Tumgik
#“शाळा
rebel-bulletin · 2 years
Text
शिक्षिका ममता बंडाठे यांच्या मार्गदर्शनाला यश | सैनिकी शाळा व नवोदय परीक्षेत 6 विद्यार्थ्यांचे सुयश
तिरोडा : असीम सराफ सेन्ट्रल अकाडेमी तिरोडा येथील शिक्षिका ममता आनंद बंडाठे यांनी विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सैनिकी शाळा व नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेबाबत यथायोग्य मार्गदर्शन केले व त्याबाबत शिकविले. त्यामुळे सदर परीक्षांमध्ये 6 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अर्णव मनोजकुमार बडोले (मेरिटोरिअस पब्लिक स्कूल), पार्श्व गजेंद्र ठोंबरे (असीम सराफ सेन्ट्रल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बेशरम रंगवर विवेक यांचा टोमणा, शाहरुखच्या चाहत्यांनी घेतली शाळा
बेशरम रंगवर विवेक यांचा टोमणा, शाहरुखच्या चाहत्यांनी घेतली शाळा
बेशरम रंगवर विवेक यांचा टोमणा, शाहरुखच्या चाहत्यांनी घेतली शाळा Vivek Agnihotri On Shah Rukh Khan- शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ सिनेमाची सध्या बरीच चर्चा आहे, कारण नुकतेच त्यातलं ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात दीपिका पादुकोण अतीशय हॉट दिसत आहे. गाण्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. Vivek Agnihotri On Shah Rukh Khan- शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ सिनेमाची सध्या बरीच…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
भारतीय राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणं गरजेचं - उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यात ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण
येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार शेतकरी विरोधी असल्याची खासदार शरद पवार यांची टीका
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन
****
भारतीय राज्यघटना सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून, राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणे गरजेचं असल्याचं, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. राज्यभरातल्या ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातल्या कार्यक्रमात दूरदृश्य पद्धतीनं केल्यानंतर ते आज बोलत होते. राज्यघटना हा लोकशाहीचा आत्मा, तर संसद म्हणजे राज्यघटनेचा रक्षणकर्ता आहे, राज्यघटना ही मिरवण्यासाठी नसून वाचून, समजून घेण्यासाठी आणि आदर करण्यासाठी असल्याचं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी या संविधान मंदिराचं उद्घाटन करण्याचा हा क्षण अविस्मरणीय आहे, या मंदिरामुळे राज्यघटनेबद्दल जागृती वाढेल, असा विश्वास धनखड यांनी व्यक्त केला. युवा पीढीनं सर्वत्र राष्ट्राचा गौरव वाढवावा असं आवाहन त्यांनी केलं.
राज्यघटनेनं दिलेल्या आरक्षणाला काही लोक विरोध करत आहेत, मात्र आरक्षण हा भारताचा, राज्यघटनेचा आत्मा आहे. आजच्या युवांनी राज्यघटनेचा अनादर करणाऱ्यांविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी, सर्वांनी स्वहिताच्या आधी देशहिताचा विचार करावा, असं आवाहनही उपराष्ट्रपतींनी यावेळी केलं.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्र आणि औद्योगिक शाळा इथं संविधान मंदिराच्या लोकार्पणानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी प्राचार्य मिलिंद बनसोडे यांनी यावेळी संविधानाचं महत्व आणि संविधानाबाबत सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर उपराष्ट्रपती धनखड यांनी आज नागपूरमध्ये रामदेवबाबा अभिमत विद्यापीठात डिजिटल टॉवरचं उद्घाटन केलं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यावेळी उपस्थित होते. १२ मजली डिजिटल टॉवरमध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या डिजिटल वर्गांचा समावेश आहे.
यावेळी उपराष्ट्रपतींनी त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्यासमवेत विद्यापीठ परिसरात ‘एक पेड मां के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण केलं.
****
सबका साथ सबका विश्वास या मंत्रानं देशात विचारधारा आणि प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल केला असून, गरीब, आदिवासी, दलित, वंचित, मागासवर्गीय, महिला, युवावर्ग आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. झारखंड दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज पंतप्रधानांनी सहा वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात ६६० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पणही करण्यात आलं.
केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनाअंतर्गत बांधण्यात आलेल्या देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ आणि ४६ हजार लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळा देखील या कार्यक्रमात पार पडला. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकूण ३२ हजार कोटी रुपयांचा थेट मदतीचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीणच्या २० हजार लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते आवास मंजुरी पत्रांचं वाटपही करण्यात आलं.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसापूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिहार कारागृहातून बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत आम आदमी पार्टीच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यात नव्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित केलं जाईल, असं केजरीवाल यांनी सांगितलं.
