#होळी खेळ
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
·      सुधारित कृषी कायद्यातही किमान हमी भाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार - पंतप्रधानांचा निर्वाळा.
·      वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ७०:३० कोटा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयात कायम.
·      राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड.
·      प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींबाबत तोडगा काढण्यासाठी अभ्यासगट नियुक्त केला जाणार.
·      राज्यात तीन हजार ९९४ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २८३ रुग्णांची नोंद.
·      शैक्षणिक संस्थामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातल्या बंदला संमिश्र प्रतिसाद.
आणि
·      ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारतीय संघ दुसऱ्या डावात ६२ धावांनी आघाडीवर.
****
सुधारित कृषी कायद्यातही किमान हमी भाव - एमएसपी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती - एपीएमसी पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचा निर्वाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मध्यप्रदेशात रायसेन इथं काल झालेल्या शेतकरी महासंमेलनाला ते दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून संबोधित करत होते. नव्या कृषी कायद्यांमुळे एमएसपी आणि एपीएमसी बंद होईल असा अपप्रचार करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवला जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या वावड्यांकडे दुर्लक्ष करून सरकारवर विश्वास ठेवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पूर्वी राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यात कृषी सुधारणांची घोषणा करत होते. परंतु, आता या सुधारणांचं श्रेय घेता येत नसल्यानं, ते शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून वार करत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. कृषी सुधारणांचं सर्व श्रेय या पक्षांनी घ्यावं, मात्र शेतकऱ्यांच्या प्रगतीत बाधा आणू नये, असं आवाहन पंतप्रधानांनी या पक्षांना केलं.
****
चालू खरीप हंगामात ४५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांकड��न किमान आधारभूत दरानं धान्य खरेदी करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं ही माहिती दिली. या माध्यमातून शेतकऱ्यांना ७५ हजार २६३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांमधून ३९८ लाख टन तर एकट्या पंजाब राज्यातून २०२ लाख टन धान्य खरेदी करण्यात आली आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ७०:३० कोटा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या या अध्यादेशाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात मराठवाड्याबाहेरच्या काही पालकांनी चार याचिका दाखल केल्या होत्या. खंडपीठाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत, कोटा रद्द करण्याचा शासन निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. या निर्णयाचं आमदार पाटील यांनी स्वागत केलं आहे.
****
कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या सोयीकरता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टीने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणं आवश्यक आहे.
****
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड झाली आहे. महासंघाच्या संचालक मंडळाच्या २१४ व्या शिखर बैठकीत एकमतानं दांडेगावकर यांची निवड झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं, त्यांनी महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दांडेगावकर हे सध्या राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी केलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या पुणे जिल्ह्यातल्या तिघा पर्यटकांचा काल दुपारी आंजर्ले इथल्या समुद्रात बुडून मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातले सहा पर्यटक काल दुपारी आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं हे सर्वजण समुद्रात बुडाले. त्यातल्या तिघांना वाचवण्यात स्थानिकांना आलं, तर इतर तिघांचे मृतदेह थोड्या वेळाने किनाऱ्याला लागल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
प्लास्टर ऑफ पॅरीस - पीओपीच्या मूर्तींबाबत अभ्यास करुन तोडगा काढण्यासाठी अभ्यासगट नियुक्त केला जाणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही मागणी मान्य केली असल्याची माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली. पीओपी वापरावर आणलेली बंदी, केंद्र सरकारनं कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एका वर्षासाठी शिथिल केली होती. त्यानंतर ही बंदी कायम राहणार आहे, या पार्श्वभूमीवर मूर्तीकार, आणि कारखानदारांच्या शिष्टमंडळाने काल आमदार शेलार यांच्या नेतृत्वात जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली. पीओपी मूर्तींवर बंदीमुळे मूर्तीकार तसंच कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे, शाडू मातीच्या मूर्तीला अनेक मर्यादा आहेत, नव्या तंत्रज्ञानानुसार पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळवता येते, या आणि अशा अनेक मुद्यांकडे या शिष्टमंडळाने पर्यावरण मंत्र्यांचं लक्ष वेधलं. या पार्श्वभूमीवर अभ्यास गट स्थापन करुन मध्यममार्ग काढावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली, ती जावडेकर यांनी मान्य केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दिल्ली इथं सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात राज्यातले शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी दिली आहे. किसान सभेच्या नेतृत्वात २१ डिसेंबर २०२० रोजी नाशिक इथून शेतकरी दिल्लीकडे प्रस्थान करतील, २४ डिसेंबरला हे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोहोचतील, राजस्थान हरियाणा सीमेवर शहाजहानपूर कडून दिल्लीकडे जाणारा महामार्ग हे शेतकरी रोखून धरणार असल्याची माहिती नवले यांनी दिली. स्वयंपाक आणि निवासाची व्यवस्था सोबत घेऊन हे शेतकरी बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जाणार असल्याचं नवले यांनी सांगितलं.
दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासोबत मुंबई इथं अंबानींच्या कार्यालयावर येत्या २२ तारखेला मोर्चा काढणार असल्याचं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
****
वस्तू आणि सेवा कर विभागाच्या पथकानं ६२१ कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल यवतमाळ जिल्ह्यातून चार भामट्यांना अटक केली. या चौघांनी कोणताही व्यवसाय नसताना, बनावट कागदपत्रांच्या आधारे ६२१ कोटी ६० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं निदर्शनास आलं आहे.
****
राज्यात काल तीन हजार ९९४ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ८८ हजार ७६७ झाली आहे. काल ७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४८ हजार ५७४ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका झाला आहे. काल चार हजार ४६७ ��ुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ७८ हजार ७२२ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक १७ दशांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ६० हजार ३५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २८३ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात काल तीन तर, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ९१ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ४३, जालना ३९, लातूर ३४, उस्मानाबाद ३१, नांदेड २३, परभणी १९, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले तीन नवे रुग्ण आढळले.
****
औरंगाबाद शहरात पर्यटनासाठी पुढच्या महिन्यात पाच इलेक्ट्रीक बस दाखल होणार आहेत. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ही माहिती दिली. या वातानुकूलित बसचं तिकीट घेतलेल्या पर्यटकांना कोणत्याही स्थळावरून बसमध्ये बसता तसंच उतरता येईल.
****
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघानं काल दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दुसऱ्या डावात ६२ धावांची आघाडी घेतली, काल सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर भारतीय संघ २४४ धावांवर सर्वबाद झाला, त्यानंतर खेळायला आलेला ऑस्ट्रेलियाचा संघही १९१ धावांतच तंबूत परतला. काल सायंकाळी दुसऱ्या डावाचा खेळ थांबला तेव्हा भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ चार धावांवर बाद झाला होता, तर मयंक अग्रवाल पाच धावांवर खेळत होता.
****
राज्यातल्या शैक्षणिक संस्थामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला काल औरंगाबाद जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये जिल्ह्यातल्या सर्व शैक्षणिक संघटना तसंच शहरातल्या ८६५ खासगी शाळांमधले कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष वाल्मिक सुरासे यांनी दिली. हा आदेश पूर्णत: अन्यायकारक असून यामुळे बेरोजगारीत आणखी वाढ होणार असल्याचं ते म्हणाले.
भाजप शिक्षक आघाडीने औरंगाबाद इथं शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात याबाबतच्या शासन निर्णयाची होळी केली. शिक्षणासारख्या विषयातही महाविकासआघाडी सरकारचं धोरण उदासीन असल्याची टीका भाजप नेते प्रवीण घुगे यांनी यावेळी केला. हा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारं एक निवेदन शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांना सादर करण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगोखड विधानसभा मतदारसंघात बिनविरोध निवडल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींना आमदार विकास निधीतून प्रोत्साहनपर विशेष रक्कम देण्याची घोषणा आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे. एक हजाराच्या आत मतदारसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ११ लाख रुपये, एक हजार ते २ हजार मतदार संख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २१ लाख रुपये तर दोन हजाराहून जास्त मतदारसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ३१ लाख रुपये विकास निधी देण्या�� येणार असल्याचं, आमदार गुट्टे यांनी सांगितलं. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन आमदार गुट्टे यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी नागरिकांना कोरोना विषाणू प्रादुर्भावापासून बचावासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे यांच्या नेतृत्वात काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. आपल्या विविध मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात गेल्या अनेक दिवपासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला काल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठार केलं. करमाळा तालुक्यात राखुंडे वस्ती जवळ ही कारवाई करण्यात आली. या बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात करमाळा तालुक्यात तिघांचा बळी गेला आहे. तालुक्यात आणखी काही बिबटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
बीड शहरात काल एका प्लायवुडच्या गोदामात रसायनाच्या टाकीचा भीषण स्फोट होऊन एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. हा स्फोट कशामुळे झाला, याचं कारण अद्याप कळू शकलं नाही.
