#ई.एस.आय.सी.
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
कामगार कायदा उल्लंघन प्रकरणी औरंगाबाद महानगरपालिका, छावणी परिषद आणि इतर आस्थापनांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस.
राष्ट्रवाद, सुशासन आणि गरीब कल्याण हे भाजपचे तीन महत्त्वपूर्ण स्तंभ-केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांचं प्रतिपादन.
भाजपविरोधात लढण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र यावं लागेल-विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर खासदार शरद पवार यांचं मत.
आणि
पावसाच्या ओढीमुळे राज्यातील जलसाठ्यात झपाट्याने घट;साठ जलाशयं पूर्णपणे कोरडी.
****
कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिका, छावणी परिषद आणि जिल्ह्यातील इतर आस्थापनांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नोटीस पाठवली आहे. कामगार कायद्यांचं उल्लंघन करणं, किमान वेतन न देणं, ई.एस.आय.सी आणि भविष्य निर्वाह निधी बुडवून कंत्राटी कामगारावर अन्याय करणारे कंत्राटदार, महानगरपालिका, छावणी परिषद, घाटी रुग्णालय, विद्यापीठ आणि जिल्ह्यातल्या इतर शासकीय कार्यालयांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे, त्याअंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
****
राष्ट्रवाद, सुशासन आणि गरीब कल्याण हे भाजपचे तीन महत्त्वपूर्ण स्तंभ असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं ते आज मुंबईत एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. पुढच्या पाच वर्षांत वाहन निर्मिती उद्योग १५ लाख कोटी रुपयांवर नेण्याचं उद्दीष्ट असून, या क्षेत्रात भारत जगभरात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
****
केंद्रातील मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यामुळे राज्यातील मागास भागाचा विकास झाला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. ते आज जम्मू इथं विविध विकास कार्यक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर बोलत होते. महाजनसंपर्क अभियानाला सं��ोधित करतांना अमित शहा यांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीर प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत असून २८ हजार तरुणांना पारदर्शक पध्दतीने सरकारी नोकऱ्या देण्यात आल्याचं सांगितलं. मोदी सरकारनं केवळ ९ वर्षात ९ नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि १५ नवीन नसिॆंग महाविद्यालयांची स्थापना केल्याचं सांगितलं. गृहमंत्र्यांनी यावेळी त्रिकुटा नगर इथं भाजपचे विचारवंत आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****
भारतीय जनता पक्षाविरोधात लढण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र यावं लागेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पाटण्यात विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, संयुक्त जनता दलाचे नेते बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी राजा यांच्यासह विविध पंधरा पक्षांचे नेते उपस्थित होते. तानाशाहीच्या विरोधात आपण एकजुटीने लढा देऊ, असं सांगतानाच ठाकरे यांनी, विरोधकांच्या एकजुटीची ही चांगली सुरुवात झाल्याचं मत व्यक्त केलं.
****
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाला भेट देऊन विद्यापीठाचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. ‘मिशन लाईफ’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं सुरु केलेली जागतिक लोकचळवळ असून, ती पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्याला प्रोत्साहन देते. या चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन यादव यांनी यावेळी केलं. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करुन मातृभाषेतून शिक्षण घेण्यांसंदर्भात पावलं उचलण्याची सूचनाही यादव यांनी यावेळी केली.
****
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा असून या माध्यमातून प्रशासनानं जनतेला पारदर्शकपणे आणि विहित कालावधीत सेवा द्याव्यात, अशा सूचना राज्यसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिल्या आहेत. त्या आज अहमदनगर जिल्ह्यात अकोले इथं आढावा बैठकीत बोलत होत्या. जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे ��नलाईन सेवा देण्यासाठी हा कायदा करण्यात आला असून जनतेच्या सेवापूर्ततेमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशीलता अधिक प्रगल्भ करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. सेवा देण्यास विनाकारण विलंब झाला तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची कायद्यात तरतूद असून अशी वेळ कुठल्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येऊ देऊ नये असं त्या म्हणाल्या.
****
उत्तर काश्मीरमध्ये आज कुपवाडा जिल्ह्यात माछिल सेक्टरमध्ये सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाबरोबरच्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. हे सर्वजण नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत असताना, ही कारवाई करण्यात आली. या मृत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आली. या महिन्याच्या १६ तारखेला उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ जुमागुंड भागात पाच दहशतवादी मारले गेले होते.
