Tumgik
#दक्षिण गट
airnews-arngbad · 8 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १३ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थयी सदस्यत्व द्यायला तसंच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेनं आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतल्या अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थॉमस ग्रीन फील्ड यांनी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करयाला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. भारत, जपान, आणि जर्मनी या देशांना सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे, मात्र काही देशांचा या नवीन संशोधन परिषदेला विरोध आहे.
****
कोलकाता आर जी कार रुग्णालयाच्या घटनेच्या निषेधार्थ सुरु पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेलं आंदोलन आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची माफी मागत, राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणी आंदोलकांसोबत काल प्रस्तावित असलेली बैठक झाली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं बैठकीचं थेट प्रसारण दाखवणं शक्य नसल्याचं सरकारनं सांगितल्यानंतर आंदोलक प्रतिनिधीनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवत, कामावर रुजू व्हावं, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
****
काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपानं तीव्र भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपा पक्ष आज याविरोधात आंदोलन करणार आहे, ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ‘चा अशी हाक भाजपानं दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होणार आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  या उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या  उपक्रमासाठी  आतापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून,  या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी, कोल्हापूरच्या सीमा बायोटेक, आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन आणि प्रशिक्षण मिळावं, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले आहेत.
****
रायगड जिल्ह्यात धाटाव एमआयडीसीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोहोचला, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
****
बुलडाणा जिल्ह्यात काल वेगवेगळ्या घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातली एक महीला घरून शेताकडे निघाली असतांना विहिरीत पडून तिचा मूत्यू झाला. अन्य एका घटनेत खामगाव तालुक्यातलाच आठ वर्षीय यश बोदडे हा मुलगा आपल्या घराजवळ खेळताना पुलावरून नदीपात्रात पडला, वाहत्या पाण्य्याच्या प्रवाहाने वाहत जाऊन त्याचा मूत्यू झाला. तर तीसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यातल्या जहागीरपूर इथल्या एका १४ वर्षीय मुलाचा नदीपात्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या दक्षिण आशियाई कनिष्ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने शानदार प्रदर्शन करत नऊ सुवर्ण पदकं पटकावली. भारताच्या अनिशाने थाळीफेक प्रकारात पहिलं सुवर्ण पदक जिंकलं, तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत निरु पाठकनं देखील सुवर्ण पदकाची कमाई केली.
****
ब्रुसेल्स इथं आजपासून सुरु होणार्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहे. सध्या १४व्या क्रमांकावर असलेला अविनाश आज अंतिम फेरीत पदार्पण करेल.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी दोन दरवाजे आज बंद करण्यात आले असून, विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या चार दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दक्षिण आफ्रिकेत मध्यरात्री एका बारमध्ये प्रचंड गोळीबार, 14 ठार
दक्षिण आफ्रिकेत मध्यरात्री एका बारमध्ये प्रचंड गोळीबार, 14 ठार
दक्षिण आफ्रिकेत मध्यरात्री एका बारमध्ये प्रचंड गोळीबार, 14 ठार दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या सोवेटो टाऊनशिपमधील बारमध्ये सामूहिक गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.  दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या सोवेटो टाऊनशिपमधील बारमध्ये सामूहिक गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी रात्री उशिरा एका मिनीबस टॅक्सीमध्ये पुरुषांचा एक गट…
View On WordPress
0 notes
onlinekhabarapp · 5 years
Text
फुटबल खेल्न छाडेर बाख्रापालनमा
२१ माघ, कञ्चनपुर । दश वर्षसम्म नेपाली जुनियर फुटबल टिममा सक्रिय फुटबलर वीरेन्द्रबहादुर चन्द यतिबेला गृहनगर कञ्चनपुरको भीमदत्तनगरमा व्यावसायिक रुपमा बाख्रापालनमा लागेका छन् ।
विगतमा यु–१३ र १४ नेपाली फुटबल टोलीको कप्तानीसमेत गरेका चन्द यु–१९ सम्मको फटुबलमा गोलकिपरको भूमिकामा थिए । दक्षिण एशियाली खेलकूद प्रतियोगिता (साग) स्तरसम्मको फुटबलको अनुभव लिइसकेका चन्द २०७३ सालमा खेलबाट अलग्गिएका थिए ।
‘सानैदेखि आफ्नै ठाउँमा केही गर्ने चाहना थियो’, गोवरियामा रहेको चन्दाज गट एण्ड एग्रिकल्चर फर्म सञ्चालन गरिरहेका फुटबलर चन्दले भने ‘बुबासितको सल्लाहबमोजिम काठमाडौंमा विलासी दैनिकीलाई प्रवाह नगरी गृहनगर आएर बाख्रापालन शुरु गर्‍यौं ।’
वीरेन्द्र विसं २०५८ देखि जिल्ला फुटबल सङ्घको नेतृत्व हुँदै एन्फाको केन्द्रीय सदस्यसमेत रहिसकेका फुटबलप्रेमी गणेशबहादुर चन्दका जेठा छोरा  हुन् । निर्माण व्यवसाय क्षेत्रमा लामो समय काठमाडौंमा काम गरेका चन्दले आफू २५ वर्षदेखि खेल क्षेत्रको व्यवस्थापकीय भूमिकामा ��हेको बताए ।
‘सुदूरपश्चिम प्रदेशमा मासु आयात विस्थापन गर्ने अवधारणाका साथ लागेका छौं’, चन्दले भने, ‘यहाँका किसानसित सहकार्य गरेर १०० आधुनिक बाख्रा फर्म सञ्चालनमा ल्याउने लक्ष्य पनि छ ।’
‘सोच बदलौं जुन काम गरे पनि स्वदेशमै गरौं भन्ने भावले छोरालाई बाख्रापालनमा सक्रिय बनाएँ”, हाल जिल्ला फुटबल सङ्घ कञ्चनपुरका अध्यक्षसमेत रहेका चन्दले भने, ‘कान्छो छोरा इञ्जिनियर र छोरी डाक्टर भइसके ।’
आफू जन्मेको ठाउँमा केही गर्नुपर्छ भन्ने भावनाका साथ छोरासँगको सल्लाहमा बाख्रपालन थालेको गणेशबहादुरले बताए । तीन करोड रुपैयाँको लागतमा अत्याधुनिक खोरसहित व्यावसायिक बाख्रापालनमा लागेका चन्दले अष्ट्रेलियाबाट बाख्रा भित्र्याएका छन् ।
‘छोरालाई व्यावसायिक रुपमा बाख्रापालनमा लगाउनैका लागि विभिन्न अध्ययन अवलोकन गरेर अघि बढेको हुँ’, गणेशबहादुरले भने, ‘अहिले आधुनिक प्रविधिबाट बाख्रपालन हेर्न देशका विभिन्न ठाउँबाट अवलोकनकर्ता दिनहुँजसो आउँछन् ।’
फुटबलको जुनियर टिममा महत्वपूर्ण भूमिका निर्वाह गरेका वीरेन्द्रले आफू सिनियर टिमको बन्द प्रशिक्षणसम्म सहभागी भएको बताए । ‘अझै पनि फुटबलको व्यवस्थापकीय भूमिकामा आउने सोच छ’ उनले भने, ‘बाख्रापालनलाई बढाउँदै सुदूरपश्चिममा बाह्य मासु खपत कम गर्ने योजना छ ।’
चन्दले एक बिघा जमिनमा खोर बनाएर बाख्राका लागि छ बिघा खेतमा घाँसखेती गरिएको जानकारी दिए । ‘सुदूरपश्चिम प्रदेशमा मासु आयात विस्थापन गर्ने अवधारणाका साथ लागेका छौं’, चन्दले भने, ‘यहाँका किसानसित सहकार्य गरेर १०० आधुनिक बाख्रा फर्म सञ्चालनमा ल्याउने लक्ष्य पनि छ ।’
व्यावसायिक रुपमा अष्ट्रेलियाबाट उन्नत जातको बाख्रा भित्र्याउन प्रक्रियागत झन्झट रहेको चन्दको दुखेसो छ । ‘किसानलाई भारतलगायत अन्य मुलुकबाट कृषि औजार भित्र्याउन भन्सार शुल्क सहुलियत हुने कुरा पनि गफजस्तै रहेछ’, चन्दले भने, ‘अझै दोस्रो चरणमा अष्ट्रेलियाबाट बाख्रा ल्याउने तयारी छ ।’
‘बोयर’ जातको बाख्रा पोषणका लागि सहज र रोगसँग लड्न सक्ने क्षमता बढी हुने भएकाले बाख्रापालन फस्टाउनेमा उनी आशावादी छन् ।
‘यहाँ आउनुअघि काठमाडौँमा पनि बाख्रापालनको विषयमा तालीम लिएर आएँ’, चन्दले भने, ‘फिल्डमा काम गर्दै जाँदा पनि अनुभव बढ्दै गएको छ ।’ अष्ट्रेलियामा प्रतिबोयर दुई लाख २६ हजार पर्ने ५३ उन्नत जातका बाख्रा भीमदत्तनगर पहिलो पटक भित्र्याउनुभएका चन्दले २०० बाख्रा अटाउने क्षमताको आधुनिक खोरसमेत निर्माण गरेका छन् ।
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्याय प्रक्रियेला गती मिळेल- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
विधानपरिषदेच्या चार पैकी तीन जागांचे निकाल जाहीर, महाविकास आघाडीला दोन जागा
पेपरफुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार जाहीर
आणि
चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा दक्षिण अफ्रिकेवर दहा खेळाडू राखून विजय
****
देशभरात कालपासून लागू झालेल्या सुधारित फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं असून, न्यायप्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायपालिका तसंच पोलिस प्रशासनात संबंधितांना माहिती दिली जात असून, यासाठी देशपातळीवर प्रशिक्षक नेमण्यात आल्याचं, शहा यांनी सांगितलं.