****
लातूर जिल्ह्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने संभाव्य नुकसानाच्या २५टक्के रक्कम तातडीनं अदा करावी, अशी अधिसूचना लातूर जिल्हा प्रशासनानं जारी केली आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला वस्तूस्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या अहवालात यंदा तूर पिकाचं उत्पादन सरासरीपेक्षा ५० टक्के कमी होईल, असं नमूद आहे.
****
लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत नवमतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती केल्याबद्दल, औरंगाबाद निवडणूक विभागाच्या ब्रँड अँबेसेडर नवेली देशमुख यांचा काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या दोन्ही निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यात नवेली देशमुख यांची भूमिका नक्कीच उपयुक्त ठरली, असं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नमूद केलं.
****
0 notes
aptedhruv21 · 6 years ago
Text
मला काय त्याचे..
आपल्याला सतत कशाचे ना कशाचे डोहाळे लागत असतात. हिंदुत्वाचे, राष्ट्रियत्वाचे, सणांचे, New Year आणि Christmasचे, क्रिकेटचे, राजकारणाचे... इथपासून सुरु होऊन... WhatsApp मुळे अगदी सोमवार/गुरुवारपासून संकष्टी चतुर्थीपर्यंत सगळे सगळे डोहाळे लागतात.अशाच एका डोहाळ्याचं आज उद्यापन आहे.
अगदी बरोबर..
गेल्या पंधरवड्यापासून Pregnant असलेल्या देशभक्तीची आज झेंडावंदन झालं की Delivery होईल.. आणि मग आपण नवीन Pregnancy साठी मोकळे होऊ..
आणि यावेळचा प्रजासत्ता�� दिन तर अजूनच खास आहे... काही दिवसांपूर्वीच 'उरी' चित्रपटाची फोडणी बसली आहे.. काल लागलेले मणिकर्णिका आणि ठाकरे Supplement म्हणून आहेतच. पण तरी नेमका long weekend चुकलाच.
नाहीतर अगदी मजा आली असती बघा.. 
त्यात भर म्हणून प्रत्येक गोष्टीचा Events करणारे आहेतच. कालच एक Flex बघितला, Come with your School Buddies on this Republic Day and get free beers for entire group. वाचूनच चाट पडलो..
काही दिवसांनी पितृपक्षाचाही Event झाला, तर नवल वाटून घेऊ नका..
मग आता तुम्ही म्हणाल की जे पाजतायत त्यांना Problem नाही... जे पितायत त्यांना Problem नाही.. मग मधल्या मधे माझं नाटक काय आहे! 
तुम्ही जर खरंच बारकाईने लक्ष दिलंत... तर या Attitude मुळे आपल्याला एक रोग जडतोय... स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खुप आधीच या रोगाचं निदान करुन ठेवलंय.. त्या रोगाचं नाव आहे,
'मला काय त्याचं!'
झेंडावंदन झालं... प्लास्टिकचे झेंडे फडकवले.. दुसऱ्या दिवशी त्याचाच कचरा झाला... पण मला काय त्याचं...
झेंडावंदन झालं... एक गाडी कमी पडली म्हणून ट्रिपल सीट निघालो... चौकात पोलीस शिट्ट्या मारुन थांबवतोय.. पण मला काय त्याचं...
टपरीवर चहा पित उभे आहात... शेजारी एक भाई हवेत धूर सोडत उभा आहे... तिथल्याच एका वयस्कर बाईला त्याचा त्रास होतोय.. पण मला काय त्याचं..
