Tumgik
#वारंवार
bharatlivenewsmedia · 2 years
Text
फोनवर वारंवार Missed Callयेत राहिले आणि बँक खात्यातून 50 लाख रुपये चोरले
फोनवर वारंवार Missed Callयेत राहिले आणि बँक खात्यातून 50 लाख रुपये चोरले
फोनवर वारंवार Missed Callयेत राहिले आणि बँक खात्यातून 50 लाख रुपये चोरले नवी दिल्ली. टेक्नोलॉजीच्या युगात जिथे बरीचशी कामे चुटकीसरशी केली जातात, त्यासोबतचे धोकेही झपाट्याने वाढत आहेत. कधी ओटीपी शेअर केल्यामुळे तर कधी पासवर्डमुळे सायबर फसवणुकीची प्रकरणे समोर येतात. पण दिल्लीत सायबर क्राईमचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दिल्लीत सुरक्षा एजन्सी चालवणारी व्यक्ती सायबर फ्रॉडची शिकार झाली.…
View On WordPress
0 notes
hari-bol · 1 year
Text
जब थी मैं तुमसे दूर,
माना भजन कीर्तन है तुम तक की डोर ;
प्रेम के शीर सागर में तर के,
समझा "मैं" हूं मात्र शून्य ;
आदी तुम अनंत तुम,
तुम ही संपूर्ण भगवन;
जब समर्पण बनेगा जीवन का आधार,
परमात्मा लगेंगे पास वारंवार ||
Tumblr media
6 notes · View notes
drsamratjankar12 · 3 days
Text
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते.
0 notes
kaizengastrocare · 4 days
Text
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते. https://www.kaizengastrocare.com/
0 notes
6nikhilum6 · 16 days
Text
Pimpri : मोशी, चिखली, तळवडे परिसरात खंडीत वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण
एमपीसी न्यूज – मोशी, चिखली, तळवडे, सोनवणे वस्ती आदी (Pimpri) परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील लघुउद्योजक, छोटे दुकानदार आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोशी, चिखली, तळवडे, वस्ती सोनवने आदी परिसरामध्ये लघुउद्योजकांचे कारखाने, वर्कशॉप आहेत. येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्यांना वेळेत काम पूर्ण करण्यात समस्या येत आहेत. कामामध्ये…
0 notes
airnews-arngbad · 21 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या ५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं पटकावलं सुवर्ण पदक, पदकांची संख्या २६ वर
****
जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून, पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे सूरत इथं, जल संचय जन भागीदारी, या अभियानाचा प्रारंभ आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केला, त्यावेळी ते बोलत होते. भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं असून, पाण्याच्या साठवणीच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती भारतात परंपरेनं विकसित झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई या समस्यांवर जल संचयानेच तोडगा निघू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीत शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांशी संवाद साधला. मातृभाषेतून शिक्षण घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावावर पंतप्रधानांनी यावेळी चर्चा केली.
****
नुकत्याच संपलेल्या ऑगस्ट महिन्यात देशभरात चाळीस लाखांहून अधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे देशातल्या डिमॅट खात्यांची संख्या १७ कोटी १० लाखांवर पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात बाजारात विक्रमी संख्येनं आय पी ओ दाखल झाले आणि विविध कंपन्यांनी त्यांच्या माध्यमातून सुमारे १७ हजार कोटी रुपयांचं भांडवल उभारण्याचा मार्ग निवडला, त्यामुळे डिमॅट खात्यांमध्येही वाढ झाली, असं सेबीनं सांगितलं.
****
देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२ पूर्णांक ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यात २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली असल्याचं, त्यांनी आज समाजमाध्यमावरील संदेशात सांगितलं. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर हजार सातशे पंच्याणव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून, तिथं १९ हजार ५९ कोटी तर दिल्ली राज्यात १० हजार ७७८ कोटी इतकी गुंतवणूक झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद केली असून, या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जनसन्मान यात्रेत ते आज बोलत होते. सरकारने विविध समाजांसाठी तसंच महिला आणि मुलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. भारतीय संविधान हे कुणीही बदलू शकत नाही, असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं.
****
पंचायत समितीच्या इमारती ग्रामीण विकासाच्या केंद्रबिंदू आहेत, या विकासाच्या मंदिराचं पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिलह्यातल्या राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते आज बोलत होते. राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात नवी पहाट आणणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे, असं विखे पाटील म्हणाले.
