#लोककला
Explore tagged Tumblr posts
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की ��ुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्��न काय सांगावं !
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले कि��वा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दी��ाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
मधुबनी पेंटिंग - मिथिला का गौरव
मधुबनी पेंटिंग – मिथिला का गौरव – मिथिला या मधुबनी पेंटिंग भारत की एक पारंपरिक लोककला है, जो मुख्यतः बिहार तथा नेपाल के मिथिला क्षेत्र में प्रचलित है। यह कला सरल लेकिन गहरी भावनाओं की अभिव्यक्ति करती है और मिथिला के नैतिक मूल्यों, रीति-रिवाजों और परंपराओं को दर्शाती है। इस कला में प्राकृतिक रंगों का उपयोग होता है और इसमें धार्मिक, सांस्कृतिक और प्राकृतिक विषयों को चित्रित किया जाता है। यह पेंटिंग…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 18 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १८ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज बाधित झालं. अमित शहा यांनी काल राज्यसभेत संविधानावरच्या चर्चेला उत्तर देताना केलेल्या वक्तव्यावर, आज लोकसभेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. आज सदनाचं कामकाज सुरु होताच या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेतही आज काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याचा आपण निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर भाजपचे आशिष शेलार यांनी हरकत घेतली आणि संसदेतल्या कार्यवाहीबाबत या सभागृहात बोलणं उचित नसल्याचं सांगितलं. त्यावर अध्यक्षांनी, हे वक्तव्य तपासून उचित कारवाई केली जाईल असं सांगितलं.
विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यसभेतला हा मुद्दा उपस्थित करुन चर्चेची मागणी केली. मात्र एका सभागृहाचा मुद्दा दुसर्या सभागृहात उपस्थित करता येत नसल्याचं सांगून, उपसभापती निलम गोर्हे यांनी ही मागणी फेटाळली. यावर विरोधी पक्षाचा सदस्यांनी गदारोळ केला आणि हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली. या गदारोळातच उपसभापतींनी विरोधक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करत असल्याचं म्हंटलं. त्यावर विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. दरम्यान, विधान परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती, तोपर्यंत राम शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.
सोयाबीन, कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचं सांगून विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. सोयाबीन, कापसाला योग्य भाव नाही, धानाला बोनस नाही, अशी स्थिती असून, सरकारने शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी विरोध�� पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग - एमपीएससी मार्फत वर्ष २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.
जगभरातल्या संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातला मानाचा ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव आजपासून सुरू होत आहे. येत्या २२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातल्या अनेक दिग्गज कलाकारांसह १५ नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला येत्या २९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितलं. या यात्रेच्या आढावा बैठकीनंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. या यात्रेत शेतकऱ्यांसाठी भव्य कृषी आणि पशु प्रदर्शन, कृषिनिष्ठ शेतक-यांचा सत्कार, अश्व, श्वान, कुकूट प्रदर्शन आणि विविध स्पर्धेचे उद्घाटन, कुस्त्यांची दंगल, पारंपारीक लोककला महोत्सव, महिला आरोग्य शिबिर तसंच शेवटच्या दिवशी लावणी महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती करणवाल यांनी दिली.
क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आज ब्रिस्बेन इथं झालेल्या कसोटी सामन्यानंतर अश्विननं पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. अनिल कुंबळे नंतर सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या अश्विनच्या नावावर ५३७ बळी आहेत. तसंच फलंदाजीत अश्विननं सहा शतकांसह तीन हजार धावा केल्या आहेत. ३०० कसोटी बळी आणि तीन हजार धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन क्रिकेट जगतातला ११ वा ख��ळाडू ठरला, तर ११ वेळा मालिकावीर किताब पटकावत अश्विननं मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती.
दरम्यान, बॉर्डर-गावस्कर मालिकेतला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या, प्रत्यूतरात भारतीय संघानं पहिल्या डावात २६० धावा केल्या. वारंवार पावसाचा ��्यत्यय आलेल्या या सामन्यात दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सात बाद ८९ धावांवर रोखलं. भारतासमोर विजयासाठी २७५ धावांचं आव्हान होतं. मात्र, भारतीय संघाच्या आठ धावा झाल्या असतानाच पाऊस आणि खराब प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत असून, मालिकेतला चौथा सामना मेलबर्न इथं २६ तारखेपासून खेळवण्यात येणार आहे.
0 notes
Text
जिलास्तरीय युवक महोत्सव में जेईएस लोककला विभाग की शानदार सफलता
Great success of JES Folk Art Department in District Level Youth Festival जालना: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग और नेहरू युवा केंद्र, जालना के संयुक्त तत्वावधान में औद्योगिक प्रशिक्षण संस्थान में आयोजित जिला स्तरीय युवक महोत्सव में जेईएस महाविद्यालय के लोक कला विभाग के विद्यार्थियों ने द्वितीय स्थान प्राप्त कर महाविद्यालय का नाम रोशन किया. महोत्सव के ‘सामूहिक लोकगीत’ श्रेणी में लोक कला विभाग के…
0 notes
Text
The Grand Title Track from the Film Phullwanti Set to Hit the Screens | Bollywood Masala.
Get ready for the exciting launch of the grand title track from the film Phullwanti! Stay tuned for all the latest updates and enjoy the perfect blend of Bollywood masala and Bollywood tadka as this song hits the screens
0 notes
Text
charudatta thorat shraddha karale radio vishwas 90.8 community station nashik - charudatta mahesh thorat sraddha karale nashikcha radio
1 एप्रिल, 2024, रेडिओ पर विशेष मुलाखत प्रसारित ..
चारुदत्त थोरात की विशेष मुलाखत.. #Podcast
📌 रेडिओ का App available #GoogleStore 👉👉 https://play.google.com/store/apps/details?id=atclabs.radiovishwas908
#श्रद्धा_कराळे_चारूदत्त_थोरात_Podcast
_________________
जगप्रसिद्ध आदिवासी लोककला विश्वविक्रमकार व
सुप्रसिद्ध वारली चित्रकार श्रद्धा कराळे आणि .....
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिराचे भक्त
चारूदत्त थोरात यांच्यातील संवाद...
7 Time World Record Achiver - In the art of Adiwasi Warli - Shraddha Karle - Historical Kalarama Temple - Nashik
_____________________
charudatta thorat ,
World Famous Most Historical
kalarama temple of nashik bhakta ..
चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet,
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक,
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार (जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
- Source -
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक
______
#1_April_2024 रेडिओ
#Podcast on #Radio (Full Podcast)
___________________
#Poster Creator : अजित सारंग | डॉ.हरि कुलकर्णी
#PodCast Release 1-4-24 @Digital_Radio
जल्द ही डिजिटल माध्यम मे प्रसारित.. #आकाशवाणी
------------------------------------------------------------------
• २२ देशो के ... @मराठी कम्युनिटी मे सीधा प्रसारण !!!
-------------------------------------------------------------------
• मुलाखतकार - *** #श्रद्धा_कराळे RJ ***
(सुप्रसिद्ध वारली चित्रकार, वर्ल्ड रेकॉर्ड विश्वविक्रमकार,
7 Time Word Record Holder, *वारली लेखिका*)
• Interview by - Shraddha Karale,
Word Record Achiver - *Warli Artist*
_______________________________________
_______________________________________
_______________________________________
• विषय - प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व : चारूदत्त थोरात
यांचे मुल��ूत विचार... (#RJ श्रद्धा & CMThorat)
" तुमचं जगणं .. तुमचा आवाज " इस कार्यक्रम मे...
रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ पर.....
• गेस्ट के रूप मे #चारूदत्त जी के विचार सुने...!
• रेडिओ विश्वास - के २२ देशो मे ६ लाख से अधिक श्रोते
_______________________________________
_____________________________________
_______________________________________
• content : " traditional life of indians "
• Chief Guest - Charudatta Mahesh Thorat
- Famous Warli Painter - Shraddha Karale
Radio Vishwas 90.8 Marathi
radio station online
Mon. 18 March 2024 / RJ Shraddha With
Charudatta Mahesh Thorat / cmthorat
_________________
________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त : चारूदत्त थोरात
________________
__________________
1 एप्रिल, 2024, रेडिओ पर विशेष मुलाखत प्रसारित ..
चारुदत्त थोरात की विशेष मुलाखत.. #Podcast
#चारूदत्तथोरात की रेडिओ #आकाशवाणी मुलाखत...
First Radio Interview of #CMThorat
• प्रेरणादायी व्यक्तीत्व -
चारूदत्त थोरात यांचे मुलभूत विचार
__________________________________________
••••••••• संवादन | Communication •••••••••••
Guest - charudatta thorat ,
World Famous Most Historical
kalarama temple of nashik bhakta ..
अतिथी - चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
Interviewer - shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet,
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
मुलाखतकार : माननीय. श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक,
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार
(जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
____________________________________________
• Recorded Date - 18 March 2024
• Publicly Published Date - 01 April 2024
________________________________________
- Source -
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक.....................
____________
_______________________
#रेडिओ_90 #आकाशवाणी #चारूदत्त की #मुलाखत
Recording Date - 18 March 2024
publicly published on 1 april 2024
Thanks - For / 90.8 radio nashik fm radio community group of radio nashik /
first community radio 908 vishwas radio
____________________
_________________
सुप्रसिद्ध वारली चित्रकार RJ श्रद्धा कराळे .. चारुदत्त थोरात ... रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ
संचालक - डॉ. हरि विनायक कुलकर्णी...
अजित सारंग सर
0 notes
Text
ऐतिहासिक कालाराम मंदिर के प्रमुख भक्त चारूदत्त महेश थोरात हैं.. आदिवासी लोककला वारली चित्रकार श्रद्धा कराले
0 notes
Text
charudatta.thorat.historical.kalarama.temple.bhakta.nashik.warli.chiktrakar.shraddha.karale.चारूदत्त.थोरात.ऐतिहासीक.काळाराम.मंदीर.नाशीक.भक्त
• मुलाखतकार - 7 Time World Record Holder & जगप्रसिद्ध आदिवासी लोककला *वारली* चित्रकार :
माननीय. श्रद्धा कराळे
• ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त :
चारूदत्त थोरात
श्रद्धा कराळे आणि चारुदत्त थोरात यांची सर्वात गाजलेली रेडिओ मुलाखत..
प्रसारण - 1 april 2024
जगप्रसिद्ध वारली चित्रकार श्रद्धा कराळे आणि काळाराम मंदिराचे भक्त चारुदत्त थोरात यांची सर्वात गाजलेली रेडिओ मुलाखत..
charudatta thorat ,
World Famous Most Historical
kalarama temple of nashik bhakta ..
चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet,
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक,
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार (जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
- Source -
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक
0 notes
Text
charudatta thorat ,
World Famous Most Historical
kalarama temple of nashik bhakta ..
चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet,
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक,
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार (जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
- Source -
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक
0 notes
Text
पीएम मोदी ने यूथ इन्फ्लूएंसर्स को सम्मानित किया
पीएम मोदी ने यूथ इन्फ्लूएंसर्स को सम्मानित किया...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने शुक्रवार को कंटेंट क्रिएटर्स को सम्मानित किया और इस अवॉर्ड समारोह में विभिन्न श्र���णियों में सम्मानित होने वाले यूथ इन्फ्लूएंसर्स को जानकर आपको उनके काम की ज्यादा जानकारी होगी। कल्चरल एंबेसडर ऑफ दि ईयर – मैथिली ठाकुर: मैथिली ठाकुर ने कल्चरल एंबेसडर ऑफ दि ईयर अवॉर्ड जीता है। उनका सांगीत और लोककला में समर्पण ने सोशल मीडिया पर उन्हें एक प्रमिनेंट फिगर बनाया है। बेस्ट…
View On WordPress
0 notes
Text
'शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी'तर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील लाल महाल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालो. राजमाता जिजाऊंचे संपूर्ण आयुष्य समाजाला प्रेरणा देत राहील, त्यांचा त्याग आणि तपश्चर्या हे भारतीय स्वाभिमानाचे प्रतीक आहे, असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.
0 notes
Text
लोककला, परंपरा जोपासण्यासाठी 'महासंस्कृती महोत्सव’ - पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि.१३ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रदेशांतील संस्कृती, लोककला, परंपरेचे आदानप्रदान, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यवतमाळ येथे फेब्रुवारी महिन्यात पाच दिवसीय ‘यवतमाळ जिल्हा महासंस्कृती महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 28.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस-अनेक मतदार संघात प्रमुख पक्षांकडून उमेदवारीची अद्याप प्रतीक्षा
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून काही उमेदवारांची घोषणा
औरंगाबाद पूर्व मतदार संघात काँग्रेसपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीत बदल
सायबर घोटाळ्यांच्या प्रतिबंधासाठी प्रत्येकानं जागरुक राहण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त
आणि
दीपोत्सवाला आजपासून प्रारंभ-खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्या
सविस्तर बातम्या
राज्य विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. महायुती तसंच महाविकास आघाडीसह अनेक पक्षांनी अद्यापही काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत महायुतीकडून २३५ उमेदवार जाहीर झाले असून, यामध्ये भाजपचे १२१, शिवसेनेचे ६५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४९ उमेदवारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत २५९ उमेदवार घोषित झाले असून, यामध्ये काँग्रेसचे ९९, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ८४, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ७६ उमेदवारांचा समावेश आहे.
महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. यात बीड जिल्ह्यातल्या गेवराईतून विजयसिंह पंडित, तर अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर मधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेनं २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये हदगाव मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर, नांदेड दक्षिण - आनंद तिडके पाटील, परभणी - आनंद भरोसे, वरळी - मिलिंद देवरा, कुडाळ - निलेश राणे, तर रिसोड मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसनं १४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यामध्ये नांदेड उत्तर मधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दिलेला उमेदवार बदलला आहे. आता या मतदार संघात काँग्रेसकडून मधुकर देशमुख यांच्याऐवजी आता लहू शेवाळे निवडणूक लढवणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून आता विकास दांडगे ऐवजी अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये माजलगाव मतदारसंघातून मोहन जगताप, परळी - राजेसाहेब देशमुख, तर अणुशक्तीनगरमधून फहद अहमद, यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३२ उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. भोकर मतदारसंघातून - साईप्रसाद जटालवार, नांदेड उत्तर - सदाशिव आरसुळे, तर परभणी मतदारसंघातून श्रीनिवास लाहोटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर घोटाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं जागरुक राहण्याची आवश्यकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून संवाद साधत होते. सायबर घोटाळ्याविरोधातल्या मोहिमेत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचं आवाहन त्यांनीयावेळी केलं. समाजातल्या सगळ्यांच्या प्रयत्नानेच या आव्हानाचा सामना करू शकतो, असं सांगताना, पंतप्रधानांनी या प्रकारापासून सावध राहण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं...
Byte…
सुलेखन, लोककला, शास्त्रीय नृत्यकला, संरक्षण, अंतराळ आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या यशस्वी वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला. फिट इंडिया अभियानाच्या अनुषंगाने त्यांनी विविध मुद्यांच्या माध्यमातून व्यायामाचं महत्त्व विशद केलं.
उद्याच्या 'जागतिक ॲनिमेशन दिवसाच्या निमित्तानं बोलतांना, पंतप्रधानांनी ॲनिमेशनच्या जगात ‘मेड इन इंडिया’ आणि ‘मेड बाय इंडियन्स’ ह्यांचा प्रभाव असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, भारताला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. आपल्या आसपासच्या परिसरातल्या नवीन शोधाबाबत किंवा स्थानिक स्टार्ट-अपबाबत आत्मनिर्भर इनोव्हेशन ह्या हॅशटॅगसह सामाजिक संपर्क माध्यमांवर लिहिण्याचं त्यांनी आवाहन केलं.
सरदार पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवात सहभागी होण्याचं तसंच सरदार वन फाईव्ह झिरो तसंच बिरसामुंडा वन फाईव्ह झिरो या हॅशटॅगसह या दोन्ही राष्ट्रपुरुषांबाबतचे विचार सामाजिक संपर्क माध्यमांवरून सामायिक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी ३१ ऑक्टोबरला होणारी राष्ट्रीय एकता दौड यंदा दिवाळीमुळे २९ ऑक्टोबरला होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं.
सर्व देशवासियांना दीपावली आणि छट पूजेसह सर्व सणांच्या शुभेच्छा देतांना, vocal for local चा मंत्र लक्षात ठेवत, या सणांसाठीची खरेदी स्थानिक दुकानदारांकडूनच करण्याचं आवाहन करत, पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
आनंद आणि उत्साहाचं पर्व असलेल्या दीपोत्सवाला आज वसुबारसेच्या पूजनाने प्रारंभ होत आहे. सवत्स धेनु अर्थात गाय आणि वासराची पूजा करून दिवाळीला घरोघरी सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आकाशदिवे, रोषणाईच्या माळा, आणि गृहसजावटीच्या साह��त्यासह फटाके, फराळाचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
****
मुंबईत वांद्रे टर्मिनसवर काल पहाटे प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली, यात नऊ जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. वांद्रे टर्मिनस, इथल्या फलाट क्रमांक एक वर वांद्रे-गोरखपूर या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या कामगारांचा या गर्दीत समावेश होता.
दरम्यान, दिवाळीनिमित होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर यासह रेल्वेच्या काही प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री येत्या आठ नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथल्या सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात काल युवा संसद, पालकांना संकल्प पत्र आणि मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. युवा संसद कार्यक्रमात नवमतदारांचं स्वागत करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या दोन हजार १६५ मतदान अधिकारी आणि कर्मचार्यांचं प्रथम प्रशिक्षण काल निलंगा इथं पार पडलं. निवडणुकीमध्ये सर्वसाधारण समस्यांच्या अनुभव कथनातून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातल्या सहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणी लोकसभेसाठी सहा आणि विधानसभेसाठी सहा अशा १२ मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. लोहा, हदगाव, किनवट या तीन विधानसभा क्षेत्राची मतमोजणी त्या-त्या ठिकाणी होणार आहे.
