#फरकामुळे
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
VIDEO: ‘०.५ सेंकद की किमत तुम क्या जानो…’, अवघ्या काही क्षणांच्या फरकामुळे हुकले अविनाशचे सुवर्ण पदक
VIDEO: ‘०.५ सेंकद की किमत तुम क्या जानो…’, अवघ्या काही क्षणांच्या फरकामुळे हुकले अविनाशचे सुवर्ण पदक
VIDEO: ‘०.५ सेंकद की किमत तुम क्या जानो…’, अवघ्या काही क्षणांच्या फरकामुळे हुकले अविनाशचे सुवर्ण पदक Avinash Sable Medal: अविनाश आणि अब्राहम किबिव्होट यांच्यात अखेरच्या टप्प्यापर्यंत कमालीची चुरस होती. CWG 2022: बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. शनिवारी (६ ऑगस्ट) स्पर्धेच्या नवव्या दिवशी अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला दोन ऐतिहासिक पदकं…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 February 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ दुपारी १.०० वा. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान खरेदी करारात उद्योजक अनिल अंबानी यांचे दलाल असण्याप्रमाणे भूमिका पार पाडली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. आपल्याला राफेल करारातलं कंत्राट मिळणार, हे अनिल अंबानी यांना आधीपासून ठाऊक होतं, या करारात पंतप्रधानांची भूमिका गोपनीयतेचा भंग कर��ारी तसंच राष्ट्रीय सुरक्षेला बाधक असल्याची टीका गांधी यांनी केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. नियंत्रक आणि महालेखापाल कॅगचा राफेल करारासंदर्भातला अहवालही गांधी यांनी फेटाळला आहे. **** विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी, आजही कामकाज सुरू होताच, विविध विषयावरून घोषणाबाजी सुरू केली, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी, याबाबत नाराजी व्यक्त करत, सदनात पत्रकं झळकावत कामकाजात अडथळा आणणं योग्य नसल्याचं सांगत, प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही सदस्यांची घोषणाबाजी सुरूच होती. राज्यसभेत शून्यकाळात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, कोळसा शाळांमधल्या शिक्षकांना तुटपुंज्या वेतनासह इतर समस्यांकडे लक्ष वेधलं. या शिक्षकांना इतर शिक्षकांप्रमाणे वेतन देण्याचे निर्देश असूनही, त्यावर अंमलबजावणी झालेली नाही, याबाबत चौकशी करून, योग्य कार्यवाही करण्याची मागणी राऊत यांनी केली. काँग्रेसचे खासदार मोतीलाल व्होरा यांनी, साखरेचा दर प्रतिकिलो ३५ रुपये करावा अशी मागणी केली. साखर कारखान्यांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देयकं थकवली असून, ही थकबाकी त्यांना अदा करता यावी, यासाठी साखरेचे दर वाढवावेत अशी मागणी व्होरा यांनी केली. भाजपचे खासदार विकास महात्मे यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्याकडे सदनाचं लक्ष वेधलं. धनगडांना मिळणारा आरक्षणाचा लाभ, फक्त उच्चारातल्या फरकामुळे धनगरांना मिळू शकत नसल्याचं, ते म्हणाले, या प्रकरणी लक्ष घालून, धनगरांनाही आरक्षणाचे लाभ लागू करावेत, अशी मागणी महात्मे यांनी केली. दरम्यान, शून्य प्रहरात मुद्दा उपस्थित करण्यावरून, समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे सभापतींनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. **** देशभरात आंदोलन करत असलेल्या एक लाखांहून अधिक वकीलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असं आश्वासन केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलं आहे. ते आज राज्यसभेत शून्य प्रहरात बोलत होते. देशभरातल्या न्यायालयांमध्ये पायाभूत सुविधांसह इतर मागण्यांसाठी वकिलांचं आंदोलन सुरू आहे. **** केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचे माजी संचालक एम नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयानं, न्यायालय अवमानना प्रकरणी दोषी ठरवत, एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. न्यायालयाचं आजचं कामकाज संपेपर्यंत एका कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षाही न्यायालयानं राव आणि कार्यकारी संचालक एस बासू राम यांना सुनावली आहे. बिहारमधल्या निराधार गृहातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करणारे सीबीआयचे अधिकारी ए के शर्मा यांची, न्यायालयाचे आदेश डावलून, जाणीवपूर्वक बदली केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. **** उद्योजक रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या आई मौरीन वाड्रा यांची आज राजस्थानात जयपूर इथं अंमलबजावणी संचालनालयात चौकशी झाली. बिकानेर जमीन घोटाळा प्रकरणात ही चौकशी करण्यात आली. संचालनालयानं यापूर्वी तीन वेळा वाड्रा यांना जयपूर इथं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र ते हजर झाले नव्हते. बिकानेर जमीन वाटपात कथित घोटाळा झाल्यावरुन बिकानेरच्या तहसीलदारांनी राजस्थान पोलिसांकडे तक्रार केली होती. त्या संदर्भात पोलिसांनी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालाची दखल घेऊन अ��मलबजावणी संचालनालयानं २०१५ साली हा खटला दाखल केला. **** दिल्लीमध्ये हवाला ऑपरेटर्स चालवत असलेलं सुमारे २० हजार कोटी रुपयांहून अधिक व्यवहाराचं मनी लाँड्रींग रॅकेट आयकर विभागानं उघडकीला आणलं आहे. जुन्या दिल्ली भागात गेले काही आठवडे आयकर विभागानं घातलेल्या छापासत्रानंतर ही बाब समोर आली. यामध्ये हवाला ऑपरेटर्सचे तीन गट कार्यरत असल्याचं, या तपासात समोर आलं आहे. **** जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले, तर एक जवान जखमी झाला. या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाल्याचं वृत्त आहे. ***** ***
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुननं सोडलं मौन, वयातील अंतराबाबत म्हणाला…
मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुननं सोडलं मौन, वयातील अंतराबाबत म्हणाला…
मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुननं सोडलं मौन, वयातील अंतराबाबत म्हणाला… मलायका आणि अर्जुन जवळपास ५ वर्षं एकमेकांना डेट करत आहेत. पण त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांना नेहमीच ट्रोल केलं जातं. The post मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुननं सोडलं मौन, वयातील अंतराबाबत म्हणाला… appeared first on Loksatta. अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दोघंही नेहमीच…
View On WordPress
0 notes