#अभिजीत खांडेकर
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
योगामुळे समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग-पंतप्रधानांचं प्रतिपादन
दहावा योगदिन सर्वत्र उत्साहात साजरा-मराठवाड्यात विविध ठिकाणी शिबीरांमधून योगाभ्यास
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची सरकारची भूमिका-मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
लोकपाल नियुक्त न केल्याप्रकरणी यूजीसीकडून परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठासह १५७ विद्यापीठांना नोटीस
आणि
१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप
****
योग हा समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग तयार करत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. गेल्या दहा वर्षात योग हा आपल्या मर्यादित परिघातून बाहेर पडला असून, जगभरात योगाच्या लाभाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं.
या भाषणानंतर पंतप्रधानांसह जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, यांच्यासह अनेक मान्यवर योगाभ्यासात सहभागी झाले.
****
स्वत:साठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे.
नागपूर इथं परिवहन मंत्री नितीन गडकरी, तर मुंबईत वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी योगाभ्यास प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. मरीन ड्राईव्ह इथं झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देत, योग हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावा, असं मत व्यक्त केलं. उ��मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
मराठवाड्यात योगदिनानिमित्त सर्वत्र योगाभ्यास आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम पार पडला. भारतीय योग संस्था, यांच्यासह विविध संघटनांच्या वतीनं शहरात जिल्हा परिषदेसह विविध शासकीय कार्यालयं, पर्यटन विकास महामंडळ, आदी ठिकाणी योगशिबीरं घेण्यात आली.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या योगाभ्यास प्रात्यक्षिकात पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उप अधीक्षक वैभव पाटील, नाथा घारगे यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभाग, अंगुली मुद्रा विभाग आणि हस्ताक्षर तज्ज्ञ विभागातील कर्मचारी सहभागी झाले.
मौलाना आझाद महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, शिशुविहार शाळा, आदी शैक्षणिक संस्थांमध्येही योगदिवस साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे बोटॅनिकल गार्डन इथं योग शिबिर घेण्यात आलं. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, जालना जिल्ह्याचे खासदार डॉ कल्याण काळे यांच्यासह अनेक मान्यवर या शिबीरात सहभागी झाले.
नांदेड इथं गुरूग्रंथ साहिबजी भवनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, यांच्या उपस्थितीत झालेल्या योगाभ्यास प्रात्यक्षिकात प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी तसेच शालेय विद्यार्थ्यांन सहभाग घेतला.
जालना इथं पतंजली योग समिती, महानगरपालिका, मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसंच धोंडाबाई तोतला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग शिक्षक माऊली हरबक यांनी उपस्थितांना योगाभ्यासाचे धडे दिले. माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर, मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी झाले.
****
परभणी इथं जिल्हा प्रशासन आणि जागतिक योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजगोपालाचारी उद्यानात योगाभ्यास शिबीर घेण्यात आलं. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह अनेक अधिकारी, विद्यार्थी, तसंच नागरिकांनी या शिबीरात योगाभ्यास केला.
हिंगोली इथं संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येनं याठिकाणी योगासनं केली. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथं नारायणराव वाघमारे महाविद्यालयातही योगशिबीर घेण्यात आलं.
****
लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह जवळपास ६ हजार नागरिक सहभागी झाले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीच्या माध्यमातून योगाविषयी जनजागृती ��ेली.
****
बीड इथं चंपावती क्रीडा संकुलावर झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी कर्मचारी यांनी योगासनं केली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हा प्रशासन, आयुष विभाग, जिल्हा योग संघटना, नेहरु युवा केंद्र, पतंजली योग समितीच्या वतीने योगशिबिर घेण्यात आले. ४५० नागरिक, खेळाडू तसंच विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अकोला इथं जलतरण पटूंनी जलतरण तलावात योगासने करुन योग दिन साजरा केला. ५ वर्षांच्या चिमुकलीपासून ८० वर्षे वयाचे अनेक जण या उपक्रमात सहभागी झाले
****
महाराष्ट्र पोलीस दल अधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धीमत्ता-आर्टीफिशल इंटेलिजंस 'एआय'चा वापर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. या सर्व व्यवस्थेतून देशातले महाराष्ट्राचे पोलीस दल एक आधुनिक दल होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले –
आर्टीफिशियल इंटेलिजंसचा उपयोग हा लॉ अँड ऑर्डर करता प्रेडीक्टीव्ह सिच्युयेशन्स करता आणि एखादा गुन्हा घडला असेल तर तो गुन्हा सोडवण्याकरता आपल्याला करता येणार आहे. यासंदर्भात जे काही मॉड्युल आपण तयार केलं, त्या��ं प्रेझेंटेशन हे आज सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत झालं. त्यांनी जे काही सजेशन्स दिले आहेत, ते सजेशन्स इनकॉरपोरेट करून आपण लवकरच हा संपूर्ण प्रोजेक्ट रोल्डआऊट करणार आहोत, रोल आऊट करणार आहोत.
****
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ओबीसी आरक्षण बचाओची हाक देत, जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यावेळी उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधत, त्यांना हा दिलासा दिला. या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता. दरम्यान, आंदोलकांच्या वतीनं एक शिष्टमंडळ यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सह्याद्री अतिगृहात दाखल झालं आहे.
