#ऑनलाईन धान्य वाटप
Explore tagged Tumblr posts
sajagnagrikktimes · 5 years ago
Text
रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणा-या विरोधात गुन्हा दाखल
रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणा-या विरोधात गुन्हा दाखल. #rationing_grains #e_poss_machine #ghotala_news2019 #sajagnagrikktimes
Rationing grains :अन्न धान्य वितरण कार्यालयाला अहवाल सादर, त्यात सगळे आलबेल
सजग नागरिक टाईम्स,अजहर खान: Rationing grains e poss machine घोळ : पुणे :महाराष्ट्रात रेशनिंग धान्यांचा काळाबाजार होत असल्याचे
अनेक उदाहरणे पहायला मिळाले असून तर काहिंवर अन्न सुरक्षा मानके कायद्या नुसार गुन्हे देखील दाखल झाले आहे ,
तसेच तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरिष बापट यांनी काळाबाजार करणा-यांवर थेट
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १२ एप्रिल २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
राज्याच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०२१-२२ या वर्षाच्या रब्बीच्या पणन हंगामातल्या धान आणि भरडधान्य ��रेदीसाठी शेतकऱ्यांनी येत्या तीस तारखेपर्यंत NeML पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी करावी, असं आवाहन अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं केलं आहे. सरकार या धानाची खरेदी एक मे ते तीस जून या कालावधीत करणार असून भरडधान्य खरेदीच्या तारखांची सूचना स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या यशस्वी महिला उद्योजक तसंच सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांचा आज मुंबईत महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महिला सुरक्षा ऑडिट प्रशिक्षणही देणात येणार आहे
****
दिव्यांग, अनाथ, तृतीय पंथीय व्यक्ती आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना रेशन दुकानातून धान्य वाटप करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात अंत्योदय योजनेमध्ये १६६४ कार्ड धारक तर प्राधान्य लाभार्थी योजनेसाठी ५७ हजार लाभार्थीचा नवीन इष्टांक मंजूर करण्यात आला असून त्यांना स्वस्त धान्याचा लाभ देण्यात येणार आहे.
****
हेलिना या रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वदेशात तयार झालेल्या हेलिकॉप्टरमधून डागलेल्या या क्षेपणास्त्रानं आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. उंच पर्वतराजीत पार पडलेली ही चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डीआरडीओ चे शास्त्रज्ञ, भारतीय सैन्यदल आणि भारतीय वायुदल यांनी संयुक्तपणे पार पाडली.
****
बारावीनंतर अभियांत्रिकी, अॅग्रीकल्चरल, फार्मसी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएच सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत येत्या १५ तारखेपर्यंत असून ही मुदत संपल्यानंतर येत्या २३ तारखेपर्यंत पाचशे रुपये विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल
****
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुव��व���त. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर नोंदणी तसंच समूह नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय  
** भारत बायोटेकच्या कोविड बूस्टर डोसचं परीक्षण सुरू; पॅनेसिया बायोटेक कंपनी स्पुतनिक लसीचं उत्पादन करणार
** बीड जिल्ह्यात उद्या रात्रीपासून ३१ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू होणार
आणि
** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं स्वखर्चातून उभारलं सुसज्ज कोविड सुश्रुषा केंद्र
****
१८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर नोंदणीची तसंच समूह नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार हा निर्णय घ्यावा, लसीच्या मात्रा वाया जाऊ नयेत, आणि नागरिकांचं लसीकरण व्हावं, हाच या मागचा उद्देश आहे. फक्त शासकीय लसीकरण केंद्रांवरच ही सुविधा उपलब्ध असेल. खासगी लसीकरण केंद्रांना मात्र लसीकरण कार्यक्रम जाहीर करून, ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. कोविन ॲपवर सध्या एका मोबाईलवरून चार जणांची नोंदणी करता येते, मात्र ज्या नागरिकांना मोबाईल किंवा इंटरनेट वापराला मर्यादा आहेत, त्यांना या ॲपवरून समूह नोंदणी करून लसीकरणाची वेळ घेता येणार आहे. लसीकरण केंद्रावर नोंदणीचा निर्णय घेताना, केंद्रांवर गर्दी होणार नाही, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला द्यावेत, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत बायोटेक कंपनीने कोविड लसीच्या बूस्टर डोसचं परीक्षण सुरू केलं आहे. औषध महानियंत्रकांनी बूस्टर डोसचं परीक्षण करण्याची परवानगी दिल्यानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सच्या दिल्ली तसंच पाटणा इथल्या रुग्णालयात हे परीक्षण केलं जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या परीक्षणात सहभागी नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीची दुसरी मात्रा घेतल्याच्या सहा महिन्यांनंतर बुस्टर डोस दिला जाणार आहे.
दरम्यान, पॅनेसिया बायोटेक ही भारतीय जैव तंत्रज्ञान कंपनी रशियाच्या स्पुतनिक या कोविड लसीचं उत्पादन करणार आहे. स्पुतनिक व्ही या लसीच्या दरवर्षी दहा कोटी मात्रांचं उत्पादन करण्याची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेश जैन यांनी केली आहे.
****
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसीच्या २१ कोटी ८० लाख ५१ हजार ८९० मात्रा दिल्या आहेत. यापैकी २० कोटी ८ हजार ८७५ मात्रा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही एक कोटी ८० लाख ४३ हजार मात्रांचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय, ४८ लाखाहून अधिक मात्रा सध्या पुरवठा प्रक्रियेत असून, येत्या ३ दिवसांत त्या राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध होतील, असं आ��ोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
नागपूर जिल्ह्यात कोविडमुळे कुटूंबातल्या एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झालेला असल्यास अशा मुलांचं पालकत्व जिल्ह्यातली श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट घेणार आहे. या मुलांचं शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, कौशल्य विकासाची संपूर्ण जबाबदारी ट्रस्टनं स्वीकारली असल्याची माहिती माजी महापौर संदीप जोशी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय, पालक गमावलेल्या उपवर मुलींचा विवाह लावून देण्याचा या संस्थेचा प्रयत्न आहे. क्रीडा प्रशिक्षक, कलाकारांना किट्सचं वाटप करण्यात येणार अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिली.
****
नाशिक जिल्ह्यात १२ दिवसांचे कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर आज बाजार, उद्योग सुरू झाले. गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू झाल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत आज लिलाव सुरू होताच कांद्याला प्रतिक्विंटल किमान सातशे तर जास्तीत जास्त १ हजार ४८१ रुपये दर मिळाला.
****
सातारा जिल्ह्यात आज रात्री १२ वाजेपासून १ जूनच्या सकाळी  ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. या काळात राज्य परिवहन मंडळाच्या सेवा तसंच सर्व सहकारी बँक, पतसंस्था बंद राहणार आहेत. भाजी, किराणा तसंच इतर सर्व बाजारपेठा देखील बंद राहणार असून दूध वितरणासाठी सकाळी ७ते ९ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यात उद्या २५ तारखेच्या रात्री १२ वाजेपासून ३१ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज यासंदर्भातले आदेश जारी केले. औषधी दुकानं, आरोग्यसेवा, तसंच इतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापनं या काळात बंद राहणार आहेत. भाजीपाला विक्री सकाळी ७ ते ९ या वेळेत तर दूधविक्री सकाळी ७ ते १० या वेळेत सुरू असेल. स्वस्त धान्य दुकानं आणि कृषी निविष्ठा सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहतील. ज्या नागरिकांना लसीकरणाबाबत मोबाईलवर संदेश आलेला आहे, अशांना या काळात लस घेण्यासाठी परवानगी असणार आहे.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज १४ कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ रुग्णांचा समावेश असून अहमदनगर जिल्ह्यातल्या तीन आणि नाशिक, जळगाव इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या पाच हजार ५५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पाच लाख ५१ हजार ३४२ जणांनी कोविडचे दोन्ही डोस घेतल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात आज ८२४ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये बीड २०१, आष्टी १८२, केज ७८, पाटोदा ६५, अंबाजोगाई ५७, गेवराई ५४, माजलगाव ५१, शिरुर ४९, धारुर ४४, वडवणी २२ आणि  परळी इथल्या २१ रुग्णांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद शहरानजिक असणाऱ्या आदर्श पाटोदा ग्रामपंचायतनं स्वखर्चातून गावातील जिल्हा परिषद शाळेत सर्व सुविधांनी युक्त कोविड केअर सेंटर स्थापन केलं आहे. सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे आणि ग्राम विकास अधिकारी पुंडलिक पाटील यांच्या संकल्पनेतून गावात हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे. गावातील ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचं ग्राम विकास अधिकारी पुंडलिक पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले….
प्राथमिक सर्व आरोग्याच्या ज्या सुविधा लागतील त्या आम्ही इथं ठेवलेल्या आहेत. खाजगी डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे, आणि त्याचं पेमेंट ग्रामपंचायत करते.होम आयासोलेशनचा ज्यांना सल्ला दिला जातो. तर इथे त्यांना ॲडमिट करुन त्यांची देखरेख या डॉक्टरांच्या अधिपत्याखाली करुन आणि मग त्याची ट्रीटमेंट करण्याची सुविधा आम्ही इथं केली .त्याच्या मागचं कारण असं आहे की, तो जर गावात पेशंट राहिला तर त्याचं मनोधैर्य मजबूत होतं आणि तो लवकर कव्हर होण्याच्या दृष्टीकोनातून म्हणून हे क्वारांटाईन सेंटर स्थापन करण्याची आमची संकल्पना होती. असंच जर इतर ग्रामपंचायतीनं केलं तर जो सरकारी यंत्रणेवर ताण येतो आहे. तो कमी होवून पेशंटची संख्या कमी होईल व कोर���ना हा लवकरात लवकर हा हद्दपार होवू शकतो. एव्हढं आवाहन मी पाटोदा ग्रामपंचायतच्या वतीनं करतो.
 ****
टाळेबंदीच्या काळात परभणी जिल्ह्यातल्या ऑटो रिक्षा मालकांकडून बँका किंवा फायनान्स कंपन्या करत असलेली कर्जाची हप्ते वसुली तत्काळ थांबवावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना आज याबाबत एक निवेदन सादर करण्यात आलं. राज्य शासनानं चालू वर्षी दीड हजार रुपये मदत केली, मात्र ती तुटपुंजी आहे. या वर्गाची आर्थिक स्थिती सध्या नाजुक असल्यामुळे सक्तीची हफ्ते वसुली तत्काळ थांबवावी अशी मागणी संघटनेनं केली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण पूर्ण���णे रोखण्यासाठी ना��रिकांनी खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी म्हटलं आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत बोलत होत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ६२ शतांश टक्क्यांवर आला आहे, कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपचारांच्या नियोजनसह प्रशासन सज्ज असल्याचं गव्हाणे यांनी सांगितलं.
//*********//
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 October 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ ऑक्टोबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      कोविड संसर्ग प्रतिबंधासाठी आजपासून केंद्र सरकारचं ज��जागृती अभियान.
·      महिला बचत गटांना रोजगार देण्यासाठी राज्यात नव तेजस्विनी योजना राबवणार.
·      सार्वजनिक जागा आणि रस्त्याची अनिश्चित काळासाठी अडवणूक करुन शाहीनबाग सारखं आंदोलन करण्याला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार.
·      कृषी कायद्यांची अंमलबजावणी न करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेविरूद्ध भारतीय जनता पक्षाचं राज्यभर आंदोलन.
·      राज्यात आणखी १४ हजार ५७८ कोविड बाधितांची नोंद, ३५५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
·      मराठवाड्यात ४०रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ८६७ रुग्णांची नोंद.
आणि
·      येत्या ११ तारखेची राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याची खासदार संभाजी राजे छत्रपती यांची मागणी.
****
आगामी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोविड संसर्ग प्रतिबंधाबाबत केंद्र सरकार आजपासून जनजागृती अभियान राबवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरच्या माध्यमातून या अभियानाची सुरुवात करणार आहेत. लोकांचा सहभाग मिळण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरु करण्यात येणार आहे. मास्क वापरणं, सामाजिक अंतर राखणं आणि वेळोवेळी हात धुणं हे तीन मुख्य संदेश या अभियानाअंतर्गत दिले जाणार आहेत. या जनआंदोलनाच्या पहिल्या दिवशी आज सर्वांना कोविड-19 शपथ दिली जाणार आहे. हिवाळ्यात कोविड प्रतिबंधासाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल ते पत्रकारांशी बोलत होते. या संदेशाचा प्रसार करण्यासाठी सामाजिक संपर्क माध्यमांसह सर्वच माध्यमांचा वापर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या महिला बचत गटांना ५२३ कोटी रुपयांचा निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात नव तेजस्विनी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांना रोजगार मिळणार असून, ग्रामीण भागात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या निर्णयामुळे मदत होणार आहे.
राज्यात आदरातिथ्य उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यापूर्वी लागणाऱ्या ७० परवानग्यांऐवजी आता दहा परवानग्या तसंच नऊ स्वयं प्रमाणपत्रं लागतील.
राज्यातल्या शाळा वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर सुरू करण्याबाबाबत निर्णय घ्यावा अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली.  ऑनलाईन शिक्षण सुरु झालं असून, याबाबतचा आढावा घेण्यासंदर्भातले निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागाला दिले.
****
राज्यातले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत ��ुरु राहणार आहे. पर्यटन विभागानं काल यासंदर्भातला सुधारीत आदेश जारी केला. यानुसार आता हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार रात्री दहा वाजता बंद करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
****
सार्वजनिक जागेची आणि रस्त्याची अनिश्चित काळासाठी अडवणूक करुन शाहीनबाग सारखं आंदोलन करण्यास मान्यता देऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दिल्लीतल्या शाहीनबाग इथं गेल्या वर्षी नागरिकत्त्व सुधारण कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु झालं आणि ते तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आंदोलनाला बंदी घालावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, एखाद्या सुनिश्चित ठिकाणीच आंदोलन करायला पाहिजे, असा सल्ला दिला. सार्वजनिक ठिकाणी बराच काळ आंदोलन करुन नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही आणि कायदा त्यास मान्यता देत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
****
केंद्र सरकारनं शेतक��्यांच्या हितासाठी मंजूर केलेले कृषी कायदे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश सरकारनं काल जारी केला.
दरम्यान, या आदेशाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या याबाबतच्या आदेशाची होळी करण्यात आली.
उस्मानाबाद इथंही भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात त्या आदेशाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली.
लातूर इथं भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या या आंदोलनात राज्य सरकारच्या आदेशाची होळी करुन निषेध नोंदवण्यात आला.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी निषेध आंदोलन केलं.  
परभणी इथंही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा तीव्र निषेध करत, या आदेशाची होळी केली.
हिंगोली, बुलडाणा, चंद्रपूर, आणि वशिम इथंही भाजपच्या वतीनं या स्थगिती आदेशाची होळी करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
नागपूरला दीक्षाभूमी इथं धम्मचक्र प्रवर्तन दिनी येत्या २५ ऑक्टोबरला, तसंच येत्या ६ डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी गर्दी करू नये, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. मुंबई इथं महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कोविड-19चा प्रसार वाढण्याचा धोका लक्षात घेऊन यावेळी गर्दी टाळावी, असं ते म्हणाले.
****
अल्पसंख्याक समाजाचं शासकीय सेवेतलं प्रमाण वाढावं याकरता राबवण्यात ये�� असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रती महिना दोन हजार रुपयांवरुन चार हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काल ही माहिती दिली. यासंदर्भातील शासन निर्णयही काल जारी करण्यात आला.
****
अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अंमली पदार्थ व्यवहार नियंत्रण विभाग एनसीबीने रियाला अटक केली होती. तिचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज मात्र फेटाळण्यात आला.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी १४ हजार ५७८ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १४ लाख ८० हजार ४८९ झाली आहे. राज्यभरात काल ३५५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३९ हजार ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १६ हजार ७१५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत ११ लाख ९६ हजार ४४१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ४४ हजार ५२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४० कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ८६७ रुग्णांची नोंद झाली.
बीड जिल्ह्यात १४ बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी १३७ रुग्ण आढळून आले. लातूर जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू, तर नवे १७४ रुग्ण, नांदेड जिल्ह्यात सात मृत्यू, तर नवे २०९ रुग्ण, परभणी जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर नव्या ८० रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात आणखी १२०, उस्मानाबाद जिल्ह्यात ९० तर जालना जिल्ह्यात आणखी ३८ रुग्ण आढळले. तर हिंगोली जिल्ह्यात नव्या १९ रुग्णांची नोंद झाली.  
****
मुंबईत आणखी दोन हजार ८४८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४६ मृत्यूंची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५३ नवे रुग्ण, तर ६९ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ९४३ नवे रुग्ण आढळले, तर १३ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात ९७६, सांगली ४५१, रायगड ४३०, सातारा ४४१, पालघर २८९, गडचिरोली ११९, रत्नागिरी ६६, सिंधुदुर्ग ५८, गोंदिया ५६, तर बुलडाणा जिल्ह्यात आणखी २२ रुग्ण आढळले.    
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत. या निमित्तानं कुलगुरू प्रमोद येवले यांनी काल विद्यार्थ्यांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत मार्गदर्शन केलं. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन मॉक टेस्ट द्यावी, ही चाचणी म्हणजे त्या विद्यार्थ्याचं परीक्षेसाठी नोंदणी समजली जाईल, असं कुलगुरूंनी सांगितलं. पूर्वी ऑफलाईनचा पर्याय दिलेले विद्यार्थी मॉक टेस्ट देऊन ऑनलाईन परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात, तर ग्रामीण भागात नेटवर्कची किंवा इतर अडचण असलेले विद्यार्थी, आपल्या घराजवळच्या महाविद्या��यात परीक्षा देऊ शकतात, असं त्यांनी स्पष्ट केलं.
या परीक्षेसाठी एक लाख १३ हजारांवर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर ५० हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडला आहे. ७८५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, त्यांना परीक्षेसाठी २० मिनिटं जास्त वेळ मिळणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही स्क्रीनशॉट घेऊ नये, तसंच गुगलचा वापर करू नये, या दोन्हीपैकी काहीही कृती केल्यास परीक्षा बंद होईल, असं कुलगुरुंनी स्पष्ट केलं.
****
येत्या ११ तारखेला नियोजित राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ही परिक्षा घेतल्यास होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या वतीनं काल नवी मुंबईत राज्यस्तरीय बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा समाजाचं नुकसान होईल, असं खासदार संभाजीराजे म्हणाले.
कोविड प्रादुर्भावामुळे अनेक उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्यानं, ही परीक्षा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. परीक्षा रद्द न केल्यास, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं परीक्षा केंद्र बंद पाडण्याचा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिला.  
****
नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणं दिसताच तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असं आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. नवरात्र, दसरा-दिवाळी सारखे सण घरी राहूनच साजरे करावेत, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
जालना शहरातली व्यापारी प्रतिष्ठानं तसंच दुकानं आता सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शहरातल्या व्यावसायिकांना सायंकाळी सात ऐवजी साडेआठ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शहर व्यापारी महासंघानं जिल्हा प्रशासना��डे केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल सुधारित आदेश जारी केले. त्यानुसार शहरातल्या व्यावसायिकांना कालपासून सायंकाळी दोन तासांची वेळ वाढवून देण्यात आली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू नियमांचं सर्व व्यावसायिकांनी पालन करावं, असं याबाबतच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर शहर आणि तालुक्यातल्या काकरंबा गावातल्या गरजू कुटुंबांना लोकसेवा फाऊंडेशनच्या वतीने तूर डाळ आणि तांदुळाचं मोफत वाटप करण्यात येत आहे. या धान्य वाटपाचा काल नववा दिवस होता. या नऊ दिवसांत १५६ कुटुंबांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं.
****
परभणी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी कृषी विभागाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत जागा हस्तांतरित करावी, अशी मागणी शिवसेनेचे ��ासदार संजय जाधव यांनी केली आहे. यासाठी त्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन सादर केलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी किमान ५० एकर जागा देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
****
परभणी, लातूर, आणि बीड जिल्ह्यात येत्या शनिवारी दहा तारखेला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असं विद्यापीठानं सांगितलं आहे. दरम्यान, उद्यापर्यंत मराठवाड्यात कोरड्या हवामानाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची कामं संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करुन वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत. या कामांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. ही कामं वेळेत न झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू तहसील कार्यालयातल्या दैनंदिन कामकाजात कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत, याची कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. सेलू महसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी संघटनेनं जिल्हाधिकारी तसंच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठवलेल्या निवेदनातून, तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या कार्यपद्धतीविरूध्द गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना केली.   या संघटनांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
मराठा आरक्षणावर लावण्यात आलेली बंदी उठवावी, तसंच मराठा समाजाला कायम स्वरूपी आरक्षण मिळावं या मागणीसाठी काल नांदेड इथं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या घरासमोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेनं घरणे आंदोलन केलं. यावेळी खासदार चिखलीकर यांनी आंदोलकांसोबत बसून चर्चा केली. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आग्रही आहोत असं ते म्हणाले.
****
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची नगर विकास विषयक केंद्र सरकारच्या स्थायी समितीवर सलग दुसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे. खासदार जलील यांची पहिल्या वर्षी नगर विकास आणि नागरी उड्डाण विषयक अशा दोन महत्त्वपूर्ण स्थायी समित्यांवर निवड झाली होती.  
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या पालखेड सज्जाचा तलाठी याला दुसऱ्या व्यक्तीमार्फत तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल पकडण्यात आलं. वडिलांच्या नावे असलेली शेत जमीन वारसांच्या नावे करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 June 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २ जून २०२० सायंकाळी ६.०० ****  औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत आज दिवसभरात ६० रुग्णांची वाढ  जालना जिल्ह्यातही आणखी २५ जणांना कोरोना विषाणू संसर्ग  शेतमाल खरेदीसाठी केंद्र सरकारकडून जाहीर होणारा किमान आधारभूत दर कायद्यानं बंधनकारक असावा - काँग्रेस पक्षाची मागणी आणि  राज्यात ४८३ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित तर ३२२ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द; औरंगाबाद विभागतल्या ७७ दुकानांवर कारवाई **** औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत आज दिवसभरात ६० रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक हजार ६४७ झाली आहे. यामध्ये २७ महिला आणि ३३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यात सकाळी ५५ आणि दुपारी पाच नवीन रुग्णाची वाढ झाली आहे. यामध्ये वाळूज महानगर, तक्षशीलानगर, रहेमानिया कॉलनी, राजा बाजार आणि ��ोतवालपुरा इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं उपचार घेत असलेल्या तीन जणांचा कोरोना विषाणू संसर्गामूळे मृत्यू झाला आहे. यात शहागंज मधील ५४ वर्षीय पुरुष, कैलास नगर इथला ५६ वर्षीय पुरुष तर गौतमनगर पिसादेवी रस्ता इथल्या ६९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८२ रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. **** जालना जिल्ह्यात आणखी २५ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता १५३ झाली आहे. दरम्यान, शहरातल्या मोदीखाना भागातल्या एका ६० वर्षीय कोरोना विषाणू बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यामुळे जालना जिल्ह्यात आता कोरोना संसर्गामुळे मृत पावलेल्यांची संख्या दोन झाली आहे. **** नांदेड जिल्ह्यात आज सकाळी दोन कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता १५१ झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णात एक सात वर्षे वयाची मुलगी तर एका ४ वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे. **** अमरावती इथं चार जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे. एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या २४९ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन हजार ६५० नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असल्या��ी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. **** अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, आज या संसर्गाचे नवीन ११ रुग्ण आढळून आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** धुळे शहरातल्या मुख्य टपाल कार्यालयात मध्ये काम करणारे ३ कर्मचारी कोरोना मुक्त झाले आहे. आज त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. **** गृह विलगीकरणात राहण्याचे निर्देश असतानाही एका लग्नसमारंभाला हजेरी लावणाऱ्या एका तरुणाविरुध्द जालना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या या तरुणाच्या संपर्कातल्या काहींचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल बाधित आला होता. त्यामुळे या तरुणाच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्याविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे **** कोरोना विषाणू टाळेबंदी दरम्यान मुंबईत अडकलेले स्थलांतरित नागरिक रेल्वे आणि एसटीच्या माध्यमातून स्वत:च्या घरी परतत आहेत. आतापर्यंत मुंबईतून पश्चिम रेल्वेच्या श्रमिक रेल्वेद्वारे १८ लाख लोक आपापल्या राज्यात परतले आहे. त्यासाठी मुंबईतून पश्चिम रेल्वेने १ हजार २१६ श्रमिक रेल्वे सोडल्या. मध्य रेल्वेच्या माध्यमातून ८ लाख स्थलांतरित मुंबईतून परतले असून त्यासाठी ६०३ श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. एस.टी.च्या माध्यमातून ५ लाख ३७ हजार लोकांना राज्यांच्या सीमेवर पोहोचवण्यात आलं. त्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे ४३ हजार एस.टी. बसेस सोडण्यात आल्या. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** शेतमाल खरेदीसाठी केंद्र सरकारकडून जाहीर होणारा किमान आधारभूत दर कायद्यानं बंधनकारक असावा, अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली. शेतमालाला बाजारात मिळणारा दर हा किमान आधारभूत दरापेक्षा कमी असल्याचं, काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी म्हटलं आहे. सरकारने हमीभाव जाहीर करूनही, शेतकऱ्यांना तो दर मिळत नसेल, तर २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं पंतप्रधानांचं उद्दीष्ट कल्पनतेच राहील, असं त्यांनी म्हटलं आहे. **** राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत धान्य वाटप करतांना अनियमितता तसंच नियमभंग करणाऱ्या ४८३ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ३२२ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. राज्यातील ९३ रास्त भाव दुकानदारांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. ते आज आपल्या विभागाच्या बैठकीत बोलत होते. कारवाई झालेल्या दुकानांमध्ये औरंगाबाद महसूल विभागातल्या ७१ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, ६ दुकानांचा परवाने रद्द करण्यात आले आहेत. यापुढेही अनियमितता आढळली किंवा नियमभंग केल्यास कडक कारवाईचा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी ई-पॉस ला जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली. **** नैऋत्य मोसमी पाऊस येत्या ६ तारखेपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून ही माहिती देण्यात आली. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेली स्थिती पूर्ववत झाल्यानंतर मोसमी पावसाची पुढे वाटचाल होईल, पाच जूननंतर हा बदल अपेक्षित असल्याचं, हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई आणि किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका पाहता, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एडीआरएफच्या दहा तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या व्यतिरिक्त सहा तुकड्या राखीव असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ उद्या रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरपासून दक्षिण गुजराथजवळ दमणपर्यंत पोहोचणार आहे. मुंबईला या चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं सांगितलं जात असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. रायगड किनारपट्टीवरील ६० गावांमध्ये सुमारे १ लाख ७३ हजार नागरिक राहत आहेत. इथं कुठल्याही प्रकारे मनुष्यहानी होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. एडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या असून एक तुकडी हरिहरेश्वर तर दुसरी अलिबागला तैनात आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या ५ हजार ६६८ मच्छिमारांना परत बोलावून घेण्यात आले आहे. **** विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नसल्याने विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेलं परीक्षा शुल्क परत करावं अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे नि��ेदनाद्वारे केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क भरले होते अशा सर्वच विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे. जेणे करून ‘टाळेबंदीमध्ये या पैशाचा विद्यार्थी आणि त्यांचा कुटुंबीयाना आर्थिक हातभार मिळेल. यासंदर्भात त्वरीत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापुर उपजिल्हा रुग्णालयाला आमदार प्रशांत बंब यांनी आज फूट ऑपरेटिव्ह हॅंडवॉश आणि सॅनिटायझर यंत्र भेट दिलं आहे. या मध्ये हात धुण्यासाठी नळाला हात लावण्याची गरज नाही पायानं हे यंत्र वापरता येणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मदत होणार आहे. हात स्वच्छ करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि दवाखान्यात येणारे रुग्ण या यंत्रणेचा वापर करत आहेत. आमदार बंब यांनी असे दोन यंत्र रुग्णालयाला भेट दिले असल्याचं नोडल अधिकारी डॉ सुदाम लगास यांनी सांगितलं. ***** जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका दुचाकीवर एकाच व्यक्तीनं, तर तीन आणि चार चाकी वाहनांनी चालक, आणि दोन प्रवासी अशी वाहतूक करण्यास परवानगी आहे. मात्र, शहरात अनेकांकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर पोलिस दंडात्मक कारवाई करत असल्याचं दिसून येत आहे. **** औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीनं नेमण्यात आलेल्या कोविड स्वयंसेवकांना आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज मार्गदर्शन केलं. उद्यापासून शहरातली सर्व दुकानं सुरू होणार असून या स्वयंसेवकांनी आपआपल्या गल्लीत, वार्डात नागरिकांमध्ये गर्दी न करणे, मास्क वापरण्याबाबत, वारंवार हात धुण्याबाबत आणि एकमेकातलं आंतर राखण्यासाठी ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यास त्यांनी यावेळी सांगितलं. **** जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पीककर्ज नोंदणीसाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत ३१ मे पर्यंत होती. पीककर्जाच्या ऑनलाईन अर्जाची लिंक जालना डॉट एनआयसी डाट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आजपर्यंत एक लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी नोंदणी केली असून, राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ६६ कोटी २० लाख रुपयांचे पीककर्ज वाटप पूर्ण झालं आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्याचं पीककर्ज वाटपाचं एकूण उद्दीष्ट १११५ कोटी रुपये इतकं आहे. **** नांदेड शह��ात आज दुपारी ४ वाजता अर्धा तास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आणि अनेक तालुक्यात आज दुपारी जोरदार पाऊस झाला *****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 May 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०५ मे २०२० सकाळी ७.१० मि. **** ** महसुलात घट झाल्यामुळे राज्य शासनाचा खर्च कपातीचा निर्णय; खरेदी, पदभरती, कर्मचाऱ्यांच्या बदल्या तसंच बांधकामावर बंदी, चालू आर्थिक वर्षात तरतुदीच्या केवळ ३३ टक्केच निधी उपलब्ध होणार ** टाळेबंदीच्या अंमलबजावणीत कोणतीही कुचराई न करण्याचं आणि लवकरात लवकर ग्रीन झोन्समध्ये येण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश ** राज्यात काल दिवसभरात ७७१ नवे कोरोना विषाणू बाधित रूग्ण; तर ३५ जणांचा मृत्यू ** औरंगाबाद शहरात १५, हिंगोलीत २३, उदगीर आणि नांदेडमध्ये प्रत्येकी तीन नवे रूग्ण ** आणि ** राज्यात मद्य विक्रीची दुकानं सुरू होताच, ग्राहकांची मोठी गर्दी. काही जिल्ह्यात मात्र परवानगी नाकारली **** कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कर आणि इतर महसुलात झालेली घट लक्षात घेऊन, राज्य शासनाच्या अर्थमंत्रालयानं काल आपल्या खर्चात कपात करण्याचा शासन निर्णय जारी केला. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा विभाग तसंच मदत आणि पुनर्वसन विभाग हे प्राधान्यक्रमाचे विभाग म्हणून शासनानं घोषित केले आहेत. प्राधान्यक्रमाल्या विभागांव्यतिरिक्त इतर कोणत्याही विभागानं कोणत्याही खरेदी तसंच दुरुस्ती, कार्यशाळा वा इतर खर्चांच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये किंवा निविदा काढू नयेत असं या आदेशात म्हटलं आहे. याशिवाय सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औपधी द्रव्ये विभागाशिवाय इतर विभागातल्या पदभरती आणि बदल्यांनाही स्थगिती दिली आहे. चालू आर्थिक वर्षात कार्यालयाच्या दैनंदिन वापराच्या वस्तुंसाठी वितरित केलेल्या निधीपैकी ७५ टक्के निधी खर्च करायला मान्यता असेल. कोणत्याही विभागांनं पुढच्या आदेशापर्यंत कोणतंही बांधकाम हाती घेऊ नये, जी कामं सुरु करण्याचे आदेश मिळाले आहेत ती आणि चालू असलेली कामच फक्त करावीत. वित्तीय वर्षाच्या कार्यक्रमांतर्गत कोणत्याही नवीन योजनांवर खर्च करू नये तसंच सध्याच्या कार्यक्रमांतर्गत चालू असलेल्या सर्व योजनांचा आढावा घेऊन, रद्द तसंच पुढे ढकलता येण्यासारख्या योजना निश्चित करण्याचेही आदेश दिले आहेत. याशिवाय २०२०-२०२१ साठी तरतूद केलेल्या निधीपैकी केवळ ३३ टक्केच निधी उपलब्ध होईल यादृष्टीनं खर्चाचं नियोजन करावं, त्यात मानधन, वेतन, निवृत्तीवेतन, पोषण आहाराशी संबंधित योजनांना प्राधान्य द्यावं असं निर्णयात म्हटलं आहे. चालू वर्षात कोणत्याही प्रकारची संक्षिप्त देयके मान्य केली जाणार नाहीत, ज्या कार्यालयाच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम न वापरता पडून आहे त्यांनी ती ३१ मे पर्यंत शासनाकडे परत करावी असंही या आदेशात म्हटलं आहे. **** राज्याचं अर्थचक्र सुरु व्हावं यासाठी प्रशासनानं कोणत्याही परिस्थितीत टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्समध्ये यावे यासाठी, स्थानिक परिस्थितीनुरूप योग्य तो निर्णय घ्यावा, अंमलबजावणीत कोणतीही कुचराई करू नये असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातल्या विभागीय आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. चालू महिना अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र ग्रीन झोन झाले पाहिजेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळूनच होईल हेही त्यांनी स्पष्ट केल. **** राज्यात काल दिवसभरात ७७१ नवे कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले, यामुळे आता राज्यातल्या रूग्णांची संख्या १४५४१ एवढी झाली आहे, असं आरोग्य विभागानं सांगितलं, राज्यात एकूण ३५ रूग्णांचा मृत्यूही झाल���, एकूण मृतांची संख्या ही ५८३ झाली आहे. या ��जारातून आतापर्यंत २४६५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. **** औरंगाबाद शहरातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या २९७ झाली आहे, काल दुपारपर्यंत शहरात नवीन १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. सिडको एन ११ तसंच पुंडलिक नगर भागातही काल कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले. एका दैनिकाचा पत्रकार आणि त्याच्या आईलाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान औरंगाबाद शहरात आतापर्यंत दहा जणांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. **** हिंगोली जिल्ह्यात काल राज्य राखीव पोलिस दलाचे आण २२ जवान आणि जिल्हा रूग्णालयातली २४ वर्ष वयाची एक पारिचारिका बाधित असल्याचं स्पष्ट झालं. काल रात्री उशिरा या सर्वांचे तपासणी अहवाल प्राप्त झाल्याचं डॉक्टर किशोरप्रसाद व्यास यांनी सांगितलं. बाधित जवान हे मुंबईत बंदोबस्तासाठी गेले होते, तिथे त्यांना या आजाराची लागण झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातली एकूण रूग्णांची संख्या ६९ झाली आहे. **** नांदेड शहरात काल नव्यानं तीन रुग्ण कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे. आता नांदेडमध्ये कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या ३४ झाली आहे. यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अद्याप ६२ रुग्णांच्या लाळेच्या नमुन्यांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली. जिल्हा सामान्य रूग्णालातून पळून गेलेले चार बाधित रुग्ण अद्याप सापडले नाहीत असं ते म्हणाले. **** लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये आणखी तीन जण बाधित असल्याचं काल तपासणी अहवालात आढळून आलं. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णांची संख्या १३ झाली आहे. **** सोलापूर जिल्ह्यातल्या बाधित रूग्णांपैकी दोन रूग्णांचा काल मृत्यू झाला, जिल्हा प्रशासनानं ही माहिती दिली. जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा आठ झाला आहे. **** सांगली जिल्ह्यात इस्लामपूर शहरातल्या प्रतिबंधीत क्षेत्रात ४ एप्रिलपासून एकही कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळला नसून सलग २८ दिवसांचा कालावधी पुर्ण झाल्यामुळं आता या क्षेत्राची अधिसूचना रद्द करण्यात आली असल्याचं सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगितलं. **** पुण्यात एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा काल कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला. ५७ वर्षांच्या या पोलिस अधिकाऱ्याला गेल्या आठवड्यात विषाणूची लागण झाल्याचं निदर्शनास आलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यात आतापर्यंत १२ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. **** अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ६० झाली आहे. या विषाणुमुळे १० रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. अमरावती शहरात आता कोरोना विषाणू चाचणी केंद्र सुरू करण्यात आलं आहे. **** बुलडाणा जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून कोरोना विषाणूचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्यासह पोलीस प्रशासनानं आपल्या सुसज्ज यंत्रणा तसंच नियोजनबध्दरित्या कोरोना विषाणूची स्थिती हाताळल्यानं जिल्ह्यात त्याच्या प्रादुर्भावाला अटकाव बसला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. **** पालघर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असून काल सायंकाळपर्यंत जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू ब��ितांची संख्या ही १७९ वर पोहचली आहे. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात वसई विरार महानगर पालिकेत सर्वाधिक १५२ रूग्ण आहेत. धुळे शहरात १० मे पर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू राहणार असून फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या आता ३२ झाली आहे. आतापर्यंत चार रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. **** मुंबईच्या जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील १२ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोरोना विषाणू बाधित असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, या १२ पोलिसांच्या संपर्कातील ४४ पोलिसांचं विलगीकरण करण्यात आलं आहे. लक्षणं आढळून आलेल्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. **** कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निदान झाल्यावर रुग्णांना भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण योग्य उपचारांमुळे असंख्य रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. असाच अनुभव आला तो नवी मुंबईतल्या ऐरोली इथं राहणारे मोहन टील्लू यांना. ऐकू या त्यांनी आकाशवाणीला सांगितलेला आपला अनुभव – मी १९ दिवस मी हॉस्पिटलाइट होतो मला सर्वांना सांगायचं की कोविड १९ झाला म्हणजे एकदम घाबरून जाऊ नका पाच दिवसांचा course असतो पाच दिवसांचा course पुर्ण कर सहाव्या दिवसी तुमची test होते ताप आणि यांची लक्षणे आली तर डॉक्टरांकडे जा मी गेले जेव्हा कोरोना होईल detect तेवढा लवकर बरा होण्याचं chances आहेत मी जी चुक केली बाहेरजाण्याची तुम्ही करु नका कारण आता परिस्थिती बिकट आहे सरकार फार सुंदर काम करत आपल्यासाठी आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे मी १९ दिवस हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा माझ्या diet भर दिला discharge झालो तेव्हा माझ्या society नी माझी काळजी घेतली माझे तेच म्हणणं आले तुम्हाला लपवू नका घाबरू नका आणि बाहेर जाऊ नका कोरोना झाला म्हणजे गेला असं नाही बरेच लोक नीट होऊन घरी येत आहे याच प्रमाण इंडियात बरेच आहे **** महाराष्ट्रातून आतापर्यंत ३५ हजारावर स्थलांरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यात आलं आहे. या सर्व कामगारांची आरोग्य तपासणी करून, तसंच आवश्यक ती योग्य खबरदारी घेऊन त्यांना पाठवलं जात असल्याचं, राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. या कामगारांना पाठवण्यापूर्वी संबंधित राज्य सरकारांसोबत संपर्क साधून नियोजन केलं जात असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. राजस्थानशिवाय इतर कोणत्याही राज्य सरकारने बस किंवा खासगी वाहनाद्वारे कामगारांच्या प्रवासाला अनुकूलता दाखवली नाही, असं या अधिकाऱ्यानं सांगितल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. **** राज्यात मे महिन्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे धान्याचे वाटप करतांना ई पासची अट शिथिल करण्यात आली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज क्षेत्र असल्यानं कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. धान्याचे योग्य वाटप होण्यासाठी स्वस्त धान्य दुकांनामध्ये शिक्षक तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. **** वस्तु आणि सेवा कराच्या परताव्याची प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आलेली नाही, असं अप्रत्यक्ष कर मंडळानं स्पष्ट केलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे यासंदर्भात वृत्त प्रसारीत होत आहे, हे वृत्त केवळ अफवा असून नागरिकांनी अशा कोणत्याही लिंकवर जाऊ नये आणि आपली माहिती भरू नये असं आवाहन मंडळानं केलं आहे. देशातल्या बेरोजगारांना सरकार दरमहा साडेतीन हजार रूपये भत्ता देत असल्याचा व्हॉटस ॲपवर येत असलेल्या पोस्टचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** राज्यात मद्याची दुकानं सुरु झाली असली, तरीही औरंगाबाद बीड, आणि जालन्यासह सहा जिल्ह्यात मात्र मद्य विक्रीला परवानगी देण्यात आलेली नाही. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार साथरोगाच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं, जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. औरंगाबाद बीड आणि जालन्यासह अमरावती, बुलडाणा आणि सोलापूर जिल्ह्यात मद्याची दुकानं येत्या १७ तारखेपर्यंत म्हणजेच टाळेबंदीच्या काळात बंदच ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे, या पाचही जिल्ह्यात फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकानंच सुरू राहणार आहेत. नागपूर शहरातही मद्य विक्री बंदच राहणार आहे, मात्र नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, काल ही दुकानं सुरू झाल्यानंतर खरेदीसाठी ग्राहकांनी प्रत्येक जिल्ह्यात मोठी गर्दी केली. काही ठिकाणी रांगा लावण्यात आल्या तर अनेक ठिकाणी एकमेकांपासून दूर राहण्याच्या नियमाचं पालन न केल्यामुळे पोलिसांना गर्दी आवरण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले. त्यामुळे पोलिसांना काही दुकाना बंद करणे भाग पडले. **** केंद्र आणि राज्य शासनानं दारू दुकानं सुरू करायला दिलेल्या परवानगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांनी तीव्र विरोध केला आहे. दारूमुळे दरवर्षी पाच लाख लोकांचे मृत्यू होतात, ज्याचं प्रमाण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानं मरण पावलेल्या लोकांपेक्षा कैक पटीने जास्त असल्याचं डॉक्टर बंग म्हणाले. ते म्हणाले - कोरोनाची लागण आहे मृत्यूपेक्षा दारूचे व्यसन आणि त्यामुळे होणारे मृत्यू हे हजारो पटीने जास्त आहे पण कोरोनासाठी बंदी सुरू मात्र विक्रीसाठी सुरू असं करून शासनाने हत्ती सोडला आणि शेपुट मात्र धरून ठेवलेला आहे काही दुकानं सुरु आहेत तिथे अंतर पाळले जाणार नाही नियम मोडले जातील गर्दी होईल आणि दारूची बाटली पुरुष सोबत घरी दारूची बाटली आणतील कोरोना आणतील आपल्या घरच्या लोकांना घरपोच मार उपवास दडवतील आणि कोरोना देतील **** औरंगाबाद इथं जीवनावश्यक वस्तुंची दुकानं एकादिवसाआड सुरू राहणार आहेत. काल सम तारीख असल्यानं, नागरिकांनी जुना मोंढा परिसरात किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी एकच गर्दी केली. या ठिकाणी किमान शारीरिक अंतर राखण्याचा नियमही पाळला गेला नसल्याचं दिसून आलं. दरम्यान औरंगाबाद इथं, संचारबंदीच्या काळात दुकान चालवल्याप्रकरणी तिघा दुकानदारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. **** परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथं काल ग्रामपंचायतच्या वतीने बाजार भरवण्यात आला होता. नागरिकांनीही या बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी सामाजिक अंतराचा कोणताही नियम पाळला गेला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीत गेलेले राज्यातले जवळपास दीड हजार विद्यार्थी लवकरच राज्यात परत येणार आहेत. राज्य सरकारनं दिल्ली सरकारसोबत चर्चा केल्यानंतर त्यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या विद्यार्थ्याना घरी परतण्यास परवानगी मिळावी यासाठी राहुरी तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क समन्वयक आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. **** राजस्थानामध्ये कोटा इथं अडकलेल्या परभणी जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना विशेष बसद्वारे परभणीत आणलं आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना विलगीकरणात ठेवलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव तालुक्यातल्या जरंडी गावातही बाहेरगावी गेलेले अनेक मजूर परतले आहेत. या सर्व मजुरांना त्यांच्या घरीच अलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. घराबाहेर हे मजूर आढळल्यास त्यांना ५०० रूपयांचा दंड तसंच अशा मजूरांचे घराबाहेर असलेले छायाचित्र पुरवणाऱ्यास ५०० रूपयांचे बक्षीस जरंडी ग्रामपंचायतीने जाहीर केलं आहे. **** उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरी जिल्ह्यातील सर्व आस्थापना सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीनच दिवस सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत चालू राहतील. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्या म्हणाल्या - उस्मानाबाद जिल्हामध्येआम्ही असा निर्नय घेतलेला आहे सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी ८ ते १ पर्यत अस्थापन सुरु राहतील आणि हाच नियम मद्यविक्रीत्यांना लागू होणार आहे बाकी इतर दिवसी कुठल्याही प्रकारचे दुकान सुरु राहणार नाही फक्त दुध हे रोज मिळेल मेडिकल शॉप आणि शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये म्हणून खत आणि बियाने यांची दुकाने उघडी राहतील आणि restaurant parcel servicesला सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत आणि संध्याकाळी ७ ते सकाळी ७ कुठल्याही प्रकारचे moment राहणार नाही सलूनचे दुकान बंद राहतील मात्र सलूनचे काम घरी जाऊन देता येईल **** जालना जिल्ह्यातले व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, वकील, अभियंत्यांसह समाजातल्या सर्वसामान्य नागरीक तसंच भाजप कार्यकर्त्यांनी पीएम केअर्स निधीसाठी ६७ लाख १७ हजार ४२२ रुपये तर सीएम मदत निधीसाठी तब्बल सहा लाख दोन हजार रुपये असा एकूण ७३ लाख १९ हजार ४२२ रुपये निधी संकलित केला आहे. हा सर्व निधी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते काल पंतप्रधान तसंच मुख्यमंत्री मदत निधीच्या अधिकृत बॅक खात्यावर जमा करण्यात आला. आमदार संतोष पाटील दानवे यांनी जालना तसंच औरंगाबाद जिल्ह्यात तीन लाख फेसमास्क आणि सॅनिटायझर्सच्या ५० हजार बाटल्यांचं वाटप केलं असून जालना जिल्ह्यात १५ हजार कुटूंबांना अन्नधान्य तसंच जीवनावश्यक वस्तुंचं वाटप केलं आहे. **** मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळानं मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीचा धनादेश काल संस्थेचे सरचिटणीस आमदार सतिश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सुपुर्द केला. **** टाळेबंदीच्या काळात नियोजित विवाह वधुवरांसह दहा जणांच्या उपस्थितीत करण्यास लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी मान्यता दिली आहे. असा विवाह घरातल्या घरात व्हावा, बाहेरच्या जिल्ह्यातून कोणीही या विवाहासाठी येऊ नये, आणि या नियमांचं पालन होत असल्याची, तहसीलदारांनी खात्री करून घ्यावी, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर आपल्या दारी या अभियानाला कालपासून सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत सिल्लोड इथं घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. प्रारंभी नगर परिषद कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. **** नांदेडमध्ये बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातला जूना मोंढा भागातली ठोक दुकानं आज आणि उद्या बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नांदेड होलसेल व्यापारी संघटनेनं दिली आहे. गेल्या दिड महिन्यापासून दररोज किराणा सामानांची होलसेल दुकाने सुरू आहेत. शहरातली सर्व किराणा दुकानात भरपूर माल उपलब्ध असून जनतेनं काळजी करण्याचं कारण नाही, असं व्यापारी संघटनेनं म्हटलं आहे. **** पौराणिक मालिका श्री कृष्णा् आज रात्री नऊ वाजता दूरदर्शनच्या राष्ट्री य चैनलवरून प्रसारित होणार आहे. **** नांदेड जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं वन स्टॉप सेंटर ची स्थापना करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात कुठल्याही महिला अथवा बालकावर कौटुंबिक हिंसाचार होत असल्यास त्यांना त्यापासून संरक्षण आणि मदत मिळावी, यासाठी या सेंटरची स्थापना केली असल्याचं नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेंद्र रोटे यांनी सांगितलं. **** परभणी जिल्ह्यात पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या वतीनं पाथरी इथं नितीन जिनिंग मध्ये काल कापूस खरेदीला आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या ��पस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी कापसाला प्रति क्विंटल ५ हजार ३५५ रूपये भाव मिळाला आहे. पुर्णा इथल्या कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापूस खरेदीला कालपासून सुरुवात झाली. काल २० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. तालुक्यातल्या ६७४ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. **** परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यामधील मानोली शिवारातल्या हातभट्टीवर काल पोलिसांनी छापा टाकाला. यात हातभट्टी तयार करण्याचे ४५ हजार रूपयांचे रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** लातूर जिल्ह्यात बाभळगाव इथं दोन बिबट्यांचा वावर असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी विशेष काळजी घेत सतर्क राहण्याचं आवाहन उस्मानाबाद - लातूर विभागिय वनक्षेत्रपाल गायकर यांनी केलं आहे **** नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या देळूब बुद्रुक इथले शेतकरी आनंदराव लोमटे यांनी आपल्या शेतात टरबूजाची लागवड केली आहे. मात्र टाळेबंदीमुळे टरबूज खरेदीस व्यापारी नसल्यानं नुकसान होत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले - दोन महिन्याच्या अगोदर टरबुजाची करून त्याची लागवड केली होती काही पैसे मिळतील ही अपेक्षा या lockdown कोणी खरेदीदार उरला नाही त्याच्यामुळे बेभाव टरबुज द्यावे लागले आणि त्याची काय पैसे होतील असं वाटत नाही **** परभणी महानगर पालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी संयुक्तपणे प्रभाग क्रमांक ९ मधल्या पशु वैद्यकीय रुग्णालयात आज सकाळी ७ ते १० या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. **** परभणी जिल्ह्यातल्या वसमत रस्त्यावरील एमआयडीसी परिसरात रिकाम्या जागेवर असलेल्या गवताला काल दुपारी मोठी आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित येऊन आग विझविल्यानं कोणताही अनर्थ घडला नाही. आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 April 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि. ****  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागात अटी शर्तींसह दुकानं सुरु करण्याचा राज्यात अद्याप निर्णय नाही- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण  कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवेतल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना जारी  राज्यात ८११ आणखी कोरोना विषाणू बाधित रुग्ण; २२ जणांचा मृत्यू  लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला बळी; औरंगाबाद शहरातही पाच नवे रुग्ण; हिंगोलीत आणखी एक पोलिस दलाचा जवान बाधित आणि  विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय पडताळणी समित्यांचा अहवाल केंद्र सरकारला सादर **** कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागात अटी शर्तींसह दुकानं सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असला, तरीही राज्यात दुकानं उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेतला नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, त्यानंतर ही दुकानं सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं टोपे म्हणाले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, ग्रामीण भागातली दुकानं, ज्या शहरात हॉटस्पॉट नाही अशा रहीवाशी भागातली दुकानं, सुरु करण्यात येणार आहेत. मात्र बाजारपेठेतली दुकानं, मद्य, तंबाखू, गुटखा, सिगारेट यांची दुकानं, मॉल्स, हॉटेल्स, सलून उघडणार नसल्याचं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारं आपल्या अधिकारात दुकानं सुरु ठेवायची की नाही याचा निर्णय घेऊ शकतात, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची दुकानं सध्या तरी सुरु होणार नसल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं निदान करण्यासाठी राज्यात ��तापर्यंत ४० प्रयोगशाळांच्या माध्यमातून एक लाखांवर चाचण्या केल्या आहेत. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक चाचण्या करणारं राज्य ठरलं असल्याचं टोपे यांनी सांगितलं. **** कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दररोज वाढत आहे. महिनाभरापूर्वी देशात टाळेबंदी लागू केली तेव्हा एकूण ६०६ बाधितांपैकी ४३ रुग्ण बरे झाले होते. त्यावेळी हे प्रमाण ७ टक्के होतं. आता देशभरात कोरोनाबाधितांची संख्या २४ हजार ५०६ वर पोचली असून, त्यापैकी ५ हजार ६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यानुसार कोरोना विषाणू मुक्त होणाऱ्यांचं प्रमाण साडे वीस टक्के झालं आहे. तर अरुणाचल प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांमधे एकही रुग्ण नसल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. **** देशातल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीचा आणि उपाययोजनांचा केंद्रीय मंत्रीगटानं काल आढावा घेतला. देशात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी नऊ दिवसांपेक्षा जास्त वाढला असल्याची माहिती देण्यात आली. देशात एकशे चार कारखान्यांमध्ये दररोज एक लाख पीपीई किट तयार होत असल्याचं तसचं याच प्रमाणात मास्क तयार होत असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं. कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी देशभरात एक कोटी २४ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचा डाटा तयार केला असून त्यातल्या १० लाख लोकांना प्रशिक्षण दिलं असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. **** कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कार्य करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतल्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना या आजाराचा संसर्ग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मास्क आणि हातमोज घालणं अनिवार्य असून, प्रत्येक कार्यालयात साबण, हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं. कार्यालयात आल्यावर काम सुरु करण्यापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुवून हातमोजे घालावे, तोंडाला स्पर्श करु नये, दोन कर्मचाऱ्यांमध्ये कमीत कमी एक मीटरचं अंतर असावं, प्रत्येक विभागानं कर्मचाऱ्यांना संरक्षण साहित्याच्या किटचं वाटप करावं, असे निर्देश या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्य सरकारनं दिले आहेत. कर्मचाऱ्यांनी चेहरा, डोळे, नाक, आणि तोंडाला स्पर्श करू नये, हातमोजे खिशात ठेऊ नये, दरवाजाचे हॅण्डल प्रत्येक दोन ते तासांनी सॅनिटायझरने विषाणूरहित करावे, मोबाईल दूरध्वनीवर बोलताना चेहऱ्याशी संपर्क टाळण्यासाठी स्पीकर मोडचा वापर करावा, कार्यालयात स्नानाची व्यवस्था नसल्यास घरी गेल्यानंतर तात्काळ साबणीचा वापर करून स्नान करावे, स्वच्छता, आरोग्य आणि पोलिस खात्यातल्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक संरक्षक उपकरणाचा वापर करावा, एकमेकांचे मोबाईल, हातरूमाल, पाण्याची बॉटल, चष्मा यासारख्या वस्तू वापरू नयेत असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. **** राज्यात काल ८११ आणखी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण ���ुग्णांचा आकडा सात हजार ६२८ झाला आहे. काल या आजारानं २२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३२३ कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. तर काल दिवसभरात ११९ जण या आजारातून बरे होऊन घरी परतले असून, कोरोना विषाणू मुक्त झालेल्यांची संख्या एक हजार ७६ आहे. **** लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला बळी गेला आहे. उदगीर इथं काल एका ७० वर्षीय कोरोना विषाणू बाधित महिलेचा मृत्यू झाला असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी सांगितलं. ही महिला विषाणू बाधित असल्याचा अहवाल काल दुपारीच आला होता. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार असलेल्या या महिलेला प्रकृती खालावल्यानं काल अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं, असं ते म्हणाले. **** औरंगाबाद शहरातही काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामुळे औरंगाबाद शहरातल्या एकूण रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असली, तरी २२ जण आतापर्यंत या आजारातून मुक्त झाले आहेत. काल शहरात आढळलेल्या पाच रूग्णांमध्ये शहरातल्या हिलाल कॉलनीतल्या एकाच घरातील तीन महिलांचा समावेश आहे, टाऊन हॉल परीसरातील एक तर अन्य एकजण हा किलेअर्क भागातल्या रहिवाशी आहे. सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयात १८, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत चार अशा एकूण २२ कोरोना विषाणूबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत आढळलेले कोरोना विषाणू बाधित सर्व रूग्ण हे बाधितांच्या एकमेकांच्या संपर्कातले आणि त्यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे या आजाराचे शहरात रूग्ण जरी वाढत असले तरी प्रादुर्भाव मात्र मर्यादित स्वरूपात आहे. रविकुमार कांबळे, आकाशवाणी, औरंगाबाद **** राज्य राखीव पोलिस दलाचा आणखी एक जवान कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळूल आलं आहे. हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या जवानांसोबत मालेगावहून आलेला हा जवान जालन्यात उतरला होता. त्यानंतर तो हिंगोली तालुक्यातल्या हिवरा बेल या आपल्या गावी गेला होता. हिंगोलीतल्या काही जवान बाधित असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांच्यासोबतच्या सर्व जवानांची चाचणी करण्यात आली, यात गावी आलेल्या या जवानाचीही चाचणी करण्यात आली आहे. विषाणू बाधित असल्याचं आढळल्यानंतर या जवानाच्या संपर्कात आलेल्या ४६ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, यापूर्वी आढळलेल्या कोरोना विषाणू बाधित सहा जवानांच्या संपर्कातल्या काही जवानांना एस आर पी एफ कॅम्पमध्ये तर काहींना तिरुमला मंगल कार्यालयात विलगीकरणात ठेवलं आहे. हिंगोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत काल एस आर पी एफ परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आलं. **** नांदेड शहरातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यानं त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. **** परभणी शहरातल्या एकमेव कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा उपचारानंतरचा दुसरा अहवाल