#उद्धव ठाकरे बारसू पत्र
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 2 years ago
Text
बारसू प्रकल्पावरुन राजकारण तापलं, उदय सामंतांनी ते पत्र दाखवून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं
मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कालपासून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही त्यांच्या सुरात सूर मिसळत बारसू रिफायरनरीला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची बाजू मांडली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.
सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित असावा, शरद पवार यांची टीका.
अप्रमाणीत बी-बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांविरोधातले खटले निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करावं - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी.
आणि
आयपीएलमध्ये गुजरातचं लखनौसमोर २२८ धावांचं आव्हान.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने राज्यात आणण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत, या विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्यासंदर्भात चर्चा केली. महाराष्ट्रातले २२ विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना मणिपूरमधून आसामला आणण्यात येणार असून तिथून विशेष विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले –
मणिपूरमध्ये आपले विद्यार्थी जे अडकले आहेत, त्यांना तातडीने रेस्क्यू करण्यासाठी, तिथून सुरक्षित स्थळी आणण्यासाठी मुख्य सचिव मनोज सौनिक, आणि सी एम ओ चे भूषण गगराणी आणि गुप्ता या तिघांशी बोललो, हे तिघेही त्या कामावर आहेत. स्पेशल फ्लाईट करून त्यांना आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मणिपूर सरकारशी संपर्क करून या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली, यावेळी त्यांनी अडकलेल्या विद्यार्थांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
****
सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा प्रतिक्षित निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुधा माहिती असावा, त्यामुळेच ते मी पुन्हा येईन म्हणत असतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारच्या प्रकल्पांचं स्वागत व्हायला हवं, मात्र, ते प्रकल्प स्थानिकांना विचारात घेऊन उभे राहावेत, बारसू रिफायनरीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. सरकारने पोलीस बळाचा वापर करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा, असा सल्ला पवार यांनी दिला दिला आहे. देशात सर्वात जास्त राज्यांमध्ये बिगर भाजपा पक्षांचं सरकार असून, भविष्यात विरोधी पक्षाची एकजूट करून भाजप समोर सक्षम पर्याय दिला जाईल, असं पवार म्हणाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करणारं दुसरं कुणीच नाही, म्हणून शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आज सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करून काम करणारे उद्धव ठाकरे आता, मोदी हे लोकशाही धोक्यात आणत असल्याचा कांगावा करत आहेत, अशी टीका आठवले यांनी केली आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशा��ाठीची नीट परीक्षा आज घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या ३६ परीक्षा केंद्रांवर २० हजार ८०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यंदा परीक्षार्थींना २० मिनिटं वेळ वाढवून देण्यात आली होती.
****
अप्रमाणित बी-बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांविरोधातले खटले निकाली काढण्यासाठी, शीघ्र कृती न्यायालय - फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मागणी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. याबाबतीत एक पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. संबंधित कंपनी आणि विक्रेत्यांविरुद्ध खटले दाखल करण्यात येतात, मात्र संबंधित खटले निकाली काढण्यासाठी ५ ते १० वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास विलंब होतो, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं.
दरम्यान, चंद्रपूर इथं वाघाच्या हल्ल्यात ठार झालेले पुरूषोत्तम बोपचे यांच्या नातेवाईकांना, मुनगंटीवार यांच्या हस्ते सरकारी नियमानुसार पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
****
देशात गरीबी, भ्रष्टाचारासोबतच परंपरा आणि आधुनिकता, ग्रामीण आणि शहरांमधील वाढत चाललेली दरी, विकासाची गती कमी करत आहे. या आव्हानावर मात करून, प्रत्येक भारतीयाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी, युवा पदवीधरांनी आपल्या खांद्यावर घ्यावी, असं आवाहन भारताचे मूनमॅन पद्मश्री डॉ. मायलस्वामी अन्नादुराई यांनी केलं आहे. मुंबईच्या जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नववा दीक्षांत समारंभ आज घेण्यात आला, त्यावेळी त�� बोलत होते. देशाची ताकद वाढवायची असेल तर केवळ मनुष्यबळ वाढवून चालणार नाही तर कुशल, जबाबदार आणि मानवीय दृष्टीकोन असलेलं मनुष्यबळ निर्माण करावं लागेल असं, अन्नादुराई यांनी सांगितलं.
****
बजरंग दलाच्या वतीने परवा ९ मे रोजी राष्ट्रव्यापी हनुमत शक्ती जागरण करण्यात येणार आहे, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी ही माहिती दिली. या जागरणावेळी देशभरात अनेक ठिकाणी हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे.
****
सोलापूर शहरातल्या औद्योगिक वसाहतीतल्या कला टेक्स आणि उडता प्लास्टिक कारखान्याला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन्ही कारखान्यांचं मोठं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दलाच्या गाड्यांसह खाजगी टँकरद्वारे ही आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात येत असून, आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही.
