#तयारीत
Explore tagged Tumblr posts
Text
E-Sakal : ई-सकाळची गरुडझेप, संपूर्ण देशात नंबर वन वेबसाईट बनण्यामागचं रहस्य काय?

सकाळ मीडिया ग्रुप: डिजिटल क्षेत्रातील मराठी पत्रकारितेचा अव्वल ब्रँड
सकाळ मीडिया ग्रुपने आपल्या विश्वासार्ह पत्रकारितेच्या जोरावर पुन्हा एकदा मोठे यश मिळवले आहे. कॉमस्कोरच्या जानेवारी 2025 च्या अहवालानुसार, eSakal.com हा भारतातील नंबर 1 मराठी न्यूज प्लॅटफॉर्म ठरला आहे. डिजिटल वाचकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याने eSakal.com हा मराठी मीडिया क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणून ओळखला जात आहे.
मराठी वाचकांची पहिली पसंती – eSakal.com
सध्याच्या डिजिटल युगात बातम्या फक्त छापील माध्यमापुरत���या मर्यादित राहिलेल्या नाहीत. वेगवान अपडेट्स, सखोल विश्लेषण, हायपरलोकल रिपोर्टिंग आणि मल्टीमीडिया कंटेंटच्या जोरावर eSakal.com ने वाचकांची मने जिंकली आहेत.
📌 13.05 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्त्यांबरोबर eSakal.com नं सर्व स्पर्धकांना मागे टाकले आहे.
📌 व्हिडिओ, पॉडकास्ट आणि ग्राफिक्स यांसारख्या तंत्रज्ञानस्नेही फॉरमॅट्समुळे वाचकांचा ओढा वाढला आहे.
📌 महाराष्ट्रातील गावागावातील हायपरलोकल बातम्या eSakal.com च्या लोकप्रियतेचे मोठे कारण ठरल्या आहेत.
यशामागचे महत्त्वाचे घटक
✅ डिजिटल इनोव्हेशनवर भर: AI, डेटा अॅनालिटिक्स आणि स्मार्ट अल्गोरिदमच्या मदतीने eSakal.com वाचकांना त्यांच्या आवडीच्या बातम्या सहज उपलब्ध करून देत आहे.
✅ गुणवत्तापूर्ण पत्रकारिता: राजकारण, अर्थकारण, क्रीडा, मनोरंजन, तंत्रज्ञान आणि स्थानिक घडामोडींचे अचूक आणि परखड वार्तांकन हे सकाळच्या यशाचे प्रमुख कारण आहे.
✅ थेट आणि वेगवान अपडेट्स: ब्रेकिंग न्यूज असो किंवा स्पर्धात्मक राजकीय वातावरण – eSakal वाचकांपर्यंत सर्व घडामोडी तत्काळ पोहोचवते.
✅ हायपरलोकल कंटेंट: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या, स्थानिक प्रश्न आणि लोकहिताचे विषय eSakal.com वर मोठ्या प्रमाणात कव्हर केले जातात.
सकाळ मीडिया ग्रुपचे पुढील उद्दिष्ट
सकाळ मीडिया ग्रुप आपल्या डिजिटल परिवर्तनाला आणखी पुढे नेण्याच्या तयारीत आहे. नवीन प्रयोग, विविध प्लॅटफॉर्म्सवरील उपस्थिती आणि वाचकांसाठी अधिक वैविध्यपूर्ण कंटेंट यामुळे eSakal.com भविष्यातही मराठी वाचकांची पहिली पसंती राहील.
सकाळ मीडिया ग्रुपचे डिजिटल प्रमुख स्वप्नील मालपाठक म्हणतात,
'आमच्या यशामागे वाचकांचा विश्वास आणि आमच्या टीमचा सातत्यपूर्ण मेहनतीचा मोठा वाटा आहे. डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचे वर्चस्व टिकवण्यासाठी आम्ही सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत राहू.'
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• एचएमपीव्ही संसर्गाबाबत घाबरू नये; मात्र खबरदारी घेण्याचं राज्यशासनाकडून आवाहन. • पुढील शंभर दिवसांत राबवण्यात येणाऱ्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांसाठी सात क��मी कृती कार्यक्रम. • राज्यातल्या चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य. आणि • तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात.
