Tumgik
#साप किल्ला
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्रातील पन्हाळा किल्ला, सापांचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या
महाराष्ट्रातील पन्हाळा किल्ला, सापांचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या
पन्हाळा किल्ल्याचा इतिहास: जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि तुम्ही एखादे रोमांचक ठिकाण शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला अशी जागा सांगणार आहोत, जिथे फिरणे तुमच्यासाठी खूप छान अनुभव असू शकते. या अतिशय सुंदर, नैसर्गिक सौंदर्य आणि थरारक ठिकाणाचे नाव आहे पन्हाळा किल्ला. होय, हा सुंदर किल्ला महाराष्ट्रात आहे. या किल्ल्याला सापांचा किल्ला असेही म्हणतात. पण का? चला जाणून घेऊया. पन्हाळा किल्ल्याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
radhanagari-blog · 8 years
Photo
Tumblr media
Radhanagari nature club We also providing accommodation radhanagri, dajipur jungle safari nature trail, birds watching, devrai trail wildlife photography birds, butterfly walk(photography) wildlife nature documentry shows fireflies night walk traditional food visit us www.radhanagariwildlife.com contact +919923102589 प्रेक्षणीय स्थळे - लक्ष्मीसागर जलाशय, शाहूसागर जलाशय, सावराई सडा, सांबरकोंड, कोकण दर्शन पॉइंट, वाघाचे पाणी, सापळा , उगवाई देवराई, शिवगड किल्ला . राधानगरी अभयारण्याचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये करण्यात आला आहे . जगातील ३४ अतिसंवेदनशील ठिकाणांपैकी पश्चिम घाटात राधानगरी अभयारण्य येते . दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्त्वाचा जंगल पट्टा आहे निमसदाहरीत जंगल प्रकारात याचा समावेश होतो . कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस असणाऱ्या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ. कि.मी. आहे . समुद्रसपाटीपासूनची याची सरासरी उंची ९०० ते १००० फूट असून येथे सरासरी पर्जन्यमान ४०० ते ५०० मी. मी. आहे . दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्याचाच एक भाग आहे . पूर्वी हे शिकारीकरीता राखीव जंगल होते . कोल्हापूर संस्थानाचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यावर सन १९५८ ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली . तसेच हे महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य आहे . राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतालच्या जंगल परिसराला मिळून सन १९८५ ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. येथील घनदाट जंगलाचे पट्टे डंग या नावाने ओळखले जातात . येथील डोंगरमाथ्यांवर जांभा खडकाचे मोठे सडे (Plateau) आहेत सड्यांवर व सड्यांच्या भोवताली असणाऱ्या दाट जंगलामधे एक संपन्न जैवविविधता आढळून येते. वनस्पती जगत - भारतातील राधनागरी अभयारण्याचे महत्व म्हणजे निमसदाहरित व पान गळीच्या मिश्र जंगल प्रकारामुळे असंख्य प्रजातींचे ते आश्रयस्थान आहे. डोंगरातील दऱ्याखोऱ्यातील घनदाट जंगल, विस्तीर्ण सडे व गवताळ कुरनात असंख्य प्रजातींचे वृक्ष, वेली, झुडपे, ऑर्किड्स, नेचे, बुरशी आढळतात. अभयारण्यात १५०० पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती आढळतात . भारतीय द्विपकल्पामधील प्रदेशनिष्ठ २०० प्रजाती येथील भागात आहेत . ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे हे भांडार आहे . करवंद, कारवी, निरगुडी, अडुळसा, तोरण, शिकेकाई, रानमिरी, मुरूड शेंग, वाघाटी, सर्पगंधा इ. झुडपे व वेली मोठ्या प्रमाणात आहेत . प्राणी संपदा- राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३६ प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे यापैकी संकटग्रस्त प्रजातींमध्ये वाघ, बिबळ्या तर फक्त पश्चिम घाटात आढळणारे लहान हरीण गेळा (पिसोरी) यांचा समावेश आहे . तसेच रानकुत्रा, अस्वल, गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, रानडुक्कर, साळिंदर, उदमांजर, खवलेमांजर, शेकरू, लंगूर, ससा, याच बरोबर वटवाघळांच्या तीन प्रजाती आढळतात . पक्षीविश्व - पक्षी निरीक्षणासाठी राधानगरी अभयारण्य अप्रतिम ठिकाण आहे . येथे आजमितीस २३५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे . यामध्ये ग्रेट पाईड होर्नबील, निलगिरी वूड पीजन, मलबार पाईड होर्नबील तीन प्रकारची गिधाडे या संकटग्रस्त प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश आहे . जगात फक्त पश्चिम घाटातच आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी १० प्रजातींचे पक्षी येथे आढळतात . अभयारण्यातील सांबरकोंड, कोकण दर्शन पॉईंट, सावर्दे, काळम्मावाडी धरण, उगवाई देवी मंदिर ही स्थळे पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाणे आहेत . फुलपाखरे- १२१ प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद राधानगरी अभयारण्यात करण्यात आली आहे .सदर्न बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू (१९० मी.मी.) असून ग्रास ज्युवेल हे सर्वात लहान फुलपाखरू (१५ मी.मी.) ही दोन्ही फुलपाखरे राधानगरी अभयारण्यात आढळतात . हजारोंच्या संख्येने एकत्र जमुन स्थलांतर करणारी ब्ल्यू टायगर, ग्लॉसी टाइगर, स्ट्राइप टाइगर, ही फुलपाखरे या ठिकाणी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात आढळतात . सरिसृप व उभयचर- सरिसृप गटात राधानगरी अभयारण्यात वेगवेगळ्या जातींच्या पाली, सरडे. साप - सुरळी आढळतात . उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक आढळतात . गांडूळासारखा दिसणारा देवगांडूळ (Caecilian) यासारख्या पर्यावरणात महत्वाच्या परंतु दुर्लक्षीत अशा उभयचर प्राण्यांच्या जाती येथे आढळतात . एका नव्या पालीच्या प्रजातीची पहिली नोंद राधानगरी येथेच झाली आहे . त्या पालीचे नामकरण Cnemaspis kolhapurensis करण्यात आले आहे . राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३३ प्रजातींच्या सापांची नोंद करण्यात आली आहे . ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक, एरिक्स व्हिटेकरी, पाइड बेली शिल्डटेल या सापांची नोंद येथे झालेली आहे . निसर्गात जाताना आपण निसर्गाचा एक जबाबदार घटक आहोत याची जाणीव ठेवून निसर्गाचे संतुलन बिघडू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे .- निसर्गात शिकण्यासारखे खूप आहे , त्याचा लाभ घ्या . जंगल हे प्राण्यांचे आश्रयस्थान आहे व आपण तेथील पाहूणे. तेथे मद्यपान, धुम्रपान, दंगा आदी गोष्टी करू नका. निसर्गाला स्वत:चे संगीत आहे , त्याचा आस्वाद घ्या . तेथे टेप , रेडिओ व इतर वाद्ये वाजवू नका. जंगल परिसरातील पाणवठ्याच्या जागी जास्त वेळ घालवू नका. पाणवठा दूषित होईल अशी कोणतीही कृती करू नका. वन्यप्राण्यांशी जवळीक करण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो . पक्षांची घरटी, प्राण्यांची वस्तीस्थाने इ. चा आदर करा. निसर्गात केर कचरा होइल अशा वस्तू नेऊ नका. उदा. प्लॅस्टिक कॅरी बॅग, प्लॅस्टिकच्या-काचेच्या बाटल्या, चॉकलेट -वेपर्सचे रॅपर इ. वन्यप्राण्यांना कॅमेऱ्याने टिपा बंदुकीने नको.
1 note · View note
loksutra · 3 years
Text
आजच्या मनोरंजनाच्या बातम्या: रश्मी देसाई लाल नागीनच्या भूमिकेत, रणदीप हुडा वीर सावरकरांच्या भूमिकेत
आजच्या मनोरंजनाच्या बातम्या: रश्मी देसाई लाल नागीनच्या भूमिकेत, रणदीप हुडा वीर सावरकरांच्या भूमिकेत
आजच्या मनोरंजन बातम्या: बुधवार हा मनोरंजनाच्या बातम्यांनी भरलेला दिवस आहे. कंगना रणौतचा वाढदिवस असेल तर रणदीप हुड्डाला वीर सावरकर बायोपिक मिळाला आहे. रश्मी देसाईनेही नागिनचे शूटिंग सुरू केले. ती लाल नागाच्या रुपात एंट्री घेणार आहे. त्याचप्रमाणे समंथा आणि विजयदेवर कोंडा यांच्या चित्रपटाबाबत कळले की, हा चित्रपट काश्मीर प्रश्नावर आधारित असेल. आज आम्ही तुम्हाला आजच्या 5 मोठ्या बातम्यांबद्दल सांगत…
Tumblr media
View On WordPress
0 notes