#व्या��ार
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 15 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १५ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
राजस्थानमधल्या झूंझनू जिल्ह्यात कोलिहान खाणीत अडकलेल्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीच्या दक्षता पथकातील १५ कर्मचाऱ्यांना आज बाहेर काढण्यात यश आलं आहे. काल रात्री कर्मचाऱ्यांना खाणीत घेऊन जाणारी लिफ्ट तुटल्यामुळं हे सर्वजण खाणीत अडकले होते.
****
७७ व्या कान चित्रपट महोत्सवाला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात झाली. या महोत्सवात भारत मंडपम् या भारतीय दालनाचं उद्घघाटन आज चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवात प्रथमच “भारत पर्व”चं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये जगभरातील नामवंत मान्यवर आणि प्रतिनिधी, चित्रपटकर्मी, खरेदीदार आणि विक्री प्रतिनिधी सहभागी होत आहेत. गोव्यात येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ५५ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फीचं अधिकृत फलक आणि ट्रेलरचं अनावरण ‘भारत पर्व’ मध्ये होणार आहे.
****
भारतीय सैन्यातील माजी कर्नल वैभव काळे यांना गाझा पट्टीत रफाह इथं वीरमरण आलं. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते संयुक्त राष्ट्र-यूएनच्या सैन्यात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. त्यांचं शिक्षण नागपूर इथं झालं होतं.
****
मुंबईत घाटकोपरच्या छेडानगर इथं वादळी वाऱ्यामुळं कोसळलेल्या लोखंडी जाहिरात फलकाखाली अडकलेल्या गाड्या काढण्याचं काम बचाव पथकामार्फत आजही सुरू आहे. महाकाय फलक कोसळल्यानं त्याखाली असलेल्या वाहनांमधून इंधन गळती होत आहे, तसंच कोसळलेल्या फलका��ुळं पेट्रोल पंप प्रभावित झाल्यानं उपाययोजनेसाठीचे उपकरणं वापरण्यास अडचणी येत असून फलक हटवण्यासाठी अवजड यंत्रांचा वापर केला जात असल्याचं बचाव पथकाच्या सूत्रांनी सांगितलं.
****
घाटकोपर इथं होर्डींग दुर्घटनेनंतर नंदुरबार शहरात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नंदुरबार नगरपरिषद कार्यवाही करत आहे. शहरातील २२ खाजगी इमारतींवर होर्डींग उभारण्यात आलेले असून या सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडीट, आणि होर्डींग्ज स्थिरता प्रमाणपत्र पंधरा दिवसांच्या आत पालिकेला सादर करण्याच्या नोटीसा संबंधीतांना देण्यात आल्या आहेत. कुठेही धोकादायक किंवा विना परवानगी होर्डीग आढल्यास तात्काळ कारवाई होणार असल्याची माहीती नंदुरबार नगरपरिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठीच्या नवीन योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु आहे. शहराला येत्या डिसेंबरपासून पाणी पुरवठा केला जाणार असून याबाबतचं वेळापत्रक कंत्राटदारांनी खंडपीठात सादर केलं आहे. या अनुषंगानं औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायामुर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमुर्ती आर. एम. जोशी यांनी नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाची बिडकीन परिसरात काल पाहणी केली.
गुणवत्ता, दर्जा आणि सुरक्षेच्या दृष्टीनं जलवाहिनीच्या कामाला गती द्यावी, तसंच सर्व जलवाहिनीची कामं सुव्यवस्थित व्यवस्थापन करुनच व्हावी, अशा सुचनाही न्यायमुर्तींनी कंत्राटदारांना दिल्या आहेत.
****
धुळे लोकसभा मतदार संघात निवडणूकीसाठी मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या २०९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान केलं. उद्यापर्यंत हे टपाली मतदान करता येणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील एकूण एक हजार ९९ अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
****
दुरसंचार विभाग किंवा ट्रायकडून मोबाईल सेवा खंडित करण्याचे इशारे देणारे कॉल बनावट आहेत. दूरसंचार विभाग किंवा ट्रायनं कोणालाही अशा प्रकारचे कॉल करण्याचे अधिकार दिलेले नाहीत, असं दूरसंचार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा कॉलसंदर्भात डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट संचारसाथी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आपण सरकारी अ��िकारी असल्याचं भासवणाऱ्या आणि लोकांना फसवणाऱ्या परदेशी मूळ स्थान असलेल्या मोबाईल क्रमांकांवरून येणाऱ्या व्हॉटसअॅप कॉलबाबतही दूरसंचार विभागानं एक नियमावली जारी केली आहे.
