#शकतात
Explore tagged Tumblr posts
atulgaikwad7038 · 3 months ago
Text
Tumblr media
0 notes
pujajadhav55 · 8 months ago
Text
Tumblr media
0 notes
chaitanyakulkarni98 · 7 months ago
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती न��तर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिच�� धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून ��ोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मु��्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
3 notes · View notes
impossibleperfectiongarden · 9 months ago
Text
Tumblr media
काय ब्रम्हा विष्णु महेश प्रारब्धातील कर्म संपवु शकतात
पहा आज दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर उद्या सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
2 notes · View notes
khumaerbayas · 19 hours ago
Text
Kuch Karo Amit Shaha Ji , Modi Ji only International fashion show, you were always the reality The situation is concerning, and only in this grave situation, which has been ongoing for several years, can our esteemed Home Minister, Shri Amit Shah Ji, provide a solution! For the past several years, the Maharashtra Home Ministry has not made any positive decisions to address the concerns of the police, and as a result, the Maharashtra police have fallen to an even worse level than their already declining state. As the Home Minister of our country, you should either relieve Devendra Fadnavis from his responsibilities as Home Minister or take direct charge of the Home Ministry’s administration for a few years with your serious and accountable leadership. This is not just a request but a plea—because in Maharashtra, mere requests don’t work; one must plead. Why not? After all, our ruler Devendra Fadnavis wants it this way, and yes, so do his indulgent police officers. हिंदी अनुवाद: कुछ करो अमित शाह जी, मोदी जी सिर्फ अंतरराष्ट्रीय फैशन शो, आप हमेशा हकीकत थे। परिस्थिति चिंताजनक है, और केवल इस गंभीर स्थिति में, जो कई वर्षों से बनी हुई है, उसका समाधान हमारे आदरणीय गृह मंत्री श्री अमित शाह जी ही कर सकते हैं! महाराष्ट्र के गृह मंत्रालय से पिछले कई वर्षों में कोई सकारात्मक निर्णय लेकर पुलिस की शंकाओं का समाधान नहीं किया गया, और इस कारण, महाराष्ट्र पुलिस अपने निचले स्तर से भी बदतर स्थिति में आ गई है। हमारे देश के गृह मंत्री के रूप में, आप या तो देवेंद्र फडणवीस नामक गृह मंत्री को उनकी जिम्मेदारी से मुक्त करें या फिर आप स्वयं अपने गंभीर और उत्तरदायी गृह मंत्रालय के तहत कुछ वर्षों के लिए सक्रिय प्रशासन करें—यही आपसे विनती है। बल्कि, प्रार्थना है, क्योंकि महाराष्ट्र में केवल विनती से कुछ नहीं होता, प्रार्थना ही करनी चाहिए। क्यों नहीं? हमारे शासक देवेंद्र फडणवीस यही चाहते हैं, और हां, उनके वे भोगी पुलिस कर्मचारी भी यही चाहते हैं। — मराठी अनुवाद: काहीतरी करा अमित शहा जी, मोदी जी फक्त आंतरराष्ट्रीय फॅशन शो, तुम्ही नेहमीच वास्तव होते. परिस्थिती चिंताजनक आहे, आणि फक्त या गंभीर परिस्थितीत, जी अनेक वर्षांपासून सुरू आहे, तिचे निराकरण आपल्या आदरणीय गृह मंत्री श्री अमित शहा जीच करू शकतात! महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाकडून गेल्या अनेक वर्षांत कोणताही सकारात्मक नि...
