#अजय सिंह भारोत्तोलन
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
देशभरात दोनशे हून अधिक जिल्ह्यांमध्ये आज प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार मेळाव्याचं आयोजन
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना विशेष विमानानं परत आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
विरोधी पक्षाची एकजूट करून भाजपला सक्षम पर्याय देणार-खासदार शरद पवार
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी १४ मे नंतर पुन्हा आंदोलनाचा इशारा 
केरळमध्ये नाव उलटून २१ पर्यटकांचा मृत्यू; धाराशिव तसंच छत्रपती संभाजीनगर इथं पाण्यात बुडून चार जण दगावले
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सचा लखनौ सुपर जायन्ट्सवर तर सनरायजर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सवर विजय
आणि
आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या जेरेमी लालनिरुंगाला रौप्यपदक
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य भारत मिशन अंतर्गत, देशातल्या तरुणांना भवितव्याच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीनं, आज देशभरातल्या दोनशे हून अधिक जिल्ह्यांमध्ये, प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक तरुणांना प्रशिक्षणाच्या संबंधित संधी उपलब्ध करून देण्यासाठी, अनेक स्थानिक व्यवसाय आणि संस्थांना, या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमधल्या कंपन्यां सहभागी होत आहेत. या व्यासपीठाद्वारे, सहभागी संस्था संभाव्य शिकाऊ उमेदवारांशी थेट संपर्क साधू शकतात, त्यांच्या पात्रतेनुसार जागेवरच प्रशिक्षणार्थींची निवड करू शकतात, तसंच तरुणांच्या रोजगाराच्या संधी बळकट करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी डब्लू डब्लू डब्लू डॉट अप्रेनटीसशिप इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर भेट देऊन आपलं नाव नोंदवावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना विशेष विमानानं राज्यात आणण्याचे आदेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत, या विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्यासंदर्भात चर्चा केली. महाराष्ट्रातले २६ विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना आसामला आणण्यात येणार असून, तिथून आज दुपारपर्यंत हे विद्यार्थी विशेष विमानानं महाराष्ट्रात पोहोचणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...
‘‘मणिपूरमध्ये आपले विद्यार्थी जे अडकले आहेत, त्यांना तातडीने तिथून सुरक्षित स्थळी आणण्यासाठी मुख्य सचिव मनोज सौनिक आणि सी एम ओ चे भूषण गगराणी आणि गुप्ता या तिघांशी बोललो, हे तिघेही त्या कामावर आहेत. आणि त्यांना स्पेशल फ्लाईट करून त्यांना आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि तिथल्या दोन मुलांशी देखील बोललो मी आकाश शर्मा आणि तुषार आव्हाड. आणि त्यांना हे सांगितलं काळजी करू नका. युद्ध पातळीवर तुमची इकडे आणण्याची व्यवस्था करतो. ती मुलं घाबरली आहेत. त्यांना सांगितलं घाबरू नका. तुमची व्यवस्था आणण्याची आपण करतोय.’’
मणिपूर मधल्या परिस्थितीत सुधार होत असून, राज्यात सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी निमलष्करी दल प्रयत्न करत आहे. मणीपूरच्या राज्यपाल अनसुया उईके यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातल्या सर्वाधिक हिंसाचारग्रस्त चूरचंद्रपूर जिल्ह्यात सकाळी सात ते दहा यावेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. आतापर्यंत या हिंसाचारात चोपन्न जणांचा मृत्यू झाला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रादेशिक सेनेच्या महिला अधिकाऱ्यांना, नियंत्रण रेषेजवळील प्रादेशिक सैन्याच्या अभियंता रेजिमेंटमध्ये तैनात करण्यास, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. प्रादेशिक सैन्याच्या समूह मुख्यालय तसंच नवी दिल्ली इथल्या प्रादेशिक सैन्य महासंचालनालयात कर्मचारी अधिकारी म्हणून संघटनात्मक गरजेनुसार तैनात करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
****
सीमा रस्ते संघटना- बी आर ओ नं देशाच्या उत्तर आणि इशान्य सीमावर्ती भागात बांधलेल्या रस्त्यांमुळे, दुर्गम भागातली अनेक गावं मुख्य प्रवाहात आली आहेत, परिणामी या गावांमधून मोठ्या शहरांमध्ये होणारं स्थलांतर थांबलं असल्याचं, संरक्षण राज्य मंत्री अजय भट यांनी सांगितलं. सीमा रस्ते संघटनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त, काल पुण्यात वार्��िक अभियांत्रिकी उपकरण परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी  ‘डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित केलेलं बीआरओ-केंद्रित सॉफ्टवेअरचं लोकार्पण करण्यात आलं.
