#भारत देशात���ल बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 January 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि.
****
** राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात  
** आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; आगामी वर्षात विकास दर ११ टक्के राहण्याची शक्यता
** ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं आजपासूनचं नियोजित आंदोलन स्थगित
** उच्च शिक्षण संस्था तसंच महाविद्यालयं प्रत्यक्ष सुरु करण्याची सर्व कुलगुरूंची मागणी
** शक्ती कायद्यांतर्गत प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र न्यायालयं स्थापन करणार - गृहमंत्री अनिल देशमुख
** राज्याचा कोविड मुक्तीचा दर ९५ पूर्णांक २८ शतांश टक्के; मराठवाड्यात नव्या २१४ रुग्णांची नोंद  
आणि
** विकेल ते पिकेल धोरणानुसार नांदेड इथल्या रयत बाजारात सुमारे २५ लाख रुपयांची उलाढाल
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल सुरुवात झाली. प्रारंभी राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीपुढं अभिभाषण केलं. राज्य घटनेनं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, मात्र तितक्याच गांभिर्यानं आपण कायद्याचं पालन करणंही घटनेला अपेक्षित आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितलं. अलिकडेच दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणं, ही दुर्दैवी घटना असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना जास्त अधिकार आणि ताकद देण्यासाठी तीन कृषी कायदे संसदेनं गेल्या अधिवेशनात मंजूर केले. कृषी क्षेत्रातल्या या सुधारणांचा लाभ दहा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. हे लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी या सुधारणांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. या कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा जो काही निर्णय असेल, त्याचा सरकार ��दरच करेल, असं ते म्हणाले. कृषी क्षेत्राबाबत एम एस स्वामिनाथन समितींच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि इतर अनेक पावलं देशातल्या शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार उचलत आहे, असं राष्ट्रपतींनी सांगितलं.
कोविड १९ ची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अशा संकट काळातही भारत जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे, असं ते म्हणाले. देशाच्या हितरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे. गलवान खोऱ्यातल्या घटनेचा निर्देश करुन त्यांनी सांगितलं की, भारताची सार्वभौमता जपण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अतिरिक्त बळ तैनात केलं आहे. देशाच्या या प्रगतीच्या प्रवासात महिलांचा सहभाग वाढत असून, त्यादृष्टीनंही सरकारनं अनेक निर्णय घेतले आहेत, असं कोविंद म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राममंदिर उभारणीला सुरुवात झाली आहे. यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ सुरु होत आहे, असं त्यांनी सांगितलं.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी, डावे आणि इतर पक्षांनी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला होता.
या अधिवेशनात येत्या सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
****
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल लोकसभेत २०२०-२१ या वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. या आर्थिक सर्वेक्षणानुसार पुढील आर्थिक वर्षात सकल देशातंर्गत उत्पादन- जीडीपीचा विकास दर, ११ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये सरकारी खर्चात वाढ झाल्यानं अर्थव्यवस्थेचा विकास दर सुधारण्याचे संकेत देण्यात आले आहेत. निर्यात आणि सरकारी खर्चात वाढ झाल्यानं अर्थव्यवस्थेची घसरण थांबण्यास मदत होणार असल्याचं, या सर्वेक्षणात म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षातील जीडीपीचा विकास दर सात पूर्णांक सात दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे. येत्या आर्थिक वर्षात विकास दर १५ पूर्णांक चार शतांश टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा प्राथमिक अंदाजही या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू साथीनंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येत असल्याची सविस्तर माहिती सर्वेक्षणात देण्यात आली असून, देशात सुरू करण्यात आलेली लसीकरणाची मोहिम, ही अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, असं या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आलं आहे. जीडीपीचा विकास दर वाढवण्यात कृषी क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र कोविड संकटामुळे सेवा, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात मोठी घट झाल्याचं सर्वेक्षणात म्हटलं आहे.
****
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आजपासूनचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय ज्य���ष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी घेतला आहे. काल त्यांनी पत्रकार परीषदेत याबाबत घोषणा केली.
नव्या कृषी कायद्यांविरोधात तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता यासह अन्य मागण्यांसाठी समाजसेवक हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांनी केलेल्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीमध्ये हजारे यांना निमंत्रित सदस्य म्हणून विशेष स्थान दिलं जाणार आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये ही समिती निर्णय घेऊन कार्यवाही करणार आहे. याबरोबरच लोकपाल आणि लोकायुक्त तसंच निवडणुक पद्धतींमध्ये सुचवलेल्या सुधारणांबाबत केलेल्या मागण्यांवरही चर्चा करण्यात आली असून, त्या मागण्याही लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत. केंद्र सरकारनं दिलेल्या आश्वासनांवर आपण समाधानी असल्याचं हजारे यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या सर्व उच्च शिक्षण संस्था तसंच महाविद्यालयातले प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरु करण्याची, आणि विद्यापीठातली संवैधानिक पदं भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी, राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. कोश्यारी यांनी राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची, काल दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे बैठक घेतली. शासनानं विद्यापीठांना संवैधानिक पदं भरण्याची अनुमती द्यावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाला केली. विद्यार्थ्यांची वसतीगृहं सुरु करण्याबाबत देखील लवकर निर्णय घ्यावा असंही राज्यपालांनी सांगितलं. बैठकीला उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता उपस्थित होते.
****
दिल्लीत इस्त्रायलच्या दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन, राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातील जनतेनंही सतर्क राहून आपल्या आजुबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
शक्ती कायद्यांतर्गत प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी राज्यात ३६ जिल्ह्यात ३६ न्यायालयं स्थापन करणार असल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं शक्ती कायद्यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. या न्यायालयांमध्ये या कायद्याशी निगडित प्रकरणांची जलद सुनावणी होऊन ४५ दिवसांत निकाल लागेल, असं देशमुख यांनी सांगितलं.  दरम्यान, गृहमंत्र्यांच्या हस्ते काल औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या कमांड कंट्रोल सेंटर, ज्येष्ठ नागरिक मदत कक्ष आणि एसएसएमएस क्यू आर स्कॅन प्रणालीचा शुभारंभ झाला, मुंबईच्या धर्तीवर सेल्फ बॅलन्सिंग स्कूटर प्रकल्प औरंगाबादेतही लवकरच राबवण्यात यावा, त्यादृष्टीनं कार्यवाहीच्या सूचना देशमुख यांनी दिल्या. गृह विभागामार्फत पोलिसांसाठी घरे उभारण्याबाबतही विविध प्रस्ताव आणि पर्यांयावर विचार सुरू असल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज ७३ पुण्यतिथी. हा दिवस देशभरात हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. दिल्लीतल्या राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधास्थळी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७१वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर तसंच तुळजापूर शहराच्या विकासासाठी नागरिकांनी ई-मेलद्वारे सूचना पाठण्याचं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात आमदार पाटील यांनी काल वार्ताहर परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. तुळजापूर इथं अद्ययावत नाट्यग्रह, क्रीडा संकुल तसंच उद्यानं विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तुळजापूर -उस्मानाबाद- सोलापूर या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
दुचाकी चालवतांना स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, असं आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केलं आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या हेल्मेट सेल्फी पॉईंट संकल्पनेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. वाहतुकीच्या इतर आवश्यक नियमांबाबत कामत यांनी मार्गदर्शन केलं.
****
राज्यात काल २ हजार ६१३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख २५ हजार ८०० रुग्ण या संसर्गातून बरे झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९५ पूर्णांक २८ शतांश टक्के झाला आहे. काल राज्यभरात २ हजार ७७१ नव्या बधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या बाधितांची एकूण संख्या २० लाख २१ हजार १८४ झाली आहे. राज्यात काल ५६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. या आजारामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ५१ हजार झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५२ शतांश टक्के एवढा आहे. राज्यात सध्या ४३ हजार १४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल चार कोविडबाधितांचा मृत्यू झाला, तर नव्या २१४ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या दोन, तर नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात काल ४७ रुग्ण आढळले. बीड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी ४३, औरंगाबाद जिल्ह्यात ३२, लातूर २५, उस्मानाबाद १७, परभणी ��ाच, तर हिंगोली जिल्ह्यात काल दोन नवे रुग्ण आढळले.  
****
वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्वांनी कोविड संसर्ग प्रतिबंधक लस टोचून घेण्याचं आवाहन औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी केलं आहे. ही लस सुरक्षित असल्याचं सांगताना त्या म्हणाल्या…
आपण आतापर्यंत जवळजवळ ४७०० लोकांच लसीकरण शहरात केलं आहे. मी देखील ही लस घेतलेली आहे. लस पुर्ण सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. प्रथम फेज मध्ये सगळे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्सच सुरु आहे. जे कोणी आहेत राहीलेत त्यांनी लवकर येऊन लसीकरण पुर्ण करुन घ्या. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्सच आपण करणार आहोत सेकंड फेज मध्ये आणि थर्ड फेज मध्ये जे नागरिक आहेत पन्नासच्या वरचे त्यांच लसीकरण करणार आहोत.
****
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी एटीएम मोबाईल कॅश व्हॅन सेवा सुरू करत असून यासाठी बँकेनं दोन फिरत्या व्हॅन खरेदी केल्या आहेत. या व्हॅन लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी दिली. बँकेची शाखा नसलेल्या गावांना प्रामुख्यानं या एटीएम मोबाईल कॅश व्हॅन सेवेचा उपयोग होईल, असं ते म्हणाले.
****
कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल या धोरणानुसार नांदेड शहरात भरवलेल्या संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचा काल माजी मंत्री डी पी सावंत, आमदार मोहनराव हंबर्डे आणि कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या रयत बाजारात २० ते २५ लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती जिल्‍हा कृषी अधिक्षक अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
या बाजारातून आपल्याला चांगला भाव मिळाल्याची भावना अर्धापूर तालुक्यातल्या मालेगावचे शेतकरी सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले…..
महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल शेतकरी ते थेट ग्राहक या उपक्रमाअंतर्गत गेली चार दिवस आम्ही या उपक्रमात सहभागी आहोत. जनतेने जो आम्हाला प्रतिसाद दिला. त्यामुळे आम्ही खरोखर शेतकरी भारावून गेलो आहोत. कारण यात दोन गोष्टी झाल्या आम्ही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. आणि ग्राहकांना विषमुक्त उत्पादन देण्यात आम्ही यशस्वी ठरलो.
 नांदेड तालुक्यातल्या वाडी बुद्रुकच्या महिला शेतकरी सविता पावडे यांनी, वर्षातून दोन ते तीन वेळा असे उपक्रम राबवण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या……
मी एक शेतकरी उत्पादक म्हणून मला असे वाटते वर्षातून फक्त एकदा असे पदर्शन न भरवता किमान दोन ते तीन वेळेस तरी व्हावे. या उपक्रमातून एक नवा मार्ग मिळून नवीन कृषी व्यावसायिक तयार होतील. शेत���त नवं चैतन्य येईल यासाठी मी ग्राहक, शासन, कृषी विभाग यांचे मनपूर्वक धन्यवाद.
****
लातूर शहरात गंजगोलाई परिसरातील एका दुकानाला काल आग लागली. बांधकाम  आणि शेतीशी संबंधित वस्तूच्या या दुकानाचं या आगीत मोठं नुकसानं झालं. आगीचं नेमकं कारण मात्र समजू शकलं नाही.
****
प्रशासन आपल्या गावी या उपक्रमाचा काल नांदेड जिल्ह्यात अर्धापूर महसूल मंडळात तसंच कंधार तालुक्यातल्या पांगरा महसूल मंडळात प्रारंभ झाला. या उपक्रमाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर, तसंच जनावरांचं लसीकरण शिबीर भरवण्यात यावं, जात तसंच उत्पन्न आदी प्रमाण पत्र, शिधापत्रिका, आधार कार्ड, पॅन कार्ड तात्काळ तयार करून वाटप करावं, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी यावेळी केल्या.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी कायद्यातल्या किचकट तरतुदी आणि केंद्र शासनाच्या धरसोड धोरणाविरोधात काल परभणीत जीएसटी भवनसमोर कर सल्लागार आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलन केलं. अनेक तरतुदीमुळे हा कायदा किचकट ठरला आहे, एक सुटसुटीत आणि साधा कायदा यावा, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.  
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कसबे तडवळे इथल्या जिल्हा परिषद शाळेत प्रस्तावित असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर सुरु करावं, या मागणीसाठी भीम सैनिकांच्या वतीनं काल लातूर-बार्शी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. १९४१ साली कसबे तडवळे इथं बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिली महार-मांग-वतनदार परिषद घेतली होती. या शाळेस शासनानं पर्यटन स्थळ आणि स्मारक घोषित केलं असून, यासाठी ८५ लाख ३१ हजार इतका निधी मंजूर केला आहे. हा निधी वितरीत करुन काम सुरु करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नुकत्याच दिलेल्या एका निकालाविरोधात भारतीय स्त्री शक्तीच्या लातूर शाखेनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अल्पवयीन मुलीला विवस्त्र न करता, तिच्या मर्जीशिवाय शरीराला हात लावणं म्हणजे लैंगिक शोषण नाही असा निकाल नागपूर खंडपीठानं नुकताच दिला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालायात केलेल्या दाव्यासाठी ॲड. प्रतिमा एन. लाकरा युक्तिवाद करतील अशी माहितीही संस्थेनं दिली आहे.
****
औरंगाबाद इथं ८ फेब्रुवारीला विभागीय स्तरावरील लोकशाही दिन आणि विभागीय महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात निराकरण न झालेल्या किंवा तक्रारदाराचं समाधान न झालेल्या प्रश्नांवर विभागीय लोकशाही दिनात सुनावणी घेण्या�� येणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 June 2019 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३० जून २०१९  सकाळी ७.१० मि. ****
·      आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची सूचना.
·       गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
·      महिलांना राजकीय आरक्षण देण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका - प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दानवे.
आणि
·      विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याची सूचना काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे. दिल्लीत काल त्यांनी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात राज्यातल्या पक्ष नेत्यांची बैठक घेतली, या बैठकीत बोलतांना त्यांनी ही सूचना केली. बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्याची पक्षाची तयारी असल्याचं सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहणार आहे, मात्र अद्याप दोन्ही पक्षात जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
दरम्यान, पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला.
****
सरकार पुढच्या वर्षीपर्यंत देशात 'एक शिधापत्रिका' योजना राबवणार आहे. या नव्या योजनेनंतर कुणीही गरीब व्यक्ती सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतरित झालेल्या नागरिकांनाही वितरण व्यवस्थेचा लाभ विनासायास घेता येईल. अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं असल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्रासह इतर दहा राज्यांनी याआधीच या योजनेचा लाभ देणं सुरु केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
‘स्टार्टअप इंडिया’योजने अंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात एकोणीस हजार ३५१ स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली असून, यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक तीन हजार ६६१ ‘स्टार्टअप’ उद्योगांची नोंदणी झाली आहे. वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्रानं आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक पटकवला आहे. राज्यात एकूण अडूसष्ट `स्टार्टअप`मध्ये ४४० कोटी ३८ लाख रुपयांची वैकल्पिक गुंतवणूक झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सहा आठवड्यांच्या उन्हाळी सुटीनंतर, सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज उद्यापासून सुरू होत आहे. अयोध्या राम जन्मभूमी प्रकरण, राफेल खरेदी प्रकरण आणि राहुल गांधी यांच्याविरोधातलं न्यायालय अवमान प्रकरण आदी संवेदनशील खटल्यांवर यापुढे सुनावणी होणं अपेक्षित आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या मार्गदर्शना��ाली सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज आपल्या संपूर्ण क्षमतेसह म्हणजे सर्व ३१ न्यायमूर्तींसह सुरू होईल, असं पीटीआय वृत्तसंस्थेनं नमूद केलं आहे.
****
गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत विविध विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर निश्चित ठोस उपाय शोधले जातील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
पावसामुळं पुण्यात काल भिंत कोसळून दगावलेल्या ���ंधरा जणांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. काल पहाटेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत बिहार आणि पश्चिम बंगालमधून आलेल्या कामगारांच्या कुटुंबातल्या पंधरा जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत आणि मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमानंतर लगेच, प्रादेशिक भाषांमधून पंतप्रधानांच्या संवादाचा अनुवाद प्रसारित होईल, आज रात्री आठ वाजता या अनुवादाचं पुन:प्रसारण केलं जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रम मालिकेचा हा ५४ वा भाग असेल. पंतप्रधानांच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच कार्यक्रम आहे.
****
महिलांना राजकीय आरक्षण मिळावं ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या आहेत असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं भाजप महिला कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा माधवी नाईक यांनी, येत्या राखीपौर्णिमेपासून सभासद नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीतल जाधव यांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या अश्विनी तुपडाळे यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल जाधव आणि भाजपच्या दिपाली लाड यांच्यात झालेल्या लढतीत दोघींनाही समान मतं मिळाली, त्यामुळे काढण्यात आलेल्या चिठ्ठीद्वारे जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली.
****
औरंगाबादच्या विश्व संवाद केंद्रातर्फे दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार यावर्षी बीडचे पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. प्रांत संघचालक मधुकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मंग��वारी या पुरस्काराचं वितरण औरंगाबाद इथल्या मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती देवगिरी प्रांतचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेटे यांनी दिली.  
****
क्रिकेट:
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यात सामना होणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी पाच सामन्यात भारतानं विजय मिळवला असून, एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही.
या स्पर्धेत काल पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा तर ऑस्ट्रेलियानं न्युझीलंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्ताननं पाकिस्तानला विजयासाठी २२८ धावांचं आव्हान दिलं होतं. या विजयानंतर गुणतालिकेत पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धेतल्या अन्य सामन्यात, ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा ८६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियानं विजयासाठी न्यूझीलंडला २४४ धावांचं लक्ष्य दिलं होतं, मात्र न्युझीलंडचा संघ ४४व्या  षटकांत १५७ या धावसंख्येवर सर्वबाद झाला.
****
विद्यापीठं फक्त परीक्षेपुरती मर्यादीत न राहता तिथून संशोधन होण्याची आवश्यकता त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर यांनी व्यक्त केली आहे. ते काल लातूर इथं गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. समाज बदलायचा असेल तर शिक्षण बदललं पाहिजे, राष्ट्राची आणि चारित्र्याची उभारणी शिक्षणामधून करण्याची गरज असल्याचं मत धारुरकर यांनी व्यक्त केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी, निमअर्कासह योग्य त्या उपाय योजना येत्या आठ दिवसात कराव्यात, असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी केलं.
****
राज्यात कालही अनेक भागात चांगला पाऊस झाला. औरंगाबाद शहरात काल रात्री तर, परभणी शहरासह जिल्ह्यात काल दमदार पाऊस पडला. मानवत, पाथरी, जिंतूर, सोनपेठ, तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर महानगरपालिकेनं केंद्र सरकारच्या ईईएसएल कंपनीसोबत पथदिव्यांबाबतचा करार केला आहे. यानुसार पहिल्या टप्यामध्ये सध्याचे पारंपारिक पद्धतीचे ९५ टक्के पथदिवे बदलण्यात येतील.
****
0 notes