#अविनाश साबळे
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १३ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थयी सदस्यत्व द्यायला तसंच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेनं आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतल्या अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थॉमस ग्रीन फील्ड यांनी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करयाला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. भारत, जपान, आणि जर्मनी या देशांना सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे, मात्र काही देशांचा या नवीन संशोधन परिषदेला विरोध आहे.
****
कोलकाता आर जी कार रुग्णालयाच्या घटनेच्या निषेधार्थ सुरु पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेलं आंदोलन आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची माफी मागत, राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणी आंदोलकांसोबत काल प्रस्तावित असलेली बैठक झाली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं बैठकीचं थेट प्रसारण दाखवणं शक्य नसल्याचं सरकारनं सांगितल्यानंतर आंदोलक प्रतिनिधीनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवत, कामावर रुजू व्हावं, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
****
काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशा�� संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपानं तीव्र भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपा पक्ष आज याविरोधात आंदोलन करणार आहे, ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ‘चा अशी हाक भाजपानं दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होणार आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  या उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या  उपक्रमासाठी  आतापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून,  या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी, कोल्हापूरच्या सीमा बायोटेक, आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन आणि प्रशिक्षण मिळावं, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले आहेत.
****
रायगड जिल्ह्यात धाटाव एमआयडीसीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोहोचला, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
****
बुलडाणा जिल्ह्यात काल वेगवेगळ्या घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातली एक महीला घरून शेताकडे निघाली असतांना विहिरीत पडून तिचा मूत्यू झाला. अन्य एका घटनेत खामगाव तालुक्यातलाच आठ वर्षीय यश बोदडे हा मुलगा आपल्या घराजवळ खेळताना पुलावरून नद��पात्रात पडला, वाहत्या पाण्य्याच्या प्रवाहाने वाहत जाऊन त्याचा मूत्यू झाला. तर तीसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यातल्या जहागीरपूर इथल्या एका १४ वर्षीय मुलाचा नदीपात्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या दक्षिण आशियाई कनिष्ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने शानदार प्रदर्शन करत नऊ सुवर्ण पदकं पटकावली. भारताच्या अनिशाने थाळीफेक प्रकारात पहिलं सुवर्ण पदक जिंकलं, तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत निरु पाठकनं देखील सुवर्ण पदकाची कमाई केली.
****
ब्रुसेल्स इथं आजपासून सुरु होणार्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहे. सध्या १४व्या क्रमांकावर असलेला अविनाश आज अंतिम फेरीत पदार्पण करेल.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी दोन दरवाजे आज बंद करण्यात आले असून, विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या चार दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
अविनाश साबळेने मोडला 30 वर्षे जुना अमेरिकेतील 5000 मीटरचा राष्ट्रीय विक्रम - शेतकऱ्याच्या मुलाने मोडला अमेरिकेतील 30 वर्षे जुना विक्रम, ऑलिम्पियन अविनाश साबळे यांनी यापूर्वी 7 वेळा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे.
अविनाश साबळेने मोडला 30 वर्षे जुना अमेरिकेतील 5000 मीटरचा राष्ट्रीय विक्रम – शेतकऱ्याच्या मुलाने मोडला अमेरिकेतील 30 वर्षे जुना विक्रम, ऑलिम्पियन अविनाश साबळे यांनी यापूर्वी 7 वेळा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे.
भारताचा अव्वल धावपटू अविनाश साबळे याने कॅलिफोर्निया, यूएसए येथे साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये पुरुषांच्या 5000 मीटर प्रकारात 30 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. साबळेच्या नावावर 3000 मीटर स्टीपलचेसचा राष्ट्रीय विक्रम आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या साबळेने अमेरिकेत १३:२५.६५ सेकंदाची वेळ नोंदवत १२वे स्थान पटकावले. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात जन्मलेल्या या 27 वर्षीय सैनिकाने, एका शेतकऱ्याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
विश्लेषण : मराठमोळा धावपटू अविनाश साबळे केनियन वर्चस्वाला कसे देतोय आव्हान?
विश्लेषण : मराठमोळा धावपटू अविनाश साबळे केनियन वर्चस्वाला कसे देतोय आव्हान?
विश्लेषण : मराठमोळा धावपटू अविनाश साबळे केनियन वर्चस्वाला कसे देतोय आव्हान? ३,००० मीटर स्टीपलचेस म्हणजे काय, राष्ट्रकुलमधील ताजे यश आणि राष्ट्रीय विक्रमाची वेळ नोंदवताना अविनाशने कशा प्रकारे केनियाच्या धावपटूंना आव्हान दिले, आदी मुद्द्यांचा घेतलेला वेध… प्रशांत केणी महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने नुकतेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील ३,००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेत…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
CWG 2022: स्टीपलचेजर साबळे, रेस वॉकर प्रियंका जिंकली रौप्य पदके | राष्ट्रकुल खेळ बातम्या
CWG 2022: स्टीपलचेजर साबळे, रेस वॉकर प्रियंका जिंकली रौप्य पदके | राष्ट्रकुल खेळ बातम्या
अविनाश साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकण्याचा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला तर प्रियांका गोस्वामीने शनिवारी येथे राष्ट्रकुल क्रीडा क्रीडा स्पर्धेत भारतासाठी उत्पादनक्षम दिवशी महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीच्या चालीत त्याच रंगाचे पदक जिंकले. गोस्वामीने इतिहासही रचला कारण ती 10,000 मीटर स्पर्धेत रौप्यपदकांसह रेस वॉकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. दोन…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 3 years ago
Text
2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले
2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले
2020 summer Paralympics;भावना पटेलने सिल्व्हर पदक जिंकले     टोकियो -वृत्तसंस्था 2020 summer Paralympics मध्ये भारताला पॅरा ऑलिम्पिक मध्ये पाहिले पदक मिळाले असून चीनला हरवून भारताच्या भावना पटेल हिने पदकाची कमाई केली आहे.   आणखी वाचा:कोरोनाने ऑलिम्पिक पदकाची संधी हुकली;ऑलम्पिक खेळाडू अविनाश साबळे याची खंत भावना पटेल ही पॅरा ऑलिम्पिक मध्ये टेबल टेनिस खेळाडू आहे.तिने सेमी फायनल मध्ये चीनची झेंक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अंतिम लढतीस अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघाकडून तीव्र निषेध;सर्व शक्यतांची पडताळणी करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश
कृ��ीपूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात कमी मुदतीची कर्ज उपलब्ध करून देण्याची रिझर्व्ह बँकेची इतर बँकांना सूचना
राज्यातल्या जलप्रकल्पांची क्षमतावाढ करण्याची गरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून व्यक्त
आणि
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर विजयासाठी २४९ धावांचं आव्हान
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघाने आंतरराष्ट्रीय कुस्तीसंघाकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत याबाबत केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी टी उषा यांना योग्य कार्यवाही करण्याचे तसंच सर्व शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले असल्याचं, मांडवीय यांनी सांगितलं. विनेश फोगाट यांना या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी क��स्ती प्रशिक्षण तसंच इतर व्यवस्थापनाकरता केंद्र सरकारकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचं विवरणही क्रीडामंत्र्यांनी सदनासमोर सादर केलं.
या मुद्यावरुन आज लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. यासंदर्भात क्रीडामंत्र्यांनी जबाब देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेश प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींनी या स्पर्धेत विनेशच्या आतापर्यंतच्या कामगिरीचं कौतुक करत, भावी विश्वविजेत्यांसाठी ती प्रेरणा ठरेल, सध्याच्या प्रसंगात सगळा देश तिच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांनी ट्वीटरवरच्या संदेशातून विनेशला धीर देत, ती विजेत्यांमधली विजेती असल्याचं म्हटलं आहे. या परिस्थितीवर मात करून विनेश दमदार पुनरागमन करेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.
ऑलिम्पिकच्या कुस्ती प्रकारात ५० किलो वजनी गटात विनेश फोगाट आज रात्री सुवर्णपदकासाठीची कुस्ती खेळणार होती. मात्र आज सकाळी तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं.