नकारात्मक आला आहे. त्याची आणखी एकदा तपासणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. **** नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्ये काल आणखी आठ जणांना कोरोना विषाणुची लागण झाल्यानं मालेगावमधल्या रुग्णांची संख़्या आता १२४ झाली आहे. **** वाशिम जिल्ह्यात आढळलेला एकमेव कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरा झाला आहे. या रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला काल रुग्णालयातून सुटी ��ेण्यात आली. **** राज्याच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या स्वच्छाग्रहींसाठी हातमोजे, सॅनिटायझर तसंच मास्क खरेदीसाठी एकूण दोन कोटी ७० लाख रुपयांचा निधी जागतिक बँक प्रोत्साहन अनुदानाअंतर्गत देण्यात आला आहे. या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. या वस्तू वाटप करण्यासाठी ग्रामपंचायतींची निवड करताना कोविड-१९ या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या ग्रामपंचायतीबरोबरच त्यांच्या नजिकच्या ग्रामपंचायतींची निवड करावी, असं ते म्हणाले. **** टाळेबंदीच्या काळात मद्याची दुकानं सुरु करु नये, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मद्याची दुकानं बंद असल्यानं अनेकांचं व्यसन सुटलं असून, पुन्हा ही दुकानं सुरु करण्याचा निर्णय अन्यायकारक ठरेल, असं आठवले यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महसूल वाढीसाठी मद्याची दुकानं सुरु करण्याची मागणी केली आहे, मात्र आठवले यांनी याला विरोध केला आहे. **** स्वस्त धान्य दुकानात तांदळासोबत डाळही उपलब्ध करुन देण्याचा विचार सरकार करत असल्याचं अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये एकही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी सरकार शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य उपलब्ध करुन देत आहे. **** केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना- मनरेगा आणि राज्याच्या रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागातल्या विकास कामांना गती देऊन अकुशल कामगारांच्या रोजंदारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यापक काम करता येईल, असं रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र तोमर यांनी काल विविध राज्यातल्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागातल्या विकास कामांना खीळ बसू नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा केली, त्यावेळी भुमरे यांनी ही मागणी केली. **** बँक उद्योगाला देण्यात आलेला सार्वजनिक उपयुक्तता सेवेचा दर्जा २१ ऑक्टोबरपर्यंत राहणार असून या काळात त्याला औद्योगिक विवाद कायद्याच्या तरतुदी लागू राहतील असं कामगार मंत्रालयांनं घोषित केलं आहे. परिणामी या काळात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा संप करता येणार नाही. आर्थिक घडामोडींवर कोरोना विषाणू उद्रेकाचा होत असलेला गंभीर परिणाम लक्षात घेऊन ही तरतूद करण्यात आली आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ६४ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** लातूर महानगरपालिकेनं शहरात ��्रवेश करणारे जवळपास ३० रस्ते बंदिस्त केले आहेत. लातूर शहरात कोरोना विषाणूची लागण झालेली नसली तरीही खबरदारी म्हणून शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्याच्या सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार हे रस्ते बंद करून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. लातूर जिल्ह्याच्या सीमाही पूर्णपणे बंद करुन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत. **** नांदेड शहरात टँकरच्या टाकीत बसून आलेल्या १८ जणांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. आंध्र प्रदेशातले हे नागरिक जालन्याहून निघाले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. **** परभणीत दोन दिवसांच्या संचारबंदीनतर काल सकाळी अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. किराणा तसंच भाजीपाला घेण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचं दिसून आलं. या काळात परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर राखण्यातं आलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** नांदेड जिल्ह्याच्या किनवट- माहूर सारख्या दुर्गम आदिवासी भागात कोरोना विषाणू संसर्गा विरूध्द लढण्यासाठी प्रशासनानं विविध उपाय योजना केल्या आहेत. याविषयी माहिती देताना सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले……. प्रत्येक गावामध्ये सुद्धा एक-एक अंटी कोरोना टिम नोडल अधिकारी अंतर्गत बनवलेली आहे. आज दोन्ही केंद्रांमध्ये माहूर मध्ये मिळून जवळपास सहा हजार लोकांना आपण होमक्वांरनटाईन केले आहे. या भागामध्ये काही एक कोरोनाचा पेशंन्ट आला नाही किंवा संक्रमण सुद्धा झाले नाही. सर्व बॉर्डर सिल केलं आहे , ३-४ चेक पांईट केलेल आहे. त्याच्यात पोलिस आणि फोरेस���टचे लोक आपण लावलेले आहेत. दहा-दहा लोकांची एक वेगळी टिम तयार केली आहे. त्याला आपण लोकल टिम्स म्हणू. त्याच्या मध्ये आपण काही युवकांची, काही व्हेलंटीअर घेतलेले आहे. त्यांचे काम आहे की बॉर्डर वरून कोणी माणूस इकडे आला तर त्याला गावामध्ये स्टॉप करणार आणि त्यांना येथे येण्याचा जो संपर्क आहे तो थोडासा थांबणार. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे यांनी कालपासून मदत नव्हे कर्तव्य' या उपक्रमांतर्गत स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीनं ३५ गावातल्या गरजुंना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य किट वाटपाचा शुभारंभ केला. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या वतीनं नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघा��ल्या महापालिकेच्या रूग्णालयातल्या परिचारिका, अंगणवाडी सेविका यांना आमदार हंबर्डे आणि आमदार अमरनाथ राजूर��र यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं. **** नांदेड इथं परशुराम ब्राम्हण कर्मचारी महासंघाच्या वतीनं २५० गरजु कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचं तर हिंगोलीच्या विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीनं २५० गरजुंना अन्नधान्याच्या किटचं वाटप करण्यात आलं. **** परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरात सर्व दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तुंचे भावफलक आपल्या दुकानासमोर लावले आहेत. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हे आदेश दिले होते. जे दुकानदार भावफलक लावणार नाही, त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा पारधी यांनी दिला आहे. **** हिंगोलीच्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थाननं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून पाच लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा धनादेश अप्पर निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला. **** नांदेड जिल्ह्यात धर्माबादचे उद्योगपती सुबोध काकाणी हे गेल्या एक महिन्यापासून गरजुंना २० ते २२ हजार अन्नाची पाकिटं वाटप करत आहेत. या सेवेत गावातले नागरिकही सहभागी झाले आहेत. **** टाळेबंदीच्या काळात औरंगाबाद शहरात शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम कृषी विभागानं सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत झाली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी टाळेबंदीत शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन येत कृषी विभागानं शेतकरी तसंच शेतकरी गटामार्फत २९ मार्चपासून आतापर्यंत 96 लाख 87 हजार रूपयांचा भाजीपाला आणि फळ विक्री केली आहे. दीड लाख किलोग्रॅम भाजीपाला तर जवळपास अडीच लाख किलोग्रॅम फळांची विक्री याकाळात करण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण ६४ शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन शहरातल्या विविध भागातल्या ग्राहकांच्या थेट दारापर्यंत हा भाजीपाला आणि फळं पोहाचवली. या उपक्रमामध्ये मध्यस्थ कोणीच नसल्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही याचा मोठा लाभ झाला. रवीकुमार कांबळे, आकाशवाणी औरंगाबाद **** टाळेबंदीमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं नेमलेल्या दोन समित्यांनी काल आपापले अहवाल केंद्र सरकारला सादर केले. देशातल्या उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांचं आगामी शैक्षणिक वर्ष जुलै ऐवजी सप्टेंबर पासून सुरु करावं अशी शिफारस एका समितीनं केली आहे, तर आवश्यक पायाभूत सुविधा असतील तर विद्यापीठांनी टाळेबंदी संपण्याची वाट न पाहता ऑनलाईन परीक्षा घ्यायला हरकत नाही, असं दुसऱ्या समितीनं आपल्या शिफारशीत म्हटलं आहे. या शिफारशींचा अभ्यास करुन दिशानिर्देश जारी होतील, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं. **** जालना जिल्हा रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा काल मृत्यू झाला. एकाच दिवशी ठराविक अंतरानं तीन मृत्यू झाल्यामुळे मृतांचे नातेवाईक आक्रमक झाल्यानं जिल्हा रुग्णालयात काही काळ तणाव निर्म��ण झाला होता. मेंदूज्वर, मुत्रपिंड विकार आणि कर्करोग आदी आजार असलेले हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या तिन्ही रुग्णांचे मृत्यू कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेले नाहीत, तरीही खबरदारी म्हणून त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितलं. **** महात्मा बसवेश्वर जयंती आज साजरी होत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लिंगायत समाजाने घरात राहुनच जयंती साजरी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन लातूरचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केलं आहे. लातूर महानगरपालिका प्रथेप्रमाणे बसवेश्वर जयंती साजरी करणार असल्याचं ते म्हणाले. **** नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीत दररोज हळदीची मोठी आवक होत आहे. काल नांदेडच्या बाजारात तीन हजार पोते हळद आवक झाली तर भोकरच्या बाजारातही हळद खरेदीला दोन दिवसापासून सुरूवात झाली आहे. हळदीला काल पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद विकण्याची घाई न करता आवश्यकतेनुसार टप्प्या टप्प्यानं हाळद विक्री करावी असं आवाहन शेतकरी नेते शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केलं आहे. सध्या हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक असल्यानं भाव कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी टाळेबंदी उठेपर्यंत संयम ठेऊन हळद विक्री करावी, असं त्यांनी म्हटलं आहे. **** परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात रमजानच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी संचारबंदीतून सूट देऊन फळांची दुकानं सुरु करावी अशी मागणी जमियत ए उलेमा ए हिंद च्यावतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. **** परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातल्या पेठशिवणी इथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरु असलेलं काम बंद करण्यात आलं असून, हे काम सुरु करुन पावसाळ्या अगोदर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. **** परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काल जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. डास अळी उत्पती झाल्यास हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया त्यादी आजाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे जनतेनं खरबरदारी घ्यावी असं आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख माजीद शेख यांनी केलं. नांदेडमध्येही जिल्हा हिवताप कार्यालयात हिवतापाचे संशोधक सर रोनॉल्ड रॉस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामाजिक अंतर पाळून हिवताप दिन साजरा करण्यात आला. **** मुंबईतल्या एका विशेष न्यायालयानं एल्गार परिषद - माओवाद्यांशी संबंधांप्रकरणी काल नागरी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांचा अ��तरीम जामीन अर्ज फेटाळताना त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यांनी कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमीवर तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. आपण श्र्वसनासंबंधी विकारानं ग्रस्त असून तुरुंगात कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा धोका असल्यानं जामीन मिळावा, असं तेलतुंबडे यांनी आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं. **** अहमदनगरमध्ये बेकायदेशिररित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांना पारनेर इथल्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. दिल्लीच्या मरकजसाठी आलेले हे २६ परदेशी नागरिक कायद्याचं उल्लंघन करून अहमदनगरमध्ये राहत होते. **** नाशिक शहरातल्���ा भद्रकाली परिसरात असलेल्या भीमवाडी सहकार नगर परिसरातल्या झोपडपट्टीला काल सकाळी लागलेल्या आगीत सुमारे दिडशे झोपड्या खाक झाल्या. अग्नीशमन दलाचे एक जवान आग विझवताना जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. घरगुती उपयोगाच्या सातपेक्षा अधिक सिलेंडरचा या आगीत स्फोट झाल्यामुळे आगीनं भीषण रुप धारण केलं होतं. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 April 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १३ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि. ****  दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण विषयाची परीक्षा रद्द; नववी आणि अकरावीची परीक्षा होणार नाही  कोरोना विषाणूबाधित जिल्ह्यांची तीन भागात विभागणी; मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर औरंगाबाद, रेड झोनमध्ये, बीड, उस्मानाबाद, जालना, हिंगोली आणि लातूर ऑरेंज झोनमध्ये तर परभणी आणि नांदेड, ग्रीन झोनमध्ये  राज्यात आणखी २२१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले; दिवसभरात २५ रूग्णांचा मृत्यू आणि  औरंगाबाद जिल्ह्यात शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा मृत्यू **** राज्यातली संचारबंदी येत्या ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या भूगोल आणि कार्यशिक्षण विषयाची तसंच इयत्ता नववी आणि अकरावीचीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल सांगितलं. याविषयी माहिती देतांना त्या म्हणाल्या - पहिला निर्णय आम्ही असा घेत आहोत की, इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या दुसऱ्या सत्रामधील परिक्षा न घेता, पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या व त्याची प्रात्याक्षिके व अत्यंर्गत मुल्यमापन करून त्यांचे वर्गउनंती म्हणजे पुढच्या वर्षांमध्ये पाठवण्यासंदर्भामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यावेतिरिक्त दुसरा निर्णय जो आहे. इयत्ता दहावी याचा भुगोल व कार्यशिक्षण या दोन्ही विषयीच्या संदर्भात आहेत जी परिक्षा रद्द करण्यात येत आहे. आणि हे रद्द करत असतांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसार सुध्दा या विद्यार्थ्यांचा गुणा बाबत नजर मंडळाने कारवाई करायचे आहे. आणि यासंदर्भात सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत. **** राज्य सरकारनं कोरोना विषाणूबाधित जिल्ह्यांची प्रादुर्भावानुसार तीन भागात विभागणी केली आहे. जिल्हावार रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन असं हे विभाजन करण्यात आलं आहे. १५ पेक्षा अधिक रूग्ण असलेला जिल्हा रेड, १५ पेक्षा कमी रूग्ण असलेला जिल्हा ऑरेंज तर एकही रूग्ण नसलेला जिल्हा ग्रीन झोनमध्ये गणन्यात आला आहे. यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरसह औरंगाबाद, रायगड, पालघर आणि सांगली जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. ऑरेंज झोनमध्ये मराठवाड्यातल्या बीड, उस्मानाबाद, जालना, हिंगोली आणि लातूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, जळगांव, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, गोंदिया आणि नाशिक हे जिल्हे आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत, अशा धुळे, नंदूरबार, सोलापूर, वर्धा, परभणी, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या झोन नुसार रेड आणि ऑरेंज झोनमधली टाळेबंदीचे निर्बंध आणखी कडक केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. **** राज्यात काल आणखी २२१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यात रूग्णांची एकूण संख्या १९८२ एवढी झाली आहे. सध्या एक हजार ६१६ रूग्णांवर उपचार सुरू असून २१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल दिवसभरात एकूण २५ रूग्णांचा मृत्यू झाला. यापैकी १६ जण मुंबईतले आहेत. तिघेजण पुणे तर सोलापूर आणि नवी मुंबईतल्या प्रत्येकी एक जणाचा मृत्यू झाला. दिल्लीतल्या निजामुद्दीनच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातल्या ७५५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३७ जण कोरोना विषाणू बाधित आढळले आहेत. यात लातूर ८, यवतमाळ ७, बुलढाणा ६, मुंबई ३, पुणे २, पिंपरी चिंचवड २, अहमदनगर २, तर रत्नागिरी, नागपूर मनपा, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. या रूग्णांच्या निकट संपर्कात आलेले अहमदनगर इथं ६ तर पिंपरी चिंचवडमध्ये १ जण बाधित आढळला आहे. **** औरंगाबादच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात काल १३० कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०६ जणांना घरीच अलगीकरणात राहण्याचं सांगण्यात आलं आहे. एकूण १०२ जणांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. **** जालना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात काल पाच नवीन कोरोना संशयित रुग्ण भरती झाले. त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून विलगीकरण कक्षात सध्या ११८ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. बीड जिल्ह्यात आणखीन एक संशयित कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळला आहे. त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. **** परभणी इथल्या जिल्हा रुग्णालयात कालपर्यंत ३२० रुग्णांची नोंद झाली असून २४८ जणांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले. त्यापैकी २४४ जणांचे अहवाल नकारात्मक आले असून उर्वरित अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान १३० जणांचं घरी विलगीकरण करण्यात आलं आहे. तर रुग्णालयातील संसर्ग सुरक्षा कक्षात २० जणांवर उपचार करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर, आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी सांगितलं आहे. **** लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत काल २६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यातील संशयीत तीन व्यक्तींचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आजपर्यंत ५६ व्यक्तींचा विलगीकरण कालावधी समाप्त झाला आहे तर सध्या ८७ व्यक्तींना घरातच विलगीकरण करून ठेवण्यात आलं आहे. **** नवी मुंबईत काल ४ रूग्ण आढळून आले असून नवी मुंबईत आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता ३��� झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या नेरूळ इथल्या ६८ वर्षिय नागरिकाचा काल मृत्यू झाला. **** पनवेल परिसरात काल कोरोना विषाणूची लागण झालेले ६ रूग्ण आढळून आले आहेत. पनवेल मध्ये आतापर्यंत २८ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. **** मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची 'रॅपिड टेस्ट' आरोग्य तपासणी करण्यात येणार असून आजपासून या तपासणीला सुरुवात करण्यात येणार आहे. या अंतर्गत पालिकेतील ८० हजार कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मुंबईत पसरत चाललेल्या कोरोना संसर्गामुळे पालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या आरोग्य आणि सफाई विभागातील कर्मचाऱ्यांची तपासणी पासून याला सुरुवात करण्यात येणार आहे. **** कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाला टाळेबंदीचा काळ वाढवावा लागला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये राज्यातल्या कष्टकरी, स्थलांतरित मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करू नये. आहे तिथंच राहावं, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. सर्वांची राहण्याची सोय आणि पुरेसं अन्न देण्याची व्यवस्था शासनानं केली असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. **** राज्यभरात काल बेकायदेशिर मद्य विक्रीचे १०२ गुन्हे नोंदवण्यात आले असून ४६ लोकांना अटक करण्यात आली आहे, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनं सांगितलं. याशिवाय आठ वाहने आणि १६ लाख, ३४ हजार रूपयांचं मद्यही जप्त करण्यात आलं असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. टाळेबंदीच्या काळात बेकायदेशिर मद्यविक्रीचे आतापर्यंत दोन हजार ,३८३ गुन्हे नोंदवण्यात आले असून ९३७ जणांना अटक करण्यात आली आहे. **** राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीत योगदानाचा ओघ सुरू असून आतापर्यंत या कोषात १९७ कोटी रूपये जमा झाले आहेत. या सर्व देणगीदारांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. या निधीत ८३ वेगवेगळ्या दानशूर घटकांनी प्रत्येकी २५ लाखांहून अधिक रकमेचं योगदान दिलं आहे. **** दिल्ली शहराला काल सायंकाळी पावणे सहा वाजता भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का बसला. भूकंप मापकावर या धक्क्याची ३.५ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर आले. भूकंपाचा केंद्रबिंदू ईशान्य दिल्लीतल्या वजिराबाद भागात ८ किलोमीटर खोल होता, असं राष्ट्रीय भूकंपशास्त्र विभागाचे प्रमुख जे. एल. गौतम यांनी सांगितलं. दिल्लीलगतच्या नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २६ तारखेला आकाशवाणी वरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ६४ वा भाग असेल. या भागासाठी जनतेनं विषय सुचवण्याचं आवाहन मोदी यांनी ट्विटरद्वारे केलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. औरंगाबाद इथं श्वसनासंबंधीचा विषाणूजन्य तीव्र आजार अर्थात सारीनं बाधि�� रुग्णांची संख्या काल अकरानं वाढून १८० झाली आहे. महापालिका जनसंपर्क विभागानं ही माहिती दिली. खाजगी रुग्णालयांत ९९ तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय –रुग्णालयात ८१ जण उपचार घेत आहेत. **** कोरोना विषाणूच्या संकटात टाळेबंदीमध्ये अडचणीत सापडलेल्या गरजूंना जेवण, अन्नधान्य किंवा वस्तूची मदत करताना छायाचित्र काढण्यास, व्हिडिओ चित्रीकरण करण्यास, आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यास लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मनाई केली आहे. यामध्ये सामाजिक अंतर पाळलं जात नसून, असे फोटो समाजमाध्यमांवर टाकल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे. यामध्ये गरजवंतांची चेष्टा होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. **** नांदेड जिल्ह्यात टाळेबंदीच्या काळात विविध स्वयंसेवी संस्था तसंच दानशूर व्यक्ती गरजू लोकांना जेवण आणि अन्न धान्य वाटप करीत आहेत. धान्य वाटपात सुसुत्रता आणण्यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहीती जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिली. नगरपालिका तसंच गाव पातळीवर अनुक्रमे मुख्याधिकारी आणि ग्रामसेवक तर महापालिका क्षेत्रात आयुक्तांच्या अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी यांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे धान्य वाटप करताना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करून धान्य वितरण करणाऱ्या व्यक्ती आणि लाभार्थी यांना मास्क असणे आवश्यक करण्यात आले असल्याचंही ईटनकर यांनी सांगितलं. **** जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी टेलिमेडिसीन ॲपद्वारे घरातूनच थेट व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांशी संपर्क साधून ऑनलाईन तपासणी आणि उपचार करण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. नागरिकांना जालना शहर आणि जिल्ह्यातल्या शासकीय, तसंच खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे. या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर..... गूगल प्ले स्टोर वरून मॅड ऑन गो स्मार्ट हेल्थ हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केलं तर जालन्यातल्या लोकांना घरी बसून आपली कोरोनाची संभाव्यता तपासता येणार आहेत. सोबतच थेट व्हिडिओ कॉल करून उपलब्ध तज्ज्ञ डॉक्टरांकडून ते मोफत तपासणी करून घेऊ शकतात. या नवीन सुविधेमुळे घरबसल्या तसेच खासगी क्षेत्रातील डॉक्टरांशी संवाद साधून उपचार घेता येणार असल्याने ही सुविधा मोलाची ठरणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या या अभिनव प्रयोगाला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तर संपूर्ण राज्यात ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आकाशवाणी भाषांसाठी बाबासाहेब मस्के जालना. **** कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात नाकातोंडावर आवरण – मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं असून या नियमाचं उल्लंघन केलेल्या ९२ जणांकडून काल ४६ हजार रूपयांची वसुली करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त ��स्तिक कुमार पांडेय यांनी सांगितलं. नियमभंग करणाऱ्याला पाचशे रूपयांचा दंड आकारण्यात येत आहे. टाळेबंदीचा नियम न पाळणाऱ्यांविरूद्ध गुन्हे नोंदवण्यात येतील, असंही पांडेय यांन यावेळी सांगितलं. **** उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीचे महंत तुकोजीबुवा यांच्यासह सात जणांविरूद्ध जमावबंदी नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंत तुकोजीबुवा यांनी आपला वाढदिवस जमावबंदी नियमाचं उल्लंघन करून, मास्क न घालता, पुरेसं सामाजिक अंतर न ठेवता, साजरा केला होता. **** कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या संचारबंदी मुळे हातावर पोट असणाऱ्या मजुर कुटुंबियांची होणारी उपासमार आणि गैरसोय रोखण्यासाठी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि उस्मानाबाद जिल्हा परिषद यांच्या वतीनं जिल्ह्यातल्या पंधरा हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंच्या संचाचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे. **** औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृतीसाठी एक ई-पुस्तिका तयार केली आहे. यामध्ये कोरोना विरुद्धचं युद्धतंत्र, साक्षरता, दक्षता आणि जनजागरण या बाबींचा समावेश आहे. कोरोनाच्या साथीसंदर्भात महत्वपूर्ण माहिती या ३२ ���ानी पुस्तिकेद्वारे देण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी ही पुस्तिका तयार करत आहेत. **** कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदीची मुदत वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी - पीपीएफ, आवर्ती डिपॉझिट - आरडी आणि सुकन्या समृद्धी योजना खातेधारकांसाठी किमान ठेव जमा करण्याची अंतिम मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढवली आहे. अर्थ मंत्रालयानं ट्विटरवरून याबद्दल माहिती दिली, त्यामुळे नागरिकांना आता ही ठेव जमा करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. **** कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोली नगर परिषदेचे सफाई कर्मचारी मेहनत घेत आहेत. या सफाई कर्मचाऱ्यांना टाळेबंदीच्या काळात मदत म्हणून मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाच्या वेतनातून सफाई कर्मचाऱ्यांना अन्नधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे हिंगोलीचे वार्ताहर रमेश कदम - नगरपरिषदेच्या ७७ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मदतीसाठी दिला आहे. एक लाख पाच हजार आठशे तेवीस रुपये एक दिवसाच्या वेतनातून व स्वइच्छिने दिलेले ४५००० हजार रूपये. अशी दिड लाखाची रूक्कम ही जमा झाली आहे. या रक्कमेतून स्वच्छतेची जबाबदारी साभांळणाऱ्या स्वच्छता कर्मचारी व आश्या वर्कर अशा एकूण एकशे शहात्त�� गरजू कामगारांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. **** परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातल्या वस्त्र आणि परिधान अभिकल्पना विभागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन लागणाऱ्या मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर मास्कची निर्मिती करण्यात येत असून ४० रुपये प्रती नग याप्रमाणे हे मास्क उपलब्ध करण्यात आले आहेत. **** परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या रक्तदान कार्यक्रमात काल ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केलं. गेल्या २९ मार्चपासून शिस्तबद्ध रितीनं सुरू असलेल्या या रक्तदान शिबिरात शहर आणि ग्रामीण भागातून दररोज रक्त संकलीत करण्यात येत आहे. **** नवनिर्वाचित खासदार राजीव सातव यांच्या मार्गदर्शनात परभणी इथं सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी कोरोना आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या, शिधा कार्ड नसलेल्या ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचं वाटप केलं. यामध्ये १० किलो पीठ, ५ किलो तांदूळ, १ किलो तुरीची डाळ, १ लिटर गोडेतेल, १ किलो मीठासहीत कांदा-मिरची मसाला याचा समावेश आहे. ***** परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर जिल्हा परिषदेचे सदस्य राम पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत ३०० गरजु कुटुंबियांना काल सेलू इथं जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केलं. त्यांनी विविध भागांतल्या ३०० कुटुंबियांना पंधरा दिवस पुरेल इतक्या किराणा मालाचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. **** राज्यात टाळेबंदीत जरी ३० एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यात काही प्रमाणात शिथिलता देण्याचे संकेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. ते म्हणाले - जरी तीस तारखेपर्यंत लॉक डाऊन झालेल असलं, तरी मला असं वाटत की या जिल्ह्यातले काही व्यवहार एक पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही हळूहळू सुरू करण्याच्या मनस्तिती मध्ये आहोत. म्हणजे लॉक डाऊन किंवा दुकाने आम्ही उघडणार आहोत अशातला काही भाग नाही. काही विकासाचे कामे आम्ही सुरू करू. काही सिचंणाचे प्रकल्प आहेते ते सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करू. अत्यावश्यक ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी आहेत त्या आजून मोठ्या पद्धतीने सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करू. **** परभणीचे जिल्हाधिकारी दि.म. मुगळीकर यांनी काल जिल्ह्यातल्या पाथरी आणि मानवत इथल्या ग्रामीण रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विलगीकरणात असलेल्या रुग्णांची व्यक्तीशः विचारपूस करून संबंधित अधिकाऱ्यांकडून औषधी साठा, साहित्य, उपकरणं आणि मनुष्यबळ या बाबत सविस्तर आढावा घेतला. **** कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबियांसोबत घरातच जयंती साजरी कराण्याचं आवाहन पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलं आहे. देशातील नागरिकांच्या आरोग्यासाठी, आपल्या हितासाठी संचारबंदी या कायद्याचा अंमल केला आहे. त्याचे कोणालाही, कोणत्याही स्थतीत उल्लंघन करता येणार नाही त्यामुळे एकहीजण घराबाहेर पडणार नाही याची दक्षता प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी, असंही बनसोडे यांनी म्हटलं आहे. अशाच स्वरूपाचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केलं आहे. भीमजयंतीच्या दिवशी अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्याचा, बुद्ध विहारात एकत्रित जमण्याचा, तसंच अनेक तास अभ्यास करण्याचा संकल्प सोडला जातो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत खबरदारी म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या विहामांडवा इथं एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वडील, मुलगा आणि तीन पुतणे असे सर्व जण एकाच कुटुंबातले होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. **** गेल्या दोन वर्षांपासून पैठण तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ग्रामस्थ, पोलीस आणि वन विभागानं तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर काल पैठण तालुक्यातल्या थेरगाव शिवारात जेरबंद केलं. या बिबट्यास पकडताना त्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून यांत एक पोलिस अधिकारी, एक पत्रकार, दोन शेतकरी आणि दोन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. **** परभणी जिल्हा परिषेदेच्या माजी सभापती राधाबाई सुर्यवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून साकारलेला सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा इथला बंधारा भर उन्हाळ्यातही पाटाच्या पाण्यामुळे तुडूंब भरला आहे. या बंधाऱ्यात माजलगाव उजव्या कालव्यातलं पाटाचं पाणी आलं आहे. बंधाऱ्यात साठलेलं पाणी पाहुन शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होतांना दिसत आहे. **** लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील पिंपरी इथं केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजना कार्ड धारक तसेच अंत्योदय कार्ड लाभार्थी धारकांना स्वस्त धान्य दुकानामार्फत मिळणाऱ्या मोफत तांदूळ योजनेची सुरूवात काल जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ किलो मोफत तांदूळ वाटप करण्यात आले. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग आणि जळकोट परिसरात काल सायंकाळी वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला तर उमरगा तालुक्यात अलुर बेळंब इथं गारांचा पाउस झाला. यामुळं आंबा, द्राक्षं तसंच पपईच्या फळबागांसह ज्वारी, गहू, हरभरा या पीकांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझीम पाऊस झाला. आष्टी तालुक्यात टाकळी आमिया भागात वादळी वाऱ्यासह तासभर जोरदार गारांचा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीमध्ये रिमझिम पाऊस तर रात्री उशिरा ��ातारा शहरातही पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात येत्या पाच दिवसात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. **** नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथं एका दुचाकीवरून गुटखा घेऊन जातांना एक जणाना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख १२ हजार ६९८ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. **** क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नांदेड शहरातील तरोडा बुद्रुक भागाच्या महसुल कॉलनीत आज सकाळी १० ते ३ या वेळात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. युवकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांच्यावतीनं करण्यात आलं आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 April 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि. ****  सरकारी तसंच खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी मोफत करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याची अनेक राज्यांची पंतप्रधानांकडे मागणी  राज्यात कोरोना विषाणूमुळे आणखी आठ जणांचा मृत्यू; औरंगाबादेत तीन तर बीडमध्येही एक रूग्ण आढळला  परिचर्या प्रशिक्षित नागरिकांनी वैद्यकीय सेवेसाठी पुढे येण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन  राज्य कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण आणि  औरंगाबाद शहरात संध्याकाळी सात ते रात्री ११ वाजेपर्यंत वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद **** सरकारी तसंच खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी मोफत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. खासगी प्रयोगशाळा मनमानी करत जास्तीची रक्कम घेत असल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. डॉक्टरांना पी पी ई किट देण्याच्या मागणीसाठी दाखल तीन याचिकांवर काल सुनावणी करताना न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या पीठानं, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी योद्ध्याप्रमाणे काम करत असून, त्यांचं रक्षण करणं आवश्यक असल्याचंही नमूद केलं. डॉक्टरांना वैयक्तिक संरक्षक उपकरण आणि अन्य सुविधा देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं सराकरनं सांगितलं. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून लोकसभा तसंच राज्यसभेतल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याची मागणी अनेक राज्यांनी केली आहे, त्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक नेत्यांनी आपल्या राज्यासाठी मदत वाढवून मागितली, तर अनेक नेत्यांनी या बैठकीतही टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. या बैठकीत राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झाले होते. टाळेबंदीचा कालावधी वाढण्याची शक्यता आझाद यांनी या बैठकीनंतर व्यक्त केली. दरम्यान, पंतप्रधान येत्या शनिवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या वेळी, कोरोना विषाणू प्रादुर्भाव, प्रतिबंध आणि उपचारांसोबतच टाळेबंदीच्या मुदतीसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. **** राज्यात काल कोरोना विषाणूचे आणखी ११७ रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा एक हजार १३५ झाला आहे. तर काल या आजारानं राज्यात आठ जणांचा मृत्यू झाला. **** औरंगाबाद इथं काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या १७ झाली आहे. हे तिन्ही रूग्ण अगोदर बाधित असलेल्या रूग्णांचे नातेवाईक आणि संपर्कात आलेले रूग्ण आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयात काल कोरोना विषाणूची बाधा झाल्यासारखी लक्षणं आढळलेले नवीन आठ रूग्ण भरती झाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान, औरंगाबाद इथं काल १५५ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६३ जणांना घरीच विलगीकरण करण्यात आलं असून, ८८ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात पिंपळा इथंही एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी ही माहिती दिली. आष्टी तालुक्यातले दोघे जण अहमदनगर इथं जमातीसाठी गेले होते, या दोघांनी २३ मार्चपासून अहमदनगरमध्ये एका मशिदीमध्ये मुक्काम केला होता, अशी माहिती समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी हे दोघे बीड जिल्ह्यात दाखल झाले, आरोग्य प्रशासनाने अहमदनगरमधूनच त्यांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, यातील एक जणांचा अहवाल हा सकारात्मक आला असून अन्य एकाचा अहवाल प्रतिक्षेत आहे. दरम्यान या दोघांच्या संपर्कात आलेल्या तीन जणांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. **** यवतमाळ इथं काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यापैकी सात जण दुसऱ्या राज्यातले असून एक जण यवतमाळ जिल्ह्यातला आहे. सात जणांपैकी चार उत्तर प्रदेशचे, दोन पश्चिम बंगालचे तर एक दिल्लीचा आहे. हे सातही जण तब्लिगी जमातशी निगडीत आहेत. तर सकारात्मक असलेला आठवा व्यक्ति या सात जणांच्या संपर्कात आला होता. **** परिचर्या प्रशिक्षित नागरिकांनी वैद्यकीय सेवेसाठी पुढे यावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून जनतेशी बोलत होते. सैन्याच्या वैद्यकीय विभागातून निवृत्त झालेले सैनिक, निवृत्त परिचारिका, तसंच परिचर्या प्रशिक्षण घेतलेल्या आणि सध्या वैद्यकीय सेवा देण्यास इच्छुक नागरिकांनी कोविडयोद्धा @ जीमेल डॉट कॉम या संकेतस्थळावर आपली माहिती देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, कापडापासून घरी बनवलेले मास्क पुनर्वापरापूर्वी योग्य पद्धतीनं धुवून घ्यावेत, एकवेळ वापरण्याचे मास्क नष्ट करताना आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले.... जर जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा. आणि हे मास्क दुकानात जाऊन घेण्याची आवश्यकता नाहीये. चांगलं स्वच्छ आपलं कापड असतं त्या कापडाच्या तीन चार घड्या घालून छान आपलं नाक आणि तोंड कव्हर केलं तर हा मास्क घरच्या घरी बनवू शकतो. आणि धुवून पुन्हा वापरू शकतो. हे मास्क केवळ आता नाही. मला तर असं वाटतं यातू��� बाहेर पडल्यानंतर सुध्दा पुढच्या काही दिवस आपल्याला वापरायला पाहिजे. कारण हा विषाणू कसा कुठून जाता आहे. अजून कोणाच्या लक्षात आलेलं नाही आहे. वैद्यकीय साहित्याचा जगभरात तुटवडा आहे, भारतात अनेक कंपन्या वैद्यकीय साहित्य उत्पादनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र हे साहित्य खरेदी करताना, त्यांच्या गुणवत्तेबाबत काळजी घेणं आवश्यक असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. नागरिकांनी घरच्या घरी व्यायाम करावा, कोरोना विषाणू प्रादुर्भावाचं संकट ओसरल्यावर आर्थिक संकटाशी सामना करावा लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी शारीरिक तसंच मानसिक दृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. **** दिल्लीत झालेल्या तब्लिगी जमातच्या कार्यक्रमानंतर देशात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला, यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला जबाबदार का धरलं जाऊ नये, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. दिल्लीत हे संमेलन सुरू अस��ाना, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी जमातचा प्रमुख मौलाना साद याची अपरात्री दोन वाजता भेट घेतली होती, असंही देशमुख यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे. या संमेलन स्थळापासून पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर असूनही पोलिसांनी हे थांबवलं नाही, या कार्यक्रमाला परवानगी का दिली, असा प्रश्नही देशमुख यांनी विचारला आहे. **** कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणारे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना तीन महिन्यांसाठी २५ लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी आणि आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणारे केंद्र चालक, संगणक परिचालकांनाही हे विमा संरक्षण मिळणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. **** कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या पी.पी.ई. किट आणि एन ९५ मास्कचं उत्पादन आणि विक्री करण्यापूर्वी हाफकिन बायोफार्मास्युटिकल महामंडळाकडून त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता प्रमाणित करून घेण्याचे निर्देश राज्य शासनानं दिले आहे. दर्जा आणि गुणवत्तेबाबतच्या मानकाव्यतिरिक्त इतर साहित्य वापरून तयार केलेल्या किट आणि मास्कची विक्री ही अनधिकृत समजण्यात येणार असून, अशा किट आणि मास्कची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य शासनानं अधिसूचनेद्वारे जाहीर केलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमाचं साहित्य बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता यावा, यासाठी शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट इ बालभारती डॉट इन या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात बारावीचा अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन यासंदर्भात सूचना दिल्या होता. **** टाळेबंदीच्या काळात राज्यातला कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातल्या स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचं वितरण सुरळीत सुरु असल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. एक ते सात एप्र��ल या कालावधीत राज्यातल्या ९० लाख दोन हजार ८६८ शिधापत्रिकाधारकांना, तब्बल २२ लाख ८३ हजार १८० क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. टंचाई भासवून चढ्या दरानं विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. **** राज्य कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. बाधित रूग्णांची संख्या वाढत असली तरी जवळजवळ १२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले… आपल्या जवळ असलेल्या एकंदर सगळ्या माहितीवरून कुठंही आपण फेज थ्री मध्ये नाहीच हे मी या निमित्तानं सांगेल. आणि WHO सुध्दा अशा काही परिस्थितीमध्ये सांगत असते स्व:हून सुध्दा प्रो ॲक्टीव्हली डिक्लेअर करत असते. एक स्पाईक ज्याला मी म्हणतो तो मोठा येत असतो. पण तो कंट्रोल करण्याच्या संदर्भाने आपला विषय चालू आहे. संख्या निश्चितच वाढेल बेरीज ही होईल. पण तेव्हढाच डिशचार्ज ही होतयं हेही मला समाधानाची बाब सांगितली पाहिजे. तर जवळजवळ १२० च्या दरम्यान हे डिशचार्ज सुध्दा झालेले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या शून्य आहे अशा ठिकाणी नागरिकांना मोकळीक देण्यात येईल. मात्र, ज्या ठिकाणी ही संख्या वाढते आहे त्या ठिकाणी टाळेबंदी वाढवण्यात येईल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं. **** राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्थानक, बस स्थानक, भाजीपाला मार्केट, शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा गर्दीच्या ठिकाणी उभारण्यासाठी ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’नं पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. देशातल्या विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या टनेलचा वापर केला जात असल्याचं ते म्हणाले. यामध्ये पाण्यात एक टक्का सोडियम हायड्रोक्लोराईडच्या मिश्रणाचा वापर केला जातो. टनेलमधून जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला चार ते पाच सेकंदाचा वेळ लागतो. अशा प्रकारच्या टनेलच्या निर्मितीसाठी १२ फुट लांबीच्या पोर्टा केबिनचा वापर केला गेला असल्याचं सामंत यांनी सांगितलं. मात्र, कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असणाऱ्यांनी या टनेलमध्ये प्रवेश करणं योग्य नसल्याचंही सामंत यांनी नमूद केलं. **** कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काल देगलूर शहरास भेट देऊन देगलूर तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी गरजू गोरगरिबांना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. **** मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती महानगरपालिकेनं केली आहे. वैयक्तिक, कार्यालयीन किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर असताना मास्क लावावा लागणार आहे. हा मास्क देखील चांगल्या दर्जाचा, किंवा घरी बनवलेला असणं बंधनकारक आहे. मास्क लावला नसेल तर अशा व्यक्तीला अटक केली जाईल, तसा आदेश मुंबईचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काल जारी केला. **** औरंगाबाद शहर कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वैद्यकीय आस्थापना आणि सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना आज संध्याकाळी सात ते रात्री ११ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी काल हे आदेश जारी केले. या आदेशानुसार कालही संध्याकाळी सात ते रात्री ११ वाजेपर्यंत वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद होत्या. **** हिंगोली इथं निर्जंतुकीकरण करणारे सफाई कामगार आणि ट्रॅक्टर चालकाला केलेल्या मारहाण प्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी काल स्वच्छता कर्मचाऱ्��ांनी काम बंद आंदोलन पुकारलं. नगरपरिषदेचे सुमारे अडीचशे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. मंगळवारी सायंकाळी या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर काही आरोपींना अटक करण्यात आली, उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पालिकेने काम बंद ठेवलं आहे. **** नांदेड शहरात शिधापत्रिका नसणाऱ्या व्यक्तींनी आपली नावं महानगर पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातल्या मालमत्ता कर वसुली कर्मचाऱ्यांकडे नोंदवावी अशी सूचना, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर यांनी केली आहे. ते काल या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना शासनाच्या नियमानुसार अन्नधान्य मिळणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. **** हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या उखळी इथल्या एका तरुणीचा ताप, उलट्या आणि श्वसनाच्या त्रासानं परभणी इथल्या रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांसह अन्य दोघांना खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचे घशातल्या स्रावाचे नमुने औरंगाबाद इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सध्या इथं एका कोरोना विषाणूग्रस्तावर उपचार सुरू आहेत. **** नांदेड जिल्ह्यात पोलीस विभागाच्या कार्यालयांमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना हात धुण्यासाठी जिल्ह्यात तीनशे लिटर सॅनिटायझर देण्यात आलं असून, मास्क, हँडग्लोज, चष्मे आदी साहित्यही वितरित करण्यात आलं आहे. **** जालन्यातल्या कोरोना बाधित महिलेच्या थेट संपर्कात आलेल्या ४४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. यामध्ये बाधित महिलेच्या शिक्षिका मुलीचाही समावेश आहे. या शिक्षिकेनं रांजणी इथं पोषण आहाराचं वाटप केलं होतं. दरम्यान, जालना इथल्या परिचारीका प्रशिक्षण केंद्राच्या नूतन