****
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, तर एका जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. नाशिक शिक्षक मतदारसंघात काल रात्री उशीरा दुसऱ्या क्रमांकाची मतं मोजण्यास प्रारंभ झाला होता. याठिकाणचा अधिकृत निकाल अद्याप हाती आला नाही. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर, मुंबई शिक्षक मतदारसंघातून जगन्नाथ अभ्यंकर विजयी झाले. कोकण पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवर आहेत. 
****
अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात, पुढील तीन महिन्यात निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात केली. याबाबत शिक्षक संघटनांशी बोलून त्यात यशस्वी मार्ग काढण्यात आला आहे, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा प्रस्ताव मात्र अद्याप प्रलंबित असून, त्यांच्याकडील परिपूर्ण माहिती आल्यावर हा निर्णय घेतला जाणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
पेपर फुटी रोखण्यासाठी चालू अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचं आश्वासन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. राज्यातल्या पेपर फुटीच्या संदर्भात काल विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना ते बोलत होते. गट क श्रेणीतल्या पदांची भरती एमपीएससी मार्फत होणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात आणखी ३१ हजारांहून अधिक पदांची भरती सुरू असून, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
****
दिल्लीतल्या साकेत न्यायालयानं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दोन दशकांहून अधिक जुन्या मानहानी प्रकरणी, पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीचे सध्याचे उपराज्यपाल असलेले विनय कुमार सक्सेना, हे २००१ मध्ये एका गैर सरकारी संस्थेचे अध्यक्ष असतांना, त्यांनी पाटकर यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साकेत न्यायालायात पाठवण्यात आलं होतं. या न्यायालयानं २५ मे रोजी पाटकर यांना मानहानी प्रकरणी दोषी ठरवलं होतं.
****
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
काँग्रेस पक्षानं प्रज्ञा सातव यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काल याबाबतचं पत्रक जारी केलं.
****
कृषी क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यभरात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. 
मुंबईत वसंतराव नाईक कृषि संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानद्वारे वसंतराव नाईक पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. कृषी मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ कृषी पत्रकार श्रीकांत कुवळेकर यांना कृषी पत्रकारिता पुरस्कार, धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या राहोड इथल्या कन्हैय्यालाल बहुउद्देशीय संस्थेला यंदाचा सामाईक पुरस्कार, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाला उल्लेखनीय कृषी योगदान पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.
राज्यात अन्नधान्याची जेव्हा टंचाई होती, तेव्हा वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करण्यासाठी अनेक महत्वाच्या योजना आणल्या, त्यातून मोठी हरित क्रांतीदेखील घडून आली, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी वसंतराव नाईक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
आता आपण जवळपास ११ लाख हेक्टर सरकारी जमीन आणि १० लाख हेक्टर शेतकऱ्यांची जमीन अशा एकूण २१ लाख हेक्टर जमीनीवर बांबू लागवडीचं उद्दीष्ट ठेवल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात, १०० वा शास्त्रज्ञ आणि शेतकरी संवाद कार्यक्रम काल पार पडला. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह मान्यवरांनी, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरातल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास महापालिकेसह विविध शासकीय, सामाजिक संस्थाच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, विशेष चर्चासत्र पार पडलं.
लातूर जिल्ह्यात उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काल अनावरण करण्यात आलं. वसंतराव नाईक यांनी केलेलं काम आजही सर्वांस���ठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असल्याची भावना, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केली.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हिंगोली शहर तसंच जिल्ह्यात कृषी दिन विविध उपक्रम तसंच वृक्षारोपणानं साजरा करण्यात आला.
धाराशिव इथं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सारथी जिल्हा परिषद शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक विकास गोडसे यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. विविध पुरस्कातप्राप्त शेतकर्यांचा या यावेळी सत्कार करण्यात आला.
****
'नीट'पेपर फुटीसंदर्भात लातूर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय कडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकाने काल लातूर न्यायालयात याबाबत केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली. या प्रकरणी अटकेत असलेले जमील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींच्या हस्तांतरणाची प्रक्रियाही सीबीआयच्या पथकाने काल पूर्ण केली. त्यांचा ताबाही सीबीआयला सोपवण्यात आला. दरम्यान, या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असून, आज दुपारी त्यांना न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे.
****
नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजवणीबाबत काल परभणी जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. शहरातल्या नवीन मोंढा पोलिस ठाण्यात पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आणि कायदे तज्ञ रमण दोडिया यांनी नागरीकांना कायद्यांची माहिती दिली.
****
आषाढी वारीसाठी पैठणहून पंढरपूरला निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा काल अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या मिडसावंगी इथं पार पडला. हजारो वारकरी यामध्ये सहभागी झाले होते.
मुक्ताईनगर इथून निघालेली श्री संत मुक्ताबाईंची पालखी काल बीड जिल्ह्यात दाखल झाली. गेवराई इथं भाविकांनी भर पावसात पालखीचं स्वागत केलं.
नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातून पंढरपूरकडे निघालेल्या साधू महाराज पायी दिंडी वारीला काल लातूर जिल्ह्याच्या सीमेवर निरोप देण्यात आला. यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
महिला क्रिकेटमध्ये, चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा दहा खेळाडू राखून पराभव केला. सामन्याच्या काल अखेरच्या दिवशी पाहुण्या संघाचा दुसरा डाव ३७३ धावांवर आटोपला. भारताने विजयासाठी आवश्यक ३७ धावा दहाव्या षटकांत बिनबाद पूर्ण केल्या. सामन्यामध्ये दहा बळी घेणारी स्नेह राणा सर्वोत्तम खेळाडू ठरली. या दोन संघांमध्ये होणाऱ्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना येत्या शुक्रवारी चेन्नई इथं होणार आहे.
****
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, आणि थकीत पीक विमा तत्काळ द्यावा तसंच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
बीड इथं काल बँक ठेवीदारांनीही आंदोलन केलं. जिल्ह्यातल्या अनेक पतसंस्थांना कुलूप लागलं असून, नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या बँकामध्ये अडकल्या आहेत. या ठेवी परत मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळवण्यासाठी दामिनी ॲप वापरण्याचं आवाहन, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. हे अॅप जीपीएस लोकेशनच्या आधारे वीज पडण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी सूचना देतं. नागरिकांनी पावसाळ्यात जल पर्यटन करतांना सतर्क राहावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्याच्या आठही तालुक्यात चालू वर्षी आतापर्यंत सरासरी २२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरीपाच्या ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही दिवसांच्या खंडानंतर पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पिकांना जीवदान मिळालं असून दुबार पेरणीचं संकट टळलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आज नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनं सुरु झालं. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी माहताब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ दिली.
दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तृहरी माहताब यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली. तीन जुलै पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी परवा २६ जून रोजी निवडणूक होणार असून, २७ तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरु होणार आहे.
****
दरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे खासदार आज संसदेत संविधानाची प्रत घेऊन आले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, यांच्यासह इतर पक्षाच्या खासदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 
****
सरकार चालवण्यासाठी बहुमत लागतं मात्र देश चालवण्यासाठी एकतेची गरज असते, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या १० वर्षात आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. जगातली सर्वात मोठी निवडणूक शानदार झाली, ही गौरवाची बाब असल्य���चं त्यांनी नमूद केलं. देशात चांगल्या आणि योग्य विरोधी पक्षाची आवश्यकता असून, यापुढेही सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं असल्याचं, पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
यंदाच्या हज यात्रेदरमयान तेराशे यात्रेकरुंचा उष्णतेच्या संबंधीत विविध कारणांने मृत्यू झाल्याचं, सौदी अरेबियानं सांगितलं आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक लोक वयोवृद्ध तसंच सहव्याधी असलेले होते, मात्र बहुतांश मृत्यू उष्णतेच्या लाटेमुळेच झाले असल्याचं, त्यांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे.