दरम्यान कुस्तीच्या ५३ किलो वजन गटात आज भारताच्या अंतिम पंगालचं आव्हान संपुष्टात आलं. महिलांच्या सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत यांच्या संघाचा उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या संघाने पराभव केला.
****
ॲथलेटिक्स मध्ये उंच उडी, ट्रिपल जंप या प्रकारातल्या पहिल्या फेरीत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. तर तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत अविनाश साबळे ��हभागी होणार आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजेनंतर ही शर्यत होईल. भारोत्तोलनात महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू सहभागी होणार आहे.
****
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत दोन कांस्य पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर आणि एक कांस्यपदक पटकावणारा महाराष्ट्राचा स्वप्नील कुसाळे आज स्वदेशी परतले. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी आणि क्रीडा चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
****
गेल्या दशकभरात कर संरचनेत मोठे बदल करण्यात आल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत वित्त विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला तसंच, छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फायदा झाल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. विरोधकांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.
****
वायनाड भूस्खलन दुर्घटनेतल्या पीडितांसाठी केंद्र सरकारनं पुनर्वसन निधी द्यावा, अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज सदनात केली. या दुर्घटनेला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावं, अशी मागणीही त्यांनी केली. या दुर्घटनेच्या बचाव आणि मदत कार्यात उत्तम काम केल्याबद्दल राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्य सरकार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन विभाग तसंच केरळलगतच्या राज्यांची प्रशंसा केली.
****
भारतीय रिझर्व्ह बँक -आरबीआयनं, विविध कृषी पूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात अल्पावधीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. यानुसार, शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदरानं ३ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात अतिरिक्त ३ टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. हे अल्प मुदतीचं कर्ज मिळवण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी सध्याच्या जलप्रकल्पांची क्षमतावाढ करणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. हिंगोली, बीड, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतल्या जलसंपदा विभागाशी संबंधित प्रलंबित योजनांच्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून एका प्रकल्पातलं अतिरिक्त पाणी दुसऱ्या प्रकल्पात नेण्याचं नियोजन करावं, असे निर्देश त्यांनी दिले. या जिल्ह्यांत आवश्यक त्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यां��ं रूपांतर बॅरेजेसमध्ये करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याची कार्यवाही गतीनं करण्याची सूचनाही पवार यांनी केली आहे.
****
राज्य सरकार येत्या ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवणार असून, अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन योजना राबवून पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासह वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
आदिवासी विभागातल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ, विना परवानगी झाड तोडण्यासाठीच्या दंडाची रक्कम पन्नास हजार रुपये, लहान शहरांतल्या पायाभूत सुविधांना वेग देणं, इत्यादी निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारताला २४९ धावांचं लक्ष्य दिलं आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सात बाद २४८ धावा केल्या आहेत. भारताच्या रियान परागनं सर्वाधिक तीन बळी घेतले. श्रीलंका या मालिकेत शून्य एकने आघाडीवर आहे.
****
बीड जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायिक आढळल्यास कडक कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची जिल्हास्तरीय बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांनी ती माहिती प्रशासनाला द्यावी, असं आवाहनही या बैठकीतून करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या, क्षयरोगमुक्त असलेल्या शहाऐंशी ग्रामपंचायतींचा आज गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी, संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या दृष्टीनं जिल्ह्यातल्या आरोग्य संस्थांना मार्गदर्शन केलं.
****
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त परभणी इथे स्तनपान जागरूकता सप्ताह राबवण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातलं सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि परभणीचं जिल्हा रुग्णालय यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला. यावेळी महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रमांमधून स्तन्यदा मातांना स्तनपानाचं महत्व सांगितलं.
****
सुधारित फौजदारी कायद्यांविषयी माहिती देणाऱ्या मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचं आज नांदेड जिल्हा आणि सत्र न्यायालयात उद्घाटन झालं. नांदेड इथला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आणि ना��देडचं जिल्हा माहिती कार्यालय, यांनी संयुक्तपणे हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. सोप्या भाषेत साकारण्यात आलेलं हे प्रदर्शन उद्यासुद्धा सकाळी १० पासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं असणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज कोविडचे तीन नवे रुग्ण आढळले, सध्या शहरात कोविडचे १३ सक्रीय रुग्ण असल्याचं, महानगरपालिकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातल्या सातशे वीस गावात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासह स्वच्छतेची विविध कामं पूर्ण झाली आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. आज ती सुवर्ण पदकासाठी खेळणार होती. या गटाच्या ठरलेल्या वजन मर्यादेपेक्षा विनेशचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्यानं तीला अपात्र घोषित करण्यात आलं. त्यामुळे ती आता स्पर्धेतून बाहेर गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, या मुद्यावरुन आज लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. यासंदर्भात क्रीडामंत्र्यांनी जबाब देण्याची मागणी विरोधकांनी लाऊन धरली.
ऑलिंपिक स्पर्धेत आज महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूची जर्मनीविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
ॲथलेटिक्स मध्ये उंच उडी, ट्रिपल जंप या प्रकारातल्या पहिल्या फेरीत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. तर तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत अविनाश साबळे सहभागी होणार आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजेनंतर ही शर्यत होईल. भारोत्तोलनात महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू सहभागी होणार आहे.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत दोन कांस्य पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर आज स्वदेशी परतली. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आणि क्रीडा चाहत्यांनी तिचं जल्लोषात स्वागत केलं.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज कोलंबो इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत श्रीलंका एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
दहावा राष्ट्रीय हातमाग दिवस आज साजरा करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिल्लीतल्या विज्ञान भवनात या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते संत कबीर पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
****
माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी इंडस्ट्री देशातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांपर्यंत पोहचवून, या क्षेत्रातल्या क्रांतीचा लाभ देशाचा प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्याची सरकारची योजना आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. सरकारनं देशभरात पासष्ट सॉफ्टवेअर पार्क्स उभारली असून त्यातली सत्तावन्न दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
प्रस्तावित वक्फ सुधारणा विधेयकाद्वारे सध्याच्या वक्फसंबंधित कायद्यांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या कायद्याचं सध्याचं वक्फ कायदा १९९५, हे नाव बदलून त्याजागी, एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सशक्तिकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा १९९५, अर्थात, Unified Waqf Management, Empowerment, Efficiency and Development Act, 1995, असं केलं जाणार आहे. तसंच, वक्फ बोर्डाच्या कार्यकारिणींमध्ये मुस्लिम महिला आणि बिगर मुस्लिमांना योग्य प्रतिनिधीत्व मिळावं, हे सुनिश्चित केलं जाणार आहे. याशिवाय बोहरा आणि आगाखानी समाजांसाठी स्वतंत्र औकाफ म��डळ स्थापन करण्याची सूचनाही या विधेयकात समाविष्ट आहे. वक्फ बोर्डाचं काळानुरूप आधुनिकीकरण करणं आणि या मध्ये सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे.
****
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार पियूष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या तीन सप्टेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं आज या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.
****
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गुन्हे दाखल केले नाहीत; म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार पाहणाऱ्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना अवमाननेची नोटीस पाठवली आहे. त्याचप्रमाणे धाराशिव जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे आणि पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर आणि मुखेड या विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या तयार झाल्या आहेत. राजकीय पक्षापासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रारूप यादी सर्वांसाठी खुल्या असून, नागरिकांनी आपआपल्या नावाची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे जायकवाडी धरणातला पाणीसाठा आता सुमारे चोवीस टक्क्यांवर पोहचला आहे. आज सकाळी सहा वाजता या धरणाची पाणीपातळी एक हजार पाचशे चार फूट, तर एकूण पाणीसाठा एक हजार दोनशे सत्तावन्न पूर्णांक पाच दशलक्ष घनमीटर इतका होता.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेपाला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
तांत्रिक अडचणींमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा ई-पॉस मशीनला विरोध
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडचा अविनाश साबळे तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत, पुरुष हॉकी संघाची उपान्त्य फेरीत आज जर्मनीविरुद्ध लढत 
****
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने'च्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ही योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत, नवी मुंबईतले चार्टर्ड अकाऊंटंट नावेद मुल्ला यांनी या योजनेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र ही योजना म्हणजे सरकारनं अर्थसंकल्पाच्या अंतर्गत घेतलेला निर्णय आहे, त्याला आव्हान कसं देता येईल, असं म्हण�� न्यायालयानं कालच्या सुनावणीत ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या योजनेअंतर्गत १४ ऑगस्टला मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याबद्दल महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी न्यायालयाचे ट्विटरवरून आभार मानले आहेत. केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेलं आव्हान न्यायालयाने फेटाळल्यानं या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, महिला बचतगटांसाठीच्या यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काल तटकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झालं. महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे, यामुळे महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होईल, असं त्या म्हणाल्या.