****
देशात सर्वात जास्त राज्यांमध्ये बिगर भाजपा पक्षांचं सरकार असून, भविष्यात विरोधी पक्षाची एकजूट करून भाजपला सक्षम पर्याय दिला जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पंढरपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारच्या प्रकल्पांचं स्वागत व्हायला हवं, मात्र, ते प्रकल्प स्थानिकांना विचारात घेऊन उभे राहावेत, बारसू रिफायनरीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. सरकारने पोलीस बळाचा वापर करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा, असा सल्ला त्यांनी दिला. सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा प्रतिक्षित निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुधा माहिती असावा, त्यामुळेच ते मी पुन्हा येईन म्हणत असतील, अशी टीका पवार यांनी केली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करणारं दुसरं कुणीच नाही, म्हणून शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य करून काम करणारे उद्धव ठाकरे आता, मोदी हे लोकशाही धोक्यात आणत असल्याचा कांगावा करत आहेत, अशी टीका आठवले यांनी केली.
****
अप्रमाणित बी - बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांविरोधातले खटले निकाली काढण्यासाठी, जलदगत�� न्यायालय -फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची मागणी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. याबाबतीत एक पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. संबंधित कंपनी आणि विक्रेत्याविरुद्ध खटले दाखल करण्यात येतात, मात्र संबंधित खटले निकाली काढण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा कालावधी लागतो, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास विलंब होतो, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं.
****
राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला, ३१ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण राज्यभरातून या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक हजार ५५३ अर्ज विविध जिल्हा कार्यालयांक���े प्राप्त झाले असून, ७८३ लाभार्थ्यांना आतापर्यंत मंजुरी पत्र निर्गमित करण्यात आली आहेत.
****
राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा १४ मे नंतर पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष, सुभाष जावळे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षण एल्गार परिषदेच्या वतीनं पुण्यात आकुर्डी इथं काल मराठा आरक्षण एल्गार परिषद घेण्यात आली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात १५ मे पासून पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर गोंधळ घातला जाईल, तरीही दुर्लक्ष केलं तर केंद्र आणि राज्यातल्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जातील, तरीही सरकार जागं झालं नाही, तर एक जून पासून मुख्यमंत्री कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा जावळे पाटील यांनी दिला आहे.
****
ग्राहकाला घराचा ताबा देण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी पुण्यातल्या बांधकाम व्यावसायिकाची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. सदर व्यावसायिकाला महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण - महारेरानं ४९ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता, मात्र दंडाची ही रक्कम वेळेत न भरल्यानं पुणे शहर तहसीलदारांनी मालमत्ता जप्तीचे आदेश काढले आहेत. संबंधित विकासकाच्या मालमत्तेचा आता लिलाव करण्यात येणार आहे. राज्यातल्या एकूण १२ विकासकांना महारेरानं आर्थिक दंड ठोठावला आहे. यामध्ये नाशिक भागातल्या पाच, छत्रपती संभाजीनगर परिसरातल्या चार, पुण्यातल्या दोन आणि मुंबईतल्या एका विकासकाचा समावेश आहे.
****
ई- वाहनांच्या वापरात देशातल्या अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकूण दोन लाख ९२ हजार २५९ ई वाहनांची नोंदणी झाली. या तुलनेत कर्नाटकात एक लाख ९३ हजार, तमिळनाडूत एक लाख ११ हजार, गुजरात ८६ हजार, राजस्थानात सुमारे ८२ हजार, तर दिल्लीत ५७ हजार ई वाहनांची नोंदणी झाली आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा काल घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या ३६ परीक्षा केंद्रांवर २० हजारावर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यंदा परीक्षार्थींना २० मिनिटं वेळ वाढवून देण्यात आली होती.
****
राज्यातल्या पाणीसाठ्यात मोठी घट झाली असून, सध्या राज्यातल्या धरणात सरासरी ३६ पूर्णांक ६४ शतांश टक्के पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी कालच्या तारखेला हे प्रमाण ३७ टक्क्यांवर होतं. मोठ्या, मध्यम आणि लहान अशा एकूण तीन हजारावर धरणांमध्ये मिळून, एकूण २२ हजार ३५० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात उपलब्ध पाणीसाठ्याचं प्रमाण ४१ पूर्णांक ७५ शतांश टक्के आहे. सध्या २३५ गावं आणि ६०६ वाड्यांवर एकूण १८४ टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातल्या पाच टँकरचा समावेश आहे.
****
केरळमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी नाव उलटून २१ जणांचा मृत्यू झाला. मलप्पुरम जिल्ह्यात काल सायंकाळी ही दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असलेली ही नाव अरबी समुद्रात पुरपुझा नदीच्या मुखाजवळ उलटल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.
****
धाराशिव शहरात खदानीमधल्या पाण्यात बुडून दोन किशोरवयीन मुलांचा मृत्यू झाला. शहरातल्या हॉटेल शालीमारच्या मागे असलेल्या खदानीच्या परिसरात मुलं खेळत असताना अकरा वर्षीय विराट झेंडे खदानीत पडला, त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय प्रतिक खंडागळेचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या बेलगाव शिवारात शेततळ्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास पियुष जीवडे हा आठ वर्षीय बालक शेततळ्यात पडला, त्याला वाचवण्यासाठी कपिल त्रिभुवन या युवकानं पाण्यात उडी मारली, मात्र अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
****
बुलडाणा जिल्ह्यात मेहकर- खामगाव रस्त्यावरच्या देऊळगाव साकरशा गावाजवळ काल रात्री तीन वाहनांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. पाठीमागून येणाऱ्या भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने, ती दुचाकी समोरच्या वाहनाला धडकून हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या विसरवाडी-सेंधवा महामार्गावर ट्रक आणि चारचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. लग्न समारंभासाठी लागणारं साहित्य घेऊन ही चारचाकी मध्यप्रदेशहून गुजरातकडे जात होती. अपघातानंतर ट्रक चालक आणि त्याचा मदतनीस दोघेही फरार झाले आहेत.
