sumitsubhashpawar
Sumit's Blog Diary
2 posts
Sumit Subhash Pawar
Don't wanna be here? Send us removal request.
sumitsubhashpawar · 4 years ago
Text
Bollywood आणि हिंदुत्व
Blog No. 02
Pune , Maharashtra   Aug  21st, 2020   Fri 4:30 PM
Bollywood Actor सुशांतसिंग राजपूत ने केलेली Depression मधून आत्महत्या की हत्या ? या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही पण Bollywood मधलं हिंदुत्व यांचा Flashback जाणून घेणं गरजेचं आहे. एक कलाकार मेहनतीने TV Serial मध्ये येतो आणि त्याच्या कर्तृत्वावर Bollywood मध्ये प्रवेश करतो. कालांतराने त्याचे चित्रपट Hit नाहीतर Super Duper Hit होतात. आणि बघता बघता ७ चित्रपट Sign करतो. आणि खरंय ना Bollywood मधल्या काही Non-Hindu कलाकार आणि Hindu असल्याची लाज बाळगणारे कलाकार ( Kapoor , Bhatt , Johar ) यांना कष्टाने , स्वकर्तुत्वाने आलेला हिंदू कलाकार कसा पचेल ? KRK Films च्या Official Twitter Account वरून सुशांतसिंगला ७ Bollywood मधल्या नामांकित Production Company ने Banned केलंय असं Tweet येतं आणि सुशांतसिंगच्या आत्महत्येनंतर ते Tweet Delete केलं जातं. नक्की काय समजावं ? सुशांतसिंग सारखा हिंदू कलाकार इतका झपाट्याने मोठा होत आहे हे आवडलं नाही की त्याच्या ५० स्वप्नांपैकी असलेली काही स्वप्न ? ( ५० पैकी १ स्वप्न म्हणजे सुशांतसिंगला स्वामी विवेकानंद यांच्यावर Documentary काढायची होती. ) Bollywood मध्ये हिंदू कलाकारांच्या बाबतीत घडणारी अशी उदाहरणे काही नवीन नाहीत. Bollywood चा दबंग म्हणवल्या जाणाऱ्या सलमान खानने त्याच्या विरोधात जाणाऱ्या अनेक हिंदू कलाकारांचं Career उध्वस्त केलंय. ऐश्वर्या राय प्रकरणावरून स्वतः ऐश्वर्या रायच काय तर त्यापाटोपाठ विवेक ओबेरॉय ला सुद्धा जवळपास Film Industry मधून संपवून टाकलं. नुकतंच ज्याने आपल्या आवाजाने Bollywood च्या संगीत क्षेत्रात एक नवीन ओळख तयार केली अशा अरिजित सिंग ला २०१६ च्या Star Guild Awards Show मध्ये अपमानित केलं आणि त्या अपमानाला प्रत्युत्तर म्हणून अरिजित सिंगने सलमानची चेष्टा केली तो राग धरून सलमान खानने स्वतःच्या आणि अनेक कलाकारांच्या चित्रपटात गाणं म्हणण्यासाठी अरिजित सिंगला वगळलं आहे. Bollywood चा बादशाह म्हणवला जाणारा शाहरुख खान सुद्धा काही कमी नाही. जस अरिजित सिंग च्या बाबतीत Awards Show मध्ये घडवलं त्याचप्रकारे निल नितीन मुकेश ला २०१३ च्या FilmFare Awards Show मध्ये अपमानित केलं. आणि त्यानेसुद्धा तेच केलं जे अरिजित सिंगने केलं आणि शाहरुख खानने सुद्धा तेच केलं जे सलमान खानने केलं. अखेरीस निल नितीन मुकेशला Bollywood मधून बाद केलं. शेवटी काय ना धर्मसंस्काराचा अभाव ! हिंदुत्वाला बदनाम करणारे आणि षडयंत्र रचणारे कलाकार Bollywood मध्ये काही कमी नाहीत. बाजीराव मस्तानी