Tumgik
#उत्‍तरकाशी
airnews-arngbad · 10 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 November 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
·      राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेल्या जिल्ह्यात तातडीनं पंचनामे करुन मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·      हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू;पशूधनासह शेतपिकं आणि फळबागांचं नुकसान
·      धुळे सोलापूर महामार्गावर कन्नड घाटात कार दरीत कोसळून चार ठार तर सात जखमी
आणि
·      जालना इथं विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ;छत्रपती संभाजीनगर इथं आज यात्रेचं औपचारिक उद्‌घाटन
सविस्तर बातम्या
राज्यात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे, तिथे तातडीनं पंचनामे करुन शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेआहे. काल ठाणे इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
Byte…
गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये गारपिट झालेली आहे, सकाळीच सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे, अवकाळी पडलेला आहे, त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर इथं बोलताना त्यांनी, कुठल्याही परिस्थितीत शेतक-यांना मदत करण्याचीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं आश्वासन दिलं.
****
दरम्यान, राज्यात कालही अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याच्या बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. विभागात काल सकाळपर्यंत १०७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे ज्वारी, गहू, मका, कपाशी, तूर आदी पिकांसह फळबागांचं नुकसान झालं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे आठही जिल्हा प्रशासनाला पिकांसह इतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
या पावसामुळे परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीला पूर आला असून, शेतात पाणी साचलं आहे.
धाराशिव शहर आणि परिसरात आज पहाटेपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या गोजेगाव शिवारात वीज कोसळल्याने राजू जायभाये या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. 
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात वीज कोसळून ५० शेळ्या-मेंढ्या दगावल्या, तर जिल्हाभरात सात मोठी जनावरं दगावली. भोकरदन आणि घनसावंगी तालुक्यात बहुतांश ठिकाणी ज्वारी आणि फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांचं नुकसान झालं.
नांदेड जिल्ह्यात मुदखेड, किनवट आणि नांदेड तालुक्यात एकूण चार जनावरं दगावल्याचं आणि एका घराची अंशत: पडझड झाली असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून तातडीने सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी, आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
****
राज्यात पुढच्या दोन दिवसांसाठी मराठवाड्यातल्या जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस आणि गारपिटीचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येत्या तीस तारखेनंतर हे वातावरण निवळणार असून, त्यानंतर थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड घाटात धुक्यामुळे कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. वाहनाच्या पुढच्या काचेवरचं दव पुसण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी अत्याधुनिक १५ वाहनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
राज्यातल्या दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यांना मदत देण्यासाठी केंद्राकडे पाठवलेला निधी प्रस्ताव मंजूर झाल्यावर भरीव मदत करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते काल बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. याशिवाय, दुष्काळसदृष्य स्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये राज्य शासनाकडून मदतीची ग्वाहीही पवार यांनी दिली.
****
उत्तराखंड मधल्या उत्‍तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न अथकपणे सुरु आहेत. याबाबतची एकूण स्थिती नियंत्रणात असल्याचं, राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सदस्य निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी सांगितलं आहे.
****
जालना इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. जिल्हा परिषद कार्यालयापासून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संकल्प रथास हिरवा झेंडा दाखवला. आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी ड���.श्रीकृष्ण पांचाळ यावेळी उपस्थित होते. या मोहिमेविषयी माहिती देताना रावसाहेब दानवे म्हणाले,
Byte…
२०१४ ते २०२३ पर्यंत या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या देशात विकासाची कोणती कोणती कामं झालीत, गरीबासाठी कोणती कामं झालीत, आणि शेतकरी तरूणांसाठी कोणती कामं झालीत ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेची सुरूवात करण्यात आली आहे. जालन्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन शासनाच्या योजनेची माहिती या संकल्प यात्रेमध्ये दिली जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज विकसित भारत संकल्प यात्रेचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होणार आहे. शहरातल्या सिद्धार्थ उद्यानात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे
****
शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचं ४२५ वं समाधी वर्ष तसंच एकनाथी भागवत ग्रंथाच्या साडेचारशेव्या जयंतीनिमित्त पैठण इथं सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची काल सांगता झाली. एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी सांगतेचं काल्याचं कीर्तन केलं. त्यापूर्वी या सोहळ्यात काल सकाळी गजारूढ ग्रंथदिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधल्या एकनाथ मंदिरामध्येही भागवत जयंतीसह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
बीड जिल्ह्यत शिरूर कासार तालुक्यातून जाणाऱ्या पैठण - पंढरपूर पालखी मार्गाचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काल नागरिकांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केलं. अधिकाऱ्यांनी याबाबतचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांची भेट घेतली. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पाठिंबा असून येत्या विधिमंडळ अधिवेशनामध्येही आपण याबाबत प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली.