****
कोयना धरण परिसरात आज पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पहाटे तीन वाजून ५३ मिनिटांनी तीन रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का जाणवला. या धक्यामुळे कोणतीही जीवित वा वित्त हानी झालेली नाही. कोयनानगर पासून उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर भूकंपाचा धक्का जाणवला असून भूकंपाचा केंद्रबिंदू ३० किलोमीटर खोलवर असल्याची नोंद आहे.
****
ई वाहनांच्या वापरात देशातल्या अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकूण दोन लाख ९२ हजार २५९ ई वाहनांची नोंदणी झाली. या तुलनेत कर्नाटकात एक लाख ९३ हजार, तमिळनाडूत एक लाख ११ हजार, गुजरात ८६ हजार, राजस्थानात सुमारे ८२ हजार, तर दिल्लीत ५७ हजार ई वाहनांची नोंदणी झाली आहे.
****
मुंबई विमानतळावर काल बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे अडीच किलो सोनं जप्त केलं. सीमा शुल्क विभागाने आज ही माहिती दिली. बँकॉकहून आलेल्या या प्रवाशाच्या झडतीत पायमोजे आणि पँटमधून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
****
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील करहामा गावात आज पहाटे झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा एक दहशतवादी ठार झाला. करहामा मधल्या कुंजर भागात अतिरेकी असल्याच्या माहितीवरून पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी या भागात संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली होती. ठार झालेला दहशतवादी कुलगाम इथला आहे. येत्या २२ ते २४ मे दरम्यान होणाऱ्या जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा ��ंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. सुरक्षा दलाच्या सैनिकांनी गेल्या तीन दिवसांत तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल जम्मू काश्मीरच्या राजौरी आणि पुंछ या दोन सीमावर्ती जिल्ह्यांमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.
****
अनेक विकसित अर्थव्यवस्था मंदीच्या मार्गावर आहेत पण भारतात मंदीची शक्यता शून्य आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल बेंगळुरू इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या.भारताने 2047 पर्यंत विकसित आणि प्रगत अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य ठेवलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरु आहे. गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत २० षटकांत २ गड्यांच्या बदल्यात २२७ धावा केल्या. शेवटच वृत्त हाती आलं तेंव्हा लखनऊ सुपर जायंट्स संघाने बिनबाद ६४ धावा केल्या होत्या.
दरम्यान, या स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला दुसरा सामना संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात मेहकर-खामगाव रस्त्यावरच्या देऊळगाव साकरशा गावाजवळ काल रात्री तीन वाहनांच्या अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला. पाठीमागून येणाऱ्या भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने, ती दुचाकी समोरच्या वाहनाला धडकली.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र : नाणार रिफायनरी प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू, मध्येच काँग्रेसने दिला वेगळा प्रस्ताव
महाराष्ट्र : नाणार रिफायनरी प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू, मध्येच काँग्रेसने दिला वेगळा प्रस्ताव
नाणारऐवजी बारसू गावाजवळील प्रकल्प नेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. भाजप नेते यासाठी तयार नाहीत. राज्य सरकारने जमीन देण्याचे मान्य केल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. नवीन प्रस्तावित जागा रिकामी आहे. तिथे विस्थापितांच्या पुनर्वसनाचा आणि शेतीच्या नुकसानीचा प्रश्नही ऐरणीवर येणार नाही. दरम्यान, काँग्रेस नेत्याने नवा प्रस्ताव दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून नाणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्याचा राज्यसरकारचा निर्णय
स्थानिकांच्या इच्छेविर��धात बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही-उद्धव ठाकरे यांचा इशारा 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्या कोकणासंदर्भातल्या भूमिकेवर टीका 
देशभरातल्या ४९९ शहरांमध्ये आज वैद्यकीय प्रवेशासाठीच्या 'नीट' परीक्षेचं आयोजन
शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई
रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांच्याकडून जालना रेल्वे स्थानकाची पाहणी
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सची प्रतिस्पर्ध्यांवर मात
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मुंबईच्या कुर्ला इथं डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्यस्तरीय उपक्रमाचा लोढा यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये काल पासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअर विषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी, यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
****
बारसू मधल्या स्थानिकांच्या इच्छेविरोधात तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते काल महाडमध्ये जाहीर सभेत बोलत होते. हा प्रकल्प कोकणाच्या भरभराटीसाठी आणायचा असेल,तर ती तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला, ते म्हणाले…
‘‘जर तो प्रकल्प आणायचा असेल कोकणाच्या भरभराटीसाठी तर तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, तुम्ही सगळे आमच्या कार्यकर्त्यांना आणी तिथल्या भूमीपुत्रांना तडीपाऱ्या लावताय, जिल्हाबंदी लावताय, आणी उद्या सांगताय रिफायनरी आल्यानंतर नोकरी मिळेल.. आज जिकडे बंदी करताय, तिकडे रिफायनरी आल्यानंतर प्रवेश तुम्ही कसा देणार आहात.. प्रकल्प तर मी होऊ देणार नाहीच, जो पर्यंत माझा तिथला कोकणी बांधव त्याचा मनाविरुद्ध हे सगळं चाललंय.. तो नाही बोलला तर प्रकल्प होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसू मध्ये उतरेल.’’
तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित असलेल्या सोलगावला उद्धव ठाकरे यांनी काल ��ेट दिली. तसंच बारसू इथल्या कातळशिल्पांची पाहणी केली. त्यानंतर ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना, बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला गैरसमजातून पत्र लिहिलं होतं, ती अंतिम भूमिका नव्हती असा खुलासा केला. बारसूचा तेलशुद्धीकरण प्रकल्प गुजरातला न्यावा आणि गुजरातला गेलेले वेदांत, एअरबससारखे प्रकल्प परत महाराष्ट्रात आणण्याचं आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिलं.
कॉग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आपल्या समर्थकांसह उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
****
कोकणवासियांबद्दल लोकप्रतिनिधींना शून्य आपुलकी असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते काल रत्नागिरीत जाहीर सभेत बोलत होते. गोवा मुंबई महामार्गाचं काम गेल्या सोळा वर्षांपासून रखडलं असून, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं काम चार वर्षांत पूर्ण होऊन जनतेसाठी खुला झाल्याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. बारसू संदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी, कोकणात जमिनींचा व्यापार होत असल्याची टीका केली. बारसू इथं कातळशिल्पांच्या परिसरात रिफायनरी होणं शक्य आहे का, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रत्येक विकास कामाला विरोध केला आहे. यांना कोकणाबद्दल प्रेम आहे की द्वेष, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे यांनी स्वत:च्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोकणात एकही विकास प्रकल्प आणलेला नाही, अशी टीका राणे यांनी केली. आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांनी काल रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापूर इथं मोर्चा काढला. तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या समर्थनात तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं.
****
विकासामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूमध्ये गेल्याची टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते काल कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी, बारसू इथं व्हावी असं पत्र देऊन सुचवलं होतं. मात्र आता ते या प्रकल्पाला विरोध करत असल्याचं केसरकर म्हणाले.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट आज देशभरातल्या ४९९ शहरांमध्ये होणार आहे. तसंच देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असल्याचं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
सौदी अरब देशाने आता भारतासह सात देशांतल्या प्रवाशांसाठी विसा स्टिकर ऐवजी ई विसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे. आता या सात देशातल्या नागरिकांना क्यूआर कोड असलेला ई विसा दिला जाणार आहे.
****
उत्तराखंडातली चारधा�� यात्रा पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे. आतापर्यंत चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी चार धाम यात्रा पूर्ण केली आहे, यापैकी एक लाख चाळीस हजाराहून अधिक भाविकांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आहे. केदारनाथ दर्शनासाठीची ऑनलाईन नोंदणी २५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आली असल्यानं, त्यापूर्वी नोंदणी केलेले भाविकच यंदा केदारनाथाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा यंदा एक महिना लवकर सुरु होणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यात सुरु होणारा हा पालखी सोहळा यंदा मात्र जून महिन्यातच पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता गृहीत धरुन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाय योजना करण्याचे निर्देश पुणे जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.
****
राज्यात काल कोरोनाच्या १७६ नव्या रुग्णांचं निदान झालं, यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर ४८७ रुग्ण काल कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात एक हजार ८७६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातले फक्त ११५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून १५ पीडित महिलांची सुटका केली. काल ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ११ आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी, हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आल्याची माहिती उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी काल जालना इथं रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या पीटलाईन आणि इतर कामांचा आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुकुंदवाडी तसंच करमाड रेल्वे स्थानकालाही भेट देऊन निरीक्षण केलं. करमाड इथं मालधक्का करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मालधक्का आणि पायाभूत सुविधांबाबत माहिती घेण्यासाठी परिसरातल्या अनेक उद्योजकांची तसंच जालना इथं पोलाद उद्योग प्रतिनिधींची सरकार यांनी काल भेट घेतली.
****
नाशिक इथं गोदावरी नदीपात्रालगत काल विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४०० किलो कचरा संकलित करण्यात आला. महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 'स्वच्छ सर्वेक्षण २०२३' अंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदी पात्रातील पाणवनस्पती काढून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत कचरा देण्याबाबत तसंच प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापरण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
वड, पिंपळ कुळातील चिंच, कडुनिंबासारखी दीर्घायुषी आणि मानवाला सतत लाभ देणारी झाडं मुलांनी लावावीत, असा सल्ला अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी दिला आहे. निसर्गशाळेच्या वतीने आयोजित निसर्ग महोत्सवात त्यांनी काल राज्यभरातील मुलांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सुटीत मुलांनी निसर्गात जाऊन झाडे, पक्षी आणि प्राण्यांची निरीक्षण करणारी डायरी लिहावी असंही चितमपल्ली यांनी सांगितलं.
****
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना करण्यात आली. या वन्यप्राणीगणनेत ३३ वाघ आणि १६ बिबट्यांसह अस्वलं, रानगवे, विविध प्रकारची हरणं, वानरं, मगरी, सायाळ अशा एकूण तीन हजार २३ प्राण्यांची नोंद करण्यात आली.