चित्रपटात बाजीरावला नाचताना काय दाखवतात, PK चित्रपटात देवधर्मांचा केलेला अपमान काय दाखवतात , अनेक चित्रपटांमधून लवजिहाद ला समर्थन काय देतात आणि ती मूर्ख एकता कपूर ने हल्लीच्या Altbalaji निर्मित XXX - 2 या Web Series मध्ये केलेला भारतीय सैनिकांचा अपमान. कुठे फेडाल हे पाप ? याउलट SS Rajamouli यांच्या बाहुबली आणि बाहुबली २ या चित्रपटाने या अशा कंटकांना तोंडात न��� घालायला लावली. त्यात काल्पनिक राजाच्या केलेल्या वर्णनाने ( राजा कुठेही नाचताना दाखवला नाही तरी चित्रपट १५००+ कोटी रुपये कमवू शकतो. ) अख्खी Bollywood Industry हादरून गेली आणि हिंदू राजा, भारतीय सैनिकांचे पराक्रम यांवरचे चित्रपट तयार होऊ लागले आणि Box Office Collection मध्ये असे चित्रपट उच्चांक गाठू लागले. सोनू निगमने मशिदीवरच्या भोंग्यांबाबत आवाज उठवला त्याला Bollywood ने वाळीत टाकलं. जावेद अख्तर , आमिर खानची बायको या देशात रहायला भिती वाटतीये असं जाहीर वक्तव्य करतात तेव्हा कुठे गेली यांची देशभक्ती ? जेव्हा मुस्लिम मुलींवर बलात्कार केला जातो त्यावेळी हातात विरोधाचे पोस्टर्स , Candle March मध्ये सहभागी होताना कलाकार सगळीकडे दिसतील. पण हिंदू मुलींवर होणारे अत्याचार, बलात्काराच्या वेळी नाही पोस्टर्स घेणारे दिसतील आणि नाही Candle March काढणारे. ( या प्रकरणाचे सुद्धा पुरावे आहेत फक्त अत्याचार झालेल्या मुलींची नावे आपण जाहीर करत नाही म्हणून पुरावे देत नाही. ) करण जोहर त्यातलाच एक. Nepotism चा अध्यक्ष म्हटलं तरी चालेल. अथक परिश्रम , स्वतःच्या जिद्दीवर Bollywood मध्ये आलेल्या कलाकारांना डावलून Star कलाकारांच्या मुलांना Without Audition Entry दिली जाते हा तर Bollywood मधला भ्रष्टाचार म्हणावा लागेल. स्वतःच्या Flop झालेल्या Koffee With Karan या Show मध्ये बाहुबली कलाकार प्रभासने जेव्हा त्याला तोंडावर अफवेबाज म्हटलं , कंगना रनौत ने Nepotism चे उद्गाते म्हटलं तेव्हा त्याच तोंड बघण्यासारखं न्हवत माकडासारखं झालं होतं. ७१ वर्षांचा घोडा आणि ४ मुलांचा बाप असलेला महेश भट हा सुशांतसिंग राजपुतच्या Girlfriend बरोबर असणाऱ्या संबंधावरून Troll होतो तेव्हा कळतं Bollywood ची पात्रता काय आणि किती आहे. खरंतर अक्षय कुमार आणि कंगना रनौत यांची 'आप की अदालत' मधील मुलाखत बघितल्यानंतर लक्षात येत FilmFare Award Show नावाच्या ऐवजी Bikau Award Show नाव ठेवलं पाहिजे. यावर्षीच बघा ना Bollywood मधला सर्वांत मोठा Award Show मानल्या जाणाऱ्या FilmFare Award Show मध्ये Kesari आणि Chhichore यांसारख्या चांगल्या चित्रपटाला डावलून Gully Boy या चित्रपटाला Award दिलं जातं त्याबरोबर 'तेरी मिट्टी में मिल जावा' या गाण्याला Award न देता 'अपना Time आएगा तू नंगा ही तो आया है , क्या घंटा लेकर जाएगा ' या गाण्याला Award दिला जातो. यांपेक्षा