आमदार पंकजा मुंडे, आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणंघेणं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचाही अधिकार नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना, राज्यात अशांतता पसरवण्याचा महाविकास आघाडीचा कट आहे, अशी टीका त्यांनी केली.
****
निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचं आश्वासन देऊन भारतीय जनता पक्ष महिलांची फसवणूक करत असल्याची टीका, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महागाईमुळे सण, उत्सावाचा रंग फिका पडला असून, जनता त्रस्त आहे, म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी महिला काँग्रेस राज्यभरात ‘खर्चे पे चर्चा’ अभियान राबवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात युती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना सुरु केल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर टीका केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरु केलेली ही योजना असून, त्यांना राजकीय फायदा घ्यायचा असल्याचं त्या म्हणाल्या. केंद्रीय संस्थांची भिती दाखवत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलं, मात्र, महायुतीमध्ये प्रचंड अडचणी असल्यामुळे हे सरकार पडेल, असं मत सुळे यांनी व्यक्त केलं.
****
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्या सर्वत्र श्री गणेशाची स्थापना होणार असून, गेल्या दोन दिवसांपासूनच अनेक ठिकाणी गणेश मूर्तींचं आगमन होत आहे. तसंच गणरायाचं स्वागत करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. उत्सवासाठी आवश्यक सामानानं सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असून भाविकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्यात विविध ठिकाणी पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त स्पर्धेसारख्या अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बचत गटांमार्फत गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याची विक्री केली जात आहे.
****
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसर्या टप्प्याअंतर्गत राज्यात नऊ हजार २०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यापैकी तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या धोंदलगाव इथं कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे एक हजार ७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार असल्याचं, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात पूर प्रभावित गावांमध्ये साथ रोग पसरणार नाही यासाठी जिल्हा आरोग्य विभाग विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात २८ गावं पूर प्रभावित झाली होती. या गावामध्ये आता आरोग्य सेवा सुरळीत राहावी, साथ रोग पसरू नये, यासाठी विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. घरोघरी आरोग्य सेवकांमार्फत सर्वेक्षण केलं जात असून, ज्या ठिकाणी डासांची घनता जास्त आहे, तिथे घरामध्ये फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत किनवट पोलिसांनी आज १३ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत २० लाख ३८ हजारांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
****
भंडारा पोलिसांनी देखील काल मध्यरात्री केलेल्या एका कारवाईत १६७ किलो गांजा पकडला. याप्रकरणी एका चारचाकीसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यात आडोळी ते वाळकी दरम्यान असलेल्या ३५ टोलवरची १८० मीटर विद्युत तार चोरणाऱ्या ४ चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आज पोलिस प्रशासनाने माध्यमांना माहिती दिली. हिंगोली रस्त्यावरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या घरकुलातून चारचाकी वाहन आणि मुद्देमालासह एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतलं हे भारताचं सहावं सुवर्ण पदक आहे.
नौकायन स्पर्धेत भारताचे यश कुमार आणि प्राची यादव उपान्त्य फेरीत पोहोचले आहेत. महिलांच्या २०० मीटर टी - 12 धावण्याच्या शर्यतीत सिमरन शर्माने देखील उपान्त्य फेरीत प्रवेश मिळवला. पुरुषांच्या ४०० मीटर टी - 47 स्पर्धेत दिलीप गावितनं अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत भारत सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि ११ कांस्य पदकांसह एकूण २६ पदकं जिंकून पदकतालिकेत १७ व्या स्थानावर आहे.
****
२० वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरवालने सुवर्णपदक पटकावलं आहे. स्पेनमधे पोंतेवेद्रा इथं ही स्पर्धा झाली.
****
गुजरात इथं झालेल्या योनेक्स सनराइज् पश्चिम विभागीय अंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत संभाजीनगरच्या सोनाली मिरखेलकर हीनं महिला दुहेरी गटात सुवर्णपद पटकावलं, तर मिश्र खुल्या गटात उपविजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे.