****
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा गट तयार करुन मतदार यादी तपासून घेण्यात यावी. मयत तसंच स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यापूर्वी खात्री करावी, अशा सूचनाही देशपांडे यांनी केल्या.
****
लातूर जिल्ह्याचा पुढील पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यासाठी काल कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी काल अनुभवी व्यक्तींचं म्हणणं ऐकून नोंदी घेतल्या. सोयाबीन हे प्रमुख पीक असलेल्या जिल्ह्यात सोयाबीनचे हब व्हावं, जिल्ह्यात चंदन, अश्वगंधा या सुगंधी औषधी वनस्पतींचं प्रमाण मोठं आहे, त्यासंबंधी युवकांना प्रशिक्षण द्यावं, औसा, उदगी��� किल्ला, हत्तीबेट आदी पर्यटन स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं निर्धारित २० षटकात ८ बाद १३९ धावा केल्या. चेन्नईनं १७ षटकं आणि �� चेंडूत ४ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं.
दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सात गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं प्रथम फलंदाजी करत १८२ धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्ली संघानं सतराव्या षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ते साध्य केलं.
या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजता राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
****
दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बिंदियारानी ने रौप्यपदक पटकावलं आहे. काल झालेल्या स्पर्धेत बिंदियारानीने ५५ किलो वजन गटात १९४ किलो वजन उचललं.
****
फिडे आणि टेक महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी पहिली जागतिक बुद्धिबळ लीग दुबईमध्ये होणार आहे. दुबईतले भारताचे वाणिज्य दूत डॉ. अमन पुरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातली सर्वात मोठी आणि फ्रँचायझी-आधारित ही बुद्धिबळ स्पर्धा २१ जून ते २ जुलै दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत ६ खेळाडूंचा समावेश असलेल्या ६ संघांमध्ये सामने होणार आहेत.
****
महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात काल दिल्ली पोलिसांनी ७ तक्रारदार कुस्तीपटूंचे जबाब नोंदवून घेतले आहेत. कुस्तीपटूंच्या वकिलांच्या उपस्थितीत त्याचं जबाब नोंदवण्यात आले. जबाब नोंदवताना या तक्रारदारांनी वेगवेगळ्या घटना सांगितल्या. परंतु, शोषण नेमके कधी झाली ती तारीख कुणाच्याही लक्षात नव्हती. लवकरच पोलीस कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांचा देखील जबाब नोंदवून घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एका दुचाकीस्वाराचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला, तर चिकलठाणा परिसरात सिलिंडरची वाहतुक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत अहमदनगर इथल्या एका युवकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघं जन जखमी झाले. माळीवाडा इथं झालेल्या अन्य एका अपघातात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास हुकूमशाही मोडून टाकू - उद्धव ठाकरे यांचा इशारा.
शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलिसांची कारवाई.
आणि
मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे निर्देश.
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मुंबईच्या कुर्ला इथं डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्यस्तरीय उपक्रमाचा लोढा यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअर विषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी, यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
****
बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. बारसूमध्ये रिफायरनरी - शुद्धीकरण प्रकल्प सरकारने हुकूमशाहीने लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही मोडून टाकू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राजापूरच्या सोलगाव इथं रिफायनरी विरोधक ग्रामस्थांशी ठाकरे यांनी आज भेट घेऊन संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. बारसू इथं रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी आपण पत्र दिलं होतं, त्याचा अर्थ याच ठिकाणी प्रकल्प करा, असा होत नाही. या ठिकाणी आंबा आणि काजूच्या बागा आहेत, स्थानिकांना ही रिफायनरी नको असेल तर हा प्रकल्प होता कामा नये, असं ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार नि��ेश राणे यांनी आज रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापूर इथं मोर्चा काढला.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रत्येक विकास कामाला विरोध केला आहे. यांना कोकणाबद्दल प्रेम आहे की द्वेष, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे यांनी स्वत:च्या मुख्यमंत्री पदाच्या का���्यकाळात कोकणात एकही विकास प्रकल्प आणलेला नाही, अशी टीका राणे यांनी केली.
****
विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन उद्योजक बनावं, असं आवाहन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केलं आहे. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आज ते सांगली इथं बोलत होते. नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होईल, त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या करिअर विषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून घेऊन आत्मनिर्भर बनण्यासाठी पुढं यावं. युवकांनी कष्ट करण्याची तयारी ठेवत, रोजगाराभिमुख चांगले शिक्षण घेऊन रोजगार देणारे बनावं, असं आवाहन खाडे यांनी केलं आहे.
****
लेखक आणि वाचकाला जोडण्यासाठी प्रकाशक हा महत्त्वाचा दुवा असल्याचं, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचं उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. ऑडिओ बुक या पुस्तकांच्या बदललेल्या या स्वरूपामुळे छापील पुस्तकांच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाते, मात्र छापील पुस्तकं आपलं स्थान कायम ठेवतील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. संमेलनाचे अध्यक्ष अशोक कोठावळे यांच्यासह साहित्यिक, लेखक आणि प्रकाशक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट उद्या देशातल्या ४९९ शहरांमध्ये होणार आहे. तसंच देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असल्याचं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
सौदी अरब देशाने आता भारतासह सात देशांतल्या प्रवाशांसाठी विसा स्टिकर ऐवजी ई विसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे. आता या सात देशातल्या नागरिकांना क्यूआर कोड असलेला ई विसा दिला जाणार आहे.