दुर्दैव Bollywood मध्ये असूच शकत नाही. २०१६ च्या FilmFare Award Show मध्ये फिल्मफेअर बेस्ट डेब्यू मेल ऍक्टर या ��ुरस्कारासाठी 'उरी' चित्रपटात काम केलेला विकी कौशल आणि सलमान ख���नच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'हिरो' चित्रपटात काम केलेला सूरज पांचोली यांना नामांकन मिळाले होते. सर्वांना विकी कौशल कडून खूप अपेक्षा होत्या की कदाचित हा अवॉर्ड त्याला मिळेल कारण त्याने त्याच्या चित्रपटासाठी खूप मेहनत सुद्धा घेतली होती. आणि चित्रपट बॉक्स ऑफिस वर जास्त कमाई करू शकला नाही तरीही लोकांना पसंत सुद्धा पडला होता. चित्रपट समिक्षकांनी चित्रपटाचे खूप कौतुक केले होते. त्याच्यासमोर स्पर्धक असलेल्या सुरज पांचोलीला तो पुरस्कार मिळाला. अक्षय कुमार आणि कंगना रनौत सारख्या अनेक कलाकारांनी जाहीररीत्या सांगितलं आहे की FilmFare Award पैसे देऊन किंवा Award Show मध्ये Perfomance देऊन विकत घेतला जातो. Bollywood मध्ये हिंदुत्वाला समर्थन करणारी सुद्धा एक टोळी तयार झाली आहे. कंगना रनौत , पायल रोहतगी, ट्विंकल खन्ना, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, मधुर भांडारकर यांसारखे अनेक दिग्ग्ज कलाकार आहेत. चित्रपट माध्यमांचा उपयोग करून हिंदुत्वाविरोधात षडयंत्र रचणारे, चित्रपटांतून हिंदू राजा, हिंदू पद्धती, देवधर्म, लवजिहाद यांविरोधात काही दाखवलं तर काय होऊ शकते याचं उदाहरण अनेक चित्रपटाने सोसलं , अनुभवलं आहे. हिंदुसमर्थनार्थ चित्रपट काढले तर बाहुबली, उरी, दंगल यांसारखे अनेक चित्रपट डोक्यावर सुद्धा घेतले गेले आहेत. एका बाजूने बाजीराव मस्तानी, तान्हाजी, मनिकर्णिका, पद्मावत, केसरी, परमाणू, भगतसिंग, पानिपत आणि भविष्यात येणारा अक्षय कुमारचा पृथ्वीराज चौहान यांसारखे चित्रपट तयार व्हायला लागलेत.आणि दुसरीकडे काही चित्रपट मुघल - ए - आझम , सिकंदर - ए - आझम , जोधा अकबर आणि भविष्यात येणारा शाहरुख खानचा टिपू सुलतान यांसारखे चुकीच्या पद्धतीने चित्रपट तयार केले जातात आणि प्रदर्शित सुद्धा व्हायला येतात. आपण ठरवलं पाहिजे की कोणते चित्रपट आपण पाहिले पाहिजेत आणि कोणते नाही ?
आपण सुज्ञ आहोतच.
✍️ सुमित सुभाष पवार
0 notes
sumitsubhashpawar · 5 years ago
Text
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक जीवनाचा स्वल्पविराम... पूर्णविराम नाही...।
Blog No. 01 
Ajara , Kolhapur , Maharashtra    Jul 15th, 2019    Mon 2:30 PM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक जीवनाचा स्वल्पविराम... पूर्णविराम नाही...।
लौकिक शिक्षण संपल्यानंतर अनेकांना नवनवीन संधी मिळत असतात. कोणाला उद्योग क्षेत्रात तर कोणाला क्रीडा क्षेत्रात तर कोणाला अजून कुठे तरी काम करण्याची , पण रा.स्व. संघाने एक नवीन संधी मला प्राप्त करून दिली ती म्हणजे 'प्रचारक जीवन जगण्याची'.