****
सौरउर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यानं साखर कारखान्यांनी सौरउर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्याबाबत विचार करण्यासंबंधीच्या सूचना, साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागातले साखर कारखाने हरित उर्जा तयार करणारे मोठे स्त्रोत आहेत, हरित हायड्रोजन निर्मितीसाठी कारखान्यांना मोठी संधी प्राप्त होणार आहे. हरित उर्जा, सौर उर्जेद्वारे तयार केल्यास ती वर्षभर मिळू शकते, असंही खेमनार यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या यंदाच्या मधुमित्र पुरस्कारासाठी, अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या अंबड इथले शेतकरी राजू कानवडे यांची निवड झाली आहे. मधमाशापालन हा व्यवसाय निसर्ग संवर्धनासाठी आणि शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असून, मधमाशांची भुमिका महत्वाची असल्यानं, या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावं हा या पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे. उद्या २५ जूनला पुण्यात या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
विधवा महिलांना सन्मान दिला पाहिजे, तसंच महिलांनी स्वावलंबी होऊन कुटुंबाला देखील आधार दिला पाहिजे, असं मत काल नाशिक इथं आयोजित विधवा मेळाव्यात व्यक्त करण्यात आलं. जागतिक विधवा महिला दिनाच्या निमित्तानं नाशिकच्या रुंग्टा महाविद्यालयात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विधवा महिलांच्या विविध प्रश्न आणि समस्यांवर मंथन करण्यात येऊन त्यातून मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक विधवा महिलांनी आपल्या समस्या मांडल्या.
****
छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी समांतर जल वाहिनी च्या कामाचा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल प्रत्यक्ष कामाचा ठिकाणी जाऊन आढावा घेतला. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सुचना सावे यांनी संबंघित अधिकाऱ्यांना दिल्या.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एट फेरीच्या गट एकमध्ये गुणांकनानुसार पहिल्या स्थावर असलेल्या भारताचा आज ऑस्ट्रेलियासोबत सामना होणार आहे. सेंट लुसिया इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.
दरम्यान, या स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे तीन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या संघानं निर्धारित षटकात आठ बाद १३५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे १७ षटकात १२४ धावांचं आव्हान देण्यात आलं, ते या संघाने पाच चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं.
****
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातल्या चिमठाणे आणि दुसाणे मंडळात काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे या मंडळातल्या अनेक गावांमध्ये शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी पशुधन दगावल्याचं देखील वृत्त आहे. दराणे, रोहाणे गावातून वाहनाऱ्या पाटली नाल्याला मोठा पूर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
मुंबईत सुरू असलेल्या अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 'मिफ' मध्ये आज पहिल्या 'डॉक फिल्म बाजार'चं उद्घघाटन प्रसिद्ध निर्माते अपूर्व बक्षी यांच्या हस्ते झालं. नवोदित माहितीपट निर्मात्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणं आणि संभाव्य निर्मात्यांना त्यांचं कार्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ देणं हे  'डॉक फिल्म बाजार'चं उद्दिष्ट आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी या 'डॉक फिल्म बझार'मध्ये सहभागी विविध देश आणि संस्थांच्या दालनांना भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.
****
भारतीय रेल्वेची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. विविध सार्वजनिक सेवा कार्यक्रमात अधिकाधिक लोकांच्या सहभागाबद्दल ही नोंद झाली आहे. रेल्वेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी विविध दोन हजार स्थळांवर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये ४० लाख, १९ हजार लोकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, रेल्वे पूल, रस्त्यांचं उद्घघाटन, नव्या रेल्वेस्थानकांची पायाभरणीही झाली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० जून रोजी रविवारी अकरा वाजता 'मन की बात' कार्यक्रमात जनतेशी संवाद साधतील. आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा हा एकशे अकरावा भाग असेल. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच मन की बात कार्यक्रम असेल.
****
लातूर जिल्ह्यातील इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले -प्रमाणपत्रं त्यांच्या जवळच्या परिसरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यासाठी येत्या १८ जून ते दोन जुलैदरम्यान महाराजस्व अभियान राबवलं जाणार आहे. लातूर तालुक्यात या कालावधीत ६६ महा ई-सेवा केंद्रांद्वारे लातूरच्या दहा शाळा, अन्य आठ महसूल मंडळात होणाऱ्या शिबिरांतून दहा हजार प्रमाणपत्रं वितरणाचं प्रशासनाचं उद्दीष्ट आहे.
****
शेगावहून पंढरपूरला निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी आज दुसऱ्या दिवशीही अकोल्यात मुक्कामी आहे. शहरात दिवसभर पालखीची परिक्रमा सुरु असून हजारो भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली आहे. उद्या ही पालखी वाशिमकडं प्रस्थान करणार आहे. दरम्यान, काल अकोल्यात या पालखीचं आगमन झालं असून कालही मध्यरात्रीपर्यंत असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
****
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातल्या सावळी इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांना काल पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते मोफत गणवेशाचं वाटप झालं. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीसह दारिद्र्य रेषेखालील मुलांना याचा लाभ झाला आहे.
दरम्यान, गणवेश तयार करण्याचं काम स्थानिक महिला बचत गटांनी केल. त्यामुळे या बचतगटांनाही अर्थसाह्य मिळाल्याचं पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी नमूद केलं.                                  ****
निसर्ग नियमांवर आधारित आरोग्यदायी जीवनपद्धतीचं मार्गदर्शन करणाऱ्या निसर्गधारा ही मोफत कार्यशाळा आज छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. शहरातील तापडिया नाट्यमंदिर इथं दुपारी पावणेतीन वाजता या कार्यक्रमात नाशिकच्या योग विद्या गुरुकुलचे योगगुरु डॉक्टर विश्वास मंडलीक निसर्गोपचाराची प्रात्यक्षिकं दाखवणार आहेत.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंडवर पाच गडी राखून विजय मिळवला. दरम्यान, काल भारत-कॅनडा संघांदरम्यानचा सामना पावसामुळं रद्द झाल्यानं उभय संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे.
या स्पर्धेत भारत प्राथमिक साखळी फेरीत अ गटातून अव्वल स्थान मिळवत सुपर एट फेरीत गट एक मध्ये दाखल झाला आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया,अफगाणिस्ताननं आपलं स्थान पक्क केलं आहे. दरम्यान, या गटातील चौथ्या स्थानासाठी बांग्लादेश आणि नेदरलँड यांच्यात चुरस आहे. सुपर एटच्या गट दोन मध्ये अमेरीका, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिजनं आणि इग्लंड संघांनं आपलं स्थान पक्क केलं आहे. सुपर एट फेरीत भारताचे २०, २२ आणि २४ जून रोजी सामने होणार आहेत.                                 ****
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. दरम्यान, कोकणात बऱ्याच ठिकाणी वीजांसह पावसाची शक्यता आहे, येत्या तीन ते चार तासांत कोल्हापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यादरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याचा अंदाजही पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे
                               **** पंजाब, हरयाणा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यासह दिल्लीत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशातही अशीच स्थिती आहे. याभागात सध्या रात्रीच्या वाढत्या तापमानाचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा उष्ण दिवसांचं प्रमाण जास्त आहे, असं हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर. के जेनामनी यांनी आकाशवाणीला सांगितलं आहे.                              ****
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 12 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या २४ जून पासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांची शपथ, लोकसभा अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचं अभिभाषण होणार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. हे अधिवेशन तीन जुलै पर्यंत चालेल. राज्यसभेचं अधिवेशन देखील २७ जून ते तीन जुलै पर्यंत होणार आहे.
****
तेलगूदेशम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाब नायडू यांनी आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजयवाडा इथं झालेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून मोहन चरण मांझी आज शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी भूवनेश्वर इथं होणार्या या सोहळ्याला देखील पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.
****
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम पुरस्काराच्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा केली. यावर्षी तीन श्रेणींमध्ये ३३ पुरस्कार दिले जातील. इंग्रजीसह बावीस भारतीय भाषांमध्ये काम करणाऱ्या मुद्रित, दृकश्राव्य आणि रेडिओ श्रेणींमध्ये हे सन्मान प्रदान केले जातील. प्रसारण मंत्रालयात नोंदणीकृत प्रसारण कंपन्या या पुरस्कारासाठी आठ जुलै पर्यंत अर्ज करु शकतात.
****
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा तिढा सुटला असून, या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे निवडणूक लढवणार आहेत. तर मुंबई पदवीधर आणि शिक्षक तसंच कोकण पदवीधर मतदार संघाची जागा काँग्रेस लढवणार असल्याचं महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलं आहे.
****
उष्माघाताने मृत रुग्णांना मदत मिळण्याबाबत नैसर्गिक आपत्तीचा निकष लावावा, जेणेकरून आपदग्रस्तांना आर्थिक मदत मिळेल अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची नोंद होत ��ाही त्यामुळे याबाबत आढावा शासन स्तरावून घेण्यात यावा, तसंच उष्माघाताने मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदतीचा निकष ठरवण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करावी, अशा सूचना ही गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
****
ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथल्या औद्योगिक वसाहतीमधल्या इंडो अमाईन आणि अन्य एका कंपनीला आज सकाळी आग लागली. अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने आग विझवण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या कंपन्यांमध्ये कोणी कामगार अडकले आहेत का, याचा शोध सुरु आहे. त्याचबरोबर आसपासच्या विविध कंपन्यांनी तातडीने सगळ्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ उद्या विद्यापीठाच्या नाट्यगृहात होणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सकाळी अकरा वाजता समारंभाला सुरूवात होईल, विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळांवरुन या समारंभाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना अमेरिकेसोबत होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भरतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. गुणतालिकेत अ गटात भारत पहिल्या तर अमेरिका दुसर्या स्थानावर आहे.