****
उत्तराखंडातली चारधाम यात्रा पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे. आतापर्यंत चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी चार धाम यात्रापूर्ण केली आहे, यापैकी एक लाख चाळीस हजाराहून अधिक भाविकांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आहे. केदारनाथ दर्शनासाठीची ऑनलाईन नोंदणी २५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आली असल्यानं, त्यापूर्वी नोंदणी केलेले भाविकच यंदा केदारनाथाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकानं छापा टाकून १५ पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी ११ आरोपीनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी, हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आल्याची माहिती उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
****
पोलिस किंवा प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका एक ‘चेक अँड बॅलन्स’ व्यवस्था म्हणून महत्त्वाची असल्याचं, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. ‘जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिना’ निमित्त आज नागपूर इथं एका चर्चासत्रात ते बोलत होते. वृत्तपत्रात अपराधाच्या किंवा पोलीस विभागाच्या बाबतीत येणाऱ्या बातम्यांकडे, आम्ही एक रचनात्मक टीका म्हणून बघतो, या बातम्या आमच्यासाठी एक ‘चेक अँड बॅलन्स’ व्यवस्था ठरतात, असंही ते म्हणाले. केंद्रीय लोकसंपर्क ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, पत्र सूचना कार्यालय, नागपूर, प्रेस क्लब, नागपूर आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला.
****
नाशिक इथं गोदावरी नदीपात्रालगत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४०० किलो कचरा संकलित करण्यात आला. महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदी पात्रातील पाणवनस्पती काढून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत कचरा देण्याबाबत तसंच प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापरण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
वड, पिंपळ] कुळातील चिंच, कडुनिंबासारखी दीर्घायुषी आणि मानवाला सतत लाभ देणारी झाडं मुलांनी लावावीत, असा सल्ला अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी दिला आहे. निसर्गशाळेच्या वतीने आयोजित निसर्ग महोत्सवात त्यांनी आज राज्यभरातील मुलांशी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सुटीत मुलांनी निसर्गात जाऊन झाडे, पक्षी आणि प्राण्यांची निरीक्षण करणारी डायरी लिहावी असंही चितमपल्ली यांनी सांगितलं.
****
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा गट तयार करुन मतदार यादी तपासून घेण्यात यावी. मयत तसंच स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यापूर्वी खात्री करावी, अशा सूचनाही देशपांडे यांनी केल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एका दुचाकीस्वाराचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला, तर माळीवाडा इथं झालेल्या अन्य एका अपघातात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ एप्र���ल  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
मराठवाड्यात अनके भागात गारपिटीसह पाऊस 
बारसू रिफायनरी तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पीपणाची - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, पोलिस बळाचा वापर करून रिफायनरीसाठी सर्वेक्षण न करण्याचं विरोधी पक्षाचं आवाहन
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला
येत्या महाराष्ट्र दिनापासून नव्या रेती धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार -महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
'पहिले पाऊल' या शाळास्तर उपक्रमाचा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ
छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांसाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्स संघावर ५५ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
मराठवाड्यात अनके भागात काल गारपिटीसह पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यात दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा, वरूड, दांडेगाव, दिग्रस बुद्रुक, या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली, तर वसमत तालुक्यातल्या कवठा, किन्होळा, कुरुंदा या भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे तसंच दुकानांचे फलक उडून गेले. डोंगरकडा, कुरुंदा, दांडेगाव, जवळा पांचाळ या भागात केळीच्या बागांचं तसंच आंब्याचं मोठे नुकसान झालं. हळद काढणीचं काम सुरू असल्यानं शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या काही भागात काल दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. राणीउंचेगाव शिवारात वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, तर घनसावंगी तालुक्यातल्या गंगाचिंचोली शिवारात काही वेळ बोराच्या आकारांच्या गारा पडल्या. एकलेहरा इथं शेतात बांधलेल्या म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला.
नांदेड शहर आणि परिसरात काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. अर्धापूर, माहूर, हिमायतनगर, किनवट, कंधार, लोहा, हदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. लोहा तालुक्यात वीज पडून चार जनावरं दगावली.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात काल वादळी वार्यासह पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, हळद, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालं.
