असून, आज यात ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि महाराष्ट्र शासनाच्या दुर्ग संवर्धन समितीचे मुख्य मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे यांचं ‘शिवरायांची अष्टक्रांती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असतील, तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मस्साजोग इथं आज देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा असून, त्यांनी या प्रकरणात विशेष लक्ष द्यावं, याप्रकरणी त्यांची भेट घेणार असल्याचं सुळे यावेळी म्हणाल्या. दरम्यान, २५ फेब्रुवारी पर्यंत या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देशमुख कुटुंबियांसह मस्साजोग ग्रामस्थांनी दिला आहे.
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईतल्या टिळक भवनमध्ये मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामसेवक संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून असहकार आंदोलन सुरू केलं आहे. जिल्ह्यातल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचं मागील पाच वर्षापासून रखडलेलं वितरण तातडीने करावं, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, डोंगरकडा इथल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या कामाचं मूल्यांकन करावं, वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयकं तातडीने निकाली काढावीत, मुद्रांक शुल्काची परिपूर्ण माहिती द्यावी, आदी मागण्या संघटनेनं केल्या आहेत. सुमारे ३०० ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. जगातल्या सर्वात मोठ्या मानवी मेळाव्यात आतापर्यंत सुमारे ५३ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दिल्ली इथं होणार्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे इथून साहित्यरसिकांना दिल्लीला घेऊन जाणारी विशेष रेल्वे उद्या दुपारी निघणार असून, परवा २० तारखेला रात्री दिल्लीला पोहोचणार आहे. या प्रवासा��रम्यान मराठी साहित्ययात्री संमेलन भरवलं जाणार आहे. या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचं नाव देण्यात आलं असून, प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावं दिली जाणार आहेत. राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’ सहभागी होत रेल्वेतून प्रवास करणार आहेत. २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम इथं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.
महाकुंभमेळ्यासाठी असलेल्या औरंगाबाद-पाटणा-औरंगाबाद या विशेष रेल्वेला परतूर रेल्वे स्थानकावर तात्पुरता थांबा जाहीर करण्यात आला आहे. ही विशेष गाडी औरंगाबाद इथून १९ आणि २५ फेब्रुवारीला सुटेल, तर परतीच्या प्रवासात पाटणा इथून २१ आणि २७ फेब्रुवारीला सुटेल.
राज्यातल्या अनुसूचित जातीच्या २५ हजार विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह उभारणार असून, यात नांदेड जिल्ह्यातल्या किनवट, माहूर आणि हिमायतनगरचा समावेश असेल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट इथं आयोजित चौदाव्या जागतिक धम्म परिषदेत ते बोलत होते.
0 notes
Text
'मुलगा निवडून आणता आला नाही अन्...', राज ठाकरे यांना अजित पवार यांचा टोला - Marathi News | NCP leader Ajit Pawar criticizes MNS leader Raj Thackeray | TV9 Marathi
Ajit pawar on Raj Thackeray: लोकसभेत पत्नीला निवडून आणता आले नाही. त्यावेळी आम्ही ईव्हीएमला दोष दिला नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे यांनी सुनावले. — À lire sur www.tv9marathi.com/maharashtra/ncp-leader-ajit-pawar-criticizes-mns-leader-raj-thackeray-1346368.html/amp
0 notes
Text
Vanraj Andekar : वनराज आंदेकर खून प्रकरणी आणखी दोघांना अटक
एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या (Vanraj Andekar ) खून प्रकरणी आता आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे. गणपती उत्सवाच्या काळात पुणे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरु केले होते. सागर पवार आणि साहिल उर्फ टक्या दळवी हे फरार होते. त्यांना कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अटक करण्यात आली. बुधवारी…
0 notes
Text
Ajit Pawar : कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार, अजित पवारांनी दिला शब्द
Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Sept 2024, 10:58 pm maharashtra election 2024 : कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असून हा दादाचा वादा आहे असं अजित पवार म्हणाले आहेत. फलटण येथे संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रूपाली चाकणकर हे देखील उपस्थित होते. महाराष्ट्र…

View On WordPress
#maharashtra politics#Ramraje Naik Nimbalkar#Satara News#अजित पवार बातमी#अजित पवार भाषण#अजित पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द#अजित पवारांचा भाजपवर घणाघात#फलटण अपघात#सातारा बातमी
0 notes
Video
youtube
नांदेड मधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर ?
0 notes
Text
काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल
नाशिक (प्रतिनिधी): धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली. त्याला विरोध करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते मात्र डॉ. शेवाळे यांना राजीनामा देणे महागात पडले असून त्यांच्या जागी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास? | Loksabha Election 2024

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी २०२४ साठी आजच फ्री डाउनलोड करा AdBanao अँप आणि मिळवा सर्व पक्षाचं प्रचार पोस्ट्स | Maharashtra Loksabha Election 2024 महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास?