****
0 notes
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media
सोयाबीन, कापूस, तूर,हरभरा,भात,मका, ज्वारी व ऊस या प्रमुख पिकांवर वारंवार तसेच आकस्मिकरीत्या उद्भवणाऱ्या कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान व त्यामुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेता यासाठी रोग सर्वेक्षण,सल्ला,जन जागृती व व्यवस्थापन याबाबतची शाश्वत यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीने “पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (cropsap )” राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत देगलूर उपविभागस्तरीय क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन आज उद्यमिता लर्निंग सेंटर, सगरोळी येथे करण्यात आले होते. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्यावेता प्रा.कपिल इंगळे यांनी कापूस, सोयाबीन, तूर पिकातील उत्पादन वाढीच्या महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन केलं. डॉ.कृष्णा अंभुरे यांनी कीड व रोगांची ओळख व त्याचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर संवाद साधला. तर प्रा.व्यंकट शिंदे यांनी सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी करावयाची कामे यावर मार्गदर्शन केले तर कृषी विभागाचे तंत्र सहाय्यक श्री.तपासे यांनी क्राॅपसॅप ॲप च्या वापरा बाबत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री.भाऊसाहेब बह्राटे,उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर श्री अनिल शिरफूले, तालुका कृषी अधिकारी बिलोली, देगलूर व धर्माबाद यांच्यासह कृषी विभागातील १२० कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. #cropsap #क्राॅपसॅप #app #सोयाबीन #कापूस #तूर #Agriculture #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #nanded
0 notes
gitaacharaninmarathi · 2 months
Text
31. कर्मयोगात कमी कष्टाने मोठा लाभ       
श्री कृष्ण आश्वासन देतात की कर्मयोगाचे थोडेसे साधन देखील परिणाम देते आणि हा धर्म आपल्याला मोठ्या भीतीपासून वाचवतो (2.40). लक्षात घेण्यासारखे आहे की सांख्ययोग हा शुद्ध जागृती आहे, तर कर्मयोगासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
आपला आध्यात्मिक प्रवास नुकताच सुरू केलेल्या आणि हे प्रयत्न अत्यंत कष्टदायक वाटणार्‍या भक्तांना भगवान श्रीकृष्ण हे आश्वासन देतात. श्रीकृष्णाला आपल्या अडचणी माहिती आहेत आणि तो खात्री देतो की लहानसा प्रयत्नही मोठे परिणाम घडवून आणू शकतो. निष्काम कर्म आणि समत्वाचा मार्ग अवलंबण्यासाठी तो आपल्याला प्रोत्साहन देतो.
एक मार्ग म्हणजे श्रीकृष्ण ने सांगितलेल्या भक्तीने कर्मयोगाचा अभ्यास सुरू करणे. कालांतराने, जसे आपण कर्मयोगाच्या दृष्टीकोनातून आपले अनुभव पाहण्याचा सराव करतो, तेव्हा आपण आपल्या अंतरंगात पोहोचेपर्यंत आपले अनुभव अधिक सखोल होत जातात.
आणखी एक मार्ग म्हणजे आपली भीती समजून घेणे आणि ती घालविण्यासाठी कर्मयोगाचा सराव कसा करायचा हे समजून घेणे. आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष जग यांच्यातील फरक म्हणजेच भीतीचा गाभा असतो. कर्मयोग आपल्याला निष्काम कर्माबद्दल शिकवतो ज्यामुळे आपल्या कृतींमधून अपेक्षांना वगळणे आपल्याला शक्य होते. त्याने आपल्यातील भीतीही कमी होते.
रडरला लावलेल्या ट्रीम टॅबवर लहानसा अंतर्गत जोर लावलेला असतानाही पाण्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे चालत्या जहाजाला आपली दिशा बदलण्यात मदत होते. त्याचप्रमाणे आतून योग्य दिशेने केलेला छोटासा प्रयत्न ब्रह्मांडाच्या सद्गुणामुळे मोठा बदल घडवून आणू शकतो, आपल्यासाठी कर्मयोग करण्याचा मार्ग मोकळा करतो.
लहान असताना जोपर्यंत आपण चालायला आणि धावायला शिकलो नाही आपण कधीही प्रयत्न सोडले नाहीत. ते काही सोपे काम नव्हते. त्याचप्रमाणे, कर्मयोगावर प्रभुत्व मिळविण्यासाठी वारंवार प्रयत्न केल्यास लहान पण निश्चित अशा विजयांची एक मालिकाच आपल्याला अनुभवावयास मिळेल.
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
Text
इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे काय? काय आहेत उपचार (What is Erectile Dysfunction in marathi)
Tumblr media
इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजे काय? What is erectile dysfunction?
इरेक्टाइल डिसफंक्शन (ED) म्हणजेच, जेव्हा एखाद्या पुरुषाला लैंगिक संबंधादरम्यान लिंगाला इरेक्शन (Erection) मिळवणे किंवा टिकवणे कठीण होते. ही समस्या अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकते, आणि ती कोणत्याही वयाच्या पुरुषांना होऊ शकते, जरी ती 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे. इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile Dysfunction) कधीकधी होणे सामान्य असू शकते, परंतु जेव्हा ही समस्या वारंवार घडू लागते, तेव्हा ती चिंता करणारी ठरते आणि उपचार गरजेचे होतात.