****
समन्यायी पाणी वाटप धोरण एखाद्या वर्षापुरते अंमलात न आणता मराठवाड्याच्या शाश्वत पाण्यासाठी ते कायमस्वरुपी राबवावं, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेनं केली आहे. काल लातूर इथं झालेल्या विभागीय बैठकीत ही मागणी करण्यात आली. वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्स्थापनेसाठी आता थेट राष्ट्रपतींचेच दरवाजे ठोठावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं काल ‘साक्षात‘ उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांचं व्याख्यान झालं. माझी कविता ही बाहेरचा आणि आतलाही आवाज ऐकते, म्हणून मी आत आणि बाहेर पाहू शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
अंबाजोगाई इथं तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक रविंद्र शोभणे यांनी यावेळी बोलताना, यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या राजकीय आणि सामाजिक विचारात अंतर पडत  असल्याची खंत व्यक्त केली. कृषी, साहित्य, संगीत आणि युवा या क्षेत्रातील चार गुणवंतांना यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देवून गौरवण्यात आलं. धावपटू अविनाश साबळे याला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल "युवा गौरव" सन्मान प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, आणि पाच हजार रुपये असं या सर्व पुरस्कारांचं स्वरूप आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या जालना-छपरा-जालना विशेष साप्ताहिक गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. जालना ते छपरा या गाडीला २९ नोव्हेंबर ते तीन जानेवारी २०२४ पर्यंत, तर छपरा ते जालना गाडीला एक डिसेंबर ते ०५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
रेल्वेच्या सिकंदराबाद आणि नांदेड विभागात सुरू असलेल्या रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामांमुळे येत्या दोन आणि तीन डिसेंबरपर्यंत काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या उशिरा धावणार आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वे चालवत असलेल्या ओखा-मदुराई-ओखा  या विशेष गाडी ला येत्या २९ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ शहरात पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभामंडप उभारणीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेऊन पाहणी केली.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
news-trust-india · 2 years
Text
Uttarkashi Avalanche: रेस्‍क्‍यू के दौरान 7 और प्रशिक्षु पर्वतारोहियों के शव हुए बरामद
Uttarkashi Avalanche: रेस्‍क्‍य��� के दौरान 7 और प्रशिक्षु पर्वतारोहियों के शव हुए बरामद
उत्तरकाशी‌। Uttarkashi Avalanche उत्‍तरकाशी में द्रौपदी का डांडा की चोटी पर एवलांच की चपेट में आए सात और प्रशिक्षु पर्वतारोहियों के शव आज शुक्रवार दोपहर तक खोज बचाव दल ने बरामद कर लिए हैं। अब तक कुल 26 शव बरामद हुए हैं। अभी तीन पर्वतारोही लापता चल रहे हैं। वहीं, वायु सेना के चीता हेलीकाप्टरों के जरिये चार शवों को हर्षिल पहुंचाया गया। जहां से एंबुलेंस के जरिये जिला अस्पताल उत्तरकाशी लाया गया। इन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
तीन दिन से फंसे हुए हैं 3000 तीर्थयात्री, बढ़ रही दिक्कतें
तीन दिन से फंसे हुए हैं 3000 तीर्थयात्री, बढ़ रही दिक्कतें