****
शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन केलं जाणार असल्याचं, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल राज्यसभेत सांगितलं. यासाठी शेतकऱ्यांना आधारच्या धर्तीवर डिजिटल ओळखपत्र दिलं जाणार असून, दरवर्षी पेरणीनंतर धान्याची उगवण झाल्यावर त्याची चित्रफीत संरक्षित केली जाईल. आणि नुकसान झाल्यास, पात्रतेनुसार भरपाई दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. शेतीचे लाभ वाढवण्यासाठी विविध विभागांच्या एकीकृत सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात असल्याचंही चौहान म्हणाले.
****
पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. पूरबाधित घरांचा प्रश्न मार्गी लावण्याकरता नवीन विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात येईल, घरांच्या पुर्नविकासासाठी कायद्यात तसंच नियमातही बदल करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणाची पाणी पातळी १५०० फुटांवर पोहोचली आहे. धरणातला जिवंत पाणीसाठा ३२३ पूर्णांक १८८ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. धरणामध्ये सध्या ६६ हजार ३६७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल विधानसभेसाठी मुंबईतल्या शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रेदरम्यान काल सोलापूर इथं त्यांनी ही घोषणा केली.
****
स्वस्त धान्य दुकानदारांनी काल ई पॉस मशीनच्या वापराविरोधात ठिकठिकाणी आंदोलन ��रत या मशीन प्रशासनाकडे जमा केल्या.
जालना शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसील कार्यालयात या मशीन जमा केल्या. इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद होतात, त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटपाची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मंठा, बदनापूर, परतूर या ठिकाणीही स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन प्रशासनाला परत केल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. इंटरनेट सेवा खंडीत होत असल्याने, धान्य असूनही त्याचं वितरण करता येत नाही, त्यामुळे ऑफलाईन पद्धत धान्य वितरणासाठी योग्य असल्याचं दुकानदारांनी सांगितलं.
परभणी शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
****
पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातून दीडशे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी आपल्याकडे प्राप्त झाली आहे, ही यादी आपण शासनाकडे पाठवली असून, त्यांच्याविरोधात कडक कारवाईची गरज, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. काल हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेच्या आगामी निवडणुका शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावर लढवणार असल्याचं कडू यांनी यावेळी सांगितलं.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडच्या अविनाश साबळेनं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा अविनाश, हा पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे. आठ ऑगस्ट रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वी, टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ आज उपांत्य फेरीत जर्मनी विरुद्ध खेळणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा पहिल्या फेरीसाठी मैदानात उतरेल. तर महिला कुस्तीपटू विनेश फोगट आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पुरुष टेबल टेनिसमध्येही आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. दरम्यान, काल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठीच्या लढतीत पराभव झाला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसची 'जनसन्मान' यात्रा येत्या आठ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी इथून सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात्रेचा पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा असून, हा टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त अर्जांची ऑनलाईन छाननी प्रक्रिया लातूर जिल्ह्यात सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येक तालुकास्तरावर छाननी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर पंचायत समिती इथं आ��ोजित शिबिराला जिल्हाधिकारी वर्ष��� ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, 'माझं लातूर, हरित लातूर' अभियानाअंतर्गत काल लातूर तालुक्यातल्या नागझरी ग्रामपंचायतीच्यावतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ५१ बेल वृक्षांची लागवड करण्यात आली.
****
दूध भेसळखोरांविरोधात विरोधात मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या रविवारी कडा परिसरात झालेल्या भेसळखोरांवर कडक कारवाई व्हावी, असंही ते यावेळी म्हणाले. सरकारने राज्यातल्या दूध देणार्या जनावरांचा, किती लिटर दूध दररोज जमा होतं याचं सर्वेक्षण करावं, जेणेकरुन भेसळखोरांवर आळा बसेल, अशी मागणीही धस यांनी यावेळी केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून एक तास शहरासाठी हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. या अभियानात काल पैठण गेट ते गुलमंडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. फेरीवाले, रिक्षाचालक तसंच विविध संघटना तसंच स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे पंधरा हजार विद्यार्थी या मोहिमेत श्रमदान करणार आहेत.
****
भगवंत देशमुख विशेष वाङ्गमय पुरस्कार दैवतांची सत्यकथा या ग्रंथासाठी यवतमाळ इथले डॉ. अशोक राणा यांना प्रदान करण्यात आला. कुमार देशमुख नाट्य पुरस्कार ऋग्वेदातील नाट्यसंहिता या ग्रंथासाठी लक्ष्मीकांत धोंड यांना, तर कुसुतमाई देशमुख काव्य पुरस्कार हंबरवाटा या काव्यसंग्रहासाठी गंगापूर इथले संतोष आळंजकर यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या या कार्यक्रमात मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे यावेळी उपस्थित होते.
****
धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत २१ वा पशुगणना कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १११ प्रगणक आणि २६ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातले शेतकरी-पशुपालकांनी पशुधनाची माहिती देऊन सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
सुरक्षा मानकांची पूर्तता करेपर्यंत कोचिंग क्लासेस बंद ठेवले जाऊ शकतात, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. दिल्लीत पुराचं पाणी शिरल्यामुळे एका कोचिंग क्लास मधल्या तीन मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हे मत व्यक्त केलं. यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगर पालिकेला नोटीस बजावली आहे. कोचिंग क्लासेसच्या असुरक्षिततेबद्दल न्यायालयानं यावेळी नाराजी व्यक्त केली.
****
राज्यसभेत आज शून्य काळात अनेक खासदारांनी सार्वजनिक महत्त्वाचे विविध मुद्दे उपस्थित केले. भाजपचे समिक भट्टाचार्य यांनी बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी मागणी केली. पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातली लोकसंख्याशास्त्रीय रचना पूर्णपणे बदलली असून, यामुळे लोकशाही, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी देशात कर्करोगाच्या वाढत्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला.
****
बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलनामुळे झालेल्या हिंसाचारात काल एकाच दि��शी १३ पोलिसांसह ९१ जणांचा मृत्यू झाला. राजधानी ढाका आणि देशाच्या इतर काही भागांम��्ये कालपासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १९७१ च्या युध्दातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटूंबांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून, विद्यार्थी संघटनांनी देशव्यापी असहकार आंदोलन सुरु केलं होतं. पंतप्रधान शेख हसीना यांचा चर्चेचा प्रस्‍ताव आरक्षण-विरोधकांनी फेटाळून लावला असून, त्यांनी राजीनामा द्यावा, ही एककलमी मागणी केली आहे.
दरम्यान, या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये अशा मार्गदर्शक सूचना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केल्या आहेत.
****
सुरक्षेच्या कारणावरुन अमरनाथ यात्रा आज एक दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. भगवती नगर तळापासून यात्रेकरुंचा प्रवास थांबवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधलं कलम ३७० हटवून आज पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षातर्फे केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली  आर. एस. पुरा इथं एका भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात सामाजिक वातावरण कलुषित झालं असून, जातीय द्वेष निर्माण करणार्यांना माध्यमांनी स्थान देवू नये, असं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  आहे. ते आज सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. मनसे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असून, त्या अनुषंगानं निवडणुकीत किती आणि कशा जागा लढवायच्या हे ठरवण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.
