pranali-avhad
Untitled
1 post
Don't wanna be here? Send us removal request.
pranali-avhad · 4 years ago
Text
जाणीव
निसर्गाला माणसासारख बोलता येत नाही, भावना व्यक्त करता येत  नाही , न बोलता ही निसर्ग मात्र भरभरून देन्यातून आपल्या भावना व्यक्त करत असतो, त्याला मिळालेल्या देणगी ची जाणीव ही ठेवत असतो . माणसाला तर पंचेंद्रियांची भरभरून देणगी लाभली आहे ,त्याने तर कितीतरी व्यक्त व्हावं, जाणीव फक्त मनात न ठेवता समोरच्या पर्यंत पोहचवावी. जाणीव असणं आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने ती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवणं यात जाणीव ठेवणारा आणि जाणीव करून देण्यासारखं काही करणारा या दोघांची ही माणुसकी समृद्ध होते , माणुसकी वरचा विश्वास टिकुन राहतो. पुन्हा दुसऱ्यांना मदत करण्याची त्याची वृत्ती वृध्दींगत होते, कारण काही अपेक्षा नसली तरी समोरच्याला आपल्या मदतीची,आपल्या काही केल्याची  जाणीव आहे ही गोष्ट सुध्दा त्याला सुखावुन ��ाते आणि पुन्हा नव्याने दुसऱ्यासाठी झिजण्याठी प्रवृत्त करते. कुणी आपल्या साठी काही केल्याची जाणीव का  अमान्य करावी ! आपला वेळ, ऊर्जा, पैसा , मेहनत,प्रेम ,माणुसकी,भावना  कुठल्या तरी स्वरूपात काही तरी ओतुन, पणाला लावून च कुणासाठी काहीतरी करता येत, मदत होत असते .उगाचच  निरर्थक, फुकट अस काही च होत नसतं. जाणीव न ठेवता गृहीत धरून जेव्हा पुढची वाटचाल करण्याचा स्वार्थी प्रयत्न आपण करतो तेव्हा पुन्हा त्याच वळणावर नियती आपल्याला आणून ठेवते ,तोपर्यंत  जोपर्यंत आपल्याला आपल्यासाठी कुणीतरी  काहीतरी करतं याची जाणीव होत नाही . दैंनदीन दिनचर्येत वेगवेगळी काम करताना   सुद्धा कुठली तरी अदृश्य शक्ती नकळत आपल्याला मदत करत असते याची जाणीव मात्र आपल्या गाठी नसते .जाणीव होणं, जाणीवेची भावना असणं ही जीवंत माणसाची लक्षणं असावी कारण मृत व्यक्ती साठी स्वतःची असण्याची जाणीव च मेलेली असते दुसऱ्यांबद्दल जाणीव ठेवण्याचा मुद्दा च येत नाही.
-- प्रणाली आव्हाड
0 notes