0 notes
nagarchaufer · 10 days ago
Text
धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर खंडणी मागण्यासंदर्भात बैठक , मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक असा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केलेला असून ,’ धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर खंडणी मागण्यासंदर्भात बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतले तर पुन्हा सीआयडीला आदेश देऊन मुंडे यांना ते सहआरोपी करू शकतात,’  असे म्हटलेले आहे.  मनोज जरांगे म्हणाले की ,’ तो आरोपी मुंडे यांच्या प्रत्येक व्यवसायात भागीदार होता . बीड जिल्ह्यातील सर्व कामे…
0 notes
healthsinfos · 15 days ago
Text
मेडिकल रेकॉर्ड फाईल सांभाळायची आवश्यकता नाही
#ABHAapp: आपल्या आरोग्याची माहिती सुरक्षितपणे आणि सोप्या पद्धतीने व्यवस्थापित करा आधुनिक डिजिटल युगात, आपल्या आरोग्याशी संबंधित माहिती आणि डेटा योग्य पद्धतीने व्यवस्थापित करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. #ABHA App (आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट) हा एक पर्सनल हेल्थ रेकॉर्ड (PHR) App आहे, ज्याद्वारे रुग्ण त्यांच्या आरोग्याची माहिती सुरक्षित, गोपनीय आणि खाजगी वातावरणात साठवून व्यवस्थापित करू शकतात.…
0 notes
airnews-arngbad · 20 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
जागतिक अनिश्चिततेच्या काळात जगभरातील तज्ज्ञांना केवळ भारताच्या जलद विकासाची निश्चिती वाटत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान���ंच्या हस्ते आ गुवाहाटी इथं गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांविषयी आयोजित अ‍ॅडव्हांटेज आसाम शिखर परिषदेचं उद्घाटन झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते. भारतानं उद्योग सुलभतेसाठी निरंतर प्रयत्न केले आहेत. उद्योग आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी इकोसिस्टीम तयार केली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. गेल्या दशकात भारतानं पर्यावरणाप्रतीची जबाबदारी लक्षात घेत धोरणात्मक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. दोन दिवसीय शिखर परिषदेत सात मंत्रीस्तरीय आणि १४ विषयाधारीत सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रपत�� द्रौपदी मुर्मू आजपासून पाच दिवस बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रपती बिहारमधील पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी समारंभाला उपस्थित राहतील. राष्ट्रपती थोड्याच वेळात या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. उद्या मध्य प्रदेशातील छत्तरपूर मधल्या गाढा इथं बागेश्वर जनसेवा समितीच्या वतीनं आयोजित सामूहिक विवाह समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर त्या गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं आदरांजली अर्पण करून, केवडिया इथं होणाऱ्या नर्मदा आरतीमध्ये सहभागी होतील. केवडिया इथं एकता कौशल्य विकास केंद्राला राष्ट्रपती मुर्मू भेट देणार आहेत. त्यानंतर अहमदाबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या तसंच गांधीनगर मधल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. यानंतर स्मृतीवन भूकंप स्मारक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या धोलावीराला त्या भेट देणार आहेत.
****
दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज आम आदमी पक्षाच्या पंधरा आमदारांना बेशिस्त वर्तनामुळे निलंबित करण्यात आलं. निलंबित आमदारांमध्ये विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि गोपाल राय यांचा समावेश आहे. नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आज सकाळी सभागृहाला संबोधित करत असताना, मुख्यमंत्र्यांच्या दालनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रं काढून टाकल्याच्या आरोपावरून विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सभापतींनी केलेल्या आवाहनानंतरही गोंधळ सुरु राहिल्याने पंधरा आमदारांना निलंबित करण्यात आलं. दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री ��ेखा गुप्ता यांनी आज दिल्लीतील मद्यपुरवठ्यासंबंधीचा कॅगचा अहवाल सदनाच्या पटलावर ठेवला.
****
हवामान विभागानं मुंबईसह ठाणे आणि शेजारच्या जिल्ह्यांसाठी दोन दिवसांच्या उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील तापमान सदतीस ते अडतीस डिग्री अंश सेल्सिअस एवढं राहिल असं हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितलं आहे. दोन दिवसानंतर म्हणजेच २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनी घट होणार असल्याचं त्या म्हणाल्या.