या स्पर्धेत आज झालेल्या अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियानं नामिबियाचा नऊ गडी राखून पराभव केला. तर श्रीलंका आणि नेपाळ दरम्यानचा सामना खराब हवामानामुळे रद्द झाला.
****
दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन इथं पार पडलेल्या कॉमरेड मॅरेथॉन स्पर्धेत अमरावतीच्या धावपटूंनी ११ तासात ९० किलोमीटर धावत विक्रम प्रस्थापित केला आहे. यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक दिलीप पाटील, दीपमाला साळुंखे, पोलीस निरिक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलीस कर्मचारी राजेश कोचे, पोलीस निरिक्षक सतिश उमरे यांचा समावेश आहे.
****
डिसेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या हॉकी पुरुष कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारताला देण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कार्यकारी मंडळानं काल स्वित्झर्लंड मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
****
सोलापूर शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्यानं ओढे, नदी, नाल्यांना पूर आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पूलावर आलेल्या पाण्यात तीन जण वाहून गेले. काल रात्री ही घटना घडली. यापैकी एकाचा शोध लागला असून, दोन जण अद्याप बेपत्ता आहेत.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएची २९० जागांसह बहुमताकडे वाटचाल-२३४ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार पुढे.
महाराष्ट्रातून अनिल देसाई, नारायण राणे, सुनील तटकरे, अनूप धोत्रे, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, हेमंत सावरा, तसंच गोवाल पाडवी विजयी.
औरंगाबादहून संदिपान भुमरे यांना एक लाखावर तर बीडमधून पंकजा मुंडेंना २२ हजार मतांची आघाडी-जालन्यातून रावसाहेब दानवे पिछाडीवर.
आणि
देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीकडून व्यक्त.
****
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएची बहुमताकडे वाटचाल दिसून येत आहे. त्यांना जवळपास २९० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर २३४ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्षानं १७, काँग्रेसनं चार, जनता दलानं दोन, तर शिवसेना ठाकरे गट, आम आदमी पक्ष आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चानं प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
भाजपनं २२७ जागांवर आघाडी मिळवली असून, सर्वात मोठा पक्ष ठरण्याकडे भाजपची वाटचाल सुरू आहे. काँग्रेस ९४ जगांवर आघाडीवर असून, इतर पक्षांचे उमेदवार १८ जागांवर आघाडीवर आहेत.
****
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी काँग्रेस सर्वाधिक १२ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ११, शिवसेना ठाकरे गट दहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सात, शिवसेना सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
****
दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई ५३ हजार ३८४ मतांनी विजयी झाले.
****
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून स्मिता वाघ यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे.
****
रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या एकूण २४ फेऱ्या झाल्यानंतर राणे यांच्याकडे जवळपास ४० हजार मतांची आघाडी आहे.
****
पालघर मध्ये भाजपचे हेमंत सावरा एक लाख ८३ हजार ३८६ मतांनी विजयी झाले. मतमोजणीच्या एकूण २९ फेऱ्याअंती सावरा यांना सहा लाख २०८ मतं मिळाली.
****
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी एक लाख ५९ हजार १२० मतांनी विजयी झाले. पाडवी यांना सात लाख ४५ हजार ९९८, तर भाजपच्या हिना गावित यांना पाच लाख ८६ हजार ८७८ मतं मिळाली.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे एक लाखांहून अधिक मताधिक्यानं आघाडीवर आहेत. भुमरे यांना आतापर्यंत तीन लाख ४४ हजार ६२३, एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल यांना दोन लाख ६२ हजार ९��६, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख १४ हजार १९७ मतं मिळाली आहेत.
****
बीड लोकसभा मतदारसंघात २५व्या फेरीअंती महायुतीच्या पंकजा मुंडे २२ हजार ५२१ मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत मुंडे यांना पाच लाख ९७ हजार ७९३, तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना पाच लाख ६७ हजार ३२२ मतं मिळाली.
****
जालना लोकसभा मतदार संघात आतापर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार महायुतीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी ६० हजारांहून अधिक मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. काळे यांना आतापर्यंत चार लाख ३२ हजार ३३२, तर भाजपाचे रावसाहेब दानवे यांना तीन लाख ७१ हजार ७७६ मतं मिळाली.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या २० व्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना दोन लाख ५७ हजार मतांची आघाडी मिळवली आहे.
****
परभणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संजय जाधव ६२ हजार ४४४ मतांनी आघाडीवर आहेत. जाधव यांना आतापर्यंत दोन लाख १९ हजार ९०, तर महायुतीचे महादेव जानकर यांना एक लाख ५६ हजार ६४६ मतं मिळाली आहेत.
परभणीच्या मतदारांनी जातीवाद करणाऱ्यांना नाकारल्याची प्रतिक्रिया संजय जाधव यांनी दिली आहे -
ह्या विजयाचं श्रेय माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांना. ज्यांनी ज्यांनी जातीयवाद केला, त्यांना जनतेनं नाकारलं. त्यामुळे जातीयवादावर आणि धर्माच्या नावावर एखादेवेळेस ठीक होतं, पूर्वीच्या काळात. पण आता जातीपातीच्या नावावर राजकारण करून मतं मिळवत नसतात. सर्वसमावेशक असंच राजकारण करावं लागतं ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत, जिंकायच्या आहेत, त्यांनी सगळ्यांना घेऊनच चालायची भूमिका ठेवली पाहिजे. जातीच्या नावावर मतं मागितल्यानंतर जसं आज पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यांना तशाच पद्‌धतीची भूमिका मतदार हा ठरवत असतो.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आष्टीकर यांनी आकाशवाणी बोलतांना ही प्रतिक्रिया दिली.
हा विजय माझा नसून हा सर्वसामान्य माणसाचा विजय आहे. महाविकास आघाडीचा विजय आहे. या महाराष्‍ट्रामध्ये अतिशय संवेदनशील आणि आमचे कुटुंबप्रमुख उद्‌धवसाहेब, माननीय शरद पवार साहेब, काँग्रेसचे नेते सर्व मंडळीचा हा विजय आहे असं मी मानतो. हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. जनतेने खूप मनाभावतून मतदान केलेलं आहे. खूप विचारपूर्वक मतदान केलेलं आहे. आणि मी सर्व जनतेच्या समोर नतमस्तक होतो.
****
नागपूर लोकसभा मतदार संघात बाराव्या फेरीनंतर महायुतीचे नितीन गडकरी ७७ हजार ९५९ मतांनी आघाडीवर आहेत.
अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अनुप धोत्रे ४० हजार १२ मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अभय पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला.
****
मावळ लोकसभा मतदारसंघात २२व्या फेरीअंती महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी एक लाख ३१२ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे.
****
चंद्रपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रतिभा धानोरकर यांनी एक लाख ६९ हजार ६४० मतांची आघाडी घेतली आहे. आतापर्यंत धानोरकर यांना चार लाख ५८ हजार ७०, तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना दोन लाख ८८ हजार ४३० मतं मिळाली आहेत.
****
रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचे सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीचे अनंत गिते यांचा ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. तटकरे यांना पाच लाख आठ हजार ३५२, तर गीते यांना चार लाख २५ हजार ५६८ मतं मिळाली.
****
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तिसर्यांदा विजयी झाले. बारणे यांना सहा लाख ९२ हजार १०१, तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना पाच लाख ९५ हजार ५४२ मतं मिळाली.
****
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती यांनी विजयी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत शाहू महाराजांना चार लाख २४ हजार २४९, तर महायुतीचे संजय मंडलिक यांना तीन लाख ३१ हजार ६५५ मतं मिळाली आहेत.
****
हातकणंगले मतदारसंघातही महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आघाडीवर आहेत.
****
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महायुतीचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत.
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या कमी फरकाने गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ठाण्यात नरेश म्हस्के यांनी शिवसेनेचा गड राखला असून, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
मै दावे के साथ कहता हूं, मोदीजी की सरकार नही बनेगी। मोदीजी ने सबसे पहले इस्तिफा देना चाहिये। मोदी हार गये है। भारतीय जनता पार्टी हार गई है। आगे तोडफोड करके सरकार बनाने की कोशिश की तो जनता सडक पर उतरेगी। बीजेपी को बहुमत नही है, बीजेपी हार गई है।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले…
तानाशाह व्यवस्था को सत्ता से बाहर निकालने का जो मार्ग बनाया था, और उसका नेतृत्व हमारे नेता राहुल गांधीजी ने कन्याकुमारी से कश्मीर जो भारत जोडो यात्रा की थी, मणिपूर से मुंबई जो न्याय यात्रा की थी, और राहुल गांधीजी के नेतृत्व मे जो देश की जनता उनके साथ खडी हुई। और उसीका नतीजा है, की आज देश मे परिवर्तन की लहर आप देख रहे हो।  
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडिया आघाडीची बैठक उद्या दिल्लीमध्ये होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 09 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र ठरलं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आज जागावाटपाबाबत घोषणा करण्यात आली. या परिषदेला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली - चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, उत्तर मध्य मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई या जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, दक्षिण अहमदनगर आणि बीड या जागा लढवणार आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशीम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई या जागा लढवणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नवीन संवत्सर, गुढीपाडवा, चेटी चंड, नवरेह उगादि तसंच साजिबू चेईराओबा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, समृद्धीचं जावं अशी कामना त्यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशाद्वारे केली आहे.  
****
��ारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर केलेल्या टिपण्णीबद्दल काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं याबाबत नवी दिल्लीत आयोगाची भेट घेतली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा आहे, या पंतप्रधान मोदी यांच्या विधानावर पक्षानं आक्षेप घेतला असून ही बाब गांभीर्यानं घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडं काँग्रेसनं केली आहे.
****
सक्तवसुली संचालनालय ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार आणि आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांची कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी काल चौकशी केली. या प्रकरणी दोघांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित, गट - ब सेवा मुख्य परीक्षा - २०२३ या परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी-१, मुद्रांक निरीक्षक संवर्गाच्या एकूण ४९ पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेमध्ये नाशिक जिल्ह्यातील  भूषण निवृत्ती लांडगे हे अराखीव तसंच मागास वर्गवारीतून राज्यात प्रथम आले आहेत. तर महिला अराखीव गटातून सांगली जिल्ह्यातील गितांजली रविंद्रनाथ कोळेकर राज्यात प्रथम आल्या आहेत. या परीक्षेचा अंतिम निकाल आणि प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
****
नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचं लेव्ही प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळं न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत लिलाव सुरू करावेत असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी काल व्यापाऱ्यांना दिले. मात्र, व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळं नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये यापुढेही काही दिवस लिलाव बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनीच याप्रकरणी पुढाकार घेऊन लिलाव उद्यापासून पूर्ववत सुरू करण्यात येतील आणि शेतकरी संघटना शेतमालाचे लिलाव करेल असं म्हटलं आहे. 
****
गुढी पाडवा, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी हे सण एकापाठोपाठ आले असून, नागरिकांनी धार्मिक सलोखा आणि शांतता अबाधीत ठेवत एकात्मतेच्या भावनेनं हे सर्व सण उत्साहात साजरे करावेत असं आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.  शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात किंवा शहरात कोणतीही अप्रिय घटना घडल्यास पोलिस यंत्रणेला तात्काळ १ १ २ या क्रमांकावर माहिती द्यावी  असं आवाहन जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी यावेळी केलं.
****
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त बीड शहरात आज सकाळी बालाजी मंदिरापासून नववर्ष स्वागत फेरी काढण्यात आली.
****
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०७ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
मराठवाडा आणि विदर्भाचा सर्वांगीण विकास तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय याला आपल्या सरकारचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आजपासून १४ दिवसांचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्याच्या पूर्वसंध्येला काल संध्याकाळी पत्रकार परिषेदत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. 
****
नागपूर इथं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापुर्वी विरोधीपक्ष सदस्यांनी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. आंदोलकांनी यावेळी संत्र्यांच्या माळा परिधान करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारविरोधी घोषणा दिल्या. 
****
आज सशस्त्र सेना ध्वज दिन. हुतात्मा सैनिकांच्या सन्मानार्थ १९४९ पासून दरवर्षी सात डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जात असून सैनिकांनी देशाप्रती दिलेल्या निस्वार्थ योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा ध्वज दिनाचा उद्देश आहे.
****
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्हा देशात आठव्या क्रमांकावर असून ही कामगिरी आणखी उंचावण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याचं जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे.
****
मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात आज हवामान अंशतः ढगाळ राहील, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. अन्यत्र हवा कोरडी राहण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारनजिक सकवार इथं दुचाकी आणि मोटारीदरम्यानच्या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या मोटार चालकाला उपचारांसाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  
****
मलेशियातील क्वालालंपूर इथं सुरु पुरुष कनिष्ठ गट हॉकी विश्वचषक स्पर्धेत क गटात आज भारताचा सामना स्पेन सोबत होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०५ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
महाराष्ट्रातल्या दोन हजार तीनशे एकोणसाठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदानाला आज सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदानाची वेळ आहे. तर, मतमोजणी उद्या होणार आहे. गडचिरोलीसह गोंदिया भागात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून तिथं परवा सात नोव्हेंबरला मतमोजणी होईल. सध्या मतदानप्रक्रीया सुरळीत पार पडत असल्याचं वृत्त आहे.
****
मराठा आरक्षणासाठी येत्या एक डिसेंबरपासून राज्यभरात गावागावात साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचं आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर  इथं वैद्यकीय उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णालयात आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते. आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करु नये तसंच उद्रेकही करु नये, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. आरक्षणप्रश्नी शासनाच्या शिष्टमंडळासोबत संबंधित निर्णयाच्या कालमर्यादेवर उद्या चर्चा होणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
नागपुर इथं गेल्या महिन्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळं झालेल्या नुकसानीनंतर या भागात पुनर्वसनासाठी दीर्घकालीन उपाययोजना करीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यात  अंबाझरी धरण भक्कम करणं, नाग नदीला संरक्षण भिंत बांधण्यासह नदीचं खोलीकरण करणार असल्याची माहिती देण्यात आली.
****
नाशिक जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्यानं सध्या शेतीसह पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था आहे. त्यामुळं संपूर्ण जिल्हा दुष्काळी म्हणून जाहीर करण्याची मागणी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात काल मुंबई इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं.
****
सहासष्टावी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा येत्या सात ते दहा नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यात फुलगाव इथं ही स्पर्धा होणार आहे.
****
दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात ढगाळ वातावरण तर इतर ठिकाणी ते कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.   ****
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 02 November 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलक आमदारांनी आज तिसऱ्या दिवशी मुंबईत आंदोलन केलं. मंत्रालयासमोर आंदोलक आमदारांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज बीड शहरात प्रशासनाच्या वतीनं मुख्य मार्गावर पथसंचलन करण्यात आलं. नागरिकांना याद्वारे शांतता आणि सुव्यवस्थेचं आवाहन करण्यात आलं. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी या पथसंचलनाचं नेतृत्त्व केलं.
****
यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय अशी या तीन चित्रपटांची नावं आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या चित्रपटांची निवड करण्यासाठी पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. 
****
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचं आम आदमी पक्षातर्फे कळवण्यात आलं आहे. ते आज मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी जाणार आहेत. केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे नोटीस मागं घेण्याची मागणी केली आहे. हे सर्व आरोप राजकीय आणि अनधिकृत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. केजरीवाल यांना मद्य धोरणासंदर्भातल्या गैरव्यवहारांच्या आरोपांवरुन चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
****
दोन हजार रुपयांच्या ९७ टक्के नोटा रिझर्व बैंकेकडे प्राप्त झाल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या तीन लाख ५६ हजार कोटी मुल्याच्या नोटांचं चलन बंद करण्यात आलं असून आता दहा हजार कोटी नोटा नागरिकांकडे बाकी असल्याचं रिझर्व बँकेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि रक्तदानाविषयी जागृती व्हावी यासाठी वाढदिवस रक्तदानानं साजरा करणाऱ्यांचा गट स्थापन करण्यात येत आहे. नाशिकचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. नागरिकांनी आपला स्वतःचा तसंच परिजनांचा वाढदिवस रक्तदानानं साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त अमरावती जिल्ह्यात गुरुकुंज मोझरी इथं आज त्यांना दुपारी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.  
****
राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळीनिमित्त भंडारा ते पुणे नविन निमआराम बससेवा सुरू करण्यात येत आहे. ही बससेवा सात ते दहा नोव्हेंबर दरम्यान दुपारी साडे बारा आणि दोन वाजता  भंडारा बसस्थानकातून तर पुणे इथून आठ ते अकरा नोव्हेंबर दरम्यान संध्याकाळी सव्वा पाच आणि सव्वा सहा वाजता सोडण्यात येणार आहे.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका संघांदरम्यानचा सामना होणार आहे. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांचा या स्पर्धेतला हा सातवा सामना आहे. या स्पर्धेत आतापर्यंतचे सहाही सामने जिंकणारा भारत हा एकमेव संघ असून श्रीलंका संघानं सहापैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. भारतानं हा सामना जिंकल्यास संघाचं उपांत्य फेरीतलं स्थान आज निश्चित होईल.