दरम्यान, अंबड तालुक्यातील शिवाजीनगरजवळ आज आंदोलकांनी छत्रपती संभाजी नगरहून बीड कडे जाणाऱ्या एसटी बस��र दगडफेक केली. पोलिसांनी बसमधील प्रवाशांना अन्य बसमध्ये बसवून, आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातल्या १५७ विद्यापीठांना लोकपाल नियुक्ती न केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. यामध्ये १०८ सरकारी, ४७ खासगी आणि २ अभिमत विद्यापीठांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, मुंबईतलं एस एन डी टी विद्यापीठ, नागपूर इथलं पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक इथलं आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पुण्याचं आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, तसंच दोन खासगी विद्यापीठांसह एकूण नऊ विद्यापीठांचा समावेश आहे. या सर्व विद्यापीठांनी तत्काळ लोकपाल नियुक्त करून यूजीसीला त्याबाबत माहिती द्यावी, असं याबाबतच्या परिपत्रकात म्हटलं आहे.
****
१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘मिफ’चा समारोप आज होणार आहे. या महोत्सवात दिला जाणारा सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा सुवर्णशंख पुरस्कार कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईत संध्याकाळी होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाईल. दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाईल.
****
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर इथं चिखलफेक आंदोलन केलं. राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला यावेळी चिखल फासण्यात आला. महागाई तसंच बेरोजगारीचं वाढतं प्रमाण, खते बियाणांचा कथित काळा बाजार, नीट परीक्षेत घोटाळा, आदी मुद्यांवरून या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये आंदोलन करण्यात आल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलतांना सांगितलं.
****
वट सावित्रीपौर्णिमेच्या सणानिमित्त आज महिलांनी वडाच्या वृक्षाचे पूजन करुन हा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला. या निमित्तानं वृक्षारोपणासह अनेक कार्यक्रम पार पडले.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातला टोकाई सहकारी साखर कारखाना सहयोग तत्वावर देण्याला सर्व शेतकरी सभासदांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात आज झालेल्या सभेत, सभासदांचा रोष पाहताच, अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी काढता पाय घेतला. सभासदांनी सर्व संचालकांना घेराव घालत, सदरील ठराव नामंजूर असल्याचं सांगितलं. असा ठराव झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सभासदांनी दिला आहे.
****
0 notes
Text
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका संपल्यानं भावुक झाली गुरूनाथची खरी बायको; म्हणाली....
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका संपल्यानं भावुक झाली गुरूनाथची खरी बायको; म्हणाली….
मुंबई ‘’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगली होती. अखेर या मालिकेनं ७ मार्चला प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होताच मालिकेतील म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेेकर याची पत्नी हिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. ‘अभि… साडे चार वर्षं आणि १३७५ पेक्षा जास्त भाग …मला तुझा…
View On WordPress
#Majhya Navryachi Bayko#Sukhada Khandkekar#sukhada khandkekar post for husband#अभिजीत खांडकेकर#अभिजीत खांडेकर#गुरूनाथ#माझ्या नवऱ्याची बायको#सुखदा खांडकेकर#सुखदा खांडेकर
0 notes
Text
Majhiya Priyala Prit Kalena
youtube
Mrunal Dusanis – Shamika(मृणाल डूसानिस)
Abhijeet Khandkekar – Abhi (अभिजीत खांडेकर)
Sneha Kulkarni (स्नेहा कुलकर्णी)
Prasad Jawade (प्रसाद जावाडे)
Sanjay Mone (संजय मोने)
Suhita Thatte (सुहिता थत्ते)
Sumukhi Pendse (सुमूखी पेंडसे)
Amita Khopkar (अमिता खोपकर)
Balaji Telefilms launched their first Marathi Serial 'Maziya Priyala Preet Kalena' on small screen. Ekta Kapoor give the comment that all matter was the strong story line and the entire star cast passion of working hard .The program will telecast from Monday to Friday at 8 pm on Zee Marathi. This is a love story between Shamika, a girl with Indian values and Abhijeet, an intelligent and confident boy. The story also revolves around two sisters Isha and Shamika take away by mother to New York after death of the their father . Star Cast In Maziya Priyala Preet Kalena: Mrunal Dusanis Abhijeet Khandkekar Sanjay Mone Suhita Thatte Sumukhi Pendse Amita Khopkar
Ektaa Kapoor is all set to launch her first Marathi venture o ‘Maziya Priyala Preet Kalena’ on small screen. The so called eternal love story will be televised on Monday to Saturday at 8 pm w.e.f 14th June 2010 on Zee Marathi.
This TV serial is a pure love story of an innocent NRI girl and a lovable boy belonging to a middle class family, portrayed by fresh faces Mrunal Dusanis and Abhijeet Khandkekar. The cast also includes Sneha Kulkarni, Prasad Jawade as new faces from ‘Maharashtracha Superstar’, a popular acting reality show of Zee Marathi. Along with them renowned theatre artistes Sanjay Mone, Suhita Thatte, Sumukhi Pendse, Amita Khopkar are playing major roles.
Talking about the first marathi venture of Balaji Productions, Ekta Kapoor has revealed that she was not really concerned about the cast or the lavish sets; but all that mattered to her was the strong storyline. On opting for newcomers, she says, “I would prefer a hard working guy or a girl, who is not so popular, but has that passion to work hard and possesses the art of perfection.”
0 notes