#shameonsystem
Explore tagged Tumblr posts
Photo
काल मला एका रुग्णाचा शासकीय रुग्णालय कडेगांव येथून फोन आला की कडेगांवच्या शासकीय रुग्णालयात 2 दिवस झाले पाणी नाही. संडास आणि बाथरूम सगळीकडे अस्वच्छता आहे. कोणी सुद्धा झाडलोट करत नाही. तसेच पेशंटला घाणीतच पटापटा तपासून जातात. हा प्रकार अतिशय निंदनीय होता. तुम्ही लगेच हिंसक होता. समंजसाने तोडगा निघतो. असे काही लोकांचे सल्ले मी ऐकत होतो. म्हणून मी डॉक्टर ला फोन करून तुमच्या दवाखाण्यात रुग्णांना त्रास होतोय, अस्वच्छता आहे जरा लक्ष घाला अशी विनंती केली पण सरकारी चमडी लगेच वळत नाही. याउलट ज्या रुग्णाने मला फोन केला त्याला हुडकून त्या वॉर्डात जाऊन सरकारी दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांनी दमदाटी केली. मग माझं मस्तक गरम झालं. कोणाचंही होईल. आणि आज संध्याकाळ पर्यंत स्वच्छता करा नाहीतर मी तिथे येऊन तुमचा माज जिरवणार अशी पोस्ट केली. काहींनी मला हे चुकीचं आहे. त्यांना वेळ द्या हा सल्ला दिला. पण मित्रांनो त्यांचा पगार सुद्धा कधी लेट होत नाही. प्रत्येक महिनीच्या 5 तारखेला खात्यावर पगार जमा झालेला असतो. तिथे कधी वेळ मगितलाय का? नाहूतर5सामान्य लोकांना सुद्धा टॅक्स भरायला मुदत द्या. आमच्या टॅक्स मधून तुमचा पगार होतो. आणि प्रश्न वेळ देण्याचा नाही. एवढे दिवस अस्वच्छता असताना, पाणी उपलब्ध नसताना, हे लोकं काय ...क मारत होते काय? माझी भाषा काही लोकांना निर्लज्य आणि कठोर वाटेल. काहिजन मला नालायक सुद्धा म्हणतील. पण भावांनो मला हीच भाषा येते. साम-दाम-दंड-भेद नीती वापरून आपली कामे आपण करून घेतली पाहिजेत. नाहीतर आपल्याला कोणी वाली उरणार नाही. पाणी नाही म्हणून फडक्याने पुसा असा सल्ला देणारे हे महाभाग जेवण नाही म्हणून त्या संडास मधील गु खा असे सांगतील. वेळीच सावध व्हा. आपल्या हक्कांसाठी भांडणे म्हणजे हिंसा होत नाही. ही लढाई असते. सरते शेवटी तहसीलदार यांनी लक्ष घालून साफसफाई करून घेतली. त्यांचे मनःपूर्वक आभार ! पण अश्या बेजबाबदार लोकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही. त्या ठेकेदाराला जोपर्यंत काळ्या यादीत टाकत नाहित. असंवेदनशील आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार फक्त आता हे कडेगांवचं रुग्णालय होतं. उद्या कुठलतरी दुसरं असेलं. आपलाच दोस्त/काहीजणांचा दुष्मन, *प्रमोद महादेव मांडवे* www.PramodMandave.com www.PramodMandave.net https://g.page/PramodMandave11 #Shameonsystem #kadegaoncivil #civilhospital https://www.instagram.com/p/CQpf9d0L_fI/?utm_medium=tumblr
0 notes