#आव्हाड
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 8 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 March 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १२ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि. • **** • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉरिशसच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान, आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात होणार सहभागी • प्रार्थनास्थळांच्या भोंग्यांबाबत नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश • विधीमंडळात अर्थसंकल्पावरील चर्चेला प्रारंभ-ढासळलेली आर्थिक स्थिती अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाल्याची विरोधकांची टीका • राज्य सरकारकडून जन्म -मृत्यू नोंदणी अधिनियमात बदल, सबळ पुरावे नसल्यास होणार फौजदारी कारवाई • मराठवाड्यात मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची अर्जुन खोतकर यांची मागणी आणि • धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्ग सर्वेक्षणाला मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि की ऑफ द इंडियन ओशन, हे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. मॉरिशसचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी काल भारतीय समुदायातल्या नागरीकांच्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली. मोदी हे या पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा हा २१ वा पुरस्कार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
प्रार्थनास्थळांवर भोंग्यांच्या वापराबाबतच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल विधानसभेत आमदार देवयानी फरांदे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. भोंग्यांची आवाजाची मर्यादा तपासणीची जबाबदारी संबंधित पोलिस निरीक्षकाकडे सोपवत असल्याचं, त्यांनी सांगितलं. अशा प्रकरणात कठोर कारवाई करता यावी, यासाठी संबंधित नियमात सुधारणा करून देण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ��े म्हणाले… बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय यापुढे मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात येणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. आमदार सुधीर मुनगंटीवार, राहुल कुल, वरूण सरदेसाई यांनी, दारूबंदीसाठीच्या मतदानाच्या नियमावलीत बदल करण्याची मागणी केली. यात ५० टक्के ऐवजी ७५ टक्के मतदारांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केल्यास, दारू दुकानाची मान्यता रद्द करण्यासाठीच्या यासंदर्भातल्या नियमात बदल करण्याचं आश्वासनही, पवार यांनी यावेळी दिलं.
राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. काल सदनात अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरवात करताना ते बोलत होते. या अर्थसंकल्पात जुन्या घोषणांचेच बुडबुडे असून दिशाभूल करण्यात आल्याचं दानवे यांनी नमूद केलं. ते म्हणाले… बाईट – अंबादास दानवे भाजपचे प्रसाद लाड यांनी, या अर्थसंकल्पातून राज्याच्या विकासाची दिशा बदलेल, असं सांगत, विकास आणि वारसा याची सांगड असलेला हा अर्थसंकल्प असल्याचं मत व्यक्त केलं. काँग्रेसचे भाई जगताप यांनी, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याचं आश्वासन या अर्थसंकल्पातून पाळलं नसल्याची टीका केली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हा अर्थसंकल्प कोणाच्याही कामाचा नसलेला दिशाहीन अर्थसंकल्प असल्याची टीका केली.
विधानसभेतही काल अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षाने केवळ आकर्षक घोषणा करत आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र अर्थसंकल्पात याची अंमलबजावणी केली नाही, अशी टीका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. हा अर्थसंकल्प राज्याला कर्जाच्या खाईत ढकलणारा असल्याची टीका कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चर्चेत सहभाग घेत, या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीही नसून हा श्रीमंतांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या चर्चेत बोलतांना, राज्यातल्या अडचणींना तोंड देत हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडल्याबद्दल अर्थमंत्र्यांचं अभिनंदन केलं. जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी, विरोधकांचे आरोप खोडून काढत, कृषी, रोजगार, सामाजिक विकास या सर्व क्षेत्रांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सांगितलं. मराठवाड्यात मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. मोसंबी रस अधिकाधिक दिवस टिकावा, यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करावं, असं ते म्हणाले, बाईट – अर्जुन खोतकर
राज्य सरकारने जन्म -मृत्यू नोंदणी अधिनियमात बदल केले आहेत. जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ मधल्या तरतू��ीनुसार तसंच महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम, २००० नुसार एका वर्��ापेक्षा जास्त विलंबाच्या जन्म-मृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. ज्यांचा जन्म अथवा मृत्यू होऊन एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल आणि त्यांच्या संबंधितांना ही प्रमाणपत्रे पाहिजे असतील, तसंच त्याबाबतचे सबळ पुरावे नसतील, अशा अर्जदाराविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड-सोयगाव मतदारसंघातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशनच्या प्रलंबित पाणीपुरवठा योजना दोन महिन्यांत पूर्ण कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रलंबित ४८ प्रकल्पांतल्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी आणि काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना पाटील यांनी केली.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या २४० किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी सहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती, खासदार बजरंग सोनवणे यांनी समाजमाध्यमांवरून दिली. छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगांव या ९३ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही, दोन कोटी ३२ लाख रुपये मंजूर झाले असून, याबाबतचं पत्र रेल्वे विभागानं जारी केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, अहिल्यानगर- बीड - परळी या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचं काम पूर्ण झालं असून या मार्गाचं काम जलदगतीनं सुरू असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं.