समोरुन पुण्यात नवीन आलेल्या माणसाची रिक्षावाला अडवणूक करतोय... स्टेशन ते शिवाजीनगर १५०₹ सांगतोय... पण मला काय त्याचं...
Friday Night... मस्त दारु पिऊन झिंगतोय... तिकडे आई- बाप मुलगा सरळ- सभ्य आहे या समजुतीत निवांत... पण मला काय त्याचं...
चौकात एक मुलगा रोज येऊन माझ्याच Colleague ची छेड काढतो.. ती बिचारी तोंडाने बोलत नाही, डोळ्यातून बरंच काही सांगून जाते.. पण मला काय त्याचं...
या सगळ्या गोष्टींमध्ये आमची देशभक्ती वांझ होऊन जाते..
आता या सगळ्या गोष्टींचा आणि देशभक्तीचा काय संबंध?
थांबा.. सांगतो...
स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे.. सशस्त्र लढ्याला म्हणावं तेवढं यश मिळत नव्हतं.. टिळकांच्या निधनानंतर नेतृत्व हरपलं.. जवळ जवळ सर्व क्रांतीकारक भूमिगत होते.. सावरकर लंडनमध्ये होते... मग एक अभिनव लढा भारतात उभा राहिला... त्यामध्ये फाशी जाण्याची गरज नव्हती... काळ्या पाण्याची भिती नव्हती.. कुटुंबांवर जुलूम होणार नव्हता...
मग नक्की काय करायचं होतं?
का��ींनी झाडाला मिठी मारायची होती... काहींनी मीठ उचलायचं होतं... काहींनी विदेश��� कापडाची होळी करायची होती... काहींना पोलीस ठाण्यावर मोर्चे काढायचे होते... 
काही मूठभर क्रांतीकारकांनी संपूर्ण त्याग करण्यापेक्षा, बहुतांश जनतेने थोडा थोडा त्याग करायचा होता.. त्यावेळी कोणाच्या डोक्यात हा विचार आला नाही की, मला काय त्याचं! 
आणि आला असता, तर मग काही खरं नव्हतं बरं का...
आपल्या देशभक्तीच्या कल्पनाच निराळ्या असतात मित्रांनो... बाॅर्डर आणि गदरमधले नायक, भगतसिंग आणि अगदी कालच्या उरीमधला विहान शेरगील... ही माणसं आणि त्यांचा त्याग फार अवघड आहे... आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो सहसा झेपत नाही...
म्हणून मग आम्ही काय करतो, मला काय त्याचं म्हणत गप्प बसतो...
अरे, नो एंट्रीतून आलेल्याला घाल की गाडी आडवी एकदा... चार गोष्टी सुनव त्याला... समजवून सांग... हा तुझाच रस्ता आहे... हा तुझाच देश आहे...
समोरचा माणूस कचरा टाकतोय.. तू बघतोयस... त्याला उलटं बोलायचं धाडस होत नाहीए... मग एकदा स्वतःहून तो कचरा उचलून तर बघ... अरे मित्रा, हा तुझाच कोपरा आहे... हा तुझाच देश आहे...
नारायण पेठेतल्या हाॅटेलात गेलायस... समोरचा माणूस पुणेकर आहे, हे ठाऊक आहे तुला... तरीही हिंदीमधून संवाद साधतोयस... मित्रा घडा घडा मराठीतून बोल की... ही तुझीच भाषा आहे रे.. हा तुझाच देश आहे...
क्रिकेट खेळतोस.. क्रिकेट बघतोस... गर्दीनं स्टेडियम भरुन टाकतोस... तिकडे हाॅकीवाले प्रेक्षकांची वाट बघतात... कधीतरी पाऊल हाॅकीकडेही टाकून बघ... लेका हा तुझाच खेळ आहे.. हा तुझाच देश आहे..
Office मधला colleague रोज एका मुलीकडे बघत बसतो... तिला आवडत नसताना तिच्यामागे फिरत राहतो.. तुला ते जाणवतं ना? मग घे की बाजूला त्याला एकदा... चांगला सज्जड दम भर... कारण दोस्ता, ही तुझीच बहिण आहे...  हा तुझाच देश आहे...