****
मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी, ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्��वण्यात आला आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्सचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. पंजाब किंग्ज संघ आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे, तर राजस्थान रॉयल्सचं अव्वल चार संघात स्थान मिळवण्याचं लक्ष्य असेल. दरम्यान, काल रात्री दिल्ली इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा १९ धावांनी पराभव केला.
****
0 notes
Text
होटल, रेष्टुरेण्ट, खाजाघर तथा थकालीमा समेत यौ'न ध'न्दा, यस्तो अवस्थामा पक्राउ परे ८ जोडी
होटल, रेष्टुरेण्ट, खाजाघर तथा थकालीमा समेत यौ’न ध’न्दा, यस्तो अवस्थामा पक्राउ परे ८ जोडी
नेपालका अति व्यस्त मानिएका शहरमध्यको एक भक्तपुरपनि हो । यहाँ दे ह व्या ��ार फस्टाउँदै गएको खुलासा भएको छ । विभिन्न होटल, रेष्टुरेण्ट तथा खाजाघरबाट यौ न ग तिवि धि गरेको अभियोगमा प्रहरीले छा पा मा रेर १६ जनालाई नियन्त्रणमा लिएको छ ।
जानकारी अनुसार महानगरीय प्रहरी बृत्त जगातीको टोलीले पिसफुल, प्याराडाइज, कस्तुरी खाजाघर, ए–वान र थकाली खानाघरमा एकैपटक छा पा मा रे र दर्जन बढीलाई समातेको हो । अ नैति क…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 February 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि. **** १६ अब्ज ५० कोटी रूपयांच्या प्रधानमंत्री संशोधन शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीस केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी तिहेरी तलाक विरोधी विधेयक आणि राष्ट्रीय मागास आयोगाला वैधानिक दर्जा देणारं विधेयक पारित करण्यासाठी सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं विरोधी पक्षांना आवाहन तूर खरेदीच्या दर एकरी मर्यादेत वाढ; १०० टक्के क्षेत्र ग्राह्य धरणार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्याचं मुख्य��ंत्र्यांचं आश्वासन आणि भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय **** २०१८-१९ पासून सात वर्षांसाठी सुरू होणाऱ्या प्रधानमंत्री संशोधन शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीस काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. एकूण १६ अब्ज ५० कोटी रूपयांची ही योजना असून या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तीन हजार गुणवंत पदवीधारकांना भारतीय तंत्रज्ञान संस्था किंवा भारतीय विज्ञान संस्थेत पीएच डी करण्यासाठी सरळ प्रवेश दिला जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिले दोन वर्ष दर महिन्याला ७० हजार रूपये, तिसऱ्या वर्षी ७५ हजार रूपये तर शेवटच्या दोन वर्षांसाठी ८० हजार रूपये प्रतिमाह प्रधानमंत्री संशोधन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याशिवाय शोध अनुदान म्हणून पाच वर्षाच्या कालावधीत दोन लाख रूपये देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय परीषदांमध्ये शोध निबंध सादर करणे तसंच विदेशी प्रवासासाठी या अनुदानाचा उपयोग संशोधक विद्यार्थ्यांना करता येईल. देशाचा विकास आणि प्रगतीत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करण्यादृष्टीनं ही योजना आखण्यात आली असून यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. याचबरोबर २४ नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासही काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली. यासाठी १४ हजार ९३० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. **** तिहेरी तलाक विरोधी विधेयक आणि राष्ट्रीय मागास आयोगाला वैधानिक दर्जा देणारं विधेयक पारित करण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेच्या दोन��ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतांना पंतप्रधान राज्यसभेत बोलत होते. विरोधकांनी मागील अधिवेशनात हे दोन्ही विधेयकं पारित का होऊ दिली नाहीत, असा सवाल पंतप्रधानांनी यावेळी उपस्थित केला. मोदी यांनी विरोधकांनी घेतलेले आक्षेप फेटाळून लावत, आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात झालेल्या कामाचा आढावा घेतला. लोकसभेतही ��ा चर्चेला उत्तर देताना, पंतप्रधानांनी, लोकशाहीत प्रत्येकाला आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे, पण संसदेच्या कामकाजात अडथळा आणणं योग्य नसल्याचं, नमूद केलं. **** औरंगाबाद शहरात मेट्रो रेल्वे सुरु करण्याची आग्रही मागणी, खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल लोकसभेत केली. मुंबई- दिल्ली औद्योगिक मार्गिका, अजिंठा – वेरूळ लेणी, बिबिका मकबरा यासारखी प्रख्यात पर्यटन स्थळं आणि प्रमुख धार्मिक स्थळांसाठी पर्यटक मोठ्या संख्येनं औरंगाबाद शहरात येतात, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रो रेल आवश्यक असल्याचं, खैरे म्हणाले. **** तूर खरेदीची दर एकरी मर्यादा वाढवण्यात आली आहे. राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. तूर हे आंतरपीक असल्यामुळे, आतापर्यंत उत्पादकता ठरविण्यासाठी तूर पेऱ्याखाली असलेल्या क्षेत्राच्या २० टक्के क्षेत्र ग्राह्य धरण्यात येत होतं, ते क्षेत्र आता शंभर टक्के ग्राह्य धरण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले. तूर उत्पादक शेतकऱ्यांना याचा निश्चित लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. **** राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलं. मुंबईत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या, ३२ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वेतन समानीकरणासंदर्भातलं बक्षी समितीचं काम सुरू असून, समितीनं वेतन त्रुटी राहू नये म्हणून सुरू केलेल्या पोर्टलवर अधिकारी महासंघानं माहिती भरण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. निवृत्तीचं वय ५८ वरून ६० वर्ष करणं, आणि पाच दिवसांचा आठवडा याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कर्मचारी संघटनेचे नेते र. ग. कर्णिक यांना जीवनगौरव पुरस्कार, आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार दिघे यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी संदर्भात सुरू करण्यात आलेल्या पोर्टल वर संबधित अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी २८ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन माहिती सादर करण्याचं आवाहन वित्त विभागानं केलं आहे. ***** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. ***** शीख धर्मियांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंहजी यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त नांदेड इथे प्रस्तावित क्रीडा संकुलाचं आधुनिकीकरण आणि अध���यासन संकुलाच्या इमारतीसाठी केंद्र सरकारकडून ६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. **** भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेनं लातूर तालुक्यातली अकरा गावं अतिशोषित श्रेणीत मोडत असल्याबाबत अधिसूचना जारी केल्यामुळे या गावांमध्ये आता कोणत्याही प्रकारच्या विंधन विहिरींची खोदकामं करता येणार नाहीत. याशिवाय, लातूर तालुक्यातल्या सगळ्या बोअरवेल चालकांना आपल्या यंत्रसामुग्री आणि वाहनांची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं असून, विना नोंदणी खोदकाम करणाऱ्या चालकांचं साहित्य जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. **** परभणी, लातूर तसंच जालना जिल्ह्यात काल सकाळी तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यात बहुतांश भागात काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं, यामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती असून, आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वातावरणामुळे रब्बीच्या पिकावर रोग पडण्याची शक्यता असते. तर काढणीला आलेल्या द्राक्षांसाठीही हे वातावरण नुकसानदायक असल्याचं, लातूरचे द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी शिवाजीराव सोनवणे यांनी सांगितलं. मराठवाड्यासह विदर्भाच्या बहुतांशी भागात येत्या १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान गडगडाटासह वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन, राज्य शासनानं केलं आहे. **** भारताच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही क्रिकेट संघानी काल दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवला. केपटाऊन इथं झालेल्या पुरूषांच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १२४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलदांजी करत भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३०४ धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ ४० षटकात १७९ धावा करून सर्व बाद झाला. महिलांच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघानं काल दक्षिण आफ्रिकेचा १७८ धावांनी पराभव केला. भारतानं विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर ३०३ धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ ३० षटकं ५ चेंडूत केवळ १२४ धावाच करु शकला. भारताची झुलन गोस्वामी ही एकदिवसीय सामन्यात २०० बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. **** ज्येष्ठ नाट्य समीक्षक, राजा कारळे यांचं काल वृद्धापकाळानं मुंबईत निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. ‘अश्वमेध’, ‘स्टील फ्रेम’, ‘असाही एक अभिमन्यु’, ‘महापुरूष’, ‘पाषाण पालवी’ अशा पाच नाटकांचं लेखन केलं होतं. त्यापैकी पाषाण पालवी आणि महापुरूष या नाटकांना राज्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. **** ३२ व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर न भरल्यानं, त्यांचं बँक खातं गोठवण्याची कारवाई लातूर महानगर पालिकेनं केली आहे. व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर भरून महानगर पालिकेस सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त अच्युत हंगे यांनी केलं आहे. **** औरंगाबाद इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयच्या वतीनं यावर्षी घेण्यात येणार असलेली ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं काल, शहरातल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मागणी मान्य न झाल्यास, परीक्षेवर बहिष्काराचा इशारा या संघटनेनं दिला आहे. **** लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर इथला सहाय्यक कृषी अधीक्षक, बालाजी देवनुरे याला दहा हजार रुपयांची तर उस्मानाबाद इथल्या जिल्हा हिवताप कार्यालयातला अधिक्षक संदीपान पोतदार याला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. ***** ***
0 notes