प्रचारक जीवन म्हणजे संघ सांगेल ते कार्यक्षेत्र , भ्रमणध्वनी नाही , समाज स्वीकारेल अशा कुर्ता-पायजमा या वेशात आणि 'आज मी जेवायला येतोय' असा अवघड प्रश्न घेऊन समाजात जाऊन काम करणं म्हणजे प्रचारक जीवन...।
२१ जून २०१६ रोजी नाशिक विभागात ( पिंपळद ) येथील बैठकीत नियुक्ती झाली आणि कोल्हापूर विभाग , दक्षिण कोल्हापूर जिल्ह्यातील 'आजरा तालुका' हे कार्यक्षेत्र मिळालं..
लगेचच काही दिवसांनी मिरज ( सांगली ) येथे Crash Cource होता. तो पूर्ण करून मी कार्यक्षेत्रात आलो. आणि निघण्यापूर्वी काहीजणांनी एका गोष्टीच वर्णन आणि भिती करून दिली ती म्हणजे इथला पाऊस आणि जंगली प्राणी ( गवा , हत्ती )
पहिल्या गोष्टीने म्हणजे पावसाने धो-धो पडायला सुरुवात केली आणि मनात एक प्रश्न आला "अरेरे..! ही ढगफुटी की पाऊस...?"
एकदम निसर्गरम्य वातावरण जणू काही भिंतीवरील निसर्ग चित्रचं समोर आहे असा प्रत्यक्ष निसर्ग पाहायला मिळाला. एकूण ९८ गावांचा आजरा तालुका. त्यापैकी मला आवडलेलं 'किटवडे' हे गावं. गावाने जणू काही हिरवी शाल पांघरलेली आहे. याचं कारणं असं की भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस या गावात पडतो.
तिसऱ्या वर्षी मला आजऱ्याबरोबर एक नवीन कार्यक्षेत्र मिळालं ते म्हणजे 'चंदगड'
'चंदगड' तालुका 'आजरा' तालुक्यापेक्षाही सुंदर , निसर्गमय तालुका...
हिंदू संस्कृती अजूनही टिकवून ठेवलेला हा तालुका..
श्री.देव रवळनाथाची डोक्यावरची आरती , ५ दिवसांची यात्रा आणि शिमग्यातील सोंग अनुभवायला खूप छान वाटायचं.
कार्यक्षेत्रात काम कर�� असताना सर्व कार्यकर्त्यांची मिळालेली सोबत त्यांच्या सहकार्याने झालेले छोटे, मोठे कार्यक्रम , उपक्रम आणि कार्यक्षेत्रात आलेले चांगले वाईट अनुभव म्हणजे मला मिळालेली शिदोरीचं म्हणावी लागेल.
पहिल्या वर्षी संदिपजी नेवे जिल्हा प्रचारक होते. एक आदर्श , खुप Strict , उत्तम असे जिल्हा प्रचारक होते.
दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अक्षयजी गायकवाड जिल्हा प्रचारक होते. अक्षयजी आणि मी दोघांचंही संघ शिक्षा वर्ग एकाच वेळी झालं.. आणि आम्ही दोघेही एकाच भागातील असल्यामुळे आमचं Bonding चांगल जुळलं होतं.
द्वैमासिक वर्ग -
प्रचारक जीवनात सर्व विभागातील प्रचारक समदुःखी भावनेने एकत्र येण्याचा संगम म्हणजे द्वैमासिक वर्ग. या द्वैमासिक वर्गाचा कार्यक्षेत्रात खूप फायदा तर व्हायचांच पण स्वतःच्या Development साठीच्या नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या.