तुच जर का, सगळं सोडून मला काय त्याचं म्हणत बसलास... तर या देशाने बघायचं कोणाकडे?
Sacred Games मधला एक संवाद खुप वेळा आठवतो.. सिस्टम, मुंबई, कचरा या सगळ्यावर बोलताना सरताज म्हणतो,
"ये सिस्टीम.. ये बम्बई.. ये इंडिया..ये सब कौन है? हम ही है ना BC.."
खरंय की नाही? 
प्रजासत्ताकचा अर्थ लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य असा असतो की लोकांनी निवडून दिलेल्या लोकांचे राज्य असा, हे आपण जेवढ्या लवकर समजू.. तेवढ्या लवकर आपण एक Matured Democracy म्हणून उदयाला ��ेऊ...
नाहीतर मग ते अमेरिकेतले गोडवे आहेतच.. तिथे स्वच्छता आहे... न्याय आहे... वगैरे वगैरे..
ही अशी गोष्टी आहे, की जी नष्ट झाली असती तर सावरकरांना आनंदच झाला असता... पण आपण जसजसे प्रगत होतोय तसतसे अजूनच या गोष्टीला बळी पडतोय...
मणिकर्णिका मधल्या एका गाण्याचे बोल खुप सुंदर आहेत..
' मेरी नस नस तार करलो.. और बनाओ एक सितार...
 राग भारत उसपें छेडो... छनछनाओ बार बार..'
किती परमोच्च त्याग आणि देशप्रेम आहे... आपल्या माहित असतं की हे सगळं आपल्या आवाक्याबाहेर आहे... म्हणून मग आपण फेबुवर पोस्ट टाकतो.. इन्स्टावर स्टोरी टाकतो आणि गप्प बसतो...
तुला नाही ना असलं काही जमत... तरीही तू देशभक्त आहेस हे लक्षात ठेव...
सिग्नल पाळ... तू देशभक्त...
मतदान कर... तू देशभक्त..
लाच देऊ नकोस.. तू देशभक्त...
स्त्रियांचा सन्मान कर... तू देशभक्त..
आणि सगळ्यात महत्त्वाचं,
मला काय त्याचं म्हणणं सोड.. म्हणेजच तू देशभक्त..
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 September 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      वैद्यकीय शिक्षण आणि व्यावसायिकांसाठी नियंत्रण संस्था म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कार्यरत.
·      वाढीव शुल्क घेणाऱ्या दवाखान्यांकडून पाच पट दंड वसूल करण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आदेश.
·      आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी सोमवारपासून पुकारलेलं कामबंद आंदोलन स्थगित करावं - मुख्यमंत्र्यांचं आवाहन.
·      प्रसिद्ध पार्श्वगायक एस पी बालसुब्रह्मण्यम यांचं निधन.
·      राज्यात कोविडबाधितांची संख्या १३ लाख ७५७.
·      मराठवाड्यात काल २९ कोविडग्रस्तांचा मृत्यू तर नवे एक हजार ६०८ रुग्ण.
आणि
·      धनगर तसंच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन; कृषी विधेयकांनाही विरोध.
****
देशभरातल्या वैद्यकीय शिक्षण आणि व्यावसायिकांसाठी नियंत्रण संस्था म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कालपासून कार्यरत झाला. याआधी कार्यरत असलेल्या भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा हा आयोग घेणार आहे. डॉ सुरेशचंद्र शर्मा या आयोगाचे अध्यक्ष असतील, तीन वर्षांसाठी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हा आयोग कार्यरत झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या सुधारणांना प्रारंभ होणं, अपेक्षित आहे.