दरम्यान, येत्या एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. याशिवाय तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही या केंद्रानं दिला आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांसाठी स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर तत्कालिन रजायपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता, सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून आमदारांची नवीन यादी तयार करण्यात येत आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. यावर न्यायालयानं राज्य सरकारला दोन आठवड्यांनी उत्तर देण्यास सांगितलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे, असा आरोप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल कर्नाटकात विजयापुरा इथं माध्यमांशी बोलत होते. रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळात निश्चित झाल्याचं ते म्हणाले. ही ग्रीन रिफायनरी आहे, त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. शांततापूर्ण आंदोलकांशी आपण चर्चा करू, मात्र फक्त राजकारणासाठी विरोध करणाऱ्यांना खपवून घेणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, राज्य सरकार पूर्णपणे स्थिर असून, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असं फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. २०२४ ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
****
बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असून, माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. या प्रकल्पाचं सर्वेक्षण थांबवायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प आम्हाला नको, असं सांगावं, म्हणजे काय करायचं ते ठरवता येईल, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करून सर्वेक्षण करू नये, अस आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केलं आहे. या बाबत केलेल्या एका ट्विटमध्ये पवार यांनी, या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याकडे लक्ष वेधत, खारघरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही, सरकारनं आंदोलकांवर दडपशाही न करता सर्वेक्षण थांबवावं, असं मत एका ट्विट संदेशाद्वारे व्यक्त केलं आहे.
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या संदर्भात सरकारवर टीका केली आहे. सरकार दडपशाही करत असून, सर्वेक्षण थांबवण्याची मागणी त्यांनी केली. प्रकल्प काय आहे हे जनतेला समजावून सांगावं, एक जाहीर सादरीकरण द्यावं आणि अंतिम मान्यता ही भूमिपुत्रांची असावी, अशी महाविकास आघाडी सरकारची अट होती, असं ते म्हणाले. तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे फायदे समजावून सांगण्यासाठी स्थानिकांशी संवाद साधण्याची मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
****
शा��ेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला असून, याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याचं, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. सत्तार यांनी यासंदर्भातला अहवाल काल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सोपवला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून, या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा, असं केसरकर यांनी सांगितलं. तर, कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे साहित्य आणि मदत लागेल, ते देण्याची कृषी विभागाची भूमिका असल्याचं अब्दुल सत्तार यांनी आश्वस्त केलं.
****
येत्या महाराष्ट्र दिनापासून नव्या रेती धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली. यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासनानं जाहीर केलेल्या नव्या वाळू धोरणानुसार वाळूचं उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार असून, सर्वसामान्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाळू मिळणार असल्याची माहितीही, विखे पाटील यांनी दिली. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास सहाशे रुपये, म्हणजेच एकशे तेहतीस रुपये प्रति मेट्रिक टन दरानं वाळू उपलब्ध होईल.
****
'पहिले पाऊल' या शाळास्तर उपक्रमाचा काल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी सी फेस शाळेतून या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची भाषा असून, प्रगती करणाऱ्या देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं, हे वास्तव लक्षात घेत, येत्या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या-त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकवले जाणार असल्याचं केसरकर यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या दोन हजार दोन उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजावंदन कार्यक्रमानंतर पात्र निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येतील.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात महत्वपूर्ण असलेल्या, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांसाठी, शासनानं सत्तर कोटी रुपयांचा निधी दिला असून, या निधीतून चांगले रस्ते होणार असल्यानं उद्योगांची भरभराट होणार आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत चिकलठाणा आणि शेंद्रा औद्येागिक क्षेत्रातल्या, विविध विकास कामांचं भूमिपूजन काल सामंत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारं पोषक वातावरण असल्यानं, पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकरता शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली. पालकमंत्री संदिपान भुमरे तसंच ��हकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, मराठवाडा लघू उद्योजक आणि कृषी संघटना -मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पाच अभ्यास मंडळाची निवडणूक काल घेण्यात आली. बिनविरोध निवडून आलेल्या १९ सदस्यांसह ४२ जण आता विद्या परिषदेचे सदस्य बनले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ही माहिती दिली. अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये मराठीसाठी डॉ. सर्जेराव जिगे, हिंदी - डॉ. अपर्णा पाटील, इतिहास - डॉ. हरी जमाले, वनस्पतीशास्त्र - डॉ. अरविंद धाबे, तर रसायनशास्त्रासाठी डॉ. मोहम्मद आरेफ अली पठाण विजयी झाले.
****
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या रिक्त पदं येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत भरण्याची सूचना, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिली असल्याची माहिती, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलिल यांनी दिली आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार जलील यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली असून, ते स्वतः युक्तिवाद करत आहेत. घाटीत सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आलं आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इथं शस्त्रक्रिया होत नसल्याकडे  जलिल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. जिल्ह्यातल्या विविध शासकीय आणि इतर संस्थांमधल्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात देखील खासदार जलील यांनी याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठानं संबंधित संस्थांना नोटीस बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उस्मानाबाद पंचायत समितीअंतर्गत, २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये झालेल्या २४ कामांमध्ये, आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या निर्देशानुसार नियुक्त चौकशी समितीच्या अहवालात ही बाब नमूद आहे. या कामांवर हजेरीपटांवरील मजूरांची, एकूण ६३ लाख ७७ हजार ७६७ रुपये एवढी मजूरी, त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा न होता, इतर खात्यांवर जमा झाल्याचं निदर्शनास आलं आहे. तसंच याशिवाय कामांच्या प्रत्यक्ष स्थळ पाहणीत, १७ कामांमध्ये मूल्यांकनापेक्षा १९ लाख ४५ हजार रुपये जास्तीचा खर्च झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून, ही रक्कम त्यांच्याकडून वसूल का कर���्यात येऊ नये, असं विचारण्यात आलं आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी देखील निर्देश दिले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासह औद्योगिक वसाहतींच्या क्षेत्रात अनेक अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून, त्यांना पोलिसांचं अभय असल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या भागात सुरू असलेल्या गुटखा विक्री, मटका, मुरुम चोरी, बिअर शॉप, रेती व्यवसाय आणि गॅस रिफिलींग अशा अवैध व्यवसायांवर कारवाई करावी, अशा मागणीचं पत्र दानवे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, संभाजीनगरचे पोलीस आयुक्त तसंच लाललुचपत विभागाच्या महासंचालकांना लिहिलं आहे. या अवैध व्यवसायिकांकडून पोलीस प्रशासन वसुली करत असल्याचा आरोपही दानवे यांनी यात केला असून, त्याबद्दलचे पुरावे सादर करण्याची तयारी दाखवली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सवर ५५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत गुजरातच्या संघानं निर्धारित २० षटकात २०७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला मुंबईचा संघ १५२ धावातच सर्वबाद झाला.