पुण्यात स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून, २२ सुरक्षा रक्षक बदलण्यात आले आहेत. परिवहन म��त्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली. एसटी प्रवाशांच्या प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेसंदर्भात हयगय झाल्यास, कठोर कारवाईचे संकेत, सरनाईक यांनी दिले.
धाराशिव जिल्ह्यात शेतीसोबतच पर्यटन क्षेत्रात प्राधान्यानं काम करणार असून, जलयुक्त शिवार, फळबाग लागवड, दळणवळण या क्षेत्राचा विकास करणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी केलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यातल्या दीडशे पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असून यात महिला बचत गटांना सहभागी करणार असल्याचं पुजार यांनी सांगितलं.
श्रीशैल्य उटगे यांनी काँग्रेसच्या लातूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीन��मा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिल्याचं उटगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
होळीचा सण उद्या साजरा होणार आहे. होळी तसंच धुलिवंदन साजरा करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या महावितरण विभागातर्फे करण्यात आलं आहे. दरम्यान, या सणांच्या काळात शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. जिल्हा शांतता समिती आणि विभागप्रमुखांच्या काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
लातूर स्त्री रोग संघटनेतर्फे 'सुरक्षित मातृत्व' या विषयावर काल एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भावस्थेतील काळजी, आहार, आरोग्य तपासणी याविषयी मार्गदर्शन केलं.
धाराशिव जिल्ह्यात तसंच सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात वाघाचा वावर आढळून आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्वर अभयारण्यातून हा वाघ स्थलांतरित झाला असण्याची शक्यता असून, भूम, वाशी, कळंब, परंडा, येडशी-रामलिंग घाट आणि बार्शी वन परिक्षेत्रात या वाघाचा वावर दिसून येत आहे.
नांदेड रेल्वे स्थानकावरील विस्तारीकरणाच्या कामानिमित्त नांदेड ते छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस १४ मार्च रोजी आणि परभणी ते नांदेड एक्स्प्रेस आज, उद्या आणि १५ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागातर्फे ही माहिती देण्यात आली.
0 notes
nagarchaufer · 19 days ago
Text
सर्व महत्त्वाचे पेपर उरकून गेल्यानंतर ‘ त्या ‘ निलंबित नायब तहसीलदाराचा कारनामा उघडकीस
सर्व महत्त्वाचे पेपर उरकून गेल्यानंतर ‘ त्या ‘ निलंबित नायब तहसीलदाराचा कारनामा उघडकीस
निलंबित असलेल्या एका नायब तहसीलदाराने शासकीय ओळखपत्राचा दुरुपयोग करत बेकायदेशीरपणे परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवला असल्याचा प्रकार पाथर्डीत समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे सर्व महत्त्वाचे पेपर उरकून गेल्यानंतर ही बाब समोर आलेली आहे.  पाथर्डी ये��ील सामाजिक कार्यकर्ते हरिहर गर्जे आणि किसन आव्हाड यांनी प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर एकच खळबळ उडालेली असून निलंबित नायब तहसीलदार अनिल…
0 notes
deshbandhu · 1 month ago
Text
Rajniti me Koi Kisi Ka Dushman Nahi, Kisi Ko Bhi Diya Ja Sakta Samman : Jitendra Awhad
मुंबई। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एसपी) के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार के शिवसेना प्रमुख एवं महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे क�� गौरव सम्मान दिए जाने पर शिवसेना (यूबीटी) सांसद संजय राउत नाराज हैं। एनसीपी (एसपी) विधायक जितेंद्र आव्हाड ने इस पर कहा कि कोई भी किसी को सम्मान दे सकता है, राजनीति में कोई किसी का दुश्मन नहीं हो सकता।
एनसीपी (एसपी) विधायक जितेंद्र आव्हाड ने कहा, "ये बात गलत है।
Click to read more: https://www.deshbandhu.co.in/states/in-politics-no-one-is-anyone-enemy-anyone-can-be-respected-jitendra-awhad-534871-1
0 notes
automaticthinghoagiezine · 10 months ago
Video
youtube
नाशिक भाजपचे आंदोलन जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन..