****
वैद्यकीय उपचारांसाठी वाढीव शुल्क घेणाऱ्या दवाखान्यांकडून पाच पट दंड वसूल करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. टोपे यांनी काल नागपूर इथं कोविड उपचारासंदर्भात आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी असलेल्या सहाशे खाटांची संख्या एक हजारपर्यंत वाढवण्यात यावी अशी सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केली. प्लाझ्मा उपचाराला प्रोत्साहन देण्यासाठी दर निश्चित करण्यात आले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी येत्या सोमवारपासून पुकारलेलं कामबंद आंदोलन स्थगित करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केलं आहे. आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातल्या मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आता राज्य शासनानं आशा स्वयंसेविकांना दरमहा दोन हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा तीन हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे. प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांच्या कमी करण्यात आलेल्या मोबदल्याची मागणी केंद्र सरकारकडे नव्यानं करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मो��िमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी सॅनिटायझर, मास्क, हातमोजे, आदी साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
****
शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य असलेल्या ठिकाणी दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थितीतून सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत ही सूट देण्यात आली असून, दिव्यांग अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होणार नाही याची काळजी संबंधित विभागांनी घ्यावी, असंही याबाबत जारी शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकारनं संसदेत संमत केलेली तिन्ही कृषी सुधारणा विधेयकं राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारी असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेस सर्वच पातळ्यांवर तीव्र विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या विधेयकांविरोधात काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ येत्या सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.
****
प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचं काल चेन्नईत निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. कोविड संसर्ग झाल्यानं, त्यांच्यावर पाच ऑगस्टपासून चेन्नईतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून विविध भूमिका साकारलेल्या एस पींच्या गायन कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा –
१६ भारतीय भाषांमधून ४० हजारांवर गाणी गायलेल्या एसपींनी, हिंदी चित्रपटात कमल हसन आणि सलमान खान यांचा आवाज म्हणून ओळख निर्माण केली. एक दुजे के लिए, सागर, अप्पूराजा, मैंने प्यार किया, पत्थर के फुल, साजन, हम आपके है कौन या चित्रपटांसह हंड्रेड डेज, द जंटलमन, सपने, रोजा आणि चेन्नई एक्सप्रेस आदी चित्रपटांतल्या नायकांसाठी त्यांनी गायलेली गाणी, खूप लोकप्रिय झाली. ५६ वर्षांच्या गायन कारकिर्दीसाठी एसपींना विविध राज्य सरकारं आणि संगीत संस्थांच्या अनेकविध पुरस्कारांसह सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तसंच पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. कोविड योद्ध्यांच्या कार्या��ा अभिवादन करणारं इलयाराजा यांनी संगीतबद्ध केलेलं ‘भारतभूमी’ हे तमिळ गीत एसपींनी गेल्या मे महिन्यात ध्वनिमुद्रीत केलं होतं. आपल्या चाहत्यांमध्ये ‘सिंगिंग मून’ या टोपण नावानं प्रसिद्ध असलेल्या या गायन चंद्राला त्याच्याच गाण्याच्या हिंदी रुपातली ही श्रद्धांजली...
****
राज्यात काल दिवसभरात आणखी १७ हजार ७९४ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १३ लाख ७५७ झाली आहे. राज्यभरात काल ४१६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३४ हजार ७६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत नऊ लाख ९२ हजार ८०६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७२ हजार ७७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईत काल एक हजार ८७६ नव्या रुग्णांची नोंद झाली. नाशिक - एक हजार ४६८, ठाणे - एक हजार ६७१, सातारा ६२२, सांगली ६०८, रायगड ४७९, पालघर २५७, रत्नागिरी ११६, गोंदिया ३०८, गडचिरोली ८५, यवतमाळ ७६ तर वाशिम जिल्ह्यात नव्या ४९ रुग्णांची नोंद झाली.