एच एम पी व्ही संसर्गाबाबत घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षभरात देशात या आजाराचे काही रुग्ण आढळले होते, ते सर्व रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच बरे झाल्याची माहिती आबिटकर यांनी दिली. ते म्हणाले… आय सी एम आरनं ज्या वेळेला भारतामध्ये फेब्रुवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये संभाव्य एच एन पी व्ही च्या विषाणूची आठ हजार बावन नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या. या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये एकूण १७२ पॉझिटीव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या आहेत. फेब्रुवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये ही सर्व प्रकरणं सौम्य होती. आणि त्याप्रमाणे या कुठल्याही पेशंटला ॲडमिट न करता सुद्धा यातला कुठलाही पेशंट न दगावता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते बरे झालेत.
या आज���राबाबत अनावश्यक भीती बाळगू नये, असं सांगताना, माध्यमांनी यासंदर्भातली वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवण्याचं आवाहनही आबिटकर यांनी केलं… हा आजार नवीन नाहीये. किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होतोय अशातला भाग नाही. फक्त काळजी घेणं आणि सुरक्षित पद्धतीनं त्याच्यावरती उपचार करणं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा, माझी मिडीयाला सुद्धा विनंती आहे की, आपण सगळ्यांनी याबाबतची वस्तुस्थिती लोकांना सांगू या. केंद्र शासानाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतोय. खूप चांगली टीम आपल्याकडची तयार आहे. त्या सगळ्या टीमचा आपण उपयोग करू या. आणि या एकूण आजाराची जी काही अनावश्यक भीती आपण बाळगतोय ती अनावश्यक भीती न बाळगता जे पेशंटस् असतील त्यांना आपण राईटली ट्रीट करण्यासाठी आपण सगळे जण काम करू या.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलतांना, राज्यात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं स्पष्ट केलं. तरीही सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी औषधांसह ऑक्सिजन आणि आवश्यकता वाटल्यास विलगीकरण व्यवस्थेच्या तयारीत राहावं, आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्यात अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घा��ीमध्ये सर्व व्यवस्था उपलब्ध असून, कोविड व्यवस्थापनाचा अनुभव असल्यानं, कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी म्हटलं आहे… सद्याच्या स्थितीमध्ये हा आजार जो आहे, इतका जास्त धोकादायक नाही. यासाठीची संपूर्ण व्यवस्था छत्रपती संभाजीनगर येथील घाटीमध्ये उपलब्ध आहे. कुठल्याही प्रकारची भीती सध्याच्या स्थितीमध्ये नाहीये. आणि भविष्यामध्येही येणार नाही. आपण कोविडचा चांगल्या प्रकारे मुकाबला केला आहे. गरज भासली तर रूग्णालयात येऊ उपचार घ्यावेत. कुणी स्वत:च्या मनाने यासाठी औषध उपचार घेऊ नये.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी काल आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांच्यासह आरोग्य विभागाची बैठक घेऊन, एचएमपीव्हीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आढावा घेत, आवश्यक सूचना केल्या.
हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात खबरदारी म्हणून २४ खाटांचा अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला असून, उपजिल्हा रुग्णालय तसंच ग्रामीण रुग्णालयातूनही काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम काल जाहीर केला. प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करण्याच्या कामांबाबत त्यांनी सविस्तर सूचना केल्या. यासंदर्भात काय कार्यवाही केली याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यातल्या चारचाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. येत्या एक एप्रिलपासून वाहनावर फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला कोणत्याही माध्यमातून दुप्पट पथकर भरावा लागणार आहे. राज्यात एम एस आर डी सी चे ५० पथकर नाके तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे २३ पथकर नाके आहेत.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, भाऊ धनंजय देशमुख यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा यावेळी उपस्थित होते. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, कठोर कारवाई होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. देशमुख कुटुंबियांना शंका असेल अशा अधिकाऱ्यांना विशेष तपास पथकात घेणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यात सकल मराठा समाज आणि सर्वपक्षीय विचार मंचच्या वतीने काल ठिकठिकाणी चक्काजाम आंद��लन करण्यात आलं. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली होती. या प्रकरणांतल्या संशयितांना अटक करून कडक शिक्षा करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला काल घटस्थापनेनं प्रारंभ झाला. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर… संबळाचा कडकडाटात, तुतारीचा निनादात आणि आई राजा उदोच्या गजरात श्री तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना झाली. १४ जानेवारी पर्यंत हा शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरु राहणार आहे. या दरम्यान देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार असून ११ जानेवारीला या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील महत्वाची मानली जाणारी जलकुंभ यात्रा काढली जाणार आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर,धाराशिव.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी दिले जाणारे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार काल जाहीर झाले. २०२२ या वर्षासाठी प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना आणि २०२३ या वर्षाचा पुरस्कार आसामी कवी निलमकुमार यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ८१२ कोटी मंजुर केले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येणार आहे. उर्वरीत चार लाख शेतकर्यांची माहिती पुढच्या दोन दिवसात भरण्यात येणार असून, पिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे.
अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात उद्या नऊ जानेवारीला प्राचार्य बी. के. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे.
नांदेड इथं भरवण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानाच्या मिनी सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात हस्तनिर्मित वस्त्रे तसंच वस्तू, खाद्यपदार्थ, मसाले, आदी उत्पादनाची दालनं लावण्यात आली आहे. १० जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुलं राहणार आहे.
रस्ते सुरक्षेबाबत मुलांनीच आपल्या पालकांना शिक्षण देण्याची आवश्यकता वाटत असल्याचं, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी म्हटलं आहे. काल रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. गेवराई इथं लालबहादूर शास्त्री चौकात या अभियानाची कालपासून सुरुवात करण्यात आली, यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत रब्बी हंगाम २०२४ साठी शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी येत्या १५ जानेवारी पर्यंत नोंदणी करता येणार आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या नोंदणीसाठी अर्ज करावा, असं आवाहन लातूर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव यांनी केलं आ��े.
धाराशिव जिल्ह्यातल्या तेरणा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या दुरुस्ती कामाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल पाहणी केली. हे काम अंतिम टप्प्यात आलं असून, त्यामुळे परिसरातल्या सात गावांमधलं दीड हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय दिव्यांग शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन काल अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या २० दिव्यांग शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
पूर्णा - जालना आणि जालना - नांदेड या गाड्यांच्या क्रमांकात तसंच जालना - नांदेड या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हे सर्व बदल आजपासून लागू झाले. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन रेल्वे व्यवस्थापनानं केलं आहे. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रोटेगाव आणि परसोडा स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाची देखभाल - दुरुस्ती करण्यासाठी उद्यापासून १७ जानेवारीपर्यंत लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान तर नगरसोल-नरसापूर एक्सप्रेस नगरसोल ते लासूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. याच काळात मुंबई -नांदेड तपोवन एक्सप्रेस दोन तास उशीरा धावणार आहे. दरम्यान, नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज तिची नियोजित वेळ सकाळी साडे नऊ ऐवजी दुपारी तीन वाजता नांदेडहून सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
0 notes
Text
शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार , पंजाब हरियाणा पाठोपाठ ‘ ह्या ‘ राज्यातील शेतकरी तयारीत
शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार , पंजाब हरियाणा पाठोपाठ ‘ ह्या ‘ राज्यातील शेतकरी तयारीत
शेतकरी आंदोलनाचा पुन्हा एकदा केंद्र सरकारने धसका घेतलेला असून पंजाब हरियाणा येथील शंभू बॉर्डर इथे आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना हटवण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात सहा शेतकरी नेते जखमी झालेले आहेत. पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच करण्याचा निर्णय ��ेण्यात आलेला असून सुमारे दहा हजार शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. शेतकरी आंदोलकांनी…
0 notes
Text
बिग बॉस मराठी दिवस तिसावा: घरात दुष्मन कोण?