****
केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. धुळे जिल्ह्याल्या शिंदखेडा इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते आज बोलत होते. सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही त्याचप्रमाणे राज्यात महिला सुरक्षित नाहीत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे सरकार हटवून आपल्या विचारांचं सरकार आणणं ही जनतेची जबाबदारी आहे, असं पवार यावेळी म्हणाले.
****
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचं पूजन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाची प्रत आणि श्री गणेशाची मूर्ती राज्यपालांना भेट म्हणून दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना माय जी ओ व्ही ओपन फोरमवर, नमो ॲप वर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या क्रमांकावर पाठवाव्यात किंवा एक नऊ दोन दोन या क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा संघर्ष, त्याग आणि बलिदानाचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे पोहोचवावा, असं आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात भरवण्यात आलेल्या, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन आज सावे यांच्यासह खासदार भागवत कराड तसंच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं, त्यावेळी सावे बोलत होते.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी बोलताना, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या इतिहासाविषयी माहिती दिली तसंच, तरुणांनी या मुक्तिसंग्रामाची गाथा जाणून घेऊन त्यापासून प्रेरणा घ्यावी, असं आवाहन केलं. १७ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे.
****
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार असून, ‘पर्यटन आणि शांतता’ अशी यंदाची या दिनाची संकल्पना आहे. महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांतर्फे या विषयाच्या अनुषंगाने परिसंवाद, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, महामंडळाचे व्यवस्थापक मनोजकुमार सुर्यवंशी यांनी दिली.
****
ईद-ए-मिलाद निमित्त छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि परभणी जिल���ह्यासाठी उद्याची १६ तारखेची सार्वजनिक सुटी कायम ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली आहे.
तर बीड जिल्ह्यात येत्या बुधवारी १८ तारखेला ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातलं पत्रक आज जारी केलं.
****
लातूर शहरात येत्या सतरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणपती विसर्जनाच्या अनुषंगानं, जनतेच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं शहरातल्या विसर्जन मार्गावर वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. विसर्जनाच्या दिवशी सकाळी दहा ते रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही पर्यायी मार्गाची व्यवस्था असेल, असं प्रशासनानं कळवलं आहे.
****
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथं दसवेल फाट्याजवळ आज सकाळी खासगी प्रवासी वाहन आणि व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. शिंदखेडा तालुक्यातल्या वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून हे भाविक शिंदखेडा इथं परतत असतांना हा अपघात झाला. खासगी प्रवासी वाहनाचा चालक मद्यधुंद असल्याचं प्रथमदर्शी निदर्शनास आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बॅडमिंटनपटू अनमोल खरब हिनं लुवेन इथं बेल्जियम इंटरनॅशनल स्पर्धेत महिला एकेरीचं पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावलं आहे. १७ वर्षीय अनमोलनं अंतिम फेरीत डेन्मार्कच्या अमाली शुल्झचा २४-२२, १२-२१, २१-१० असा पराभव केला.
****
0 notes
6nikhilum6 · 9 days
Text
Alandi : आळंदी नगरपरिषद शाळेच्या नवीन इमारत बांधकामास अधिकचा निधी दिला जाईल - अजित पवार
एमपीसी न्यूज – आळंदी नगरपरिषदेच्या (Alandi) शाळा क्रमांक चारच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला अधिकचा निधी दिला जाईल, असे सांगून अधिकच्या निधीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. शाळा क्रमांक चारच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, अपर…
0 notes
Text
मित्र
एकेक लागला गळायलानी पाय माझे वळायला ।काळ लोटला वेळ लोटलीमित्रांसाठी लागलो हळहळायला । दिवस तेव्हाचे आठवतातभारी वाटायचे याच मित्रात ।शाळा सुटली नोकरी लागलीकाम काम तेच होतं कर्मात । आता थोडी मिळाली उसंतबोलावे भेटावे वाटत मित्रांना ।पण तेही निघालेत दूर आतासांगा थांबवू कसे मी सर्वांना ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 1 month
Text
0 notes
aissmseducation · 4 months
Text
सभोवतालच्या परिसरातून घडते विद्यार्थ्यांचे जीवनमान
Author- सौ.ज्योती अजित येनपुरे Asst. Teacher (SSPMS Primary Day School)
मूल जन्माला येते तेव्हा त्याच्यावर सभोवतालच्या परिसराचा प्रभाव पडतो. आई-बाबा, आजी-आजोबा हा इतकाच त्याचा परिसर. मूल आपल्या कुटुंबातील लोकांचे निरीक्षण करत असते. जसे, की ते कसे बोलतात, कसे वागतात यावरूनच ते मूल बोलायला, वागायला शिकते.
जसजसे मूल मोठे होत जाते ते त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या इतर लोकांमध्ये, मित्रांमध्ये मिसळू लागते. यातूनच आपुलकी, जिव्हाळा, प्रेम या गोष्टी ते शिकत जाते. सोबतच इतरांना मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे, छोट्यांना आधार देणे अशा बऱ्याच गोष्टीही ते शिकत असते. परिसर त्याच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणून अनेक नवनव्या गोष्टींची भर घालत असतो.
परिसरात वावरत असताना घरातील लोकांपेक्षा, त्याच्या आई-बाबांपेक्षा वेगळे वागणे, बोलणे मुलाच्या कानावर पडत असते. मग ते कधी चांगले तर कधी वाईट असते. या गोष्टींचा त्याच्या मनावर कसा परिणाम होतो, हे त्याच्यावर होत असलेल्या किंवा आई-बाबांकडून मिळणाऱ्या संस्कारांवर अवलंबून असते. यातूनच त्याची सामाजिक जडणघडणही व्हायला सुरुवात होते.
मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या जीवनात शाळा अत्यंत प्रभावशाली ठरते. शाळेमध्ये साजरे होणारे विविध दिन जसे, की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती हे राष्ट्रीय सण साजरे ��ेल्यामुळे त्याच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होते. शिवजयंती उत्सव साजरी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार त्याच्या मनात प्रेरणा निर्माण करतात. तसेच वाचन प्रेरणा दिवस, शिक्षक दिन यामुळे साहजिकच मुलाला वाचनाची, अभ्यासाची गोडी लागते आणि शिक्षकांबद्दलची ओढही निर्माण होते. एखादे ध्येय ठरवून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळावा, यासाठी या गोष्टी मुलांच्या जीवनात खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात.
शाळेमधूनच मुलांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. यामध्ये गड किल्ल्यांना भेटी दिल्या जातात. या भेटींमधून ऐतिहासिक गोष्टींची माहिती मिळते तसेच निसर्गदर्शन घडते आणि त्यांच्या मनात निसर्गाबद्दलचे प्रेम वाढीस लागून त्याचे महत्त्व समजते. निसर्गाची काळजी कशी घ्यावी, पशुपक्षांची काळजी कशी घ्यावी हेही लक्षात येते. या सगळ्यांतून मुलांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते.
एकंदरीत, वरील सर्वच गोष्टींचा सारासार विचार करता विद्यार्थ्यांच्या जीवनावर आजूबाजूच्या परिसराचा सकारात्मक प्रभाव पडत असतो.
Source: https://sspmpds.in/sabhotalchya-parisaratun-ghadte-vidhyarthi-jiwanman/
0 notes
imranjalna · 6 months
Text
Maharashtra School: मोठी बातमी: राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार, नावाच्या आधी Tr. लागणार
मुंबई: राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळांच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राज्यातील प्रत्येक शाळेत ड्रोस कोड लागू होणार आहे. त्यामुळे शाळेत आता शिक्षकांना टी-शर्ट किंवा जीन्स पँट परिधान करता येणार नाही. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरूष व महिला शिक्षकांना शाळा (Schools) निश्चित करेल अशा रंगाच्या ड्रेसकोडचे पालन करणे बंधनकारक असेल. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 7 months
Link
https://marmikmaharashtra.com/why-do-you-take-our-children-in-schools/
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Schools Subsidy: एक निर्णय आणि राज्यातील ६ हजार शाळा, ६३ हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार फायदा
Schools Subsidy: एक निर्णय आणि राज्यातील ६ हजार शाळा, ६३ हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार फायदा
Schools Subsidy: एक निर्णय आणि राज्यातील ६ हजार शाळा, ६३ हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार फायदा School Subsidy: अनुदानासाठी पात्र शाळांना अटी व शर्ती लागू राहतील. त्याचप्रमाणे त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शेवटची संधी म्हणून एक महिन्याची मुदत देण्यात येत आहे; अन्यथा पुढील महिन्यात अशा शाळा व तुकड्यांना स्वयंअर्थसाहाय्यित म्हणून मान्यता देण्यात येईल. ज्या शाळा यासाठी तयार होणार नाहीत,…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी सेमीकॉन इंडिया २०२४ या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आजचे युग हे सिलिकॉन डिप्लोमसीचे युग आहे. हा कार्यक्रम योग्यवेळी ठेवण्यात आला आहे. आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगाला आत्मविश्वास निर्माण करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टर संबंधित पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भारतात डेटा सेंटरची मागणी सातत्याने वाढत आहे. ती पूर्ण केली जाईल.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी, राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे ��ांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०० अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०० ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला आहे तर ७० हून अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्छुक आहेत. अयोध्यासमवेत नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्णमंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
****
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रकाशयोजनेतील जागतिक आघाडीवर असलेल्या सिग्नीफायने देशातील सर्वात मोठ्या प्रदीप्त मोदकांचे अनावरण केले आहे. मुंबईत स्थापन झालेल्या या प्रदीप्त मोदकाचे नाव एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. १६ फूट उंच आणि ४ फूट पायथ्याशी असलेल्या या मोदकाला प्रकाश देण्यासाठी फिलिप्सचे दिवे लावण्यात आले आहेत. हा मोदक ७ सप्टेंबरपासून पुढील ११ दिवसांसाठी चिंतामणी गणपती मंडळ आणि मुंबईतील लाल बागचा राजा चौकात बसवण्यात आला आहे.
****
लातूर महानगरपालिकेने गेल्या ५ दिवसात शहरातून एक हजार ६४० मेट्रिक टन कचरा उचलला आहे. आगामी ८ दिवसात उर्वरित कचरा उचलण्याची ग्वाही मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त संस्थेच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी संस्था नेमण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं, महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
नवी मुंबई महापालिकेचे 'पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महावि‌द्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै रोजी दिल्ली येथे भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती.
****
भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखिल तुटला आहे. जिल्ह्यातील जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे दीड मीटरने तर ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसामुळे नदीकाठावर असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडल्यानं १७ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. विविध भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भात येत्या २४ तासात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 11 days
Text
Pimpri : झिरो वेस्ट शाळा उपक्रम
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील (Pimpri)विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच कचरा व्यवस्थापनाची सवय लागावी तसेच त्यांच्यामध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी व महापालिकेच्या शाळा कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शाळा स्तरावर कचरा मुक्त शाळा (झिरो वेस्ट शाळा) हा उपक्रम राबविणे तसेच पुणे जिल्ह्यातील 20 शिक्षकांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्गीकरण करणे या विषयांसह विविध…
0 notes
bhavesh6 · 7 months
Text
CLASS 6TH 2nd Unit Test MARATHI QUESTION PAPER
CLASS 6TH 2nd Unit Test MARATHI QUESTION PAPER प्रश्न 1. एका शब्दात उत्तरे लिहा.(4) 1. वैष्णवीला कठीण गेलेला पेपर –  …………………………………………………………..……… 2. वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ –  …………………………………………………………..……… 3. चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल ? –  …………………………………………………………..……… 4. चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल? –  …………………………………………………………..……… प्रश्न 2. कोण कोणास म्हणाले ते…
View On WordPress
0 notes
sanjay-ronghe-things · 3 months
Text
गेले ते दिवस
गेलेत हो ते दिवसआलोय मी कुठे ।परत नाही येणारदिवस तेच इथे । हसणे रडणे खेळणेदिवसभर भटकणे ।मोठा मी झालो नादिवस होते ते जुने । आईचा तो मारबाबांचा होता धाक ।भ्यायचो ना कितीऐकताच ती हाक । शाळा असो वा घरमस्ती करायची खूप ।वरण भातावर वाढेआईच जास्त तूप । हवे ते मिळायचेचिंता नव्हती कशाची ।बाबाही किती झटायचेनसे काळजी खिशाची । पावसात मस्त भिजायचोउन्हा तान्हात खेळायचो ।मित्रांसोबत आम्ही तेव्हापेरुही कसे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 2 months
Text
0 notes
Text
नुकतंच सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या श्री शारदा मंदिर प्राथमिक शाळेमध्ये ६६ व्या बालक सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात बक्षीस वितरण करताना तेथील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायची संधी मिळाली. छ. संभाजीनगरमधील सर्वात जुन्या शिक्षण संस्थेने अद्यापही मराठी माध्यम टिकवून ठेवले आहे, हे विशेष. साधी, सोपी शाळा... मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी... इथे रांगोळी स्पर्धेत मुलांनीही बक्षिसे मिळवली. सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुलींनीच केलेलं...! मातृभाषेतून संवाद, लिखाण, बक्षीस वितरण... धमाल अनुभव.. त्या पालकांचंही मनोमन कौतुक वाटलं, ज्यांनी आपल्या पाल्यांना इथे शाळेत घातलंय. मार्कांपेक्षाही मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास त्यांना जास्त गरजेचा वाटला.
मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा टोपे मॅडम, शिक्षकवृंद व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार!
Contact us for more- 8087382763
https://careercounselingonline.in/
Akshar Handwriting Analysis, Sambhaji Nagar (Aurangabad), Maharashtra-431001
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
1 note · View note