****
मराठवाड्यात काल २९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ६०८ रुग्णांची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात काल आठ बाधितांचा मृत्यू झाला, तर नव्या ३५८ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात सात रुग्णांचा मृत्यू तर नवे ३५१ रुग्ण, परभणी जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू तर नवे ७६ रुग्ण, नांदेड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू तर अनुक्रमे २३२ आणि १८८ रुग्ण, बीड जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू तर नवे १९६ रुग्ण, उस्मानाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू तर नवे १६५ रुग्ण आढळले, तर हिंगोली जिल्ह्यात नव्या ४२ रुग्णांची नोंद झाली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात शून्य ते चौदा वर्षे वयोगटातल्या ज्या बालकांचे आई-वडील कोविड बाधित आहेत त्यांच्या संगोपनाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीकडून घेतली जात आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘बालसंगोपन कक्षा’चं उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि भाजपचे विधी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक मिलिंद पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
कोविड-19 बाधीतांच्या कुटुंबातील जी बालकं संसर्गापासून दूर आहेत अशांचा घरगुती वातावरणात सांभाळ करणं त्यांना खेळ, मनोरंजन आणि समुदेशन करून त्या बालकांचं आई-वडिलांना कसलंही टेन्शन न राहता त्यांनी या संसर्गातून लवकरात लवकर मुक्त व्हावं या भावनेतून हा बालसंगोपन कक्ष सुरू करण्यात आला आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त काल ��रंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पंडित उपाध्याय यांना आदरांजली वाहिली.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूरच्या दीक्षा भूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम दीक्षा स्मारक समितीनं रद्द केले आहेत. स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी ही माहिती दिली. १४ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर रोजी सर्व बांधवांनी आपल्या घरीच राहून बुद्ध वंदना घ्यावी आणि बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं आवाहन समितीनं केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात आजपासून ३० सप्टेंबरपर्यंतच्या ‘जनता संचारबंदी’बाबत कोणताही आदेश पारित केला नसल्याचं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्पष्ट केलं आहे. जनता संचारबंदी` साठी प्रशासनाच्या स्तरावर कोणतीही सक्ती नसून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने योग्य त्या उपाययोजना करणं अभिप्रेत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रवासी वाहतुकीवरही प्रशासनानं कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
सध्या पोषण माह सुरू आहे. याअनुषंगानं बालकांना पोषक ठरणाऱ्या सालाच्या मूग दाळीच्या धिरड्यांची पाककृती सांगत आहेत आहातज्ज्ञ डॉ.शुभदा कळणावत – लोणीकर –
हिरवी सालाची मुगाची डाळ जाडसर दळून घ्यायची. त्यात धन्याचं पावडर, जिऱ्याचं पावडर, कढिपत्ता, कोथिंबीर, हे सगळं बारिक चिरून त्यात घालायचं. हवं त्या प्रमाणात मीठ आणि लहान मुलांना देत असाल तर कमी तिखट नाहीतर आवडीप्रमाणे तिखट टाकून ह्याचं पातळसर पीठ भिजवून घ्यायचं. जे मुलं आवडीनी खात नाहीत पण आवश्यक आहेत अशा भाजाही किसून टाकून शकता. आणि ह्याचे धिरडे तुम्ही मुलांना खायला घालू शकता. मुगाच्या डाळीत प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, कॉपर, झिंक आणि ईतर व्हिटॅमिन्स असतात आणि याच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता आपल्याला भरून काढता येते.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कोणतीही नोकरभरती होऊ दिली जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी दिला आहे. ते काल सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते. आरक्षण प्रश्न सुटेपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवत ठेवली जाईल असं पाटील सांगितलं. या मागणीसाठी सांगली इथं काल धरणे आंदोलनही करण्यात आलं.
****
धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात काल अनेक ठिकाणी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसंच वैजापूर तालुक्यात महालगांव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलं. लातूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर जालना शहरात गांधी चमन चौकात आंदोलन करण्यात आलं.
****
कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात जालना जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर फळ पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
परभणी शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी या विधेयकांची होळी करुन निषेध नोंदवला. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं काल पाथरीच्या तहसीलदारांना निवेदन देत कृषी विधेयकांसह ४४ कामगार कायदे रद्द करावे अशी मागणी या केली. परभणी शहरातही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं.
****
मराठवाड्यात अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्हयात पैठण, दौलताबादसह औरंगाबाद शहरातही काल जोरदार पाऊस झाला. परभणी शहर आणि परिसरात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ९८ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणातून ७५ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाचा पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
औरंगाबाद महापालिकेनं शहरात विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून गेल्या पाच महिन्यात २३ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली आहे. रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे या साठी ही दंड ठोठावत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातल्या वाई ग्रामपंचायत कार्यालयातले ग्रामविकास अधिकारी शंकर गुंडमवार याला लाच घेताना काल अटक करण्यात आली. सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरता त्यानं दहा हजार रुपयांची मागणी केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला सोळावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.
****
0 notes