****
बीड इथले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून दोन दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
****
केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून इनोव्हेट नावाचा डेटा-व्हिज्युअलायझेशन हॅकेथॉन घेण्यात येणार आहे. विकसित भारतासाठी माहिती प्रेरीत अंतर्दृष्टी ही या हॅकेथॉनची संकल्पना असेल. राष्‍ट्रीय सांख्यिकी कार्यालय-एनएसओ द्वारा निर्मित व्‍यापक अधिकृत आकडेवारीचा उपयोग करून नाविन्यपूर्ण डेटा आधारित अंतर्दृष्टी तयार करण्यासाठी विद्यार्थी आणि संशोधकांना प्रेरणा देणं हे हॅकेथॉनचं उद्दिष्ट आहे. आजपासून ३१ मार्चपर्यंत MyGov प्लॅटफॉर्मवर हे हॅकेथॉन होणार आहे. पदवी, पदव्युत्तर किंवा संशोधन करत असलेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.
****
प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्याचा उद्या महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप होत आहे. हा सोहळा नेत्रदीपक आणि अविस्मरणीय करण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. प्रयागराज मध्ये नियमित स्वच्छता केली जात असून भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात असल्याचं जिल्हाधिकारी रवींद्र कुमार मांदर यांनी सांगितलं. दरम्यान, प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ६३ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवि��्र स्नान केलं आहे. काल देशभरातून जवळपास १ कोटी भाविकांनी संगमात पवित्र स्नान केलं.
****
0 notes
gitaacharaninmarathi · 24 days ago
Text
67. संबद्ध आणि असंबद्ध
श्रीकृष्ण आपल्याला खात्री देतात की अनासक्तीने कृती केल्याने, म्हणजे आसक्ती आणि अलिप्ततेच्या पलीकडे जाऊन, व्यक्ती सर्वोच्च स्थितीला प्राप्त करतो (3.19) आणि राजा जनकाचे उदाहरण देतो, ज्याने केवळ कृतीद्वारे सिद्धी प्राप्त केली (3.20).
श्रीकृष्ण सांगतात की विलासात मग्न असलेला आणि अनेक जबाबदाऱ्या असलेला राजासुद्धा सर्व कार्ये अलिप्ततेने करून परमात्म्याला प्राप्त करू शकतो. याचा ��र्थ असा आहे की आपणही आपल्या परिस्थितीला न जुमानता याच मार्गाने सर्वोच्च स्थानी पोहोचू शकतो.
इतिहासात अशी फार कमी उदाहरणे आहेत जिथे दोन ज्ञानी व्यक्तींनी संवाद साधला असेल. असाच एक संभाषण राजा जनक आणि ऋषी अष्टावक्र यांच्यात आहे, ज्याला अष्टावक्र गीता म्हणून ओळखले जाते, जे साधकांसाठी सर्वोत्तम मानले जाते.
असे म्हणतात की एकदा एका गुरूंनी आपल्या एका शिष्याला, जो लंगोटी आणि भिक्षेची वाटी घेऊन राहत होता, राजा जनकाकडे त्याच्या शेवटच्या पाठासाठी पाठवले. तो जनकाकडे येतो आणि त्याला आश्चर्य वाटते की त्याच्या गुरूंनी त्याला या माणसाकडे का पाठवले जो ऐशोआरामात राहतो पण गुरूंच्या आज्ञेनुसार तो राजवाड्यातच राहतो. एके दिवशी सकाळी जनक त्याला आंघोळीसाठी जवळच्या नदीवर घेऊन जातो. डुबकी मारताना त्यांना बातमी मिळते की राजवाडा जळून खाक झाला आहे. विद्यार्थ्याला त्याच्या लंगोटीबद्दल काळजी वाटते तर पालक निश्चिंत राहतात. त्याच क्षणी विद्यार्थ्याच्या लक्षात आले की सामान्य लंगोटीची देखील आसक्ती आहे आणि ती सोडण्याची गरज आहे.