****
दक्षिण कोरीयात सुरु आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतानं काल आणखी दोन सुवर्णपदकं जिंकली. पन्नास मीटर रायफल प्रकारात तोमर यानं सुवर्ण पदक जिंकलं. तसंच तोमर, स्वप्निल कुस‍ळे आणि अखिल शेओरन यांनी सांघिक रौप्य पदक पटकावलं. ट्रॅप मीश्र सांघिक प्रकारामध्ये पृथ्वीराज तोडयमन आणि मनिषा कीर यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं. काल या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतानं एकूण चार पदकं मिळवली. यामध्ये भारतानं या स्पर्धेत २१ सुवर्ण, २१ रौप्य आणि १३ कांस्य पदक अशी एकूण ५५ पदकं पटकावली असून, पदक तालिकेत दुसऱं स्थान जिंकलं. 
****
जळगांव जिल्ह्यातल्या एरंडोल नगरपरिषदेनं तेहतीस गुंठ्यांमध्ये पुस्तकांची बाग साकारली आहे. वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीनं हा प्रयोग करण्यात आला असून, निसर्गरम्य वातावरणात कथा, कादंबरी, चरित्र, कवितासंग्रह, आणि विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वाचण्याची सोय या बागेत करण्यात आली आहे.
****
राज्यातलं हवामान आज कोरडं राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 01 November 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. या बैठकीला सत्ताधारी पक्षांसह, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, लोकभारती पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, महाराष्ट्र नवनिर्मान सेना, रिपब्लिकन पक्ष आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी आज म���त्रालयाच्या आवारात सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन करुन, मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावलं होतं. पोलिसांनी आंदोलक आमदारांना ताब्यात घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेली संचारबंदी आज संध्याकाळी पाच वाजेपासून मागे घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले. मात्र जमावबंदी लागू असेल, असं या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, संचारबंदीमुळे आज जिल्ह्यातल्या शाळा -महाविद्यालयं आणि सर्व आस्थापना पूर्णपणे बंद आहेत.
****
मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या पुतळ्याची निर्मिती अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केली आहे. २२ फुट उंचीचा हा पुतळा एका पृथ्वी गोलावर उभारण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत गोलंदाज फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या चेंडूवर सचिननं षटकार मारला, तो क्षण या पुतळ्याच्या रूपानं कायम स्मरणात राहणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर १७ भरुन खाजगी विद्यार्थी म्हणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी सात नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत काल संपणार होती.
****
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची नवीन संगणक प्रणालीवर नोंदणी सुरू झाली असून, नांदेड जिल्ह्यातल्या गर्भवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यावेळी पाच हजार रुपयांचं अनुदान दोन टप्प्यातच मिळणार आहे, तर दुसरी मुलगी झाल्यास सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
****
हवामान बदलामुळे होणारं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संरक्षित शेतीचं तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार असल्याचं, राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील यांनी केलं आहे. संरक्षित शेती तंत्रज्ञानावरील राज्यस्तरीय कार्यशाळेत ते काल बोलत होते. या कार्यशाळेत हरितगृह, शेडनेटगृह उभारणीविषयीचं तंत्रज्ञान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं.
****
एक जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींनी सुधारित मतदार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण अभियानांतर्गंत आयोजित शिबिरांमध्ये मतदार यादीत नावनोंदणी करण्याचं आवाहन, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. जिल्ह्यात या कार्यक्रमांतर्गत १८ आणि १९ नोव्हेंबर आणि दोन, तीन डिसेंबर रोजी विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत, प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वेमार्गाच्या कामामुळे रद्द केलेल्या गाड्या पूर्ववत सुरु करण्यात आल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. त्यानुसार दौंड - निझामाबाद ही गाडी नियोजित वेळेनुसार धावेल, मात्र उद्या आणि परवा तीन तारखेला मुदखेड ते निझामाबाद दरम्यान रद्द असेल, तर निझामाबाद - पंढरपूर ही गाडी देखील नियोजित वेळेनुसार धावेल, मात्र आज, उद्या आणि परवा तीन तारखेला निझामाबाद ते मुदखेड दरम्यान रद्द असेल. निझामाबाद - पुणे आणि पंढरपूर - निझामाबाद या गाड्या नियोजित वेळेनुसार धावतील.
****
धाराशिव इथं १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
****
आशियाई महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल रांची इथं झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने जपानचा दोन - एक असा पराभव केला. शेवटच्या लीग सामन्यात भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान सामना होणार आहे. पुणे इथं दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
१८ व्या जी-20 परिषदेला आज दिल्लीत प्रारंभ;दिल्ली जाहीरनाम्याचा मसुदा सादर होणार
राज्य परिवहन महामंडळ-एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल आंदोलक शिष्टमंडळाशी चर्चा
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राजकारणापलिकडे जावून काम करण्याची अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून व्यक्त
संसर्गजन्य आजारांवरील आंतरराष्ट्रीय बालरोगतज्ञाच्या परिषदेला औरंगाबाद इथं प्रारंभ
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डेन जोडीला उपविजेतेपद
****
१८ व्या जी - 20 परिषदेला आजपासून राजधानी दिल्लीत प्रारंभ होत आहे. या दोन दिवसीय परिषदेसाठी जी 20 देशांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये स��युक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, अर्जेंटिनाचे राष्ट्रपती अल्बर्टो फर्नांडिस, नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टीनुबू, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, इटलीचे पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी, ओमानचे सुलतान आणि पंतप्रधान हैथम बिन तारिक, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेइ लावरोव, आणि बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा समावेश आहे.
या दोन दिवसीय परिषदेत आर्थिक आणि विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे, तसंच जगभरातल्या आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या या मेळाव्यात अन्न आणि ऊर्जा सुरक्षेपासून, ते स्वच्छ ऊर्जा संक्रमण, हवामान बदल आणि बहुपक्षीय विकास बँकांची क्षमता बळकट करण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, जगाला आवश्यक असलेले क्रांतिकारी बदल घडवण्यात भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदाचं मोठं सहकार्य होणार असल्याचं, गुटेरस यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
जी-20 नेत्यांच्या दिल्ली जाहीरनाम्याचा मसुदा तयार असून, तो आज जी-20 शिखर परिषदेत या नेत्यांना सादर केला जाईल. भारताचे जी-20 चे शेर्पा अमिताभ कांत यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. हा जाहीरनामा म्हणजे दक्षिणेतल्या वैश्विक आणि प्रगतिशील राष्ट्रांचा आवाज असेल, असं त्यांनी सांगितलं. भारत भूषवत असलेलं जी-20 समूहाचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेल्या सर्व-समावेशकता, महत्त्वकांक्षा, कार्य प्रेरकता आणि निर्णायकतेशी सुसंगत असल्याचं कांत यावेळी म्हणाले.
****
राज्य परिवहन महामंडळ-एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आली आहे. आता या कर्मचाऱ्यांना ३४ टक्क्यांऐवजी ३८ टक्के महागाई भत्ता मिळेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला काल मान्यता दिली. महामंडळाच्या असुधारित वेतन संरचनेतल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २०३ टक्क्यांवरून २१२ टक्के करायलाही मान्यता देण्यात आली आहे. महामंडळाच्या ९० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर सुमारे नऊ कोटी रुपयांचा भार पडेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ग्रामविकास विभागात राज्यातल्या ३४ जिल्हा परिषदांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. गट - क मधल्या विविध ३० संवर्गात १९ हजार ४६० रिक्त पदे सरळसेवेनं भरण्यात येणार आहेत. शासनमान्य आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. काही समाजविघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून गरजूंची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसंच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, असं आवाहन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. 
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक कोटी ५७ लाख ‘आनंदाचा शिधा’ संच वाटप करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला आनंदाचा शिधा मिळेल, त्यापासून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. ते काल नाशिक जिल्ह्यात येवला इथं आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रमात बोलत होते. या शिधा वाटपाचा राज्यातल्या सुमारे सात कोटी जनतेला लाभ होणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छोट्या घरात राहणाऱ्या कुटुंबातल्या मुलांना अभ्यास करताना अडचणी येवू नयेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला आहे. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येईल. महानगरपालिकेच्या ज्या शाळांमध्ये तळमजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वर्गखोली उपलब्ध असेल, अशा इमारतीत या अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहेत.