इरेक्शन म्हणजे काय? What is an erection?
जेव्हा एखाद्या पुरुषाला लैंगिक उत्तेजना (सेक्श्युअल अराउजल) होते, तेव्हा लिंगातील रक्तप्रवाह वाढतो. लिंग ‘कॉर्पस कॅव्हर्नोसम’ नावाच्या ऊतींनी बनलेले असते. येथील रक्तप्रवाह वाढल्यामुळे सैल ऊती (spongy tissue) शिथिल होतात आणि इरेक्शन (Erection) होते. हे सामान्यतः आनंददायी अनुभव असते आणि ते संपूर्ण शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
इरेक्टाइल डिसफंक्शन चे कारणे Causes of Erectile Dysfunction
इरेक्टाइल डिसफंक्शन चे अनेक कारणे असू शकतात. चला त्यापैकी काही महत्वाची कारणे समजून घेऊयात:
शारीरिक कारणे
हृदय रोग: हृदयाच्या समस्यांमुळे रक्त प्रवाह कमी होतो, ज्यामुळे लिंगाला पुरेसा रक्त मिळत नाही. हृदयविकार, उच्च रक्तदाब, आणि अजीर्ण झालेल्या रक्तवाहिन्यांमुळे रक्त प्रवाहात अडथळा येतो.
मधुमेह: मधुमेहामुळे नसांमध्ये आणि रक्त वाहिकांमध्ये नुकसान होऊ शकते, ज्यामुळे इरेक्शन मिळवणे कठीण होते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन ED चे प्रमाण जास्त असते.
लठ्ठपणा: जास्त वजनामुळे हार्मोनल असंतुलन आणि रक्त प्रवाहात अडथळा येऊ शकतो. लठ्ठपणा आणि तणाव यांमुळे ED ची शक्यता वाढते.
हार्मोनल असंतुलन: कमी टेस्टोस्टेरोन पातळीमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. हार्मोनल समस्या शरीरातील इतर कार्यांवर देखील प्रभाव टाकू शकतात.
मज्जातंतूंचे विकार: मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रोक, आणि पाठीच्या कण्याच्या दुखापतींमुळे ED होऊ शकते. पेल्विक शस्त्रक्रियेमुळे मज्जातंतूंना दुखापत झाल्यास इरेक्शनमध्ये अडचण येऊ शकते.
मानसिक कारणे
तणाव आणि चिंता: मानसिक तणाव आणि चिंता मुळे मेंदू योग्य संकेत पाठवू शकत नाहीत. मानसिक तणावामुळे मेंदू आणि शरीरात इरेक्शनला आवश्यक असलेल्या संकेतांचे योग्य संप्रेषण होत नाही.
डिप्रेशन: अवसादामुळे लैंगिक इच्छेत कमी आणि इरेक्शनमध्ये अडचण येऊ शकते. डिप्रेशन मुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो, ज्यामुळे सेक्समध्ये रुची कमी होते.
नात्यातील समस्या: नात्यात तणाव असल्यामुळे इरेक्शन समस्या होऊ शकते. वैवाहिक तणाव, भांडण, आणि नात्यातील अविश्वास यांमुळे ED चे लक्षणे वाढू शकतात.
लैंगिक कार्याविषयी चिंता: लैंगिक परफॉर्मन्सविषयी चिंता किंवा अपेक्षांमुळे मानसिक तणाव वाढू शकतो.
जीवनशैलीतील कारणे
धूम्रपान: धूम्रपानामुळे रक्त वाहिकांमध्ये अडथळा येतो. धूम्रपान केल्याने रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे इरेक्शन समस्या होऊ शकते.
अत्यधिक अल्कोहोल सेवन: जास्त मद्यपानामुळे इरेक्शन समस्या होऊ शकते. अल्कोहोल सेवनामुळे हार्मोनल असंतुलन आणि मानसिक तणाव वाढू शकतो.
शारीरिक गतिविधीची कमी: व्यायाम न केल्यामुळे शरीराची संपूर्ण आरोग्य कमी होते, ज्यामुळे इरेक्शनमध्ये अडचण येऊ शकते. शारीरिक गतिविधी कमी असल्यामुळे वजन वाढते, रक्त प्रवाह कमी होतो, आणि हार्मोनल असंतुलन होते.
अन्न आणि आहारातील त्रुटी: अयोग्य आहारामुळे शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमी होऊ शकते.