यशोवर्धनजी (अण्णा) वाळिंबे - प्रांत प्रचारक ( Big Boss)
जेवणात जशा विविध चवी आपल्याला चाखायला मिळतात तसं अण्णांचं व्यक्तित्व आहे. चेष्टा ही करतील , शांतही असतील आणि पाहिलेले व्यक्ती स्मरणात ही ठेवतील असे विविध पैलूंचे अण्णा.
केदारजी कुलकर्णी - कोल्हापूर विभाग प्रचारक (Boss)
'7 Habits Of Highly Effective People' या पुस्तकातील काही गोष्टींचा आपल्या जीवनात कसा बदल करायचा याची जी सत्र केदारजी घ्यायचे ती अनोखीच वाटायची.
आणि द्वैमासिक वर्गाचा समारोप झाल्यानंतर भोजन वाढताना सुद्धा केदारजींची एक आठवण नक्की सांगाविशी वाटते. सर्व जेवायला बसल्यानंतर केदारजी जेवण करून उठल्यानंतर सर्व प्रचारकांसाठी 'खतरे की घंटी' असायची. केदारजी एकूण ४ टप्प्यात भोजन वाढताना आग्रह करायचे. त्यांचा क्रम पुढीलप्रमाणे :-
१. नाही नाही हात काढ
२. एक घे , एक घे
३. अर्धी घे , अर्धी घे. परत नाही आग्रह करत.
४. तू तुझ्या हाताने घे. मी नाही वाढणार.
'ए डुकरा' 'सुम्या काय काय आणि' हे लटके संमिश्रण पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल का .? आणि त्यासाठी तो योग पुन्हा पुन्हा यावा असं मला वाटतं.
लपविलास तू हिरवा चाफा , सुगंध त्याचा लपेल का.?
चाफा जरी लपवला असला तरी त्याचा सुगंध काही लपत नाही.
तद्वतच केदारजींच्या अंगी असलेला 'कलाकार' हा गुण लपेल का.?
केदार हे एक परमेश्वरीय रूप आहे. मला त्या रुपात केदारजी दिसतात. परमेश्वर जसा क्षमाशील असतो , जशी परमेश्वराच्या मूर्तीतील शांतपणा आणि क्षमाशील भावतो म्हणूनच केदारजी मला जेवढे आदर्श वाटतात तेवढेच ते मार्गदर्शक वाटतात.
प्रांतातील सर्व ज्येष्ठ प्रचारक , विभाग प्रचारक , जिल्हा प्रचारक आणि तालुका प्रचारक यांची सोबत आणि सहवासांमधून जे जे चांगले अनुभव आणि शिकायला मिळाले ही मला मिळालेली अमुल्य शिदोरीचं म्हणावी लागेलं...
'आनंदाचे डोही आनंद तरंग'
प्रचारक जीवनात मला आनंदाच्या डोहात पोहायला मिळालं आणि त्याचे तरंग सुद्धा माझ्या मनामध्ये राहतील.
प्रचारक जीवन हा श्वास आहे तो एक विश्वास आहे. या श्वासाच्या स्पंदनात मला स्नेह , सहृदयता , सहवास , सहकार्याची भावना , समतानता यांची मला देणं मिळाली. शरीर , मन , बुद्धी यांच्या सशक्तीपणाचे बळ मिळाले. सुसंवादाचे रंग भरण्याची संधी प्राप्त झाली. आणि अंशतः का असेना जीवन फुलासारखे फुलून आल्यासारखे वाटले. जीवनाचा खरा अर्थ मला उमजून आला त्या दृष्टीने मी खरोखरच भाग्यवान समजेन...
हम नई चेतना की धारा , हम अंधेरे मै उजाला । हम उस बहार के झोके है , जो खोये सब दुःख सारा । जिना है शुल मै तो क्या , पथ अंगार जले तो क्या । जिवन मै कहाँ विराम है , बढना ही अपना काम है...।
भारत माता की जय...। वंदे मातरम...।
✍️ सुमित सुभाष पवार
1 note · View note