****
चला जाणू या नदीला या अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं काल आसना नदी जनसंवाद यात्रेचा  समारोप जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत झाला. नदीची सभ्यता नष्ट होण्यापूर्वी तिथली जैविक सभ्यता नष्ट होत असते, त्यामुळे सभ्यता टिकवण्यासाठी सर्वानी पाऊल उचलण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
बीड तालुक्यातल्या कोळवाडी गावानं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धेत मराठवाड्यातून प्रथम क्रमांक पटकावला. काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर विभागीय आयुक्त यांच्या हस्ते, कोळवाडीचे सरपंच, उपसरपंच, तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचातय सदस्य आणि ग्रामस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि १० लाख रुपये असा हा पुरस्कार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं उद्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनींसाठी मुलाखती घेण्यात येणार असून, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी नायगावच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित रहावं, असं आवाहन, नांदेडच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
डिजिटायझेशन आणि ऑनलाइन सेवा वितरणामुळे नागरी प्रशासनातील पारदर्शकतेत वाढ - राष्ट्रपतींचं प्रतिपादन.
राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला.
आणि
हिंगोली तसंच जालना जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी.
****
डिजिटायझेशन आणि ऑनलाइन सेवा वितरणामुळे नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढली असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. भारतीय नागरी लेखा सेवेतील २०१८ च्या तुकडीच्या अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रशासन प्रणालींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासनाचा साचाच बदलला आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. ��वीन अधिकाऱ्यांची नियुक्ती कोणत्याही विभागात झाली तरी, आपल्या कामाच्या मूळ उद्देशाची जाणीव ठेवून, जनतेचे कल्याण आणि देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या उद्देशाने काम करावं, असा सल्ला राष्ट्रपतींनी भावी अधिकाऱ्यांना दिला.
****
राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज केरळमधल्या तिरुवनंतपुरम स्थानकातून वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यानंतर बोलत होते. वंदे भारत रेल्वे गाड्या पर्यावरणपूरक असून, देशभरात अशा चारशे गाड्या सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वेचं जाळं देशभरात पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून, रेल्वे स्थानकांना आधुनिक बनवण्याचं काम सुरु आहे, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. केरळ मधल्या तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं, याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सामंत यांनी सांगितलं. माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात, असं आवाहन सामंत यांनी केलं. या प्रकल्पाचं सर्वेक्षण थांबवायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प आम्हाला नको, असं सांगावं, म्हणजे काय करायचं ते ठरवता येईल, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करून सर्वेक्षण करू नये, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केली आहे. या बाबत केलेल्या एका ट्विटमध्ये पवार यांनी, या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याकडे लक्ष वेधत, खारघरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या काही आंदोलकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही, सरकारनं आंदोलकांवर दडपशाही न करता सर्वेक्षण थांबवावं, असं मत एका ट्विट संदेशाद्वारे व्यक्त केलं आहे.