इरेक्शन समस्या कोणाला होऊ शकते? Who can have erection problems?
इरेक्शन समस्या कोणालाही होऊ शकते, परंतु काही विशिष्ट गटांमध्ये ती अधिक सामान्य असते:
40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पुरुष: वयोमानानुसार इरेक्शन समस्या वाढू शकते.
मधुमेह किंवा हृदयरोग असलेले पुरुष: यांत्रिक कारणांमुळे इरेक्शन समस्या होऊ शकते.
मानसिक तणाव आणि चिंता अनुभवणारे पुरुष: मानसिक कारणांमुळे शॉर्ट टर्म इरेक्शन समस्या येऊ शकते.
हार्मोनल असंतुलन असलेले पुरुष: हार्मोनल समस्या असलेल्या पुरुषांमध्ये ED ची शक्यता वाढते.
जननेंद्रियांची सर्जरी झालेली पुरुष: सर्जरीमुळे मज्जातंतूंना आणि रक्तवाहिन्यांना नुकसान होऊ शकते.
धूम्रपान करणारे पुरुष: धूम्रपानामुळे रक्त प्रवाहात अडथळा येतो, ज्यामुळे ED होऊ शकते.
अल्कोहोल चे सेवन करणारे पुरुष: अत्यधिक अल्कोहोल सेवनामुळे हार्मोनल असंतुलन होते.
इरेक्टाइल डिसफंक्शन चे लक्षणे (Symptoms of Erectile Dysfunction)
इरेक्टाइल डिसफंक्शन ची मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
इरेक्शन मिळवण्यात अडचण: सेक्स दरम्यान लिंग ताठ होण्यात अडचण येणे.
इरेक्शन टिकवण्यात अडचण: इरेक्शन झाल्यावर ते टिकवता न येणे.
लैंगिक इच्छेत कमी: लैंगिक इच्छेत कमी होणे.
लैंगिक संतोषात कमी: सेक्स दरम्यान आनंद कमी होणे.
आत्मविश्वास कमी होणे: इरेक्शन समस्या असल्यामुळे आत्मविश्वास कमी होणे.
इरेक्शन समस्येचे निदान (Diagnosis of erection problems)
इरेक्शन समस्येचे निदान करण्यासाठी डॉक्टर खालील चाचण्या करतात:
शारीरिक परीक्षण: लिंग, अंडकोष आणि नसांच्या उत्तेजनेची तपासणी.
रक्त तपासणी: मधुमेह, हार्मोनल असंतुलन आणि हृदय रोगांची तपासणी.
यूरिन टेस्ट: मधुमेह आणि इतर संबंधित समस्यांची तपासणी.
अल्ट्रासाऊंड (Sonography): रक्त प्रवाहाची तपासणी.
मनोवैज्ञानिक परीक्षण: तणाव, चिंता आणि अवसादाची तपासणी.
पेनाइल रिगिडिटी चाचणी: लिंगाच्या कठोरतेची तपासणी.
इरेक्टाइल डिसफंक्शन चे उपचार (Treatment of erectile dysfunction)
इरेक्टाइल डिसफंक्शन च्या उपचारांचे पर्याय अनेक आहेत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात:
औषधोपचार
ओरल मेडिकेशन: सिल्डेनाफिल (वियाग्रा), टेडलाफिल (सियालिस), वार्डनफिल (लेविट्रा) यासारखी औषधे घेतल्याने रक्त प्रवाह सुधारतो.
हार्मोनल उपचार: टेस्टोस्टेरोन रिप्लेसमेंट थेरपी.
मनोवैज्ञानिक सल्ला
मनोवैज्ञानिक सल्ला आणि काउंसलिंग: मानसिक कारणांमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन झाल्यास, सल्लामसलत करणे फायद्याचे ठरते. मानसोपचार आणि सल्लामसलतीने मानसिक तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.
जीवनशैली बदल
स्वस्थ आहार आणि नियमित व्यायाम: शरीराची संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी.
धूम्रपान आणि अल्कोहोल चे सेवन कमी करणे: रक्त प्रवाह सुधारण्यासाठी.
सर्जिकल पर्याय
पेनाइल इम्प्लांटेशन: लिंगात इम्प्लांटेशन करून इरेक्शन सुधारण्यासाठी. पेनाइल इम्प्लांटेशनमध्ये लिंगात एक उपकरण बसवले जाते, जे रक्त प्रवाह वाढवते आणि इरेक्शन सुधारते.