****
इयता दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी येत्या फेब्रुवारी मार्च मध्ये खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी अर्ज क्रमांक १७ द्वारे ऑनलाईन नावनोंदणी सुरु आहे. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज आणि शुल्क सोमवारी ११ सप्टेंबर पर्यत ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. माध्यमिक शाळांनी तसंच कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षार्थ्यांचे अर्ज तसंच ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, विभागीय मंडळाकडे १५ सप्टेंबरपर्यंत जमा करावी, असं लातूर विभागीय मंडळाच्यावतीने कळवण्यात आलं आहे. आपल्या परिसरातल्या जास्तीत जास्त शाळाबाह्य विद्यार्थ्यांकडून खाजगी अर्ज क्रमांक १७ भरुन घेण्यासाठी, मुख्याध्यापक तसंच प्राचार्यांनी विविध माध्यमाद्वारे जनजागृती करण्याचं आवाहन, मंडळाकडून करण्यात आलं आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री मुंबईत मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून आलेल्या शिष्टमंडळासह रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी देखील या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाल्याचं, मुख्यमंत्री सचिवालयाकडून सांगण्यात आलं आहे. या बैठकीत कायदेशीर बाजू तपासून आरक्षण देण्याबाबत चर्चा झाल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्राकडे मागणी करावी, तसंच १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात ५० टक्क्याची मर्यादा वाढवून घ्यावी, अशा मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. त्या काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.
****
मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १२ वा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राज्यात इतरत्रही आंदोलनं करण्यात येत आहेत.
धुळ्यात मराठा समाजाच्या तरूणांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. काल मुंबई-आग्रा महामार्ग आणि धुळे-सोलापूर महामार्गावर असलेल्या चाळीसगाव चौफुली इथं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला. यामुळे महामार्गावरील वाहतुक सुमारे दोन तास खोळंबली होती.
बीड जिल्हा वकील संघाच्या वतीनं काल एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालय समोर झालेल्या या उपोषणात वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. बीड तालुक्यातल्या वासणवाडी इथं काही महिलांनी स्वत:ला जमिनीमध्ये कमरेपर्यंत गाडून घेत आंदोलन केलं.
****
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राजकारणापलिकडे जावून काम करण्याची अपेक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं नारायण दादा काळदाते स्मृती प्रतिष्ठान आणि मानवलोक संस्थेतर्फे वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात खासदार सुळे यांच्या हस्ते माजी मंत्री राजेश टोपे यांना, नारायण दादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार, तर तेलंगणा राज्याचे जलसंपदा मंडळाचे अध्यक्ष व्ही.प्रकाश राव यांच्या हस्ते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांना, डॉ. द्वारकादासजी लोहिया लोकसहभाग पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, फेटा, आणि ५१ हजार रूपये असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. टोपे यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम काळदाते प्रतिष्ठानकडे मदत निधीसाठी सुपूर्द केली.
****
संसर्गजन्य आजारांवरील आंतरराष्ट्रीय बालरोगतज्ञाच्या परिषदेला कालपासून औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये सातशे हून अधिक डॉक्टर सहभागी झाले आहेत. परिषदेचे सचिव डॉक्टर निखिल पाठक यांनी या परिषदेत काल झालेल्या कार्यशाळांबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले...
‘‘औरंगाबादमध्ये पहिल्यांदा ही अशी इनफेक्शन डिसीज्‌ची कॉन्फरन्स होत आहे. या परिषदेत आपण आठ तारखेला तीन कार्यशाळा घेतल्या. पहिली कार्यशाळा ही व्हॅक्सिनेशन म्हणजे लसीकरणावर होती. दुसरी कार्यशाळा ही ए पी एफ सी म्हणजे अँटीबायोटीक प्रिस्क्राईबिंग मोड्युल याचा अर्थ कोणत्या आजारात कोणत्या अँटीबायोटीक वापराव्यात याच्याविषयीची कार्यशाळा होती. तिसरी जी कार्यशाळा होती, ती कोणत्या आजारात कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत त्याच्यासाठीची होती. या तीन कार्यशाळेला जवळजवळ दोनशे डेलिबरेटस्‌नी त्यांचा फायदा घेतला.’’
या परिषदेमध्ये, संसर्गजन्य आजार, जिवाणू तसंच विषाणूजन्य आजार, नवजात अर्भकामधील संसर्ग- निदान आणि उपचार अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर विचार मंथन होणार आहे‌. उद्या या परिषदेचा समारोप होणार आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.
लातूर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ‘शासकीय योजना पुस्तिका’ तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
परभणी जिल्ह्यात या निमित्ताने १४ ते १७ सप्टेंबर २०२३ या चार दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये कवी संमेलन, क्रीडा तसंच विविध स्पर्धा, आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने उद्या १० सप्टेंबरला बीड इथं शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. धानोरा रस्त्यावरच्या राजयोग मंगल कार्यालयात ही परिषद होणार आहे. मराठवाड्यातले शिक्षणतज्ञ, शिक्षण संस्थाचालक, यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. 
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ इथं आज एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक धनंजय गुडसूरकर हे असणार आहेत. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या सगरोळी इथं उद्या पहिलं नांदेड जिल्हा मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी-गीतकार दासू वैद्य हे आहेत, तर उद्घाटन माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते होणार आहे. एकदिवस चालणाऱ्या या संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद तसंच कथाकथन आणि कविसंमेलन होणार आहे.
****
अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांना पुरुष दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात बोपन्ना - एब्डेन जोडीचा राजीव राम आणि जो सॅलिसबरी या ब्रिटिश - अमेरिकन जोडीकडून सहा - दोन, तीन - सहा, चार - सहा असा पराभव झाला.
****
बीड जिल्हयात पशूधनाला पुढचे ४३ दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार ३१ ऑगस्ट २०२३ रोजी एक लाख ८६ हजार ४५८ मेट्रिक टन चारा शिल्लक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपलब्ध चाऱ्याची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी बंदी घातली आहे.
दरम्यान, बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. विविध मागण्यांचं निवेदन आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना सादर केलं.
****
हैद्राबाद मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी, येत्या १२ सप्टेंबर पासून औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य सैनिक पाल्य युवक समितीचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील कोलते यांनी ही माहिती दिली. १७ सप्टेंबरला होणाऱ्या मुक्तिसंग्राम कार्यक्रमावर बहिष्काराचा इशाराही कोलते यांनी दिला आहे. १८ सप्टेंबर रोजी औरंगाबादहून मुंबईकडे पदयात्रा काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल संततधार पाऊस झाला. काल जिल्ह्यात २६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेला हा पाऊस खरिपातल्या पिकांना जीवनदान देणारा ठरला आहे.
औरंगाबाद शहर परिसरातही दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. काल शहरात २७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणांमधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
कांद्याच्या प्रश्नावर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
इतर मागास प्रवर्गातल्या तरुणांना `गट कर्ज व्याज परतावा` योजनेचा लाभ घेण्याचं मंत्री अतुल सावे यांचं आवाहन.
शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांचं अपात्रता प्रकरणी सहा हजार पानी लेखी उत्तर विधानसभा अध्यक्षांना सादर.
आणि
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन.
****
नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांकडून कांदा खरेदी सुरु असून कांद्याच्या प्रश्नावर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नाफेडची कांदा खरेदी केंद्रं वाढवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री तसंच केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना विनंती करण्यात आली आहे. सध्या नाफेडकडून ५०० मेट्रिक टन कांदा खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे असलेला उपलब्ध कांदा पाहता या केंद्रांची संख्या वाढवावी अशी विनंती केंद्र सरकाएकडे पत्राद्वारे केल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.
****
केंद्र सरकारनं ४० टक्के कांदा निर्यात शुल्क लागू केल्याच्या निषेधार्थ गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बंद असलेल्या बाजार समित्यांचे कामकाज आज सकाळी पूर्ववत सुरू करण्यात आले; मात्र नाफेडपेक्षाही कमी भाव पुकारल्यानं संतप्त शेतकरी कार्यकर्त्यांनी हे लिलाव बंद पाडले. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सटाणा इथं लिलाव बंद पाडतानाच येवला आणि चांदवड इथं रास्तारोको आंदोलन केलं तर कळवण इथं नाकोडा उपआवारात प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. चांदवड इथं पोलिसांना वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आंदोलकांवर बळाचा वापर करावा लागला. सिन्नर इथं मात्र लिलाव सुरळीत होऊन कांद्याला जास्तीत जास्त २ हजार २९९ रुपये भाव मिळाला.
****
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना तसंच श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी भारताच्या चांद्रयान तीन मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनतेचं अभिनंदन केलं आहे. भारताच्या या ऐतिहासिक यशाचा बांगलादेशालाही मोठा आनंद झाला असल्याचं हसिना यांनी म्हटलं असून इस्त्रो आणि त्याच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. विज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात पुढच्या वाटचालीसाठी दक्षिण आशियातल्या सर्व देशांसाठी हा गौरव आणि प्रेरणेचा क्षण असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेला भारताच्या या ऐतिहासिक यशाचा गर्व असल्याचं श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुनावर्देना यांनीही या यशाबद्दल भारताचं अभिनंदन केलं आहे.