****
श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली. आज श्रावणी सोमवारनिमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरासह हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैजनाथ मंदीरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज, बॅडमिंटनपटू लक्ष्यसेनचा पुरुष एकेरीत कांस्यपदकासाठी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल.
अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तीन हजार मीटर अडथळांच्या शर्यतीत बीडचा अविनाश साबळे सहभागी होणार आहे. तर महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत किरन पहलचा सामना होईल. त्याशिवाय आज नौकानयन आणि टेबल टेनिसचेही सामने होतील. हॉकीमध्ये भारताचा उपान्त्य फेरीचा सामना उद्��ा होणार आहे.
दरम्यान, टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचनं प्रथमच ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावलं आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत त्यानं कार्लोस अल्काराझचा सात - सहा, सात - सहा असा केला पराभव. १९८८ नंतर ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा जोकोव्हिच हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
****
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पाऊस सुरु असून, अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  
धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून काल सायंकाळ पासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे. धुळे शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून महापालिकेच्या अग्निशामन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नदी काठच्या रहिवाशांना देखील सुरक्षीत स्थळी हलवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. दरम्यान, निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून आज सकाळी पाच हजार सातशे पन्नास घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात आलं.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 02 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०२ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि विजय घाटावर लालबहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिली.
तत्पूर्वी, महात्मा गांधींची कालातीत शिकवण आपला मार्ग उजळत राहाते, तर आव्हानात्मक काळात शास्त्रीजींचं नेतृत्व अनुकरणीय असल्याचं पंतप्रधानांनी टविट संदेशात म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं निमित्ताने केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं महात्मा गांधी यांच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळ मध्ये शांती सलोखा सदभावना रॅली काढण्यात आली. सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालयातून निघालेल्या या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी 'मजबुती का नाम, महात्मा गांधी' अशा घोषणा दिल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला.
गोंदिया जिल्ह्यातल्या भजेपार गावातल्या पर्यावरण दूत युवकांनी ३० किलोमीटर सायकल वारी करून गांधीजींना अभिवादन केलं.
****
आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ५० हजाराहून अधिक नागरीकांनी अवयवदानाची शपथ घेतली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे. आज सामाजिक माध्यमावर दिलेल्या संदेशात त्यांनी, नागरीकांना अवयवदानाची शपथ घेण्याचं आवाहन केलं आहे.
****
येत्या तीन ते चार वर्षांत जगातलं आघाडीचं मोटार उत्पादन केंद्र बनण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. चेक रिपब्लिकची राजधानी प्राग इथं, भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. गेल्या नऊ वर्षांत ऑटोमोबाईल उद्योगाच�� आकार साडेचार लाख कोटी रुपयांवरून साडेबारा लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला असून, या उद्योगामुळे देशातल्या साडेचार कोटी तरुणांना रोजगार मिळाल्याचं ��डकरी यांनी सांगितलं.
****
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत आज पुरुषांच्या स्पीड स्केटिंग तीन हजार मीटर रिले शर्यतीत आणि रोलर स्केटिंग मध्ये भारतानं कांस्य पदकं जिंकली.
आज भारताच्या महिला कबड्डी संघाचा सामना चीन शी होणार आहे. टेबल टेनिस मध्ये महिला दुहेरीत उपांत्य फेरीत सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांचा सामना उत्तर कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. अमलान बोरगोहेन, पुरुषांच्या २०० मीटरमध्ये आणि भारतीय मिश्रित चार बाय ४०० मीटर स्पर्धेत धावणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेत काल बीडच्या अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. बीड जिल्ह्यात सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. अविनाशचे वडील मुकुंद साबळे आणि आई वैशाली साबळे यांनी या शब्दात आपला आनंद व्यक्त केला,
काल जी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक त्याने मिळवल्यामुळे मला मोठा भरपूर आनंद वाटतो. आपल्या मुलाने अविनाशने देशात एकदम नाव उंचावले. अविनाशने भरपूर कष्ट करुन या देशामध्ये नाव उंचावले, म्हणून खूप आनंद वाटतोय. भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय त्यानी, त्याचा सगळ्यांना आनंद आहे.
****
मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं लाक्षणिक आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. प्रत्येक गावात, तालुक्याच्या ठिकाणी तहसील तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जात आहे.
****
प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणार्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे आज छत्रपती संभाजीनगर इथं महाआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे.
****
बीड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात काल ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत कार्यशाळा तसंच ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ या सामाजिक संस्थेला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
बुलढाणा तालुक्यात नांदुरा ते मलकापूर रस्त्याच्या लगत झोपडीत झोपलेल्या मजुरांना एका भरधाव आयशर ट्रकने चिरडल्याची घटना आज पहाटे घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. चिखलदरा तालुक्यातल्या मोरगाव इथले दहा मजूर रोजगाराच्या शोधात भटकंती करत नांदुरा इथं सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात रुजू झाले होते.
****
चंद्रपूरच्या प्र��िद्ध ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या प��्यटन हंगामाला कालपासून सुरुवात झाली. गेले तीन महिने पावसाळ्यामुळे व्याघ्र प्रकल्पात पर्यटन बंद ठेवण्यात आलं होतं. प्रकल्प व्यवस्थापनाने आता ऑनलाईन नोंदणी देखील सुरू केली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान.
किल्ले प्रतापगडाच्या विकासासाठी २५ कोटी रुपये तर गड किल्ले संवर्धनासाठी दूर्ग प्राधिकरण स्थापनेची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी कुलगुरू डॉ नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन.
आणि
तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना अनि��्णित; भारतानं मालिका गमावली तर हॉकी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. टेबलटेनिपटू शरद कमल अचंता यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ॲथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारा महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याला अर्जुन पुरस्कार तर क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
किल्ले प्रतापगडच्या विकासासाठी २५ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ३३६व्या शिवप्रताप दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या किल्ले प्रतापगड इथं झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्यदैवत आहेत, त्यांच्या विचारांनुसारच आम्ही राज्यकारभार करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या गड किल्ल्यांच्या विकासासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तत्पूर्वी प्रतापगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगड फुलांच्या तोरणासह विद्युत रोषणाईनं सजवण्यात आला आहे.
****
ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, माजी कुलगुरु डॉ.नागनाथ कोत्तापल्ले याचं पुण्यात अल्पशा आजाराने निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. गेल्या वर्षी कर्करोगाचं निदान झालेले कोत्तापल्ले यांना विषाणू संसर्ग झाल्यामुळे पंधरा दिवसांपासून पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अतिदक्षता विभागात त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवलं होतं. उपचारादरम्यान, त्यांचं आज दुपारी निधन झालं. कोत्तापल्ले यांच्या कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा –
२९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यात मुखेड इथं जन्मलेले कोत्तापल्ले यांनी देगलूर इ���ून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. पदवी तसंच पदव्युत्तर पदवीत त्यांनी कुलपतींचं सुवर्णपदक पटकावलं होतं. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर १९८० साली त्यांनी पीएच. डी. पदवी मिळवली. बीड इथं मराठीचे अधिव्याख्याता, त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिव्याख्याता आणि प्रपाठक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिल्यावर २००५ साली ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून ��्यांनी लौकिक मिळवला.
राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. श्रीगोंदा इथं १९९९ साली झालेलं ग्रामीण साहित्य संमेलन तसंच २००५ साली जालना इथं झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण इथं २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.
कोत्तापल्ले यांची विपुल ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. ‘मूड्स’ कृष्णमेघ हे कवितासंग्रह, ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ आदी कथासंग्रह, ‘राजधानी’ हा दीर्घकथा संग्रह, ‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ या कादंबऱ्या, ‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य: स्वरूप आणि बोध’, अस्तित्वाची शुभ्र शिडे, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा अन्वयार्थ’, ‘साहित्याचा अवकाश’ ‘मराठी कविता: एक दृष्टिक्षेप’, आदी समीक्षात्मक ग्रंथ, ‘जोतीपर्व’ हे अनुवादित पुस्तक प्रसिद्ध आहे. याशिवाय ‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ आदी पुस्तकांचं संपादनही कोत्तापल्ले यांनी केलं आहे. त्यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर, आसाराम लोमटे, दासू वैद्य, यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेकांनी दु:ख व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
माजी मंत्री सुरेश जैन यांना घरकूल घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी जैन यांना न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन दिला होता, मात्र आता न्यायालयाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला आहे.