उत्‍तरकाशी स्थित गंगोत्री हाईवे पर 3000 तीर्थयात्री फंसे हुए है। जिनके रहने-खाने की अब दिक्कतें शुरू हो गई है। आपको बता दें की गंगोत्री राष्ट्रीय राजमार्ग पर हेल्गू गाड़ व सुनगर के बीच राजमार्ग बुधवार की शाम से अवरुद्ध है। करीब 3000 तीर्थ यात्री राजमार्ग अवरुद्ध होने से फंसे हुए हैं। इन यात्रियों के सामने सबसे अधिक समस्या रहने खाने की है। साथ ही कई तीर्थ यात्री बुजुर्ग और बच्चे बीमार भी हो गए…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
उत्तरकाशीजवळ बोलेरो गाडी दरीत कोसळून तिघे ठार | मृतकामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चांदोरी बु.मधील मुलगी
उत्तरकाशीजवळ बोलेरो गाडी दरीत कोसळून तिघे ठार | मृतकामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चांदोरी बु.मधील मुलगी
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चांदोरी बु. येथील एका मुलीचा दरीत बोलेरो गाडी कोसळल्याने मृत्यू झाल्याची उत्तरकाशीत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतक मुलीचे नाव जयश्री अनिल कोसरे (वय २०) रा. चांदोरी बु. आहे. ती आपल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील मोठ्या वडील बाळा कोसरे यांच्यासह उत्तर काशी येथे देवदर्शनाला गेली. यमुनोत्री राष्ट्रीय राजमार्गजवळ दरीत बोलेरो गाडी कोसळल्याने 3…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
यूकेएसएसएससी पेपर लीक मामले में 32वीं गिरफ्तारी, कनिष्ठ सहायक गिरफ्तार...
यूकेएसएसएससी पेपर लीक मामले में 32वीं गिरफ्तारी, कनिष्ठ सहायक गिरफ्तार…
UKSSSC Paper Leak: उत्तराखंड में यूकेएसएसएससी पेपर लीक मामले में फुल एक्शन के साथ कार्रवाई जारी है। मामले की जांच लखनऊ, धामपुर, कुमाऊं, उत्‍तरकाशी से अब टिहरी तक पहुंच गई है। एसटीएफ ने मामले में आज 32वीं गिरफ्तारी की है। ये गिरफ्तारी टिहरी गढ़वाल राजकीय पॉलिटेक्निक कॉलेज के कर्मचारी राजवीर के रूप में हुई है। मीडिया रिपोर्टस के अनुसार आरोपित राजबीर निवासी लक्सर हरिद्वार क्षेत्र के कुछ अभ्यर्थियों…
Tumblr media
View On WordPress
0 notes
uttarakhandjan · 2 years
Text
UKSSSC पेपर लीक मामले में चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह इंटरसेप्ट
UKSSSC पेपर लीक मामले में चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह इंटरसेप्ट
देहरादून: उत्तराखंड अधीनस्थ चयन आयोग (UKSSSC) भर्ती पेपर लीक कर धांधली में बड़ी कार्यवाही करते हुए चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह को गिरफ्तार किया कर लिया गया है। हाकम सिंह उत्‍तरकाशी जिला पंचायत का सदस्‍य है, जिसे हिमाचल के आरा कोर्ट बॉर्डर से स्थानीय पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। वहीं देहरादून से एसटीएफ टीम भी मौके के लिए रवाना हो चुकी है। बता दें कि पेपर लीक मामले की जांच के दौरान हाकम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dainikuk · 2 years
Text
UKSSSC पेपर लीक मामले में चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह इंटरसेप्ट
UKSSSC पेपर लीक मामले में चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह इंटरसेप्ट