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
dainiksamachar · 1 year ago
Text
महाराष्ट्र के तीन जिलों में इंटरनेट बंद, करोड़ों का नुकसान, ठाणे में आव्हाड को मंच से उतारा गया
मुंबई: में आरक्षण को लेकर चल रहा मराठा आंदोलन अब राज्य के अन्य जिलों में फैल गया है। राज्य में हिंसा की घटनाओं को देखते हुए तीन दिनों में इंटरनेट की सेवाएं जहां बंद हैं तो तो वहीं दूसरी बीड जिले में अभी भी हालात ठीक नहीं हो पाए गए हैं। प्रदर्शनकारियों ने विधायक संदीप क्षीरसागर के आवासीय घर में आगजनी को अंजाम दिया था। तब से खासी सर्तकता बरती जा रही है। राज्य के संभाजीनगर इलाके में पिछले 29 से 31 अक्टूबर के बीच हुई घटनाओं के सिलसिले में पुलिस ने 54 मामले दर्ज करते हुए 106 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। जिनमें से 20 मामले बीड जिले में सामने आए हैं। राज्य के बीड शहर में कर्फ्यू के आदेश लागू हैं। इसके अलावा बीड, संभाजीनगर ग्रामीण और जालना जिलों में इंटरनेट सेवाएं पूरी तरह से बंद हैं। अब तक 17 कंपनियों की तैनाती राज्य में 24 से 31 अक्टूबर के बीच महाराष्ट्र में कुल 141 मामले दर्ज किए गए हैं और 168 आरोपियों को गिरफ्तार किया गया है, जबकि 146 आरोपियों को आईपीसी की धारा 41 के तहत नोटिस दिया गया है। मराठा आरक्षण आंदोलन के बाद पूरे महाराष्ट्र में लगभग 12 करोड़ रुपये की सार्वजनिक संपत्ति को नुकसान पहुंचा है। जिन इलाकों में अतिरिक्त पुलिस बल की जरूरत है वहां अतिरिक्त पुलिस बल तैनात किया गया है। राज्य में अब तक एसआरपीएफ की 17 कंपनियां अलग-अलग जगहों पर तैनात की जा चुकी हैं। बीड जिले में कानून व्यवस्था बनाए रखने के लिए रैपिड एक्शन फोर्स की एक कंपनी भेजी गई है। इसके अतरिक्त सात हजार होम गार्ड भी तैनात किए गए हैं। आदेश में कहा गया है कि छत्रपति संभाजीनगर के ज्यादातर हिस्सों में बुधवार शाम से अगले 48 घंटों के लिए मोबाइल व ब्रॉडबैंड इंटरनेट सेवाएं निलंबित रहेंगी। आव्हाड को मंच से उतर जाने को कहाठाणे शहर में अनिश्चितकालीन अन��न कर रहे मराठा आरक्षण समर्थकों ने एनसीपी के नेता जितेंद्र आव्हाड से उस मंच से उतर जाने को कहा। यहां पर मराठा प्रदर्शनकारी बैठक हुए थे। यह घटना 31 अक्टूबर की देर रात हुई। जिलाधिकारी कार्यालय के सामने 28 अक्टूबर से धरना दे रहे आरक्षण समर्थक कार्यकर्ताओं ने कहा कि वे नहीं चाहते कि उनके आंदोलन पर राजनीतिक नेता कब्जा कर लें। राज्य के पूर्व कैबिनेट मंत्री आव्हाड राकांपा की शहर इकाई के अध्यक्ष सुहास देसाई के साथ ‘सकल मराठा समाज’ के प्रदर्शनकारी कार्यकर्ताओं से मिलने गए थे। आव्हाड को मंच पर देखकर प्रदर्शनकारियों ने चिल्लाते हुए कहा कि मंच पर किसी भी राजनीतिक दल का कोई नेता नहीं है। हम नहीं चाहते कि इस आंदोलन पर राजनीतिक दल कब्जा कर लें। क्या आप हमें आरक्षण देने जा रहे हैं? नहीं। तो फिर आपके लिए मंच पर कोई जगह न��ीं है। नीचे उतरो, नीचे उतरो। बाद में आव्हाड मौके से चले गए। मराठा आरक्षण की मांग कर रहे लोग ठाणे में अलग-अलग जगहों पर अनिश्चितकालीन अनशन कर रहे हैं। http://dlvr.it/SyFQCs