आसक्तीशिवाय कार्य करणे ही गीतेची मूळ शिकवण आहे. ही संबद्ध असण्याची तसेच असंबद्ध असण्याची अवस्था आहे. भौतिक जगात, एखाद्याला पूर्णपणे संबद्ध पाहिजे आणि दिलेल्��ा परिस्थितीत सर्वोत्तम कार्य करावे लागेल. त्याच वेळी, तो आंतरिकपणे असंबद्ध आहे कारण अशा कृतींचे परिणाम त्याच्यावर होणार नाहीत. परिणाम केलेल्या प्रयत्नांनुसार असू शकतात किंवा ते पूर्णपणे विरुद्ध असू शकतात आणि कोणत्याही परिस्थितीत, तो चिंतित किंवा अस्वस्थ नाही. ‘कार्य-जीवन’ संतुलन राखण्याची ही गुरुकिल्ली आहे.
1 note · View note
drasmitadongare · 1 month ago
Text
Tumblr media
गर्भवती आहात? थकवा, चक्कर येणे, त्वचा पांढरी दिसणे यांसारखी लक्षणे जाणवत आहेत का? हि अनिमियाची लक्षणे असू शकतात! क्लोव्हरलीफ स्पेशालिटी क्लिनिकमध्ये ��ज्ज्ञ निदान आणि योग्य उपचार मिळवा. आरोग्यासाठी आजच भेट द्या!
✅CLOVERLEAF SPECIALITY CLINIC, WAKAD
Address: Near Bumkar Chowk, Wakad
✅Contact us for more information & Appointment
✅CAll: +91 92268 22020/ +91 92268 22021
🌐Book an Appointment: https://www.drasmitadongare.com/book-an-appointment/
0 notes
atulgaikwad7038 · 1 month ago
Text
कोणाची भक्ती केल्याने आपले पाप नष्ट करू शकतात हे जाणून घेण्यासाठी ज्ञान गंगा पुस्तक अवश्य वाचा आणि रोज सकाळी लोकशाही चॅनलवर 5.55 ते 6.55
0 notes
kaizengastrocare · 3 months ago
Text
डिसफेजीया किंवा गिळण्या�� अडचण यांमुळे तोंडातून पोटात अन्न किंवा काही द्रव गिळण्यासाठी सामान्यपेक्षा जास्त वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. डिसफॅगियाच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणजे वेदना. क्वचित प्रसंगी गिळणेही अशक्य होऊ शकते. अधूनमधून गिळण्यात अडचण येऊ शकते जेव्हा तुम्ही झपाट्याने खाता आणि तुमचे अन्न नीट चघळत नाही, परंतु ही प्राथमिक चिंता नाही. तथापि, सतत डिसफॅगिया हे काही गंभीर वैद्यकीय स्थितीचे लक्षण असू शकते, ज्यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. डिसफेजीयाच्या संशयास्पद कारणावर अवलंबून, अन्ननलिकेच्या कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि ऍसिड रिफ्लक्स समस्या ओळखण्यासाठी एसोफेजियल मॅनोमेट्री किंवा पीएच मॉनिटरिंगसारख्या अतिरिक्त चाचण्या केल्या जाऊ शकतात. या व्हिडिओ मध्ये डॉ सम्राट जानकर आपल्याला डिसफॅगिया चे निदान कसे केले जाते याविषयी माहिती देत आहे.https://www.youtube.com/shorts/bYfuauATpzk
0 notes
svagrosolutions · 3 months ago
Text
मातीच्या आरोग्याचे महत्त्व आणि ते महत्त्वाचे का आहे
माती हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. हे वाढत्या अन्नासाठी आधार प्रदान करते, परिसंस्थांना समर्थन देते आणि ग्रहाचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जमिनीच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. निरोगी माती का आवश्यक आहे हे समजून घेणे आम्हाला तिचे संरक्षण करण्यात आणि प्रत्येकासाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यात मदत करू शकते.