****
माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. काळा पैसा वैध करण्यास प्रतिबंध करणाऱ्या पीएमएलए न्यायालयात मलिक यांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत सक्तवसुली संचालनालय-ईडीने त्यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला. ईडीपूर्वी आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं, मलिक यांनी आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.
****
गु��रातमध्ये २००२ साली झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातल्या दोषी ठरलेल्या ११ जणांच्या सुटकेला बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणातील ११ दोषींना २० वर्षांच्या कारावासानंतर गुजरात सरकारने १५ ऑगस्ट २०२२ रोजी मुक्त केलं होतं. बिल्किस बानो सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका यांनी दाखल केली आहे.
****
मंदिरांच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान मंदिरांच्या जमिनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणी नियुक्त विशेष तपास पथकाने आपला अहवाल दिल्यानंतरही काहीही कारवाई झाली नसल्याने, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती, खंडपीठाने धस यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते, त्याला धस यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाचा निर्णय कायम ठेवल्यानं, धस आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह सात जणांविरोधात आठ मंदिरांची जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका न्यूझीलंडने एक शून्यने जिंकली आहे. मालिकेत आजचा तिसरा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. भारतानं प्रथम फलंदाजी करत, सर्वबाद २१९ धावा केल्या. न्यूझीलंड संघाने १८ षटकांत एक बाद १०४ धावा केलेल्या असताना, पावसामुळे खेळ थांबवावा लागला, तो पुन्हा सुरू होऊ शकला नाही.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ या आठवड्यात बांगलादेश दौऱ्यावर जात आहे. चार डिसेंबरपासून बांगलादेशसोबत तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका तर १४ डिसेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच हॉकी सामन्यांच्या मालिकेत भारताने आज ऑस्ट्रेलियाचा चार -तीन असा पराभव केला. भारताकडून मनप्रितसिंग, अभिषेक, समशेरसिंग, आणि अक्षयदीपसिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. मालिकेत पहिले दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलिया दोन एकने आघाडीवर आहे. चौथा सामना तीन तारखेला तर पाचवा सामना चार तारखेला होणार आहे. २०२३ च्या जानेवारी महिन्यात ओडिशात होणाऱ्या आगामी हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. 
****
अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. आज सकाळी १० वाजता वर्णी महापूजा झाली, पुढचे आठ दिवस कीर्तन, प्रवचन, भजन आदी उपक्रम मंदिरात राबवले जाणार असून, सात डिसेंबरला होम-हवन आणि महापूजेने नवरात्रोत्सवाची सांगता होईल. महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आराध बसणाऱ्या महिलांच्या निवासाची व्यवस्था देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद शहरातील रिक्षा चालकांनी उद्यापासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
शेतात राबणारा महाराष्ट्राचा अविनाश साबळे आता जागतिक स्पर्धेत इतिहास रचण्यासाठी सज्ज
शेतात राबणारा महाराष्ट्राचा अविनाश साबळे आता जागतिक स्पर्धेत इतिहास रचण्यासाठी सज्ज
शेतात राबणारा महाराष्ट्राचा अविनाश साबळे आता जागतिक स्पर्धेत इतिहास रचण्यासाठी सज्ज अविनाशला करोना झाला. त्यानंतर त्याचे पाय जड झाले होते. जवळपास तीन महिने त्याने कोणतेच काम केले नाही. सकाळी धावण्यासाठी जाणे देखील त्याला कठीण वाटत होते. त्यामुळे साबळे कुटुंबियांना अविनाशची काळजी वाटू लागली होती. अविनाश पुन्हा धावू शकणार की नाही, ही भिती त्यांनी सतावत होती. पण त्यानंतर काय चमत्कार घडला,…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 September 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
हैदराबाद मुक्तिदिन-अमृत महोत्सवी सोहळ्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन; मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी मुक्तिदिन साजरा.
मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.
औरंगाबाद इथं आयटीआय प्रशिक्षण संस्थेत दोन दिवसीय महारोजगार मेळाव्याला प्रारंभ.
आणि
माजी केंद्रीय गृहमंत्री माणिकराव गावित यांचं वृद्धापकाळानं निधन.
****
हैदराबाद मुक्ति संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाला आजपासून आरंभ झाला. सिकंदराबाद इथल्या संचलन मैदानावर आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हैदराबाद मुक्तिदिन-अमृत महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन झालं. मुक्तिलढ्यात योगदान देणाऱ्या विविध वीरांचं स्मरण करून शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नेते तसंच स्वातंत्र्यसैनिक यावेळी उपस्थित होते.
मराठवाड्यात ठिकठिकाणी आज ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी मुक्तिदिवस साजरा करण्यात आला. औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानात मुक्तिसंग्राम स्मारक परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला विकासाची गती पकडायची असून, या विभागाच्या विकासाचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं. ते म्हणाले –
मराठवाड्याच्या या पवित्र भूमीचे मला नेहमीच कुतुहल वाटले आहे. मराठवाड्यात संतांचे संस्कार आहेत, मेहनती तरुण वर्ग आहे, वाढणारे उद्योग आहेत, पर्यटनाला भरपूर संधी आहे, तरी आपल्याला विकासाची गती पकडायची आहे. इथले विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच संपूर्ण मराठवाड्यातला पायाभूत सुविधांचा मुख्यमंत्री वॉर रुम मधून नियमित आढावा देखील घेतला जाईल, असे शब्द देखील आपल्याला मी याठिकाणी देऊ इच्छितो.
विविध विकास कामांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी घोषणा केली. औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वेमार्गाचं भूसंपादन, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेत नांदूर मधमेश्वर प्रकल्पातल्या चार धरणांचा समावेश करुन अखंड जलवाहिनीद्वारे पाणी उपलब्धता, जालना जिल्ह्यात अंबड इथं भुयारी गटार योजना तसंच बदनापूर इथं नविन बसस्थानक उभारणं, परभणी शहरासाठी पाणी पुरवठा योजनेला मंजुरी, हिंगोली इथं हळद संशोधन केंद्रासाठी जागेची उपलब्धता, नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी जागेची उपलब्धता, नांदेड महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी तरतूद, बीड इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत बांधकाम १४२ कोटी रुपये निधी, लातूर जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी जागेची उपलब्धता तसंच विमानतळासाठी अतिरिक्त भूसंपादनाची तरतूद, आदी कामांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
रा��्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक विजेता धावपटू अविनाश साबळे याचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते ३० लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
****
जालना इथं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. सत्तार यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उस्मानाबाद इथं आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मुक्तिसंग्रामात उस्मानाबाद जिल्ह्याचं योगदान मोठं असल्याचं सावंत यांनी नमूद केलं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पावसाने नुकसान झाल्यामुळे पूर्वीपेक्षा दुप्पट मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
हिंगोली इथं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार य���ंच्या हस्ते ध्वजारोहण झालं. निजामाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्या कुटुंबीयांची मुनगंटीवार यांनी भेट घेतली.
परभणी इथं सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. भाषा, संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक आणि राजकीय हक्क प्राप्तीसाठी मराठवाड्यातल्या जनतेने जो त्याग केला, तो सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे, असे गौरवोद्‌गार सावे यांनी काढले.
बीड इथं रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणानंतर भुमरे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे नातेवाईक यांना भेटून शुभेच्छा दिल्या. हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी आदारांजली वाहीली.
नांदेड इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा मुक्ती लढा हा सर्वार्थाने व्यापक लढा आहे, असं फडणवीस म्हणाले. मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टीने गेल्या काही वर्षांपासून आपण प्रयत्न करत असून अजून खूप काम करावं लागेल असं फडणवीस यावेळी म्हणाले.