तुम्ही ही करा AdBanao सोबत आपल्या पार्टीचा प्रचार…
गेल्या ५ वर्षात देशामधील सर्वात जास्त राजकीय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रातच…
२०१९ साली भाजप-शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळून सुद्धा सरकार बनवता आले नाही कारण, २०१९मधील शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत एक नवीन समीकरण बनवले.आणि उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे जवळ पास निश्चित झाले असताना;
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित दादा पवार यांनी सरकार स्थापन करून शपथा देखील घेतल्या.
पहाटे घडलेले हे सरकार ६ दिवसाच्या आतच कोसळले.

आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी पहिली पसंद
AdBanao घेऊन आले आहे,
👉लोकसभेसाठी सर्व पक्षांसाठी इलेक्शन विशेष पोस्टर्स
👉इलेक्शन विशेष व्हिडिओज
👉 पार्टी स्पेशल ऍनिमेटेड व्हिडिओज
👉इलेक्शन विशेष प्रोफाईल पिक्चर
👉तुमचा फोटो वापरून प्रचार करण्यासाठी विशेष फ्रेम्स
👉व्हाट्सॲप स्टिकर्स
👉ट्रेंडिंग रील्स
👉पार्टी फ्रेम्स
👉आणि यासोबत मिळवा इलेक्शनसाठी खूप काही.
३५ लाख पेक्षा जास्त बिझनेस आणि ३६५ दिवसाच्या फेस्टिवल इमेजेस आणि व्हिडिओजसाठी AdBanao ॲप आहे पहिली चॉईस.
तर या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आणि आपल्या पार्टीच्या एकदम जबरदस्त पोस्टर्स साठी आताच फ्री डाउनलोड करा.
AdBanao ॲप.
Read the full on our Website
#election#loksabha election#maharashtra#posters#digitalmarketing#adbanaoapp#branding#adbanao#postermaker#social media branding
0 notes
Text
.. तर तब्बल 65 टक्के मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील
तर तब्बल 65 टक्के मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत बोलताना ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते त्यानंतर काँग्रेसने देखील 76 लाख अतिरिक्त मतांची माहिती निवडणूक आयोगाने का दिली नाही ?असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा चिरला आहे असाही आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे. नाना पटोले यांनी बीड आणि परभणी येथील गुन्हेगारांना शिक्षा…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेऊन देशातली सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
राज्यातल्या वाढीव मतदारसंख्या प्रकरणी महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी
तीन दिवसीय वैदिक संमेलनाला रत्नागिरीत प्रारंभ
आणि
छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष झांबड यांना अटक
****
देशातली सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेऊन तयार होत असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं आज ‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२५’ या औद्योगिक महोत्सवात ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या लोह क्रांतीमुळे नजीकच्या सर्व जिल्ह्यांना लाभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. वर्धन लिथियमच्या ४२ हजार कोटींच्या सामंजस्य करारामुळे विदर्भात एक पथदर्शी इकोसिस्टीम तयार होत आहे.
दरम्यान, गडचिरोली इथलं लोहखनिज देशातील उच्च दर्जाचं असून त्यावर प्रक्रिया उद्योग येत आहेत, येत्या पाच वर्षात देशातील स्टील हब म्हणून उदयास येईल, अशी आशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात झालेल्या या कार्यक्रमास अनेक मंत्री, उद्योग समुहाचे प्रतिनिधी आ��ि अधिकारी उपस्थित होते.
****
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मागणी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारसंख्या ३९ लाखांनी कशी वाढली असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला. आपल्याला या मतदार यादीबाबत माहिती देण्याची मागणी गांधी यांनी केली, ते म्हणाले –
हमने इलेक्शन कमिशन को पांच बार बोला है, की हम आरोप नही लगा रहे है। हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर्स लिस्ट मांग रहे है। लोकसभा की फाईनल वोटर लिस्ट। नेम, ॲड्रेस, फोटोग्राफ। विधानसभा की फायनल वोटर लिस्ट। नेम, ॲड्रेस, फोटोग्राफ। तीनों राजनईक पार्टीयां, विपक्ष की पार्टींयां महाराष्ट्र की पब्लिकली आपसे सवाल पूछ रही है। मैने पार्लमेंट मे बोला, हमारे सब नेतोओं ने बोला इलेक्शन कमिशन हमे लिस्ट नही दे रही। उनकी जिम्मेदारी बनती है, की जल्दी से जल्दी लोकसभा, विधानसभा महाराष्ट्र की लिस्ट वो एन सी पी, शिवसेना अँड काँग्रेस पार्टी को पकडा दे। क्यों की हम इस इन्वेस्टीगेशन को एंड तक ले जाना चाहते है।
दरम्यान, काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्यानं राहुल गांधी विनाकारण असे प्रश्न उपस्थित करत आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी पराभवाबद्दल आत्मचिंतन करावं, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
पहिले तर याचं सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशन ने दिलेलं आहे. किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले इलेक्शन कमिशन ने सांगितलेलं आहे.आता ही जी काही तयारी राहुल गांधींची चालली आहे, ती दिल्लीमध्ये प्रचंड मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे जो पर्यंत ते आत्मचिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील, तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही.