इमारतीचं १५० खाटांच्या कोरोना विषाणू बाधितांसाठीच्या रूग्णालयात रूपांतर करण्यात आलं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….. प्रशासनानं मागील आठवडाभरात याठिकाणी आवश्यक सुविधांची सर्व कामं युध्द पातळीवर पूर्ण केली आहेत. १५० खाटांच्या या रूग्णालयात ५० खाटं ही अतिदक्षता विभगासाठी असून ३० व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. १५ वैद्यकीय अधिकारी आणि ४० परिचारीकांच्या माध्यमातून याठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. सुरक्षेसाठी पीपीई किट आणि मास्कचा आवश्यकसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. **** बीड जिल्ह्यात विविध धार्मिक स्थळांमध्ये २४ परदेशी नागरिक आश्रय घेत असल्याचं समोर आल्यानंतर या सर्वांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं एक दिवसाआडची संचारबंदी पुन्हा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेची दुकानं सकाळी सात ते साडे नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना खरेदीसाठी सकाळी सहा ते दहा ही वेळ वगळून खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. **** नांदेड जिल्ह्यातल्या लोहा शहरात पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जलस्वराज्य परिवारानं पारदर्शक चेहरा संरक्षक वितरीत केले. यामुळे पोलिसांना कोणत्याही संसर्गापासून सुरक्षित राहात येईल. **** राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांना खोकला आणि नंतर ताप आल्यानं त्यांनी डॉक्टरांच्या सल्यानुसार कोरोना विषाणूची तपासणी करुन घेतली. आपला हा अहवाल नकारात्मक आल्याचं देशमुख यांनी सांगितलं. वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्यानं कार्यरत असताना आपल्याला लागण झाल्यास इतरांना प्रादुर्भाव होऊ नये त्याचप्रमाणे कुटुंबियांनाही याचा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने आपण ही चाचणी करून घेतल्याचं ते म्हणाले. **** नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिन्हास यांनी गरीब शीख - शिखलीगर कुटुंबियांना घरपोच अन्नधान्याची मदत दिली. मराठवाड्यातल्या सर्व गरीब कुटुंबियांना मदत देण्याची तयारी गुरुद्वारा बोर्डानं दर्शवली असल्याचं बोर्डानं दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भारतीय स्टेट बँकेच्या ५१ शाखांच्या वतीनं अन्नधान्याचं साहित्य जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे काल सोपवण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर खुर्द इथल्या तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं काल २६० मजुरांना गहू, तांदूळ, साखर यासह १२ वस्तुंचं वाटप करण्यात आलं. परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं बसस्थानक परिसरातल्या मजुरांना आमदार सुरेश वरपूडकर यांनी काल जीवनावश्यक वस्तुंचं वाटप केलं. हिंगोली शहरात संचारबंदीच्या काळात हालचाल करू न शकणाऱ्या १६४ दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूचं किट आजपासून वाटप करण्यात येणार आहे. तसंच शाळेत शिकणाऱ्या ३२ दिव्यांग विद्यार्थ्यांना ४८ हजार रुपयाची शिष्यवृत्ती आज ऑनलाइन खात्यात जमा होणार असल्याची माहिती हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथल्या मदरसा दारुल उलूम बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातल्या एक हजार गरीब आणि गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. **** परभणी इथं समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश सामाजिक माध्यमावर टाकल्याप्रकरणी दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एकाला अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी फरार आहे. परभणी जिल्ह्यात अशा प्रकारचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. **** उस्मानाबाद इथं काल संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी, तसंच तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणं आणि आस्थापना उघड्या ठेवणं, अशा विविध प्रकरणात आठ गुन्हे दाखल झाले. तर संचारबंदी काळात २९२ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. **** परभणी इथल्या श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर श्री साई स्मारक समितीच्या व्यवस्थापन मंडळातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख रुपयाचा निधी काल सुपुर्द करण्यात आला. **** कोरोना विषाणूग्रस्तांच्या मदतीसाठी जालना जिल्हा मराठी पत्रकार संघानं ५१ हजार रुपयाचा निधी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे सुपूर्द केला. **** हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पैसे काढण्यासाठी नागरिकांनी काल मोठी गर्दी केली होती. औरंगाबाद शहरातही अनेक बँक शाखांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं. या ठिकाणी खातेधारक योग्य अंतर राखत रांगेत उभे होते. **** सर्व लाभार्थ्यांनी बँक खात्यात जमा झालेलं अनुदान काढण्यासाठी १४ एप्रिलनंतर बँकेत जावं आणि कोरोना संसर्गाचा धोका टाळावा असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केलं आहे. विविध योजनांचे अनुदान बँक खात्यात झाले असून ते उचलण्यासाठी लाभार्थ्यांची बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. याची दखल घेत त्यांनी हे आवाहन केलं. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातल्या सर्व पेट्रोल पंप धारकांनी पुढील आदेशापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी असणाऱ्या वाहनचालकांनाच पेट्रोल द्यावेत असे आदेश परभणीच्या पोलीस अधिक्षकांनी जारी केले आहेत. **** परभणी जिल्ह्यातल्या स���लू इथं एका अवैध हातभट्टीवर पोलिसांनी काल धाड टाकली. या धाडीत हातभट्टीसाठी लावण्यात आलेले १६० लिटर रासायनिक द्रव्य नष्ट करून एका महिलेला ताब्यात घेण्यात आलं. **** राज्यात गुटखा बंदी लागू असून, सर्वत्र संचारबंदी असतांनाही हिंगोली जिल्ह्यातल्या औंढां तालुक्यातल्या पिंपळदरी इथं गावकऱ्यांनी गुटखा आणि मद्याची वाहतूक करणारी जीप मंगळवारी रात्री पकडली. यात दोन लाख रूपये किंमतीचा गुटखा सापडला असून वाहनासह चालक कळमनुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 February 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २८ फेब्रुवारी २०१९ सकाळी ७.१० मि. ****  भारतीय लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव भारतानं उधळला; पाकिस्तानचं एक विमान पाडलं  कारवाई दरम्यान, भारतानं एक मिग २१ विमान गमावलं; पाकिस्तानच्या ताब्यातल्या वैमानिकाची सुटका करण्याची मागणी  कृषी, रस्ते, ऊर्जा आणि आदिवासी विभागासाठी भरीव तरतुदी असलेला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधी मंडळात सादर आणि  विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडीला मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मात्र टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव; मालिकाही गमावली **** भारतीय लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव काल भारतानं उधळून लावला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. या कारवाईत भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई दलाचं एक विमान पाडलं. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडलं. या कारवाईत भारतानं एक मिग-२१ विमान गमावलं. या विमानाचा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, या जखमी वैमानिकाची दृश्य फीत काल पाकिस्ताननं जारी केली. मात्र असं करून, पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा तसंच जिनेव्हा कराराचं उल्लंघन केल्याचं भारतानं म्हटलं आहे. पाकिस्ताननं या वैमानिकाला तातडीनं सुरक्षित परत पाठवावं, असं भारतानं, पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून सांगितलं. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये बड��ाम जिल्ह्यात हवाई दलाचं एक मालवाहू हेलिकॉप्टर कोसळून हवाई दलाचे सहा अधिकारी ठार झाले. यात एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला. **** वायू दलानं परवा पाकिस्तानात केलेल्या हवाई कारवाईचं, विरोधी पक्षांनी स्वागत केलं आहे. काल नवी दिल्लीत २१ विरोधी पक्षांची बैठक झाली, या बैठकीत सर्व विरोधी पक्ष सैन्यदलासोबत भक्कमपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, द्रविड मुनेत्र कळघमचे तिरुची शिवा आणि लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. **** लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल कृषी, रस्ते, ऊर्जा आणि आदिवासी विभागासाठी भरीव अशा तरतुदी असलेला अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत या अर्थसंकल्पाचं वाचन केलं. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याची ग्वाही सरकारनं दिली. शेतकऱ्यांना सन्मानानं जगता यावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज योजनेमार्फत राज्यातला शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी उपलब्ध करून देणार, असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. कर्मचाऱ्यांसाठीच्या सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होत असल्याने राज्याच्या तिजोरीत १९ हजार ७८४ कोटी रुपये इतकी महसुली तूट अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. सन 2019-20 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 3 लक्ष 14 हजार 498 कोटी रुपये व महसुली खर्च हा 3 लक्ष 34 हजार 273 कोटी खर्च अंदाजीत केला. परिणामी 19 हजार 784 कोटी रुपये महसुली तूट येत आहे. अनावश्यक खर्चात बचत करून व महसूल वसूली अधिक प्रभावीपणे करून हि तूट मर्यादीत करण्याचा ��ी प्रयत्न करेणं. राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची माहिती देताना, मुनगंटीवार यांनी, गेल्या १५वर्षांच्या तुलनेत राज्यावर कर्जाचा बोजा स्थूल उत्पन्नाच्या १४ पूर्णांक ८२ शतांश टक्के एवढा असल्याचं सांगितलं. सामाजिक विकास विभागासाठी तीन हजार १८० कोटी, इतर मागासवर्गीय कल्याणासाठी दोन हजार ८९२ कोटी, महिला बालविकास दोन हजार ९२१ कोटी, अल्पसंख्याक विकास ४६२ कोटी, गर्भवती आणि स्तन्यदा मातांच्या पोषण आहार योजनेसाठी एक हजार ९७ कोटी, शेती तसंच उद्योगांना तर सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी पाच हजार २१० कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. औरंगाबादसह आठ शहरांमध्ये राबवल्या जात असलेल्या स्मार्ट सिटी योजनेसाठी चोवीसशे कोटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत चारशे कोटी रुपये वाढ, राज्यातल्या ३८५ शहरांत राबवल्या जात असलेल्या, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सहा हजार ८९५ कोटी, मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह एकूण १४ जिल्ह्यांतल्या शेतकऱ्यांना, अल्पदरांत धान्य पुरवठ्यासाठी ८९६ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. **** शेती- सिंचन, आरोग्य, महिला आणि बाल विकास या क्षेत्रांसह प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या लोक कल्याणकारी उपक्रमांसाठी भरीव तरतूद करुन राज्याची विकास यात्रा अखंडित ठेवण्याचा निर्धार काल सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात व्यक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. उद्योग आणि रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, ग्रामविकास, कौशल्य विकास या कार्यक्रमांबरोबरच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी या अर्थसंकल्पातील तरतुदी सहाय्यभूत ठरणार आहेत, असंही ते म्हणाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, परीक्षार्थी तसंच पालकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन मंडळानं केलं आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून, तीन एप्रिलपर्यंत चालणार आहेत, तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून, त्या २९ मार्चपर्यंत चालणार आहेत. **** नांदेड नगर पालिकेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष पुरुषोत्तम माहेश्वरी यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८१ वर्षाचे होते. नांदेड इथल्या उस्मानशाही मिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काही काळ कार्य केलं. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी नांदेड नगरपालिका निवडणूक लढवली आणि नगराध्यक्ष झाले. नांदेडच्या महिला महाद्यिालयाचे ते सचिव तर प्रतिभा निकेतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. याशिवाय अन्य काही संस्थामध्ये ते सक्रिय होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता गोवर्धन घाट स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. **** शाळा न्यायाधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथले शिक्षण संस्थाचालक राजकुमार सावंत आणि सचिव राहूल प्रधान यांना पंधरा दिवसांची कैदेची आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा गंगाखेड न्यायालयाने सुनावली आहे. कामावरून कमी केलेल्या शिक्षिकेला ४० दिवसाच्या आत पुन्का कामावर रूजू करून घेऊन वेतन देण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते, मात्र या आदेशाचं पालन या संस्थाचालकांनी केले नाही, त्यामुळे सदरील शिक्षिकेनं न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. **** औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ - म्हाडानं औरंगाबाद शहरातल्या अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या सदनिकांचे दर २० ते ४७ टक्यांपर्यंत कमी केले आहेत. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी काल शहरातल्या अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातल्या रिक्त असलेल्या एकूण ९१७ सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचं उद्धाटन केलं, त्यावेळी वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड नगरपरिषदेसाठी काल ७१ टक्के मतदान झालं. नगराध्यक्ष आणि २६ नगरसेवकांसाठी ही निवडणूक झाली. आज सकाळी दहा वाजता या मतदानाची मोजणी केली जाणार आहे. **** नवी दिल्लीत काल संपलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी या जोडीनं मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावलं आहे. १० मीटर एअर पिस्टल प्रकारात या जोडीनं ४८३ पूर्णाक ४ दशांश गुणांची कमाई केली. अंतिम फेरीत त्यांनी चीन आणि जपानच्या खेळांडूचा प्रतिकार मोडून काढला. दरम्यान, काल बंगरूळू इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा सात गडी राखून पराभव केला आणि मालिकाही जिंकली. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ठेवलेलं १९१ धावाचं लक्ष्य ऑस्ट्रेलियानं २ चेंडू राखून पूर्ण केलं. भारताचा कर्णधार विराट कोहली यानं नाबाद ७२ धावा काढल्या. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या जळकोट वाडी इथले शेतकरी त्रिंबकभाऊ फंड यांनी त्यांना मिळालेली कृषी भूषण पुरस्काराची ५१ हजार रूपयांची रक्कम पुलवामा इथं शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना समर्पित केली आहे. काल जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडे त्यांनी ही रक्कम सुपूर्द केली. फंड यांच्यासोबतच बोरामनी गावातल्या वजीर मुजावर शेख, वडगाव शिराढोण इथले उद्धव पवार आणि अन्य शेतकऱ्यांनी मिळून एक लाख सोळा हजार रूपये या शहिदांच्या परिवारांना दिले. **** पंतप्रधान जन आरोग्य योजनेतंर्गत परभणी जिल्ह्यातल्या नागरीकांसाठी आयुष्यमान भारत या योजनेच्या पत्रांचं वाटप काल जिल्हा सामान्य रुग्णालय इथं खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान येत्या शनिवारी २ मार्चला राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत परभणी इथं आरोग्य शिबीराचे आयोजन सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यत करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. **** दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं, उन्हाळी सुट्यांनिमित्त नांदेड इथून सुरू केलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. यानुसार, नांदेड- हजरत निझामुद्दीन दिल्ली-नांदेड, नांदेड – तिरुपती –नांदेड, तिरुपती-नगरसोल-तिरुपती, नांदेड-पनवेल-नांदेड आणि हैदराबाद-जयपूर-हैदराबाद या विशेष गाड्या येत्या जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. ***** ***
0 notes