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
सोलापूर: अक्कलकोट येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध
https://bharatlive.news/?p=170864 सोलापूर: अक्कलकोट येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जितेंद्र आव्हाड ...
0 notes
nbi22news · 2 years ago
Video
youtube
#nbinewsmarathi: श्रीराम-हनुमंताबद्दल हिंदूंच्या मनात आस्था, आव्हाड सांभ...
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
“नाशिककरांना विनंती, हे जगात मोठं स्थान”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं वेदोक्त प्रकरणावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली?
नाशिक : माजी खासदार संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांना नाशिकच्या काळाराम मंदिरात महंतांनी वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केला. त्यानंतर त्यांनी ��्या घटनेविषयी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला होता. यावेळी त्यांनी छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका असा इशाराही त्यांनी महंताना दिला होता. त्यानंतर राज्यात जोरदार खळबळ माजली आहे. त्यावरूनच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला इशारा दिला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
प्रार्थनास्थळांच्या भोंग्यांबाबत नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
विधीमंडळात अर्थसंकल्पावरील चर्चेला प्रारंभ-ढासळलेली आर्थिक स्थिती अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाल्याची विरोधकांची टीका
मराठवाड्यात मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची अर्जुन खोतकर यांची मागणी
आणि
धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्ग सर्वेक्षणाला मंजुरी
****
प्रार्थनास्थळांवर भोंग्यांच्या वापराबाबतच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज विधानसभेत आमदार देवयानी फरांदे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. भोंग्यांची आवाजाची मर्यादा तपासणीची जबाबदारी संबंधित पोलिस निरीक्षकाकडे सोपवत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अशा प्रकरणात कठोर कारवाई करता यावी, यासाठी संबंधित नियमात सुधारणा करून देण्याची विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय यापुढे मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी देण्यात येणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. आमदार सुधीर मुनगंटीवार, राहुल कुल, वरूण सरदेसाई यांनी दारूबंदीसाठीच्या मतदानाच्या नियमावलीत बदल करण्याची मागणी केली. यात ५० टक्के ऐवजी ७५ टक्के मतदारांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान केल्यास दारू दुकानाची मान्यता रद्द करण्यासाठीच्या यासंदर्भातील नियमात बदल करण्याचं आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.