दरम्यान, गांधी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची ��पशीलवार लेखी उत्तरं दिली जातील, असं निवडणूक आयोगानं म्��टलं आहे. लोकशाहीत राजकीय पक्ष हा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं तसंच त्यांची मतं आणि सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत असं आयोगानं सामाजिक संपर्क माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा झाली. काँग्रेसचे धर्मवीर गांधी, समाजवादी पार्टीचे शिवपालसिंह यादव, तृणमूक काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आदी खासदारांनी अर्थसंकल्पावर टीका केली, तर भाजपचे राव राजेंद्रसिंह यांच्यासह इतर सदस्यांनी अर्थसंकल्पातल्या तरतुदीचं स्वागत केलं.
****
देशात माता मृत्यू दरात ८३ टक्क्यांनी घट झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. सरकारकडून राबवल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांचं हे फलित असल्याचं नड्डा म्हणाले. बालमृत्यूदरातही ६९ टक्के घट झाल्याचं नड्डा यांनी सांगितलं. जागतिक पातळीवर माता आणि बाल मृत्यूदरात अनुक्रमे ४२ टक्के आणि ५५ टक्के घट झाल्याकडे नड्डा यांनी लक्ष वेधलं.
****
देश हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाला एक नवीन मार्ग दाखवत आहे, असं प्रतिपादन नवीकरण आणि अक्षय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं आहे. देशाने नुकतीच शंभर गिगावॅट सौरऊर्जा क्षमता ओलांडून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्या पार्श्वभूमीवर जोशी यांनी ही प्रतिक्रिया दिली. २०३० पर्यंत ५०० गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जा क्षमतेचं महत्त्वकांक्षी लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने म्हटलं आहे.
****
प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ४० कोटी भाविकांनी स्नान केलं आहे. १३ जानेवारीपासून सुरू झालेल्यस या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत मकरसंक्रांत, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी या तीन पर्वण्यांवर जगभरातून आलेल्या भाविकांनी अमृत स्नान केलं, कुंभमेळा अजून १९ दिवस चालणार असून, भाविकांची ही संख्या ५० कोटींहून अधिक होऊ शकते, असा अंदाज उत्तरप्रदेश सरकारकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, येत्या सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्रिवेणी संगमावर धार्मिक अनुष्ठानात सहभागी होण्याची शक्यता या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.
****
दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पैठण इथं आज गोदावरी प्रगट दिनानिमित्त जलपूजन करण्यात आलं. पैठण इथल्या कृष्णकमल तीर्थावर भक्तांच्या मांदिया��ीत हा सोहळा पार पडला. गोदावरी नदीमध्ये पुष्पवृष्टी करून महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
****
संस्कृत ही भारताची पुरातन भाषा आहे, तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात असल्याचं, रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. रत्नागिरीत इथं आज तीन दिवसांच्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आधुनिक काळातल्या ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन आणि पठणातून काही उपाययोजना करता येते का, यावर संशोधन व्हायला हवं, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी केली.
दरम्यान, या उद्घाटन सोहळ्यापूर्वी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. विविध वेशभुषेतले नागरिक मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आणि बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांना पोलिसांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं अटक केली. झांबड यांच्यावर वर्षभरापूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, तेव्हापासून झांबड फरार होते. या प्रकरणी बँकेचे मुख्याधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. आज सकाळी अटक झाल्यानंतर झांबड यांना आजच न्यायालयासमोर हजर करण्यात येत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रथमच आज देहदानाची नोंद झाली. शहरातील एका नागरीकाने आपल्या भावाच्या निधनानंतर त्यांचा देह महाराष्ट्र ॲनाटोमी ऍक्ट अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला. वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र विभागातल्या विद्यार्थांना शिक्षणासाठी दानात मिळालेल्या या मृतदेहांचा उपयोग होतो. परभणी जिल्ह्यात देहदानासंदर्भात जनजागृती सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्याचा लाभ कायम रहावा यासाठी ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या पाच लाख ६५ हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित असून, ई केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी गावनिहाय शिबीरं घेण्यात येत आहे. शिधापत्रिका धारकांनी या शिबिराचा लाभ घ्याव, असंही चौधर यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात १० फेब्रुवारीपासून हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम सुरू केली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या ��हा तालुक्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा स्तरावरून योग्य ते नियोजन करण्यात आलं असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या १२वीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून परभणी, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, आणि जालना या चार जिल्ह्यातून १ हजार ४०८ महाविद्यालयातले एक लाख ८५ हजार ३०० विद्यार्थी १२वीची परीक्षा देणार आहेत. यासाठी मंडळाकडून मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलं असून, ४६० परीक्षा केंद्रं निश्चित करण्यात आली आहेत.
****
0 notes
Text
काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश
#RajuParwe #BreakingNews #Shivsena #EknathShinde #Congress
0 notes
Text
Pimpri : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पिंपरीत भर पावसात आंदोलन
एमपीसी न्यूज – बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज (शनिवारी) राज्यभरात मूक आंदोलन ( Pimpri) करण्यात येत आहे. पिंपरीतही भर पावसात काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे…
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/former-minister-rajni-satav-passed-away/
0 notes