#विनेश ��ोगट
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 06 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीला अमित शहा, राजनाथ सिंह आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.
दरम्यान, संयुक्त जनता दलाचे पक्षाध्यक्ष आणि अनेक नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. एनडीएच्या नेत्यांनी सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड केल्याच्या पार्श्वभुमीवर आज या बैठका होत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तातडीची बैठक आज मुंबईत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांच्यासह अन्य नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
****
राज्यात नॅनो डीएपी, नॅनो युरीया, मेटाल्डीहाईड किटकनाशकाची तिप्पट दराने खरेदी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली असून हा कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याबाबत विधानसभेत आवाज उठवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ नॅनो डीएपी आणि नॅनो युरीया खते तयार करत नाही. त्यामुळे ही खते इफको कंपनीकडून कृषी आयुक्तालय थेट खरेदी करुन शेतकऱ्यांना त्याचं वाटप करतं. तरीही कृषी आयुक्तालयाने हा निधी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला वितरीत केला असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला, त्यामुळे या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
राज्यभरातल्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर इथल्या पाणीप्रकल्पांमध्येय सर्वाधिक सरासरी ३७ पूर्णांक ६४ टक्के तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाणीप्रकल्पांमध्ये सर्वात कमी सरासरी केवळ ८ पूर्णांक ३३ टक्के इतकाच उपयुक्त पाणी��ाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत छत्रपती संभाजीनगरमध्ये ही सरासरी ३३ पूर्णांक ५५ टक्के इतकी होती.
****
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं खास आयोजन करण्यात आलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय कलादालनातही विशेष प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली असून राज्यातही ठिकठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील हरणखुरी गावात पावसाळापूर्वी नाला खोलीकरण कामाला सुरुवात झाली आहे. मागील वर्षी कमी पाऊस आणि जलसंधारणाच्या कामा अभावी गावाला पाण्याच्या टंचाईला सामोरे जावं लागलं आहे. यंदा पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत भुजगावच्या पुढाकारातून नाला खोलीकरण कामाला सुरुवात करण्यात आली असून हरणखुरी गावांत सर्व नाल्यांचं खोलीकरण केलं जाणार आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मान्सून दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग इथं कालपासून तर रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत लांजा इथं सर्वाधिक १८ पूर्णांक ८० मिलिमीटर पावसाची, तर दापोलीत १६ पूर्णांक ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात आजही सकाळी दहा वाजल्यानंतर काही वेळ पावसाची संततधार सुरू होती.
****
भारतीय नेमबाज सरबज्योत सिंगने म्युनिक इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीत ५८८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. यासह त्याने अंतिम फेरीतही धडक मारली.
****
पॅरिसमध्ये यंदा होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत आपलं स्थान निश्चित करणाऱ्या सहा भारतीय कुस्तीपटूंपैकी पाच कुस्तीपटू उद्यापासून हेंगेरीत होणाऱ्या पॉलिक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल टूर्नामेंट स्पर्धांमध्ये सहभागी होतील. या स्पर्धेत गेल्यावर्षी आशियाई खेळांमध्ये ५३ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकणारा अंतिम पंघाल, ५० किलो वजनी गटात दोनवेळची ऑलिम्पिक विजेती विनेश फोगाट, २३ वर्षाआतील ७६ किलो वजनी गटात विश्वविजेती रितिका हुडा, ५७ किलो वजनी गटात माजी आशियाई विजेती अंशू मलिक आणि पॅरिस ऑलम्पिकमध्ये राखीव गट प्राप्त करणारा एकमेव भारतीय पुरुष कुस्तीपटू अमन सहरावत या खेळाळूंचा समावेश आहे.
****
0 notes