****
बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असून, नागरीकांनी रक्तदान करण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी केलं आहे. या रुग्णालयात आपत्कालीन अपघात विभाग, शस्त्रक्रिया विभाग, त्याचबर���बर जिल्हाभरातून हेमोफिलिया, थैलेसिनियाचे काही बाल रुग्ण सुद्धा आहेत. त्यांना आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला रक्त द्यावंच लागतं, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दररोज ४० ते ४५ रक्त पिशव्यांची आवश्यकता असते, असं थोरात यांनी सांगितलं.
****
महिला क्रिकेटमध्ये, दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. काल झालेल्या सामन्याय न्यूझीलंडच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात ९ बाद २५९ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलग करताना भारतीय महिला संघ ४८ व्या षटकात १८३ धावांवर सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत असून, शेवटचा सामना उद्या अहमदाबाद इथं होणार आहे.
* ***
बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पक्षाने या मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी काल फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले बॅनर फाडले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
बुन्देली झलक
बुन्देली झलक का उद्देश्य बुंदेलखंड की विलुप्त होती लोककला, संस्कृति एवं परंपराओं को पुनर्स्थापित करने के लिए प्रोत्साहित करना एवं पुनर्स्थापित करने में जनमानस का सहयोग करना। अपनी बोली अपनी भाषा से विमुख होते लोगों को अपनी बोली के प्रति प्रोत्साहित करना एवं अन्य प्रदेशों की भांति कक्षा एक से अपनी बोली लोक भाषा को पाठ्यक्रम में अनिवार्य करने हेतु संघर्ष ।
बुन्देली झलक की स्थापना नवंबर 2018 में हुई । बुन्देली झलक के संस्थापक गौरीशंकर रंजन ने कीर्तिशेष परम आदरणीय श्री गुणसागर शर्मा ‘सत्यार्थी’ के मार्गदर्शन मे शुरू किया । बुन्देलखण्ड के अनेक साहित्यकारों, विद्वानों नें भरपूर सहयोग किया ।
कोशिश है कि बुन्देलखण्ड की लोक कला, संस्कृति,परम्पराओं एवं साहित्य की सम्पूर्ण जानकारी और बुन्देलखण्ड के लोक कलाकार (गायक, वादक), साहित्यकार, बुद्धजीवी, सामाजसुधारक, संस्कृतिकर्मी आदि का जीवन परिचय एवं उनके उत्कृष्ट कार्यों को वेबसाईट के माध्यम से आम जानमानस तक पहुचाना ।
बुन्देलखण्ड की लोक कला, संस्कृति, साहित्य, परम्पराएं, लोक जीवन एवं लोक पर्व-त्योहारों, बुन्देली किस्सा -कहानियों, बुन्देलखण्ड की लोक कथाएं , लोक गाथाएं , लोक देवता, बुंदेलखण्ड का इतिहास आदि की विस्तृत शोधपरक जानकारी वेबसाईट https://bundeliijhalak.com/ मे उपलब्ध है ।
बुन्देली झलक बुन्देलखण्ड के वरिष्ठ लोक कलाकार (गायक, वादक) , साहित्यकार , बुद्धजीवी , समाजसुधारक, संस्कृतिकर्मी आदि को पद्म पुरस्कार और अन्य राजकीय एवं राष्ट्रीय पुरस्कार हेतु Nominate (मनोनीत) करना ।
0 notes
Text
सरस मेला का समापन समारोह, कुशल महिला उद्यमी सम्मानित
पटना:लोकरंग , लोककला , हस्तशिल्प , कलाकृतियाँ एवं देशी व्यंजनों का सुप्रसिद्ध बिहार सरस मेला का बुधवार को समापन हो गया l ग्रामीण विकास विभाग, बिहार सरकार के तावाधन में बिहार ग्रामीण जीविकोपार्जन प्रोत्साहन समिति (जीविका ) द्वारा बिहार सरस मेला ज्ञान भवन , पटना में 20 सितंबर से 27 सितम्बर तक चला l सरस मेला में बिहार समेत 22 राज्यों की स्वयं सहायता समूह की महिला उद्यमियों ने अपनी उपस्थिति दर्ज…
View On WordPress
0 notes