लातूर इथं कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. स्वातंत्र्य सैनिक कालिदास देशपांडे यांच्या दैनंदिनीवर आधारित 'हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि मी' तसंच प्राध्यापक चंद्रशेखर लोखंडे लिखित मराठवाड्याचा मुक्ती लढा आणि हैद्राबाद संस्थान या पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
उद्योजकता, अॅप्रेंटीस विभागाअंतर्गत औरंगाबाद इथं आयटीआय प्रशिक्षण संस्थेच्या आवारात दोन दिवसीय महारोजगार मेळाव्याला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि कौशल्यविकास आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्‌घाटन झालं. नवीन सरकारनं राज्य बेरोजगार मुक्त करायचा संकल्प केला असून, आज औरंगाबादेत याची सुरुवात झाली. या महारोजगार मेळाव्यात किमान ५००० युवकांना नोकरी मिळेल असा विश्वास कौशल्यविकास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यावेळी बोलताना देशात रोजगाराच्या आणि स्��यंरोजगाराच्या अधिका अधिक संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत असल्याचं सांगितलं.
****
माजी केंद्रिय गृहमंत्री माणिकराव गावित यांचं वृद्धापकाळानं आज निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. गावित यांनी संसदेत नऊ वेळा खासदर पद भूषवलं असून ते काहीकाळ देशाचे गृहमंत्री होते. माणिकराव गावित यांच्या पार्थिव देहावर उद्या नवापूर इथं अंतिम संस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गावित यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आदिवासी, ग्रामीण भागाचा सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून देशभर लौकीक असलेले प्रगल्भ असं मार्गदर्शक नेत्रृत्व गमावलं असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानात लोकसहभाग वाढवावा आणि क्षयमुक्त भारताचं उद्दिष्ट यशस्वी करावं, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. प्रधान मंत्री क्षयमुक्त भारत अभियान, निक्षय मित्र सत्कार समारंभ आणि पोषण आहार वितरण सोहळा आज मुंबईतल्या राजभवनात झाला, त्यावेळी कोश्यारी बोलत होते. भारतातून २०२५ पर्यंत क्षय रोग हद्दपार करण्याचं उद्दिष्ट आखण्यात आल्याचं कोशारी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरातल्या रस्त्यांच्या कामाचे प्रश्न, कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या मालाच्या लिलावाची मागणी, पिक विमा या मागण्यासाठी आज सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी यावळी दीड तास नांदेड- हिंगोली महामार्ग रोखून धरला होता. तहसिलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 September 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
मराठवाड्याला विकासाची गती पकडायची असून, या विभागाच्या विकासाचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुक्तिसंग्राम स्मारक परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले –
मराठवाड्याच्या या पवित्र भूमीचे मला नेहमीच कुतुहल वाटले आहे. मराठवाड्यात संतांचे संस्कार आहेत, मेहनती तरुण वर्ग आहे, वाढणारे उद्योग आहेत, पर्यटनाला भरपूर संधी आहे, तरी आपल्याला विकासाची गती पकडायची आहे. इथले विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच संपूर्ण मराठवाड्यातला पायाभूत सुविधांचा मुख्यमंत्री वॉर रुम मधून नियमित आढावा देखील घेतला जाईल, असे शब्द देखील आपल्याला मी याठिकाणी देऊ इच्छितो. 
विविध विकास कामांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी घोषणा केली. औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वेमार्गाचं भूसंपादन, क्रीडा विद्यापीठ, घृष्णेश्वर मंदिर विकास कामासाठी १५७ कोटी, पैठण इथल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास, जालना जिल्ह्यात अंबड इथं भुयारी गटार योजना, जाफ्राबादसाठी पाणी पुरवठा योजनेला मंजुरी, हिंगोली इथं श्री क्षेत्र औंढा नागनाथ मंदिराचा विकास, नांदेड महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी तरतूद, लातूर विमानतळासाठी अतिरिक्त भूसंपादनाची तरतूद, रस्ता दुरुस्ती निधी, आदी कामांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्याच्या १२ हजार कोटी रुपये निधीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
बर्मिंगहम इथं झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू अविनाश साबळे याचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते ३० लाख रुपायंचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा माहिती कार्यालया���्या वतीनं हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील योद्ध्यांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचं उद्घाटनही यावेळी झालं.
जालना इथं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण झालं. यावेळी बोलताना सत्तार यांनी, मराठवाड्यातल्या जनतेला मुक्तिसंग्रामाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यावेळी उपस्थित होते.
उस्मानाबाद इथं आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मराठवाडा मुक्तिसंग्रामात उस्मानाबाद जिल्ह्याचं योगदान मोठं असल्याचं सावंत यांनी नमूद केलं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पावसाने नुकसान झाल्यामुळे पूर्वीपेक्षा दुप्पट मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते.
हिंगोली इथं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी मानवंदना दिली.
नांदेड इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, परभणी इथं सहकार मंत्री अतुल सावे, बीड इथं रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे तर लातूर इथं कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
प्रकल्प चित्ता अंतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या ‘कुनो राष्ट्रीय उद्याना’त नामिबियातून ��णलेले चित्ते सोडले. जंगली चित्त्यांचं पुनर्वसन करणारा हा प्रकल्प जगातला अशा स्वरूपाचा पहिला आंतरखंडीय प्रकल्प आहे. भारतातील वन्यजीव आणि त्याच्या अधिवासाचं पुनरुज्जीवन आणि त्यात वैविध्य आणण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा हा प्रकल्प एक भाग आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या सेवा पंधरवड्याला आजपासून प्रारंभ झाला. आज १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या या पंधरवड्यात, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, दिव्यांगांना मदत, मोदी सरकारच्या कामाची माहिती देणारी प्रदर्शने, वैचारिक चर्चा असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचं आज नाशिक इथल्या रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. १९६५ साली धुळे जिल्ह्यातल्या नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दिला सुरुवात झाली. १९७१ ते १९७८ पर्यंत ते धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती होते. १९८० साली ते नवापूरचे आमदार झाले, तर १९८१ साली खासदार झाले. त्यानंतर गावित हे नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात गावित यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यांच्या पार्थिवावर उद्या नवापूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या प्रणव आनंदनं १६ वर्षाखालील, तर ए आर इलमपार्थी यानं १४ वर्षांखालील गटात अजिंक्यपद पटकावलं आहे. अग्रमानांकित प्रणव आनंद यांनं ११ फेऱ्यांमध्ये नऊ गुण मिळवले. या विजयानंतर तो भारताचा ७६ वा ग्रँडमास्टर ठरला आहे. इलमपार्थी यानं ११ फेऱ्यांमध्ये साडेनऊ गुण मिळवले.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 July 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २१ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बांठिया आयोगाच्या अहवालानुसार इतर मागास प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षण लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, आगामी दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश
·      १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासह सर्वोच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांवर येत्या एक ऑगस्ट रोजी सुनावणी
·      राष्ट्रपतिपदासाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी
·      शिवसेना म्हणून मान्यता देण्याची बंडखोर शिंदे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ३२५ रुग्ण, मराठवाड्यात १३९ बाधित
·      प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार तर, आतांबर शिराढोणकर आणि संध्या माने यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर
आणि
·      पीक विम्यामध्ये कांदा पिकाचा समावेश करण्याची उस्मानाबाद युवा सेनेची मागणी
****
 सविस्तर बातम्या
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बांठिया आयोगाच्या अहवालानुसार इतर मागास प्रवर्ग - ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या
सुनावणीत न्यायालयानं ओबीसी आरक्षणाबाबत बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करत, आगामी दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी प्रवर्गातल्या राजकीय आरक्षणासह होतील.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर काल पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, नव्या सरकारचा पा��गुण राज्यासाठी चांगला असल्याचं सांगत, ओबीसी आरक्षणाचं श्रेय सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना असल्याचं सांगितलं. आरक्षणाचं श्रेय घेत असलेले विरोधक कालपर्यंत बांठिया आयोगाच्या विरोधात बोलत होते, अशी टीकाही शिंदे यांनी केली. ते म्हणाले...
 Byte….