मातीचे आरोग्य म्हणजे काय? मातीचे आरोग्य म्हणजे मातीची स्थिती आणि ती वनस्पती, प्राणी आणि लोकांना किती चांगल्या प्रकारे आधार देऊ शकते याचा संदर्भ देते. निरोगी माती पोषक तत्वांनी समृद्ध आहे, फायदेशीर जीवांनी परिपूर्ण आहे आणि जास्त कार्यक्षमतेने निचरा करताना पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे.
मातीचे आरोग्य महत्त्वाचे का आहे?
अन्न उत्पादनास समर्थन देते निरोगी माती झाडांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखी आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते. हे सुनिश्चित करते की पिके चांगली वाढतात, आपल्याला खाण्यासाठी निरोगी आणि पौष्टिक अन्न देतात. खराब माती आरोग्यामुळे पीक उत्पादन कमी आणि पौष्टिक अन्न कमी होऊ शकते.
पाण्याची गुणवत्ता आणि पुरवठा राखतो निरोगी माती स्पंजप्रमाणे काम करते, पावसाचे पाणी शोषून घेते आणि साठवते. हे पाणी वाहून जाण्यापासून आणि त्यासोबत मौल्यवान माती आणि पोषक द्रव्ये घेण्यास प्रतिबंध करते. हे भूजल पुनर्भरण करण्यास म��त करते आणि नद्या आणि तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करते.
हवामान बदलाचा प्रभाव कमी होतो माती कार्बन साठवते, ज्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. माती व्यवस्थापनाच्या चांगल्या पद्धती अधिक कार्बन मिळवून आणि हवेत कमी सोडून हवामान बदलाशी लढण्यास मदत करू शकतात.
जैवविविधतेला प्रोत्साहन देते निरोगी माती जीवाणू, गांडुळे आणि वनस्पतींच्या वाढीस मदत करणाऱ्या कीटकांसह जीवनाने भरलेली असते. हे जीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात, पोषक घटकांचा पुनर्वापर करतात आणि माती सुपीक ठेवतात.
मातीची धूप रोखते जोरदार पाऊस किंवा वारा असतानाही मजबूत, निरोगी माती जागीच राहते. हे शेतजमिनी, जंगले आणि नैसर्गिक परिसंस्थांचे ऱ्हास होण्यापासून संरक्षण करते. आपण मातीच्या आरोग्याचे रक्षण कसे करू शकतो? रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करा. जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी पीक रोटेशनचा सराव करा आणि कव्हर पिके वाढवा. कीटकनाशके आणि तणनाशकांचा अतिवापर टाळा. नो-टिल शेतीचा अवलंब करून मातीचा त्रास कमी करा. मातीची धूप रोखण्यासाठी झाडे आणि वनस्पती लावा. निष्कर्ष मातीचे आरोग्य ही शाश्वत भविष्याची गुरुकिल्ली आहे. हे अन्न उत्पादनास समर्थन देते, जलस्रोतांचे संरक्षण करते आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करते. आमच्या मातीची काळजी घेऊन, आम्ही केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाही - आम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करत आहोत. आपली माती निरोगी आणि समृद्ध ठेवण्यासाठी एकत्र काम करूया!
0 notes
samiksha30 · 3 months ago
Text
कबावत ब्रश: मुलांच्या कलात्मक जगासाठी परिपूर्ण साथीदार!
कला ही मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असते. त्यांना त्य���ंच्या कल्पना रंगांतून व्यक्त करता याव्यात, यासाठी योग्य साधनांची गरज असते. याचसाठी कबावत ब्रश कंपनी घेऊन येते उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वुडन फ्लॅट पेंट ब्रश, जे खास मुलांच्या कलात्मक गरजांसाठी डिझाईन करण्यात आले आहेत.