****
राज्याची ढासळलेली आर्थिक स्थिती अर्थसंकल्पात प्रतिबिंबित झाल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आज सदनात अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरवात करताना ते बोलत होते. या अर्थसंकल्पात जुन्या घोषणांचेच बुडबुडे असून दिशाभूल करण्यात आल्याचं दानवे यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट – अंबादास दानवे
विधानसभेतही आज अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली. निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षाने केवळ आकर्षक घोषणा करत आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र अर्थसंकल्पात याची अंमलबजावणी केली नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. हा अर्थसंकल्प राज्याला कर्जाच्या खाईत ढकलणारा असल्याची टीका कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. उद्योग क्षेत्रात राज्याची पिछेहाट झाली असून एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी कुठलाही रोडमॅप यात दिसत नाही असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चर्चेत सहभाग घेत, या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीही नसून हा श्रीमंतांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या चर्चेत बोलतांना, विकासचक्राला गती देण्याचं काम या अर्थसंकल्पातून झाल्याचं सांगितलं. तर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी, विरोधकांचे आरोप खोडून काढत, कृषी, रोजगार, सामाजिक विकास या सर्व क्षेत्रांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सांगितलं. मराठवाड्यात मोसंबी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची मागणी अर्जुन खोतकर यांनी केली. मोसंबी रस अधिकाधिक दिवस टिकावा, यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करावं, असं आवाहन करत, यामुळे मोसंबीला चांगला भाव मिळेल, असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
बाईट – अर्जुन खोतकर
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड-सोयगाव मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशनच्या प्रलंबित पाणीपुरवठा योजना दोन महिन्यांत पूर्ण कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रलंबित ४८ प्रकल्पांतील ठेकेदारांवर कडक कारवाई करावी आणि काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
****
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अतुल सावे यांनीही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
****
केंद्र सरकारनं उडदाच्या आयातीला ३१ मार्च २०२६ पर्यंत ��ुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातली अधिसूचना आज परकीय व्यापार महासंचालनालयानं जारी केली. उडदाच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत यावर्षी ३१ मार्चला संपणार होती. देशात म्यानमार, सिंगापूर, थायलंड आणि ब्राझीलमधून उडदाची आयात होते.
****
सरकारी शाळांच्या शिक्षण पद्धतीत सुधार करण्याची गरज खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे. ते आज राज्यसभेत शिक्षण मंत्रालयाच्या कार्यपद्धतीवरच्या चर्चेत बोलत होते. जिल्हा परिषदा तसंच महापालिकांच्या शाळांमध्ये शिक्षण मोफत उपलब्ध असून, इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होत असल्याकडे पटेल यांनी लक्ष वेधलं. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या तरुणांना आपल्याच देशात त्याच दर्जा���ं शिक्षण मिळण्याच्या गरजेवर पटेल यांनी भर दिला. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी, आम आदमी पक्षाचे संजय सिंह आदी मान्यवरांनी या चर्चेत सहभाग घेत, आपली मतं मांडली.
****
केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या २४० किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी दिली आहे. यासाठी सहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी समाजमाध्यमांवरून दिली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगांव या ९३ किमीच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही २ कोटी ३२ लाख रूपये मंजूर झाले असून याबाबतचे पत्र रेल्वे विभागानं जारी केलं असल्याचंही सोनवणे यांनी सांगितलं. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्यासोबत या रेल्वे मार्गाची आज ॲानलाईन पाहणी केल्याचं सोनवणे यांनी सांगितलं, हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असं आश्वासनही सोनवणे यांनी दिलं. दरम्यान, अहिल्यानगर- बीड - परळी या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून या मार्गाचं काम जलदगतीनं सुरू असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एक लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांत जवळपास ४६ हजार जणांचा मृत्यू झाला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. मद्यपान तसंच अन्य अंमली पदार्थांचं सेवन तपासणारी यंत्रं मागवणार असल्याचं सरनाईक यांनी नमूद केलं.
****
धाराशिव जिल्ह्यात शेती व्यवसायासोबतच पर्यटन क्षेत्रात प्राधान्यानं काम करणार असून जलयुक्त शिवार, फळबाग लागवड, दळणवळण या क्षेत्राचा विकास करणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी आज पत्रकार परिषदेत केलं. जिल्ह्यातल्या दीडशे पर्यटनक्षेत्रांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असून यात महिला बचत गटांना सहभागी करणार असल्याचं पुजार यांनी सांगितलं.
****
होळी आणि धुलिवंदन साजरा करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या महावितरण विभागातर्फे करण्यात आलं आहे. होळी पेटवताना मोकळ्या जागेचा वापर करा तसंच रंग खेळताना वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका यासारख्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे.
****
लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जागेसाठी आवश्यक असलेल्या तीन कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला पुरवणी मागण्या��मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. २०१३ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली. या रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची दहा एकर जागा निश्चित करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दिग्रस बंधाऱ्या नंतर अंतेश्वर उच्च पातळी बंधारा आणि त्यानंतर नांदेड येथील विष्णुपुरी बंधाऱ्यात पाण्याचा प्रवाह सुरू राहणार आहे.
****
नांदेड रेल्वे स्थानकावरील विस्तारीकरणाच्या कामानिमित्त नांदेड ते छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस १४ मार्च रोजी आणि परभणी ते नांदेड एक्स्प्रेस १२, १३ आणि १५ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे असं रेल्वे विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
गांधी हम शर्मिंदा है आपके कातिल जिंदा है
गांधी हम शर्मिंदा है आपके कातिल जिंदा है
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिलेली असून त्यांच्या फेसबुक पोस्टची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे काय आहे जितेंद्र आव्हाड यांची फेसबुक पोस्ट ?  गांधी कभी मरते नही ! 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली. जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा बंगाल आणि देशातील उच्चवर्णीयांचे काँग्रेसमध्ये वर्चस्व होते.…
0 notes
trendingwatch · 2 years ago
Text
पुलिस पर कोई राजनीतिक दबाव नहीं, अवध के छेड़छाड़ मामले पर सीएम शिंदे ने कहा; विधायक की जमानत पर सुनवाई आज
पुलिस पर कोई राजनीतिक दबाव नहीं, अवध के छेड़छाड़ मामले पर सीएम शिंदे ने कहा; विधायक की जमानत पर सुनवाई आज
महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सोमवार को कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) के नेता जितेंद्र आव्हाड के खिलाफ जांच में कोई राजनीतिक हस्तक्षेप नहीं होगा, जिन पर भारतीय जनता पार्टी (भाजपा) की कार्यकर्ता से कथित तौर पर छेड़छाड़ का मामला दर्ज किया गया है। पारदर्शिता से किया जायेगा। “महिला द्वारा शिकायत के अनुसार प्राथमिकी दर्ज की गई थी। पुलिस जांच करेगी और आवश्यक कार्रवाई करेगी।…
View On WordPress
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
youtube
आ.जितेंद्र आव्हाड सद्याच्या राजकीय घडामोंडीवरी..
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
मंगल गिरी यांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी , जितेंद्र आव्हाड म्हणाले की ?
मंगल गिरी यांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी , जितेंद्र आव्हाड म्हणाले की ?
सोशल मीडियावर आपल��� व्हिडिओ शेअर करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एसटी महामंडळातील कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी मंगल गिरी यांना महागात पडले असून महामंडळाकडून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाचा युनिफॉर्म घालून त्या व्हिडिओ शेअर करत असल्याने महामंडळाची प्रतिमा डागाळली गेली आहे असा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले होते. सोशल मीडियावर मात्र मंगल गिरी यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
मंगल गिरी यांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी , जितेंद्र आव्हाड म्हणाले की ?
मंगल गिरी यांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी , जितेंद्र आव्हाड म्हणाले की ?
सोशल मीडियावर आपले व्हिडिओ शेअर करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एसटी महामंडळातील कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी मंगल गिरी यांना महागात पडले असून महामंडळाकडून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाचा युनिफॉर्म घालून त्या व्हिडिओ शेअर करत असल्याने महामंडळाची प्रतिमा डागाळली गेली आहे असा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले होते. सोशल मीडियावर मात्र मंगल गिरी यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
आम्हाला वाईट वाटण्याचे कारण नाही, अजित पवार आमचेच: जितेंद्र आव्हाड
https://bharatlive.news/?p=157362 आम्हाला वाईट वाटण्याचे कारण नाही, अजित पवार आमचेच: जितेंद्र ...
0 notes