इरेक्टाइल डिसफंक्शन चे व्यवस्थापन (Management of erectile dysfunction)
इरेक्टाइल डिसफंक्शन चे व्यवस्थापन करण्यासाठी खालील उपाययोजना करू शकता:
नियमित व्यायाम
कार्डियो व्यायाम: दररोज चालणे, धावणे, पोहणे, आणि सायकल चालवणे. कार्डियो व्यायामामुळे रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे इरेक्शन सुधारते.
शक्ती प्रशिक्षण: नियमित शक्ती प्रशिक्षण करून मांसपेशींना ताकद मिळवणे. शक्ती प्रशिक्षणामुळे हार्मोनल संतुलन सुधरते आणि आत्मविश्वास वाढतो.
स्वस्थ आहार
फल आणि सब्जियां: ताज्या फळांचे आणि भाज्यांचे सेवन. फळे आणि भाज्यांमध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारते.
पूर्ण अनाज: ब्राउन राइस, ओट्स, आणि होल व्हीट ब्रेड चे सेवन. पूर्ण अनाजामुळे ऊर्जा वाढते आणि वजन नियंत्रित राहते.
प्रोटीन युक्त आहार: चिकन, मछली, अंडे, आणि नट्स चे सेवन. प्रोटीनयुक्त आहारामुळे मांसपेशींना ताकद मिळते आणि हार्मोनल संतुलन सुधारते.
तणाव व्यवस्थापन
योग आणि ध्यान: मानसिक शांती आणि तणाव कमी करण्यासाठी. योग आणि ध्यानामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि मानसिक शांती मिळते.
मनोरंजन गतिविधी: आपल्या आवडीच्या शौक आणि गतिविधींमध्ये भाग घेणे. मनोरंजन गतिविधींमुळे मानसिक तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.
धूम्रपान आणि अल्कोहोल चे सेवन कमी करणे
धूम्रपान सोडणे: रक्त प्रवाह सुधारण्यासाठी. धूम्रपान सोडल्याने रक्त प्रवाह सुधारतो आणि इरेक्शन समस्या कमी होते.
अल्कोहोल चे सेवन सीमित करणे: इरेक्शन सुधारण्यासाठी. अल्को��ोल चे सेवन कमी केल्याने हार्मोनल संतुलन सुधारते आणि मानसिक तणाव कमी होतो.
इरेक्टाइल डिसफंक्शन साठी घरगुती उपाय (Home Remedies for Erectile Dysfunction)
काही घरगुती उपाय देखील इरेक्टाइल डिसफंक्शन मध्ये मदत करू शकतात:
तरबूज: तरबूज मध्ये सिट्रुलाइन नावाचे एमिनो एसिड असते, जे रक्त प्रवाह सुधारते.
पपीता: पपीता मध्ये पोषक तत्व असतात जे धमन्यांना फुलवतात.
लसूण: लसूण खाल्ल्याने रक्त प्रवाह सुधारतो.
बदाम: बदाम मध्ये व्हिटॅमिन ई असते, जे यौन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
जिंजर: अद्रक खाल्ल्याने रक्त प्रवाह सुधारतो.
इरेक्टाइल डिसफंक्शन बद्दल काही तथ्ये (Some facts about erectile dysfunction)
इरेक्टाइल डिसफंक्शन बद्दल काही रोचक तथ्ये खालीलप्रमाणे आहेत:
सर्वात सामान्य लैंगिक समस्या: इरेक्टाइल डिसफंक्शन ही सर्वात सामान्य लैंगिक समस्या आहे.
प्रत्येक वयात होऊ शकते: इरेक्टाइल डिसफंक्शन कोणत्याही वयात होऊ शकते, जरी ती वृद्ध पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे.
मानसिक आणि शारीरिक कारणे: इरेक्टाइल डिसफंक्शन चे कारणे मानसिक आणि शारीरिक दोन्ही असू शकतात.
उपचार करण्यायोग्य आहे: योग्य निदान आणि उपचारांद्वारे इरेक्टाइल डिसफंक्शन ची समस्या सहजतेने दूर होऊ शकते.
इरेक्टाइल डिसफंक्शन आणि नात्यातील तणाव (Erectile dysfunction and relationship stress)
इरेक्टाइल डिसफंक्शन मुळे नात्यातील तणाव वाढू शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊयात:
नात्यातील तणावाचे कारणे
संवादाची कमी: इरेक्शन समस्या असल्यास, संवाद कमी होतो आणि तणाव वाढतो.
स्वत:वरील अविश्वास: इरेक्शन समस्या असल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो.