****
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं तीन दिवस चाललेल्या ब्रिक्स परिषदेची आज सांगता झाली. ब्रिक्स परिषदेचा विस्तार करण्यात येणार असून यात नविन सहा देशांना सदस्यत्व देण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जोहान्सबर्ग इथं सांगितलं. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे सध्या या परिषदेचे सदस्य आहेत. अर्जेंटीना, मिस्र, इथोपिया, ईरान, सौदी अरेबिया आणि संयुक्‍त अरब अमीरात हे नविन सदस्य देश असतील. भारतानं ब्रिक्स परिषेदेच्या विस्ताराचं नेहमीच समर्थन केलं असून या देशांच्या सहभागानं ब्रिक्स संघटना बळकट होईल असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्यातल्या इतर मागास प्रवर्गाच्या उद्योजकांकरता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या 'गट कर्ज व्याज परतावा योजने'च्या ऑनलाईन पोर्टलचं उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आलं. राज्यातल्या इतर मागास प्रवर्गातल्या तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीनं पुढं येऊन या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, स्वतःच्या उद्योग उभारणीतून समाजातल्या अन्य गरजू व्यक्तींनादेखील रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी आणि राज्याच्या विकासात आपलं योगदान द्यावं, असं आवाहन सावे यांनी यावेळी केलं. वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराच्या आणि १५ लाख रुपये इतक्या रक्कमेच्या मर्यादेत व्याजाची रक्कम गटाच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळाद्वारे जमा करण्यात येणार असल्याचं इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष, मंत्री सावे म्हणाले.
****
राज्यातल्या आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांनी आपलं सहा हजार पानी लेखी उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केलं आहे. या संदर्भात अधिक चर्चा न करता कायदेशीर आणि नियमानुसार कारवाई केली जाईल, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडून राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. त्या विरोधात उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र करावं, अशी ठाकरे गटाची याचिका होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं होतं. गेल्या महिन्यात विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या सर्व आमदारांना आपलं मत मांडण्यासाठी नोटीस बजावली होती.
****
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. १९५७ सालच्या "आलिया भोगासी" या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी ऐंशी पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं. सीमा देव यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
बुद्धिबळ विश्व��िजेतेपदासाठीच्या लढतीमध्ये आज भारताच्या आर प्रज्ञानानंदला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून चुरशीच्या लढतीनंतर परा‍भव स्वीकारावा लागला. अझरबैजानमध्ये बाकू इथं या स्पर्धेत काल प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यातला दुसरा सामना अनिर्णित संपला होता. त्यानंतर आज खेळवण्यात आलेल्या टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदला पहिला सामना गमावावा लागला. त्यानं दुसऱ्या सामन्यात बरोबरी साधली पण पहिला सामना गमावल्यामुळं त्याचं विश्वविजेतेपद हुकलं.
****
वेळेत निवडणुका न घेतल्याबद्दल भारतीय कुस्ती महासंघाला युनायटेड वर���ल्ड रेसलिंग या जागतिक कुस्ती संघटनेनं निलंबित केलं आहे. त्यामुळं जागतिक स्पर्धांमधे भारतीय कुस्तीपटुंना भारताच्या झेंड्याखाली खेळता येणार नाही. येत्या १६ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑलिंपिक पात्रता जागतिक स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना तटस्थ खेळाडू म्हणून भाग घ्यावा लागेल. भारतीय ऑलिंपिक संघटनेनं २७ एप्रिलला तदर्थ समिती नेमली होती. या समितीनं ४५ दिवसात निवडणुका घेणं अपेक्षित होतं, मात्र ही कालमर्यादा या समितीला पाळता आली नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूविकास बँकेच्या सर्व थकीत कर्जदार शेतकरी सभासदांचं संपूर्ण कर्ज माफ झालं असून शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावरच्या भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करुन घ्यावा असं आवाहन बँकेचे अवसायक सुनील शिरापूरकर यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या भूविकास बँकेच्या संपूर्ण दोन हजार ब्याऐंशी कर्जदार शेतकऱ्यांचे ६२ कोटी २८ लाख ९७ रुपये कर्ज माफ झालं आहे. या अनुषंगानं उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूविकास बँकेच्या कर्जाची सातबारा उताऱ्यावरच्या बोजाची नोंद कमी करण्याबाबत सर्व तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
जालना इथल्या महावितरणच्या ग्रामीण उपविभाग तीन अंतर्गत कार्यरत सहायक अभियंता प्रकाश चव्हाण यांना निलंबित करण्यात आलं आहे. चव्हाण यांची गत महिन्यात महावितरणच्या रत्नागिरी परिमंडळात बदली झाली होती. बदली आदेश रद्द होऊन त्यांना पुन्हा जालना ग्रामीण उपविभाग तीनमध्ये पदस्थापना देण्यात आली. बदली रद्द झाल्यामुळं अभियंता चव्हाण यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी डिजे लावून फटाके वाजवत शहरातून मिरवणूक काढली. त्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. त्यामुळं पोलिसांत जमाबंदी आदेशाचं उल्लंघन, तसंच विनापरवाना डिजे वाजविल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत सहायक अभियंता प्रकाश चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
****
'बालविवाह मुक्त नांदेड'साठी तयार आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी अत्यंत आवश्यक असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटलं आहे. या संदर्भात नांदेड इथं आयोजित कार्यशाळेत ते आज बोलत होते. या अभियानासाठी सर्व विभागांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी - चॅंपियन्स गावपातळीवर जबाबदारीनं काम करतील आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण ‘बालविवाह मुक्त नांदेड' अशी ओळख निर्माण करू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
****
वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी महावितरण वीजजोडण्यांचे अर्ज झटपट निकाली काढत असून प्रलंबित वीज जोडण्या देण्यात औरंगाबाद परिमंडळात वेग आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 18 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १८ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
द्वेषपूर्ण ट्विट्सवर केली जाणारी कारवाई प्रक्रिया अधिक पारदर्शक करणार असल्याचं, ट्विटर या समूह माध्यमाने म्हटलं आहे. पहिली पायरी म्हणून, नियमांचं संभाव्य उल्लंघन करणारी ट्विट्स विशिष्ट प्रकारे चिन्हांकित केली जातील, यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम होणार नाही, मात्र नियमांचं उल्लंघन करणारे ट्विट्स म्हणून लक्षात येतील. केवळ ट्विट स्तरावर अशा प्रकारची कारवाई केली जाईल, वापरकर्त्याच्या खात्यावर त्याचा परिणाम होणार नाही, असं ट्विटरनं स्पष्ट केलं आहे.
****
देशात काल कोविड संसर्ग झालेले सात हजार ६३३ नवे रुग्ण आढळले, तर सहा हजार ७०२ रुग्ण कोविड संसर्गातून मुक्त झाले. सध्या देशात ६१ हजार २३३ कोविड रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६८ शतांश टक्के इतका आहे.
****
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. शिंदे यांनी काल याबाबत ट्विट करुन माहिती दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र महाआर्यमन शिंदे यांना गेल्या गुरुवारी कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण शिंदे कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्विटर संदेशातून केलं आहे.
****
विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचं जीवन सुखकर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. ठाकूर हे महाराष्ट्रातल्या चार लोकसभा मतदार संघांच्या दौऱ्यावर आले असता, पालघर इथं बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार गेली नऊ वर्ष सेवा, समर्पण आणि गरीब कल्याणासाठी काम करत असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.
****
गोव्यात जी 20 अंतर्गत आरोग्य गटाची बैठक सुरू आहे. या अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय तसंच राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी, पणजी इथं जनऔषधी केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला. जी 20 गटाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. देशभरात नऊ हजाराहून अधिक जनऔषधी केंद्रं रास्त दरात उच्च दर्जाची औषधं उपलब्ध करून देत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात माध्यमांमधून सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आपण या चर्चांना आजिबात महत्त्व देत नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, अजित पवार हे समर्थक आमदारांचा गट घेऊन सत्तेत आल्यास, शिवसेना सत्तेत राहणार नाही, असं शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. आज माध्यमांशली बोलताना शिरसाट यांनी, ही बाब स्पष्ट केली. सोळा आमदार अपात्र ठरले, तर अजित पवार भाजपसोबत सत्ता स्थापन करतील, या जर तरच्या विधानांना काहीही अर्थ नसल्याचं शिरसाट त्यांनी नमूद केलं. महाविकास आघाडीच्या सभांमध्ये अजित पवार यांना ठळक स्थान दिलं जात नसल्याकडे शिरसाट यांनी लक्ष वेधलं.
****
माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. गुन्हे विभागाचे अतिरिक्त आयुक्त सतीश चंद्र हे या विशेष तपास पथकाचे प्रमुख असतील. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधीच न्यायालयीन आयोग स्थापन केला आहे.
दरम्यान, प्रयागराज जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी इंटरनेट सेवा आणखी दोन दिवस बंद राहणार आहे.
****
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं हजूर साहिब नांदेड ते तामिळनाडूमधल्या इरोड दरम्यान विशेष गाडीच्या २२ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर शुक्रवारी नांदेड इथून दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि, सिकंदराबाद, गुंटूर, रेणीगुंठा, सालेम मार्गे इरोड इथं दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर रविवारी सकाळी सव्वा पाच वाजता इरोड इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता नांदेडला पोहोचेल.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनराईजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
हवामान
राज्यात काल मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes