#म्युझियममध्ये
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
“हिंदू मुलीकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन”; भाजप नेत्याचा थेट इशारा…
“हिंदू मुलीकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन”; भाजप नेत्याचा थेट इशारा…
“हिंदू मुलीकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन”; भाजप नेत्याचा थेट इशारा… पाटणः हिंदू मुलींकडे पाहाल तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन असा इशारा लव्ह जिहाद प्रकरणी पाटणमध्ये आज महाआक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी दिला आहे. आपल्या इथे हिंदूंची संख्या जास्त असूनही आणि मूठभर जिहादी असूनही ते आपल्याला भारी पडत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होण्याची कुवत आहे का…
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 4 years ago
Text
पाटणा ट्रिप...
     भाऊजींची बदली पाटण्याला झाली. बहिण, भाऊजी, त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा तिथे शिफ्ट झाले. अन काही दिवसातच आम्हालाही तिथे जाण्याचा योग आला! पत्राद्वारे समजले की बहिणीला घरात अपघात झाला आणि ती हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. 1995 चा नोव्हेंबर महिना होता. त्यावेळी मोबाईलचा जमाना नसल्यामुळे सविस्तर समजत नव्हते. काय करावे कळेना. आई दादांशी फोनवर बोलणे झाले. ते पाटण्याला निघाले होते. आम्हीही जायचे ठरवले. रेल्वे स्टेशनवर जाऊन कुर्ला-पाटणा एक्स्प्रेसचे तिकीट काढले, अन ठरलेल्या दिवशी मी, सौ आणि तीन वर्षाची कन्या असे आम्ही तिघेजण औरंगाबादहुन रेल्वेने रात्री नऊ वाजता मनमाडला पोहोचलो. पहाटे साडे तीनची ट्रेन होती. प्लॅटफॉर्मवर बसून सोबत आणलेले जेवण खाऊन घेतले.
     एवढ्या लांबचा प्रवास, तेही बिहारची राजधानी असलेल्या पाटण्याला यामुळे टेंशन होते. बिहारबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, गुंडेगीरीबद्दल बरेच ऐकले होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. लहान मुलीला घेऊन असे रात्री अपरात्री प्रवासाला निघालो होतो तेही अशा भयानक ठिकाणी!
     वेटींग रुममध्ये जागा पाहुन बसलो. त्याचवेळी वेटींग रुमचा अ‍ॅटेंडंट झोकांड्या देत आत आला आणि दारुचा घम्म वास रुममध्ये भरला. तशा अवस्थेतच तो तिकीट तपासून नाव लिहुन घेऊ लागला. नशेत असल्यामुळे त्याला काहीच समजत नव्हते. तशात तो बायकांना जवळ जाऊन बोलू लागला. माझ्या डोक्यात सनकच भरली. उठून त्याची गचांडी धरुन त्याला दोन गुद्दे ठेवून दिले अन धक्के मारत बाहेर काढले. वेटींग रुममधल्या सर्वांनी नि:श्वास सोडला. तिथून मेन प्लॅटफॉर्मवर जावून स्टेशन मास्तरला सर्व सांगितले. तो नेहमीच दारु पिऊन असा गोंधळ घालतो असे समजले. त्यांनी पोलिसाला पाठवून त्या अ‍ॅटेंडंटला हाकलून लावले. पोलिसांनी माझा जवाब घेतला. आता मलाच भीती वाटायला लागली! या प्रकरणामुळे इथेच थांबावे लागते की काय असे वाटू लागले. उगाच कम्प्लेंट केली असा विचार मनात आला. तितक्यात एक बाई तिथे आली. त्या अ‍ॅटेंडंटची ती बायको होती. कम्पेंट करु नका असे ती गयावया करु लागली. मलाही मनातून तेच पाहिजे होते. पोलिसांकडून कम्प्लेंट वापस घेतली आणि परत तो इकडे आला तर मात्र सोडणार नाही असा उगाच दम दिला आणि मनातल्या मनात हुश्श करुन वेटींग रुममध्ये बसलो. बिहार प्रवासाची सुरुवातच अशी झाली!
     बरोबर पहाटे तीन विसला अनाऊंसमेंट झाली. कुणीतरी सांगितले की आमची बोगी अमुक अमुक ठिकाणी येईल. त्याप्रमाणे तिथे जाऊन थांबलो. काही वेळातच धाड धाड करत ट्रेन आली. बोगीचे दार बंद! दार वाजवतोय वाजवतोय, पण कुणी उघडायला तयार नाही! ट्रेन पाच मिनिटेच इथे थांबते हे कळले होते, त्यामुळे खूप घाबरुन गेलो. इतक्यात एका माणसाने ओरडून सांगितले ‘दाराला लाथ मारा. बिहारची ट्रेन आहे, तिला कडी नसत��’. पडत्या फळाची आज्ञा मानून तसेच केले, अन आश्चर्य म्हणजे दार लगेच उघडले गेले! सामान आत सरकावून आम्ही आत चढलो अन त्याच वेळी ट्रेन सुरु झाली.
     बोगीत अंधार गुडुप होता. अशा अंधारात बर्थ कसे शोधावे हा मोठा प्रश्न होता. तितक्यात टिसी आला. बाहेरच्या उजेडात त्याच्या छातीवरच्या बिल्ल्यावर देशपांडे असे वाचले. मराठी माणूस असल्यामुळे खूप टेंशन कमी झाले. त्याला तिकिट दाखवले. टॉर्चच्या उजेडात नंबर पाहून तो म्हणाला ‘बर्थपर्यंत मी घेवून जातो, तिथून पुढे तुम्ही तुमचे बघा. बोगीत आधीच लाईट नाही आणि सर्व बिहारी लोकं आहेत, कुणीच ऐकत नाही’. असे म्हणून तो सरसर पुढे गेलासुद्धा! या दोघींना तिथेच थांबवून मी त्याच्या मागे गेलो. साईडचे दोन बर्थ आमचे होते, आणि त्यावर दोघेजण पांघरुण घेवून झोपले होते! टिसीने त्यांना उठवले. पांघरुण डोक्यावरुन बाजूला करुन तो खेकसला ‘का है? काहे नींद खराब कर रहे हो?’ ‘ये इनका बर्थ है, रिझर्वेशन है’ टिसी म्हणाला. त्यावर तो म्हणाला ‘तो का हुआ? रिझर्वेशन है तो का गाडी खरीद ली का?’
     टिसीने माज्या हातात तिकीट ठेवले आणि ‘मी काय म्हटले होते? या ट्रेनमध्ये हे असेच असते’ असे म्हणत अंधारात गायबही झाला! मी हताश होवून सौला परिस्थिती सांगितली. कन्या तिच्या कडेवर मस्त झोपली होती. कसेबसे अंधारात चाचपडत एक मधले बर्थ रिकामे सापडले. त्यावर सामान टाकून या दोघींना त्यावर चढवले. त्यांची व्यवस्था लावून मी पहाटे उजाडेपर्यंत पॅसेजमध्ये बसून राहिलो!
     उजाडल्यावर बोगीत फिरुन एका ठिकाणी जागा पाहिली. सामान घेऊन आम्ही तिघे तिथे बसलो. योगायोगाने बाजूला औरंगाबादलाच एका फरशीच्या दुकानात काम करणारा बिहारी कामगार होता. काटा काट्याने काढावा हे माहित असल्यामुळे त्याच्याशी गप्पा मारुन दोस्ती केली. आमच्या सोबतच त्याला चहा, नाष्टा दिला. तो म्हणाला ‘इस ट्रेन मे ऐसेही लोग सफर करते है. कुछ बोलो तो मारपीट करते है. इसीलिये ट्रेनमे कोई दखल नही देता. इसमे ना लाईट होती है, ना पानी.’ आम्ही लवकर उठलेले असल्यामुळे आम्हाला पाणी मिळाले होते. आमचे नशीब!
     ट्रेनमध्ये येणार्‍या प्रत्येक टिसीला आमाची व्यथा सांगितली. पण कुणीच आमचा अधिकाराचा बर्थ आम्हाला रिकामा करुन दिला नाही. शेवटी जबलपूरला एका टिसीने (दया येवून) आम्ही जिथे बसलो होतो त्याच ठिकाणचे दोन बर्थ बदलून दिले तेव्हाच थोडी धाकधुक कमी झाली. तो संपूर्ण दिवस अ�� रात्र आम्ही टेंशनमध्येच काढली.
दुसर्‍या दिवशी पहाटे ट्रेनने बिहारमध्ये प्रवेश केला. बिहार सुरु झाल्यापासून आम्ही पहात होतो की ट्रेन अगदी आडरानात, छोट्या मोठ्या स्टेशनवर, असे कुठेही थांबायची. आमच्या सोबतच्या माणसाने सांगितले की ‘जिसको जहां उतरना है वो चेन खिंच लेता है. जहां मर्जी चढ जाव, जहां मर्जी उतर जाव. कोई कुछ नही बोलता.’ आम्हाला खूप आश्चर्य वाटले. असे सगळे अनुभव घेत दोन रात्री आणि एक संपूर्ण दिवसाचा प्रवास करुन शेवटी एकदाचे दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता आम्ही पाटणा स्टेशनवर पोहोचलो! थंडीचे दिवस होते. पाटण्यात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात विशेष फरक नसतो हे ऐकले होते, त्याची लगेच जाणीव झाली.  
सायकल रिक्षात बसून बहिणीच्या घरी आलो. स्टेशन ते घर अंतर खूप लांब होते. आणि मुख्य रस्ता सोडून आतले सगळे रस्ते रेताड अन कच्चेच होते. साधारण आठ डिग्री तापमानात रिक्शावाला पेडल मारत, कधी खाली उतरुन धकलत आम्हाला योग्य ठिकाणी घेवून आला. त्याला किती पैसे द्यायचे हे विचारले तर त्याने पाच रुपये सांगितले. आम्हाला खूप आश्चर्य वाटले. एवढ्या अंतराचे आपल्याकडे नक्कीच तीस चाळीस रुपये घेतले असते. मी त्याला दहाची नोट दिली आणि ‘बाकी रहने दो’ असे म्हणालो. तेवढ्यावरच खुश होवून त्याने सामान पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचवून दिले. तो गेल्यानंतर शेवटचे सामान खालून वर घेवून येत असतांना खाली दारात उभे राहून आम्हाला पहात असलेल्या बहिणीच्या घरमालकाने विचारले ‘किथना दिया उसको?’ मी दहा रुपये दिले असे सांगितले. यावर तो म्हणाला ‘इथना क्युं दिया, उनको आदत पड जायेगी’.
मला तर अजून जास्त द्यायला पाहिजे असे वाटत होते, अन हे वेगळंच सांगत होते. तो बिचारा वरती मिळालेल्या पाच रुपयावरच किती खुश झाला होता. तेव्हाच लक्षात आले की बिहारमध्ये अति गरीब अति श्रीमंत या दोनच कॅटॅगिरी आहेत, अन हे लोक इतरत्र कामाला का जातात हेही लक्षात आले!
घरी येवून फ्रेश होवून मी भाऊजींसोबत हॉस्पीटलला गेलो. अपघातामुळे बहिणीचा पाय जायबंदी झाला होता. अजून दोन दिवस हॉस्पीटलायजेशन होते. आई दादा व आम्ही तिघेजण आल्यामुळे भाऊजींना आता घरची काळजी नव्हती. दोन भाच्या, एक भाचा आणि आमची कन्या खेळण्यात रमले होते. त्या दिवशी रात्री मी हॉस्पीटलमध्ये झोपायला गेलो. जातांना भाऊजींनी अंगठी, घड्याळ काढून ठेवायला सांगितले! इथल्या परिस्थितीचा त्यांना अनुभव असल्यामुळे कसलेही आढेवेढे न घेता मी त्यांनी सांगितले तसे केले.  
दोन दिवसांनी बहिणीला डिस्चार्ज मिळाला. त्या आनंदात सौने मस्त पावभाजी केली. सर्वांनी ती आव��ीने खाल्ली. भाऊजींसोबत भाजी मार्केटला जाऊन आम्ही भाजी आणली होती. येतांना लिट्टी चोखाचा आस्वाद घेतला आणि सर्वांसाठी घरी घेवून आलो.
त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही तिघे अनेक सूचना सोबत घेऊन ल्हासा मार्केटला गेलो. अंधार पडायच्या आत परत यायचे ही महत्वाची सूचना होती. पण त्या मार्केटमध्ये गरम कपड्यांची एवढी व्हरायटी होती की तिथून निघायला रात्रीचे आठ वाजले. यामुळे एक गोष्ट मात्र झाली. बिहार आणि पाटण्याच्या लोकांबद्दल जेवढे ऐकले होते तेवढे ते वाईट नव्हते. उलट आम्हाला खूप चांगला अनुभव आला. अतिशय चांगली वागणुक मिळाली होती. कदाचित यामुळेच उशीरापर्यंत तिथे थांबायला कसलीच भीती वाटली नाही. परत येतांना जाणवले की रस्त्यात कुठेही स्ट्रीट लाईट नाहीत. तरी रिक्षावाल्याने अगदी व्यवस्थित आम्हाला परत आणून सोडले.
दुसर्‍या दिवशी पाटणा दर्शन करावे असे ठरवले. टुरिझम डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी सांगितले की ‘आप सभी का नाम लिख दो, फोन नंबर देदो, जब भी पूरी बस का बुकिंग हो जायेगा आपको फोन करके बता देंगे! एक दिन भी लग सकता है या आठ दिन भी लग सकते है!’ राजधानीचे ठिकाण असल्यामुळे सर्व व्यवस्था असेल असे वाटले होते. पण आमचा भ्रमनिरास झाला. शेवटी एका टुर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे मारुती व्हॅन ठरवली. आम्ही तिघे आणि तिन्ही भाचे मिळून पाटण्यातील अनेक ठिकाणे पाह्यली. बिहार म्युझियम, गोलघर, गांधी सेतू सर्व पाहिले. म्युझियममध्ये हजारो वर्षापूर्वीचे झाडाचे भले मोठे खोड तसेच नालंदा विद्यापिठातल्या अनेक वस्तु पाहिल्या. गोलघर म्हणजे अतिशय उंच अन गोलाकार असे जूने धान्याचे कोठार होते. गांधी सेतू इतका मोठा होता की खाली गंगा नदीकडे पाहिले की समुद्र असल्यासारखाच भास होत होता. आणि एखादी गाडी पास झाली की पूल चांगलाच हादरायचा. तेव्हा भीतीने गाळण उडायची. दिवसभर सर्व पाहून संध्याकाळी आम्ही सुखरुप घरी पोहोचलो. आम्ही येईपर्यंत घरी सर्वांच्या जीवात जीव नव्हता!
भाऊजींची रजा संपली होती. त्या दिवशी जाऊन सही करुन यायचे होते म्हणून मीही त्यांच्यासोबत त्यांच्या ऑफिसला मोटारसायकलवर निघालो. विधान भवनापासून जवळच एका ठिकाणी खूप मोठा मोर्चा दिसला. चारा घोटाळ्याच्या विरुद्ध घोषणा देत अभाविपचे असंख्य विद्यार्थी मोर्चात दिसत होते. आम्ही बाजूने पुढे जात होतो. त्याचवेळी समोर बॅरिकेट्स लावलेले दिसले आणि खूप मोठ्या संख्येने पोलिस फोर्स दिसला. भाऊजी म्हणाले ‘आता काही खरे नाही, आपण परत जाऊत.’ पण आपल्या महारष्ट्रात असे अनेक मोर्चे पाहिले असल्यामुळे ‘काही होत नाही, चला बघूत तरी’ असे म्हणून मी मोटारसायकल पुढे घ्यायला लावली.
अन त्याच वेळेस काय झाले काही कळायच्या आत तो पोलिस फोर्स सर्व मोर्चेकर्‍यांना, तसेच दिसेल त्यांना मारत सुटला. पाण्याच्या फवार्‍याचाही जोरदार मारा सुरु झाला. एकच गोंधळ उडाला. रस्ता दिसेल तिकडे सर्वजण पळत सुटले. आमच्या मोटारसायकलवर काहीजण आदळले आणि तोल जाऊन ती खाली पडली. आम्ही पडता पडता वाचलो. मोटारसायकल तशीच सोडून आम्हीही पळत रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दुकानाकडे पळालो. त्याचे शटर अगदी दोन फुटच बंद करायचे शिल्लक होते. आडवे झोपून सूर मारल्यासारखे आम्ही आत घुसलो अन शटर बंद झाले! आत बरेच लोक आश्रयाला आले होते. काचेतून आम्ही बाहेर पाहिले आणि ते दृश्य पाहून हातपायच गळाले! असे झोडपत होते पोलिस की सांगता सोय नाही! काहीजण रक्तबंबाळ झाले होते. आमच्या सोबत आतमध्ये एक मुलगीही रक्तबंबाळ अवस्थेत होती. तशा अवस्थेत आतूनच ती लालू प्रसाद मुर्दाबाद वगैरे घोषणा देवू लागली. दुकान��ाराने तिला शांत बसायची विनंती केली, नाहीतर बाहेर जा असे सांगितले, तेव्हा ती शांत झाली.
बराच वेळ हा गोंधळ चालू होता. सर्वजणांची पांगापांग झाल्यावर काही जणांना पोलिस व्हॅनमध्ये कोंबून पोलिस निघून गेले तेव्हा सर्व शांत झाले. दुकानदाराने, हे नेहमीचेच असल्यामुळे, सराईताप्रमाणे शटर उघडले. भीतभीतच आम्ही बाहेर आलो. मोटारसायकल आडवी पडल्यामुळे पेट्रोल गळाले होते. नशीब तिला काही डॅमेज झाले नव्हते. किक मारुन तिथून जवळच असलेल्या भाऊजींच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे घडलेला किस्सा भाऊजींनी सांगितला. कुणालाच यात काही विशेष घडले असे वाटले नाही! उलट प्रत्येकजण आपले वेगवेगळे अनुभव सांगत होता. एकजण म्हणाला ‘अपने ऑफिसमे एक नया आदमी आया था. ऑफिस आते वक्त रास्तेमे उसे कुछ लोगोंने अडाया और मोटरसायकल मांगी. इसने मना कर दिया. पिस्तुल निकाला और सरपे गोली मारी उन्होने, और मोटरसायकल लेके आरामसे निकल गये.’ यावर दुसरा म्हणाला ‘पागल था वो. मोटरसायकल मांगी तो दे देना था ना! काहे मना कर दिया? जान गवां दी खामखां!’ अशा एकाहुन एक धक्कादायक बातम्या ऐकून घामच फुटला. मघाचा अनुभव होताच, त्यात या चर्चेची भर पडली!
बहिणीची तब्येत आता बरीच सुधारली होती. आई दादा आणखी काही दिवस थांबणार होते. त्यामुळे आम्ही दुसर्‍या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो. 
अशा रितीने पाटण्याचा, काही चांगला, काही भीतीदायक अनुभव घेऊन, आणि प्रदुषण रहित गुलाबी थंडीच��� आनंद घेऊन येतांना जबलपूर, बनारस करुन आम्ही सुखरुप औरंगाबादला परत आलो...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.                    
0 notes