तणाव आणि चिंता: इरेक्शन समस्या मुळे तणाव आणि चिंता वाढते.
नात्यातील तणावाचे व्यवस्थापन
खुला संवाद: नात्यात संवाद ठेवणे महत्वाचे आहे.
मनोवैज्ञानिक सल्ला: मनोवैज्ञानिक सल्लामसलत करणे फायद्याचे ठरते.
एकमेकांना समर्थन: एकमेकांना समर्थन देणे महत्वाचे आहे.
निष्कर्ष (Conclusion)
इरेक्टाइल डिसफंक्शन एक सामान्य समस्या आहे ज्याचा इलाज योग्य निदान आणि उपचारांद्वारे केला जाऊ शकतो. योग्य जीवनशैली, स्वस्थ आहार, आणि चिकित्सा उपचारांद्वारे ही समस्या सहजतेने दूर होऊ शकते. जर तुम्हाला इरेक्टाइल डिसफंक्शन ची लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य उपचारांमुळे नक्कीच तुमचे लैंगिक आरोग्य सुधारेल आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वास मिळेल. इरेक्टाइल डिसफंक्शन ची समस्या सोडवण्यासाठी, तणाव व्यवस्थापन, योग्य आहार, आणि नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील.
0 notes
sanjay-ronghe-things · 5 months
Text
शोध
जिथे तिथे मी थोर शोधतोकोण कुठला चोर शोधतो । नाही इथला सारे परकेकाल होता तो पोर शोधतो । निसटून जातो वारंवार तोबांधून ठेवण्या दोर शोधतो । ताकद त्याची भरी भरकमहवा तितका मी जोर शोधतो । कठीण आहे ते सारे कळलेथोर सोडून मी ढोर शोधतो ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhadalottery2023 · 7 months
Text
संतप्त गिरणी कामगार युनियनची १८ मार्च रोजी संयुक्त बैठक I mhada lottery 2023 mumbai
म्हाडाच्या मुंबई विभागाने कोन, पनवेल येथे गिरणी कामगारांच्या mhada lottery 2023 mumbai घरांसाठी प्रतिवर्षी तब्ब्ल ४२,१३५ रुपये सेवा शुल्क आकारले आहे.सेवा शुल्क परवडणारे नसल्याने ते कमी करावे, अशी मागणी विजेत्या मिल कामगारांकडून वारंवार केली जात आहे. या मागणीसाठी गिरणी कामगारांच्या वारसांनी मंगळवारी म्हाडा भवनावर मोर्चा काढला होता . मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nirannjan17 · 7 months
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या ���दारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
Tumblr media
रक्तक्षय म्हणजे शरीरात रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या कमी होणे. यामुळे थकवा, चक्कर, वारंवार आजारी पडणे, केसगळती, भूक न लागणे, निस्तेज त्वचा आणि दम लागणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. आयुर्वेदिक औषधे आणि आहाराद्वारे रक्तक्षयावर उपचार करणे शक्य आहे.
अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा!
https://www.kalpataru-ayurved.com/
0 notes
Text
वारंवार होणाऱ्या ​​उलट्यांचा त्रास १ झटक्यात पळवून लावा
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेपाला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
तांत्रिक अडचणींमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा ई-पॉस मशीनला विरोध
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडचा अविनाश साबळे तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत, पुरुष हॉकी संघाची उपान्त्य फेरीत आज जर्मनीविरुद्ध लढत 
****
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने'च्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ही योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत, नवी मुंबईतले चार्टर्ड अकाऊंटंट नावेद मुल्ला यांनी या योजनेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र ही योजना म्हणजे सरकारनं अर्थसंकल्पाच्या अंतर्गत घेतलेला निर्णय आहे, त्याला आव्हान कसं देता येईल, असं म्हणत न्यायालयानं कालच्या सुनावणीत ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या योजनेअंतर्गत १४ ऑगस्टला मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याबद्दल महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी न्यायालयाचे ट्विटरवरून आभार मानले आहेत. केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेलं आव्हान न्यायालयाने फेटाळल्यानं या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, महिला बचतगटांसाठीच्या यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काल तटकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झालं. महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे, यामुळे महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होईल, असं त्या म्हणाल्या.
****
शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन केलं जाणार असल्याचं, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल राज्यसभेत सांगितलं. यासाठी शेतकऱ्यांना आधारच्या धर्तीवर डिजिटल ओळखपत्र दिलं जाणार असून, दरवर्षी पेरणीनंतर धान्याची उगवण झाल्यावर त्याची चित्रफीत संरक्षित केली जाईल. आणि नुकसान झाल्यास, पात्रतेनुसार भरपाई दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. शेतीचे लाभ वाढवण्यासाठी विविध विभागांच्या एकीकृत सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात असल्याचंही चौहान म्हणाले.
****
पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. पूरबाधित घरांचा प्रश्न मार्गी लावण्याकरता नवीन विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात येईल, घरांच्या पुर्नविकासासाठी कायद्यात तसंच नियमातही बदल करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणाची पाणी पातळी १५०० फुटांवर पोहोचली आहे. धरणातला जिवंत पाणीसाठा ३२३ पूर्णांक १८८ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. धरणामध्ये सध्या ६६ हजार ३६७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल विधानसभेसाठी मुंबईतल्या शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रेदरम्यान काल सोलापूर इथं त्यांनी ही घोषणा केली.
****
स्वस्त धान्य दुकानदारांनी काल ई पॉस मशीनच्या वापराविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत या मशीन प्रशासनाकडे जमा केल्या.
जालना शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसील कार्यालयात या मशीन जमा केल्या. इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद होतात, त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटपाची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मंठा, बदनापूर, परतूर या ठिकाणीही स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन प्रशासनाला परत केल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. इंटरनेट सेवा खंडीत होत असल्याने, धान्य असूनही त्याचं वितरण करता येत नाही, त्यामुळे ऑफलाईन पद्धत धान्य वितरणासाठी योग्य असल्याचं दुकानदारांनी सांगितलं.
परभणी शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
****
पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातून दीडशे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी आपल्याकडे प्राप्त झाली आहे, ही यादी आपण शासनाकडे पाठवली असून, त्यांच्याविरोधात कडक कारवाईची गरज, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. काल हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेच्या आगामी निवडणुका शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावर लढवणार असल्याचं कडू यांनी यावेळी सांगितलं.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडच्या अविनाश साबळेनं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा अविनाश, हा पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे. आठ ऑगस्ट रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वी, टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ आज उपांत्य फेरीत जर्मनी विरुद्ध खेळणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा पहिल्या फेरीसाठी मैदानात उतरेल. तर महिला कुस्तीपटू विनेश फोगट आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पुरुष टेबल टेनिसमध्येही आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. दरम्यान, काल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठीच्या लढतीत पराभव झाला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसची 'जनसन्मान' यात्रा येत्या आठ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी इथून सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात्रेचा पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा असून, हा टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त अर्जांची ऑनलाईन छाननी प्रक्रिया लातूर जिल्ह्यात सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येक तालुकास्तरावर छाननी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर पंचायत समिती इथं आयोजित शिबिराला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, 'माझं लातूर, हरित लातूर' अभियानाअंतर्गत काल लातूर तालुक्यातल्या नागझरी ग्रामपंचायतीच्यावतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ५१ बेल वृक्षांची लागवड करण्यात आली.
****
दूध भेसळखोरांविरोधात विरोधात मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या रविवारी कडा परिसरात झालेल्या भेसळखोरांवर कडक कारवाई व्हावी, असंही ते यावेळी म्हणाले. सरकारने राज्यातल्या दूध देणार्या जनावरांचा, किती लिटर दूध दररोज जमा होतं याचं सर्वेक्षण करावं, जेणेकरुन भेसळखोरांवर आळा बसेल, अशी मागणीही धस यांनी यावेळी केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून एक तास शहरासाठी हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. या अभियानात काल पैठण गेट ते गुलमंडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. फेरीवाले, रिक्षाचालक तसंच विविध संघटना तसंच स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे पंधरा हजार विद्यार्थी या मोहिमेत श्रमदान करणार आहेत.
****
भगवंत देशमुख विशेष वाङ्गमय पुरस्कार दैवतांची सत्यकथा या ग्रंथासाठी यवतमाळ इथले डॉ. अशोक राणा यांना प्रदान करण्यात आला. कुमार देशमुख नाट्य पुरस्कार ऋग्वेदातील नाट्यसंहिता या ग्रंथासाठी लक्ष्मीकांत धोंड यांना, तर कुसुतमाई देशमुख काव्य पुरस्कार हंबरवाटा या काव्यसंग्रहासाठी गंगापूर इथले संतोष आळंजकर यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या या कार्यक्रमात मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे यावेळी उपस्थित होते.
****
धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत २१ वा पशुगणना कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १११ प्रगणक आणि २६ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातले शेतकरी-पशुपालकांनी पशुधनाची माहिती देऊन सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
0 notes