���बिग बॉस मराठी’च्या नवीन सीझनने प्रेक्षकांना पुन्हा एकदा खि��वून ठेवले आहे. प्रत्येक भागासोबत स्पर्धा आणखी तीव्र होत चालली आहे, आणि घरातील सदस्यांच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागला आहे. कालचा दिवस खूपच उत्साहवर्धक ठरला, विशेषत: भाऊच्या धक्क्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले. निक्की आता खेळात एकटी पडली आहे. इरिनाच्या बाहेर पडल्यानंतर ती स्वतःला सांभाळत एक नवीन खेळ खेळण्याच्या तयारीत आहे. परंतु,…
#Aarya Jadhao#Abhijeet Sawant#Arbaaz Patel#Bigg Boss#Bigg Boss Marathi#Bigg Boss Marathi Season 5#Nikki Tamboli#Paddy Kamble#Pandharinath Kamble#Vaibhav Chavan
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/criminals-in-preparation-for-robbery-grinned-five-accused-were-taken-into-custody/
0 notes
Text
परिस्थिती सेम, काँग्रेसचा गेम? चव्हाण डाव टाकण्याच्या तयारीत; राज्यसभेचं गणित बिघडणार?
मुंबई: जून २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. पुरेसं संख्याबळ नसूनही भाजपनं राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार दिला. महाविकास आघाडीची किती मतं फुटतात याची चाचपणी या निमित्तानं भाजपनं करुन पाहिली. भाजपनं तिसरा उमेदवार देत निवडणूक चुरशीची केली. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेगवार संजय पवारांचा पराभव झाला होता. गेल्या दीड वर्षांत परिस्थिती बरीच…

View On WordPress
#Ashok Chavan#chandrakant handore#rajya sabha election#अशोक चव्हाण#चंद्रकांत हंडोरे#राज्यसभा निवडणूक
0 notes
Text
महाराष्ट्र सरकार राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा धक्का देण्याच्या तयारीत,परवडणाऱ्या घरांना चालना देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय I Real Estate News
राज्याच्या गृहनिर्माण धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा सरकारचा विचार ..

#mhada lottery2023#breaking news#mhada#mhadalottery#mhadanews#news#latest news#mumbai#digital marketing company in pune#marathi news
0 notes
Text
Israel: इस्रायल गाझा 'काबीज' करण्याच्या तयारीत!
https://bharatlive.news/?p=188639 Israel: इस्रायल गाझा 'काबीज' करण्याच्या तयारीत!
इस्रायलचे पंतप्रधान ...
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/the-grins-of-criminals-in-preparation-for-a-robbery-three-of-them-ran-two-of-them-were-hit-by-shackles/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
एचएमपीव्ही संसर्गाबाबत घाबरू नये; मात्र खबरदारी घेण्याबाबत राज्यशासनाचं आवाहन
राज्यातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य
भंडारा जिल्ह्यात वाघाच्या शिकार प्रकरणी तीन जणांना अटक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
आणि
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेनं प्रारंभ
****
एचएमपीव्ही संसर्गाबाबत घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन राज्यशासनानं केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा नवीन आजार नाही, गेल्या वर्षभरात देशात या आजाराचे रुग्ण आढळले होते, ते सर्व रुग्णालयात दाखल न होता बरे झाल्याचं आबिटकर यांनी सांगितलं. ते म्हणाले –
आय सी एम आरनं ज्या वेळेला भारतामध्ये फेब्रुवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये संभाव्य एच एन पी व्ही च्या विषाणूची आठ हजार बावन नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या. या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये एकूण १७२ पॉझिटीव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या आहेत. फेब्रुवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये ही सर्व प्रकरणं सौम्य होती. आणि त्याप्रमाणे या कुठल्याही पेशंटला ॲडमिट न करता सुद्धा यातला कुठलाही पेशंट न दगावता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते बरे झालेत.
या आजाराबाबत अनावश्यक भीती बाळगू नये, असं सांगताना, माध्यमांनी यासंदर्भातली वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवण्याचं आवाहन आबिटकर यांनी केलं.
हा आजार नवीन नाहीये. किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होतोय अशातला भाग नाही. फक्त काळजी घेणं आणि सुरक्षित पद्धतीनं त्याच्यावरती उपचार करणं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा, माझी मिडीयाला सुद्धा विनंती आहे की, आपण सगळ्यांनी याबाबतची वस्तुस्थिती लोकांना सांगू या. केंद्र शासानाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतोय. खूप चांगली टीम आपल्याकडची तयार आहे. त्या सगळ्या टीमचा आपण उपयोग करू या. आणि या एकूण आजाराची जी काही अनावश्यक भीती आपण बाळगतोय ती अनावश्यक भीती न बाळगता जे पेशंटस् असतील त्यांना आपण राईटली ट्रीट करण्यासाठी आपण सगळे जण काम करू या.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलतांना, राज्यात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे. तरीही सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी औषधांसह ऑक्सिजन आणि आवश्यकता वाटल्यास विलगीकरण व्यवस्थेच्या तयारीत राहावं, आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्यात अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय-घाटीमध्ये सर्व व्यवस्था उपलब्ध असून, कोविड व्यवस्थापनाचा अनुभव असल्यानं, कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांनी म्हटलं आहे.