****
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागानं स्वीकारला आहे, याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ते आज मुंबईत यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. सत्तार यांनी यासंदर्भातला अहवाल आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सोपवला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा, असं केसरकर यांनी म्हटलं, तर, कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे साहित्य आणि मदत लागेल, ते देण्याची कृषि विभागाची भूमिका असल्याचं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी यंत्रणेला दिले आहेत. यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश सत्तार यांनी दिले. काळाबाजार करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही सत्तार यांनी दिले. यासाठी भरारी पथकं कार्यान्वित करण्याची सूचना सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
****
राज्य सरकारच्या वतीनं राज्यातल्या शाळांसाठी आता वर्चुअल क्लासरूम अर्थात आभासी वर्ग, ही संकल्पना राबवली जाणार असून, यंदा मे महिन्यामध्ये या आभासी वर्गांच्या माध्यमातून इयत्ता दहावीसाठी उन्हाळी वर्ग घेतले जाणार आहेत. तसंच, येत्या जूनपासून वर्षभर आभासी वर्गांद्वारे राज्यातल्या सातशे एकसष्ट शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी या शाळांमध्ये विशेष वर्ग तयार करण्यात ��ले आहेत. आभासी वर्ग घेण्याच्या या उपक्रमासाठी बालभारती इथे या महिन्याच्या दहा तारखेपासून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांना या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
****
मराठवाड्यात आज हिंगोली तसंच जालना जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, वरूड, दांडेगाव, दिग्रस बुद्रुक आदी या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली तर वसमत तालुक्यातील कवठा, किन्होळा, कुरुंदा या भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे तसंच दुकानांचे फलक उडून गेले. डोंगरकडा, कुरुंदा, दांडेगाव, जवळा पांचाळ या भागात केळीच्या बागांचं तसंच आंब्याचं मोठे नुकसान झालं. हळद काढणीचं काम सुरू असल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या काही भागात आज दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. राणीउंचेगाव शिवारात वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, तर घनसावंगी तालुक्यातल्या गंगाचिंचोली शिवारात काही वेळ बोराच्या आकारांच्या गारा पडल्या. एकलेहरा इथे शेतात बांधलेल्या म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात इतरत्र ढगाळ वातावरण असून, दमटपणा वाढल्याचं, तसंच हवामान विभागानं जिल्ह्यात येत्या २९ एप्रिलपर्यंत ऑरेंज अर्लट जारी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
येत्या एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. याशिवाय तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही या केंद्रानं दिला आहे.
****
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांतली रिक्त पदं येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत भरण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिल्या असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलिल यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार जलील यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली असून स्वतः युक्तिवाद करत आहेत. घाटीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इथं शस्त्रक्रिया होत नसल्याकडे खासदार इम्तियाज जलिल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. केंद्र सरकार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणार आहे, मात्र यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचं कोणतंही नियोजन केलेलं नाही, असं मत जलील यांनी न्यायालयासमोर मांडलं.
जिल्ह्यातल्या विविध शासकीय आणि इतर संस्थांमधल्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार जलील यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं संबंधित संस्थांना नोटीस बजावली असल्याची माहितीही जलील यांनी यावेळी दिली.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 25 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या प्रतिबंधित संघटनेच्या १७ ठिकाणांवर आज मंगळवारी छापे टाकण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयए आणि अंमलबजावणी संचालनालय -ईडी यांनी संयुक्तपणे बिहार, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशात ही कारवाई केली. केंद्र सरकारने २०२२ मध्ये पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. तरीही, पीएफआय सध्या दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश आदी १५ राज्यांमध्ये सक्रीय असल्याचं सांगितलं जात आहे.
****
देशात गेल्या २४ तासात सहा हजार ६६० नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर नऊ हजार २१३ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ६३ हजार ३८० रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६७ शतांश टक्के इतका आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत २२६ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५०५ रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात पाच हजार ७७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 
****
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं, याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सामंत म्हणाले. मा���्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात, असं आवाहन सामंत यांनी केलं.
दरम्यान, या रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नये, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केली आहे. या बाबत केलेल्या एका ट्विटमध्ये पवार यांनी, या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याकडे लक्ष वेधत, खारघरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या काही आंदोलकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
भाजप नेते राहुल कुल यांच्या मालकीच्या भीमा पाटस साखर कारखान्याच्या विरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग -सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. या कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असून, ही रक्कम कारखान्या व्यतिरिक्त बाहेरच्या कामांसाठी, खासगी कामांसाठी वापरल्याचा राऊत यां��ा आरोप आहे. आपण गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात वारंवार प��्रव्यवहार केला, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.
****
'स्वच्छता मॉनिटर' उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य केलं, त्यांचं हे कार्य देशालाही दिशा दाखवेल, असा विश्वास, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त गेल्या वर्षी राबवण्यात आलेल्या, 'स्वच्छता मॉनिटर' उपक्रमात, सर्वोत्तम कामगिरी करणारे पाच जिल्हे, पाच समन्वयक तसंच ३० शाळा आणि विद्यार्थ्यांचा, केसरकर यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
सत्कारार्थीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फातेमा गर्ल्स उर्दू हायस्कूल, जालना जिल्ह्यात अंकुशनगर इथल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल, जनता हायस्कूल, मत्स्योदरी विद्यालय, तसंच मोतीगव्हाण इथल्या नेत्रदीप विद्यालयाचा समावेश आहे.
****
अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते. याआधी ही योजना विमा कंपन्यांच्या मार्फत राबवण्यात येत होती, मात्र त्यासाठी लागणारा विलंब लक्षात घेऊन, अपघातग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी, शासनाच्या वतीनं, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीत प्रस्ताव मंजूर करून शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात येणार आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं काम पूर्ण झालं आहे. येत्या एक मे रोजी या दवाखान्याचं लोकार्पण करण्यात येणार असल्याचं पैठण नगरपरिषदेनं कळवलं आहे.
****
जागतिक हिवताप दिन आज पाळण्यात येत आहे. यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथल्या सहायक संचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या वतीनं, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत, हिवताप जनजागृती साठी प्रदर्शनी लावण्यात आली आहे.
****
0 notes