****
राज्यात नैर्ऋत्य मोसमी वारे दाखल होण्यास विलंब होत असून पावसानं प्रचंड ओढ दिली आहे. त्यामुळं राज्यातील धरणांतील पाणीसाठा झपाट्याने घटला असून सुमारे ६० जलाशयांनी पूर्णपणे तळ गाठला आहे. उर्वरित धरणांमधील पाण्याची स्थितीही चिंताजनक आहे. जून महिन्यात राज्यातील सहाही विभागांत असलेल्या धरणांची पाणीपातळी २३ टक्क्यांवर आली असून ती गेल्या वर्षीपेक्षा चार टक्क्यांनी कमी आहे. राज्यात जलसंपदा विभागाचे सहा प्रादेशिक विभाग आहेत. या विभागांत दोन हजार ९८९ मोठे, तर दोन हजार ��९० मध्यम प्रकल्प आहेत. मागील कांही वर्षांत मुख्य धरणांच्या क्षेत्रात पावसाळय़ात दमदार पाऊस होत असल्यानं आणि जूनमध्ये पावसाला सुरुवात होत असल्यानं धरणांमध्ये किमान पाणीसाठा शिल्लक राहत असे. मात्र, यंदा बिपरजॉय चक्रीवादळ, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे वेळेवर तयार न होणं, समुद्रात वादळासारखी स्थिती अशा विविध कारणांमुळे मोसमी पाऊस पोहोचण्यास विलंब झाला आहे.
****
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत एम.बी.ए. शिक्षणक्रमाला ऑल इंडिया कौन्सील फॉर टेक्निकल एज्युकेशन - एआयसीटीई ची मान्यता मिळाली आहे. याबाबतची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांनी केली. ही मान्यता पुढील पाच वर्षांसाठी असून दरवर्षी दहा हजार विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या एमबीएला प्रवेश घेता येणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं एसटी बस स्थानकात आज प्रवासी आणि नाग��िकांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रवाशांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. स्थानक नियंत्रक शिवाजी बांगर यांच्यासह नशा मुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी विशाल अग्रवाल हे यावेळी उपस्थित होते. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं १२ ते २६ जून या कालावधीत नशा मुक्त भारत पंधरवडा राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत आज प्रवासी नागरिकांना व्यसनमुक्तीचा संकल्प देण्यात आला.
****
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी वारीदरम्यान आपली सेवा प्रदान केली. १८ ते २२ जून या कालावधीत लोणंद ते फलटण या मार्गावर यशस्वीरित्या ही सेवा राबवण्यात आली. स्वच्छ वारी, निर्मल वारी, स्वस्थ वारी, हरित वारी आणि यंदा विशेष म्हणजे प्लास्टीकमुक्त वारी अशी विविध अभियानं आणि उपक्रम यावेळी वारीत राबवण्यात आले.
****
लातूरसह राज्यात सुरु असलेली गोवर्धन गोवंश सेवाकेंद्र ही नवीन सुधारीत योजना सुरु करण्याबाबत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गोशाळा चालकांनी २२ जून  ते २१ जुलै २०२३ या कालावधीत अर्ज सादर करण्याचं आवाहन लातूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी केलं आहे. या योजनेंतर्गत निवडण्यात येणाऱ्या गोशाळेस त्यांच्याकडे असलेल्या पशुधन संख्येनुसार दोन टप्प्यात अनुदान देण्यात येणार आहे. गोशाळेत ५० ते १०० पशुधन असल्यास १५ लाख रुपये, १०१ ते २०० पशुधन असल्यास २० लाख रुपये आणि २०० पेक्षा जास्त पशुधन असल्यास २५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
****
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी. चे रूग्णालय उभारणार – कामगार मंत्री हसन मुश्रीफ
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी. चे रूग्णालय उभारणार – कामगार मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि.1 : राज्यातील प्रत्येक कामगारांना तसेच गरजवंताना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ई.एस.आय.सी.) किमान 30 बेडचे एक रूग्णालय उभारण्यात ��ेणार असून या महामंडळाच्या दहा किलोमिटरपुढे एक रूग्णालय ही अट काढण्यात येणार असून आता लोकसंख्या तसेच आवश्यकतेनुसार रूग्णालय उभारण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री तथा कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी.चे रूग्णालय उभारणार - कामगार मंत्री हसन मुश्रीफ
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी.चे रूग्णालय उभारणार – कामगार मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. 1 : राज्यातील प्रत्येक कामगारांना तसेच गरजवंताना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ई.एस.आय.सी) किमान 30 बेडचे एक रूग्णालय उभारण्यात येणार असून या महामंडळाच्या दहा किलोमिटरपुढे एक रूग्णालय ही अट काढण्यात येणार असून आता लोकसंख्या तसेच आवश्यकतेनुसार रूग्णालय उभारण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री तथा कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे…
View On WordPress
0 notes