#म��ाराष्ट्र बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ डिसेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वत्र अभिवादन.
·      स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ.
·      राज्यात कोविड निर्बंध कडक होणार नाहीत - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा निर्वाळा.
आणि
·      मुंबई कसोटीत भारताचा न्यूझीलंडवर ३७२ धावांनी दणदणीत विजय; मालिकाही जिंकली.
****
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभर त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
नवी दिल्लीतल्या संसद भवन परिसरात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पांजली अर्पण केली.
मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवरही अभिवादनपर विविध कार्यक्रम होत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री उद्धव ��ाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचं अमूल्य योगदान कारणीभूत आहे, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबडवे या त्यांच्या मूळ गावी  महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं.
औरंगाबाद जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी अभिवादन करण्यात येत आहे. शहरातल्या भडकलगेट इथल्या पुर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पुष्प वाहून आणि मेणबत्या पेटवून अभिवादन केलं.
 ****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं आज सकाळी मुंबईत आगमन झालं. त्यानंतर त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावेळी उपस्थित होते. रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी यांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं. खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 'रायगड किल्ल्याला भेट देणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या किल्ल्याला आपण तीर्थक्षेत्र मानतो' असं मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केलं. राष्ट्रपतींनी सपत्नीक होळीचा माळ, राजसदर या ठिकाणी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं.
****
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.
जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करणं आवश्यक असल्याचं मदान यांनी सांगितलं. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास निवडून आल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्यासंदर्भातील पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
राज्यात कोविड निर्बंध अधिक कडक होणार नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे, जालना जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. राज्याच्या आज होणाऱ्या कोविड कृती दलाच्या बैठकीत राज्यातल्या ओ-मायक्रॉन विषाणू संसर्गाबाबत आढावा घेतला जाणार असून, त्यानंतर पुढील गोष्टी ठरवू, असं टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
आपण ज्या ओपन केलेल्या संपुर्ण बाबी आहेत, त्यांच्यामध्ये लगेच निर्बंध ला‍वणे हे लोकांसाठी खुप जाचक आणि कठीण होईल. त्यामुळे परिस्थितीवर आपण लक्ष ठेवू आणि परिस्थिती कशी कशी आहे, त्या सगळ्या अनुषंगाने मग केंद्र शासनाचं मार्गदर्शन, टास्क फोर्सचं मार्गदर्शन, माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यातली मतं या सगळ्यांच्या अनुषंगाने पुढील गोष्टी ठरवू.
लहान मुलांना लसीकरण करण्यासाठी केंद्राची परवानगी मिळावी यासाठी, तसंच बूस्टर डोससाठी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसंच, औरंगाबाद आणि नागपूर इथं जिनोमिक सिक्वेसिंगच्या आणखी दोन प्रयोगशाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
येणारा संभाव्य वाढत असलेली ओमायक्रॉनची संख्या लक्षात घेता जिनोमिक सिक्वेसिंग हा सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे. आणि सध्याच्या तीन लॅबवर खूप जास्त ताण पडेल आणि त्यामुळे अचानकपणे वाढ होण्यापेक्षा आत्ताच दोन लगेचच लॅब वाढवण्यासंदर्भात परवानगी मिळावी. एक औरंगाबादला, एक नागपूरला असं सुध्दा टास्कफोर्सचे चेअरमन श्री ओक यांचं म्हणन आहे. अशा संदर्भातला त्यांचा आग्रह आहे.
****
कोविड-१९ साठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीचे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. आरटीपीआर चाचणीसाठी आता ३५० ते ७०० रूपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय रॅपिड ॲन्टीजेन तपासणीसाठी १०० ते १५० रूपये, ॲन्टीबॉडीज तपासणीसाठी ३०० ते ५०० रूपये दर प्रस्तावित आहेत. राज्यात कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत असंही या निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
मुंबई इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर ३७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी खेळ सुरु झाला तेव्हा न्यूझीलंडनं पाच बाद १४० धावांवर खेळण्यास सुरुवात केली होती. न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी ५४० धावांची आवश्यकता होती. मात्र १६७ धावात हा संघ सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विन आणि जयंत यादवनं प्रत्येकी चार, तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला. मयंक अग्रवालला सामनावीर, तर रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराचं गौरवण्यात आलं.