सद्याच्या स्थितीमध्ये हा आजार जो आहे, इतका जास्त धोकादायक नाही. यासाठीची संपूर्ण व्यवस्था छत्रपती संभाजीनगर येथील घाटीमध्ये उपलब्ध आहे. कुठल्याही प्रकारची भीती सध्याच्या स्थितीमध्ये नाहीये. आणि भविष्यामध्येही येणार नाही. आपण कोविडचा चांगल्या प्रकारे मुकाबला केला आहे. गरज भासली तर रूग्णालयात येऊ उपचार घ्यावेत. कुणी स्वत:च्या मनाने यासाठी औषध उपचार घेऊ नये.
****
हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात खबरदारी म्हणून, २४ खाटांचा अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला असून, उपजिल्हा रुग्णालय तसंच ग्रामीण रुग्णालयातूनही काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे.
****
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भविष्यात केबल कार प्रकल्प राबवण्यास केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश गडकरी यांनी या विभागाच्या सचिवांना दिल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील सर्व अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम जाहीर केला. प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करण्याच्या कामांबाबत त्यांनी सविस्तर सूचना केल्या. यासंदर्भात काय कार्यवाही केली याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. येत्या १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. वाहनावर फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला कोणत्याही माध्यमातून दुप्पट पथकर भरावा लागेल. राज्यात एमएसआरडीसीचे ५० पथकर नाके तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे २३ पथकर नाके आहेत.
****
भंडारा जिल्ह्यात एका वाघाची शिकार केल्या प्रकरणी आज तीन जणांना पोलिसांनी अटक केली. तुमसर वनविभागाचे कर्मचारी काल झंझेरिया बिटमध्ये गस्त घालत असताना एका तलावाजवळ एका मादी वाघाची मान, धडाचे दोन तुकडे, शेपटीचा एक भाग असे चार तुकडे कापलेल्या अवस्थेत सापडले होते. त्या प्रकरणी आज ही कारवाई करण्यात आली.
****
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं खासगी डेटा सुरक्षा नियमावलीचा मसूदा जाहीर केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना पुढच्या महिन्याच्या १८ तारखेपर्यंत माय गोव्ह च्या माध्यमातून या मसुद्यावर प्रतिक्रिया देता येणार आहेत.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. २०२२ या वर्षासाठी प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना आणि २०२३ या वर्षाचा पुरस्कार आसामी कवी नीलम कुमार यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
अमेरिकन मेरिट कौन्सिलने प्रदान केलेला गौरव अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निश्चितच भूषणावह असल्याचं, निवडणूक आयोगाचे आयुक्त सुखविंदर संधू यांनी केलं आहे. ते आज शिर्डी इथं बोलत होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संधू यांच्या हस्ते कौन्सिलचं गौरवपत्र स्वीकारलं. स्वीप - मतदार जनजागृती उपक्रमांतर्गत राबवलेल्या विविध नावीन्यपूर्ण संकल्पनांमुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचं जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितलं.
****
श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज घटस्थापनेनं प्रारंभ झाला. संबळाचा कडकडाट, तुतारीचा निनाद आणि आई राजा उदोच्या गजरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. तत्पूर्वी, आज पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या नवरात्रोत्सवात प्रमुख मानली जाणारी जलकुंभ यात्रा ११ जानेवारीला काढण्यात येणार असून, शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहेत.
****
अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात परवा नऊ जानेवारीला प्राचार्य बी. के. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमाकांना रोख रक्कम आणि ढाल असं पुरस्काराचं स्वरूप असलेल्या या स्पर्धेत राज्यातल्या वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे.
****
लातूर इथं येत्या १०, ११ आणि १२ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय मराठवाडा शैक्षणिक महासंमेलन आणि प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश झुरळे यांनी आज लातूर इथं ही माहिती दिली. या महासंमेलनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी मुलाखती आणि तज्ज्ञांच्या व्याख्यानांसह, नाविन्यपूर्ण, अद्ययावत, शैक्षणिक साधनांचे १०० पेक्षा अधिक स्टॉल्स पाहता येणार आहेत.
****
नांदेड इथ भरवण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानाच्या मिनी सरस विक्री प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात हस्तनिर्मित वस्त्रे, खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, मसाले, सजावटीच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या उत्पादनाची दालनं लावण्यात आली आहे. येत्या १० जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुलं राहणार आहे.
****
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांविरोधात शासनाने कारवाई करावी, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे नेते बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. ते आज बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सरपंच हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
****
रस्ते सुरक्षेबाबत मुलांनीच आपल्या पालकांना शिक्षण देण्याची आवश्यकता वाटत असल्याचं, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी म्हटलं आहे. आज रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. गेवराई इथं लालबहादूर शास्त्री चौकात या अभियानाची आज सुरुवात करण्यात आली, यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली.
****
पूर्णा जालना आणि जालना नांदेड या गाड्यांच्या क्रमांकात तसेच जालना नांदेड या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हे सर्व बदल आजपासून लागू झाले. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन रेल्वे व्यवस्थापनानं केलं आहे.
दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रोटेगाव आणि परसोडा स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाची देखभाल - दुरुस्ती करण्यासाठी उद्यापासून १७ जानेवारीपर्यंत लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस धर्माबाद ते नांदेड दरम्यान तर नगरसोल-नरसापुर एक्सप्रेस नगरसोल ते लासुर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, याच काळात मुंबई -नांदेड तपोवन एक्सप्रेस दोन तास उशिरा धावणार आहे, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाने कळवलं आहे.
****
0 notes
Text
आता सोशल मीडियाचा गळा घोटण्याच्या तयारीत केंद्र सरकार , देशविघातक ठरवायचं अन..
आता सोशल मीडियाचा गळा घोटण्याच्या तयारीत केंद्र सरकार , देशविघातक ठरवायचं अन..
इलेक्ट्रॉनिक मीडिया गोदी मीडिया बनलेला असल्याने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करण्यापलीकडे नागरिकांना आता पर्याय राहिलेला नाही अशा परिस्थितीत सोशल मीडियावर देखील आक्षेपार्ह मजकूर ठरवून नागरिकांचा आवाज पुन्हा एकदा दाबण्याचा प्रयत्न केंद्राकडून होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत बोलताना ,’ सोशल मीडियावरील कायदे अधिक कठोर व्हावेत म्हणून…
0 notes
Text
मोसादच्या हेरांचा पुन्हा एकदा भीम पराक्रम...
ज्यूंविरोधातला सायप्रसमधील मोठा दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी मोसादच्या हेरांनी थेट इराणमध्ये घुसून दहशतवादी संघटनेच्या मास्टरमाईंडचं अपहरण केलं आहे. दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या या मास्टरमाईंडचं नाव युसेफ शाहबाजी अब्बासलिलू असं आहे.दरम्यान, मोसादने याबाबत एक निवदेन जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, इराणच्या हद्दीत जाऊन मोसादने एक धाडसी मोहीम फत्ते केली आहे. याअंतर्गत मोसादने…

View On WordPress
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/five-arrested-with-deadly-weapon-in-preparation-for-robbery-7-lakh-thirty-thousand-740-rupees-seized/
0 notes
Text
अश्विन सांघी यांनी लिहिलेले 'चाणक्याचा मंत्र'
ग्रीसचा राजा अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी निघालेला असतो आणि आता भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत असतो. अशावेळी त्याचा एकजुटीने मुकाबला करायचा सोडून भारतातील गांधार, मगध, कैकेय इत्यादी मोठी राज्ये आपापसात लढण्यात गुंग होती. परकीय शत्रू सीमेवर येऊन ठेपलाय याचे काहीही गांभीर्य त्यांना नव्हते. अशा वेळी त्यांन��� एकत्रित करण्याचा प्रयत्न चाणक्य करतो. मगध सारख्या बलाढ्य साम्राज्याचा राजा धनानंदला यामध्ये…

View On WordPress
0 notes