****
भारतीयाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी, युवा पदवीधरांनी आपल्या खांद्यावर घ्यावी, असं आवाहन भारताचे मूनमॅन पद्मश्री डॉ. मायलस्वामी अण्णादुराई यांनी केलं आहे. मुंबईच्या जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नववा दीक्षांत समारंभ काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. देशाची ताकद वाढवायची असेल तर केवळ मनुष्यबळ वाढवून चालणार नाही तर कुशल, जबाबदार आणि मानवीय दृष्टीकोन असलेलं मनुष्यबळ निर्माण करावं लागेल असं, अण्णादुराई यांनी सांगितलं.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्या�� गुजरात टायटन्सनं लखनौ सुपर जायन्ट्सवर ५६ धावांनी विजय मिळवला. गुजरताच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात दोनशे सत्तावीस धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला लखनौचा संघ २० षटकात सात गडी गमावून एकशे एक्काहत्तर धावाच करू शकला.
अन्य एका सामन्यात सनरायजर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्सचा चार गडी राखून पराभव केला. राजस्थानच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं दोनशे पंधरा धावांचं लक्ष्य हैदराबादच्या संघानं सहा गडी गमावत पूर्ण केलं.
****
दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या जेरेमी लालनिरुंगा यानं स्नॅचमध्ये रौप्यपदक जिंकलं. काल झालेल्या या स्पर्धेत लालनिरुंगांने ६७ किलो वजनी गटात १४१ किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकलं.
****
केरळच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खाड्यांमध्ये हाऊसबोट प्रकल्प राबवला जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार होणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून काही बचतगट एकत्र आणून हाऊसबोटिंगच्या माध्यमातून पर्यटनवृद्धीला चालना देण्याचा हा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने लवकरच एक पथक केरळचा दौरा करणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते काद्राबाद रस्त्यावरचा पुरातन ऐतिहासिक मूर्तीवेसचा जीर्ण आणि पडझड झालेला भाग, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं संयुक्त कारवाई करत काल जमीनदोस्त केला. स्थानिक नागरिकांचा विरोध टाळण्यासाठी पहाटे चार वाजता ही कार्यवाही करण्यात आली. मूर्तीवेसचा संपूर्ण ढाचा काढून घेत या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आल्यामुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेला हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
****
0 notes
trendingwatch · 2 years ago
Text
अजय सिंह भारोत्तोलन फाइनल लाइव, राष्ट्रमंडल खेल 2022: अजय सिंह स्नैच के बाद तीसरे; क्लीन एंड जर्क जल्द
अजय सिंह भारोत्तोलन फाइनल लाइव, राष्ट्रमंडल खेल 2022: अजय सिंह स्नैच के बाद तीसरे; क्लीन एंड जर्क जल्द
कॉमनवेल्थ गेम्स 2022 में पुरुषों की 81 किग्रा भारोत्तोलन भारोत्तोलन में अजय सिंह के स्पोर्टस्टार के लाइव कवरेज में आपका स्वागत है. राष्ट्रमंडल खेलों 2022: सजीव कार्रवाई पुरुषों की 81 किग्रा क्लीन एंड जर्क अपडेट मैं हैदर दूसरे प्रयास में 169 किग्रा में विफल रहता है क्योंकि वह अपने बाएं हाथ को आराम देता है। मैं मैकटैगार्ट ने पहले प्रयास में 165 किग्रा वजन हासिल किया। मैं मोहम्मद 165 किग्रा से शुरू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
currentnewsss · 3 years ago
Text
अजय सिंह ने राष्ट्रमंडल भारोत्तोलन सी'शिप में भारत के लिए तीसरा स्वर्ण जीता, 2022 राष्ट्रमंडल खेलों के लिए क्वालीफाई किया
अजय सिंह ने राष्ट्रमंडल भारोत्तोलन सी’शिप में भारत के लिए तीसरा स्वर्ण जीता, 2022 राष्ट्रमंडल खेलों के लिए क्वालीफाई किया
अजय सिंह पुरुषों के 81 किग्रा वर्ग को जीतकर ��हां राष्ट्रमंडल भारोत्तोलन चैंपियनशिप का भारत का तीसरा स्वर्ण पदक जीता। सिंह ने कुल 322 किग्रा भार उठाया और रविवार रात स्नैच (147 किग्रा) में राष्ट्रीय रिकॉर्ड भी बनाया। वह बर्मिंघम में अगले साल होने वाले राष्ट्रमंडल खेलों के लिए सीधे क्वालीफाई करने वाले तीसरे भारतीय भारोत्तोलक बन गए। जेरेमी लालरिननुंगा (67 किग्रा) और अचिंता शुली (73 किग्रा) ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes