#��या बच्चन पती
Explore tagged Tumblr posts
loksutra · 3 years ago
Text
एंटरटेन्मेंट न्यूज- दस्त चित्रपटात यामी गौतमला पाहून आदित्य धरने ओढला पाय, दिली ही मजेशीर प्रतिक्रिया
एंटरटेन्मेंट न्यूज- दस्त चित्रपटात यामी गौतमला पाहून आदित्य धरने ओढला पाय, दिली ही मजेशीर प्रतिक्रिया
एंटरटेन्मेंट न्यूज- दासवीचा ट्रेलर पाहून आदित्य धरने यामी गौतमचे पाय ओढले यामी गौतम दासवीवर आदित्य धरची प्रतिक्रिया: यामी गौतम आणि अभिषेक बच्चन स्टारर दस्थ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता यामीचा पती आदित्य धरने या ट्रेलरवर एक मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. याआधी, ए गुरुवारच्या ट्रेलरदरम्यान त्याने पाय ओढला होता. यामी गौतम दासवीवर आदित्य धर यांची प्रतिक्रिया: नुकताच अभिषेक बच्चन, यामी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 February 2019 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ६ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.०० ****
विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज आज दुपारनंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. महाविद्यालयं आणि विद्यापीठांमधल्या नेमणुकांच्या प्रणालीसंदर्भात समाजवादी पक्षासह अन्य पक्षांच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला, तर नागरिकत्व विधेयकातल्या सुधारणेला विरोध करण्यासाठी काँग्रेस सदस्यांनीही गोंधळ केला. यामुळे आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यसभेचं कामकाज होऊ शकलं नाही.
****
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज सक्त वसुली संचालनालयासमोर हजर झाले. वाड्रा यांनी, लंडन इथं दोन घरं, सहा सदनिकांसह एकोणीस लाख पाऊंडांची मालमत्ता खरेदी केल्यासंदर्भात त्यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणी दिल्ली न्यायालयानं गेल्या आठवड्यात वाड्रा यांना जामीन मंजूर करतानाच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्त वसुली संचालनालयाला सहकार्य करण्याचेही निर्देश दिले होते.
****
दुष्काळ तीव्र असला तरी सरकारची इच्छा शक्ती देखील तितकीच तीव्र आहे, त्यामुळे दुष्काळात जनावरं आणि नागरिक उपाशी राहाणार नाहीत, असं  मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं आहे. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये, माता आणि बालसंगोपन केंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. गरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, आतापर्यंत कोणत्याही सरकारनं दिलं नाही, इतकं, म्हणजे पंचाहत्तर हजार कोटी रुपयांचं थेट अनुदान आपल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, विक्रम काळे, जयदत क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बीड शहरातल्या विविध विकास कामांचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला.
दरम्यान, धनगर आरक्षणाचा प्रस्ताव आम्हीच केंद्राकडे पाठवू आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिंगोली इथल्या शेतकरी आणि बचत गट मेळाव्यात बोलताना दिलं. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पैसे पोहोचत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी सुरूच राहील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये, असं आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. विक्री करताना शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतारा व्यापाऱ्यांना देऊ नये, असंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्र शासनानं यावर्षी तुरीची आधारभूत किंमत प्रति क्विंटल पाच हजार सहाशे पंचाहत्तर रुपये इतकी निश्चित केली आहे. राज्यात आधारभूत किंमतीनं तूर खरेदी करण्यासाठी आतापर्यंत एकशे चौतीस तूर खरेदी केंद्रं सुरु करण्यात आली असून, शेतकऱ्यांची मागणी असेल तिथे ही केंद्रं सुरू करण्याची सरकारची तयारी आहे. या केंद्रांवर आतापर्यंत सतरा हजार दोनशे चौंसष्ठ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीहून कमी किमतीत तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्य���चा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.
****
शाश्वत स्वच्छता ही काळाची गरज असून, महाराष्ट्र हा शाश्वत स्वच्छतेतही अग्रेसर राहणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘दरवाजा बंद २’ या जाहिरात अभियानाचा शुभारंभ बबनराव लोणीकर आणि चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते आज मुंबईत झाला, त्यावेळी ते बोलत होते. शाश्वत स्वच्छता मिळवण्यासाठी, शौचालयांचा नियमित उपयोग आवश्यक असून, त्यासाठीच केंद्र सरकारनं “दरवाजा बंद-२” हे अभियान सुरू केलं आहे, असं लोणीकर यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यासाठी एकशे पंचवीस कोटी शहात्तर लाख रुपयांची दुष्काळी मदत मंजूर झाली आहे. त्यात पहिल्या टप्यात देगलूर, मुखेड आणि उमरी या तालुक्यांतल्या शेतकऱ्यांसाठी पंचवीस कोटी पंचाहत्तर लाख छप्पन्न हजार रूपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी  अरूण डोंगरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातल्या देगलूर, मुखेड आणि उमरीसह अन्य चौदा महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे.
****
0 notes