Tumblr media
मुलांच्या कला प्रकल्पांसाठी का निवडावा कबावत ब्रश?
हलका आणि सोपा वापरासाठी डिझाईनमुलांच्या छोट्या हातांना सहज वापरता येईल, असा हा ब्रश हलका व सुलभ आहे.
अचूक फिनिशप्रत्येक स्ट्रोक दमदार व पेशेवर होतो, मग तो शाळेचा प्रोजेक्ट असो वा घरी केलेला एखादा कला प्रयोग.
उत्कृष्ट गुणवत्ताकबावत ब्रश मुलांच्या चित्रांना फक्त रंगच नाही तर गुणवत्ता व टिकाऊपणाही प्रदान करतो.
Tumblr media
कला सुलभतेची नवीन व्याख्या
कबावतचे वुडन फ्लॅट पेंट ब्रश मुलांसाठी परिपूर्ण आहेत. हे ब्रश हलके, वापरण्यास सोपे, आणि सुस्पष्ट आहेत. त्यामुळे मुलं सहजपणे आपल्या कल्पना कागदावर उतरवू शकतात. शाळेच्या प्रोजेक्ट्स असोत किंवा घरी कलात्मक सराव, कबावत ब्रशने प्रत्येक स्ट्रोक दमदार आणि व्यावसायिक वाटतो.
मुलांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन द्या
आजच्या डिजिटल युगात मुलांना त्यांच्या कल्पनांना वाट मोकळी करून देणे खूप महत्त्वाचे आहे. कबावत ब्रश हे मुलांना त्यांच्या स्वप्नांना रंग देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उत्तम साधन ठरते.
संपर्क साधा
मुलांच्या कला प्रकल्पांना अधिक खास बनवा! 📞 संपर्क क्रमांक: 82096 17061 | 98218 25663 📧 ई-मेल: [email protected] 🌐 वेबसाइट: Kabawat Brush Company 📷 इंस्टाग्राम: Kabawat Brush Instagram
मुलांच्या रंगीत स्वप्नांना फुलवण्यासाठी आजच कबावत ब्रश निवडा!
Tumblr media
🛒 Shop Online: Kabawat Brush Company on IndiaMART
For more information or to request a consultation, visit their website: Kabawat Brushes Company
To stay updated with the latest posts, follow us on social media:
📸  Instagram - https://www.instagram.com/kabawatbrush/
📘  Facebook - https://www.facebook.com/kabawatbrushcompany/
📌 Pinterest - https://in.pinterest.com/kabawatb/
🧵 Thread - https://www.threads.net/@kabawatbrush
🥁 Tumblr - https://www.tumblr.com/kabawatbrush
▶�� YouTube - https://www.youtube.com/@KabawatBrushCompany
Contact: Kabawat Brush Company +91- 82096 17061  / +91- 98218 25663 https://www.indiamart.com/kabawatbrushcompany/
Digital Partner:
TVM INFOSOLUTIONS PVT LTD 
Contact: TVM Info Solutions Pvt. Ltd. 
+91-9004590039 
Follow us on Social Media 
 🌐 Website - https://tvminfo.com/
📸 Instagram - https://www.instagram.com/tvm_infosolution/
📘 Facebook - https://www.facebook.com/people/Tvm-Info-Solutions-Pvt-Ltd/61555896761755/
🔗 Linkedin - https://in.linkedin.com/company/tvminfo
▶️ Youtube - https://www.youtube.com/@tvminfosolutions
0 notes
vishnulonare · 3 months ago
Text
परमात्मा मृत्यू सुद्धा छोट्या कष्टात परिवर्तित करु शकतात. | Sant Rampal...
youtube
अवश्य ऐका सत्संग: परमात्मा मृत्यु सुद्धा छोट्या काष्टात परावर्तित करू शकतात?|Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
pandurangkoli · 3 months ago
Text
0 notes