#neurolingusticprogramming
Explore tagged Tumblr posts
Text
How to apply Law of Attraction
आकर्षणाचा सिद्धांत कसा लागू करायचा?
आपल्याला आपल्या आयुष्यात आकर्षणाचा नियम (Law of attraction) लागू करायचा आहे का? आपण सगळेच त्याबद्दल नेहमी ऐकत आलो आहोत. आणि आपण त्यासाठी तयारही असतो. पण का होत असेल कि काही जणांनाच त्यात यश मिळतं , आणि काहींना अजिबात मिळत नाही, आणि यानंतर ते प्रयत्न करायचं सोडून देतात. आणि आपल्या नशिबाला दोष देत बसतात किंवा असा काही law ऑफ attraction आपल्या आयुष्यात काम करतं यावरचा आणि स्वतः वरचा विश्वास ही गमावून बसतात.
आपल्या जीवनात आपल्याला जर हा आकर्षणाचा नियम लागू करायचा असेल तर आधी आपल्याला आपल्या अवचेतन मनाचा तसं प्रोग्रामिंग करता यायला हवं.
Neuro Linguistic programming द्वारा आपल्याला ते सहज साध्य होतं. या NLP मध्ये आपल्या अवचेतन मनाला आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला रीप्रोग्रॅम करता येत. हे शिकण्यासाठी खूप सारे offline , online कोर्सेस उपलब्ध असतात. यु ट्युब सारख्या चॅनेल वर आपल्याला ती माहिती मिळू शकते. या विषयाची पुस्तकेही उपलब्ध आहेत. संपूर्ण जगाने मान्य केलेलं असं हे शास्त्र आहे.
असे खूप लोक आहेत कि जे या law of attraction चा पूर्णपणे आणि भरपूर फायदा घेत आहेत आणि त्यांना जीवनात जे ���वं ते स्वास्थ्य, समृद्धी, चांगले नातेसंबंध , यश सगळं साध्य करत आहेत. या आकार्षणाच्या नियमावर जगभरात, खूप साऱ्या गुरूंनी, मुनींनी , तत्त्ववेत्त्यांनी काम केलं आहे नि पुस्तकेही लिहिली आहेत. माझ्या मुलांनीही या आकर्षणाच्या सिद्धांताचा उपयोग करून त्यांच्या जीवनात हव्या त्या गोष्टी मिळवल्या आहेत. आणि एकदा का हा सिद्धांत आपल्याला नीट समजला तर जगातला कुठलाही व्यक्ती त्यातून यश प्राप्त करू शकतो. फक्त तत्वज्ञान म्हणून वाचू नका ते समजून घ्यायचाही आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी काही गोष्टींवर आपल्याला काम करणे आवश्यक आहे.
1) Clean your mental garbage
आपल्या जीवनात आपण खूप साऱ्या गोष्टींचा कचरा जमा केलेला असतो. कधी दुःख, कधी वेदना, कधी कोणाबद्दल राग धरलेला असतो, कोणाबद्दल मनात तिरस्कार जमा केलेला असतो, कधी कधी मनात कोणाबद्दल तरी 'बघून घेईन' हि भावना ठासून भरलेली असते, नात्यामध्ये दुरावा अशा काही कारणांनी निर्माण करून ठेवलेला असतो. कधी कधी आपण आपल्या लायकीबद्दल साशंकता मनात ठेवलेली असते. भीती, राग, घृणा, तिरस्कार, बदला, इ. भावनांनी मेंदू पूर्ण भरलेला असतो. या सगळ्या गोष्टी कचऱ्यासारख्या आपल्या मनात ठासून भरलेल्या असतात आणि कचराकुंडी करून टाकलेली असते. ज्यांच्या बाबतीत आकर्षणाचा सिद्धांत काम नाही करत त्यांच्याकडे हा कचरा खूप जमा केलेला असतो, आणि हि कचराकुंडी आपल्याला या सिद्धतांवर काम करण्याआधी साफ करणे फार फार गरजेचं असतं . आज जगभरा मधले लोक Neuro Linguistic Programming मध्ये subconscious mind reprogramming द्वारे एक नाही, २ नाही, हजारो अश्या मनातल्या कचराकुंड्या साफ करत आहेत, आणि साफ कशा करायच्या ते शिकत आहेत. तुम्ही, आम्ही सगळे जण हे शिकू शकतो. तुमच्याकडे सुद्धा जर तुमच्या भूतकाळातल्या काही दुःखद, भीतीदायक, वेदनादायक, अशा काही आठवणी आहेत, तर तुम्हीसुद्धा NLP द्वारा subconscious mind च रीप्रोग्रॅमिंग करू शकता.
2) Be clear about what you want?
बऱ्याचदा असा होतं कि लोकांना आपल्याला काय नको आहे तेच जास्त चांगल्या पद्धतीने माहित असतं . लोक सांगत असतात कि मला आजारपण नको, मला गरीब नाही राहायचा, मला जाड नाही व्हायचा इ. हे सगळे नकारात्मक विचार आहे, इथे आपण आपल्या अवचेतन मनाला काय फोकस देतो, तर आजारपण, गरिबी, स्थूलता, आणि त्याच त्या गोष्टी आपल्या जीवनात पुन्हा पुन्हा होत रहातात. म्हणून आपल्याला सुस्पष्टता हवी आहे कि आपल्याला नक्की काय हवाय. म्हणजेच जर मला आजार नको आहेत तर उत्तम आरोग्य हवाय, हे क्लिअर हवं .
3) Clear the Inner feeling of worthiness
इथे आपल्याला आपल्या मध्ये अशी भावना तीव्र करायची आहे कि मी या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात येण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. एक फ्रेम आपल्याला तयार करायची आहे आपल्या अवचेतन मनात कि मी या गोष्टीसाठी एकदम लायक माणूस आहे. आणि हि फ्रेम इतकी खोल खोल अंतर्मनात रुजवायची आहे, जितकी जास्त ती खोल जाईल तितका आपल्याला आकर्षणाच्या सिद्धांताचा फायदा होतो. आपला आपल्या स्वतःवरती खूप कमी विश्वास असतो, कारण कधीतरी कोणी तरी म्हटलं असतं कि तुझ्याकडून काहीही होणार नाही, आणि आपण तेच खरा मानून पराभूत होऊन जातो. असा असेल तर ते दूर करणं अतिशय आवश्यक आहे. आपला स्वतः वर दृढ विश्वास हवा. तसाच पुन्हा एकदा आपल्याला आपल्या अवचेतन मनाचा प्रोग्रामिंग करणं आवश्यक असतं इथे आपल्याला NLP ची मदत होते.
4) Take action.
आता तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी तयार झाले आहेत, पण त्या आधी वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींवर जादुई काम होणं खूप गरजेचं आहे.
जेव्हा तुम्हाला जीवनात आकर्षणाचा सिद्धांत ;लागू करायचा आहे तेव्हा तेव्हा आधी मनातली सगळी जळमटं काढून मन साफ स्वच्छ करा. आपल्याला नक्की काय बदल हवा आहे या बाबतीतलं क्लिअर रहा आणि सर्वात महत्वाचं स्वतःवर दृढ विश्वास ठेवा कि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही एकदम लायक, आणि योग्य व्यक्ती आहात . हे सिद्ध झाल आहे कि आपला अवचेतन मनाची शक्ती, आपल्या युनिव्हर्स च्या शक्ती सोबत जोडलेली असते. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये हा विश्वास दृढ करता कि मी माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी मला हव्या आहेत त्या मिळवण्यासाठी योग्य, लायक व्यक्ती आहे, आपल्या अवचेतन मना मार्फत हा संदेश त्या युनिव्हर्स ला पोहोचला जातो, आणि मग आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होते.
youtube
जर हा लेख आवडला तर हा लेख आणि यासोबत असेलेला विडिओ तुम्ही शेअर करू शकता.
धन्यवाद
Life Coach & Counsellor Smita Ajay Chavan
Credit - Mr.Ram Varma (NLP Coach)
For More, visit: https://smitachavan.com/
#smitachavan#counselor#asmitablogging#nlp#neurolingusticprogramming#motivation#inspiration#nlpforstudents#nlpforhousewives#nlpforeveryone#howtoapplylawofattraction
1 note
·
View note
Text
What is Nlp (Neuro Linguistic Programming)
Nlp (neuro lingustic programming) म्हणजे नक्की काय ?
आज आपण Neuro Linguistic Programming चा इतिहास जाणून घेऊया.
या जगात वावरताना, प्रत्येक माणूस जे बघतो, ऐकतो, अनुभवतो, ते त्याच्या दृष्टीकोनातून बघत असतो, आणि त्याची नोंद अवचेतन मनात होत असते. म्हणजे कशी ते आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. एका गावात ४ अंध व्यक्ती होत्या , त्यांना हत्ती कसा असतो हे जाणून घ्यायचं असतं आणि म्हणून गावकरी त्यांना एका हत्ती शेजारी आणून उभं करतात. त्या अंध व्यक्ती त्या हत्तीला हाथ लावून निरीक्षण करतात.
त्यातला एक जण म्हणतो कि हत्ती सुपासारखा असतो, दुसरा म्हणतो कि हत्ती खांबासारखा असतो, तिसरा म्हणतो कि हत्ती लांब नळी सारखा असतो, चौथा म्हणतो कि हत्ती दोरखंडासारखा असतो.
आता तुम्ही बघा, त्या चौघांनी जे सांगितलं ते त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना कळलेलं सत्य आहे. बरोबर ना, पण वास्तवात सत्य वेगळंच आहे.
आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हेच होत असतं ,आपल्याला जे सत्य आहे असं वाटतं ते पूर्ण सत्य नसून तो फक्त आपल्या प्रत्येकाचा एक दृष्टिकोण असतो. आणि खरी मेख इथेच आहे कि, आपलं जे अवचेतन मन आहे ते जे अर्धसत्य आहे ते पूर्णसत्य मानून नको त्या गोष्टींची साठवण करत असतो. आणि त्याच अवचेतन मनाला जर आपण प्रशिक्षित केलं तर प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार व्हायला वेळ लागणार नाही.
१९७५ साली Nlp (Neuro Lingustic Programming) हे तंत्र किंवा कार्यपद्धती विकसित करण्यात आली, त्यात दोन जणांचा मोठा सहभाग होता. त्यातले एक रिचर्ड बॅन्डलर (Richard Bandler ) हे एक अमेरिकन लेखक आणि (self help ) या क्षेत्रामध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. ��णि जॉन ग्रींडर (John Grinder ) हे भाषाशास्त्राचे प्रोफेसर होते. हे दोघं एकत्र काम करत असताना त्यांनी त्यावेळी बऱ्याच मानसोपचार तज्ज्ञांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. त्यात मुख्य होते ते, Fritz Pearl , Virginia Satir या फॅमिली थेरपिस्ट म्हणून काम करत होत्या. तसेच Milton Erickson हे नावाजलेले Hypnotherapist होते. Milton Erickson यांच्याबद्दल असं सांगितलं जातं कि ते बोलता बोलता समोरच्याच्या आयुष्यात बदल घडवत असत. हे तिघेही त्यांच्या क्षेत्रात अद्भुत कामगिरी करत होते. अश्या सगळ्या दिग्गज लोकांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करताना Nlp (Neuro Linguistic Programming ) ही एक नवीन कार्यपद्धती या दोन जणांनी म्हणजेच Richard Bandler आणि John Grinder यांनी जगासमोर आणली. त्या दोघांनाही माहित झाला होतं कि आपली Neurology , Language आणि वर्तणूक हि एकमेकांशी संलग्न असते, त्यावर काही techniques चा वापर करून फोबिया पासून ते सायकोसोमॅटीक आजारपण बरे करण्यापर्यंत त्याचा फायदा होऊ शकतो. सायकोसोमॅटीक म्हणजे आजारी मानसिकतेतून तयार झालेले शारीरिक आजार. नुसतं एवढंच नाही तर व्यक्तीच्या जीवनात प्रचंड बदल घडू शकतात.
Nlp (neuro lingustic programming) चे फायदे काय होतात?
१) चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी मदत होते. २) सर्जनशीलता आणि कार्यक्षमता वाढवते. ३) फोबिया किंवा भीती असेल तर ती दूर करता येते. ४) आरोग्य निरामय ठेवण्यासाठी मदत करते. ५) नातेसंबंध चांगले होतात. ६) व्यापार, बिझिनेस मध्ये यश प्राप्ती साठी मदत होते. आणि ……. न संपणारी यादी आहे.
तुम्हाला लेख कसा वाटलं तर जरूर कंमेंट मध्ये कळवा , आवडला तर like आणि share करा.
धन्यवाद
NLP Coach & Counselor Smita Ajay Chavan
https://smitachavan.com/
#smitachavan#nlp#neurolingusticprogramming#motivation#inspiration#asmitablogging#nlpforstudent#nlpforhousewives#counselling#whatsisnlp
0 notes