#आय��ीएल २०२२
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन आज देशासह जगभरात अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातल्या ७५ प्रसिद्ध स्थळांवर आज सकाळी योगाभ्यास करण्यात आला. “मानवतेसाठी योग” ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ लेणी परिसरात योगाभ्यास घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्ह्यातले वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी यांच्यासह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
****
अग्नीपथ योजनेच्या मुद्यावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह यांनी केला आहे. ते आज कोची इथं वार्ताहरांशी बोलत होते. या योजनेला विरोध करणारे नागरीकांना चुकीची माहिती देत असल्याचं ते म्हणाले. सरकार सैन्यात युवकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत असून, यावर कारगिल समिक्षा समितीच्या काळापासूनच काम सुरु असल्याचं व्ही के सिंग म्हणाले. अजय विक्रम समितीच्या शिफारशीनुसार, कार्यकाळ संपल्यानंतर अग्नीवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि अर्धसैनिक दलात भरती करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
अग्नीपथ योजनेमुळे अधिक सुदृढ, सक्षम आणि सर्वसमावेशक सशस्त्र दल निर्माण होईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. सुधारणांना पाठबळ देणाऱ्या भारतानं या योजनेला आपला भक्कम पाठिंबा दर्शवला असून, यामुळे अग्निवीरांसाठी भविष्यातील वाटचालीचा मार्ग प्रशस्त झाला आहे असंही जयशंकर यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांसाठी उत्पादन संलग्न अनुदान म्हणजे पी एल आय योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. डिझाइन आधारित उत्पादनासाठी अतिरिक्त अनुदान रक्कम जाहीर करण्यात आली आहे. या उत्पादनांना सध्या��्या अनुदानापेक्षा एक टक्का जास्त अनुदान मिळेल, असं वाणिज्य मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. २०२२-२३ साठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्यात आली होती.
****
भारतीय तटरक्षक दलात ८४० स्क्वाड्रन या नावानं नवीन विमानांचं पथक काल तयार करण्यात आलं. पूर्व तटरक्षक दलाचे महानिरीक्षक ए. पी. बडोला यांच्या उपस्थितीत पारंपरिक जलतोफांच्या सलामीत पहिलं ए एच एच विमान ताफ्यात दाखल करण्यात आलं. पूर्व भागात अशा प्रकारे पहिलंच विमान सुरक्षा दलांकडून दाखल करण्यात आलं आहे.
****
यू पी आय व्यवहारांमध्ये भारत जगात अग्रेसर असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सायबर सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षाविषयक राष्ट्रीय चर्चासत्रात काल ते बोलत होते. चालू आर्थिक वर्षात देशातील यूपीआयद्वारे आर्थिक व्यवहार एक हजार अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाल्याचं त्यांनी सांगितलं. सायबर हल्ले आणि सायबर गुन्हेगारी हे देशासमोरचं सर्वांत मोठं आव्हान असल्याचं शहा यांनी नमूद केलं.
****
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेनुसार यावर्षीच्या पालखी सोहळयात ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषासह संविधानाचाही गजर केला जाणार आहे. कोविड विषयक निर्बंधांमुळे दोन वर्ष खंडित करावी लागलेली ‘ज्ञानोबा-तुकोबांची’ पंढरपूरला जाणारी पालखी यावर्षी मोठ्या उत्साहात प्रस्थान करत असून या पालखी सोबत संविधान दिंडीही काढली जाणार आहे.
देशाचं संविधान देखील आपल्या संतांनी दिलेल्या समता, बंधुभाव आणि सामाजिक न्याय या मूलतत्वांवर आधारित आहे. आजच्या पिढीला आपल्या अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी, देशाचे नागरिक जबाबदार व्हावेत, या उद्देशाने ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोषाच्या निनादात निघणाऱ्या पालखी सोहळ्यात यावर्षी संविधान दिंडीचाही समावेश केला असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.
****
कोविड-19 पूर्वी प्रवाशांच्या सेवेत असलेली नगरसोल-चेन्नई-नगरसोल साप्ताहिक एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत पुन्हा सुरु करण्याचा निर्णय दक्षिण रेल्वेनं घेतला आहे. चेन्नई- नगरसोल ही गाडी २६ जूनपासून दर रविवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी चेन्नई सेन्ट्रल रेल्वे स्थानकावरून सुटेल, आणि रेणीगुंठा, कर्नुल, काचीगुडा, निझामाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे नगरसोल इथं सोमवारी सकाळी अकरा वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २७ जूनपासून दर सोमवारी दुपारी दीड वाजता नगरसोल रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि मंगळवारी दुपारी ��ाडे तीन वाजता चेन्नईला पोहोचेल.
****
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी १८ हॉकीपटूंचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून, मनप्रीतसिंग या संघाचं नेतृत्व करणार आहे. बर्मिंगहॅम इथं २९ जुलैपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. भारत इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घानासह पूल बी मध्ये समाविष्ट आहे. भारताचा पहिला सामना ३१ जुलैला घानाबरोबर होणार आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 March 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ मार्च २०२२ दुपारी १.०० वा. ****
देशातली आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा दोन वर्षांच्या कालावधीनंतर आज मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं मार्च २०२० मध्ये कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित केली होती. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं कठोर पालन केलं जाईल. जगभरात झालेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीमुळे आणि योग्य त्या सल्लामसलतीनंतर अनुसूचित व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंत्रालयानं घेतला आहे.
****
जागतिक आरोग्य संघटनेचं पारंपरिक औषधांचं जागतिक केंद्र गुजरातमधल्या जामनगर इथं स्थापन करण्यात येणार आहे. यासंदर्भातल्या सामंजस्य करारावर आयुष सचिव राजेश कोटेजा आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महानिदेशक अधानम गैब्रेयसिस यांनी स्वाक्षऱ्या केल्या. औषधांचं हे जागतिक केंद्र भारतात स्थापन करण्याबाबतच्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८२ कोटी ८७ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात २५ लाख ८१ हजारांपेक्षा जास्त नागरीकांचं लसीकरण झालं. १२ ते १४ वयोगटातल्या एक कोटी पाच लाखांहून अधिक किशोरवयीन मुला मुलींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. तर दोन कोटी २४ लाख पाच हजार २२७ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८७वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
अतिसामान्य माणसाला समजेल अशा शैलीत लिखाण करणारे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे मराठीतले एकमेव विचारवंत असल्याचं मत, प्रसिद्ध समीक्षक सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. अमेरीका स्थित महाराष्ट्र फाऊंडेशनचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार चपळगावकर यांना सुधीर रसाळ यांच्या हस्ते आज औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरुप आहे. शासन किंवा समाजातल्या अनेक वाईट प्रवृत्तींचा दबाव समाजावर पडत असतो. त्याची वाईट फळं समाजाला भोगावी लागतात. या सगळ्यातून सावरायचं असेल तर समाजाला मार्गदर्शन करणारे विचारवंत सतत निर्माण होत राही��े पाहिजे, असं मत रसाळ यांनी यावेळी व्यक्त केलं. लोकशाही टिकवायची असेल तर समाजामध्ये ही प्रगल्भता येणं आवश्यक असल्याचं चपळगावकर यावेळी म्हणाले.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्र राज्य अनुसूचीत जाती-जमाती आयोगाची बैठक काल पार पडली. विद्यापीठात मागासवर्गीयांकरता असलेल्या तक्रार निवारण समितीनं तक्रार नोंदवण्यासाठी महिन्यातला निश्चित एक दिवस ठरवावा, असा सल्ला महाराष्ट्र राज्य अनुसूचीत जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी यावेळी दिला. कृषि विद्यापीठ करत असलेले संशोधन कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, आदिवासी शेतकरी बांधवासाठी असलेले उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले.
****
नवीन कामगार कायदा, खासगीकरण आदी मागण्यांसाठी देशातील कामगार २८ आणि २९ मार्चला संपावर जाणार आहेत. या संपात सुमारे पाच लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी, अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉईज फेडरेशनचे सचिव देविदास तुळजापूरकर यांनी दिली आहे. त्यामुळे २६ आणि २७ मार्चला सुटी असल्यानं बँका चार दिवस बंद राहणार आहेत. राज्यातील सात हजार बँक शाखातून काम करणारे जवळपास तीस हजार बँक अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. बँक खाजगीकरण, बॅंकामध्ये विविध पदांची भरतीसाठी कंत्राटी पद्धतीचा अवलंब करुन कामगारांचं शोषण, जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणे आदि मागण्यासाठी हा संप असल्याचं देविदास तुळजापूरकर यांनी सांगितलं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा प्राध्यापक भगवंत देशमुख विशेष वाङ्गमय पुरस्कार, युक्रांदचे संस्थापक आणि पुरोगामी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना आज औरंगाबाद इथं प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये, आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. व्यक्तिरंग या त्यांच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथावर नांदेड इथले पत्रकार संजीव कुलकर्णी हे भाष्य करणार आहेत. मसापच्या औरंगाबाद इथल्या डॉ. ना. गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आय पी एल २०२२ आजपासून सुरु होत आहे. यामध्ये दहा संघ सहभागी होत आहेत. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर आज पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 March 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ मार्च २०२२ दुपारी १.०० वा. ****
पश्चिम बंगालमधल्या बीरभूम हिंसाचार आणि जाळपोळ प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत. बीरभूम जिल्ह्यातल्या रामपूरहाट मध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता, यात दोन मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या प्रकरणावरुन आज राज्यसभेत झालेल्या गोंधळामुळे कामकाजात व्यत्यय आला. भाजपच्या खासदार रुपा गांगुली यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. यावरून तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे सदनाचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं.
****
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरचं प्रशासक तातडीनं हटवण्याची मागणी शिवसेनेनं आज विधानसभेत केली. बॅंकेवर सलग दहा वर्ष एकच प्रशासक असल्यानं तातडीनं निवडणूक जाहीर करावी, असं शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले. बँके��्या कामकाजामध्ये झालेल्या अनियमिततेमुळे रिजर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार शासनाच्या सहकार विभागानं मे, २०११ मध्ये बँकेचं तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन करून विनंती केली असून, मुख्यमंत्र�� न्याय देतील असा विश्वास आबिटकर यांनी व्यक्त केला.
दम्यान, राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेधनाचा आज समारोप होत आहे.
****
देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १८२ कोटी ५५ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात देशात लसीच्या २६ लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या. १२ ते १४ वयोगटातील ९० लाख सहा हजार मुलांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. तर दोन कोटी २२ लाख ६२ हजार ५८८ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
दरम्यान, देशात काल नव्या एक हजार ६८५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ८३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ४९९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २१ हजार ५३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम या वर्षी येत्या एक एप्रिलला नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाची ही पाचवी आवृत्ती असून या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षेतला ताणतणाव बाजूला ठेवून परीक्षेला सामोरे कसं जावं, याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी ते बारावीचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड ऑनलाइन स्पर्धेद्वारे केली जाते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ मार्चला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८७वा भाग असेल.
****
बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीचा धर्म कुठेही पाहावयास मिळत नाही, असं उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात सर्वत्र आघाडीचा धर्म पाळला जात असताना फक्त बीड मध्ये सातत्याने विरोधाला विरोध असं राजकारण सुरू आहे, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब घालू असं त्यांनी सांगितलं. शिव संपर्क अभियानांतर्गत लोकांना भेटून सरकारने केलेल्या विकास कामावर प्रतिक्रिया जाणून घेतल्या असत्या, काही लोकांनी समाधान व्यक्त केलं, काहींनी सूचना केल्या तर काही ठिकाणी तक्रारींचा सामना करावा लागला, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.
****
जालना-जळगाव या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या मध्य रेल्वेच्या पथकानं काल भोकरदन आणि राजूर इथं पाहणी केली. या भागातून कृषी मालाची होणारी आयात-निर्यात, प्रवासी वाहतूक, उद्योग, व्यवसाय याचा आढावा पथकानं घेतला. मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या मुख्य परिचालन अधिकारी व्ही. नलिनी, ��ुख्य यातायात अधिकारी रवीप्रकाश गुजराल, मुकेशलाल यांचा या पथकात समावेश आहे.
****
पी.व्ही.सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय आणि पारुपल्ली कश्यप हे चार भारतीय खेळाडू स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत. पी.व्ही.सिंधूचा सामना आज कॅनडाच्या मिशेल ली सोबत होईल तर श्रीकांतची लढत आज डेन अँडर्स अँटोनसेन सोबत होणार आहे. तर दुसरीकडे, एचएस प्रणॉयचा सामना पारुपल्ली कश्यपशी होणार आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आय पी एल २०२२ उद्यापासून सुरु होत आहे. यामध्ये दहा संघ सहभागी होत आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांना यंदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळांनं नव्यानं लीगमध्ये सहभागी करून घेतलं आहे. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर उद्या पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 February 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा. ****
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १७० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ५३ लाख ६१ हजार ९९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १७० कोटी ८७ लाख सहा हजार ७०५ मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत एक कोटी ५७ लाख १६ हजार २३७ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
****
महाराष्ट्र काँग्रेसनंच देशभरात कोरोना पसरवल्याच्या पंतप्रधानांच्या कथित विधानाविरुद्ध आज राज्यात काँग्रेस पक्षातर्फे निदर्शनं करण्यात येत आहेत. मुंबईमध्ये मंत्रालयासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच राज्यभरातल्या भाजपा कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.
****
वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या प्रकरणातला आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवण्यात आल्याचं, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. आरोपीनं एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक अंकिता पिसुर्डे हिला जिवंत जाळलं होतं. न्यायालय उद्या नगराळे याला शिक्षा सुनावण्याची शक्यता असल्याचं निकम यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रं, आजपासून संबधित कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध करून दिली जात आहेत. ही प्रवेशपत्रं डाऊनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना वितरीत करता येणार असून, त्यासाठी महाविद्यालयांनी कोणतंही वेगळं शुल्क आकारू नये असं मंडळाने परिपत्रकात म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना दोन अंतर्गत पाणलोट विकास योजना राज्यात राबवण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश, मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले आहेत. काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मृदेची धूप कमी करुन शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, हर या योजनेचं उद्दीष्ट असून, हा कार्यक्रम राज्यातल्या ३० जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार आहे.
****
वैद्यकीय शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यानं राज्यातल्या वैद्यकीय शिक्षकांनी असहकार पुकारणार असल्याचं जाहीर केलं असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचं शिक्षण, तसंच विविध अभ्यासक्रम, दंत वैद्यक, नर्सिंग, बीपीएमटी, डी एम एल टी, सी सी एम पी आदींच्या अध्यापनावर बहिष्कार टाकण्यात येणा�� असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे सचिव डॉ समीर गोलावर यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यातल्या लोदगा इथं उभारल्या जाणाऱ्या पहिल्या स्वयंचलित बांबू फर्निचर उद्योगाचं भूमीपूजन भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते काल झालं. सामूहिक शेतीत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बांबू लागवड शक्य असून, त्यातून शेतकऱ्यांच्या हाती अधिकचे पैसे पडतील, असं मुंडे यावेळी म्हणाल्या. लोदगा इथं सुरु होणाऱ्या या फर्निचर उद्योगासाठी पुढील दोन महिन्यात ११ यंत्रणा बसवण्यात येणार असल्याचं माजी आमदार पाशा पटेल यांनी यावेळी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी २०२१-२२ या वर्षासाठी, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. समाजातले जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असूनही, ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज २८ फेब्रुवारीपर्यंत परभणीच्या समाज कल्याण कार्यालयात सादर करावे असं आवाहन, समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी केलं आहे.
****
औरंगाबाद महापालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे, शहरात एन एम टी नॉन मोटोराईज्ड ट्रान्सपोर्ट पॉलिसी अर्थात, मोटारविरहीत वाहतूक धोरण आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या धोरणाद्वारे पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, ग्रीनवे आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
****
एफ आय एच प्रो-लीग २०२२ हॉकी स्पर्धेत भारतानं काल पहिल्या सामन्यात फ्रान्सवर पाच - शून्यनं विजय मिळवला. आज भारताचा दुसरा सामना दक्षिण अफ्रीकेबरोबर होणार आहे; भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता सामना सुरू होईल.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 April 2018 Time 6.50AM to 7.00AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २२ एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि. **** १२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी औरंगाबादमधल्या 'ऑरिक सिटी' चं काम २०२२ पर्यंत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी कोष विक्रीवर प्रती किलो ५० रुपये अनुदान देण्याचा सरकारचा प्रयत्न- राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि बीड इथ होणारं सहावं राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन आचारसंहितेमुळे रद्द ***** १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या अध्यादेशाद्वारे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांमध्ये सुधारणा होणार असून, १२ वर्षांखालील बालकांवर लैंगिक अत्याचारासाठी फाशी, १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या - किशोरवयीनांवर लैंगिक अत्याचारासाठी पूर्वीच्या १० वर्षांऐवजी २० वर्ष तुरुंगवास, किंवा जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. तसंच हा गुन्हा अजामीनपात्र असावा, असंही या अध्यादेशात प्रस्तावित आहे. अशा अत्याचाराच्या घटनांचा दोन महिने मुदतीत तपा�� करणं आणि त्या नंतरच्या दोन महिन्यात सुनावणी पूर्ण करणं बंधनकारक असावं, असंही या अध्यादेशात म्हटलं आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर अध्यादेश लागू होईल. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. फरार आर्थिक गुन्हेगार अध्यादेश २०१८ लाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या नवीन अध्यादेशानुसार आर्थिक गुन्ह्यात फरार असलेल्या तसेच कर्ज बुडव्यांची संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. **** औरंगाबादची ऑरिक सिटी ही राज्यातली सर्वात झपाट्यानं वाढणारी औद्योगिक वसाहत २०२२ पर्यंत पूर्ण केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड-ऑरिक बिडकीन या औद्योगिक क्षेत्राचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, मुख्यमंत्र्यांनी ऑरिक सिटीच्या माध्यमातून तीन लाख रोजगार निर्माण होणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले.... इथला ऑकर उद्योग हा युसोंगच्या रूपाने आलेला आहे. आणि योसोंग हि केवळ एक इंडस्ट्रि नाही आहे. एक मोठी वेन्डंर इंको सिस्टम आणि म्यानिफॉचरींग इंको सिस्टक जी त्यातनं उभी होणार आहे. यातनं कितीतरी हजार कोटीची इनवेस्टमेंन्ट ही तयार होणार आहे. आणि हि अतिशय इंन्टिग्रेटेड स्मार्ट सिटी ति आपण तयार करतो आहोत. ज्यामध्ये साधारणपणे तिन लाख लोकांना रोजगार मिळेल. अश्या प्रकारची अपेक्षा आहे. औद्योगिक वसाहतिनी केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करावा असं मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितलं. ते म्हणाले .. जेवढ्या एम.आय.डी.सी. असतील तेवढ्या औष्णीक केंद्र असतील. यांनी पहिल्यांदा पुढच्या तिन वर्षामध्ये महानगर पालिकांच जे सिवेज वॉटर आहे, प्रलिट करून वापरावं. ते जर कमी पडलं तर त्यांनी फ्रेश पाणी घ्यावं. काही प्रमाणात तर त्यांना फ्रेश पाणी लागणारचं आहे. पिण्याकरता लागणाऱ्या पण इंडस्ट्रियल युज करीता. याच पहिल मॉडेल आपण नागपूर येथे तयार केलं. आता ऑरिक मध्ये ते तयार करतोयं. नांदेडचं पाणी हे परळीला देण्या करीता औद्योगिक वौष्णीक केंद्राला त्याची आपण वैवस्था केली आहे. दिल्ली, मुंबई, औद्योगिक वसाहतित जमिनी संपादीत झा���ेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरचं शिबिर घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एक महिना आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सांगतोयं की, जे जे प्रश्न आहेतं ते सुचीबध करून त्याच्यावर ज्या काही उपाय योजना आहेत त्याचे काय निर्णय आहे ते तयार करा. आणि एक महिन्या नंतर येथे कॅम्प लावू त्या माध्यमातण शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडवू. केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच उद्योजक यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकार देशात विमान निर्मितीला प्राधान्य देत असून, औरंगाबाद डीएमआयसीमध्ये विमान निर्मिती प्रकल्प उभारण्याचा विचार करण्यात येईल, असं केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात ऑरिक ॲपचं लोकार्पण तसंच ऑरिक इरादा पत्रांचं हस्तांतरणही करण्यात आलं. दरम्यान, काल सकाळी निर्लेप उद्योग समुहाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमालाही मुख्यमंत्री उपस्थित होते, भोगले परिवारानं निर्लेप उद्योग समूहाच्या माध्यमातून मिळवलेलं यश, इतरांना प्रोत्साहित करणारं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे लिखित नीतिधुरंधर या दिवंगत नेते बाळासाहेब पवार यांच्यावरील चरित्र ग्रंथाचं प्रकाशनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. बाळासाहेब पवार यांच्या कामाचा भाव हा व्रतस्थ होता, अशा शब्दात त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. याशिवाय औरंगाबाद पोलिस परिक्षेत्राच्या ई- समन्स, एम पोलिस, आणि यथार्थ ॲपचं उदघाटनही मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले. पोलिस यंत्रणेनं नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण ५२ टक्क्यांनी वाढल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. **** प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल बीड जिल्ह्याला उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार देऊन काल गौरवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. जनतेला केंद्रस्थानी ठेवून योजना राबवल्या गेल्या तर, देशातल्या लोकांचं जीवनमान बदलू शकत असं, पंतप्रधान यावेळी म्हणाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यशासन शेतकऱ्यांना रेशीम कोष विक्रीवर प्रती किलो ५० रुपये अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत, प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारपेठेच्या उदघाटन प्रसंगी ते काल बोलत होते. देशातल्या एकूण रेशीम उत्पादनाच्या ५० टक्के उत्पादन मराठवाड्यात होतं, त्यामुळे जालना रेशीम कोष बाजारपेठेसाठी सहा कोटी रुपये निधी मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं. ‘महारेशीम अभियान’आणि ‘मनरेगा’च्या माध्यमातून रेशीम उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक मदत केली जात असल्याचं ते म्हणाले. **** बीड इथ होणारं सहावं राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन कालच्या उद्घाटनाच्या ��िवशी सकाळी साडेनऊला निघालेल्या व्यसनमुक्ती दिंडीनंतर आचारसंहितेच्या कारणावरून रद्द करण्यात आलं. उस्मानाबाद- लातूर -बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या विधान परिषद निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्याचे आदेश जारी झाल्यानं ते रद्द करावं लागलं. **** परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या ११० गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. पाणी फाऊंडेशनचे प्रमुख अविनाश पौळ यांनी काल परभणी इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जलसंधारणाच्या कामात शहरातल्या नागरिकांनाही सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. **** हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रसिध्द कवयित्री संध्या रंगारी यांना २०१७ चा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’जाहीर झाला आहे. लातूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी च्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ३० एप्रिल रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथं काल पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनादरम्यान काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली. औरंगाबाद - खुलताबाद रस्त्यावर वेरुळ टी पॉईंट इथं झालेल्या या आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून जवळपास शंभर जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. **** औरंगाबाद इथं महागामी या नृत्य प्रशिक्षण गुरुकुलातर्फे आयोजित दोन दिवसीय नृत्य महोत्सवाला काल सुरुवात झाली. पहिल्या दिवसाच्या सत्रात अष्ट प्रहर या कार्यक्रमातून दिवसाचे आठ प्रहर आणि काव्य, राग तसंच नृत्य यावर सादरीकरण झालं. **** लातूर इथं काल कबीर व्याख्यानमालेत ‘मराठी संत परंपरा आणि वर्तमान’या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांचं व्याख्यान झालं. आजच्या भौतीक प्रधान युगामध्ये नैतिक मूल्यं जपण्यासाठी संतांच्या विचाराची गरज असल्याचं मत, देशमुख यांनी व्यक्त केलं. *****
0 notes