नवीन सरकारचा पायगुण चांगला आहे, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि एक प्रकारे सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निकाल एक सुभसंकेत म्हणायलाही हरकत नाही. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला कुठलंही क्रेडिट घ्यायचं नाही, हा विजय जो आहे, ओबीसी समाजाच्या न्याय मागण्या, न्याय लढा ज्यांनी दिला त्यांना देतो आम्ही. दुसरी गोष्ट कालपर्यंत परवापर्यंत हे जे आता श्रेय घेतायेत, ते आयोगाच्या विरुद्ध बोलत होते. आता लगेच झाला निर्णय की आम्ही केलंय, ठिक आहे तुम्ही केलंय. सगळ्यांनी मिळून केलंय आम्ही असं म्हणतो
 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचं समाधान असल्याची भावना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
****
राज्य विधानसभेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासह सर्वोच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांवर येत्या एक ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत यासंदर्भात दोन्ही बाजूंनी २७ जुलै पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश, न्यायालयानं दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकील हरीश साळवे यांनी काल काही कागदपत्रं सादर करण्यास वेळ मागितला, तसंच सुनावणी एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र, सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी यावर बोलताना, काही मुद्दे अतिशय घटनात्मक असल्यानं तातडीने सुनावणी आवश्यक असल्याचं नमूद केलं. आमदार अपात्र ठरवण्याच्या याचिकांबाबत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे.
****
राष्ट्रपतिपदासाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. संसद भवन परिसरात आज सकाळी ११ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि संयुक्त पुरोगामी आघाडीसह विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात या पदासाठी थेट लढत आहे.
****
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुभेच्छा दिल्या. इंग्लंडमध्ये बर्मिंगहम इथं २८ जुलैपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंशी पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. बीड जिल्ह्यातला धावपटू अविनाश साबळे याचाही या खेळाडूंमध्ये समावेश आहे. पंतप्रधानांनी साबळे याच्याशी साधलेल्या संवादातला हा अंश...
अविनाश, नमस्कार।
जय हिंद, सर। मै अविनाश साबले. मै कॉमनवेल्थ गेम्स मे ॲथलेटीक्स मे थ्री थाऊजंड मीटर इव्हेंट मे इंडिया को रिप्र���जेंट कर रहा हूं।
अच्छा अविनाश मैने सुना है, की सेना जॉईन करने के बाद भी आपने इस ट्रीपल चेस को चुना है। सियाचीन और ट्रीपल चेस का कोई संबंध है क्या?
हां जी सर। ट्रीपल चेस इव्हेंट मे ऑब्स्टिकल्स का गेम है। मतलब जैसे इसमे हमे हर्डल्स को उसके उपर जंप करना है। फिर वॉटर जंप करना है। इसी तरह से आर्मी की जो ट्रेनिंग होती है उसमे मे भी हमे बहोत सारे ऑब्स्टिकल्स के बीच मे से जाना पडता है। यहाँ तो मुझे ट्रीपल चेस इव्हेंट मे बहोत ज्यादा आसान लग रहा है।
****
महागाई आणि गरजेच्या वस्तूंवरच्या वस्तू आणि सेवा करातली वाढ, या मुद्द्यांवरून विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही बाधित झालं.
****
शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटानं आपल्याच गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्यावी, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिंदे गटाच्या खासदारांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ३२५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख २५ हजार १०६ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात सात रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३९ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ४७१ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ६२ हजार ४३१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १४ हजार ६३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १३९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या ४२, जालना आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी ३५, बीड १४, तर नांदेड जिल्ह्यातल्या १३ रुग्णांचा समावेश आहे.  
****
राज्य सरकारचा २०२०-२१ साठीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, प्रसिद्ध बासरीवादक आणि संगीतकार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना घोषित करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागानं कलाक्षेत्रातल्या विविध पुरस्कारांचीही काल घोषणा केली. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार, २०१९-२० या वर्षासाठी आतांबर शिराढोणकर यांना तर २०२०-२१ या वर्षासाठी संध्या रमेश माने यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. “पवळाबाई तबाजी भालेराव हिवरगावकर तमाशा लोककला पुरस्कार”, “हरिभक्तपरायण शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव कीर्तन अथवा समाजप्र��ोधन पुरस्कार” ही दिले जाणार असल्याचं, जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय, वृद्ध साहित्यिक तसंच कलावंत मानधन योजना आता “राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक - कलावंत मानधन योजना” म्हणून ओळखली जाईल, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद इथले वाचनसंस्कृती रुजावी यासाठी आयुष्यभर निरपेक्ष धडपड करणारे श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ, 'संडे क्लब' आणि देशपांडे परिवारातर्फे, 'श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार' दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशपांडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी, येत्या १४ ऑगस्ट ला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. मिर्जा अब्दुल कय्युम नदवी हे वाचनसंस्कृती रुजावी यासाठी प्रयत्नशील असून, 'मोहल्ला लायब्रररी', पुस्तक वाटप आदी उपक्रमात ते हिरिरीने पुढाकार घेतात.
****
“हर घर तिरंगा” हा उपक्रम औरंगाबाद जिल्हा प्रशासनकडून व्यापक प्रमाणात राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे तसंच सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. “औरंगाबाद शहरात महानगरपालिकेतर्फे तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत तिरंगा झेंडा उपलब्ध करुन देणात येणार आहेत. याबाबतची खरेदी प्रक्रिया संबंधित विभागाने पूर्ण करुन "हर घर तिरंगा" उपक्रम यशस्वी करावा, त्याबरोबर विभाग प्रमुखांनी या उपक्रमांत सहभागी होण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
****
कोविड लस -अमृत महोत्सव याअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पात्र नागरिकांनी विनामूल्य वर्धक मात्रेचा लाभ घ्यावा, असं आवाहन, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे. ते काल उस्मानाबाद इथं समन्वय समितीच्या बैठकीत बोलत होते. उस्मानाबाद जिल्ह्यात अमृत महोत्सवाच्या कालावधीत दुसरी मात्रा आणि वर्धक मात्रेसाठी पात्र असणाऱ्या आठ लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर कुलदीप मिटकरी यांनी दिली.
****
बीड जिल्ह्यातही बुस्टर डोस अभियान मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे यांनी सांगितल. ही मात्रा घेतलेले, बीड जिल्ह्यातले लाभार्थी विशाल वैद्य यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
Byte….
मी कोरोना पासून वाचण्यासाठी दोन लस घेतलेल्या आहेत, तरी आज मी तिसरी वर्धक मात्रा घेतलेली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत मी भाग घेतलेला आहे. तसंच मी माझा परिवार व माझे आप्तेष्ट यांना सगळ्यांना मार्गदर्शन करेल, लस घेण्यासाठी पूर्णपणे माहिती पुरवेल. केंद्र सरकारच्या या योजनेचा मी जसा उपभोग घेतला, तसा सर्व��ामान्य जनतेनं सुद्धा घ्यावा, असं मी आवाहन करतो.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं.
****
पीक विम्यामध्ये कांदा पिकाचा समावेश करावा, अशी मागणी करणारं निवेदन उस्मानाबाद युवा सेनेकडून उस्मानाबादच्या जिल्हा कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला काल देण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यात कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात असूनही पीक विमा कंपनीच्या संकेतस्थळावर कांदा पिकाची निवड करता येत नसल्यानं, हजारो शेतकरी कांदा पिकाच्या विम्यापासून वंचित राहतात, यासाठी कांदा पिकाचा विमा योजनेत समावेश करावा, असं न केल्यास शिवसेनेच्या पद्धतीनं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवासेनेनं दिला आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयातला पाणी साठा काल सायंकाळी सुमारे ८३ टक्क्यांच्या वर पोहोचला. सध्या धरणात ४८ हजार ४४० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ३०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं, तर जलविद्युत प्रकल्पातून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी धरणाच्या पाणीपातळीचा काल आढावा घेतला. धरणातला पाणीसाठा नव्वद टक्के झाल्यानंतरच धरणातून पाणी सोडण्याचं नियोजन जलसंधारण विभागानं करावं, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे .
** **
भारतीय टपाल खात्यानं सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीनदयाळ स्पर्श योजना’ या नावानं फिलाटेली शिष्यवृत्ती सुरु केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटं जमवण्याची आवड निर्माण करण्याचा टपालखात्याचा मानस आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा छंद जोपासला आहे, अशा विद्यार्थ्यांना टपाल खात्याच्या ‘फिलाटेली प्रश्नमंजुषा आणि फिलाटेली प्रकल्पाच्या’ माध्यमातून वर्षिक सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी येत्या एक ते एकतीस ऑगस्टपर्यंत टपाल खात्याकडे अर्ज करू शकतात. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन बीडचे डाक अधीक्षक डॉक्टर बी.एच.नागरगोजे यांनी केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० जुलै २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      ओबीसी आरक्षणाबाबत बांठिया आयोगाच्या अहवालानुसार दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.
·      १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसह विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या एक ऑगस्ट रोजी सुनावणी.
·      महागाईसह अन्य मुद्द्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित.
आणि
·      राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर तर श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कारासाठी मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांची निवड.
****
ओबीसी आरक्षणाबाबत बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करत, सर्वोच्च न्यायालयानं आगामी दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश आज दिले. यामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी प्रवर्गातल्या जातींच्या राजकीय आरक्षणासह होतील. न्यायालयाच्या या निर्णयानंतर, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत महायुती सरकारनं दिलेला शब्द पाळला, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणं, हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय असून, ओबीसी कल्याण, बहुजन कल्याण, गरीब कल्याण हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहील असंही फडणवीस यांनी सांगितलं. तर, राज्यात सत्तांतर झाल्यामुळेच ओबीसी आरक्षण अस्तित्त्वात आलं, असं मत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. माजी मंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
****
राज्य विधानसभेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासह सर्वोच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांवर येत्या एक ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. यासंदर्भात दोन्ही बाजूंनी २७ जुलै पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकील हरीश साळवे यांनी आज काही कागदपत्रं सादर करण्यास वेळ मागितला. तसंच सुनावणी एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र, सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी यावर बोलताना, काही मुद्दे अतिशय घटनात्मक असल्याने तातडीने सुनावणी आवश्यक असल्याचं नमूद केलं. गटनेता बदलणं हा पक्षाचा अधिकार आहे, त्याशिवाय, बहुमतानेही सदस्य निवडू शकतात. एखादा वाद उद्भवल्यास विधानसभा अध्यक्ष हस्तक्षेप करू शकतात, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.
****
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभेच्��ा दिल्या. इंग्लंडमध्ये बर्मिंगहम इथं २८ जुलैपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंशी पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. बीड जिल्ह्यातला धावपटू अविनाश साबळे याचाही या खेळाडूंमध्ये समावेश आहे. पंतप्रधानांनी साबळे याच्याशी साधलेल्या संवादातला हा अंश –
अविनाश, नमस्कार।
जय हिंद, सर। मै अविनाश साबले. मै कॉमनवेल्थ गेम्स मे ॲथलेटीक्स मे थ्री थाऊजंड मीटर इव्हेंट मे इंडिया को रिप्रेजेंट कर रहा हूं।
अच्छा अविनाश मैने सुना है, की सेना जॉईन करने के बाद भी आपने इस ट्रीपल चेस को चुना है। सियाचीन और ट्रीपल चेस का कोई संबंध है क्या?
हां जी सर। ट्रीपल चेस इव्हेंट मे ऑब्स्टिकल्स का गेम है। मतलब जैसे इसमे हमे हर्डल्स को उसके उपर जंप करना है। फिर वॉटर जंप करना है। इसी तरह से आर्मी की जो ट्रेनिंग होती है उसमे मे भी हमे बहोत सारे ऑब्स्टिकल्स के बीच मे से जाना पडता है। यहाँ तो मुझे ट्रीपल चेस इव्हेंट मे बहोत ज्यादा आसान लग रहा है।
****
राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. संसद भवन परिसरात उद्या सकाळी ११ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि संयुक्त पुरोगामी आघाडीसह विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात या पदासाठी थेट लढत होणार आहे.
****
महागाई आणि गरजेच्या वस्तूंवरच्या वस्तू आणि सेवा करातली वाढ, या मुद्द्यांवरून विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामात आजही अडथळा आला. लोकसभेत कामकाज सुरू झाल्याबरोबर काँग्रेसचे सदस्य दूध आणि ताकाची पाकिटं दाखवून घोषणा करत सभागृहाच्या मधोमध आले. लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी वारंवार या सदस्यांना जागेवर जाण्याची आणि शून्यकाळात आपले मुद्दे मांडण्याची विनंती केली, पण या सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं लोकसभा अध्यक्षांना सदनाचं काम आधी दुपारी दोनपर्यंत आणि त्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं.
राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी महागाईचा मुद्दा मांडला, सभापती एम.वेंकय्या नायडू यांनी, या मुद्यावर आपण सभागृहात चर्चा घेण्यास तयार असल्याचं सांगितलं मात्र तरीही काँग्रेस आणि आम आदमी पक्षासह इतर विरोधी पक्षांचे सदस्य सरकारविरोधी घोषणा देत सभागृहाच्या मध्यभागी आले, सभापतींनी वारंवार आवाहन करूनही गोंधळ न थांबल्यामुळे कामकाज प्रथम दुपारी दोनपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
राज्य सरकारचा २०२०-२१ साठीचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध बासरीवादक आणि संगीतकार पंडित हरिप्रसाद चौरसिया घोषित करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागानं कलाक्षेत्रातल्या विविध पुरस्कारांचीही घोषणा केली आहे.
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठीचा आतांबर शिराढोणकर यांना तर २०२०-२१ या वर्षासाठीचा संध्या रमेश माने यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
“पवळाबाई तबाजी भालेराव हिवरगावकर तमाशा लोककला पुरस्कार”, “हरिभक्तपरायण शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव कीर्तन अथवा समाजप्रबोधन पुरस्कार” ही दिले जाणार असल्याचं, जाहीर करण्यात आलं आहे.
याशिवाय, वृद्ध साहित्यिक तसंच कलावंत मानधन योजना आता “राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक - कलावंत मानधन योजना” म्हणून ओळखली जाईल, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद इथले वाचनसंस्कृती रुजावी यासाठी आयुष्यभर निरपेक्ष धडपड करणारे श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ ‘संडे क्लब’ आणि देशपांडे परिवारातर्फे ‘श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार’ दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशपांडे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी, येत्या १४ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. मिर्जा अब्दुल कय्युम नदवी हे वाचनसंस्कृती रुजावी यासाठी प्रयत्नशील असून ‘मोहल्ला लायब्ररी’, पुस्तक वाटप आदी उपक्रमात ते हिरिरीने पुढाकार घेतात.
****
अग्निपथ भरती योजनेतून भारतीय सैन्यदलात अग्निवीर पदभरतीसाठी नावनोंदणी प्रकिया सुरू झाली असून, ऑनलाईन नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख तीस जुलै ही आहे. पुण्याच्या भरती कार्यालयाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात येत्या तेवीस ऑगस्ट ते अकरा सप्टेंबर या काळात भरती मेळावा होणार आहे. बीड, पुणे, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा सहा जिल्ह्यांतल्या उमेदवारांसाठी हा मेळावा होणार आहे.
****
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीनं १३ वा वर्धापन दिन तसंच स्वातंत्राच्या अमृत महोत्सवा निमित्त वित्तीय समावेशन आणि आर्थिक साक्षरता अभियान राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत चेतना सायकल फेरीचा आज औरंगाबाद इथं बँकेच्या मुख्य कार्यालयापासून प्रारंभ करण्यात आला. नाबार्डचे सरव्यवस्थापक एम जे श्रीनिवासुलू आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत या फेरीला आज सुरुवात झाली. ही सायकल फेरी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातून जाणार आहे.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयातला पाणी साठा सुमारे ८२ टक्क्यांच्या वर पोहोचला आहे, सध्या धरणात २५ हजार ३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या ३०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर जलविद्युत प्रकल्पातून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे. विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्याची शक्यता असल्याने, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे.  
****
0 notes