****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06  December 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि. ****  शेतकऱ्यांची उत्पादनं थेट कार्पोरेट कंपन्यांना विकण्यासाठीच्या स्मार्ट प्रकल्पाचा शुभारंभ  राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी सात हजार नऊशे बासष्ट कोटी ६३ लाख रूपयांच्या निधीची आवश्यकता- कृषी सचिव -एकनाथ डवले; केंद्रीय पथकांकडून राज्यातल्या दुष्काळ स्थितीची पाहणी  २०१८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक म. सु. पाटील यांना जाहीर  मराठा समाज आरक्षण कायद्याला स्थगिती देण्यास मुंबई उच्�� न्यायालयाचा नकार आणि  महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज देशभर आदरांजली **** राज्य शासनानं जागतिक बँकेच्या सहाय्यानं सुरु केलेल्या स्मार्ट प्रकल्पाचा आरंभ काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा, त्यांची उत्पादनं थेट कॉर्पोरेट कंपन्यांना किंवा थेट बाजारात विकता यावीत, यासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, आणि या माध्यमातून कृषी तसंच ग्राम विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं हा स्मार्ट प्रकल्प क्रांतिकारी ठरेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी राज्य शासन, कॉर्पोरेट कंपन्या आणि शेतकरी कंपन्यांमध्ये एकूण ४६ सामंजस्य करार करण्यात आले. पहिल्या टप्प्यात राज्यातल्या १० हजार गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. **** राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीच्या निवारणासाठी सात हजार नऊशे बासष्ट कोटी ६३ लाख रूपये निधीची आवश्यकता असल्याचं राज्याचे कृषी विभाग सचिव एकनाथ डवले यांनी इथं सांगितलं आहे. काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय पथकासोबत दुष्काळ परिस्थितीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या दुष्काळ परिस्थितीबाबत सविस्तर आकडेवारी निहाय माहिती देऊन, ही परिस्थिती यशस्वीरित्या हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि निधीबाबत त्यांनी सादरीकरण केलं. दरम्यान, केंद्र सरकारच्या दहा सदस्यांच्या शिष्टमंडळानं काल औरंगाबाद, जालना, बुलडाणा आणि अहमदनगर जिल्ह्यांतल्या दुष्काळ सदृश भागाची पाहणी करून पिकांच्या नुकसानीचा अंदाज घेतला. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातल्या टेंभापुरी, मुरमी आणि सुलतानपूर या गावांना पथकानं भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पथकाला माहिती दिली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि जालना तालुक्यातल्या गावांना अन्य एका पथकानं काल भेट दिली. यावेळी आमदार नारायण कुचे तसंच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी पीक परिस्थितीबाबत पथकाला माहिती दिली. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या दुष्काळ निवारणाच्या कामाविषयी माहिती दिली. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी, कर्जत, जामखेड भागाचीही आणि सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात जातेगाव, तसंच बिटरगाव इथं पथकानं दुष्काळी स्थितीची पाहणी केली. दरम्यान आज बीड जिल्ह्यातल्या परिस्थितीची पाहणी पथक आज करणार आहे. जिल्ह्यातल्या माजलगाव, वडवणी, परळी, आणि अंबाजोगाई या तालुक्यात पाणी टंचाईसह विविध प्रश्नांचा आढावा हे पथक घेणार आहे. **** २०१८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार, मराठीतले ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक म. सु. पाटील यांना जाहीर झाला आहे. साहित्यात समिक्षेच्या प्रांतात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. काल नवी दिल्ली इथं हे पुरस्कार जाहीर झाले. पाटील यांच्या ‘सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध’ या ग्रंथासाठी ��्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कोकणी भाषा विभागात परेश कामत य���ंना, अभिजात वाङ्मय आणि संशोधन पर लिखाणासाठी डॉक्टर शैलजा बापट यांना भाषा सन्मान पुरस्कार घोषित झाला आहे. एक लाख रुपये, ताम्रपट आणि शाल-श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरुप आहे. **** गृह, वैयक्तिक, लघुउद्योग तसंच वाहन कर्जासह इतर कर्जांवरच्या व्याज आकारणी पद्धतीत येत्या आर्थिक वर्षापासून बदल करण्याचा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेनं ठेवला आहे. सध्या व्याजाचे दर अंतर्गत घटकांशी निगडीत आहेत. मात्र ग्राहकांना याचा लाभ मिळावा म्हणून ते बाह्य घटकांशी निगडीत करण्याचा हा प्रस्ताव आहे. बँकेनं काल चालू आर्थिक वर्षासाठी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला. यावेळी जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. या बाबतची मार्गदर्शक तत्वं या महिना अखेरपर्यंत जारी होणार आहेत. या नुसार व्याजाचा दर रेपो दर किंवा सरकारी रोख्यांवर मिळणाऱ्या लाभावर अवलंबून असेल. त्यामुळे, सध्या प्रचलित पद्धतीप्रमाणे, बँका आपल्या व्याज दरात वाढ किंवा कपात करू शकणार नाहीत. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या कायद्याला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी या कायद्याला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे, यामध्ये त्यांनी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. काल झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या पीठानं यासंदर्भातल्या सर्व प्रलंबित याचिकांवर येत्या १० डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे. **** भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३व्या महापरिनिर्वाण दिन���निमित्त आज संपूर्ण राष्ट्र या महान नेत्याला अभिवादन करत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसद भवनात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरही यावेळी आदरांजली वाहतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर कालपासूनचं अनुयायांनी गर्दी केली आहे. गर्दी लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेनं सर्व आवश्यक सज्जता केली आहे. या परिसरात पाणीपुरवठा, फिरती शौचालयं, रुग्णवाहिका आणि इतर सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. **** हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी आमदार संतोष टारफे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ काल हिंगोली शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. बांगर यांना अटक करून तडीपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर दुसरीकडे बांगर यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा - ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेनं काल औंढा नागनाथ आणि कळमनुरी शहर बंदचं आवाहन केलं होतं. गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात काल जागतिक मृदा दिनानिमित्त जमीन आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यात आलं. जिल्ह्यात आजपर्यंत ३३ हजार ८७३ शेत माती नमुन्याचं परिक्षण करुन ७१ हजार ४७५ शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यात आल्याचं आलं. **** औरंगाबाद शहरातल्या नागरिकांच्या सहकार्यामुळे शहराचं रुप बदलण्यात यश येत असल्याचं महापौर नंदकुमार घोडेले यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं काल भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या फिल्ड आउटरिच ब्यूरो तर्फे आयोजित स्वच्छ भारत अभियान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छता सर्वेक्षणात औरंगाबाद शहर लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनीही घरीच ओला आणि सुका कचरा वेगळा करुन महानगरपालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. **** लातूर जिल्ह्यातल्या वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर, यावर कारवाईचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली. हा आयोग केवळ मुस्लिम समाजासाठी काम करत नसून जैन, बौध्द आणि पारशी समाजासाठीही काम करतो, त्यामुळे आयोगाला पूर्णवेळ अध्यक्ष आणि अधिकारी देण्याची मागणीही शासनाकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना ॲडलेड इथं आज पहाटे सुरू झाला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद २६ धावा झाल्या होत्या. *****
0 notes