देहरादून: उत्तराखंड अधीनस्थ चयन आयोग (UKSSSC) भर्ती पेपर लीक कर धांधली में बड़ी कार्यवाही करते हुए चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह को गिरफ्तार किया कर लिया गया है। हाकम सिंह उत्‍तरकाशी जिला पंचायत का सदस्‍य है, जिसे हिमाचल के आरा कोर्ट बॉर्डर से स्थानीय पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। वहीं देहरादून से एसटीएफ टीम भी मौके के लिए रवाना हो चुकी है। बता दें कि पेपर लीक मामले की जांच के दौरान हाकम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
tazacoverage · 2 years
Text
UKSSSC पेपर लीक मामले में चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह इंटरसेप्ट
UKSSSC पेपर लीक मामले में चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह इंटरसेप्ट
देहरादून: उत्तराखंड अधीनस्थ चयन आयोग (UKSSSC) भर्ती पेपर लीक कर धांधली में बड़ी कार्यवाही करते हुए चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह को गिरफ्तार किया कर लिया गया है। हाकम सिंह उत्‍तरकाशी जिला पंचायत का सदस्‍य है, जिसे हिमाचल के आरा कोर्ट बॉर्डर से स्थानीय पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। वहीं देहरादून से एसटीएफ टीम भी मौके के लिए रवाना हो चुकी है। बता दें कि पेपर लीक मामले की जांच के दौरान हाकम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swarajtv · 2 years
Text
UKSSSC पेपर लीक मामले में चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह इंटरसेप्ट
UKSSSC पेपर लीक मामले में चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह इंटरसेप्ट
देहरादून: उत्तराखंड अधीनस्थ चयन आयोग (UKSSSC) भर्ती पेपर लीक कर धांधली में बड़ी कार्यवाही करते हुए चर्चित जिला पंचायत सदस्य हाकम सिंह को गिरफ्तार किया कर लिया गया है। हाकम सिंह उत्‍तरकाशी जिला पंचायत का सदस्‍य है, जिसे हिमाचल के आरा कोर्ट बॉर्डर से स्थानीय पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। वहीं देहरादून से एसटीएफ टीम भी मौके के लिए रवाना हो चुकी है। बता दें कि पेपर लीक मामले की जांच के दौरान हाकम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vilaspatelvlogs · 4 years
Text
उत्तराखंड में मिले कोरोना के 61 नए मामले, संक्रमितों का आंकड़ा 1785 और रिकवरी रेट 61% पहुंचा
उत्तराखंड में मिले कोरोना के 61 नए मामले, संक्रमितों का आंकड़ा 1785 और रिकवरी रेट 61% पहुंचा
[ad_1]
देहरादून: उत्तराखंड में शनिवार को कोरोना के 61 नए मामले सामने आए जबकि 131 लोग संक्रमण मुक्त होकर अस्पताल से डिस्चार्ज किए गए. राज्य में शनिवार को मिले कोरोना संक्रमितों में चमोली में 3, देहरादून में 12, टिहरी में 23, रुद्रप्रयाग में 1, उत्‍तरकाशी में 4, ऊधमसिंहनगर में 5, पौड़ी गढ़वाल में 9, हरिद्वार में 4 मरीज सामने आए.
उत्तर प्रदेश में बीते 48 घंटों में सामने आए 1000 से ज्यादा कोरोना…
View On WordPress
0 notes
rnewsworld · 4 years
Photo
Tumblr media
उत्तरकाशी में 45 साल बाद अचानक गांव लौटे 84 साल के बुजुर्ग, परिवार ने नहीं जताई खुशी Edited By Abhishek Shukla | टाइम्स न्यूज नेटवर्क | Updated: 19 May 2020, 09:43:00 AM IST…
0 notes
newsaryavart · 4 years
Text
उत्तरकाशी में 45 साल बाद अचानक गांव लौटे 84 साल के बुजुर्ग, परिवार ने नहीं जताई खुशी
उत्तरकाशी में 45 साल बाद अचानक गांव लौटे 84 साल के बुजुर्ग, परिवार ने नहीं जताई खुशी
[ad_1]
Edited By Abhishek Shukla | टाइम्स न्यूज नेटवर्क | Updated: 19 May 2020, 09:40:00 AM IST
वापस गांव लौटे सूरत सिंह चौहान
उत्तरकाशी उत्तरकाशी के एक गांव का एक व्यक्ति 45 साल लापता रहने के बाद रविवार दोपहर अचानक अपने गांव लौट आया। अब उसकी उम्र 84 साल है। भावनात्मक लगाव न होने के कारण परिवार के लोग वृद्ध को स्वीकार करने को तैयार नहीं हैं। लेकिन, उन्होंने राजकीय इंटर कॉलेज जेष्ठवाड़ी में…
View On WordPress
0 notes
news-trust-india · 2 years
Text
Avalanche in Uttarkashi: 10 शव बरामद, हवाई निरीक्षण को मुख्यमंत्री रवाना
Avalanche in Uttarkashi: 10 शव बरामद, हवाई निरीक्षण को मुख्यमंत्री रवाना
उत्‍तरकाशी: Avalanche in Uttarkashi  उत्तरकाशी द्रौपदी का डांडा में एवलांच आने के बाद लापता करीब 25 पर्वतारोहियों की खोजबीन के लिए घटना के दूसरे दिन बुधवार तड़के से बचाव अभियान शुरू कर दिया गया। अभी तक 10 शव बरामद किए जा चुके हैं। वहीं 14 लोगों को रेस्‍क्‍यू किया जा चुका है। Uttarakhand Accident: मृतकों की संख्‍या बढ़कर हुई 27 बुधवार को मुख्‍यमंत्री पुष्‍कर सिंह धामी आइटीबीपी हेलीपैड मातली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
उत्तराखंड में दस ट्रैकर्स की मौत, 25 लापता, रेस्‍क्‍यू जारी
उत्तराखंड में दस ट्रैकर्स की मौत, 25 लापता, रेस्‍क्‍यू जारी
नैनिताल: उत्‍तराखंड में  दो अलग-अलग स्‍थानों पर टैकिंग के लिए गए दस पर्यटकों की मौत हो गई है। जबकि 25 लापता बताए जा रहे हैं। पर्यटकों को रेस्‍क्‍यू करने का अभियान सेना ने जारी रखा है। बागेश्‍वर जिले के सुदंरढूंगा घाटी में ट्रैक पर गए बंगाल के छह ट्रैकरों में पांच की मौत हो गई है तो एक अब भी लापता है। वहीं उत्‍तरकाशी जिले में हर्षिल से लम्‍खागा पास होते हुए हिमाचल प्रदेश स्थित छितकुल की ट्रैकिंग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
उत्‍तरकाशी में यमुनोत्री हाईवे पर बोलेरो खाई में गिरी | तीन यात्रियों की मौत और 10 घायल; मरने वाले सभी महाराष्‍ट्र के
उत्‍तरकाशी में यमुनोत्री हाईवे पर बोलेरो खाई में गिरी | तीन यात्रियों की मौत और 10 घायल; मरने वाले सभी महाराष्‍ट्र के
जखमी यात्रीयोमे भंडारा जिले के तुमसर शहर से उत्तरकाशी (वृत्तसंस्था), दि.27 : उत्‍तरकाशी जनपद में यमुनोत्री राष्ट्रीय राजमार्ग पर स्याना चट्टी के पास एक बोलेरो वाहन दुर्घटनाग्रस्त हो गया। इस हादसे में चालकसहीत तीन यात्रियों की मौत हो गई जबकि 10 घायल हैं। मरने वाले सभी यात्री और घायल महाराष्‍ट्र के भंडारा जिले के तुमसर के रहने वाले हैं। घायलों को रेस्‍क्‍यू कर खाई से निकाला गया। मृतकों को मे  पुरण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
बीजेपी ने हाकम सिंह रावत को 6 वर्ष के लिए किया निष्कासित, इसलिए हुई कार्रवाई...
बीजेपी ने हाकम सिंह रावत को 6 वर्ष के लिए किया निष्कासित, इसलिए हुई कार्रवाई…
UKSSSC Paper Leak: उत्तराखंड सरकार यूकेएसएससी पेपर लीक मामले में सख्त नजर आ रही है। एसटीएफ की बड़ी कार्रवाई के बाद बीजेपी ने हाकम सिंह रावत को पार्टी से 6 वर्ष के लिए निष्कासित कर दिया है। मीडिया रिपोर्टस के अनुसार प्रदेश महामंत्री कुलदीप कुमार ने पत्र जारी कर कहा क‍ि भाजपा प्रदेश अध्‍यक्ष महेंद्र भट्ट के निर्देशानुसार उत्‍तरकाशी के ज‍िला पंचायत सदस्‍य हाकम सिंह पेपर लीक के मामले में संद‍िग्‍ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes