#आयपीएल जाहिरात
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 15 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १५ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
राजस्थानमधल्या झूंझनू जिल्ह्यात कोलिहान खाणीत अडकलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीच्या दक्षता पथकातील १५ कर्मचाऱ्यांना आज बाहेर काढण्यात यश आलं आहे. काल रात्री कर्मचाऱ्यांना खाणीत घेऊन जाणारी लिफ्ट तुटल्यामुळं हे सर्वजण खाणीत अडकले होते.
****
७७ व्या कान चित्रपट महोत्सवाला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात झाली. या महोत्सवात भारत मंडपम् या भारतीय दालनाचं उद्घघाटन आज चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवात प्रथमच “भारत पर्व”चं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये जगभरातील नामवंत मान्यवर आणि प्रतिनिधी, चित्रपटकर्मी, खरेदीदार आणि विक्री प्रतिनिधी सहभागी होत आहेत. गोव्यात येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीचं अधिकृत फलक आणि ट्रेलरचं अनावरण ‘भारत पर्व’ मध्ये होणार आहे.
****
भारतीय सैन्यातील माजी कर्नल वैभव काळे यांना गाझा पट्टीत रफाह इथं वीरमरण आलं. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते संयुक्त राष्ट्र-यूएनच्या सैन्यात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. त्यांचं शिक्षण नागपूर इथं झालं होतं.
****
मुंबईत घाटकोपरच्या छेडानगर इथं वादळी वाऱ्यामुळं कोसळलेल्या लोखंडी जाहिरात फलकाखाली अडकलेल्या गाड्या काढण्याचं काम बचाव पथकामार्फत आजही सुरू आहे. महाकाय फलक कोसळल्यानं त्याखाली असलेल्या वाहनांमधून ��ंधन गळती होत आहे, तसंच कोसळलेल्या फलकामुळं पेट्रोल पंप प्रभावित झाल्यानं उपाययोजनेसाठीचे उपकरणं वापरण्यास अडचणी येत असून फलक हटवण्यासाठी अवजड यंत्रांचा वापर केला जात असल्याचं बचाव पथकाच्या सूत्रांनी सांगितलं.
****
घाटकोपर इथं होर्डींग दुर्घटनेनंतर नंदुरबार शहरात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नंदुरबार नगरपरिषद कार्यवाही करत आहे. शहरातील २२ खाजगी इमारतींवर होर्डींग उभारण्यात आलेले असून या सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडीट, आणि होर्डींग्ज स्थिरता प्रमाणपत्र पंधरा दिवसांच्या आत पालिकेला सादर करण्याच्या नोटीसा संबंधीतांना देण्यात आल्या आहेत. कुठेही धोकादायक किंवा विना परवानगी होर्डीग आढल्यास तात्काळ कारवाई होणार असल्याची माहीती नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीच्या नवीन योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. शहराला येत्या डिसेंबरपासून पाणी पुरवठा केला जाणार असून याबाबतचं वेळापत्रक कंत्राटदारांनी खंडपीठात सादर केलं आहे. या अनुषंगानं औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमुर्ती आर. एम. जोशी यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची बिडकीन परिसरात काल पाहणी केली.
गुणवत्ता, दर्जा आणि सुरक्षेच्या दृष्टीनं जलवाहिनीच्या कामाला गती द्यावी, तसंच सर्व जलवाहिनीची कामं सुव्यवस्थित व्यवस्थापन करुनच व्हावी, अशा सुचनाही न्यायमुर्तींनी कंत्राटदारांना दिल्या आहेत.
****
धुळे लोकसभा मतदार संघात निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या २०९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान केलं. उद्यापर्यंत हे टपाली मतदान करता येणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील एकूण एक हजार ९९ अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
****
दुरसंचार विभाग किंवा ट्रायकडून मोबाईल सेवा खंडित करण्याचे इशारे देणारे कॉल बनावट आहेत. दूरसंचार विभाग किंवा ट्रायनं कोणालाही अशा प्रकारचे कॉल करण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असं दूरसंचार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा कॉलसंदर्भात डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट संचारसाथी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंद��ण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आपण सरकारी अधिकारी असल्याचं भासवणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या परदेशी मूळ स्थान असलेल्या मोबाईल क्रमांकांवरून येणाऱ्या व्हॉटसअॅप कॉलबाबतही दूरसंचार विभागानं एक नियमावली जारी केली आहे.
****
मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी, ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. पंजाब किंग्ज संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे, तर राजस्थान रॉयल्सचं अव्वल चार संघात स्थान मिळवण्याचं लक्ष्य असेल. दरम्यान, काल रात्री दिल्ली इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा १९ धावांनी पराभव केला.
****
0 notes
Text
आयपीएल 2022: एमएस धोनीच्या प्रोमो व्हिडिओने जाहिरात नियमांचे उल्लंघन केले, नितीश राणा आणि जसप्रीत बुमराह यांनीही आयपीएल कायदा मोडला
आयपीएल 2022: एमएस धोनीच्या प्रोमो व्हिडिओने जाहिरात नियमांचे उल्लंघन केले, नितीश राणा आणि जसप्रीत बुमराह यांनीही आयपीएल कायदा मोडला
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या प्रोमो व्हिडिओने जाहिरात कायद्याचे उल्लंघन केले आहे. प्रोमो व्हिडिओमध्ये, भारतीय क्रिकेट संघ आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनी कधी बस ड्रायव्हर तर कधी वृद्ध व्यक्तीच्या रुपात दिसत होता. त्याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणाला आयपीएलचा कायदा मोडल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंडही ठोठावण्यात आला…
View On WordPress
#csk टीम#CSK संघ#KKR MI#अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया#आयपीएल#आयपीएल २०२०#आयपीएल २०२२#आयपीएल 2022 प्रोमो व्हिडिओ#आयपीएल जाहिरात#आयपीएल थेट स्कोअर#आयपीएल बातम्या#इंडियन प्रीमियर लीग#एमएस धोनी#कंझ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटी#केकेआर वि एमआय#केकेआरने एमआयला हरवले#क्रिकेट बातम्या#ग्राहक एकीकरण आणि ट्रस्ट सोसायटी#चेन्नई सुपर किंग्ज#चेन्नई सुपर किंग्स#जसप्रीत बुमराह#नितीश राणा#नितीश राणा फलंदाजी करत आहेत#नितीश राणा यांना दंड
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 April 2019 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ एप्रिल २०१९ दुपारी १.०० वा. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रथमच एकत्र सभा घेणार आहेत. लातूर आणि उस्मानाबादमधील युतीच्या उमेदवारांसाठी आयोजित ही सभा लातूर जिल्ह्यातील औसा इथं होणार आहे. या मतदार संघांमध्ये अठरा एप्रिलला मतदान आहे. **** लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये येत्या गुरुवारी अकरा एप्रिलला मतदान होणार आहे. या सात जागांसाठी ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक असल्यानं, प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप-शिवसेना-महायुतीचे गडचिरोली-चिमूर मतदार संघातले उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज गडचिरोली इथं, जाहीर सभा घेणार आहेत. **** निवडणूक आयोगानं राजकीय पक्ष तसंच उमेदवारांना, मतदानाच्या आणि त्याआधीच्या दिवशी पूर्व परवानगीशिवाय जाहिरात प्रसिद्ध करण्यास मनाई केली आहे. यासंबंधी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, तसंच वृत्तपत्रांना सूचना जारी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. आतापर्यंत फक्त इले��्ट्रॉनिक माध्यमांना, मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून निवडणूक प्रचाराशी संबंधित साहित्य दाखवण्यास मनाई आहे . **** जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी तपास मोहीम हाती घेतली आहे. त्यावेळी ही चकमक सुरू झाल्याची माहिती सुरक्षादलातील सुत्रांनी दिली आहे. **** बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार डॉ. राजेंद्र शिंगणे हे ग्रामीण भागामध्ये आघाडीच्या नेत्यांसमवेत प्रचार करत आहेत. तर युतीचे उमेदवार खासदार जाधव विकास कामांच्या आधारे मतदान मागत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम सिरस्कार शेतकऱ्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर आपला प्रचार करीत आहेत. **** स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगले इथले उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्याविरुद्ध ब्राम्हण समाजाबद्दल कथित आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या जाहीर सभेवेळी या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावर खुलासा मागवला होता. त्यांनी कोणताही खुलासा न दिल्यानं निवडणूक विभागाच्या तक्रारीवरून काल संध्याकाळी कुरुंद्वाड पोलिस ठाण्यात शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. **** कोल्हापूरमध्ये कुख्यात गुन्हेगार रिव्हॉल्वर तस्कर मनीष उर्फ मन्या नागोरीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आज पहाटे एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतलं. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणात रिव्हॉल्वर पुरवल्याच्या संशयावरून त्याला यापुर्वीही अटक झाली होती. **** आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल हैद्राबादमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सनराईजर्स हैद्राबादचा ४० धावांनी पराभव केला. चेन्नई मध्ये झालेल्या अन्य सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जनं किंगस इलेवन पंजाबला २२ धावांनी पराभूत केलं. आज बंगळुरू इथं रॉयल चॅलेंजरर्सची लढत दिल्ली कॅपिटल्सविरुध्द तर जयपूर इथं राजस्थान रॉयल्सची लढत कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द होणार आहे. **** भारतीय महिला हॉकी संघानं काल क्वाललंपूर इथं यजमान मलेशियाविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ५-० असा सहज विजय मिळवला. स्पर्धेत गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ३-० असा विजय मिळवला होता. ***** ***
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद मराठी बातमीपत्र ०७ एप्रिल २०१९ सकाळी ११.०० वाजता.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदार संघामध्ये येत्या गुरुवारी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. या सात जागांसाठी ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक असल्यानं, प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप-शिवसेना-महायुतीचे गडचिरोली-चिमूर मतदार संघातले उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज गडचिरोली इथं, जाहीर सभा घेणार आहेत. **** निवडणूक आयोगानं राजकीय पक्ष तसंच उमेदवारांना, मतदानाच्या आणि त्या आधीच्या दिवशी पूर्व परवानगी शिवाय जाहिरात प्रसिद्ध करण्यास मनाई केली आहे. कायदा मंत्रालयाकडे यासंबंधीचा प्रस्ताव प्रलंबित असल्यानं, आयोगानं त्यांना असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला. यासंबंधी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, तसंच वृत्तपत्रांना सूचना जारी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. आतापर्यंत फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमांना, मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून निवडणूक प्रचाराशी संबंधित साहित्य दाखवण्यास मनाई आहे. **** राज्यात पहिल्या टप्प्यात येत्या गुरुवारी ११ एप्रिलला मतदान होत असून, त्या अनुषंगाने दिनांक १० आणि ११ एप्रिल रोजी दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिराती, माध्यम प्र��ाणन आणि सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेणं, आवश्यक असल्याचं निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे. **** आंध्र प्रदेशातल्या सत्ताधारी तेलगु देसम पार्टीनं आपल्या जाहीरनाम्यात प्रत्येक कुटुंबाला दोन लाख रूपये निधी सोबतच, इतर आर्थिक लाभांचा समावेश आहे. राहुल गांधी यांच्या बहात्तर हजारांच्या आश्वासनापेक्षा ही मदत अधिक असल्याचं पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितलं. वायएसआर काँग्रेसनंही आपल्या जाहीरनाम्यात दोन लाखांच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे. **** भारतीय कम्युनिस्ट पक्षानं, अकोला मतदार संघात विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला असून, राज्यभरात भाजपाविरोधात सक्षम आघाडीस पाठिंबा दिला आहे. औरंगाबाद इथं काल झालेल्या भाकपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. **** आयपीएल क्रिकेट सामन्यांना होणारी गर्दी लक्षात घेता या सामन्यांमध्ये मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. मतदारांची जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगानं क्रिकेट नियामक मंडळाला संपर्क करण्याची सूचना महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला दिल्या होत्या. मुंबईत सर्व सामन्यांवेळी अशाच प्रकारे मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. **** कापूस घेऊन जात असलेल्या टेम्पोनं धडक दिल्यानं परभणी इथं एका ९ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. काल सकाळी ७ वाजेच्या सुमारास गंगाखेड- ईसाद रस्त्यावर हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला असून त्याच्या विरुध्द गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** अमरावती जिल्ह्यातल्या पाणीटंचाई आणि आगामी खरीप नियोजनाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. निवडणुकीच्या विविध जबाबदाऱ्या प्रशासनाकडून पार पाडण्यात येत आहेत त्याचबरोबर पाणीटंचाईची कामे प्राधान्याने करावी याची गरज लक्षात घेता तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. **** भारतीय महिला हॉकी संघानं काल क्वाललंपूर इथं यजमान मलेशियाविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ५-० असा सहज विजय मिळवला. स्पर्धेत गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं ३-० असा विजय मिळवला होता. पाच सामन्यांच्या या मालिकेतला तिसरा सामना उद्या होणार आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाचा पुढील सामना मंगळवारी म्यॅनमारविरुद्ध होणार आहे. **** भारतीय महिला फुटबॉल संघानं काल म्यानमार इथं टोकयो ऑलिं���िक पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात नेपाळचा ३-१ असा पराभव केला. भारतानं या स्पर्धेतील दोन सामन्यांतील विजयाद्वारे सहा गुण मिळवले आहेत. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 March 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० मार्च २०१९ सकाळी ७.१० मि. **** लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या दहा मतदार संघातून १७९ उमेदवार रिंगणात सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस आगामी वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी लघु बचत योजनांवरचे व्याज दर जैसे थे कायम यंदाचा ‘दुखी राज्य काव्य पुरस्कार’ कवी ‘सौमित्र’ ऊर्फ किशोर कदम यांना जाहीर आणि सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आज, भारत आणि दक्षिण कोरिया संघात अंतिम लढत **** लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली, राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा तसंच सोलापूर या दहा मतदारसंघात या टप्प्यात अठरा एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदार संघात एकूण १७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नांदेड मतदार संघातून एकूण ४१ ��णांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, आता या मतदार संघात काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांच्यासह १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. परभणी मतदार संघात काल चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचं आमच्या वार्ताहरानी सांगितलं... परभणी मतदार संघात विविध राजकीय पक्षाचे १३ तर अपक्ष ४ उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवार १७ असते तरी खरी लढत शिवसेना – भाजपचे यूतीचे उमेदवार विजय जाधव, कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर आणि वंचित बहूजन आघाडीचे अदमगीर खान मोहमद यांच्यात होईल. आकाशवाणी बातम्यासाठी, परभणीहून विनोद कापसीकर. **** हिंगोली मतदार संघात शिवसेना भाजप युतीचे हेमंत पाटील, काँग्रेसचे सुभाष वानखेडे, आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांच्यासह २८ उमेदवार, बीडमध्ये भाजपच्या डॉ.प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे, यांच्यासह ३६ उमेदवार, तर लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे, काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत, वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर, आणि बसपाचे सिद्धार्थ सूर्यवंशी, यांच्यासह १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उस्मानाबादमध्ये एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानी दिली. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात एकूण चौदा उमेदवार उरले आहेत. यात शिवसेना भारतीय जनता पार्टीचे ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील, बहुजन समाज पक्षाचे शिवाजी पंढरीनाथ वुमन आणि वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांच्यासह अन्य दहा उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने या निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. देविदास पाठक, आकाशवाणी बातम्यासाठी, उस्मानाबाद. अमरावती मतदार संघातून सेना भाजप युतीचे आनंदराव अडसूळ आणि काँग्रेस आघाडीच्या नवनीत राणा, बुलडाण्यातून सेना भाजप युतीचे प्रतापराव जाधव आणि काँग्रेस आघाडीचे राजेंद्र शिंगणे, अकोल्यातून सेना भाजप युतीचे संजय धोत्रे, काँग्रेस आघाडीचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, तर सोलापुरातून भाजप सेना युतीचे जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, यांच्यात मुख्य लढत होणार आहे. **** दरम्यान, निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला असून, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात कालपर्यंत चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. **** काँग्रेस पक्षानं उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना भाजप युतीचे गोपाळ शेट्टी यांचं मातोंडकर यांना आव्हान असेल. **** ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांचे उमेदवारावरून एकमत होत नसेल तर हा मतदारसंघ भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्यासाठी सोडावा, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, अविनाश महातेकर आणि मुंबई अध्यक्ष ��ौतम सोनवणे यांनी केली आहे. **** भारतीय जनता पक्ष, लोकसभेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रात एक हजार प्रचार फेऱ्यांचं आयोजन करणार आहे. या फेऱ्यांमध्ये केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप नेत्यांचा समावेश असेल. **** सर्वोच्च न्यायालयाच्या कथित अवमान प्रकरणी न्यायालयानं, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. निवडणूक लढवण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी, आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते. हे निर्देश पाळले जात नसल्यासंदर्भात दाखल, एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं, ही नोटीस बजावली. **** मतदान पडताळणी पावती यंत्र - व्ही व्ही पॅट मधून मिळणाऱ्या पावत्यांची पडताळणी करण्याची सध्याची पध्दत, अधिक सुसंगत असल्याचं, निवडणूक आयोगानं, सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. मतदान पडताळणी पावती यंत्र व्ही व्ही पॅटच्या नमूना पावती सर्वेक्षणाची संख्या वाढवता येईल का, असं सर्वोच्च न्यायालयानं, यासंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, आयोगाला विचारलं होतं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** केंद्र सरकारनं आगामी वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी लघु बचत योजनांवरचे व्याज दर आहे तसेच ठेवले आहेत. भविष्य निधी तसंच राष्ट्रीय बचत पत्रावर आठ टक्के तर किसान विकास पत्रावर व्याजाचा दर सात पूर्णांक सात दशांश टक्के असा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या पाच वर्षाच्या बचत योजनेचे व्याज दर आठ पूर्णांक सात दशांश टक्के कायम असून बचत खात्यांवर वार्षिक चार टक्के दरानं व्याज देण्यात येत आहे. सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज दर आठ पूर्णांक पाच दशांश टक्के असे आहेत. **** जालना इथले उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी ‘दुखी’ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘दुखी राज्य काव्य पुरस्कार’ कवी ‘सौमित्र’ ऊर्फ किशोर कदम यांना जाहीर झाला आहे. सहा एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी जालना इथल्या मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित ‘कवितेचा पाडवा’ या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २१ हजार रूपये, मान वस्त्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. **** आठवे अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पत्रकारिता पुरस्कार काल औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद वैद्य यांना, प्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर युवा पत्रकारिता पुरस्कारानं पत्रकार विद्या गावंडे यांना सन्मानित करण्यात आलं. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पुरस्कारला उत्तर देताना, वैद्य यांनी, लोकशाहीच्या लढ्यात आपणही खारीचा वाटा उचलल्याचं सांगून तो सुवर्णक़ाळ आता येणे नाही असं मत व्यक्त केलं. **** कोल्हापुरात���े सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे आणि त्यांचा सहकारी समीर शिनोळकर या दोघांना, लाचखोरी प्रकरणी गडहिंग्लज इथल्या विशेष न्यायालयानं, तीन वर्ष सक्त मजुरी आणि पंधरा हजार रुपये दंड ठोठावला आहे. तपासणी नाक्यावर, ट्रकवर कारवाई करू नये यासाठी शिंदे यांनी दरमहा १० हजार रुपये लाच मागितली होती. एप्रिल २०१५ मध्ये सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली होती. **** जालना इथं औद्योगिक वसाहतीमधील कापसाच्या गाठी ठेवलेल्या गोदामाला काल सकाळी आग लागली. कापसाच्या गाठी जळाल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. **** अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची काल सांगता झाली, नवी दिल्ली इथल्या कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. ए. के. मिश्रा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलगुरु डॉ. के.पी विश्वनाथा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलतांना ए.के. मिश्रा यांनी शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती करणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. **** उमेदवारांनी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती कडून प्रमाणित केलेली जाहिरात प्रकाशित करावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केलं आहे. उमेदवारांकडून प्रसारित होणाऱ्या, कोणत्याही माध्यम प्रकारातल्या जाहिरात मजकूरांचे प्रमाणीकरण आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. **** हिंगोली जिल्ह्यातल्या किनवटचे नगराध्यक्ष, तसंच नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू असताना नगरपालिकेच्या नवीन टॅक्ट्ररचं लोकार्पण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** मलेशियात इपोह इथं सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना, आज, भारत आणि दक्षिण कोरिया संघात होणार आहे. काल झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतानं पोलंडचा १०-० गोल अशा फरकानं पराभव केला. **** भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू, बी साईप्रणित, पारूपल्ली कश्यप, एच एस प्रणोय आणि कितांबी श्रीकांत यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तत्पूर्वी काल नवी दिल्ली इथं झालेल्या उप-उपांत्य सामन्यांमध्ये पी व्ही सिंधूनं, हाँगकाँगच्या डेंग जॉय झुऑनला, पुरूष एकेरीत साई प्रणितनं समीर वर्माला पराभूत केलं. **** आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंचांनी, डोळे उघडे ठेवून आपली जबाबदारी पार पा��ावी, असं रॉयल चॅलेजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली यानं म्हटलं आहे. मुंबई इंडियन्स आणि बेंगलोर संघात झालेल्या सामन्यात मुंबई संघाच्या लसिथ मलिंगानं टाकलेल्या एका नो बॉलचा बेंगलोर संघाला लाभ नाकारण्यात आला, त्या पार्श्वभूमीवर कोहली बोलत होता. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 28 August 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २८ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि. **** डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमितसिंग राम रहीमला बलात्कार प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयानं दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा तसंच ६५ हजार रुपये दंडही ठोठावला आहे. या प्रकरणी गेल्या शुक्रवारी राम रहीमचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयानं आज दोन्ही पक्षाच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शिक्षा सुनावली. दरम्यान, ही शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हरियाणा सरकारनं तातडीची बैठक बोलावली. नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच डेरा समर्थकांनी दोन वाहनं पेटवून दिल्याचं वृत्त आहे. **** भारत आणि चीन यांच्यात डोकलाम मुद्यावर अखेर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांनी या भागातून आपापलं सैन्य मागे घेण्यास तयारी दर्शवली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली. भारत आणि चीननं डोकलाम मुद्यावर राजकीय संबंध कायम ठेवले असून, याप्रकरणी भारताला आपले विचार मांडण्याची पूर्ण संधी मिळाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. **** गोवा विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेली निवडणूक भारतीय जनता पक्षानं जिंकली आहे. पणजी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, तर वाल्पोई मतदारसंघातून विश्वजीत राणे विजयी झाले. दिल्लीतल्या बवाना मतदारसंघाची निवडणूक आम आदमी पक्षाचे रामचंद्र यांनी जिंकली आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार वेद प्रकाश यांचा पराभव केला. आंध्र प्रदेशातल्या नांदयाल विधानसभा मतदासंघाची निवडणूक तेलगु देसम पक्षाच्या भूब्रम्हानंद यांनी जिंकली आहे. **** देशातल्या प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी क्रीडा मंत्रालयानं सुरु केलेल्या राष्ट्रीय खेल प्रतिभा खोज पोर्टलचं अनावरण आज नवी दिल्ली इथं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. देशातला कोणताही खेळाडू या पोर्टलवर आपल्या खेळाच्या यशाबद्दल संपूर्ण माहिती अपलोड करु शकतो. अशा प्रतिभावान खेळाडूंना क्रीडा मंत्रालयाकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे पोर्टल इंग्रजीसह सर्व प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असून, मोबाईल ॲपच्या रुपातही ते उपलब्ध करण्यात आलं आहे. **** सर्वोच्च न्यायालयानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बी सी सी आयला आयपीएल सामन्यांच्या प्रसारण अधिकाराचा ई लिलाव करण्याचे निर्देश देण्यास मनाई केली आहे. आयपीएल सामन्यांच्या प्रसारण अधिकाराशी संबंधित जाहिरात प्रक्रियेवर बंदी घालण्याची, तसंच या प्रक्रियेचा ई लिलाव सुरू करण्याची मागणी करणारी भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांची याचिका, न्यायालयानं फेटाळून लावली. वृत्तपत्रातून जाहिरात प्रक्रिया हा उत्तम मार्ग असून, प्रसारण अधिकारासाठी सर्व निवेदनकर्त्यांनी बंद पाकिटात आपलं निवेदन दिल्याचं बीसीसीआयनं न्यायालयात सांगितलं. **** २०२२ पर्यंत शेतीचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या संकल्प से सिध्दी न्यू इंडिया मंथन या अभियानाअंतर्गत आज लातूर इथं शेतकरी जागृती मेळावा घेण्यात आला. लातूर ग्रामीणचे आमदार त्��्यंबक भिसे यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं, तर वंसतराव नाईक कृषी विद्यापीठाचे अधिकारी डॉ व्ही पी सूर्यवंशी, सेंद्रिय शेतीचे तज्ज्ञ अजय जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. **** नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पीकावर आळींचा मोठ्या प्रमाणावर प्रार्दुभाव झाला असून सोयाबीनच्या शेंगा झाडापासून गळून पडत आहेत. आळी आणि शेंगगळती सोबतच तीस ते पस्तीस टक्के शेंगेत बी भरत नसून नुसती पापडीच दिसत आहे. अशा शेंगा वाळत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मागील दहा दिवसांपासून सतत हलका पाऊस होत असल्यानं, मूग तोडणी थांबली आहे. कापसावर लाल्यारोगाची साथ आल्यानं, शेतकरी संकटात सापडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** पुणे जिल्ह्यात नारायणगावजवळ आज पहाटे एका एसटी बसला अपघात होऊन नऊ प्रवाशांच्या मृत्यू झाला, तर सोळा जण जखमी झाले. ही बस त्र्यंबकेश्वरहून पुण्याकडे जात होती. मृतांची ओळख अद्याप पटली नसून नारायणगाव पोलिसांनी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. **** नांदेड शहरातलं श्री गुरू गोविंदसिंघजी मैदान विकसित करण्यात आलं असून, या मैदानावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनेही खेळता येतील, एवढ्या सोई सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या मैदानाचं लोकार्पण खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आलं. हे मैदान क्रिकेट खेळाडूंसाठी जास्तीत जास्त उपयोगात आणावं, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. **** नांदेड जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. आज दुपारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर परिसरातही आज सकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ****
0 notes